http://www.loksatta.com/lokprabha/20110114/metkut.htm
नाना पाटेकर नुकताच ६० वर्षे वयाचा झाला. (पण तो ९० चा झाला तरी नाना पाटेकरच रहाणार. नानासाहेब वगैरे लिहिवत नाही.) शिरीष कणेकरांचा त्याच्यावरचा एक फर्मास लेख.
नाना हा एक उत्तम अभिनेता आहे ह्याविषयी कुणाच्या मनात संदेह असू नये. त्याचबरोबर भीडभाड न बाळगता बिन्धास आपले मत रोखठोक मांडणारा एक रांगडा गडी अशीही त्याची प्रसिद्धी आहे.
एक अस्सल मराठी गडी. मोठमोठी भाषणे न ठोकता कृतीने आपले मराठीपण ठासून मांडणारा हा एक मराठी माणूस म्हणूनही मला याचे कौतुक वाटते.
मराठी नाटकात त्याचे नाव गाजलेले आहेच. मराठी सिनेमात त्याने कामे केली आहेत का? सिंहासनमधे अगदीच मामुली काम होते. हिंदी सिनेमात अनेक भूमिका आठवत आहेत पण मराठी सिनेमात फारशा आठवत नाहीत.
माझ्या वतीने त्याला शुभेच्छा.
हा अजून एक लेख सामन्यातला
http://www.saamana.com/2011/January/09/Link/Utsav9.htm
तुमचे नानाबद्दल काय मत आहे?
प्रतिक्रिया
10 Jan 2011 - 5:50 am | रेवती
नाना पाटेकरांचा अभिनय आवडतो म्हणण्यापेक्षा मला त्या माणसाची भीती वाटते असे म्हणायला हवे.
मी आणि माझ्या नणदेनी चुकून 'अग्नीसाक्षी' पाहिला आणि मी त त प प करत थेट्रातून घरी आले होते ते आठवले.
त्यांच्या समाजसेवेबद्दलही बरच ऐकून आहे.
10 Jan 2011 - 10:31 am | महेश-मया
जर तुम्हि नाना पाटेकरांची निखील वागले बरोबरची मुलाखत पाहीली असती तर तुमचे मत बदल्ले असते
10 Jan 2011 - 12:45 pm | टारझन
अग्निसाक्षी पाहिल्या नंतर मी सुद्धा नाना ला बरेच वर्ष घाबरत होतो. त्यानंतर तो मधु बरोबर आलेला एक चित्रपट होता ... यशवंत लोहार नावाची रुपरेखा असलेला. णाणा पाटेकर केवळ अप्रतिम कलाकार आहे.
त्याने केलेला एक मराठी चित्रपट ही आहे. तो पाहुन देखील मी घाबरलो होतो . त्यात बहुतेक हिरोईन ओढ्याकडे शौचास जात असतांना नाना तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा ट्राय करतो परंतु हिरॉइनचा कुत्रा तिला ऐन वेळी वाचवतो.
अवांतर : त्या मराठी हिरॉइन ला पाहुन णाणा पाटेकरची लैंगिक इच्छा एवढी प्रबळ झालेली पाहुन तो मला लिंगपिसाट देखील वाटला होता.
नाना पाटेकर यांज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- पापा
10 Jan 2011 - 3:18 pm | नन्दादीप
>>>>>>अवांतर : त्या मराठी हिरॉइन ला पाहुन णाणा पाटेकरची लैंगिक इच्छा एवढी प्रबळ झालेली पाहुन तो मला लिंगपिसाट देखील वाटला होता.
काय भयानक अवांतर आहे...
10 Jan 2011 - 3:26 pm | सुहास..
अग्निसाक्षी पाहिल्या नंतर मी सुद्धा नाना ला बरेच वर्ष घाबरत होतो >>>
अग्निसाक्षी पाहिल्या नंतर मी बरीच वर्षे मनीषा कोईराला ला घाबरत होतो . काय ' थर्ड रेटेड ' अभिनय.
असो ..
नाना म्हटल्यावर मला एकच आठवत . ते म्हणजे त्याच नाटक ' पुरुष '
आणि दुसरा त्याने उभा केलेला. ' जक्कल ' बेक्कार !!
10 Jan 2011 - 3:31 pm | टारझन
मनिषा कोईराला ... बर्याच आठवणी जाग्या झाल्या. तिचा सिनेमा पाहुन आमच्या एका बालमित्राची बाटली फुटली होती ... त्यानंतर आम्ही बरेच दिवस त्याला लै चिडवत होतो :)
तात्यांचे मनिषा कोईराला विषयक विचार वाचण्यास उसुक
10 Jan 2011 - 3:45 pm | नन्दादीप
आले....टारझन भाऊ फारमात आले.....काय भयानक, भन्नाट, जबरा, खतरी प्रतिसाद देता हो तुम्ही..
