स्त्री ची आज पर्यंतची प्रतिमा : एक साधकबाधक चर्चा

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
12 Jan 2011 - 1:42 pm
गाभा: 

णमस्कार्स ल्लोक्स ,

आज चित्राताई चा स्त्रीमुक्ती वरचा एक सुंदर लेख वाचला. लेखाचं वैशिष्ट्य असं होतं की तो संतुलित होता, त्यात टिआरपीसाठी प्रक्षोभक असं काही नव्हतं , आणि मुख्य म्हणजे ते अतिशयोक्तिपुर्ण किंवा तिखटमिठ लावलेलं नसल्याने तुमच्या आमच्या पहाण्यातलं होतं . पण त्यावरचे काही काही प्रतिसाद पाहुन आमची अंमळ करमणुक झाली हा भाग निराळा :) ते प्रतिसाद जर खरे ठरले तर किती लग्न टिकतील ह्यावर देखिल शंका उत्पण्ण होते. नशिब आपलं की ह्या सगळ्या चर्चा फक्त वांझोट्याच असतात आणि कोणी हुशार इथले प्रतिसाद वाचुन त्याच्यावर अंमल करत नाही ( नसावा , कारण मिपामुळे काही झाल्याचं अजुन ऐकिवात नाही )

हं तर आमच्या चर्चेचा मुद्दा असा आहे की आजवर स्त्रीला लै दडपलं गेलं , तिच्यावर घोर , कृर आणि निर्दयी , अमानुश , पाषवी ( अजुन काय असेल ते ) प्रकारचे खुप अन्याय झालेले आहेत. आणि आजवर बहुतांश स्त्रीया भयंकर पिडीत् आहेत असे निष्कर्ष त्या प्रतिसादांतुन निघालेत. पण आपण बर्‍याचदा पहातो की उपहासाने का होईना कधीकधी फॅक्ट्स बाहेर पडतातंच . पुष्कळदा नवरोबांवर त्यांच्या डॉमिनेटींग बायकांची असणारी हुकुमत , नवरोबा अगदी पायातले ( की ताटाखालचे जे काय असेल ते ) मांजर आहे , त्याला बिचार्‍याला बायको समोर तोंड उघडण्याची हिम्मत / परवाणगी नाही . बायको चं नाव ऐकताच त्याला हिवाळ्यात घाम फुटतो किंवा अजुन जे काही असेल ते . ह्या प्रकारचे विनोद आपण टीव्हीवर , मिपावर , रेडिओ वर , हसरी सकाळ मधे किंवा आजचा विनोद मधे वाचतो पहातो . ह्यात काही तथ्य्य आहे का ? पाल चुकचुकण्याचे कारण असे की मिसळपावरील महिला मंडळ हे स्वत:च्या अस्तित्वासाठी , हक्कांसाठी आणि विचारांसाठी एकदम स्वतंत्र आहे ( नक्की खरं काय दिखावा काय ते त्याच जाणोत ) असे दिसते , त्यामुळे आजची स्त्रीची प्रतिमा म्हातारीच्या जाडभिंगाच्या चष्म्यातुन दिसते तशी आहे का ? हे बायका डॉमिनेट आहेत दाखवणारे किस्से मी अगदी बालपणापासुन ऐकत आलो आहे त्यामुळे ही काही अलिकडचीच गोष्ट आहे असे म्हणता येणार नाही.

तुम्हाला काय वाटते ? स्त्रीया डॉमिनेटिंग असतात की नाही ? नवरोबाला खेळणं बणवतात की नाही ? नवरोबांना बायकोच्या विचारांनीच धडकी भरते की नाही ? एक साधकबाधक चर्चा अपेक्षित आहे. :)

टिप : जास्त सिरियसली घेऊ नका. रक्तदाब वाल्यांनी चर्चेपासुन दुर रहावे ;)

(साधकबाधक चर्चा प्रेमी) टारझन चर्चील

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

12 Jan 2011 - 1:44 pm | यशोधरा

=)) धन्या आहात टारोबा! :)

टारझन's picture

12 Jan 2011 - 1:48 pm | टारझन

नाही नाही यशो , फक्त धन्य म्हणुन चालणार नाही . तुम्ही जशा स्त्रीयांची मुस्काटदाबी झाल्याची उदाहरणं देता , तसं नवरोबांची शेळी ( पक्षी : बोकड) झाल्याची उदाहरणं देऊन चर्चेस योग्य न्याय द्यावा.
आपला अनुभव , सामाजिक व्याप्ती आणि वाचन मनन प्रगल्भ असल्याची मला कल्पना आहे.

