गाभा:
नाशकात स्वागत कमान कोसळून ४ ठार
पुण्याजवळ क्लोरिन गॅसगळती
ट्रक दरीत कोसळून ५ मृत्युमुखी
मायणी पक्षी आश्रयस्थानास आग
तळोजाच्या आगीत करोडोंची हानी
वरील सर्व बातम्यांसाठी सौजन्य: म.टा.
वरील सर्व बातम्यां या आग, अपघात, मृत्यू याबाबत आहेत. इथले काही भविष्यवेत्ते नेहमीच त्यांच्या परीने लोकांना अगोदर सूचित करतात. त्यावर माझा कधी विश्वास बसत नाही. कारण अशा घटना दररोजच कुठे ना कुठे घडत असतात. पण आजच्या या एकूणच त्याच विषयांवरच्या बातम्या पाहून भविष्यवेत्त्यांचे इशारे गांभिर्यानं घ्यावेत काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
भविष्यवाल्यांची बाजू घेतली म्हणून कृपया तुटून पडू नये; दोन चार मिनीटे विचार करून मगच आपले म्हणणे मांडावे - त्यातून कुणावरही आरोप - प्रत्यारोप न होता साधक बाधक चर्चा झाल्यास काही नवीन माहिती मिळू शकेल.
प्रतिक्रिया
18 Jan 2011 - 4:40 pm | टारझन
अजुन काही
[संशोधन] अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आयचा घो!
[खुलासा] एकोळी धागे
सौजन्य : मिपा
18 Jan 2011 - 4:41 pm | नन्दादीप
रोज सकाळी भविष्य वाले टी.व्ही.वर सांगतात की आज अमूक अमूक राशीच्या माणसांना "अपघात संभवतो / धनलाभ आहे / घरच्यांचा सहवास लाभेल. ई. ई. "
पण अपघात होणार म्हणून काय त्या राशीच्या माण्सांनी बाहेरच पडू नये???? अपघात काय पाय घसरून, छत कोसळून पण होवू शकतो.
तर धनलाभ आहे म्हणून काय सर्वांनीच लॉटरी काढायची किंवा (मटका खेळायचा)
आणि परदेशात एकटा असतान घरच्यांचा सहवास कसा काय मिळनार बरे???
तात्पर्य : भविष्य ऐकावे/वाचावे जरूर, पण प्रत्येकाने आपल्याला हवा तसा अर्थ घ्यावा.
ऐकावे जनाचे, करावे मनाचे.
18 Jan 2011 - 4:44 pm | वाहीदा
का अश्या निराशाजनक बातम्या छापतात हे मटावाले ??
सकाळी सकाळी अश्या बातम्या वाचकांनी वाचाव्या ही अपेक्षाच निराशाजनक
बाकी भविष्यवाणीवर आपला जास्त अभ्यास नाही तेव्हा युयुस्तुंचा प्रतिसाद वाचण्यास उत्सुक ...
18 Jan 2011 - 4:46 pm | गवि
साधकपेक्षा बाधकच चर्चा होणार्से दिस्ते.
18 Jan 2011 - 4:48 pm | यकु
वरच्या अपघातात जीव गमावलेल्या लोकांनी "ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हजार वेळा ऐकले असेल आणि काहीही करायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले नसले तरी त्यांना दिनक्रमाप्रमाणे काहीतरी करावेच लागते.. सगळ्यांनाच करावे लागते...
आपल्याकडे विविध प्रकारच्या भविष्य कथनाच्या माध्यमातून अलार्मींग सिस्टीम आहे; पण ती तितकीशी अचूक ठरत नाही.. अडम धडम असते.. असे का? ज्योतिष अचूक का वर्तविले जाऊ शकत नाही? जाणकारांनी प्रकाश टाकावा..
18 Jan 2011 - 4:57 pm | गवि
कसे अचूक वर्तवणार ? पन्नास टक्के शक्यतेवर आधरित अंदाज वर्तवण्याची पद्धती १००% अचूक आउटपुट कशी देणार.