>>>(तिचा सिनेमा पाहुन आमच्या एका बालमित्राची बाटली फुटली होती ... )
ह. ह. पु. वा.
10 Jan 2011 - 6:09 am | शुचि
माझा "एकमेव" आवडता अभिनेता. इन्टेन्स!!!! इन्टेन्स!!!! इन्टेन्स!!!!
इतक्या इन्टेन्सिटी ने कोणी अभिनय करू कसे शकते?
त्याचा "प्रहार" फार सुंदर चित्रपट!
_______________________________________________
नानाची जयवंत दळवींच्या "पुरुष" नाटकातील गुलाबरावची भूमिका पहायला नाही मिळाली याची खंत वाटते. पण नानाने न्याय दिला असणार याची खात्री आहे.
10 Jan 2011 - 10:23 am | स्वानन्द
सहमत. एकमेव नाही पण प्रचंड आवडतो. प्रहार असो, टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह असो, अब तक छप्पन असो की माफीचा साक्षीदार... नानाचा अभिनय अगदी खणखणीत! बाकी तो साठ चा झाला तरी 'तो नाना' असंच म्हणावसं वाटतं.
10 Jan 2011 - 6:08 pm | ramjya
मला सुद्धा प्रहार आवडला होता.....
11 Jan 2011 - 10:16 am | वेताळ
डासामुळे माणसाचे तृतियपंथी मध्ये रुपातंर होते हा त्याचा शोध मागच्या शतकातील सर्वोत्तम शोध म्हणुन गणला गेला आहे.
11 Jan 2011 - 10:24 am | टारझन
नाना पाटेकर ह्या शास्त्रज्ञाच्या " (ब्रदर इन लॉ) वन मॉस्किटो थेरी ऑफ जेंडर ट्रान्स्फॉर्मेशन" नुसार मला सगळे कव्वाल , आरती म्हणणारे , सभागृहात एखाद्याचं भाषण ऐकल्यावर प्रोत्साहन देणारे लोक तृतियपंथी वाटायला लागले होते.
- ट्युटन
11 Jan 2011 - 8:29 pm | संजय अभ्यंकर
" (ब्रदर इन लॉ) वन मॉस्किटो थेरी ऑफ जेंडर ट्रान्स्फॉर्मेशन"
ह.ह.पु.वा.
10 Jan 2011 - 6:04 am | शिल्पा ब
मला आवडतो नाना पाटेकर हा अभिनेता. एकदम जबर्दस्त माणुस...वाटत नाही साठीचा.
10 Jan 2011 - 8:27 am | अवलिया
नाना पाटेकर आपली मते स्पष्ट मांडतो त्यामुळे मते पटो वा न पटो पण तो आम्हाला आवडतो.
10 Jan 2011 - 8:49 am | प्रचेतस
मराठी मधला नानाचा एक ठळक चित्रपट म्हणजे 'माफीचा साक्षीदार'. जोशी-अभ्यंकर खून खटला या त्याकाळी पुण्यात गाजलेल्या प्रकरणावर आधारीत हा चित्रपट होता. यात नानाने प्रमुख खलनायकाची-विकृत खुन्याची भूमिका केली होती. यात त्याची देहबोली, डोळ्यातील क्रूरता फारच प्रभावीपणे दर्शवली होती.
मराठीमधील त्याचा अजून एक चित्रपट म्हणजे 'पक पक पकाक'
'भालू' मध्येही त्याची खलनायकी भूमिका होती.
10 Jan 2011 - 7:47 pm | सुधीर काळे
मला देखील नाना पाटेकरांचे ’पक पक पकाक पक’मधील काम अतीशय आवडले होते!
पण अगदी वेगळा नाना पाटेकर पहाचा असेल तर "महासागर" आणि "हमीदाबाईची कोठी" ही नाटके पहायला हवीत. दोन्हीतील त्याला मिळालेल्या व्यक्तिरेखा अगदी आगळ्या-वेगळ्या आहेत.
10 Jan 2011 - 8:59 am | विंजिनेर
नाना एक विक्षिप्त आणि सच्चा अभिनेता आहे.
त्याच्यावर बर्याच वर्षांपूर्वी किस्त्रीमच्या दिवाळी अंकात "तिच्यायला तिच्या नानाच्या...." ह्या टायटलची एक प्रदीर्घ मुलाखत वाचली होती.
