दाल,बाटी..
गव्हाची जाड कणीक (४ वाटी),मका पीठ (१ वाटी)..
पुर्ण ओवा..
ओवा-जिर्याची जाड पुड,हळद,मीठ,हिंग...गरम तेल टाकुन कालवुन घ्या..आणि मग थोडे थोडे पाणी टाकत भिजवा..(जास्त कडक नको..)
भिजवल्यावर चांगले मळुन घ्या..
त्यानंतर त्याचे ५-६ समान गोळे करुन घ्या..
त्यातील एक गोळा घेउन पोळपाटावर लाटुन घ्या..
आणि त्यावर तेल पसरुन घ्या..
आणि त्याची एकावर एक पुड करुन चौकोनी बट्टी करुन घ्या..खालीलप्रमाणे..
अशाप्रकारे सर्व बट्टी तयार करुन घ्या...
आणि त्यानंतर चाळणीत किंवा ईडली पात्रात बट्ट्या वाफवुन घ्या.. वेळ १५-२० मि.
(चाळणीत वाफवताना चाळणी मावेल एवढी पातेली घेउन त्यात पाणी टाकुन त्यावर चाळ्णी त्यात बट्ट्या..आणि वर झाकण)
ते वाफवुन होते तोवर..
आमसुल आणि गुळ पाण्यात उकळवुन घ्या..
आणि तुरदाळ पण शिजवुन तयार ठेवा..
वाफवुन झाल्यावर थोड्या निवल्यावर त्याचे तुकडे करुन घ्या..
तुकडे करण्याची पद्धत..
व्यवस्थित तुकडे झाल्यावर तेलात तांबुस-सोनेरी रंगावर तळुन घ्या..
कच्च्या बट्टीत आणि तळलेल्या बट्टीत साधारण एवढा फरक दिसला पाहिजे...
वरण-
फोडणीला जिरे,मोहरी,कढीपत्ता,तेल...
नंतर त्यात लाल तिखट व थोडा मसाला घाला...हे थोडे परतुन झाल्यावर...
बट्टी वाफवत असताना तयार केलेले गुळ-चिंचेचे पाणी त्यात घाला.. आणि एक मिनिटानंतर त्यात पुर्वी शिजवलेली थोडी दाळ टाका...आणि बाकीची दाळीचे वरण ब्लेंडर/रवीने घोटुन घ्या...
नंतर हे घोटलेले मिश्रण फोडणी व मसाल्यात ओतुन घ्या..आणि थोडेसे ढवळुन घ्या मग त्यात चवीपुरते मीठ..आणि ताजी कोथिंबिर..(सुगरण)..
हे झाले दर्शनी ..पण खायला बसल्यावर कसले काय..
मस्तपैकी बट्टी मोडुन घ्या...
दाल-बाटी...आणि शुद्ध देसी गावराणी तुप..
याखेरीज..कैरीच्या लोणच्या सोबत किंवा गार झालेली बट्टी दुधात मोडुन पण चांगली लागते..
प्रतिक्रिया
12 Jan 2011 - 6:28 pm | टारझन
मस्त दिसत्ये डिश. यम्मी आहे का ?
बाकी दुकानातुन पदार्थ विकत आणताणाचा फोटु नाही टाकलात सुरुवातीला ? अर्थात कोणी कसं वागावं हे त्याला सांगण्याचा मला अधिकार नाही पण मी माझं निरिक्षण नोंदवलं.
12 Jan 2011 - 6:30 pm | मेघवेडा
हाण्ण! जबराट!
मायावतींच्या घरी खाल्ली होती.. आठवणीने मन भरून आले! माया, आपुन परत आ रैला है ब्येल्जममे..
12 Jan 2011 - 6:35 pm | अवलिया
रेडी टु सर्व्ह मिळत नाही का? ते आणून खावे. अर्थात कुणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले. या मताशी काही जण असहमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही
अरे हो ! डीश मस्तच... सुपर्ब !!
12 Jan 2011 - 6:38 pm | सहज
बाटी तेला ऐवजी भरपूर तूपात करतात, तसेच डाल मधे मिश्र डाळी, राजमा इ असते असे वाटते.
तरी तुम्ही केलेल्या मेहनतीला दाद आहेच!!!
अजुन येउ द्या!
12 Jan 2011 - 6:52 pm | डावखुरा
हे माहीत आहे हो..ह्याचे खुप प्रकार आहेत...हे आपले महाराष्ट्रीयन..