हे म्हणजे "टॉसने नेहमीच अचूक छापच का येत नाही? कधी छाप कधी काटा असे का बरे?" अशातले झाले.
असो. चालू दे..
(स्वतः नियतकालिकात काम करुनही तुला भविष्य कसे छापतात (यंदा तूळचं मीनला मीनचं वृषभला...) ते ठावूक नाही? ;) ह.घ्या.)
18 Jan 2011 - 5:01 pm | यकु
नाही ना.. ज्योतिष्य किंवा भविष्य किंवा तो जो काही प्रकार असेल तो शास्त्रच आहे असे छातीठोकपणे सांगणारे लेख मागे आले होते.. येतात..
इव्हन वैद्यकिय, सायंटीफिकल नॉलेजदेखील सुरूवातीला एक अंदाजच असतो.. त्यातही छातीठोकपणे काही सांगता येत नाही.. पण ते भौतिक गोष्टींबद्दल असल्याने चुकत चुकत प्रयोग करून सिध्द करता येते..
भविष्य हे जर शास्त्र असेल तर त्यात असले काही प्रयोग करता येतात का?
18 Jan 2011 - 7:18 pm | नन्दादीप
>>ज्योतिष्य किंवा भविष्य किंवा तो जो काही प्रकार असेल तो शास्त्रच आहे
मला वाटत ज्योतिष्य किंवा भविष्य हे एक ठोकताळे मांडण्याची कला आहे, जी ग्रह. तारे ई.ई.ची मदत घेते.
माणूस तर यंत्रांच्या मदतीने पण चुकीचे ठोकताळे सांगतात...(उदा. वेधशाळा), तर ज्योतिषी किस खेत की मुली...
18 Jan 2011 - 8:09 pm | Nile
हे वाक्य वाचले आणि तुम्हाला असे प्रश्न का पडावे याचे कारण कळाले, तुमच्या भविष्यात तुम्हाला सद्बुद्धीचा लाभ असेल अशी सदिच्छा!
18 Jan 2011 - 6:29 pm | आत्मशून्य
सोपी गोष्ट आहे. जर काळजीपूर्वक अभ्यासून व डोळे ऊघडून अंमलात आणली तर. तसेच भवीष्य हे शाश्वत असते ते जर तर वर बदलत नसते, त्या शक्यता नसतात तर फक्त घडणारे वास्तव असते. म्हणूनच त्याचे ज्ञान होवून फायदा होवू शकत नाही , अथवा घटना जाणून पूर्वतयारी करता येऊ शकत नाही . कारण ते अटळ असते आणी त्याप्रमाणेच घडत असते, काळ हा मनाचा खेळ होय. बाकी जे वर्तवले जाते ते भवीश्य न्हवे तर फक्त अंदाज असे म्हणतात कारण ते ज्ञानाने असंमृध्द असते. भवीश्य तंतोतंत अचूक वर्तवणार्या मनूश्याचे भौतीक जगातून लगेच लक्ष कायमचे ऊडून जाते.
18 Jan 2011 - 8:05 pm | स्वानन्द
प्रतीसाद आवडला. आणि तो पेंगू सुद्धा :) ( पुन्हा सांगतोय. पण लई आवडला म्हणून राहवलं नाही )
18 Jan 2011 - 6:11 pm | युयुत्सु
ज्योतिष मानवी जीवनातील चक्रीय वास्तवाची प्रतिकृती (मॉडेल) आहे, असे माझी अमेरीकन गुरु म्हणत असे. प्रतिकृती म्हणजे मूळ कृती नाही. त्यामूळे त्यात अचूकता येणं शक्य नाही.
बाकी एक प्रयोग म्हणून तुम्ही येत्या अमावस्ये पर्यंत पेपर मध्ये येणार्या बातम्यांवर लक्ष ठेवा... मंगळ-हर्षल योगात आगी आणि रेल्वे अपघात प्रामुख्याने घडून येतात.