मला वाटतं त्याची शिवीगाळ आणि विक्षिप्तपणा इतर नट/नट्यांच्या सोज्वळपणा आणि साधेपणावर (म्हंजे त्याच प्रकारची लफडी वगैरे) उठून दिसते - पत्रकारितेच्या भाषेत "इट मेक्स अ गुड कॉपी".
10 Jan 2011 - 10:35 am | गवि
पंधराएक वर्षांपूर्वी नानामधे तोच तोच पणा खूप आला होता. (आक्रस्ताळेपणा, थयथयाट, कपाळ बडवणे, अण्णा अण्णा, ये हिंदू..ये मुसलमान्..किसका खून कौनसा,.. किडे मकोडों की तरह बच्चे पैदा करो, कीडे मकोडोंकी तरह मर जाओ.. अशा टाईपचा अँग्री अभिनय कंटाळा येईपर्यंत रिपीट व्हायला लागला होता)
पण नंतर त्याची दखल घेऊन म्हणा किंवा काहीही असो.. त्याने स्वतःत एकदम बदल करुन जी विविधतेची "रेंज" दाखवली त्याचे नाव तेच..
नवीन कॉमेडीरुपात (वेलकम, टॅक्सी#९२११ इ इ) तर तो खूपच धमाल दिसतो.
10 Jan 2011 - 10:50 am | इन्द्र्राज पवार
नानासमोर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व स्तरावरील दिग्गज ज्या आदराने वागतात ते पाहिल्यावर व्ही.शांताराम, 'लता मंगेशकर, आशा भोसले' यांच्यानंतर खर्या अर्थाने 'नाना पाटेकर' हाच महाराष्ट्रीयन कलाकार असेच चित्र नजरेसमोर येते. इतके यश पदरी असूनही नानांचे (साठीला पोचले असल्याने आदरार्थी लिहिणे भाग आहे....अन्यथा कुणालाही पटणार नाही ते वयाच्या या मुक्कामाला आले आहेत) पाय मात्र घट्ट जमिनीवर आहेच. मागील महिन्यात 'तन्वीर पुरस्कार'च्या वेळी केलेल्या त्यांच्या भाषणात स्वभावातील नम्रपणा फार उठून दिसला. डॉ.श्रीराम लागू आणि सुलभा देशपांडे यांच्या संदर्भात ज्या भाषेत त्यानी कृतज्ञता व्यक्त केली [तसेच आणखीन एक 'तन्वीर पुरस्कार' विजेती वीणा जामकर या नवोदित अभिनेत्रीचे भाषण.....पण तो वेगळा विषय आहे]..... ती पाहता पडद्यावरील 'नाना' आणि स्टेजवरील नाना यात जमीनअस्मानाचा फरक जाणवतो.
"माझे बी.पी. मी ८० ते १२० मध्ये कायम ठेवतो....समाजातील असंतोषाबाबत माझ्या मनी जी घुसमट आहे ती खरे तर तुमचीच आहे, मी फक्त प्रतिनिधीत्व करतो..." अशी वाक्ये असोत वा नाट्यसृष्टीबद्दलची कृतज्ञता असो, नानां किती कसलेले वक्तृत्वपटू आहेत हे जाणवले.
वर मराठी चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाबद्दल एक मुद्दा आहे. पण आता ते डॉ.श्रीराम लागू यानी अजरामर केलेल्या "नटसम्राट" च्या भूमिकेतून पडद्यावर येत आहेत....या चित्रपटाविषयी आणि त्यातील नाना पाटेकर यांची मध्यवर्ती भूमिका याबद्दल औत्स्युक्य राहिल.
नाना पाटेकर याना दीर्घायुरारोग्य लाभो.
इन्द्रा
10 Jan 2011 - 11:03 am | विलासराव
विसरलात की काय?
माझा आवडता नानाचा चित्रपट.
10 Jan 2011 - 11:08 am | इन्द्र्राज पवार
श्री.विलासराव....
धागाकर्ते श्री.हुप्प्या यानी लिहिलेच आहे की, "हिंदी सिनेमात अनेक भूमिका आठवत आहेत पण मराठी सिनेमातील फारशा आठवत नाहीत....." ~ त्यामुळे नानांच्या फक्त 'मराठी' चित्रपटाबद्दलच त्याना प्रतिसाद अभिप्रेत असावेत. ... आणि होय, तुम्ही म्हणता तसे 'परिंदा' कोण विसरेल?