गप्पे! मी त्या लेखावर मोजके २-३ प्रतिसाद दिलेत, त्यातही कसलीही उदाहरणं दिलेली नाहीयेत. तुझा बोकड झालेला असेल तर तूच लिही उदाहरणं! :P

>>आपला अनुभव , सामाजिक व्याप्ती आणि वाचन मनन प्रगल्भ असल्याची >> गल्ली चुकलं की रे भावा. :)

आहो फक्त त्या धाग्यावरचं कशाला गृहित धरताय ? म्हणुनच मी "स्त्री ची 'आजची' प्रतिमा" न लिहीता 'आजपर्यंतची ' लिहीलंय . आणि आजवरचा इतिहास बघता तुम्ही ..... हॅहॅहॅ ..
माझा बोकुड व्हणार न्हाई , हो कधी कधी मी बोकड छाप दाढी जरुर ठेवतो :)

बाकी गल्ली बरोबर आहे ताईसाहेब :)

प्रतिसाद द्या. नाही तर अचानक नातलग मार्गाने प्रतिसाद मागेन :)

यशोधरा's picture

12 Jan 2011 - 2:35 pm | यशोधरा

बळंच? :) असो. चालूद्या.

मृगनयनी's picture

12 Jan 2011 - 1:56 pm | मृगनयनी

र्टारझन'जी, स्त्री-मुक्तीवादाबद्दल आपले मत वाचून अंमळ डोळे पाणावले! ;)

आपल्या या लेखामुळे आमचा "स्त्री-सुलभ-लज्जा" हा लेख इथे प्रकाशित करायचा विचर आम्ही पुढे ढकलला!

वास्तविक "लज्जा" ही एक सिरीयल एका मराठी चैनेल वरती सध्या चालू असून तिचा या लेखाशी काहीही सम्बन्ध नाही!

असो!.. अधिक प्रतिसादासाठी खाली जागा राखून ठेवत आहे!

__

__

__

__

-

टारझन's picture

12 Jan 2011 - 2:32 pm | टारझन

आपल्या या लेखामुळे आमचा "स्त्री-सुलभ-लज्जा" हा लेख इथे प्रकाशित करायचा विचर आम्ही पुढे ढकलला!

हा हा हा .. नयनी ला काहीतरी सुचतंय वाटतं =)) स्त्री-सुलभ्-लज्जा नसलेली कोणी पाहिलीस की काय ? =))

तुझ्या प्रतिसादासाठी अधिक झाला माझ्या प्रतिसादा खाली : )

मदनबाण's picture

12 Jan 2011 - 4:16 pm | मदनबाण

हा हा हा .. नयनी ला काहीतरी सुचतंय वाटतं =))
णाही णाही... हे काय चक्क नयनी ? परत एकदा णाही णाही !!! ;)

पण त्यावरचे काही काही प्रतिसाद पाहुन आमची अंमळ करमणुक झाली हा भाग निराळा ते प्रतिसाद जर खरे ठरले तर किती लग्न टिकतील ह्यावर देखिल शंका उत्पण्ण होते.
टारुशी या बाबतीत सहमत...

बाकी चालुद्या... ;)

मृगनयनी's picture

13 Jan 2011 - 12:33 pm | मृगनयनी

हे काय! मदनबाण! तुमचे नयनबाण अजून आमच्यावरच का! ;) ;) ;)

__________________________

असो!... पण टारझनजी, नक्की कुठे बरं उगम झाला असेल या स्त्री-मुक्ती चळवळीचा ? पामेरिया? अल्सेशिया? की पर्शिया? की अजून कुठे? ;) =)) =))

__________________________

जोक्स अ पार्ट, पण कोणतीही "मुक्ती" ही नक्की कोणत्या प्रकारची मानावी? शारिरीक की मानसिक (पक्षी: आत्मिक)

कारण मनाची शक्ती ही शारिरीक शक्तीपेक्षा केव्हाही जास्त असते! उदाहरणार्थः रामयणात सीता रावणाच्या कैदेत होती. तिला अशोकवनात ठेवलेले होते. रात्रंदिवस राक्षसिणींचा पहारा तिच्याभोवती होता. पण मनाने ती खंबीर होती. मुक्त होती. तिच्या मानसिकतेवर "रावण बन्धन घालू नाही शकला. म्हणजे सीतामाई बन्धनात असूनही मुक्त होतीच ना! तिच्या मनःसामर्थ्यामुळे रावण तिच्या केसालाही स्पर्श करू नाही शकला!

