विकांताची खादाडी : डाल तडका

सुहास..'s picture
सुहास.. in पाककृती
9 Jan 2011 - 8:20 pm

साहित्य :
तुरडाळ
जिरे-मोहरी
कांदा
टमाटे
लाल मिरची मसाला
हडळ...आपल हे...हळद
कडीपत्ता
कोंथबीर

प्रमाण स्वताच ठरवायचे आहे.

कृती :
१ ) तुरडाळ शिजवुन घ्या . मी कुकर वापरला. (एक शिट्टी !)

२) शिजेपर्यंत कांदा-टमाटे कापुन घ्या
३) कढईत आधी तेल टाका, मोहरी आणि जिरे तड-तड वाजायला लागले की चिरलेला कांदा टाका.

४) कांदा चांगला हलवुन घ्या. लाल झाला पाहिजे.

५ ) त्यानंतर टमाटे , कडीपत्ता , हळद , मीठ, लाल मिरचीर पुड टाकुन खमंग वास सूटे पर्यंत चांगल हलवा.

६ ) सरतेशेवटी शिजलेली डाळ टाका . एक उकळी येवु द्यात .

७) डाल तडका तयार !! कोथंबीरेने सजवुन घ्या .

डाल- रोटी खाओ , प्रभुमास्तर के गुण गावो.

प्रतिक्रिया

टारझन's picture

9 Jan 2011 - 8:41 pm | टारझन

मस्त रे ... दाल तडका आपला विक प्वाइंट . त्यावर जिरा राईस म्हणजे सोना पे रॉबर्ट.

- लायन

स्पा's picture

10 Jan 2011 - 2:43 pm | स्पा

टारोबांशी सहमत
मस्त रे सुहाश्या.....

शिल्पा ब's picture

10 Jan 2011 - 12:41 am | शिल्पा ब

छान. मुगाची डाळीचे वरण करून वरून जिरे, मोहरी, लाल मिरची, हळद , हिंग अशी फोडणी देऊनसुद्धा डाळ तडका छान लागते.

गवि's picture

10 Jan 2011 - 12:54 am | गवि

फस्क्लास..

वाफाळत्या आंबेमोहोर भातावर घ्यायचे वाढून.. पोह्याचा पापड सोबत..

मस्त रे सुहास..

डाळ शिजवतानाच त्यात टॉमेटो चिरून घालावा. आणि मग ते शिजलेले डाळ्-टोमॅटो घोटून फोडणीत घालावे. याची चव एकदम फुल्टू असते. :)
सुहास.. ट्राय इट! :)

शिल्पा ब's picture

10 Jan 2011 - 3:47 am | शिल्पा ब

फक्त सुहासनेच ट्राय करायचे का?

तुम्ही बी करा ट्राय .. आपला फुल सपोर्ट आहे तुम्हाला .इस्टो पेटत नसेल तर सांगा :) हवा मारायला येऊ :)

अवलिया's picture

10 Jan 2011 - 10:48 am | अवलिया

तद्दन फालतु ! फु़कट वेळ घालवलास !
रेडी टु कुक मिळत नाही का जवळपास?

सहमत आहे . परंतु मग सुहास.. राव रिकामटेकड्या आणि काहीही पकवता न येणार्‍या प्रकारच्या स्त्रीयांना श्या घालण्याचा हक्क गमवुन बसेल. त्याला ही पाककृती येणं ही त्याची नैतिक जबाबदारी / गरज होती. जाणकार साधाकबाधक प्रकाश टाकतील.

अवांतर : "आपण इंचाइंचाने किचन मधुन माघार घेत आहोत." असे तर नानांस सुचवायचे नसेल ना ?

अवलिया's picture

10 Jan 2011 - 1:23 pm | अवलिया

सहमत आहे..
अरे तु एवढा माज करतोस तुला स्वतःला तरी येतो का दालतडका असं कूणी विचारायच्या आत पाकृती टाकुन मोकळा झाला पोरगा !
तसा चांगला आहे पण संगत खराब..
नाहीतर विचारवंत नक्की झाला असता !! असो.

सुहास..'s picture

10 Jan 2011 - 1:43 pm | सुहास..

http://www.misalpav.com/node/16220#comment-276089

@ नाना आधी हे वाच ! म्हटलं पंगाशेठ सारखा विद्वान पंडित म्हणतोय म्हटल्यावर आम्ही नक्कीच महामुर्ख आहोत, नव्हे ! महामुर्ख-शिरोमणी आहोत. आता या बाबतीत संपादकांकडे जाण्यात काही अर्थ नव्हता, म्हणुन म्हटल चला अजुन थोडा मुर्खपणा करुन घेवुयात .

आता रेडी टु कूक का नाही वापरले ते सांगतो .