इन्द्रा
10 Jan 2011 - 1:49 pm | पाषाणभेद
अंकूश मधला रवी कोण विसरेल?
10 Jan 2011 - 7:34 pm | अप्पा जोगळेकर
त्याच्यात तो डोक्यावर थापट्या मारुन घेतो तेंव्हा एकदम खतरा वाटतो.
10 Jan 2011 - 11:28 am | श्रावण मोडक
हे कणेकर काय लिहितात: "ना तो अमिताभपुढे (कोहराम) कमी पडला ना राजकुमारपुढे (तिरंगा), ना ऋषी कपूरपुढे (हम दोनो) कमी पडला ना अनिल कपूरपुढे (वेलकम), ना अजय देवगणपुढे (अपहरण) कमी पडला ना जॅकी श्रॉफपुढे (अग्नीसाक्षी). मग अतुल अग्निहोत्रीपुढे (यशवंत) काय कमी पडणार?"
नानाची तुलना अमिताभशी समजू शकतो. एकवेळ राजकुमारही समजू शकू. पण ऋषी कपूर, अनिल कपूर, अजय देवगण, जॅकी श्रॉफ ते अगदी अतुल अग्निहोत्री? अगागागागागा...
या असल्या लिंका नका देत जाऊ राव नाना, सचिन, आशाताई अशा व्यक्तींविषयी.
10 Jan 2011 - 11:32 am | गवि
+०.५
अनिल कपूर वगळून अन्यांबाबतीत अत्यंत सहमत.
10 Jan 2011 - 11:42 am | हुप्प्या
अहो कणेकर जरा वहावत गेलेत. नानाने किती लोकांसमोर काम केले आहे ते सांगायला गेले आणि भलतेच काही लिहून बसले.
ऋषी कपूर, देवगण, राक्षसगण वगैरे मंडळींकडून नानाला कांपिटिशिन होतीच कुठे? कुठे तो ऐरावत आणि कुठे ती शामभट्टाची .......
तसे पाहिले तर व्यक्तीश: मला राजकुमारचा तथाकथित अभिनय हा अत्यंत बावळट प्रकार वाटतो. बर्याचदा विनोदीच वाटतो. नानासमोर तोही किस झाड की पत्ती असे माझे स्वच्छ मत आहे.
पण कणेकरांच्या लेखातून नानाच्या स्वभाववैशिष्ट्यांची चांगली झलक दिसते. कणेकरांशी त्याची इतकी जवळची ओळख आहे त्यामुळे इतक्या गोष्टी मला तरी नव्याने समजल्या.
नानाचे मला आवडलेले हिंदी सिनेमे म्हणजे प्रहार, अब तक छप्पन, गुलाम -ए-मुस्ताफा, अंकुश, प्रतिघात, टॅक्सी नं. ९२११.
10 Jan 2011 - 7:35 pm | अप्पा जोगळेकर
अजय देवगणने अपहरण मधे अगदी तोडिस तोड टक्कर दिली आहे नाना पाटेकरांना.
10 Jan 2011 - 11:40 am | राजेश घासकडवी
हे नाटक पाहून इतकी वर्ष झाली तरी त्यातला नाना पाटेकर आठवतोय... खत्रा काम केलं होतं.
10 Jan 2011 - 12:36 pm | विजुभाऊ
नानाचा अभिनय आवडला होता " ब्लफ मास्टर" मध्ये
अगोदर होटेलमालक असतानाचा नेहमीच्या गुर्मीत वागणारा नाना शेवट लेखक आहे असे दाखवताना नानाने बोलण्यात /वागण्यात देहबोलीत केलेला टोकाचा बदल "सलाम ठोकावा " इतका झक्क जमलाय.
कणेकरांच्या लेखात लिहीलय तसे "तेजाब" च्या शुटिम्गच्या वेळेस नाही तर परिंदा च्य वेळेस भाजला होता.
नानाने कुठल्यतरी चित्रपटात सह अभिनेता असलेल्या राजेश खन्नाला वेळेवर येण्यासाठी दम भरला होता
10 Jan 2011 - 3:04 pm | योगी९००
नानाने कुठल्यतरी चित्रपटात सह अभिनेता असलेल्या राजेश खन्नाला वेळेवर येण्यासाठी दम भरला होता
त्या चित्रपटाचे नाव होते आवाम... बी आर चोप्रांचा चित्रपट होता तो.. त्यात मी सुद्धा काम केले होते :)
म्हणजे मी सहावीत असताना पनवेलला होतो. तेथील विठोबा खंडाप्पा हायस्कूल मध्ये या चित्रपटाचे थोडे शुटींग झाले होते. त्यातल्या सुरुवातीच्या प्रार्थना म्हणण्याच्या सीन मध्ये मी होतो.
