निषेध, निषेध गडकरी रंगायतन - ठाणे येथे बॉम्बस्फोट

श्री's picture
श्री in काथ्याकूट
4 Jun 2008 - 5:46 pm
गाभा: 

आज गडकरी रंगायतन - ठाणे येथे नाटक सुरु होण्या अगोदर बॉम्बस्फोट झाला. आतापर्यन्त ५ जण जखमी झाल्याची बातमी आहे.

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

4 Jun 2008 - 6:05 pm | अमोल केळकर

भ्याड कृतीचा निषेध.

विसोबा खेचर's picture

4 Jun 2008 - 6:08 pm | विसोबा खेचर

प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की 'आम्ही पाचपुते' या नाटकाच्या वेळेसच फक्त असे होत आहे. वाशीच्या भावे नाटयगृहात या नाटकाचा प्रयोग होता तेव्हादेखील तेथे बॉम्ब सापडला होता परंतु तो निकामी करण्यात आला होता..

आता झाला प्रकार हा केवळ याच नाटकाच्या बाबतीतल्या आपापसातल्या दुश्मनीमुळे आहे की यात खरोखरच अतिरेकी हात आहे याबद्दल तपास सुरू आहे...

आपला,
(ठाणेकर) तात्या.

श्री's picture

4 Jun 2008 - 6:13 pm | श्री

खुल्याशा बदल धन्यवाद तात्या, काही गैरसमज पसरण्या अगोदर आपलि बातमी फार मोलाची आहे.

राजे's picture

4 Jun 2008 - 6:23 pm | राजे (not verified)

नाही हो.. असे वाटत नाही की ही.. नाटका नाटकाची दुश्मनी असावी... फक्त योगायोग असावा !
जखमीं व्यक्तिना लवकर बरं वाटू दे अशी देवा जवळ प्रार्थना !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विसोबा खेचर's picture

4 Jun 2008 - 6:27 pm | विसोबा खेचर

तुम्हाला काय वाटतं किंवा काय वाटत नाही याबद्दल अंदाज बांधू नका. तपासातून काय निष्पन्न होतं याची वाट पाहा..

तात्या.

राजे's picture

4 Jun 2008 - 6:32 pm | राजे (not verified)

बरोबर !
सहमत.

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मुक्तसुनीत's picture

4 Jun 2008 - 6:19 pm | मुक्तसुनीत

या भीतीदायक प्रसंगी जखमी झालेल्या बांधवांच्या प्रकृतीमधे उतार पडो अशी प्रार्थना.

कुंदन's picture

4 Jun 2008 - 6:35 pm | कुंदन

या भीतीदायक प्रसंगी जखमी झालेल्या बांधवांच्या प्रकृतीमधे उतार पडो अशी प्रार्थना.

आजच लोकमत मध्ये बातमी वाचली :
http://onlinenews.lokmat.com/staticpages/editions/mumbai-3.php

कर्मचारी , प्रेक्षक आणि नाट्य गृहा चा व्यवस्थापनाने विमा उतरवला आहे.

मनस्वी's picture

4 Jun 2008 - 6:28 pm | मनस्वी

जखमीं व्यक्तिना लवकर बरं वाटू दे अशी देवा जवळ प्रार्थना !

आता नाट्यगृहात पण प्रेक्षकांची प्रवेशद्वारावर कडक तपासणी केली पाहिजे. पिशव्या तपासल्या गेल्या पाहिजेत.

परवा वाशीच्या नाट्यगृहात बॉम्ब सापडला पाहून इतर सर्व नाट्यगृहांनी सावधगिरी बाळगायला हवी होती.
ज्याने परवा बेवारस पिशवी द्वारपालाच्या निदर्शनास आणून दिली त्या इसमाला सलाम!

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

छोटा डॉन's picture

4 Jun 2008 - 6:42 pm | छोटा डॉन

जखमीं व्यक्तिना लवकर बरं वाटू दे अशी देवा जवळ प्रार्थना !

सामान्य जनतेच्या मागचे असे भोग केव्हा संपतील ते ईश्वर जाणे ....

