शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी,
साँदेश ची तहान पेढ्यावर... ;)
शाळा म्हटली की बालमित्र त्यांच्या सोबत केलेल्या गमती जमती, काही विशिष्ट तास..उदा. मोस्ट कॉमन गणित,विज्ञान ई. जास्तीत जास्त झणांना कंटाळ्वाणा वाटणारा...
मग त्यात विरंगुळा काय तर खिडकीजवळची जागा असेल ,दरवाज्या जवळची ही चालते.. त्यातुन बाहेरची मजा पहात बसायची किंवा..वर्गातच विरंगुळा शोधायचा..म्हण्जे ??...( <3 )
किंवा शा.शिक्षण च्या तासाला मिळणारा वेळ जास्तीत जास्त सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करायचा..
(म्हण्जे नजरेत येण्याचा प्रयत्न बरंका..)
किंवा स्नेह सम्मेलनात जास्त भाव मारुन डॅशिंगपणा दाखवायचा प्रयत्न करायचा...
किंवा कोणत्याही छोट्या छोट्या बाबतीत काही चुक न होउ देण्याची दक्षता बाळगत आपले व्यक्तिमत्व कसे उठावदार दिसेल असे पहाणे..
एक ना अनेक असे अनेक प्रयत्न चालु असतात..पौगंडावस्थेतील मुलांचे....काही प्रमाणात त्यांचेही असतात पण त्याप्रमाणात नाही..(हे वैयक्टिक मत आहे..कोणाला ऑबजेक्षण असेल तर स्पष्ट सांगाव)
पण प्रयत्न नेमके कशासाठी???
च्यायला अजुन नाही लक्षात आले??
हो बरोबर तेच म्हणतोय मी..
शाळेत असताना तिच्या नजरेत भरावं म्हणुन नुसती पुढं पुढं करायची..
काहीतरी आगाउपणा म्हणा किंवा काहीतरी चांगले काम...केले की बसायचे तिच्याकडे नजर लाउन,,आशाळभुत नजरेने..प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत..
पण हे जरा सांभाळुनच बरं का!..नाहीतर व्हायचा घोटाळा..आणि मग चिडवाचिडवी..
ह्म्म्म....कधीतरी मिळतो तो अपेक्षित मुक प्रतिसाद..म्हण्जे एखादी चोरटी नजर फक्त आप्ल्यलाच कळलेली...किंवा एखादे निरागस स्मित हास्य...हे भांडवल पुढे बरेच दिवस पुरते त्याला..
पण कधीकधी मोठ्ठ घबाडही सापडुन जाते..
जसे की एखाद्या स्पर्धेत बाजी /तीर मार्ल्यावर..ती तीने अभिणंदनासाठी पुढे केलेला तो हात..
किंवा अशाच अनेक लहान सहान घटना याचे महत्व एका विशिष्टकाळात खुपच जास्त असते नाही..
मग काय असे काही प्रतिसाद आला कि कि तो हुरळुन जातो ..आपल्याच.. मनाच्या गैर समजुतीत हरवुन जातो..जो आग ईधर है वो तो उधर भी है असे मानुन तो मात्र हवेत तरंगत असतो..
मग आप्ल्याच भावविश्वात मग्न तो.. पुढच्या संधीच्या शोधात दुरवर भटकुन येतो पण मनाने..
मग आप्ल्या कल्पनाविश्वात आपलीच कॉलर ताठ करुन घेतो..
शाळा अशीच असते..तेव्हा एवढे कळत तर काही नसते पण नुकतेच धड पौगंडावस्थाही लागलेली नसते आणि धड बालपण्ही नसते..
मधेच लटकलेली पोरं बिचारी फिरतात/हुरळुन जातात मृगजळाच्या मागे...निव्वळ आकर्षण..
पण एकदा का दहावी झाली की मग कसले काय..मग वाहु लागतात कॉलेजचे वारे ...
कॉलेजात जाणे म्हणजे कितीही भारी असले म्हण्जे..ना युनिफॉर्म्ची कट्कट,. वेगळे विषय,वेगळे मित्र..
तरीही शाळा ती शाळाच... तिथली मजा तिथेच.. शाळे असताना जरी आपल्याला ते कळत नसले तरी नंतर मात्र खुप मिस कर्तो ना..
तीच सगळी आठवण आपल्याला करुन देते मिलींद बोकीलांची शाळा कादंबरी...