आवाम चित्रपट लई भारी होता...फक्त पनवेल मध्येच चालला बहूतेक...त्यात नानाने एका वयस्कर कर्नल की मेजरची भुमिका केली होती आणि राजेश खन्नाने त्याच्या हाताखालील तरूण शिपायाची...हॅ हॅ हॅ...
10 Jan 2011 - 12:56 pm | परिकथेतील राजकुमार
मला नानाची सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे तो चाहत्यांना देतो त्या प्रत्येक सही साठी पैसे घेतो, आणि जमलेले पैसे आमटेंच्या आश्रमाला देतो :)
10 Jan 2011 - 1:11 pm | गणपा
रोखठोख नाना आवडतो.
जंगलबुकचा बुलंद शेरखान असो वा थोडासा रुमानी हो जाये मधला हळवा नाना.
He is the Bestest ;)
नानाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
10 Jan 2011 - 1:13 pm | स्मिता चावरे
तो विसरलात का?
10 Jan 2011 - 1:56 pm | नगरीनिरंजन
पकपक पकाक मध्ये अतिश्शय सुंदर काम केलं आहे त्याने!
10 Jan 2011 - 3:25 pm | डावखुरा
पक पक पकाक ..evergreen hit
साळु माझी सोनपरी..
जीवन लई सुंदए हाये..भारी एकदम भारी..
सहमत...
10 Jan 2011 - 2:02 pm | ५० फक्त
थोडासा रुमानी हो जाये हा नानांचा आवडलेला चित्रपट.
त्यातली एक खुप प्रसिद्ध कविता की गाणं आहे, ते कुणाकडे असेल तर द्या ना.
नानांना खुप खुप शुभेच्छा.
हर्षद.
10 Jan 2011 - 2:10 pm | परिकथेतील राजकुमार
थोडासा रुमानी हो जाये इथे प्रयत्न करुन बघा.
10 Jan 2011 - 2:10 pm | पाषाणभेद
नाना अन दिप्ती नवलचा एक चित्रपट आहे. ते बहूतेक शेतमजूर दाखवलेले आहेत. कोणता तो चित्रपट? क्लासीकल आहे तो.
किंबहूना त्याच्या सगळ्या चित्रपटाचीच यादी देता येईल काय?
10 Jan 2011 - 2:21 pm | मेघवेडा
त्याची फिल्मोग्राफी आहे इथं विकीपीडियावर.
मला वजूद मधला मल्हार गोपालदास अग्निहोत्री खूप भावला होता. कसलेला अभिनय, करारी देहबोली, दर्जेदार संवादफेक, सारं काही उच्चकोटीतलं. त्याचं "कैसे बताऊं मै तुम्हे मेरे लिये तुम कौन हो.." तर निव्वळ अप्रतिम. इतका भावला होता नानाचा तो रोल की त्या चित्रपटात माधुरी असूनदेखील तिच्याकडे लक्षच गेलं नाही! :)
आमच्या या लाडक्या नटास साठाव्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
10 Jan 2011 - 7:53 pm | चिगो
हेच म्हणणार होतो.. "वजूद" मधला नाना जबरा आहे.. किंवा त्या पिक्चरमध्ये तोच काय तो बघण्यासारखा आहे...
नाना द ग्रेट ला "अब तक साठ" साठी खुप खुप शुभेच्छा...
वाढदिवसाच्या शुभेच्छा, नाना...
10 Jan 2011 - 3:05 pm | राजा
सुर्योदय
हा नाना अन दिप्ती नवलचा चित्रपट आहे याची आठ्वण होण्याचे कारण म्हणजे खुप वर्षा पुर्वी दुरदर्शन ला दुपारी पहिला
10 Jan 2011 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार
दुपारी सुर्योदय पाहिल्यावर लक्षात राहणारच की.
11 Jan 2011 - 11:13 am | विलासराव
सुर्योदयचं शुटींग हे माझ्या गावी म्हणजे पारनेरला झालेले आहे. जवळपास एक महीना हे काम चालु होते. त्यामुळे नानाला प्रत्यक्ष पहाता आले.
10 Jan 2011 - 6:48 pm | बाबय
हा नाना चा च होता का?
