पातोळ्या.

ज्योति प्रकाश's picture
ज्योति प्रकाश in पाककृती
5 Jan 2011 - 11:49 pm

गगनविहारी यान्च्यासाठी पातोळ्याची पाककृती.
साहित्यः-१)हळदीची पाने ७ ते ८.
२)२ वाट्या तान्दुळाची पिठी .
३)३ वाट्या ओले किसलेले खोबरे.
४)१ ते दीड वाटीकिसलेला गुळ.
५)चिमुटभर वेलचीपुड.
६)मिठ चविनुसार.
७)थोडे तेल.
कृती:-१)प्रथम किसलेले खोबरे व गुळ एकत्र करुन त्यात थोडे मिठ घालुन शिजवुन घ्यावे.
गुळ विरघळला व थोडे सुकले कि सारण झाले म्हणुन समजावे.
२)एका भान्ड्यात २ वाट्या पाणी घेवुन त्यात थोडे मिठ व एक चमचा तेल घालुन उकळत ठेवावे.
पाणी उकळले की त्यात तान्दुळाची पिठी घालवी.आच बारिक ठेवावी.व ढवळुन झाकण ठेवावे.
२ मिनिटानी आच बन्द करावी्. ह्याला उकड काढणे म्हणतात.
३)५ मिनिटानी एका परातीत उकड काढुन घेणे.त्यातील थोडी उकड घेउन त्यावर पाण्याचा हबका
मारावा व चान्गले मळुन घ्यावे.तेलाचा हात लाउन परत मळुन घ्यावे.
४)हळदीचे एक पान घेउन त्याला तेल लावणे.व त्यावर मळलेल्या पिठाचा गोळा घेउन पानभर पातळ
थापावा.
५)नन्तर त्यावर तयार केलेले सारण पसरावे.व पान दुमडून निट बन्द करावे.
सगळया पातोळ्या तयार झाल्यावर कुकरमध्ये जाळीच्या चाळणीत शिट्टी काढून २० मिनिटे
शिजत ठेवावे.
खाताना हळदीचे पान काढ्ण्याचे भान ठेवावे.छान तुपाची धार घालुन ताव मारायला सुरुवात करायची.
आमच्याकडे हा प्रकार हरितालिका व नागपन्चमीला करतात.

प्रतिक्रिया

अहा... किती छान.... खूप खूप मनापासून थँक्स... ज्योतीजी..लगेच फ़र्माईश पूर्ण....!!

रेवती's picture

6 Jan 2011 - 4:29 am | रेवती

या पातोळ्या सोप्या वाटताहेत.
आमच्याकडे फरच नाजूक प्रकार असतो.
तांदळाची पिठी पाण्यात जाडसर कालवून त्याचं धिरडं हळदीच्या पानावर घालायचं आणि उकडायचं.
जर लोणच्याबरोबर खायचं असेल तर तसच वाढायचं नाहीतर उकडलं गेल्यावर सारण भरून दुमडायचं.
मला अजिबात जमत नाहीत पण चव फार आवडते.;)

वेगळच,आहे नविन, करुन बघायला पहिजे
पन हळदिच पान कुथ मिळेल?

कवितानागेश's picture

6 Jan 2011 - 11:09 am | कवितानागेश

एरवी हवी असतील तर ओली हळद (मूळे असलेली हळ्कुंड) आणून घरी कुंडीत लावायची.

गवि's picture

6 Jan 2011 - 11:13 am | गवि

रेसिपी मिळाल्याच्या आनंदात हळदीची पाने कुठे मिळतील हे लक्षातच घेतलं नाही.

पावसाळ्याची वाट पाझाले.किंवा

रोपे उगवून मोठी पाने मिळण्याची वाट पाहणे

या दोन्ही लांबकाळ वाट पाहण्याच्या गोष्टी ऐकून खट्टू व्हायला झाले.

यशोधरा's picture

6 Jan 2011 - 11:17 am | यशोधरा

मुंबैत असाल तर मुलुंडला मिळतील हळदीची पाने. पुण्यात असाल तर रास्ता पेठेत.

गणपा's picture

6 Jan 2011 - 1:34 pm | गणपा

ओ गवी हळदीची पानं नसतील तर करदळीची वापरा...
(हां हळदीच्या पानाचा सुगंध नाही येणार पण वेळ मारुन नेता येईल.)

स्वाती दिनेश's picture

6 Jan 2011 - 2:38 pm | स्वाती दिनेश

हळदीची पानं नसतील तर करदळीची वापरा...
(हां हळदीच्या पानाचा सुगंध नाही येणार पण वेळ मारुन नेता येईल.)
अगदी हेच म्हणायचे होते, ते गणपाने आधीच म्हणून टाकले,:)
पाकृ छान,
स्वाती

हळदीची पानं नसतील तर करदळीची वापरा...
(हां हळदीच्या पानाचा सुगंध नाही येणार पण वेळ मारुन नेता येईल.)

म्हणजे कतरिनाला घेण्याऐवजी ट्विंकल खन्नाला घेऊन सिनेमा काढा..

वाट पाहू आम्ही कतरिनाची.. सॉरी, पावसाळ्याची..

ज्योति प्रकाश's picture

6 Jan 2011 - 8:50 pm | ज्योति प्रकाश

आपण आपला पोस्टाचा पत्ता दिल्यास कुरिअरने हळदिची पाने पाठवण्याची सोय करु शकते पण १०-१२ दिवसाच्या आत कारण
पाण्याअभावी पाने आता सुकायला लागली आहेत.अर्थात आपण भारतात रहात असाल तरच.

त्या परिस पातोळ्याच द्या पाठवुन. ;)
गविंना कतरीना आणि करिना दोन्ही एकदम गवसतील =))

ज्योति प्रकाश's picture

7 Jan 2011 - 4:26 pm | ज्योति प्रकाश

तुम्ही पाठवलेली लिन्क ओपन होत नाही.

ज्योती, पातोळ्या मस्त.
फक्त आमच्याकडे करताना उकड काढत नाही. तांदळाचे पीठ सरबरीत (जरासे जाडच ठेवायचे) भिजवून ते हळदीच्या पानाच्या आतल्या बाजूने पसरवून त्यावर एका बाजूलागूळचून घालायचे व पान दुमडून बंद करुन ते तुम्ही लिहिल्याप्रमाणे उकडायचे.

रुपाली प्रा॑जळे's picture

6 Jan 2011 - 9:16 pm | रुपाली प्रा॑जळे

याचात फटू घाला

मी खांटोळ्या बरोबर कन्फ्युज झालो .. खांटोळ्या म्हणजे सांज्याच्या वड्या..

जागु's picture

7 Jan 2011 - 4:15 pm | जागु

मस्तच.