व्यथित छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा's picture

4 Jun 2008 - 6:43 pm | वरदा

खरच तपासणी करायला हवी कमीतकमी ऑगस्ट पर्यंत...मला उगाच असं वाट्टं १५ ऑगस्ट पर्यंत हे प्रकार वाढतात....

चतुरंग's picture

4 Jun 2008 - 6:44 pm | चतुरंग

ज्याची भीती मनात होती ते असे घडत असलेले बघून थरकाप झाला!
सुदैवाने कोणी मेले नाही हे चांगलेच. जखमींना आराम पडो ही प्रार्थना.

(आता आपल्या सर्वांची सार्वजनिक स्थळी वावरतानाची चौकस दृष्टीच ह्या अशा घटनांपासून भविष्यात थोडा तरी बचाव करण्यास समर्थ ठरेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला काय घडते आहे त्याकडे "जाऊदे, आपल्याला काय करायचे आहे. असेल काही तरी. उगीच कशाला नसत्या लफड्यात पडा असे वाटण्याचे दिवस संपले आहेत ह्याची ही निशाणी आहे. सावध रहा रात्र वैर्‍याची आहे!")

चतुरंग

विकास's picture

4 Jun 2008 - 7:50 pm | विकास

सुदैवाने कोणी मेले नाही हे चांगलेच. जखमींना आराम पडो ही प्रार्थना.

हेच म्हणतो.

(आता आपल्या सर्वांची सार्वजनिक स्थळी वावरतानाची चौकस दृष्टीच ह्या अशा घटनांपासून भविष्यात थोडा तरी बचाव करण्यास समर्थ ठरेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला काय घडते आहे त्याकडे "जाऊदे, आपल्याला काय करायचे आहे. असेल काही तरी. उगीच कशाला नसत्या लफड्यात पडा असे वाटण्याचे दिवस संपले आहेत ह्याची ही निशाणी आहे. सावध रहा रात्र वैर्‍याची आहे!")

चौकस दृष्टीचे रुपांतर भितीत न होणे महत्वाचे असते. नाहीतर तो पॅरानोया ठरतो. त्यासाठी लोकशिक्षण महत्वाचे ठरते.

पंजाब प्रश्न जेंव्हा चिघळलेला होता तेंव्हा रेल्वे स्टेशन्सवर रेडीओ बाँबचे स्फोट झालेले होते. त्यातून सावधपणा येऊन काही घातपात टळले तर कधीकधी अमेरिकन भाषेत "टू एर्र ऑन दी सेफर साईड" ठरले.

बाकी सावध रहाणे आणि डोळसपणे सजग रहाणे महत्वाचे असते कारण जेंव्हा समाज / सरकार दिवसा झोपा काढतो/काढते तेंव्हा मग आपोआपच रात्र वैर्‍याची होते.

- (ठाणेकर ) विकास

मदनबाण's picture

4 Jun 2008 - 7:57 pm | मदनबाण

सुदैवाने कोणी मेले नाही हे चांगलेच. जखमींना आराम पडो ही प्रार्थना.
हेच म्हणतो.....

(ठाणेकर)
मदनबाण.....