10 Jan 2011 - 6:48 pm | मराठे
त्याचं 'खामोशी' मधलं काम पण खरं तर चांगलं होतं.. त्या सिनेमात तर एका बाजूला नाना आणि सीमा बिस्वास तर दुसर्या बाजूला मनिषा कोईराला आणि सलमान खान... भन्साळीबाबूंनी काय खाउन स्टारकास्ट जमवलं होतं कोणास ठाऊक ! ... गाणी चांगली होती.. स्टोरी ठिक होती.. नानाचा आणि सीमा विस्वास चा अभिनय मस्त होता पण तरीही सिनेमा दणकून आपटला.
10 Jan 2011 - 7:10 pm | घाटावरचे भट
माझा पण आवडता अभिनेता नाना पाटेकर. नाना पाटेकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (मिपा स्टाईल नव्हेत, तर खर्याखुर्या, मनापासून!!
- भट
10 Jan 2011 - 7:50 pm | प्रदीप
नानांना प्रथम पाहिले ते 'पाहिजे जातीचे' मध्ये. विहंग नायक व त्यांनी अक्षरशः धमाल केली होती त्यात. कणेकरांच्या लेखात त्याचा उल्लेख आहे तो अशा अर्थाने की कुण्यातरी 'शिरीश कणेकर' नाम सदृश्य 'टिकाकारा'ने एका मराठी वर्तमानपत्रात त्यांच्या त्या कामाची (व बहुतेक त्या नाटकाचीच) टिंगल केली होती व नानांना ते आवडले नव्हते. तो टिकाकार कोण असावा ह्याचा अंदाज मी अजून बांधत आहे (उगाच, चाळा म्हणून!). त्याकाळी छबिलदास चळवळीची टिंगल मराठी मुख्य प्रवाहातील संबंधित ('प्रवाहपतित'!) लोकांकडून व्हायची. एकाएकी अरविंद व सुलभा देशपांडेंनी उभारलेल्या ह्या चळव़ळीकडे नाटक ह्या प्रकाराकडे गंभीरपणे पाहणार्या अनेक सुजनांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे मुख्य प्रवाहपतितांचा जळफळाट झाला होता. माधव मनोहर व नंतर पुष्पाबाई भावे ह्यांचे सन्माननीय अपवाद सोडले तर तेव्हा मराठी वर्तमानपत्रांतून जी नाटक समिक्षणे येत ती 'दुर्वांची जुडी' इ. (स्थळः दिवाणखाना) छाप नाटकांना अनुरूपच असत. तर हे गृहस्थ, ज्यांना नानांना अगदी मारावेसे वाटले हे कोण असावेत? एकंदरीत शिरीष ह्या नावाशी साधर्म्य असणारे एक तेव्हाचे नाटककार असावेत बहुधा. त्यांचे एक नाटक तेव्हा अफाट चालले होते, व एकंदरीत प्रायोगिक रंगभूमिवर तुच्छतेने काही जाहीर मतप्रदर्शन करण्यास हे तत्पर असत. एकदा टी.व्ही. वर त्यांनी हे अमोल पालेकरांची मुलाखत्र घेतांना केले व ज्याला हिंदीत 'कुल्हाडी पे पाँव रख दिया' असे म्हणतात अशी स्वतःची गत करून घेतली., ते थोडे नंतर ऐशीच्या शतकात. त्या दिवशी वाचले ते हेच असावेत बहुधा!
दोनेक वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात 'पाहिजे जातीचे' च्या निर्मीतीवरील सुलभाताईंची मुलाखत आली होती. त्यात अरविंद देशपांडेंनी किती खोल विचार केला होता, व ते कसे बसवले होते ह्याविषयी सुंदर माहिती त्यांनी कथन केली होती.
तळमळीने काही जणांनी छबिलदास चळवळ उभारली होती-- देशपांडे पत्रि-पत्नि, तसेच अरूण काकडे, माधव वझे ही त्यातील अग्रगण्य नावे. चळवळ लौकिकार्थाने संपली खरी पण त्यातून बरेच काही चांगले आपणास मिळाले. नाना हे त्यातील एक महत्वाचे लखलखते रत्न!
11 Jan 2011 - 7:25 pm | तिमा
'पाहिजे जातीचे' हे नाटक मी दोनदा बघितले. पहिल्यांदा बघितल्यावरच नाना हा मोठा अभिनेता होणार हे लक्षांत आले होते.
त्यात स्वत: अरविंद देशपांडे व सुषमा तेंडुलकर यांनीही अप्रतिम अभिनय केला होता.
10 Jan 2011 - 10:10 pm | विसोबा खेचर
नान्या साठीचा झाला? फोन करायला पायजेल त्याला..!