म्हणजेच मुक्ती म्हणजे- स्वैराचार नव्हे! स्त्री-मुक्ती चळवळ ही स्त्री-स्वैराचाराकडे झुकु नये... इतकेच वाटते!

कारण स्त्री आणि पुरुष या दोघांनाही एक्मेकांची गरज असते!... वेगवेगळ्या कारणांसाठी ... अर्थात यालाही काही अपवाद असू शकतात! ;)

त्यामुळेच स्त्रियांनी मानसिक मुक्तीची काही तत्वे पाळून जर आपापली कर्तव्ये निभावली, तर त्या जास्त सुखी होतील!... कारण जर स्त्री सुखी असेल.. तर पूर्ण कुटुम्ब सुखी होते! :)

टारझन's picture

13 Jan 2011 - 1:02 pm | टारझन

वा वा वा !! हॄदयजिंकु प्रतिसाद :) उगाचंच स्त्रीयांवर अण्याय होतोय , आणि नाही पटलं तर घ्या घटस्फोट ( हे फक्त दुसर्‍याला सल्ले देण्या करता असंतंय :) ) अशा बोबाटा करणार्‍यांनी णयणीचे ( मदणु , माईंड इट ) विचार घ्यावेत , आणि शिकावे :) वा ... सितामाईंचे उदाहरण एकदम समर्पक वाटते. त्यात काही खोट काढायला जागा नाही. पुरुषोत्तम समजलेल्या रामाला मात्र समाजासमोर नतमस्तक व्हावे लागले हा माझा पराभव आहे. परंतु रामाने कसे वागावे हे रामाला सांगण्याचा हक्क मला नाही , मी आपले एक निरिक्षण नोंदवले :)

सुरेख प्रतिसादाबद्दल धन्यवाद मृगनयनी जी .

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jan 2011 - 1:06 pm | बिपिन कार्यकर्ते

हे काय! मदनबाण! तुमचे नयनबाण अजून आमच्यावरच का!

=)) :)

तिच्या मनःसामर्थ्यामुळे रावण तिच्या केसालाही स्पर्श करू नाही शकला!

इथे मी असहमत आहे असे नम्रपणे नोंदवतो. :)

माझ्या माहितीप्रमाणे, रावण सीतेला बळाने प्राप्त करू शकला नाही कारण त्याला शाप होता की कोणत्याही स्त्रीवर बळजबरी केली तर त्याचे काहीतरी वाईट म्हणजे मृत्यू वगैरे होईल. अर्थात, सीतेच्या मनःसामर्थ्याबद्दल किंवा पातिव्रत्याबद्दल शंकाच नाही.

हे आले लगेच काड्या टाकायला ... आपली करामत पाहिली, अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले.
बोलणं जरुरी होतं का ?
अर्थात कोणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jan 2011 - 1:14 pm | बिपिन कार्यकर्ते

आमच्या शीतामाय बद्दल आसं कोनी ब्वाललं आन उगाच चुकिचा इतिहास पसरवला तर आमी गप बस्नार न्हाय! आन आमी नुस्तं नीरीक्षन नोंद्वून गप बस्नार न्हाय.

- सितेची बिग्रेड

आमच्या शीतामाय बद्दल आसं कोनी ब्वाललं आन उगाच चुकिचा इतिहास पसरवला तर आमी गप बस्नार न्हाय!

का ? आणि सो कॉल्ड स्त्रीमुक्ती मोर्चा स्त्रीस्वातंत्र्याविषयी इतिहासंच काय वर्तमानही चुकीचा पसरवतोय , तिथे का बरं गुपचुप +१ लावता? अर्थात तुम्ही कुठे काय लावता हे सांगण्याचा हक्क मला नाही . मी माझे एक निरिक्षण नोंदवले.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jan 2011 - 1:09 pm | परिकथेतील राजकुमार

अर्थात, सीतेच्या मनःसामर्थ्याबद्दल किंवा पातिव्रत्याबद्दल शंकाच नाही.

+१ सहमत आहे.
अर्थात कोणी मनःसामर्थ्य वापरावे आणि कोणी पातिव्रत्य हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी फक्त निरीक्षण नोंदवले.

शिल्पा ब's picture

13 Jan 2011 - 9:17 am | शिल्पा ब

वस्सकन वसकलं की सगळ्यांची शेळी होते....तो फिर husband is काय चीज हय...
ऐसा मेरे मैत्रीणच्या husband चं म्हणणं आहे वो फक्त सांग्या तुमकु...

