सामुग्री : कारली ,मीठ तिखट ,धणे पुड बडीशेप( ओली) , दही.
कारली सोलून घ्या. सोललेला कीस बाजूला काढून ठेवा ( याची चटणी करू शकता )
सोललेली कारली एका बाजूने काप देवून चिरून त्यातील बिया काढून घ्या.
चिरलेली कार्ली मिठाच्या गरम पाण्याने धुवून घ्या. थोडा दाब देवून पाणी काढून टाका
आतील बाजूने तिखट मीठ लावून कारली थोडावेळ ( साधारण वीस मिनिटे )तशीच बाजूला ठेवून द्या.
बडीशेप ( ओली) न मिळाल्यास साधी बडीशेप पाण्यात अर्धा तास भिजत टाका.
पाच चमचे बडीशेप मध्ये एक अर्धा चमचा या प्रमाणात धणेपूड मिसळा. यात चवीसाठी तिखट , ( हवी असल्यास किंचीत साखर ) मीट यांचे मिश्रण करा व ते काप दिलेल्या कारल्यात भरा.
मिश्रण सुटून बाहेर येवू नये म्हणून कारली दोर्याने बांधा.
भरलेली कारली शॅलो फ्राय क्रऊन घ्या. फ्राय करून झाल्यानन्तर दोरे काढून टाका.
वाढताना कारल्यासोबत दही अवश्य द्या.
प्रतिक्रिया
6 Jan 2011 - 12:14 pm | गवि
अहो काय झकास पाककृति आहे..
भरलेली कारली हा माझा वीक पॉईंट आहे..
आणि तुमच्या या पाकृमधे बर्यापैकी कुरकुरीत किंवा निदान ओलेपणा नसलेली भाजी दिसते आहे.. ही तर माझी अजूनच आवडती.
पोळीऐवजी हा प्रकार भातासोबत (आमटीभात किंवा मोअर बेटर प्लेन वरणभातासोबत) जास्त छान वाटेल.
6 Jan 2011 - 12:56 pm | गणपा
मस्त हो विजुभाय :)
कारल्याचा कडुपणा कमी करणार्या डीपफ्राय पेक्षा हा प्रकार बरा वाटतोय.
(कारलं जर साखर, गुळ्,कांदा, नारळ टाकुन गोडं करुनच खायच तर मग कारलं घ्याच कशाला या मताचा.)
6 Jan 2011 - 1:02 pm | वाहीदा
आमच्या पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आहे पाकृ पण कृती आवडली.
अम्मी ची नजर चूकवून मेहजबीन आप्पी(ताई) कधी कधी त्यात खिमा पण टाकायची अन आम्ही 'खिमा भरलेलाकरेला' कुठला अन 'साधा भरवा करेला' कुठला हेच शोधत बसायचो.
गेले ते दिवस :-(
6 Jan 2011 - 1:20 pm | यशोधरा
पाकृ मस्त वाटतेय (फोटो दिसत नाहीये) आणि ही वाहीदाने सांगितलेली खिमा भरायची कल्पनाही मस्त आहे.
6 Jan 2011 - 1:23 pm | नगरीनिरंजन
खिमा भरा करेला!!
वाचूनच तोंडाला पाणी आलं. :-)
6 Jan 2011 - 1:02 pm | पर्नल नेने मराठे
विजुभाउ ..जवाब नही ;)
6 Jan 2011 - 1:16 pm | अवलिया
कारलं खात नाही.
पण विजुभाऊ करुन खाऊ घालतील तर कारले सुद्धा खाउ !!
6 Jan 2011 - 2:00 pm | परिकथेतील राजकुमार
हेच बोल्तो. वाटले तर खाकी चड्डी घालुन पंगतीला बसु.
6 Jan 2011 - 2:11 pm | अवलिया
खाकी चड्डीपेक्षा सोवळे काय वाईट ? तेवढेच विजुभाउला ब्राह्मण भोजनाचे पुण्य !
6 Jan 2011 - 2:14 pm | परिकथेतील राजकुमार
विजुभौंचा कर्मकांडावर विश्वास नाही.
6 Jan 2011 - 2:16 pm | अवलिया
ते विजुभाउ आहेत.. तोंडाने एक बोलतील मनात दुसरेच असते...
6 Jan 2011 - 1:55 pm | सहज
मस्त डिश विजुभौ!
(कारले, शेपू, वांगे प्रेमी) सहज
6 Jan 2011 - 2:59 pm | मुलूखावेगळी
विजुभौ,
मस्त डिश
मला कार्ले फ्राय्,मसाला,पीठ लावुन सगळे प्रकार आवड्तात
आता हे पन ट्राय करेल.
6 Jan 2011 - 4:58 pm | जिवाणू
कारले कडू असल्यामुळे आवडत नाही, पण ह्या रीतीने केल्यास कडुपणा कमी होईल असे वाटते.
6 Jan 2011 - 5:52 pm | स्मिता.
पाकृ आवडली. कारले मला फार आवडते. आणि भरले कारले तर विचारायलाच नको.
एक शंका; तुम्ही कारले सोलून घ्यायला का सांगितले आहे? त्याने कडूपणा कमी होतो का? आमच्याकडे कारली न सोलताच अशी भाजी करतात.
6 Jan 2011 - 5:56 pm | आजानुकर्ण
पाककृती चांगली आहे. मात्र परप्रांतीयांच्या पाककृतीपेक्षा अस्सल मराठमोळ्या पाककृती येथे अपेक्षित आहेत.
(मराठी) आजानुकर्ण
भरवा आणि करेला हे दोन हिंदी शब्द वाचून डोळे पाणावले
(अश्रुपातक) आजानुकर्ण
7 Jan 2011 - 2:35 am | पक्या
काय राव ...काय बोलताय ?अजुन २-३ धागे मागे गेलात तर तंदुर चिकन ही पाकॄ दिसेल.
तंदूर आणि चिकन हे पण मराठी शब्द नाहियेत. असेच अजुन पण शोधले की सापडतील.
विजूभाऊ मस्त पाकृ.
7 Jan 2011 - 3:40 pm | गणपा
हाच निकष लावला तर मिपावरच्या ३/४ पाककृत्या हद्दपार कराव्या लागतील ;)
7 Jan 2011 - 1:58 am | पिंगू
मस्त वाटले.. पण कारले सोलण्याचे प्रयोजन कळाले नाही.. विजुभौ जरा स्पष्ट करून सांगा ना..
- पिंगू
7 Jan 2011 - 10:34 am | विजुभाऊ
कारल्याच्या कडा सोलून घेतल्या आहेत. त्या कडांची तळून चटणी करतात.
मी तळलेली कारली करताना फक्त कडा सोलत नाही अन्यथा कारली नेहमीच सोलून घेतो.
प्रयोजन नक्की काय ते मलाही माहीत नाही. पण बहुधा त्या कडांची चटणी करण्यासाठीच सोलत असावेत
7 Jan 2011 - 3:29 pm | जागु
झक्कास.