गाभा:
१३ वी रास आल्याने प्रत्येकाच्या आधीच्या (जुन्या) राशी बदलल्या.
आता प्रश्न असे की...
१. राशी बदलल्या मुळे भविष्य पण बदलले का???
२. जर बदलते तर ललाट रेषांचे काय ? (म्हणजे लहान पणी ऐकल्याप्रमाणे नशीब्/भाग्य/ललाट रेषा कधीच बदलत नाहीत, जे नशीबात असत ते होत.)
३. जर भविष्य बदलत नसेल किंवा थोडेफार बदलत असेल तर "सर्व राशींचे भविष्य इकडून तिकडून सारखेच असते काय???
४. या आधी १३वी रास का वगळली गेली?? (१३ क्रमांक अशुभ म्हणून?)
५. जर ती वगळली होती होती तर ती आत्ता परत का सामाविष्ट केली?
प्रतिक्रिया
16 Jan 2011 - 4:43 pm | स्वानन्द
ही आणि कुठली नवीन रास? कधी आली? कोणी शोधली?
16 Jan 2011 - 5:09 pm | नन्दादीप
मला पण जास्त महिती नाही हो..
पण हे घ्या...इथे अधिक माहिती मिळेल.
http://www.astrology.com/13th-zodiac-sign-and-has-your-sun-sign-changed/...
आणि विकी वर पण अधिक माहिती आहे.
18 Jan 2011 - 11:13 am | गुंडोपंत
मराठी विकीवर नाही मिलाली मला ही माहिती. द्याल का?
16 Jan 2011 - 4:53 pm | गवि
अहो. कुठल्या गोष्टीला लॉजिक लावायचा प्रयत्न करता आहात?असे प्रश्न या शास्त्रात अर्थहीन आहेत.जन्म म्हणजे नेमका कधी धरायचा?एकाच अपघातात मेलेल्यांचा मृत्युयोग एकत्रच कसा?असे 1000 प्रश्न काढता येतात.त्याला उत्तर म्हणून तुमचा अभ्यास कसा कमी आहे हेच ब-याचदा दाखवलं जातं.
असो.चालूदे.
16 Jan 2011 - 4:56 pm | नन्दादीप
अक्षी बरूबर बोल्लात तुमी गवि भौ...
16 Jan 2011 - 5:59 pm | स्वानन्द
कदाचित ह्या राशीची कमतरता असावी... म्हणून इतके दिवस जमलं नसेल ;)
बाकी, आईन्स्टाईन ने E=mC^2 सांगितल्यावर 'Law of Conservation of Energy' हा 'Law of conservation of mass & energy' असा बदलला गेला. :)
16 Jan 2011 - 9:09 pm | टारझन
कोणते तरी मंत्र पुटपुटुन करोडो मैलांवरच्या ग्रहांची शांती होते , हे पाहिले तेंव्हा अंमळ हसु फुलले होते :)
- प्लुटोझन
16 Jan 2011 - 10:52 pm | आत्मशून्य
शांती भंग करता हेपाहून सूध्दा अंमंळ जास्तच हसू येते :)
- टंकण
17 Jan 2011 - 1:02 am | chipatakhdumdum
नावाप्रमाणे प्रतिसाद.
16 Jan 2011 - 11:54 pm | मी-सौरभ
१३ वी आली ती ईंग्रजी रास.
आपली असते ती चंद्ररास :)
कशाला फुकट डोक्याला कल्हई करुन घेता राव??
17 Jan 2011 - 5:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
१३ वी रास 'आल्या'मुळे सगळ्यांच्याच राशी कशा काय बदलणार?
रास म्हणजे काय?
सूर्याचा आकाशात दिसणारा (भासमान) भ्रमणमार्ग १२ (याला इंग्लिशमधे एक्लिप्टीक म्हणतात. मराठी शब्द?) समान भागांमधे विभागला आहे. तो प्रत्येक भाग म्हणजे एक रास. या प्रत्येक भागाला एक नाव दिलं आहे, उदा: मेष, वृषभ, मिथुन, ... मकर, कुंभ, मीन. ही नावं आली आहेत ती आकाशाच्या त्या-त्या भागातल्या तारकासमूहांच्या नावांवरून. आकाशात एकूण असे ८८ तारकासमूह आहेत असं आता मानलं जातं.
वर्षाचा काही काळ असा येतो की सूर्य या नेहेमीच्या १२ राशींपैकी एकाही राशीत नसून (वृश्चिक आणि धनु राशींच्या मधे) भुजंगधारी/Ophiuchus या तारकासमूहात असतो. भुजंगधारीप्रमाणे Cetus (मराठी नाव?) या दक्षिणेकडील (मीन आणि मेष यांच्यामधे) तारकासमूहातही सूर्य काही दिवस असतो.
या १३ (किंवा १४) व्या राशींमुळे इतर लोकांच्या राशी बदलण्याचं काही कारण नाही. आणि रास बदलली तर बदलली, काय फरक पडणारे त्यामुळे?
17 Jan 2011 - 8:30 am | स्वानन्द
>>वर्षाचा काही काळ असा येतो की सूर्य या नेहेमीच्या १२ राशींपैकी एकाही राशीत नसून (वृश्चिक आणि धनु राशींच्या मधे) भुजंगधारी/Ophiuchus या तारकासमूहात असतो.
पण मग आधी जे म्हटलंय की १२ समान भागात विभाजन केलेलं आहे; ते चूक होतं का? म्हणजे इतके दिवस, हा तेरावा भाग गृहीतच धरला जात नव्हता का? तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर ही रास आल्यानी बाकी कुणाची रास बदलण्याचं कारण नाही, तर त्याचा अर्थ असाच होतो ना, की मुळातच १३ समान भाग करून ठेवले होते, आणी त्यातल्या फक्त १२ राशीच प्रकाशित केल्या होत्या. आणी आता फक्त १३ व्या राशीला प्रकाशित करण्यात येत आहे!
आणखी एक शंका: चंद्ररास आणी सूर्यरास यात काय फरक आहे?
18 Jan 2011 - 11:24 am | गुंडोपंत
तुमच्या लिखाण मराठी विकिवर चढवले तर चालेल काय? परवानगी देता का?
खरं तर जरा जास्त विवेचन केलेत तर चांगला लेख होईल याचा. करताय?
17 Jan 2011 - 7:02 am | नरेशकुमार
रास म्हनजे काय ?
17 Jan 2011 - 9:38 am | बिपिन कार्यकर्ते
'रास' नावाचे सुमा करंदीकरांचे पुस्तक आहे. छान आहे. नुकतेच वाचले. या राशीपेक्षा ती रास जास्त चांगली आहे.
17 Jan 2011 - 9:53 am | स्पा
रास = भरपूर
(उदाहरण :- बाला, रास दारू आनली हाय तिक्र)
17 Jan 2011 - 11:37 am | गवि
शिवाय,
रास न आया मुझे सपना बहार का.
यार ने ही लूट लिया घर यार का..
.....
वफा ना रास आई..
....
पण हे राष्ट्रभाषेत झाले. तरी चालून जावे.
17 Jan 2011 - 11:50 am | नरेशकुमार
हिन्दि लिहिलेले वाचुन खुप तरास झाला
17 Jan 2011 - 11:55 am | स्पा
अजून एक :- रावणाने लंकेत सोन्याची रास उभारली होती नव्हे
राशीच्या राशी उभारल्या होत्या
17 Jan 2011 - 10:51 am | नगरीनिरंजन
कृष्णगोपी करायचे ती क्रीडा. रास-गरबा वगैरे.