अगदी समर्पक प्रसंगांसह.. म्हणजे खरं सांगु का मी जेव्हा वाचली ना तेव्हा तर मला वटले होते की चायला माझ्यासोबतचे प्रसंग यांना कसे माहीत...
ज्यांनी वाचलीय ना त्याणा विचारा.. नाही,विचारा कशाला एकदा वाचाच ना...
ह्म्म...आता खालील चित्रफितींबद्दल..
ह्या पाहण्याआधी जर कादंबरी वाचली असेल तर जास्त कळतील आणि अजुन मस्त गुदगुल्या ओतील...
ती शिरोडकर अगदी आपल्या मनात्ली "ती" सारखीच, तो जोश्या म्हणजे दुसरा तिसरा कोणीच नसुन शाळेत असतानाचा तुच रे...
त्याला सोबत तो म्हात्रे...त्याची ती केवडा,साखर्दांडे...पुन्हा शिक्षक तेच,तसेच....
काय नी किती सांगु..
आणि अप्पा च्या भुमिकेत मुननाभाई भाईला गांधीगिरी चे पाठ देणारे,बोक्या सातबंडे मधील बेलवंडी आजोबा आणि त्यानंतर आता शाळा मधे.. दिलीप प्रभावळकर...
पण मे २०११ पर्यंत वाट पहा तोवर हे पहा..
( मराठमोळी लव्ह स्टोरी )
(कादंबरी वाचली असल्यास संदर्भ पटकन लागेल..)
मिलींद बोकीलांच्या कादंबरीवर आधार्लेल्या ह्या चित्रपटाचा प्रोमो..
प्रतिक्रिया
8 Jan 2011 - 1:14 am | प्राजु
हे बरं झालं. मस्तच! 'शाळा' आधीच वाचली असल्याने चित्रपट पहाण्याची उस्तुकता वाढली आहे.
धन्यवाद लालसा!
लेखही आवडला.
8 Jan 2011 - 2:46 am | गणपा
"शाळा" वाचताना त्यातले बरेच प्रसंग स्वतःशी रिलेट करता आल्याने मजा आली होती.
चित्रपटाने पोपट करु नये एवढीच अपेक्षा आहे. जालावर कधी येतोय त्याची वाट पहातोय.
पण त्या आधी कुणी तरी परिक्षण टाकले तर बर होईल. (अर्थात चित्रपट प्रदर्षीत झाल्यावर)
8 Jan 2011 - 3:27 am | बेसनलाडू
जितेंद्र जोशी = नरूमामा, दिलीप प्रभावळकर = अप्पा असे दिसत आहेत. झलक पाहून तरी चित्रपट पहायला मजा येईलसे वाटते. संगीत आणि छायाचित्रणादी तांत्रिक बाजूंच्या बाबतीत चित्रपट उजवा दिसतो आहे. मात्र मूळ कादंबरीतील व्यक्तिरेखांचे नि घटनांचे बारकावे, वेग यांना कितपत न्याय मिळाला आहे, हे पाहण्याची उत्सुकता आहे. उत्कृष्ट कादंबरीवरून एखादा चित्रपट तयार झाला की थेट मूळ कादंबरीशी तुलना होते. हे स्वाभाविक असले तरी असे करू नये नि चित्रपट हा चित्रपट म्हणूनच पहावा, असे वाटते. अशा अनेक चित्रपटांपैकी किती चित्रपट मूळ कादंबरीला न्याय देतात, हाही मुद्दा आहेच. अनेकदा चित्रपट मूळ कादंबरीच्या तुलनेत फिकाच वाटतो, असा अनुभव आहे.
(प्रेक्षक)बेसनलाडू
8 Jan 2011 - 4:03 am | बबलु
फारा दिवसांनी मराठी चित्रपटाची (अतुरतेने) वाट पाहणार मी. गुड गुड.
झलक तरी छान आहे. तांत्रिकदृष्ट्या सफाईदार वाटतोय.
जोश्या, सुर्व्या आणि मुख्य म्हणजे चित्र्याचे कॅरॅक्टर पाहायला उस्तुक.
केवडा, अंबाबाई आणि बेंद्रेमॅडमबद्दल उस्तुकता आहेच. ;) ;)
बाकी.... चित्रपट कसाही असला, परिक्षण कसेही असले तरी मी हा चित्रपट नक्कीच बघणार आहे.