'दाल-बाटी' खाताना आधी गावराणी तुप ताटात घेउन मग त्यावर 'दाल' घेउन चारी बोटांनी भर्पुर घोटतात..मग त्यात बाटी चा 'चुरमो'..अस्सल राजस्थानी "दाल-बाटी-चुरमो" :)
सुचनेसाठी धन्यवाद..
12 Jan 2011 - 6:53 pm | पर्नल नेने मराठे
एवढे कश्ट करुन परत चुराच करायचा .. अर्थात कुणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.
:( भुक लागलिये.
12 Jan 2011 - 7:01 pm | सहज
मोठ्या लोकांना कडक बाटी पण घरातल्या लहान लहान मुलांना, दात पडलेल्या वयस्क व्यक्तिंना चुरमा. अर्थात कुणी का चुरमा करावा हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.
12 Jan 2011 - 6:43 pm | परिकथेतील राजकुमार
झ का स !
छत्तीसगडला असताना ३/४ वेळा हे खाण्याचा योग आला होता, अतिशय सुंदर पदार्थ आहे.
पुण्यात हा पदार्थ सहसा हॉटेलात का आढळत नाही काय माहिती ? अर्थात कुणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.
12 Jan 2011 - 7:09 pm | मुलूखावेगळी
मस्त
पन ही खानदेशी वाटतेय
लय फेवरेट आयटम आहे.
मारवाडी मैत्रिनीकडे २-३ दा खल्ली
पुन्यात कोठे मिळेल पत्त्ता द्या किन्वा
लालसा पुन्यातच राहत्त्तात का तुमचा पत्ता द्या
12 Jan 2011 - 7:28 pm | भाऊ पाटील
ही अस्सल खानदेशी दाळ-बट्टीच आहे.
12 Jan 2011 - 8:46 pm | रेवती
फोटूंमुळे समजण्यास सोपे गेले.
पाकृ छान सांगितली आहे.
याचे बरेच प्रकार असल्याने आपल्या आवडीप्रमाणे तो प्रकार करून खावा.
एका मैत्रिणीच्या आईने बाट्या अवनमध्ये बेक केल्या होत्या.
बाट्या दुमडताना त्यात बटाट्याचे चविष्ट सारण भरले होते.
बाकी लालसाभाऊ कधी बोलावताय दालबाटी खायला?;)
12 Jan 2011 - 8:48 pm | प्राजु
मी बाट्या अवन मध्ये बेक करते. आताही बेकच करेन पण नुसते कणकेचे गोळे करून बेक करण्याऐवजी अशा प्रकारे करून बघेन.
फोटो छान आले आहेत.
12 Jan 2011 - 8:49 pm | मीली
बाट्या मस्त कुरकुरीत दिसत आहेत .आणि डाळ पण आमसुलामुळे मस्त झाली असणार! फोटो पाहून लगेच खावेसे वाटत आहे.बाट्या करायची पद्दत नवीन वाटते आहे.करून बघावी लागेल.
स्टेप बाय स्टेप फोटो मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद!
12 Jan 2011 - 8:51 pm | पुष्करिणी
मस्त पाकृ. जरा कष्टाची आहे पण सविस्तर अतिशय चांगली सांगितली आहे.
मितान कडे नुकताच बाफला बाटी खायचा योग आला होता, ते ही खूप चविष्ट आहे.
12 Jan 2011 - 8:56 pm | स्वाती दिनेश
फोटो आणि पाकृ छान,
अवांतर- आमच्या मारवाडी मैत्रिणीच्या हातची दालबाटी खाल्ली नाही बरेच दिवसात,फोन केला पाहिजे तिला आता..
स्वाती
12 Jan 2011 - 9:00 pm | मितान
व्वा ! चविष्ट आणि थंडीसाठी इष्ट पाकृ ! आज करावी काय ??
12 Jan 2011 - 9:00 pm | डावखुरा
बट्टी ओवन मधे पण बेक करतात त्यासाठी स्पेशल त्या अंडाकृती ओवन पण येते..
गॅस ओवन,ईलेक्ट्रिक ओवन..माय्क्रोवेव्ह...पण ते एवढ्या कुरकुरित नाहि होत..
आणि जर तळणाचा काही त्रास असेल तर ओवन मधली बट्टी उत्तम..
पण अत्यंत पौष्टिक आणि रुचकर पदार्थ..
सर्व प्रतिक्रिया दात्यांचे धन्यवाद..
12 Jan 2011 - 10:31 pm | पिंगू
लालासा, ही बट्टी मी एकदा राजस्थानी हॉटेलात खाल्ली होती. सही लागते.. पुण्यात असशील तर जमव फड... मीपण येतो..