मी ज्या एरियात रहातो , तो भाग अजुन ग्रामपंचायतीतच आहे. त्यामुळे इथे मॉल नाही. मॉलमध्ये जायच तर दहा+दहा रु बसलाचा गेले असते . वर त्या पाकिटाचा खर्च, मला मिळणारा पगार, जाण्या-येण्याकरिता लागणारा वेळ, शिवाय मॉलमध्ये जायच म्हटल्यावर कपडे अंगात चांगले पाहिजे , दाढी घोटलेली असली पाहिजे. (गप विकांताला, प्रचंड काम असताना, एकीकडे स्क्रिप्ट आणि दुसरीकडे पुस्तकाचा आंनद घेत पहुडलो असताना सांगीतलेत कोणी हे धंदे ;) या सर्व बाबींमुळे मला काहीही आनंद मिळणार नव्हता. शिवाय डाळ निवडायला घेतल्यापासुन १२ मिनीटाला डाळ तयार होते. शिवाय बौध्दिक आणि मानसिक श्रम केल्याने डाळीचा पहिला घास घेताना मला मिळणारा आनंद हा ही लक्षात घेण्यासारखा आहे. मग जरा जीडीपी व इतर बहाद्दर बाबी लक्षात घेतल्या तर घरच्या घरी डाळ बनविणे मला अजिबात अशक्य नव्हते. ;)

@ टार्‍या ,
छ्या काय श्या द्यायच्या ! एका वर्तुळात जगणारी (आणि तिथेच मरणारी) माणसे ही , आमच्या श्या बी रिझर्व्हड असतात. ;)

@ प्राजु
शिजवतानाच कुकर मध्ये टमाटे फोडुन घालायचे का ? वोक्के ,नेक्ट टायमाला ट्राय करतो ग तायडे !!

छ्या काय श्या द्यायच्या ! एका वर्तुळात जगणारी (आणि तिथेच मरणारी) माणसे ही , आमच्या श्या बी रिझर्व्हड असतात

लेका , श्या अशाच लोकांना घालायच्या असतात :) कुठं विकत आणायला लागतात .तशाच श्या आर गुड फॉर नथिंग .. मग ह्या "नथिंग" लोकांसाठी वापरल्यावरंच गुड होणार ना ? :)

अवांतर : बाकी तुझ्या सही वरुन मला "वाटी - चमचा " चा विनोद आठवला =)) या आमच्या गरिबांच्या हास्टिलात कधी .. दाखविन मज्जा

-(श्या प्रेमी) टारुटारुटारु

सुहास..'s picture

10 Jan 2011 - 2:27 pm | सुहास..

लेका , श्या अशाच लोकांना घालायच्या असतात कुठं विकत आणायला लागतात .तशाच श्या आर गुड फॉर नथिंग .. मग ह्या "नथिंग" लोकांसाठी वापरल्यावरंच गुड होणार ना ? >>>
कांता ने सांगीतलय की वयस्कर लोकांविषयी (विशेष ता स्त्रियांविषयी ) आणि त्यांच्या शी नीट बोलत जा म्हणुन रे ! नाय तर आपल झोपडपट्टीच तोंड आन गटार यात फारस अतंर नाही. ;)

अवांतर : बाकी तुझ्या सही वरुन मला "वाटी - चमचा " चा विनोद आठवला =)) या आमच्या गरिबांच्या हास्टिलात कधी .. दाखविन मज्जा >>>

=)) =)) =))

प्रसन्न केसकर's picture

10 Jan 2011 - 2:21 pm | प्रसन्न केसकर

नवहुच्चभ्रु होण्याच्या दिशेने वाटचाल जोरात सुरु दिसतेय.
लगे हाथ (एफजीआय) फॅमिली ग्रोथ इंडेक्स हा विषय पण हाताळुन टाक. विकीवर माहिती शोधायची अन तिला व्यक्तीस्वातंत्र्याचा तडका द्यायचा. हाय काय अन नाय काय!

अवलिया's picture

10 Jan 2011 - 3:07 pm | अवलिया

हा हा हा

बेस्ट पाककृती !

व्यक्तीस्वातंत्र्याचा विजय असो.. !!

अवलिया's picture

10 Jan 2011 - 3:04 pm | अवलिया

@ नाना आधी हे वाच ! म्हटलं पंगाशेठ सारखा विद्वान पंडित म्हणतोय म्हटल्यावर आम्ही नक्कीच महामुर्ख आहोत, नव्हे ! महामुर्ख-शिरोमणी आहोत. आता या बाबतीत संपादकांकडे जाण्यात काही अर्थ नव्हता, म्हणुन म्हटल चला अजुन थोडा मुर्खपणा करुन घेवुयात .

सहमत आहे. http://misalpav.com/node/16204#comment-276202 इथे बघा महाविद्वान पंगाशेटने आम्ही महामुर्खपणा करु नये म्हणुन अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे. वा ! प्रतिसाद असावा तर असा, मुर्ख म्हणायचे पण आडून आडून ... :) संपादकांकडे तक्रार करुन फायदा नाही, ते आपल्यावरच चढणार... विकीवरची माहिती वाचुन तिचे मराठीकरण करणे अजुन जमत नसल्याने संपादकांच्या गुडबुकात आणि त्यांच्या हुच्चभ्रु वर्तुळात आपण नाही. त्यांच्यात जाऊन अमेरिकेची चाटण्याची इच्छा पण नाही. असो.

जागु's picture

10 Jan 2011 - 12:04 pm | जागु

छान छान.

खादाड अमिता's picture

10 Jan 2011 - 12:52 pm | खादाड अमिता

+१

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jan 2011 - 1:00 pm | परिकथेतील राजकुमार

एकदम तडका रे !

अमोल केळकर's picture

10 Jan 2011 - 2:25 pm | अमोल केळकर

सुंदर पदार्थ :)

अमोल

मुलूखावेगळी's picture

10 Jan 2011 - 2:58 pm | मुलूखावेगळी

छान
डाल तडका फेव आइटम आहे माझा
(वरुन तळ्लेला कान्दा अनि लाल मिरची टाकल्यावर तर २रे काहीच नको)

sneharani's picture

13 Jan 2011 - 4:51 pm | sneharani

मस्त पाकृ.!
:)