नवरोबाला खेळणं बणवतात की नाही ?
नवरोबांना बायकोच्या विचारांनीच धडकी भरते की नाही ?

सर्व प्रश्नांना "हो"

-(रक्तदाबपीडित) गवि

.............

असो.. आमचे मत असे की लग्न हा चांगला प्रकार आहे पण मुळात लग्न हा एक संपूर्ण कॉम्प्रोमाईजचा प्रकार असल्याने ज्यांना "स्वातंत्र्य" हवे आहे त्यांनी तो सुरुवातीलाच निवडू नये. निवडलाच तर ज्यात मुळातच तीव्र असमानता आहे असं नातं लग्नातून जोडू नये.

म्हणजे मग "मुलांकडे बघून" आणि इतर अशा अनेक निमित्तांचे प्रयोजन "सहन करत राहण्यासाठी" राहणार नाही.

पती हा पुरुष, जो आपण असमानता बघून ठरवून केला, तो आणि तो सुप्रसिद्ध "समाज" बदलेल याची वाट पाहून काही फरक पडणार नाही.

नवर्‍यावर पूर्ण अवलंबून असणे, नवरा भक्कम पगाराचा हवा, एनाराय हवा आणि त्या तुलनेत स्वतःची एक व्यक्ती म्हणून असलेली योग्यता सोडून द्यायची तयारी, केवळ रुप, केवळ ऐश्वर्य यावरच आधारित लग्न राजीखुषीने, नशापाणी न करता ठरवून केले की स्वातंत्र्याचा वगैरे प्रश्नच कुठे येतो.

पु.लं.च्या भाषेत "बैलाच्या गोठ्यात झोपायचे आणि ..."

पुढचे बोलत नाही.

वास्तववादी आहे.

नवर्‍यावर पूर्ण अवलंबून असणे, नवरा भक्कम पगाराचा हवा, एनाराय हवा आणि त्या तुलनेत स्वतःची एक व्यक्ती म्हणून असलेली योग्यता सोडून द्यायची तयारी, केवळ रुप, केवळ ऐश्वर्य यावरच आधारित लग्न राजीखुषीने, नशापाणी न करता ठरवून केले की स्वातंत्र्याचा वगैरे प्रश्नच कुठे येतो.

:)

मनीषा's picture

12 Jan 2011 - 2:19 pm | मनीषा

चर्चा विषय - स्त्री ची आज पर्यंतची प्रतिमा : एक साधकबाधक चर्चा

तो ही कला ? नाट्य ? आणि अनुभव ??? विभागात

आणि लेखक - टारझन

हे असं का होतं आहे ? मिपावर हे चाल्लंय तरी काय ?

आदरणीय श्री टारझन कृ ह. घे.

टारझन's picture

12 Jan 2011 - 2:37 pm | टारझन

आदरणिय मनिषा जी , कृपया चर्चाप्रस्तावावरही एखादं उदाहरण होऊन जाऊ द्या. ह्यामुले मिपावरच्या अशांत स्त्री आत्म्यास शांती मिळण्यास मदतंच होणार आहे. कारण त्यांच्यामते स्त्रीयांवर सगळीकडेच अमानुश, निर्दयी, कृर, पाषवी , पाषाणऋदयी, आणि हृदय पिळवटुन टाकणारा अन्याय होतोय , ज्यामुळे आज स्त्रीयांवर काडीमोड घ्यायची वेळ आलेली आहे :) आहो मी तर ऐकलंय परिस्थिती एवढी भयंकर आहे की महिलांना शौचास जाण्यासाठी सुद्धा नवरोबांची परवाणगी घ्यावी लागते. परवाच दैनिक सकाळ मधे वाचलं , एकीने आपल्या पतीस सकाळी सकाळी विचारलं " जाऊ का ? " , आणि ते कृर आणि निर्दयी पती मिस्चिफ का कसल्याश्या मुड मधे होते ... आणि ते तिला "नको " म्हणाले. तिने बिचारीने मिसळपाववरची चर्चा वाचली न घेतला ना डिवोर्स.
त्यामुळे तुम्ही स्त्रीजातीच्या कल्याणासाठी प्रतिसाद देणे फार फार गरजेचे आहे.

अरेरे !

खूपच वाईट परिस्थिती आहे हो ... त्या बद्दल तुम्ही निरपेक्ष मनाने आवाज उठवित आहात या बद्दल तुमचे अभिनंदन !!