-- नान्याचा तात्या.
10 Jan 2011 - 11:13 pm | सखी
नानाची अजुन एक मुलाखत सुधीर गाडगीळांनी घेतलेली सकाळवर पण आहे.
यात उल्लेख केल्याप्रमाणे तो खरोखरचं मुलाखत कंटाळवाणी, रटाळ होणार नाही यासाठी प्रयत्न करतो आणि त्याला ते जमतेही. याचा अनुभव मागच्या वर्षीच्या बीएमएम च्या अधिवेशनाला घेतला. जवळजवळ ४-५००० क्षमता असलेल प्रेक्षागृह -बहुतेक लोकं शिस्तीने त्यांच्या तिकींटानुसार बसलेली - साहजिकच प्रेक्षक विखुरलेले, मध्येमध्ये जागा रिकाम्या सोडल्या होत्या. पहील्या मिनिटातच नानाने सगळ्यांना पुढे येऊन बसण्याची विनंती केली, म्हणजे कशा आपल्याला गप्पा मारता येतील असेही म्हणाला. गाडगीळांची येथेच्छ मस्करी केली, अशोक सराफने पडत्या काळात खूप मदत केली, करायचा हे त्याचे ऋण नानाच्या बोलण्यात अगदी जाणवते, ज्या लोकांनी त्याचे पैसे बुडवले त्यांना आता २०-३० वर्षांनंतर मागण्याची धमक मला वाटतं त्याचातच असावी. आनंदवनाबद्दल भरभरुन बोलला (कुठेही आव नाही कि तोसुद्धा नियमितपणे मदत करत असतो). रुमानी मधल्या कविता म्हणुन दाखवुन -त्याचे श्रेय कवि, लेखकालाच दिले कारण ते शब्दच इतके चांगले व एक छान लय असलेले आहेत की त्यात अॅक्टरला जास्त काही करावे लागत नाही असे त्याचे म्हणणे.
हि मुलाखत गुगल व्हिडिओ किंवा युट्युबवर आहे २-३ भागात, ईच्छुकांनी गुगलुन बघावे, हाफीसातुन व्हिडिओ ब्लॉक केलेले आहेत त्यामुळे दुवा देता येत नाही.
11 Jan 2011 - 6:56 pm | उपास
हो अगदी साठीतही नाना रॉक्सच..
वर म्हटल्याप्रमाणे बीएमएम मधे नाना दिलखुलास बोलला.. तसा तर तो नेहमिच बोलतो.. अगदी अलिकडच्या लागूंच्या कार्यक्रमातही.. थेट माणूस आहे.. वरती त्याच्या कारकीर्दीतले बरेच चित्रपट लिहीलेत.. त्यातलं त्याचं अजून एक आवडलेलं काम म्हणजे प्रतिघातमध्ये त्याने वेड्याचं केलेलं.. अतिशय आक्रमक भूमिका करण्यात त्याचा हात धरणार सद्ध्या कोणी नाही.. त्याची संवादफेक अफलातून आहे.. अर्थात त्याची मेहनत त्यामागे आहेच आणि आत्मविश्वासही.. मराठी माणसाचा इगो सुखावणारं काही तरी त्याच्या भूमिकेत मला नेहमी दिसत आलय...
नाना परवा म्हणाला.. भ्रष्ट राजकारण्यांची चीड येते , अगदी पोटतिडकीनं बोलत होता.. घुसमट होते, गोळीनेच उडवलं पाहिजे वगैरे वगैरे.. अगदी सामान्य माणसाच्या मनातलच.. त्याच आनंदवनाशी असलेलं नातं, त्याच गणपतीत बेभान होऊन नाचंण आणि हा सामान्य माणसाशी सततचा संवाद.. एक माणूस म्हणून त्याला प्रगल्भ बनवतोच.. माझ्या तर मनात येतं, की जर साऊथ मधले हिरो, आपली प्रसिद्धि एन कॅश करत राजकारणात येतात्,तसं नानाने करायला काय हरकत आहे.. लोहा लोहे को काटता है.. नाना खरच सगळं हलवून टाकेल.. असो.. त्याने काय करावं हा त्याचा प्रश्न पण त्यानेच आपल्याला सवय लावलेय की, त्याला वेगवेगळ्या भूमिकेत बघत तोंडात बोटं घालायची.. थोडक्यात, नाना म्हणजे चोख काम, अजून काय सांगायच!