आपले तिकिट आत्तापासून बूक. :)
8 Jan 2011 - 5:01 am | नंदन
--- असेच म्हणतो. पुस्तकाला कितपत न्याय दिलाय याबद्दल धाकधूक असली तरी चित्रपट पाहणार हे नक्की!
8 Jan 2011 - 3:12 pm | विंजिनेर
चित्रपट बघायची उत्सुकता वाढली आहे.
जाता जाता: प्रदर्शन "समर २०१११" असं आंग्रजाळेलं दिसतंय (म्हंजे ज्या देशात उन्हाळ्याचं आल्याचं कौतूक असतं त्यांच्या स्टाईलचं) आहे. म्हंजे नक्की कधी? जून-जुलैला समर म्हणावं तर आपल्याकडे तेव्हा पावसाळा असतो(कदाचित शाळा सुरू व्हायच्या दिवशी - १३ जूनला प्रदर्शन होणार असेल ;) ).
12 Jan 2011 - 9:08 am | स्पा
चित्रपट बघायची उत्सुकता वाढली आहे. :)
आमच्या डोम्बवालीत शुटींग केलं असता तर अजून मजा आली असती ;)
8 Jan 2011 - 6:05 am | राजेश घासकडवी
पहिला ट्रेलर बघून सिनेमाविषयीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुलं खरी वाटतात, अॅक्टिंग ठीक वाटते आहे, चित्रीकरण, जागा निवडणं अस्सल वाटतंय. नक्की बघणार.
8 Jan 2011 - 6:30 am | अभिज्ञ
अगदी हेच म्हणतो.
तांत्रिकदृष्ट्या चित्रपट ऊत्तम दिसतोय.
नक्कीच पाहणार.
अभिज्ञ.
8 Jan 2011 - 9:07 am | डावखुरा
आवर्जुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद..
एकुणात ट्रेलर पाहुन चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेत उतरेल असे दिसुन येत आहे..
जेव्हापासुन याची कुणकुण लागली आहे की शाळा यावर चित्रपट येणार आहे तेव्हा पसुन मागोवा घेतोय,
आणि काल एकदम प्रोमो दिसल्यामुळे..
तसेहि त्यांचे प्रोमिस होतं की ७ तारखेला येणार ते त्यांनी पुर्ण केले....यात आनंद...
8 Jan 2011 - 11:24 am | स्वानन्द
'शाळा' अजून वाचलेलं नाही. पण ' गमभन' ही एकांकीका पाहिली असल्याने साधारण पात्रांची कल्पना आहे.
मी सुद्धा आतुरतेने वाट पाह्तोय या चित्रपटाची.
अवांतरः हे 'काथ्याकूट' या सदरात का टाकलं आहेस रे?
8 Jan 2011 - 12:19 pm | नन्दादीप
कधी प्रदर्शीत होतोय??? काल च्या लिस्ट मध्ये तर नाहीये....
8 Jan 2011 - 4:40 pm | स्वानन्द
मे २०११ मध्ये.
9 Jan 2011 - 1:13 pm | नन्दादीप
धन्यवाद...!!! आता वाट बघेन मे महिन्याची..
8 Jan 2011 - 10:17 am | मृत्युन्जय
बघायलाच पाहिजे. ती शिरोडकरच्या भुमिकेत केतकी माटेगावकर आहे का?
8 Jan 2011 - 10:22 am | डावखुरा
हो ती केतकी माटेगावकरच आहे.."सारेगमप Li'L champs" मधली..
8 Jan 2011 - 10:48 am | परिकथेतील राजकुमार
केवडा ... केवडा....
12 Jan 2011 - 10:09 am | टारझन
क चालती ब ना .. :)
-(बेंद्रीण प्रेमी) तात्याटार्या
8 Jan 2011 - 11:19 am | इन्द्र्राज पवार
"....अनेकदा चित्रपट मूळ कादंबरीच्या तुलनेत फिकाच वाटतो, असा अनुभव आहे...."