बाकी तुम्ही तुमच्या जेन वर अशी वेळ येउ देणार नाही ही खात्री वाटते (उगीचच) ..

कृ. ह. घे. हे वे. सां न.

आत्मशून्य's picture

12 Jan 2011 - 11:59 pm | आत्मशून्य

जागा वाचते. आणी लेखन पण आशयपूर्ण भासू लागते.

विजुभाऊ's picture

12 Jan 2011 - 2:34 pm | विजुभाऊ

याअ लेखात बायकाना पर्याना महिलाना सिंगल आउट करण्याचा प्रयत्न जाणतेअजणातेपणे झालेला आहे.
माझ्या ओळखीचे एक साहेब त्यांच्या पत्नीला प्रचंड घाबरतात. त्यांचे म्हणणे जगात कोणाचाही पती व्हावे पण शिक्षीकेचा पती होऊ नये.
घरीसुद्धा छडी लागे छमछम चालू असते......

स्पा's picture

12 Jan 2011 - 2:41 pm | स्पा

उत्तम लेख

(लग्न झालेलं नसल्याने एक चान मार्गदर्शन पर लेख वाचायला मिळेल , precaution is better than cure )

विनायक प्रभू's picture

12 Jan 2011 - 2:49 pm | विनायक प्रभू

टारझन च्या सर्व प्रश्नांचे उत्तर हो.

टारझन's picture

12 Jan 2011 - 2:54 pm | टारझन

घ्या मास्तर ... जर माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या मते 'हो' असतील तर आमचा मिसळपाव वरचा बहुजन स्त्री वर्ग स्त्रीवर अमानुष , पाषवी , निर्घृण , अतोनात अत्याचार होतो असा का टाहो फोडत असतो ? :) का त्या युयुत्सुंना टार्गेट करत असतो. ? काही ज्येष्ठ पुरुष सभासद का म्हणुन त्या प्रतिसादांना हळुच +१ लावत असतात ?
बोला मास्तर बोला , माझे प्रश्न अजुन संपलेले नाहीत. बोला मास्तर बोला. :)

छोटा डॉन's picture

12 Jan 2011 - 3:22 pm | छोटा डॉन

मास्तरांशी सहमत आहे, त्यांचे गणित नाही चुकायचे कधी :)
टार्‍या, लेका मास्तरांना फोन करा, सगळ्या प्रश्नांची ऑपॉप उतरे मिळतील.

- छोटा डॉन

डॉनराव , मी फोन केला तर फक्त माझे समाधान होईल. पण हा धागा मी जनकल्याणासाठी सुरु केला आहे. मास्तरांनी सर्वांसाठी लिहावे.

@सहजराव : चर्चाप्रस्ताव ठेवला असताना तुम्ही सर्वांनी एक साधकबाधक चर्चा करणे अपेक्षित आहे. पण ती कोणी करतंच नाहीये. बहुतेक सगळे आपल्या बायकांना घाबरत असावेत. त्यामुळे जाणते-अजाणतेपणे माझ्या संशयाची पाल डायनॉसॉर चे रुप घेत आहे.

चर्चाप्रस्ताव ठेवला असताना तुम्ही सर्वांनी एक साधकबाधक चर्चा करणे अपेक्षित आहे.

आम्ही न घाबरता साधकबाधक चर्चा सुरु केली पण आमच्या प्रतिसादाला कोणी साधे बूच देखील लावले नाही.

असो..

युयुत्सुरावांच्या जाणकार प्रतिक्रियेच्या प्रकाशाच्या प्रतिक्षेत

विनायक प्रभू's picture

12 Jan 2011 - 2:52 pm | विनायक प्रभू

शमत.
नकु च्या प्रतिसादा प्रतिक्षेत

नरेशकुमार's picture

12 Jan 2011 - 4:45 pm | नरेशकुमार

प्रभु काका, तुमि तो हनिमुन ट्रॅव्हल पिच्चर बघितलाय का ?
त्यात नाय का ती कधीच भांडन न करनारी (गंधर्व) जोडि असते बघा, आमचे तसेच आहे.
आमि असल्या चर्चेत भाग घेउ शकत नाय. कारन आमाला काय अश्या गोश्टिन्चा एक्सपेरियन्स नाय.

आमचं म्हनजे,
we are made for each other.......समझे..