- पिंगू
13 Jan 2011 - 1:11 am | चिंतामणी
माझ्याकडे बट्टीचे पिठ आहे. कधी करायचे त्याबद्दल व्यनी कर.. :)
(इथे लिहीलेस तर फाटे फुटतील) ;)
13 Jan 2011 - 9:33 am | रोचीन
म्हणजे जाडसर दळलेलि कणिक का??
वेगळं काहि असेल तर कृती टाकाल का??
13 Jan 2011 - 8:52 am | ५० फक्त
अतिशय धन्यवाद डिटेल पाकक्रुती बद्दल आणि फोटो तर अतिशय मदतिचे आहेत.
पुणेकर मिपाकर,
हा पदार्थ पुण्यात जे एम रोडवरचं मयुर, भांडारकर रोडचं पंचवटी, कर्वे रोडचं थाट्बाट इथं मिळतो, पण कोणत्या दिवशी ते नक्की नसतं.
सग़ळेजण जायचं असेल् तर मी पंचवटी मध्ये बोलेन, पण किमान ६-८ जण तरी हवेत.
हर्षद.
13 Jan 2011 - 9:28 am | स्पंदना
पाक कृती आवडली , बनवुन बघेन.
धन्यवाद लालसा भाऊ!
13 Jan 2011 - 10:24 am | जोशी 'ले'
लाल्सा भौ ह्याला आम्हि बाफले म्हनतो, जर खान्देशी असाल तर बट्टी आणि फौजदारि वरना ची पा. क्रु. येउ द्या...
13 Jan 2011 - 10:40 am | स्नेहश्री
बाफले.....आम्ही ह्याला बाफले म्हणतो आणि गोल टिक्की केली की त्याला बाटी म्हणतो. आणि हे आम्ही तुपात तळतो...खरच तोंडाला पाणी सुटलय..सहीच..
कोणाकडे "दरब्याच्या लाडु ची" रेसिपी मिळेल काय?
13 Jan 2011 - 10:42 am | चटोरी वैशू
कालच बनवली होती तरिपण... पुन्हा तोंडाला पाणी सुटले....
दाल्-बाटी.... कर्वे रोडला एक स्वीट मार्ट आहे तिथे... तसेच एफ. सी. रोड, तु.पा. चौकाच्या पुढे एका स्वीट मार्ट मधे पण भेटते....
माझ्या मते शक्तिमान (टारझन) च्या घरी पण बनत असेलच (असे माझे मत आहे ...माफ करा)
13 Jan 2011 - 11:11 am | मुलूखावेगळी
दाल्-बाटी.... कर्वे रोडला एक स्वीट मार्ट आहे तिथे... तसेच एफ. सी. रोड, तु.पा. चौकाच्या पुढे एका स्वीट मार्ट मधे पण भेटते....
>> आठवले कर्वे रोड वर सागर स्वीटस
इथे तर उन्धियो पन मस्त मिळतो.
13 Jan 2011 - 10:48 am | ramjya
बाटी शेणाच्या गोवर्यावर भाजताना पाहिले आहे.....दाल बाटी, चुरमा नाव ऐकुन आहे
13 Jan 2011 - 10:52 am | ढब्बू पैसा
ह्याला बाफले म्हणतात. बाटी म्हणजे कणकेचे गोळे तुपात शॅलो फ्राय करतात. तसे करतांना कढईवर पाण्याचं झाकण ठेवतात. दाल बनवताना, मिश्र डाळींचा ही उपयोग करता येतो. "दाल" चवीला आंबट गोड असते. आणि सोबत गट्टे की सब्जी असायलाच हवी !
स्वतः मारवाडी असल्याने अधिकाराने बोलू शकते ;)
बाकी वरची कृती मस्तच!
13 Jan 2011 - 5:24 pm | इन्द्र्राज पवार
ढब्बू पैसा....
बाफले = समजले नाही
तुपात शॅलो फ्राय करतात = समजले नाही....आम्हाला फक्त मासा फ्राय करता हे माहिती आहे. (मराठा असल्याने)
मिश्र डाळ = माहित नाही
गट्टे की सब्जी = पाहिलेली नाही.
स्वतः मारवाडी असल्याने अधिकाराने बोलू शकते = हे मान्य.
बाकी, लालसाभाऊंची दालबाटी पाहूनच डोळे निवले. हा पदार्थ खास जळगाव धुळे भागातील असल्याने आम्हा कोल्हापुरकरांना त्याचे कौतुक वाटणार हे आलेच....तुमच्या भागातील 'पाचोरा' या गावच्या एका युवकाची गोवा ट्रीपमध्य अशीच एकदा ओळख झाली होती, त्यानेही असलाच पदार्थ कॅम्पमध्ये केल्याचे आठवते, पण त्याचे नाव लक्षात नाही.