१. श्री.बेसनलाडू यांच्या वरील मताशी सहमती व्यक्त करीत असतानाच असेही म्हणावेसे वाटते की, "शाळा" त्याला कदाचित अपवाद ठरू शकेल. याला कारण म्हणजे श्री.मिलिंद बोकिल यांच्या कादंबरीतील भाग "शाळा सुरु" ते "शाळा संपली" एवढ्याच कक्षेत आहे....कथानिवेदक 'दहावी' त येतो, दोन्ही मित्र सुर्या आणि फावड्या नापास झाले आहेत....शिरोडकर कुठे गेली याचा पत्ता नाही. इतपतच या ३०३ पानाच्या कादंबरीत असल्याने दिग्दर्शकापुढे या 'टीनएजर्स' चेच भावविश्व कॅमेर्याच्या माध्यमाने टिपणे असल्याने तो नक्कीच बेला यांच्या वरील वाक्याला छेद देईल, असे वाटते. [ट्रेलरही आश्वासक आहेच, विशेषतः वातावरणनिर्मिती सुंदर दिसत्ये....त्यामुळे शुभेच्छा देऊ या].
२. श्री.लालसा म्हणतात : "हो ती केतकी माटेगावकरच आहे.."सारेगमप Li'L champs" मधली..".
~ म्हणजे केतकी माटेगावकर ही नायिका असेल तर 'क्रेडिट पेज' वर हिचे नावच नाही. स्त्री नावे दोन आहेत (१) देविका दफ्तरदार व (२) अमृता खानविलकर..... त्यामुळे 'शिरोडकर' ही केतकीच आहे का?
इन्द्रा
8 Jan 2011 - 12:49 pm | बेसनलाडू
माझ्या वरच्या प्रतिसादातील भीती खोटी ठरो, हीच प्रार्थना करतो आहे.
(भयभीत)बेसनलाडू
शाळेचे एक वर्ष कुणाचेही भावविश्व मर्यादित करू शकेलसे वाटत नाही. कादंबरी वाचताना नकळतच स्वतःच्या शालेय जीवनाशी त्याची (पात्रे, प्रसंग, शिक्षक या सगळ्याची) वाचक थेट सांगड घालू शकणे, हे कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य. चित्रपटाने हे वैशिष्ट्य जरी पूर्ण पाळले, तरी मला बव्हंशी समाधान वाटेल.वरकरणी एक शालेय वर्ष वाटणार्या गोष्टीतच एका वेगळ्या स्तरावर समांतरपणे लेखकाची स्वतःची प्रेमकथाही बहरत असलेली दाखवली आहे. आणि या दुसर्या कथानकाचे शालेय वर्षाच्या कथानकाला अनेक ठिकाणी छेदही गेले आहेत. हे बारकावे जसे पुस्तकात पकडले गेले आहेत, तसे किंवा पुष्कळसे चित्रपटाच्या फ्रेम्समध्ये पकडले गेले, तर अधिक आवडेल. उत्तमोत्तम पुस्तकांवर आधारीत चित्रपट असे बारकावे टिपण्यात यशस्वी होतातच असे नाही. कधी वेळेचे बंधन नि विस्तारभय, कधी सुमार अभिनय तर कधी काही तांत्रिक बाबी. ते निदान शाळेच्या बाबतीत तरी होऊ नये, इतकेच मनापासून वाटते आहे.
चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा नि प्रार्थना अर्थातच आहेतच.
(शुभेच्छुक)बेसनलाडू
8 Jan 2011 - 3:55 pm | गणपा
बेलाशी सहमत.. म्हणुनच वर जरासा निगेटीव्ह वाटणारा प्रतिसाद दिला होता..
पण उत्सुकता आहेच. पुस्तका पेक्षा चित्रपटाच माध्यम हे थोड्यावेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचत.
चित्रपटाच्या स्वभाव धर्माला जागुन २-३ गाणी पडणारच जी मुळ कादंबरीत नाहीत. जर ती नीट बसवली गेली नाहीत (संगीत+शब्द्+चित्रिकरण) तर विचका होऊ शकतो.
प्रोमोवरुन तरी बरा दिसतोय.
तस्मात उत्कंठा आहेच.. चित्रपटाला शुभेच्छा.
8 Jan 2011 - 4:20 pm | डावखुरा
शेवट तसा वाईट्टच केलाय बोकीलांनी..
एक अनामिक हुरहुर लावुन ठेवतो मनाला...उगीचच जोश्याबद्दल वाईट वाटते..
आणि ईंद्रा यांच्याशी सहमत...ट्रेलर आश्वासक वाटते...आणि बेला यांनाही त्यांची शंका खोटी ठरावी हीच ईच्छा आहे..गणपा ही चांगली अपेक्षा ठेउन आहेत..
आपल्या सगळ्यांच्या शुभकामना आहेतच..
बर्याच दिवसांनी मराठीत चांगला सिनेमा येउ घातलाय...