आमाला पुरुश मुक्तित सुध्दा अज्याबात इन्टरेस्ट नाय,
बायकोत गुंतुन राहान्यात काय मज्जा असते सांगु. (घेउन बघा एकदा, म्हनजे कळेल)
आयला.... हे मुक्ति प्रकरन काही दिवस बरं वाटत, पन नंतर कोनि कुत्र हाल खात नाय (मी नाही, असे कोनितरि एक भले गुहस्थ म्हनाले होते )

सहज's picture

12 Jan 2011 - 3:21 pm | सहज

'स्त्रीची आजपर्यंतची प्रतिमा' आम्ही आदरणीय तात्याबा महाराजांच्या खवमधे जाउन पहायचो. टारझनरावांनी देखील आता तशी सोय केल्याचे कळले आहे.

>>..आजवर स्त्रीला लै दडपलं गेलं , तिच्यावर घोर.....

लोक श्री वात्सायनाला विसरले हो, बाकी काही नाही!!

असो तर ती एक साधकबाधक चर्चा कधी सुरू होणार आहे? :-)

विनायक प्रभू's picture

12 Jan 2011 - 3:25 pm | विनायक प्रभू

३ उत्तरे
'डॉमिनेशन'
बरे असते.
"खेळणे"
खेळणे बनण्यात धमाल असते राव.
"धडकी"
इतर ठीकाणी धकधक आपोआप थांबते.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jan 2011 - 3:39 pm | परिकथेतील राजकुमार

सिंग मिंगल असल्याने चर्चा वाचत आहे.

आज मिपावरील इतक्या वर्षाच्या प्रवासात पहिल्यांदाच आमचे परममित्र व पालथ्या धंद्यातले सहकारी श्री. टारझन ह्यांच्याशी मतभेदाचा प्रसंग आमच्या समोर उभा राहिला आहे.

नशिब आपलं की ह्या सगळ्या चर्चा फक्त वांझोट्याच असतात आणि कोणी हुशार इथले प्रतिसाद वाचुन त्याच्यावर अंमल करत नाही ( नसावा , कारण मिपामुळे काही झाल्याचं अजुन ऐकिवात नाही )

ह्या विधानाशी आम्ही बि S ल S कु S ल सहमत नाही !
मिपावरील चर्चा व येथील मते, सल्ले ह्याचे व्यवस्थीत वाचन करुन मगच भारतीय परराष्ट्र खाते, संरक्षण खाते, मनमोहनसींग, सोनिया, RSS, शिवसेना आपापली धोरणे आखतात अथवा जुन्या धोरणात बदल घडवतात हे मी श्री. टारझन ह्यांच्या निदर्शनास आणुन देउ इच्छितो.

तसेच श्री. बराक ओबामा, श्री. मनमोहन सिंग, सध्या श्री. पृथ्वीराज चव्हाण हे कायमच एखाद्या धाग्याच्या वा काथ्याकुटाच्या अनुषंगाने त्यांना धाडण्यात येणार्‍या मिपाकरांच्या पत्रांची चातकासारखी वाट पाहात असतात. आतल्या गोटातली बातमी तर अशी आहे की श्री. ओबामा ह्यांनी मिपाकरांच्या पत्रांसाठी विशेष पोस्ट खातेच उभारले आहे.

श्री. टारझन हे आमच्या वरिल मताची योग्य ती नोंद घेतील अशी अपेक्षा करतो.

टारझन's picture

12 Jan 2011 - 3:51 pm | टारझन

श्री. परिकथेतील राजकुमार , आपल्या मतांशी असहमत असण्याचा प्रसंगच संभवत नाही. वरिल वाक्यात आमच्या कडुन नजरचुकीने "आपापसारले वैयक्तिक संबंध" आणि "नवर्‍या-बायकोच्या एकमेकांकडूनच्या अपेक्षा" लिहीणे राहुन गेले. आपल्या प्रतिसादविषयक अभ्यासाविषयी आम्ही काय बोलणार :) आपले बरोबर आहे.

दोन पावले पुढे जाऊन मी तर म्हणेन , जातींतली असमानता, आरक्षण मुद्दे , तेलंगाणा , काश्मिर प्रश्न , विदर्भ प्रश्न हे जर का सुटु शकले तर त्यात केवळ आणि केवळ मिसळपावचेच योगदान असेल.

परवाच कोणी तरी म्हणाले , चिन आणि पाकिस्तानने भारताच्या अनुक्रमे पुर्व आणि पाश्चिमेकडुन सैन्य घुसवले होते आणि अनुबॉम्ब हल्ल्याची तयारीही होती म्हणे , पण केवळ मिसळपाव वरुन गुपचुप एक पत्र दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांना गेले आणि त्यांनी सैन्य ताबडतोब बिनाशर्त मागे घेतले. ही कार्यवाही इतक्या गुपचुप आणि वेगाने झाली की न्युज वाल्यांनाही खबर नाही.

