गाभा:
राम राम मंडळी
सध्या मरणाची थंडी पडली आहे..
कुड कुड करत रात्रभर थंडी वाजते..
दातावर दात आपटतात
दिवसा सुद्धा गारठा जाणवतो
शरीर नुसतं गार पडतं.
बोट वाकडी होतात
नुसतं बसुन रहावंसं वाटतं
असं वाटत की आता संपला कार्यभाग...
छ्या ! या थंडीपासुन बचाव करण्याचे साधे सोपे, कठीण अवघड जे जे काही उपाय असतील ते सांगा बरे...
आपलाच
(गारचटलेला) नाना
प्रतिक्रिया
7 Jan 2011 - 12:22 pm | चिंतामणी
काय हो. तुम्हाला काय उपाय सुचवायचे थंडी घालवायचे. :(
आणि ते सुध्दा जाहीरपणे?????
:-/
;)
7 Jan 2011 - 6:50 pm | टारझन
काय नाना , वेळ जात नाहीये का ?
7 Jan 2011 - 12:38 pm | परिकथेतील राजकुमार
लग्न करा आता.
7 Jan 2011 - 12:39 pm | छोटा डॉन
+१
हेच म्हणतो, अजुन काही बोलण्यासारखे रहात नाही :)
- छोटा डॉन
7 Jan 2011 - 12:40 pm | अवलिया
मी थंडीपासुन बचाव मागितला होता... जन्मठेप नाही. कॉलिंग युयुत्सु !
7 Jan 2011 - 12:44 pm | परिकथेतील राजकुमार
मग ह्यापुढे असले प्रश्न विचारताना नको असलेल्या उत्तरांची यादी पण देत जा.
हरामखोर माणूस ! उगाच आमचे टंकनश्रम फुकट घालवले.
7 Jan 2011 - 12:48 pm | अवलिया
>>>मग ह्यापुढे असले प्रश्न विचारताना नको असलेल्या उत्तरांची यादी पण देत जा.
ओके
>>>हरामखोर माणूस !
संपादक कृपया लक्ष द्या ! शिवीगाळ चालायला मिपा हे प्रगल्भ संस्थळ नाही.
>>>उगाच आमचे टंकनश्रम फुकट घालवले.
खवमधे तांदुळ नव्हते पाठवले.. प्रतिसाद द्या म्हणुन,
7 Jan 2011 - 12:57 pm | परिकथेतील राजकुमार
प्रगल्भ संस्थळ म्हणजे काय? आणि मिपा प्रगल्भ नाही हे ठरवणारे तुम्ही कोण ? साधे फेसबुक म्हणजे काय हे माहिती नसणार माणूस अशी विधाने करुच कशी शकतो ?
धागा सार्वजनीक काढलात ना? ह्यापुढे तुमच्या लेखनावर कोणी प्रतिसाद द्यावेत आणि कोणी नाही त्याची पण यादी देत जा.
7 Jan 2011 - 1:01 pm | अवलिया
>>>प्रगल्भ संस्थळ म्हणजे काय?
अभ्यास वाढवा.
>>>आणि मिपा प्रगल्भ नाही हे ठरवणारे तुम्ही कोण ?
अभ्यास झाला की तुमचे तुम्हाला कळेल.
>>>साधे फेसबुक म्हणजे काय हे माहिती नसणार माणूस अशी विधाने करुच कशी शकतो ?
असंबध्द तुलना. तस्मात दुर्लक्ष.
>>>धागा सार्वजनीक काढलात ना? ह्यापुढे तुमच्या लेखनावर कोणी प्रतिसाद द्यावेत आणि कोणी नाही त्याची पण यादी देत जा.
संपादक मंडळास विनंती आहे त्यांनी धाग्यामधे प्रतिसाद कुणी द्यावे याची निवड करण्याची सोय उपलब्ध करुन द्यावी. धन्यवाद
8 Jan 2011 - 12:10 am | चिंतामणी
शेक्सीपरच्या शब्दात बोलायचे तर परा You too??????????
(चाणाक्ष मिपाकरांनी योग्य तो अर्थ घ्यावा) ;)
7 Jan 2011 - 12:44 pm | गणपा
लगीन कर रे नाना .
आणि हो बायको आयटीतली कर म्हणजे बायकोने सांगीतलेली घरकाम करण्यात सगळी थंडी कुठच्या कुठे पळुन जाईल.
(बायको नॉन आयटी वाल असुनही अणुभवी)-गणा
उप्स पर्याने आधीच सुचवल आहे मनावर घ्याचं आता ;)
7 Jan 2011 - 12:46 pm | अवलिया
च्यामारी ! अर्धी लाकडं मसणात गेली.. आता कशाला लगीन करुन व्याप वाढवायचा !
