टूटीफ्रूटी केक

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
2 Jan 2011 - 7:04 pm

शाही अंडा बिर्याणीचा यथेच्छ आस्वाद घेता घेता दिनेश आणि केसुने टूटीफ्रूटी केक हवा आहे असे जाहीर केले, त्या दोघांना कामाला लावून हा केक बनवला.
साहित्य- २५० ग्राम बटर/लोणी/मार्गारीन, २०० ग्राम साखर, ५ अंडी, २५० ग्राम मैदा,२ चहाचे चमचे बेकिंग पावडर, २ चहाचे चमचे वॅनिला अर्क, १चमचा लिंबाचा रस, अर्धी वाटी टूटीफ्रूटीचे तुकडे, पाव कप दूध, १ चिमूट मीठ
कृती- बटर भरपूर फेटून घेणे, साखर घालून फेटणे, अंडी घालून फेटणे, वॅनिला अर्क, लिंबाचा रस घालून फेटणे.
मैदा+ बेकिंग पावडर+ मीठ एकत्र करुन वरील मिश्रणात घालणे व फेटणे. मिश्रण एकजीव झाले की थोडे दूध घालून फेटणे.
टूटीफ्रूटीचे तुकडे त्या मिश्रणात घालून ढवळणे.
केक मोल्डला बटर लावून घेणे व केकचे मिश्रण त्यात ओतणे.
प्रिहिटेड अवनमध्ये १८० अंश से ला ४० ते ४५ मिनिटे बेक करणे.केक तयार झाला आहे की नाही ते (केकच्या)पोटात
सुरी खुपसून पाहणे.
केक तयार झाल्यावर जाळीवर काढणे.

केसु आणि दिनेशने कितीही "आता बास..किती वाट पहायची? कापा आता केक.." असे म्हटले तरी केक रुमटेंपरेचरला येईपर्यंत त्या दोघांकडे लक्ष न देता मिपा मिपा खेळणे आणि केक कक्षतपमानाला आल्यानंतरच तुकडे करणे.
व्हिप्ड क्रिम घालून खाणे.

प्रतिक्रिया

स्मिता चावरे's picture

2 Jan 2011 - 7:07 pm | स्मिता चावरे

अगदी मस्त दिसतोय केक! आणि लेखन शैली सुद्धा छान आहे.

निवेदिता-ताई's picture

2 Jan 2011 - 7:31 pm | निवेदिता-ताई

स्वाती...........मस्तच ह...........मिपा मिपा खेळत केलेला केक

श्रावण मोडक's picture

2 Jan 2011 - 7:59 pm | श्रावण मोडक

तोंडाला पाणी सुटले आहे!

प्रियाली's picture

2 Jan 2011 - 8:18 pm | प्रियाली

असल्या रेशिपी न वाचणे. ;) पण केक मस्तच असावा याच्याशी सहमत.

हा संकल्प आम्ही नित्यनेमाने गेली एक-दोन वर्षे पाळतो आहोत. फोटु चुकुनमाकुन दिसतात आणि मग थोडासा त्रास होतो, पण...

नंदन's picture

3 Jan 2011 - 5:43 am | नंदन

हा संकल्प आम्ही नित्यनेमाने गेली एक-दोन वर्षे पाळतो आहोत. फोटु चुकुनमाकुन दिसतात आणि मग थोडासा त्रास होतो, पण...

--- सहमत आहे :)

मदनबाण's picture

2 Jan 2011 - 8:22 pm | मदनबाण

:) काय बोलु ? छ्या... जाउंदे !!! ;)

(केक प्रेमी)

फोटू नेहमीप्रमाणेच छान.
सात तारखेपर्यंत मजा करून घ्या, नंतर फक्त फोटूच बघायचे आहेत.;)

गणपा's picture

2 Jan 2011 - 9:33 pm | गणपा

माझा वाटा कुठाय?

निवेदिता-ताई's picture

2 Jan 2011 - 10:15 pm | निवेदिता-ताई

तुझा वाटा खाल्ला......रे

केशवसुमार's picture

3 Jan 2011 - 1:04 pm | केशवसुमार

तुझा कसला रे वाटा.. अरे माझाच वाटा मला पुरला नाही.. :( १० मिनिटात सर्व फस्त..
स्वातीतै पुढच्या वेळेस सगळा केक माझा.. :P

विलासराव's picture

2 Jan 2011 - 9:45 pm | विलासराव

दिसतच नाय ते.

सहज's picture

3 Jan 2011 - 7:59 am | सहज

धन्यवाद! गेल्या दहा दिवसात खालील दोन उत्तम केक खायला मिळाल्याने ह्यावेळी जळजळ झाली नाही.

केशवसुमार's picture

5 Jan 2011 - 2:13 pm | केशवसुमार

एकदम जबरा फोटो..७ तरखे पर्यंत हदडायच्या यादीत भर टाकायला हरकत नाही..
(स्वगतः स्वातीतै हा प्रतिसाद वाचेलच..)

छोटा डॉन's picture

3 Jan 2011 - 10:27 am | छोटा डॉन

अत्याचार आहे हा सगळा ...
मी म्हणतो केले असेल न्यु ईयर सेलेब्रेशन, खाल्ला असेल केक आणि अजुन कायकाय, पण हे फोटो कशाला ?