श्री. परिकथेतील राजकुमाराच्या मताची नोंद घेण्यात आलेली आहे. तसेच साधकबाधक चर्चेला हळुवार हात घालणार्‍या जाणकार गगणबिहारींच्याही मताचा मी या इथे सार्वजनिक आदर करतो.

धन्यवाद.

धन्यवाद. या आदराचा मी स्वीकार करतो.. (पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ नाय वाट्टे.)

-गबि.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jan 2011 - 5:29 pm | परिकथेतील राजकुमार

धन्यवाद टारबा.

आपापसारले वैयक्तिक संबंध" आणि "नवर्‍या-बायकोच्या एकमेकांकडूनच्या अपेक्षा"

कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

श्री. परा,
तुम्ही मात्र संघ बदललेला पाहून मौज वाटली. अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

नितिन थत्ते's picture

12 Jan 2011 - 10:22 pm | नितिन थत्ते

परा यांच्या लेखाचे (प्रतिसादाच्या संख्येने) टॉपचे स्थान इंचाइंचाने धोक्यात येत असल्याने ही जळजळ येत असावी.

नन्दादीप's picture

12 Jan 2011 - 5:29 pm | नन्दादीप

टार्‍या भाऊशी सहमत.....नायतर काय्....च्यायला स्त्री मुक्ती बद्दल धागे आले की समस्त महिला मंडळ हळदी-कुंकु असल्या सारखे प्रतिसाद लुटत असतात्...या "हळदी-कुंकुवात" जाणकार पण स्त्री मुक्तीचा पुळका आल्यासारखे भरपूर प्रतिसाद देतात्......आता बघूया "स्त्री मुक्ती वादी जाणकार" किती प्रतिसाद देतात......

निष्कर्ष : मिपा वरील पुरुष मंडळी धोक्याच्या सीमेवर उभी आहेत्....धागकर्त्या सारखे बलदंड (?) पुरूष असल्याने आम्हाला मोकळा श्वास घ्यायला मिळतो...आणि संरक्ष्णाची हमी पण मिळते...धन्यवाद....