बाकी उपाय सुचवा मंडळी ! अघोरी उपाय नको..
7 Jan 2011 - 5:45 pm | केशवसुमार
म्हणजे नानाशेठ, मसणात लाकड कमी पडता आहेत !!.. तरीच तुम्हाला थंडी वाजतेय..
परा-गणपा ने सुचवलेला उपाय करा ..उरलेली लाकडपण पोचतील मसणात.. मग थंडी वाजायची नाही..
बाकी चालू दे..
(अघोरी)केशवसुमार
7 Jan 2011 - 6:08 pm | सुहास..
उरलेली लाकडपण पोचतील मसणात.. मग थंडी वाजायची नाही.. >>>
अगगगग !!
टिपीकल गुर्जींचा आहेर ! बाकी लाकडांची पचाइत झाली.
नान्या गेला, असा उसासा टाकुन, दोन ब्रॅन्डीचे थेंब, कावेरीतुन पुर्व दिशेला उडविल्या जातील याची नोंद घ्यावी
7 Jan 2011 - 6:21 pm | अवलिया
>>>नान्या गेला, असा उसासा टाकुन, दोन ब्रॅन्डीचे थेंब, कावेरीतुन पुर्व दिशेला उडविल्या जातील याची नोंद घ्यावी
तुम्हाला पोहचवुन त्याची क्वार्टर मारुन मगच आम्ही मरु ! काळजी नसावी.
7 Jan 2011 - 6:24 pm | स्पा
टाकुनिया नाना गेला
7 Jan 2011 - 6:26 pm | अवलिया
आहे अजुन ! इतक्यात ग्लास किणकिणवु नका !!
7 Jan 2011 - 6:28 pm | स्पा
आहे अजुन ! इतक्यात ग्लास किणकिणवु नका !!
ये .............इस खुशिमे पार्टी

7 Jan 2011 - 6:16 pm | अवलिया
केसुशेट
तुम्ही तर आम्हाला मसणात पोचवायला देव पाण्यात घालुनच बसला आहात हे माहित आहे.
एकदाचे मेलो म्हणजे सुटले तुम्ही... करा मग रोज मजाकरा ! मटार उसळ खा ! शिकरण करुन खा !!
7 Jan 2011 - 6:45 pm | केशवसुमार
नानाशेठ,
आम्ही देव पाण्यात घालून प्रॉब्लेम सुटले असते तर मग काय... पण तसं होत नाही ना..
आम्ही आपलं 'लग्न करा' हा थंडीवरचा उपाय कसा असू शकेल ह्याचे विश्लेषण केले..
बाकी चालू दे..
(बर्फातला)केशवसुमार
7 Jan 2011 - 6:49 pm | छोटा डॉन
>>आम्ही देव पाण्यात घालून प्रॉब्लेम सुटले असते तर मग काय... पण तसं होत नाही ना..
एवढं मात्र पटलं.
च्यायला नाना जाईल म्हणुन एवढा वेळ देव पाण्यात घालुन ठेवले आहेत की आता त्यांना थंडी वाजत असेल, जाऊ देत, असो.
बरं, नान्या आता बरं आहे का रे ?
बाकी चालु द्यात ( सौजन्य : आजानुकर्ण )
- छोटा डॉन
7 Jan 2011 - 6:51 pm | अवलिया
>>>च्यायला नाना जाईल म्हणुन एवढा वेळ देव पाण्यात घालुन ठेवले आहेत की आता त्यांना थंडी वाजत असेल, जाऊ देत, असो.
स्वेटर घाला त्यांना !!
>>>>बरं, नान्या आता बरं आहे का रे ?
जरा बरे आहे.. गणपाशेटने दिलेला उपाय केला आहे
बाकी तुम्हाला गजकर्ण कसा काय झाला?
7 Jan 2011 - 7:01 pm | छोटा डॉन
कुठला उपाय ?
7 Jan 2011 - 7:01 pm | अवलिया
व्यनी चेकवा
7 Jan 2011 - 12:50 pm | स्पा
मेस लावून गरम गरम जेवू शकता......
7 Jan 2011 - 7:03 pm | पर्नल नेने मराठे
णानाला मेस झेपेल का?
8 Jan 2011 - 11:15 am | विश्वनाथ मेहेंदळे
प्रश्न थोडा चुकला हो. "मेसला नाना झेपेल का" असा प्रश्न पाहिजे.
7 Jan 2011 - 12:51 pm | विंजिनेर
इकडे या. :) लगेच मुंबईतला उन्हाळा का संपला असे वाटेल :)
(-५ सें) विंजिनेर.
आणी हो, ते लग्नाचे वगैरे मनावर घेऊनच येणार असाल तर येताना जरा फराळाचं तरी घेऊन या.
