ही पाककृती नाही. हा प्रकार मी पहिल्यांदा कुठे खाल्ला होता आठवत नाही; पण अत्यंत चविष्ट असतो. आणि करायला अत्यंत सोपा. हिवाळा संपताना मटारच्या शेंगा निबर होऊन बाजारात येणे बंद होईपर्यंत हा प्रकार सतत आमच्याकडे चालू असतो. या संकरीत मटार ऐवजी गावरान मटार जर मिळाली तर क्या कहने!
साहित्य १. किलोभर मटारच्या शेंगा २. तेल दोन चमचे ३. मीठ
सर्वप्रथम मटारच्या शेंगांची देठे काढून टाकावीत. फक्त हिरव्या असणार्याच शेंगा निवडाव्यात, निबर बाजूला काढाव्यात. या शेंगांमध्ये बिलकुल ओळखू न येणार्या हिरव्या आळ्या असू शकतात. त्यामुळे एक एक शेंग लक्ष देऊन निसणे मस्ट आहे.
एक कढई किंवा पातेले गॅसवर तापवत ठेवावे. गरम झालेल्या पातेल्यात निसून झालेल्या शेंगा टाकून वरून झाकण ठेवावे. दहा मिनीटांनी झाकण काढावे. शेंगांना वाफ सुटते. एकदा खालीवर करून घ्याव्यात. आता दोन छोटे चमचे तेल शेंगांवर टाकून पुन्हा एकदा खालीवर कराव्यात. पुन्हा एकदा झाकण लावून पंधरा मिनीटे वाफवू द्यावे.
पंधरा मिनीटांनी गॅस बंद करावा आणि आणखी पाच मिनीटे वाफ दबू द्यावी. गॅस बंद केल्यानंतर शेवटच्या पाच मिनीटांत मीठ टाकावे आणि वाफ दबायला ठेऊन द्यावे. आधीच मीठ टाकले तर मीठ विरघळून भांड्याच्या तळाशी चिकटते आणि नंतर पुन्हा एकदा मीठ टाकत बसावे लागते. पाच मिनीटांनंतर झाकण उघडले की शेंगांच्या सुगंधाने किचन भरून जाईल.
या शेंगा सबंध जशाच्या तशा ओरपून आत वाफवलेले वटाणे खायला खूप मजा येते.
प्रतिक्रिया
15 Jan 2011 - 6:45 pm | रेवती
छान आयडीया!
15 Jan 2011 - 6:52 pm | विंजिनेर
तूरीच्या शेंगा अशाच वाफावून खाणे - विशेषतः शेतातल्या ताज्या शेंगा ही एक चैन असते असे आमचे स्पष्ट मत आहे.
15 Jan 2011 - 7:10 pm | मस्त कलंदर
एकदम सोप्पं आणि आवडेलसं प्रकर्ण दिसतंय. भाजीसाठी आणलेल्या शेगांतले अर्ध्याहून अधिक दाणे अस्मादिकांच्या पोटात निवडतानाच जात असल्याने हे आवडणार यात शंकाच नाही..
निसणं म्हणजे नक्की काय करायचंय? शेंग पूर्ण न सोलता ती एका बाजूने उघडायची आहे का?
15 Jan 2011 - 7:39 pm | यकु
___/\ ____
म्हणजे त्यातला काडीकचरा, पाला, अवांतर असलेली देठे काढून टाकायची..
शेंगा सोलू नयेत..
15 Jan 2011 - 8:24 pm | मस्त कलंदर
शेंगांची फक्त टोके काढून त्या न उघडता आतल्या अळ्या दिसत नाहीत, म्हणून निसणं म्हणजे काय अपेक्षित आहे असा माझा प्रश्न होता. त्यात नमस्कार करण्यासारखं काय आहे हे मला समजलं नाही. एकाच गोष्टीसाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात एकदम वेगवेगळे शब्द असू शकतात.
असो. चालू द्या.
15 Jan 2011 - 8:38 pm | यकु
:O :-O :shock:
15 Jan 2011 - 7:28 pm | विसोबा खेचर
मस्त रे यशवंता.. :)
15 Jan 2011 - 8:03 pm | निवेदिता-ताई
अतिशय सुंदर आणी चविष्ठ प्रकार दिसतोय....