मुलूखावेगळी's picture

12 Jan 2011 - 7:41 pm | मुलूखावेगळी

आजवर स्त्रीला लै दडपलं गेलं , तिच्यावर घोर , कृर आणि निर्दयी , अमानुश , पाषवी ( अजुन काय असेल ते ) प्रकारचे खुप अन्याय झालेले आहेत. आणि आजवर बहुतांश स्त्रीया भयंकर पिडीत् आहेत असे निष्कर्ष त्या प्रतिसादांतुन निघालेत.
>>> ह्याला १ प्रूफ आहे
हे नरेश कुमारान्ची माझ्या धाग्यावर्ची लिहिलेली कमेन्ट्स वाचा
छान छान, वाचुन आनखिन मजा आली.

~~~एकदम फुल्टू मज्जा केलि~~~कोनालाच याव वाटत नव्ते~~~

मि पन बायकोबरोबर जेव्हा पन बाहेर जातो तेव्हा मलाही असेच वाटते.

आता ह्यान्च्या बायकोला पन असेच वाटत नसेल तर काय
तिला बिचारीला केवढा त्रास ,दु:ख्,क्लेश

थोडे दिवस थांब टार्‍या, तुझं लग्न झाल्यावर उपेक्षित नवरे कमिटीमध्ये सामिल झालेला दिसशील.;)
अवांतर: भाज्या चिरण्याचा सराव चालू केलास कि नाही?;)

ह्याला म्हणतात विघ्णसंतोषी :) बाकी आम्ही आमच्या बायको ला खुष ठेऊ ... उगा जगभराच्या बायकांच्या मुक्तीसाठी लढायला आमच्याकडे ना एनर्जी ना टाईम .. खि खि खि :)

भाज्या चिरण्याचा सराव चालू केलास कि नाही?

फुड प्रोसेसर आणणार आहे :) हो आम्ही चिकन -मासे बनवायला शिकुन घेतलंय :)

सुहास..'s picture

12 Jan 2011 - 11:01 pm | सुहास..

त्याच काय आहे काकु !! ( अरे रे !! काय दिवस आलेत माझ्यावर एकीकडे रंगाशेठ आणि एकीकडे काकु ? छ्या !! रंगाशेठ, जरा तो चेस-बोर्ड सोडा आणि या की हिकडे !! ;) )

उनक हा कधी ही मर्त्य न होणारा वर्ग असे मनोहर काका सांगुन गेलेत !! (गेलेत याचा आजकाल अर्थ कुठे गेले आहेत असा आहे. )

आणि कुणालाही चिरायला , आय मीन कुठलीही भाजी चिरायला सराव कसा काय लागतो हे जर उदाहरणासकट सांगीतलेत तर आमच्या सारख्यांवर प्रचंड उपकार होतील.

उनकसे

भाज्याही वेगवेगळ्या प्रकारे चिरता यायला हव्यात.
बटाटा परतून करायचा असल्यास काचर्‍या, उकडून भाजीला मोठ्या फोडी, उपासाचा किस / खीस करताना जाड किसणीवर किसून. ग्रीन बिन्स ची नेहमीची भाजी करताना बारीक चौकोनी, पुलावाला तिरपे लांब काप इ.

अरुण मनोहर's picture

14 Jan 2011 - 3:01 am | अरुण मनोहर

कंसात खुलासा केल्यासाठी धन्यवाद.
>>उनक हा कधी ही मर्त्य न होणारा वर्ग असे मनोहर काका सांगुन गेलेत !! (गेलेत याचा आजकाल अर्थ कुठे गेले आहेत असा आहे. ) <<

यावरून खरा घडलेला जोग आठवला०

एका सभारंभात "जोग" आजच्या कार्यक्रमाला हजर नाहीत हे लक्षात आले, तेव्हा स्टेजवर बोलतांना वक्ता म्हणाला होता-
'आज जोग आपल्यात नाहीत म्हणून वाईट वाटत आहे.'

त्यानंतर जी स्मशानशांतता पसरली ती ऐकून वक्ता लवकरच स्टेजवरून नाहीसा झाला होता!

असो. पण 'गेलेत' ह्याचा 'आजकाल' अर्थ 'कुठे गेले आहेत' असा असेल, तर परवा कोणता होता आणि उद्या कोणता असेल ह्या प्रश्नांनी अंमळ विचारात पडलो.
पुन्हा असो.

मुक्तसुनीत's picture

12 Jan 2011 - 11:54 pm | मुक्तसुनीत

एक मित्र : अरे , त्या "अ‍ॅक्शन रीप्ले" सिनेमात बघ ना, तो अक्षयकुमार ऐश्वर्या रायला सांगू शकतो : "आवाssssssज नीचे" , काय हिंमत आहे राव ! खिखिखिहाहाहा

दुसरा मित्र : अरे तू जरा व पु काळे छाप कथा वाचायचं थोडं कमी कर ना !

टारझन's picture

13 Jan 2011 - 12:12 am | टारझन

=)) =)) =)) =)) हा हा हा ... मार्मिक विनोद करणा तो कोइ इनसे सिखे .. सिखे इनसे :)

- इनसेन

प्राजु's picture

13 Jan 2011 - 2:31 am | प्राजु

:P

ऋषिकेश's picture

13 Jan 2011 - 9:23 am | ऋषिकेश

लिहिलं असतं रे ! पण नको, बायको पण मिपावर येते अधून मधून! ;)

शिल्पा ब's picture

13 Jan 2011 - 9:56 am | शिल्पा ब

कोणाची?

... क्षीण आहे, असे दुर्दैवाने सांगावेसे वाटते.

मूळ चर्चेवरील प्रतिसाद वाचून अधिक हसू आले.

पुढील प्रयत्नांस हार्दिक शुभेच्छा.

धन्यवाद श्री पंगा-जी :)

आपल्या प्रतिसादा ने हुरुप वाढला :)

नरेशकुमार's picture

13 Jan 2011 - 3:12 pm | नरेशकुमार

सध्या किति टन हुरुप जमा झालायं ?

स्त्रीया डॉमिनेटिंग असतात की नाही ?

स्त्रीचं डॉमिनेशन माहेरच्या सुबत्तेवर अवलंबून असते

नरेशकुमार's picture

13 Jan 2011 - 5:59 pm | नरेशकुमार

स्त्रीचं डॉमिनेशन माहेरच्या सुबत्तेवर अवलंबून असते

साफ चुक.
माझ्या सासुला मी आईचा दर्जा देतो, आनि सासर्‍यांना वडीलांचा. ते सुध्दा मला मुलासारखे मानतात.
त्याच्या सुबत्तेविषयी काही बोलत नाही. अगदि करोड्पती नाहीत पन मनाचि श्रिमंति त्याहुन कमी नाही