जोक्स अपार्ट, फ्रांफुवासियांचे सेलेब्रेशन म्हणजे बोलायचे काम नाही, भारी असणारच.
केसुशेठ ह्यांचे करेक्ट टायमिंग लाजवाब ( नाहीतर आम्ही, च्यायला ह्या मुहुर्ताला पुण्यात येऊन पडलो, असोच ) :)

बाकी लिश्ट बनवत आहेच, जेव्हा तिकडे येईन तेव्हा ... हॅ हॅ हॅ !

- छोटा डॉन

कच्ची कैरी's picture

3 Jan 2011 - 4:49 pm | कच्ची कैरी

वाआआ सर्वच फोटो छान .

परिकथेतील राजकुमार's picture

3 Jan 2011 - 5:39 pm | परिकथेतील राजकुमार

छे ! सगळे फाँट फॉल्टी दिसत आहेत आणि फोटु तर डिस्प्लेच होत नाहीये.

केक मस्तच दिसतोय. एक शंका - मला टूटीफ्रूटी विशेष आवडत नाहीत, त्या न घातल्यास चवीत खूप फरक पडेल का? (अर्थात त्याला टूटीफ्रूटी केक म्हणून सर्व्ह करणार नाही :))

किंवा टूटीफ्रूटीच्या ऐवजी दुसरे काही घालता येईल का?

जबरदस्त दिसतोय केक.

आवांतर: स्वातीताई, ख्रिसमस ला मी कॉफी केक केला होता. मात्र त्यात सावर क्रीम घालून केला. मी पहिल्यांदाच केक च्या भानगडीत पडले त्या मानाने चांगलाच झाला होता. मुख्य म्हणजे नवर्‍याला आणि लेकाला आवडला. :)

ऋषिकेश's picture

4 Jan 2011 - 2:43 pm | ऋषिकेश

स्वाती ताई आणि पाककृती असे कॉबिनेशन वाचणे म्हणजे बादलीभर लाळ, न मिळण्याची खंत यांना (आणि जळफळाटाला) आमंत्रण आहे :)
आता फ्राफ्रूला जाण्याचा बेत होईपर्यंत प्रियालीतैसारखा संकल्प करावा म्हणतो! :P

स्मिता.'s picture

4 Jan 2011 - 5:23 pm | स्मिता.

अहो स्वातीताई, किती छान-छान पदार्थ बनवून आम्हाला असं का जळवता?
बरं बनवता तर बनवता, वरून त्याचे फोटो कशाला टाकता? उगाच ऑफिसात बसल्या-बसल्या तोंपासु.
खूपच छान दिसतोय तो केक. थोडा इकडे पाठवून द्या ना... नाहीतर मीच फ्राफ्रूला येते!

स्वाती दिनेश's picture

5 Jan 2011 - 1:15 pm | स्वाती दिनेश

खवय्यांनो,
सर्वांना धन्यवाद.
सखी, मी तुला खरडीत सांगितले आहेच, टूटीफ्रूटी नको असेल तर ड्राय चेरीज घाल.
डान्या, लिस्ट घे बरं बनवायला..
प्राजु, कॉफी केक छान झाला होता हे वाचून बरे वाटले.
ऋ, लवकर कर बेत..(मागे तू कॉफीकेक करुन पाहिला होतास ते आठवले.. आता ह्याचाही प्रयोग करुन पहा..)
स्मिता, फ्राफुत स्वागत आहे.
पर्‍या ,मेल्या आता फाँट फॉल्टी दिसायला लागले काय?
सहज, केकचे फोटो इथे डकवलेत ते केक जबरदस्त आहेत..(पण कॅलरीबाँबज दिसत आहेत.. आता ७ तारखेपासून म्हणे आमच्याकडे लो कॅल डायट सुरु होणार आहे त्यामुळे...)
रेवती, ७ नंतर फोटोच बघायचे आहेत हे ६ ता. पर्यंत तरी नक्की आहे... :) (लो कॅल केक तरी करावे लागतील फर्माइशीनुसार आणि मग हळूहळू.. ह्या एवढ्याने काय होतय? तो अमूक तमूक केक करा,समोसे करा ,चायनिज खूप दिवसात खाल्ले नाही . कॅलरी,कॅलरी ... काय कटकट आहे? आम्ही जावू की पळायला .. असं करत डायटची गाडी डीरेल व्हायला वेळ किती लागणार हे मी तुला सांगायला हवं का?
सगळे संवाद ओळखीचे वाटत आहेत की नाही?)
गणपा, तुझा वाटा? अरे इथे एकेकाला अख्खा केक लागतो रे.(दिनेश आणि केसु दोघांना सांगावे लागते .. अरे ,मी पण आहे घरात,मला चव तरी पाहू दे.. पण फ्राफुत यायचे जमव ना, तुझ्यासाठीही केक नक्की करेन.)
रसराज, प्रियाली,नाइल,नंदन,विलासराव,मदनबाण,
सर्वांना धन्यवाद.
स्वाती

जागु's picture

5 Jan 2011 - 4:46 pm | जागु

केक पाहुन भुक लागली.