(फुक्टा पण पौष्टिक) विंजिनेर
7 Jan 2011 - 12:54 pm | यकु
अंगावरचे कपडे काढून टाका आणि अंगाला राख फासून थंडीत राहाण्याचा सराव करा.. ;-)
तुमच्या नावावरून तुम्हाला हे सांगण्याची तसे पाहाता काही आवश्यकता नाही..
7 Jan 2011 - 12:56 pm | अवलिया
ओके. फक्त कुणाच्या अंगावरचे काढायचे ह्याचा खुलासा आला असता तर बरे
7 Jan 2011 - 12:57 pm | यकु
शिव!!! शिव !! शिव!!!
7 Jan 2011 - 1:02 pm | Nile
शिव?? तो तर उघडाच असतो ना?
7 Jan 2011 - 1:04 pm | अवलिया
कपडे काढुन शिवायचे की आधीच शिवायचे?
आणि कपडे का शिवायचे?
8 Jan 2011 - 12:15 am | चिंतामणी
मी एकटाच सभ्य निघालो.
नाना, माझा पहीला पोस्ट बघुन टॉपिक डिलीटायची रीक्वेश्ट सं.मं.ला पाठवली असती अशी वेळ आली नसती. :(
7 Jan 2011 - 12:57 pm | नावातकायआहे
>>आता कशाला लगीन करुन व्याप वाढवायचा !
थंडीपुरती टेंपरवारी सोय बघा.
इंडस्ट्रियल ग्रेड 'हिटर' आना. ;-)
7 Jan 2011 - 12:58 pm | विजुभाऊ
लग्न करा आता.
नान्या...
परा आणि डॉन्या या अनुभवी लोकानी तुला सल्ला दिलाय ना.
रामदासानी बोहोल्यावरुन पलून गेल्यानन्तर देखील " प्रपंच करावा नेटका" असे लिहीले.
रामदासांच्या नन्तर असे म्हणू शकणारे हे दोघेच.
अवांतरः रामदास स्वामी ज्या गडावर रहायचे त्या गडाचे नाव सज्जन गड होते.
परा आणि डॉन्या ज्या गडावर रहातील त्या गडाचे नाव काय ठेवायचे
7 Jan 2011 - 1:02 pm | स्पा
परा आणि डॉन्या ज्या गडावर रहातील त्या गडाचे नाव काय ठेवायचे
कावेरीगड
7 Jan 2011 - 1:02 pm | अवलिया
म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?
8 Jan 2011 - 12:18 am | चिंतामणी
____/\____
____/\____
____/\____
____/\____
____/\____
7 Jan 2011 - 1:00 pm | गणपा
व्यनी चेकवा. :)
7 Jan 2011 - 1:05 pm | अवलिया
=))
खतरनाक !!
7 Jan 2011 - 1:25 pm | परिकथेतील राजकुमार
व्यनी फॉरवर्ड कर रे !
7 Jan 2011 - 1:38 pm | परिकथेतील राजकुमार
गणपा __/\__ ठार मेलो च्यायला !!
8 Jan 2011 - 12:50 am | पर्नल नेने मराठे
ह्म्म स्वेत्र विनुन पाथ्वला असेल गनपाने
8 Jan 2011 - 1:39 am | सुहास..
स्वेत्र विनुन पाथ्वला असेल गनपाने >>>
ही चुचु आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त हुशार आहे !
नान्या आता बोल !!
तुला पुर्वेकडचा कावळा शिवेल ब्वा आता !! ;)
7 Jan 2011 - 1:17 pm | नगरीनिरंजन
अवलिया भाय, अवलिया भाय
लोकरीची चड्डी, ब्रँडीचा प्याला आणि मोज्यात पाय. ;-)
7 Jan 2011 - 1:25 pm | utkarsh shah
घ्या २ घोट (थंडी जाण्यासाठी आणि बाकीची तुमच्या जबाबदारीवर)
7 Jan 2011 - 1:34 pm | विजुभाऊ
थंडीपासून बचाव = थंडीपासून बच्चा आव
7 Jan 2011 - 5:29 pm | विनायक प्रभू
लग्न करायची काहीही गरज नाही.
तो पिक्चर बघितला नाहीत का?
तो हो,
श शी कपुर, शत्रुघन शिन्हा, श र्मिला टॅगोर.
ते गाणे आठवा हो.
तेरा मुझसे था पहीलेसे नात कोई.
7 Jan 2011 - 5:37 pm | विनायक प्रभू
आल ध्यानात.
'आ गले लग जा'
पिक्चर मधे थंडी शर्मिला ला वाजते.
आणि ती घालवायचे श्रम शशी ला करावे लागतात.