प्राजु's picture

5 Jun 2008 - 12:18 pm | प्राजु

सुदैवाने कोणी मेले नाही हे चांगलेच. जखमींना आराम पडो ही प्रार्थना

असेच होऊदे.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

4 Jun 2008 - 8:11 pm | डॉ.प्रसाद दाढे

आपण असे किती दिवस आपल्याच मातृभूमीत दिवाभितासारख॑ जगायच॑? सगळ्या॑ना ठाऊक आहे असल्या बॉम्बस्फोटामागे कुणाचा हात आहे ते.. भ्याडा॑च्या सहिष्णूतेला वा अहि॑सेला जगात काहीही कि॑मत नाही. शत्रूला हे पक्के ठाऊक आहे की भर ह्या भारतीया॑च्या स॑सदेत जाऊन ह्या॑च्या नेत्या॑च्या चड्ड्या सोडल्या तरी हे फक्त निषेध नो॑दवतील.. युद्ध पुकारणार नाहीत.
मला पूर्ण कल्पना आहे की युद्ध करणे इतके सोपे नाही.. त्यात धोके खूप आहेत, जसे की आपले राजकीय व आर्थिक स्थैर्य नष्ट होईल, आत्ता कुठे आपण महासत्ता बनण्याच्या जवळपास पोहोचतो आहोत, तेही स्वप्न दूर जाईल.. अणूबॉम्बचा धोका आहेच. अनेक निष्पाप बळी जातील इ.इ.. पण सहनशक्तीलाही अ॑त असतो.. आणखी नक्की किती लोक॑ बॉम्बस्फोटात ठार झाल्यावर आपण आपला स॑यम सोडणार आहोत? अमेरिकेत एक स्फोट झाला तर त्या॑नी दोन राष्ट्र॑ धुळीस मिळवली.. इस्त्रायलचे कमा॑डो हमास जितके स्फोट घडविते त्याच्या दुप्पट पॅलेस्टीनमध्ये घडवून दाखवितात.. मग आपणही 'लष्करे शिवबा' स्थापून त्या॑ना प्रत्यूत्तर का देत नाही?
मी अजिबात भावना॑च्या आहारी वगैरे जाऊन हे विचार मा॑डत नाहीये पण आता खरोखरच विचार करण्याची गरज आहे..आणि कृतीचीही..

मनिष's picture

5 Jun 2008 - 11:50 am | मनिष

हा स्फोट तरी 'परकीय' अतिरेक्यांचा वाटत नाही. बाँब खूपच साधा होता...आणि जिवीतहानी फार कमी. त्यामुळे हे कृत्य असूयेपोटी, व्यावसायिक वैरामुळे असण्याची शक्यता जास्त. अर्थातच निंदनीय!!!

चतुरंग's picture

5 Jun 2008 - 7:23 pm | चतुरंग

दरवेळी बाहेरुनच माणसे यायला हवीत असेही नाही. 'स्लीपर सेल्स' ठिकठिकाणी तयार करुन ठेवून हे लोक वर्षानुवर्षे वाट पाहू शकतात. अधूनमधून असे छोटे स्फोट घडवून चाचपणीही होते शिवाय दहशत पसरतेच. काहीवेळा एकीकडे असे छोटे स्फोट घडवत ठेवून तिकडे सुरक्षा यंत्रणा गुंतवून ठेवायची आणि मुख्य मोठे लक्ष्य दुसरीकडचेच असू शकते तिकडे जोरदार तयारी चालू असते!
असे अनेक प्रकार असू शकतात त्यामुळे सतत सावध, सतर्क राहणे हेच गरजेचे. सावध तो सुखी!

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2008 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भ्याड कृतीचा निषेध.

नाटकाच्या व्यावसायिकतेतून जर असे कृत्य झाले असेल तर, तेही वाईटच आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ. श्लोक _भातखंडे's picture

28 Jun 2008 - 9:17 am | डॉ. श्लोक _भातखंडे

नाटकाच्या व्यावसायिकतेतून जर असे कृत्य झाले असेल तर, तेही वाईटच आहे.
सहमत आणि या अनपेक्षित लोकांकडून प्रमोट केलेल्या दहशतवादाचाही निषेध...

स्वाती दिनेश's picture

4 Jun 2008 - 8:50 pm | स्वाती दिनेश

अरे बापरे..आत्ताच ही बातमी कळली.
ह्या भ्याड कृतीचा निषेध !
(ठाणेकर)स्वाती

केशवराव's picture

4 Jun 2008 - 10:34 pm | केशवराव

कृती कोणत्याही उद्देशाने झाली असली तरी ती निषेधार्हच . त्रिवार निषेध!!!

विदुषक's picture

5 Jun 2008 - 12:08 pm | विदुषक

त्रिवार ,दशवार निषेध !!!
दुसरे काही करण्यची आपली इच्छा आणी लायकी पण नाही
हे सगळ्या जगाला माहीती आहे :S

मजेदार विदुषक

म.टा. वृत्त

मुंबई ,
मटा ऑनलाइन वृत्त

ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये गेल्या ४ जून रोजी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी पोलिसांनी सनातन प्रभात संस्थेशी संबंधित दोघांना अटक केली आहे.