आणि ती केतकी आहे हे मी 'च' लावुन सांगतोय ते चेपु वरील शाळा ह्या पेज वर काही छायाचित्रे आहेत शुटींगच्या वेळची आणि सिनेमात्ली स्थिर छायाचित्रे त्यात ती टॅग झाली आहे..त्यामुळे मी तसे सांगतोय..
चु.भु.दे.घे.
8 Jan 2011 - 4:54 pm | परिकथेतील राजकुमार
ती केतकीच आहे :)
हा दुवा :-
http://epaper.dnaindia.com/epaperpdf%5C12082010%5C11pentertainment-pg4-0...
8 Jan 2011 - 10:52 pm | इन्द्र्राज पवार
"....ती केतकीच आहे.."
~ होय, वाचली वरील लिंक. 'शिरोडकर' चा रोल केतकी माटेगांवकर हिचा आहे हे आता नक्की झाले. पण मग इतक्या महत्वाच्या भूमिकेचे काम करणार्या या मुलीचे नाव 'ट्रेलर' मध्ये जे 'क्रेडिट पेज' आहे तिथे का येऊ नये, हाच प्रश्न माझ्यासमोर आहे....बाकीची सर्व, अगदी प्रभावळकर ते खानविलकरपर्यंत आहेत....शिवाय परदेशी दोन्ही तंत्रज्ञांचीसुद्धा !
असो. ही काही तक्रार नाही....फक्त एक किरकोळ निरिक्षण म्हणतो. केतकीच्या वाटचालीस शुभेच्छा या निमित्ताने !
इन्द्रा
8 Jan 2011 - 11:38 am | स्वाती दिनेश
ट्रेलर बघून चित्रपट कसा असेल याची उत्सुकता वाटते आहे,
स्वाती
8 Jan 2011 - 1:11 pm | मनिम्याऊ
याआधी हिन्दी भाषेत याच कादम्बरीवर आधारित सिनेमा येउन गेला.
'हमने जीना सिख लिया' या नावचा..
लिन्क खाली देते आहे
http://www.youtube.com/watch?v=ebI4ls5scmg
8 Jan 2011 - 1:22 pm | परिकथेतील राजकुमार
त्यात आपली [?] मृण्मयी देशपांडे होती तो का हो ?
अतिशय भयाण आणि भकास होता.
8 Jan 2011 - 6:56 pm | मनिम्याऊ
त्यात आपली [?] मृण्मयी देशपांडे होती का??
हो.. तीचं ती... अप्सरा (?)
8 Jan 2011 - 4:14 pm | डावखुरा
मनिम्याऊ तै दुव्याबद्दल धन्यवाद..
8 Jan 2011 - 7:07 pm | बिपिन कार्यकर्ते
कसाही असला तरी एकदा तरी बघणारच...
8 Jan 2011 - 11:19 pm | वाहीदा
हिंदी अन मराठी 'शाळा' यातील मुख्य फरक
ट्रेलरवरुन तरी 'शालेयविश्वातिल निरागसता' मराठी चित्रपटात जास्त जाणवली ती हिंदी सिनेमा 'मैने जिना सिख लिया' मध्ये नाही जाणवत
केतकी माटेगावकरचे डोळेच कित्ती बोलके अन निरागस आहेत तसे मृण्मयी देशपांडेमध्ये नाही जाणवत. मृण्मयी देशपांडेला उगाच ओढून ताणून १०वी बसवलंय असं वाटतंय
केतकी चं डोळ्यातूनच बोलणं अन लाजणं, अहाहा ! कित्ती निरागस आहे !!. तिचे ते हळूच डोळ्याच्या कोनातून जोशीकडे बघून हसणे, खुश होणे.. मराठी चित्रपटात कैमेराने छान टिपले आहे.
हि सर्व मुले उनाड आहेत पण तितकीच ती स्वच्छंदी, मनस्वी अन निरागस ही आहेत.
शाळा या कादंबरीतील निरागसता ज्या दिग्दर्शकाने बोलकी केली त्याचाच चित्रपट चालणार हे नक्की.
पण सुर्या, फावड्या आणि चित्र्याची भुमिकेला 'गमभन' नाटकाच्या कलाकारांनी जास्त न्याय दिला आहे असे वाटते.