7 Jan 2011 - 7:36 pm | आत्मशून्य
बिडी जलायलेsssssssss

जीगरसे अवलीयाsssssssss
जीगरमा बडी आग है..........
7 Jan 2011 - 9:51 pm | सुधीर काळे
नानासाहेब,
भेसळविरहित (म्हणजे पाणी वगैरे न घालता) ब्रँडी किंवा कोनियकचे ६० मि.लि.चे दोन शॉट मारा! म्हणजे हळू-हळू नाहीं तर "उचलला ग्लास ओतला घशात" या स्टाईलवर! यशाची खात्री!!
पण त्या आधी काश्मीरपासून मात्र मैल-मैल दूर जा हं!
8 Jan 2011 - 12:18 am | शाहरुख
नाना, हायसा नव्हं अजून !
8 Jan 2011 - 1:14 am | देवदत्त
घरात शेकोटी करा. जास्तच थंडी वाटल्यास त्या आगीतच (जवळ नाही) हात शेका. कधीच थंडी लागणार नाही.
बाकी मूळ मुद्यावर.. लहानसा हीटर विकत मिळतो तो आणा.
8 Jan 2011 - 11:19 am | परिकथेतील राजकुमार
शक्यतो शेजार्याच्या घरालाच आग लावता आली तर उत्तम.
9 Jan 2011 - 1:27 pm | देवदत्त
शक्यतो शेजार्याच्या घरालाच आग लावता आली तर उत्तम. :D
आपले घर खेटून नको त्या घराला.
(आणि Love Thy Neighbour चे काय?)
9 Jan 2011 - 11:14 pm | पंगा
शेजार्याच्या/शेजारणीच्या घराला आग लावून, मग ते भस्मसात झाल्यावर त्याला/तिला आपल्या घरात (कायमचे?) आणून मग त्याच्यावर/तिच्यावर प्रेम करायला कोणीही नाही म्हटलेले नाही, असे वाटते.
डिस्क्लेमरः हा सल्ला नाही. नाहीतर आमच्या त्या मूर्ख पेलिनबाईने वीस खासदारांच्या मतदारसंघांवर बंदुकीच्या क्रॉसहेअरचे चित्र लावल्यावर एका महामूर्खाने खरोखरच त्यांपैकी एका खासदारणीवर गोळी झाडली, त्याचप्रमाणे अवलियाने (अवलियाला महामूर्ख म्हणण्याचा हेतू नाही. निदान अजूनतरी. म्हणजे, दुसर्याच्या सल्ल्यावरून खरोखरच तिसर्याच्या घराला आग लावत नाही, तोपर्यंत तरी.) जर खरोखरच शेजार्याचे/शेजारणीचे घर जाळून त्याला/तिला आपल्या घरी कायमचे राहायला बोलावले, तर चिथावणीचा आळ आमच्यावर यायचा. सार्वजनिक मंचांवर - मग ते वेबसाइटवर असो, ट्वीटमधून, प्रतिसादांतून, खरडवहीत, किंवा आणखी कोठे किंवा कसे - काहीबाही बेजबाबदारपणे लिहिल्यास (किंवा चित्रे डकवल्यास, वगैरे) त्याचे सार्वजनिक परिणाम असतात, ते असे! (अर्थात, मूर्ख पेलिनबाईला हे कधी कळण्याची अपेक्षा नाही म्हणा. आणि आता कळून उपयोगही नाही. द डॅमेज हॅज़ बीन डन.)
8 Jan 2011 - 5:54 am | नंदन
एक लेख इथे :)
8 Jan 2011 - 12:02 pm | गांधीवादी
अवलिया साहेब,
इथे एक उपाय सुचविलेला आहे.
असे धार्मिक ग्रंथांचे ज्वलन केल्याने काही जातींच्या/लोकांच्या मनातील काही क्लेश दूर होणार असतील तर हि नक्कीच काही मोठी किंमत नाही.
तथापि त्यांनी ग्रंथ ज्वलन करण्याअगोदर खालील बाबींचा विचार करावा.
१) ज्वलन काळजीपूर्वक करावे. ज्वलन केल्याने उपस्थित असलेल्या कोणाही बांधवास इजा होऊ नये.
२) ज्वलन करण्यास काही प्रती कमी पडत असतील तर कळवावे, आमच्याकडे काही प्रती आहेत, त्या आणून देऊ.
३) विनाकारण जास्त प्रतींचे ज्वलन करू नये. (ग्लोबल वार्मिंग धोक्याची घंटा देत आहे)
४) जर काही लोक आजकालच्या थंडीत कुडकुडत असतील तर प्रतींचे ज्वलन त्यांच्या इथे करावे, जेणेकरून त्यांना त्याची उब मिळेल.
8 Jan 2011 - 3:45 pm | विजुभाऊ
ब्राज्वलन करा.....