रमेश गडकरी (पनवेल) आणि मंगेश निकम (कसारा) अशी या दोघांची नावे असून हे दोघेही पनवेल येथील सनातन प्रभातच्या कार्यालयात काम करतात. हे दोघेही हिंदू जनजागृती मंच या संघटनेशी संबंधीत आहेत. पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने रविवारी रात्री या दोघांना ताब्यात घेतले. गडकरी रंगायतनमध्ये ४ जूनला ‘ आम्ही पाचपुते ’ या नाटकाचा प्रयोग होणार होता. परंतु, हिंदू जनजागृती मंच आणि काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी या नाटकाला विरोध केला होता.

यापूर्वीही संतोष पवार लिखीत 'यदाकदाचित' या नाटकातही हिंदूदेवदेवतांचे विडंबन केले होते. त्यालाही विरोध करण्यात आला होता. त्यानंतर आता संतोष पवार यांच्या 'आम्ही पाचपुते' नाटकालाही विरोध करण्यात येत आहे.

या नाटकालाही हिंदुत्त्ववादी संघटनांचा आक्षेप होता. त्यातूनच हा स्फोट घडविण्यात आला असावा , असा पोलिसांचा कयास आहे. गडकरी रंगायतनमधील स्फोटात ७ जण जखमी झाले होते. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहातही याच नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी बॉम्ब ठेवण्यात आला होता. मात्र, वेळीच त्याची माहिती मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, दहशतवादविरोधी पथक या संदर्भात आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन अटकेसंदर्भात माहिती देणार आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात अशा प्रकारचे कट रचण्यात सनातन प्रभात किंवा हिंदू जनजागर मंचाचा हात नसल्याचे सनातन प्रभातच्या नित्यानंद भिसे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

काळा_पहाड's picture

16 Jun 2008 - 5:23 pm | काळा_पहाड

कृती कोणत्याही उद्देशाने झाली असली तरी ती निषेधार्हच . त्रिवार निषेध!!!

या प्रसंगी जखमी झालेल्या बांधवांच्या प्रकृतीमधे उतार पडो अशी प्रार्थना.

काळा पहाड

आजानुकर्ण's picture

16 Jun 2008 - 8:16 pm | आजानुकर्ण

हे वाचून आश्चर्य वाटले. जरा सनातनची साईट नीट तपासून बघायला हवी.

कदाचित रमेशअली गडकरी आणि मंगेशमिया निकम अशी त्यांची खरी नावे आहेत असे सनातनचे म्हणणे असेल.

आपला,
(संभ्रमित) आजानुकर्ण

क्रुपया हिन्दुजनजाग्रुतिचा निशेध करु नये..ते योग्य असु शकतात....

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jun 2008 - 12:46 am | llपुण्याचे पेशवेll

याबाबत सामन्यातील लेख पटला.
त्यानी बॉम्बस्फोट करण्यापेक्षा जाऊन त्या कोणत्या त्या लेखकाच्या कानाखाली आवाज काढायला पाहीजे होता. आणि वर म्हणायचे ही माझी अभिव्यक्ती. जर त्यांची अभिव्यक्ति एखाद्याला दुखावत असेल तर दुसर्‍याच्या अभिव्यक्तीने आपणही दुखावले जाऊ शकतो येवढी जाणीव करून देणे आवश्यक होते. त्यासाठी अतिरेकी पणाची काही आवश्यकता नव्हती असे वाटते.
पुण्याचे पेशवे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jun 2008 - 4:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्फोटात कोणाचा हात होता आणि कोणावर काय कारवाई व्हावी ते न्यायसंस्था ठरवतीलच. पण दहशतवादाला धर्माचे लेबल (हिंदू असो वा मुसलमान) लावू नये.

आणि सुरक्षित भविष्यासाठी (सुयोग्य) शिक्षणाचा (धर्माधारीत नव्हे!) प्रचार व्हावा.

(सुशिक्षित) अदिती

आम्हाघरीधन's picture

27 Jun 2008 - 7:15 pm | आम्हाघरीधन

आणि सुरक्षित भविष्यासाठी (सुयोग्य) शिक्षणाचा (धर्माधारीत नव्हे!) प्रचार व्हावा.
खरय अदिती कोणावर काय कार्यवाही करायची ते न्यायालयच ठरवेल.