18 Jan 2011 - 7:13 pm | चिरोटा
बरेचसे अपघात विकसनशील देशांत झालेले दिसून येतात्.विकसित देशांत जन्माला येणार्या लोकांचे ग्रह बरे असतात का?
असो.!
यशवंत, ईतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण जास्त आहे.कारण लोकसंख्या आणि बेफाम औद्योगिकीकरण.खालोखाल तामिळनाडू,बंगाल्,आंध्र. ईतर राज्यांमध्ये फार काही चांगली स्थिती नसली तरी अपघातांचे प्रमाण तुलनेत कमी आहे.
19 Jan 2011 - 12:05 pm | अनुराग
ईतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण जास्त आहे.कारण लोकसंख्या आणि बेफाम
सहमत
18 Jan 2011 - 10:59 pm | आत्मशून्य
मूळकृती ही कायम यूनीक असल्याने तीचे अचूक भवीष्य बघता येत नाही ह्या सीध्दांतासाठी काही अजून दाखले/पूरावे देता येतील काय ? कारण जर केवळ यूनीकनेस हाच घटक जर प्रेडीक्षन चूकायला भाग पाडत असेल तर आपण ज्योतीष हे एक शास्त्रा म्हणून अत्यंत प्रगत अवस्थेत पोचले आहे असेच म्हटले पाहीजे.
@चिरोटा
केवळ भौतीक सूखाच्या बाबतीत बोलायचे झाले तर हे खरे आहे असे आपल्याला वाटत नाही काय ?
18 Jan 2011 - 5:47 pm | Dhananjay Borgaonkar
मटा वाचणं सोडा. अतिशय दळ्भद्री वर्तमानपत्र आहे.
18 Jan 2011 - 5:55 pm | ५० फक्त
जेंव्हा कॉलेजात होतो तेंव्हा आम्ही असं करायचो
"आज तुम्हाला बेड्मध्ये " याच्या पुढे दॅनिक भविष्य वाचायचो,
उदा - आज तुम्हाला बेड्मध्ये - धनलाभ संभवतो / अपघात होउ शकतो / घरच्यांकडुन मानसिक त्रास / सहका-यांची मदत/ कॉटुंबिक सॉख्य / जुने मित्र भेटतील / वाहनापासुन धोका / परदेश प्रवास
आणि ते सुद्धा लायब्ररीत. कमित कमि ३० वेळा तरी हाकललं होतं आम्हाला तिथुन.
एकदा करुन पहा, लई मजा येते.
18 Jan 2011 - 7:01 pm | सुहास..
"आज तुम्हाला बेड्मध्ये " याच्या पुढे दॅनिक भविष्य वाचायचो, >>>
आम्ही यात थोडासा बदल केला होता " आज तुम्हाला बाथरुममध्ये " असे केले होते.
मज्जाच मजा !!
18 Jan 2011 - 11:36 pm | धनंजय
आज (१८ जानेवारी, २०११) अपशकुनी दिवस होता काय? मिसळपावावरचा तो धागा वाचायचा चुकला वाटते.
हल्लीच मिसळपावावर "३ फेब्रुवारी २०११ धोकादायक दिवस आहे" असे काहीसे वाचल्याचे आठवते.
कोणास ठाऊक. कदाचित रोजचा दिवस अपशकुनी असल्याचे धागे येत असावेत, आणि माझे लक्ष नसावे.
या "सकाळ" वर्तमानपत्रातल्या बातम्या
- - -
जानेवारी ९
ज्वेलर्सच्या दुकानावर मालाडमध्ये सशस्त्र दरोडा
काशिमिरा येथील व्यापाऱ्याची वज्रेश्वरी येथे निर्घृण हत्त्या
पनवेलमध्ये डॉक्टरची आत्महत्या
मानोरा- वर्धा येथे थंडीचे दोन बळी
"लिफ्ट' कोसळून पाच मजुरांचा मृत्यू
आईचा खून करून सालदाराची आत्महत्या
दौंडमध्ये अनैतिक संबंधातून अकरा वर्षांच्या मुलाचा खून
(संपले नाही)
- - -
जानेवारी १०
काळाचौकी परिसरात सात लाखांची घरफोडी
मासळ येथील आठ बालकांना विषबाधा
ट्रकच्या धडकेने महामार्ग पोलिस ठार
ऍपे रिक्षा उलटल्याने न्याहलीजवळ महिला ठार
(संपले नाहीत)
- - -
जानेवारी ११
जळगाव- विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू
(वगैरे, वगैरे - संपले नाही, कट-पेस्टचा कंटाळा आला.)