करुन पहातेच उद्या....
15 Jan 2011 - 10:34 pm | आत्मशून्य
कूल आयडीया हाय!
15 Jan 2011 - 11:30 pm | डावखुरा
एकच नं....एकनाथ राव उद्याच करुन पाहणार्[आईला सांगुन]
अशाप्रकारे कोवळ्या,ताज्या शेवग्याच्या शेंगा उकडवौन किंवा मायक्रोवेव्ह ओवन मध्ये दहा मिनिटं ठेवुन पण भारी लागतात....
आणि शेतात फिरताना...तुरीच्या ताज्या शेंगा..ज्याने खाल्ल्या त्याच्याशिवाय कोणी ईमॅजिन पण नाही करु शकणार..
एकदा असेच कपाशीच्या शेतात फिरत होतो..
फिरुन झाल्यावर जायला लागलो तर काका म्हणाले काय रे [भुईमुगाच्या]शेंगा खाल्ल्या का?
मी म्हटले कुठेय?
त्यांनी मला परत कापुस लावलेल्या ठिकाणी नेले आणि म्हणे येड्या ईतका वेळ कशावर चालात होतास...
म्हणत चटकन एक झाड उपटले...आंतर्पीक भुईमुग होते...
15 Jan 2011 - 11:38 pm | यकु
लालसा,
आमच्याकडे पण वाटाण्याच्या पिकाच्या चार-दोन काकर्या मध्येच कुठेतरी कापसात सोडलेल्या असतात.
माहितगार गडी सोबत असला तरच हाती लागतात. :)
ता.क. एकनाथराव हे आमच्या पिताश्रींचं नाव आहे. (सं.मं. कृपया माझे नामांतर लवकर मंजूर करा..!)
16 Jan 2011 - 6:56 am | सहज
करुन पाहीला पाहीजे हा प्रकार!
16 Jan 2011 - 9:11 am | Nile
मटारच्या शेंगा लोखंडी चाळणीत भाजुनही मस्त लागतात. ह्यामुळे भुईमुगाच्या शेंगा भाजुन अन उकडुन खायचो त्याची आठवण झाली आणि चिडचीड झाली. :|
16 Jan 2011 - 12:00 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त!
16 Jan 2011 - 3:35 pm | कच्ची कैरी
तुरीच्या व भुइमुगाच्या शेंगा नेहमीच खाल्ल्या आहेत ,मटारविषयी कधी विचारच केला नाही . ह्या शेंगा नक्किच करुन बघेल .
16 Jan 2011 - 5:58 pm | अभिसरिका
मस्त आणी सोपी रेसिपी. फार पूर्वी मसाल्याच्या मटारच्या शेंगा खाल्या होत्या. एकदम अप्रतिम चव. नागपूर साईड्ला प्रसिद्द आहेत. कुणी त्याची रेसिपी सांगेल का ? नुस्त्या एकाबाजूने दातात धरून ओढायच्या. साल हातात राहून दाणे तोंडात येतात, माहित असल्यास क्रुपया रेसिपी द्यावी.
17 Jan 2011 - 9:48 am | चटोरी वैशू
मसाल्याच्या मटारच्या शेंगा .... मला वाटते वर आहे तिच कॄती करावी फक्त गॅस बंद करायच्या आधी ...त्यावर तिखट चवीनुसार घालावे.... एक -दोन वेळा पलटवून लगेच गॅस बंद करावा आणि कढई/पातेले/तवा गॅस खाली उतरवा नाहीतर भयानक ठसका लागु शकतो.... आमच्या कडे अशाच करतात ... माझ्या सासुबाई... : ) मस्त लागतात...
17 Jan 2011 - 11:49 am | परिकथेतील राजकुमार
तेज्यायला !
एक दिवस आधी तरी टाकायची होती हि पाकृ :(
असो..
देर इज आलवेज फर्स्ट टैम आलवेज नेक्स्ट टैम.. नेक्स्ट टैम.
रॉबिनहूड परा पांडे
17 Jan 2011 - 3:12 pm | गवि
याचीच पुढची एडिशन म्हणून मटार लसूण फ्राय नावाची अफलातून चीज बनवता / ऑर्डर करता येते.
संध्याकाळी उपयुक्त.