सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
4 Jan 2011 - 7:38 pm | धमाल मुलगा
ह्या धाग्यामध्ये टिक्निकली एकच ओळीचा गाभा असला तरी ह्यावर प्रतिसादातून मेजवानी मिळू शकेल असं वाटतं.
मिपाच्या बल्लव, सुगरणी अन्नपुर्णा ह्यांनी आपल्या पोतडीतून दाण्याची चटणी आणि ठेचा ह्यांची आपापल्या पध्दतीनुसार निरनिराळी व्हर्जन्स इथे दिली तर मजा येईल. एक चटणी-ठेचा संदर्भग्रंथ करुया की. :)
4 Jan 2011 - 7:44 pm | सुहास..
ठेचा कसा करायचा त्याची कृती हवी आहे >>
ठेचा कुठला , लाल मिरची की हिरवी ?
4 Jan 2011 - 8:43 pm | रणजित चितळे
दोन्ही
6 Jan 2011 - 10:57 am | सुहास..
उद्या - परवाच इथेच टाकतो !!
4 Jan 2011 - 7:46 pm | सूड
देवा ऽऽऽ !! चितळे पाकृ मागतायत हे कळलं तर अख्खा महाराष्ट्र हादरेल हों !! असो. :)
माझ्या माहितीतली कृती अशी- दाणे खरपूस भाजा, त्यात लाल तिखट, लसूण, कडिपत्त्याची पानं भाजून घालून एकत्र वाटा. चवीपुरतं मीठ घाला. आणि गरमागरम खिचडीवर चांगलं एक-दोन चमचे तूप घालून चटणीसोबत खा !! हाकानाका.
काही राह्यलं-साह्यलं सुगरणी बल्लवाचार्य सांगतीलच !!
4 Jan 2011 - 8:46 pm | रणजित चितळे
१. मी त्या पुण्याच्या चितळे बंधू मिठाईवाल्यांचा कोणीही लागत नाही.
२. बरेच वर्ष लष्कराच्या भाक-याथापण्यात (सैन्यात) गेल्याने महाराष्ट्राबाहेर काढल्याने छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागलोय.
लोभ आहेच
4 Jan 2011 - 9:24 pm | स्वाती दिनेश
इथे पहा, कदाचित उपयुक्त ठरेल
स्वाती
5 Jan 2011 - 10:26 am | मुलूखावेगळी
शेन्गदाना चट्णी -
भाजलेल्या शेन्गदान्यात जमेल इतके तिखट,जिरे, मीठ ,२-३ बुटुक चिन्च,मिक्सर च्या भन्ड्यात घ्या
आनि मिक्सर चे बट्न १०-१० सेकन्दानी थाम्बवत फिरवा .म्ह्नजे ती थोडी ओबडधोबड होइल आनि चिन्चेची चव पन जरा वेगळी लागते.
ठेचा उपासच का बिना उपासचा ?
लाल का हिरव्या मिरच्यान्चा ते सान्गा आधी
5 Jan 2011 - 10:50 am | रणजित चितळे
सगळ्यांचे पाकृ साठी धन्यवाद.
मला ठेचा लाल व हिरव्या मिरचीचा पाहीजे होता.
5 Jan 2011 - 11:17 am | मुलूखावेगळी
लाल ठेचा-
लाल मिरच्या मधे लसुन्,जिरे मीठ टाका आनि ग्राइन्ड करा/खलबत्त्यात कुटा
नन्तर त्यात कुट,फोडनी आनि लिम्बु पिळुन टाका(हा फार जहाल असल्याने कुट आनि लिम्बु टाकतात.
प्रमान अन्दाजे घ्या.
हिरवा ठेचा-
हिरव्या मिरच्या परता तेल टाकुन रन्ग बदलेपर्यन्त
मग त्या थन्ड करा आनि मग निवडलेला लसुन्,मीठ,जीरे घालुन मिक्सरमधे ग्राइन्ड करा/खलबत्त्यात कुटा
नन्तर त्यात फोडनी टाका.
5 Jan 2011 - 2:17 pm | Pearl
१) दाण्याची कोरडी चटणी
साहित्यः भाजलेले आणि सालं काढलेले दाणे, तिखट, मीठ, साखर, जिरे
क्रुती: एका खलबत्यात दाणे, तिखट, मीठ, जिरे आणि थोडी साखर घेउन चांगले कुटावे. खलबत्ता नसेल तर मिक्सरवरून काढावे. पण खलबत्यात बनलेली काहिशी जाडीभरडी चटणी जास्त छान लागते.
२) दाणे घालून लसणाची चटणी:
साहित्यः भाजलेले आणि सालं काढलेले दाणे, लसणीच्या भरपूर पाकळ्या, तिखट, मीठ, किंचित साखर
क्रुती: दाणे, लसूण, तिखट, मीठ आणि थोडी साखर एकत्र करून मिक्सरवरून काढावे. या चटणीत लसूण जास्त आणि दाणे कमी असतात. म्हणून त्याला लसणाची चटणी असे म्हणतात :-)
5 Jan 2011 - 2:41 pm | स्मिता.
दोन्हीही माझे अतिशय आवडते पदार्थ आहेत. भाकरीसोबत खाताना तर अहाहा...