- - -
मी म्हणतो, मिसळपावाने मथळ्यावर "तीन्ही लोक आनंदाने..."च्या खालोखाल भविष्यवेत्त्यांचे एक वाक्य रोजचे टाकून द्यावे - "आज अपघात, आगी, खून, दरवडे वगैरे काहीही होऊ शकते. सावधान करण्याचे काम आम्ही केले. ऐकावे जनाचे, करावे मनाचे म्हणालात तर जबाबदारी तुमची"
म्हणजे आजचा दिवस अपघाती आहे, हे वेगळे सांगणारा धागा शोधायची गरज राहाणार नाही.
18 Jan 2011 - 11:59 pm | टारझन
धनंजय सर , बरोबर आहे. अशा बातम्या वाचुन दर आपण दिवसंच अपशकुनी ठरवणार असाल तर कसे ?
पोलिस टाइम्स वाचा रोज .. मग तर रोजचा दिवस पार माईंदळ अपशकुनी वाटेल . अहो , छोटे-मोटे शहरो मे छोटी-मोटी बाते होती रहती है .. जशा चांगल्या घटणा घडतात तशा वाईतही घडतात. अगदी रोज घडतात. त्यामुळे ह्यात भविष्याचा काही हात असेल असे वाटत नाही ;)
19 Jan 2011 - 9:16 am | गवि
पोलिस टाइम्स वाचा रोज .. मग तर रोजचा दिवस पार माईंदळ अपशकुनी वाटेल
Jabri comment... :) sahi..
19 Jan 2011 - 11:25 pm | उपेन्द्र
सहमत. ज्यात एकही वाईट बातमी नाही असे कोणतेही वर्तमानपत्र सापडणार नाही. किंवा कोणतीही वाईट घटना ही वर्तमानपत्रासाठी "बातमी" बनते हेच खरे.
20 Jan 2011 - 12:40 am | वाहीदा
तशा वाईतही घडतात
अहो आमच्या वाईला अश्या एकापाठोपाठ खुप सुखद अन खुप दु:खद घटना घडत नाहीत.(confusing statement)
बापरे ! गावी फोन केला पाहिजे
19 Jan 2011 - 11:02 am | युयुत्सु
श्री धनंजय,
तुम्ही नोंदवलेल्या निरीक्षणांची दोन स्पष्टीकरणे देता येतात.
- ४ जानेवारी २०११ ला झालेली अमवस्या पण अभद्र होती (सगळ्या अमावस्या अभद्र नसतात) आणि तुम्ही निरीक्षण केलेला काळ हा दोन अभद्र अमावस्या मध्ये येतो
- अपघात/मृत्यु दर्शक इतर अनेक योग सतत कार्यरत असतात. ते ज्या पत्रिके मध्ये सक्रिय होतात त्या पत्रिकाना त्रास अनुभवायला येतो.
- मी केलेले भाकीत जास्त मोठ्या प्रमाणात घडून येण्याची शक्यता असल्या कारंणाने मी ते वर्तवले आहे.
19 Jan 2011 - 8:42 pm | धनंजय
आता "सकाळ" पेपरातल्या सप्टेंबर २०१० महिन्यांच्या अंकांत जाऊया. (या तारखा निवडण्यासाठी काही विशेष कारण नव्हते. सकाळच्या "जुने अंक" सदरात या तारखा पहिले आल्या.)
- - -
सप्टेंबर १९, २०१०.
पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
बहीण-भावाच्या रडण्याने अपहरणाचा प्रयत्न फसला (टीप : या बहीणभावंडांना ग्रहयोग माहीत होता असे दिसते.)
विसर्जनादरम्यान एकाचा बुडून मृत्यू
एसटी महामंडळाकडून आदिवासी विद्यार्थ्यांची अवहेलना
कर्जाला कंटाळून शेतकरी पुत्राची आत्महत्या
तैवानला चक्रीवादळाचा तडाखा
...(संपले नाही)
- - -
सप्टेंबर २०, २०१०.
उत्तराखंडला पूराचा तडाखा; ७२ जणांचा मृत्यू
आकाशवाणीसमोर दुसऱ्यांदा भरदिवसा घरफोडी
"टीजेएसबी'ला 8 कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न (टीप : या बँक कर्मचार्यांना ग्रहयोग माहीत होता असे दिसते.)
रेल्वेतील महिला प्रवाशांना दोन लाखांचा फटका
स्वाइन फ्लूने बाळंतीण महिलेचा मृत्यू
कर्नाटकातील मंत्र्याची आत्महत्येची धमकी (टीप : येथे धमकी पूर्ण केली नाही, हे गंडांतर, असे काही लोकांना वाटत असावे.)
...(संपले नाही)
- - -
सप्टेंबर २१, २०१०.
बेवारसांविषयी मेयो, मेडिकलला दयामाया नाहीच! (टीप : हलगर्जीपणामुळे इस्पितळात रुग्णाचा मृत्यू.)
सिमल्यात २०० पर्यटक अडकले (टीप : मुसळधार पाऊस, पुरामुळे...)
हेलिकॉप्टर कोसळून 'नाटो'चे नऊ सैनिक ठार
मुंबईत शॉपिंग सेंटरला आग
...(संपले नाही, पण कट-पेस्टचा कंटाळा आला)
- - -
एकुणात काय, अभद्र अमावास्या नसेल, तर दुसरा कुठला अभद्र ग्रहयोग असेल. मिसळपावाच्या मथळ्यावर "आज अभद्र ग्रहयोग" म्हणून दररोज-कायमचे मोकळे व्हावे, म्हणतो. म्हणजे अभद्रपणा अमावास्येमुळे आहे, की दुसर्या कुठल्या ग्रहयोगामुळे आहे, त्या सर्वांना मथळा लागू होतेच.
19 Jan 2011 - 9:09 am | नरेशकुमार
भविष्य बदलता येउ शकते.
उदा : तुमचे मरण* तुम्हाला कळाले कि तुम्ही ते टाळु शकता.
मरण योग ३ प्रकाराचे असतात,
१. साधारण योग : हे काही शांति, होम वगेरे करुन टाळता येते
२. असाधारण योग: काही पुन्य कर्म पणाला लावुन हे पण टाळता येते
३. दैवी योग. (हे कधीच टाळता येत नाही, हे टाळण्याचा प्रयत्न केला तर विश्वाचा विनाश संभवतो). उदा राम अवतार समाप्ती
19 Jan 2011 - 9:58 am | गवि
नकु.. हे तीन प्रकार आणि कुठून मिळवलेत ?
19 Jan 2011 - 9:44 am | ५० फक्त
श्री. नरेशकुमार,
मरण टाळणे म्हणजे भविष्य बदलणे नाही हो, अहो मरण या सगळ्या जगण्याच्या कटकटीपासुन मिळणारी पुर्वनिश्चित सुटका असते.
या जगात न टाळता येणा-या गोष्टी दोनच - १. मरण
.
.
.
.
.
.
.
.
.
.
व २. इनकमटॅक्स
हर्षद.
19 Jan 2011 - 11:03 am | नरेशकुमार
हॅ हॅ हॅ,
तुम्हि मरण कसं टाळु शकता हे मी सविस्तर नंतर सांगेन
पन इनकमटॅक्स कसा टाळता येतो, हे काय मि सांगायला पाहीजे का राव.
स्वीस बँकेत कधी गेला नाय वाटतं तुम्ही.