तशी पण मी नाटकप्रेमीच असल्याने 'गमभन' नाटक जास्त आवडले. 'गमभनचे' नैपथ्य अन प्रकाशयोजना अप्रतिम !! चित्रपटापेक्षा नाटक हे नेहमीच सरस अन दर्जेदार !!
बाकी चित्रपटाची उत्सुकता आहेच !
12 Jan 2011 - 9:31 am | घाशीराम कोतवाल १.२
वाहिदा तै तुम्ही गमभन ही रुईयाची एकांकिका पाहिली काहो
जबर्दस्त होती त्याचच पुढे नाटक झाल...
8 Jan 2011 - 8:18 pm | डावखुरा
वहीदातै हिंदी अन मराठी 'शाळा' यातील तुम्हाला जाणवलेला फरक अगदी रास्त आहे असे मला वाटते..
>>शाळा या कादंबरीतील निरागसता ज्या दिग्दर्शकाने बोलकी केली त्याचाच चित्रपट चालणार हे नक्की.
या वाक्याला +१
पण नाटकाबाबतचे तुमचे विचार थोडे पटले नाहीत..
कारण..नाटकात नैपथ्यावर मर्यादा येतात..आणि बर्याच ईतरही बाबींत मर्यादा येतात..
नाटक मलाही आवडते..पण त्याची तुलना चित्रपटाशी करणे थोडे खटकले..
कारण नाटक त्याच्याजागी आणि चित्रपट त्याच्याजागी सरस असे मला वाटते..
तसेच गणपाभौ म्हण्तात ती भीती आहेच..
(चित्रपटाच्या स्वभाव धर्माला जागुन २-३ गाणी पडणारच जी मुळ कादंबरीत नाहीत. जर ती नीट बसवली गेली नाहीत (संगीत+शब्द्+चित्रिकरण) तर विचका होऊ शकतो.-ईति गणपा)
आणि ईंद्रा काकांची शंका पण रास्तच आहे...
(~ होय, वाचली वरील लिंक. 'शिरोडकर' चा रोल केतकी माटेगांवकर हिचा आहे हे आता नक्की झाले. पण मग इतक्या महत्वाच्या भूमिकेचे काम करणार्या या मुलीचे नाव 'ट्रेलर' मध्ये जे 'क्रेडिट पेज' आहे तिथे का येऊ नये, हाच प्रश्न माझ्यासमोर आहे....बाकीची सर्व, अगदी प्रभावळकर ते खानविलकरपर्यंत आहेत....शिवाय परदेशी दोन्ही तंत्रज्ञांचीसुद्धा ! ईति ईंद्रा काका)
11 Jan 2011 - 11:28 pm | डावखुरा
'शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी'
"शाळा" चे लेखक 'मिलिंद बोकील' यांचे शाळा विषयी अनुभव कथन...
" title="shala">
ईंद्रा का तुमच्या शंकेचं उत्तर घेउन येतोय..
"Shirodkar ani Joshi he amche nayak ahet....we decided ki itkyat hyanna credits ani publicity ya bhangadit padu naye. lahan ahet, ani joshi is in his 10th, so we didnt want to give him any burden. let them concentrate on their studies...when actual publicity will start ....we will have to put their names anyway." -Admins "SHALA" (School)
12 Jan 2011 - 11:23 am | परिकथेतील राजकुमार
धन्स लालसा :)
छान माहिती.
12 Jan 2011 - 1:16 pm | इन्द्र्राज पवार
थॅन्क्स लालसा....आता खर्या अर्थाने 'केतकी' नाव टायटलमध्ये का नाही ते समजले. शिवाय त्या टीमचा हा निर्णय खरेच स्पृहणीय आहे.
तरीही नावे असलेल्या आणि नसलेल्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीबद्दल शुभेच्छा आहेतच.
इन्द्रा
13 Jan 2011 - 12:18 am | वाहीदा
मिलिंद बोकील यांनी कादंबरीचे नाव 'शाळा'च का हे फार छान सांगितले ..... वाचतानाही प्रत्येकाच्या मनात ही शाळा भरते :-) अगदी Back to School Days प्रत्येक वाचक जातोच जातो .
12 Jan 2011 - 12:58 pm | बबलु
अरेच्या.... आज हा एक टीझर ट्रेलर पाहिला तुनळीवर. यातले कलाकार वेगळे आहेत. :) :)
हा काय प्रकार आहे ? जल्ला काय कल्ला नाय.
http://www.youtube.com/watch?v=EA4V1halYqU&feature=player_embedded