11 Jan 2011 - 5:44 pm | मस्त कलंदर
मध्ये मध्ये त्याने काही आक्रस्ताळी भूमिकांमधून तोच तोचपणा आणला होता. तरी तो मला त्याच्या अभिनयासाठी नक्कीच आवडतो. त्याच्या चांगल्या भूमिकांबद्दल वरती लिहिले गेले आहेच. मला आवडलेली त्याच्या मुलाखतीची एक लिंकः
इथं तो थोडासा रूमानी हो जाए मधला एक संवाद म्हणतो, एक कविता म्हणतो आणि माधुरीसाठीचा असलेला वजूदमधला एक डॉयलॉगही आहे. हे संवाद पाठ न करता लक्षात कसे राहातात हे तो सहजसुंदरपणे सांगून जातो!!!
11 Jan 2011 - 7:21 pm | मदनबाण
नाना पाटेकरचा मी फुल स्पीड पंखा आहे... :)
कधी कधी जेव्हा माझं टाळकं सटकत किंवा मी कोणावर तरी खसकतो,,, तेव्हा मी म्हणतो माझ्यातला नाना पाटेकर जागा झाला !!! ;)
बाकी त्याचे डायलॉग लयं भारी असतात हे काय मी येगळं सांगाया नको काय ? ;)
त्याचा मला सर्वात आवडलेला चित्रपट म्हणजे... अर्थातच प्रहार. :)
जरा हा सीन पहाच :---
बाकी नाना पाटेकर माझ्या सारखाच बाप्पाचा भक्त हाय... :) त्याच्याकडे गणपतीच्या वेळी केली जाणारी फुलांची सजावट लयं भारी असते...
अवांतर :---
साला एक मच्छर !!! ;)
एक मच्छर, साला एक मच्छर, आदमी को हिजड़ा बना देता है.
एक खटमल पूरी रात को अपाहिज कर देता है.
सुबह घर से निकलो, भीड़ का हिस्सा बनो.
शाम को घर जाओ, दारू पिओ, बच्चे पैदा करो और सुबह तलक फिर एकबार मर जाओ.
क्योंकि आत्मा और अंदर का इंसान मर चुका है, जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है.
साला, एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है.
ऊंची दुकान, फीका पकवान, खद्दर की लंगोटी, चांदी का पिकदान.
सौ में से अस्सी बेईमान, फिर भी मेरा देश महान.
टोपी लगाए मच्छर कहता है, देश की लोगों में समता की भावना आ रही है.
इसलिए तो बड़ी मछली छोटी को खा रही है.
हमारे चुने हुए कुत्ते हमें काटते है, हमारी ही बोटियां आपस में बांटते हैं.
अमानुष गंध से भरी इनकी आवाज से कांपते हैं.
कल पैदा हुए बच्चे एक सांस लेते हुए हांफते हैं.
शैतानों की नाजायज औलाद तहलका मचा रही है
और हम भगवान के चहेते जानवर इंसान, जीवन को गाली बनाए बैंठे हैं.
क्या करें, साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है.
गिरो सालों, गिरो, गिरो, लेकिन गिरो तो उस झरने की तरह तो अपनी सुंदरता खोने नहीं देता.
जमीन के तह से भी मिलकर अपना अस्तित्व नष्ट नहीं होने देता.
लेकिन इतना सोचने के लिए, वक्त है किसके पास.
क्योंकि साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है.
मंदिर-मस्जिद की लड़ाई में मर गए लाखों इंसान.
धर्म और मजहब के नाम पर हो गए लाखों कुर्बान.
जिसने अन्याय के विरोध में बाली को मारा, रावण को मौत के घात उतारा.
पुण्य को पाप से उबारा
आज मुझे उस राम की तलाश है.
लेकिन मुझे लगता है कि इस युग के राम को आजीवन वनवास है,
क्या करें, क्योंकि साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है.
कभी शैतान आएंगे, मेरे दरवाजे पर दस्तक देंगे.
मेरे जेहन की तलाशी लेंगे, फिर चल उठेंगे.
उस वक्त मैं डरूंगा नहीं.
अपने विश्वास को ढाल, अंदर की आग को तलवार बनाऊंगा.
एक न एक दिन तो तुम उस आग में कूदोगे.
करो, आज में बदनाम करो, नीलाम करो.
निलामी के लिए क्या है मेरे पास.
छलके हुए आंसुओं का एहसास.
मगर, मगर मैं तुम्हें बदला लूंगा.
तेरी आखिरी गोली पर, मेरे दो सांसों के बीच का ठहराव, तुम्हें फोकट में दूंगा
11 Jan 2011 - 8:41 pm | प्राजु
नाना पाटेकर यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा! :)