[आमच्याकडे या बकर्या कोंबड्यांनी धुडगूस घातला आहे नुसता.....३०० रुपये किलो झाले तरी करवीरकर सहा वाजले की चालले डबा घेऊन खाटक्याकडे पाळीला].
इन्द्रा
13 Jan 2011 - 10:57 am | ५० फक्त
हो आत्ता आठवलं की यातल्या बाटी ह्या चुलीमध्ये भाजतात असं मी अॅकलं आहे, तो पण एक प्रकार किंवा पद्धत असु शकेल.
हर्षद.
13 Jan 2011 - 2:15 pm | पियुशा
आमच्या सारख्या नवशिक्याना छान रेसेपि मिळालि
धन्स हा लालसा
शनिवार चा बेत पक्का!
13 Jan 2011 - 2:23 pm | प्राजक्ता पवार
मस्तंच झाली आहे दाल - बाटी .
आजंच करेन :)
13 Jan 2011 - 2:24 pm | प्राजक्ता पवार
मस्तंच झाली आहे दाल - बाटी .
आजंच करेन :)
13 Jan 2011 - 2:26 pm | गणपा
खायची आहे एकदा.
आजवर नुसतच ऐकुन आहे.
एकट्यासाठी एवढा उपदव्याप करायचं जिवावर आलय. :)
13 Jan 2011 - 3:23 pm | डावखुरा
रोचीन बट्ट्यांचे ईतके प्रकार आहेत..त्यात बेसिक जाड कणीक असते मग त्यात मक्याचे पीठ आणि ईतरही काहि पीठे मिक्स करु शकतो याची सविस्तर माहिती आईला विचारुन सांगतो..
अरे वा हर्षद चांगलेच खवय्ये दिसतात की राव...मला वाटते गिरिजा(स.पे.टिळक रोड )ला ही मिळत असावे..कदाचित..पुण्यात असेल तर मी पण येईल पंचवटीला..
हर्षद,रमिया..तो भाजलेल्या बट्टीचा प्रकार तर एकदम खर्पुस आणि आरोग्यदायी तळण पण नाही ना..
सर्व प्रतिक्रिया देणार्यांचे फार्फार धन्यवाद!!
13 Jan 2011 - 4:52 pm | गवि
फोटोवरून अत्यंत टेस्टी असणार हे दिसतंच आहे.
झकास..
गुजराती थाळीत काहीवेळा तुपात लडबडलेले असेच दिसणारे काहीतरी देतात. ते खूप कडक असल्याने आवडले नव्हते. पण इथे मस्त दिसते आहे.
करुन पाहणार.
14 Jan 2011 - 8:14 pm | चिगो
अहो, जीव घेणार का तुम्ही ?
पदार्थ मस्त... आमच्याकडे विदर्भात असाच "पानगे/वाडगे" नावाचा प्रकार बनवतात. त्याच्यासोबत चुलीवर शिजवलेलं तुरीच्या डाळीचं वरण, त्यावर भरपुर तुप आणि सोबत आलू-वांग्याची भाजी.. व्वा... स्वर्ग ताटात उतरतो, राव..
14 Jan 2011 - 8:52 pm | डावखुरा
आमच्याकडे विदर्भात असाच "पानगे/वाडगे" नावाचा प्रकार बनवतात. त्याच्यासोबत चुलीवर शिजवलेलं तुरीच्या डाळीचं वरण, त्यावर भरपुर तुप आणि सोबत आलू-वांग्याची भाजी.. व्वा... स्वर्ग ताटात उतरतो, राव..
आता ह्या मेजवानीची आठ्वण देउन तुम्ही जीव घेताय..
खुप मस्त बेत असतो तो पण....अवतरु द्या एखादे वेळी मिपावर.....
14 Jan 2011 - 9:41 pm | अविनाशकुलकर्णी
बाटी शेणाच्या गोवर्यावर भाजताना पाहिले आहे...
गोव~या आणायला थेट स्मशान गाठावे लागेल..
16 Jan 2011 - 3:29 pm | कच्ची कैरी
चुलीत भाजलेल्या बट्ट्यांना रोडगे असेही म्हणतात्,आजीला फार छान जमतात.
16 Jan 2011 - 6:56 pm | बिपिन कार्यकर्ते
लालसा!!! जमवा एखादा बेत पुण्यात छानसा!!! नुसत्या फोटोवर समाधान नाही होत!
22 Jan 2014 - 12:21 pm | मृगनयना
फोटो का गंडले हो??