१. कोरडी चटणी
दाणे भाजून त्यांची सालं काढून घ्यावीत. वाळवलेल्या लाल मिरच्या सुद्धा थोडिशी भाजून घ्याव्यात (मिरची नसल्यास ति़खट चालते. पण ते भाजताना जास्त ठसका होतो). आवडीप्रमाणे (कमी/अधिक) लसणाच्या पाकळ्या घ्याव्यात. आवडत असल्यास कढीपत्ता वाळवून किंवा तळून घ्यावा. हे सर्व साहित्य एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्सर मधून फिरवून घ्यावे. ही चटणी अतिशय चविष्ट लागते.
२. ठेचा
ओल्या मिरच्या (लाल/हिरव्या, कोणत्याही) सर्व बाजूंनी मऊसर होईपर्यंत तव्यावर भाजून घ्याव्या. त्या तव्यावरून काढून २-३ मिनीट लाकडी खलबत्त्यात झाकून ठेवाव्या. झाकण काढून आधी मिरच्या पटापट शक्य तेवढ्या बारीक ठेचून घ्याव्या. नंतर त्यात आवडीप्रमाणे (कमी/अधिक) लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि मीठ घालून ठेचून सर्व एकजीव करावे. झाला ठेचा तयार! मिरच्या फार तिखट असल्यास थोडे दाण्याचे कूट घालूनसुद्धा छान लागतो.
5 Jan 2011 - 3:31 pm | गवि
धागा आत्यंतिक चटकदार अतएव सेव्ह करुन आणि प्रिंटही करुन घेण्यासारखा आहे.
6 Jan 2011 - 10:36 am | रणजित चितळे
सुधांशु , स्वाती, मुलूखावेगळी, स्मिता, पर्ल ह्या सगळ्यांना माझा सलाम. आपल्या सहकार्याने मी ब-याच दिवसाने ठेचा व शेंगदाणा चटणी खाऊ शकलो.
6 Jan 2011 - 10:49 am | विजुभाऊ
जळगावात खाल्लेला ठेचा.
हिरव्या मिरच्या ,लसुण, ठेचून घ्या.
त्यात थोडे मीठ आणि दाण्याचा थोडा जाडसर कूट टाका.
त्यावर लिंबू पिळा ,मिश्रण हलवून घ्या.
हा ठेचा ताजा ताजा संपवायचा असतो.
हिरव्या मिरच्यांचा ठेचा.
मिरच्या , कोथिंबीर , पुदीना मिक्सरमधून पेस्ट करून घ्या.
थोडे लिम्बु पिळा. फार घट्ट वाटल्यास थोडे पाणी घाला.
हा ठेचा थोडा अधीक काळ टिकावा असे वाटत असेल तर लिंबाऐवजी व्हिनेगर वापरा.
6 Jan 2011 - 5:16 pm | मुलूखावेगळी
हिरव्या मिरच्यांचा ठेचा.
मिरच्या , कोथिंबीर , पुदीना मिक्सरमधून पेस्ट करून घ्या.
थोडे लिम्बु पिळा. फार घट्ट वाटल्यास थोडे पाणी घाला.
हा ठेचा थोडा अधीक काळ टिकावा असे वाटत असेल तर लिंबाऐवजी व्हिनेगर वापरा.
>>>> आमच्याकडे हे असे करत्तात
मिरच्या , कोथिंबीर , मिक्सरमधून पेस्ट करून घ्या.
थोडे लिम्बु पिळुन फोडनी घाला --कोथिम्बिरीची चटनी म्हन्त्तात
आनि
आमच्याकडे मिरच्या , पुदिना, मिक्सरमधून पेस्ट करून घ्या.
थोडे लिम्बु पिळुन फोडनी घाला --पुदिनाची चटनी म्हन्त्तात
6 Jan 2011 - 5:44 pm | ज्ञानराम
एका तवा घ्या, त्याला मंद आचेवर ठेवा, गरम तव्यावर थोडे तेल घाला, गरम तेलात ४-५ हिरव्या मिरच्या बारीक तोडून टाका. त्यात थोड ( १-२ चमचे पाणी घाला), त्यावर झाकण ठेवा, ३-४ मीनीटे शिजू द्या, झाकण काढून त्या मीरच्या हलवा, त्यात १०-१२ लसूण ठेचून घाला. आता हे मिश्रण निट हलवून घ्या,, त्यात चिमूट भर हिंग आणि मीठ घाला, , चांगले हलवून घ्या, आता तवा खालि उतरवून घ्या, एका हाताने, वरवंटा ( आता तो मीळणे शक्य नाहि ) , किंवा वाटीने ते मिश्रण तव्यावर वाटून एकजीव करा, थो ड तव्यावर परतून घ्या...
गरम गरम बाजरीच्या भाकरी बरोबर वाढा.
लय झक्कास... लागतय बघा......