गीता महाभारत ज्वलन कार्यक्रम..

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
1 Jan 2011 - 3:53 pm
गाभा: 

.
गीता महाभारत ज्वलन कार्यक्रम...
मनुसृति नंतर आता ५०१ गितेचे व १०१ महाभारत धर्म ग्रंथ ज्वलन होणार आहे..२.०१.२०११

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jan 2011 - 5:01 pm | llपुण्याचे पेशवेll

१. विचारवंतांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत आहे. :)
२. भारतात धार्मिक पुस्तके छापणारे हज्जारो कारखाने आहेत. त्यामुळे इतक्या प्रति परत छापणे डाव्या हातचा मळ आहे. पण जास्तीत जास्त ख्रिश्चन बांधव यात सामिल झाले तर जास्तीत जास्त प्रति जाळल्या जातिल. म्हणजे तेवढ्याच नवीन छापता येतील व बाजारात मागणी वाढून छापण्याच्या उद्योगाला चालना मिळेल. त्यामुळे मंदीचे संकट दूर होण्यास मदत होईल. :)

पाषाणभेद's picture

1 Jan 2011 - 6:23 pm | पाषाणभेद

मंदीचे येणारे संकट कोणाला वाटते.
काही लोकांना (माझ्यासकट) ते तर आव्हान वाटते. आव्हान स्विकारायला पाहीजे मंदीचे.

अविनाश कदम's picture

1 Jan 2011 - 6:01 pm | अविनाश कदम

म्हणजे गीता व महाभारत छपाईच्या उद्योगाची भरभराट व्हावी म्हणून रचलेलं हे कारस्थान असावं.

अवलिया's picture

1 Jan 2011 - 6:17 pm | अवलिया

जबरदस्त !! आपल्याला आवडले ब्वा !
च्यामारी आज आमचे डोळे लख्खकन उघडले.
आम्ही आपले या लोकांवर आंधळ्याप्रमाणे विश्वास ठेवत होतो.. !
असो.

महाभारताच्या कमी प्रती का बरे?
महाग आहेत म्हणुन की काय?
गीताप्रेस वाल्यांना सांगायला हवे पॉकेट गीता जशी चार रुपयात आणली आहे तसेच पॉकेट महाभारत आणा धावीस रुपयात..
बरे फक्त महाभारतच जाळायचे सोडुन त्यातली गीता वेगळी का जाळत आहेत?
की गीता त्यांच्याकडच्या महाभारतात नाही ;)

सुहास..'s picture

1 Jan 2011 - 6:35 pm | सुहास..

नान्या !!

क्षिप्रम स्थित धी : !!

किम प्रभाषेत ?

चिंतामणी's picture

1 Jan 2011 - 7:18 pm | चिंतामणी

तुझ्याशी सहमत.

"या लोकांवर " ही जोडणी खास.

मिपावरच्या विचारवंताच्या प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत असेलाला चिंतामणी

विनायक बेलापुरे's picture

2 Jan 2011 - 12:41 pm | विनायक बेलापुरे

=)) =))=))=))=))

पंगा's picture

1 Jan 2011 - 6:54 pm | पंगा

कोण लॉर्ड्ज़ साल्वेशन आर्मी? आपण तर कधी नाव नव्हते ऐकले बुवा!* त्यांना एवढे महत्त्व का द्यायचे?

अशाने उद्या प्रसिद्धीसाठी ऊठसूट कोणीही काहीही जाळू लागेल!

(की यांचे निमित्त पुढे करून स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा वेगळ्याच कोणाचा डाव आहे?)

बाकी चालू द्या.

===================================================================
(*४११०३०मध्ये कार्यरत आहेत काय? होऊ शकतात काय? झाल्यास टिकू शकतात काय? ४११०३०चे सोडा, ४००००८मध्ये? मग यांना का घाबरायचे? विचारतो कोण?)

सुनील's picture

2 Jan 2011 - 8:32 pm | सुनील

की यांचे निमित्त पुढे करून स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा वेगळ्याच कोणाचा डाव आहे?
असेच असावे!

रणजित चितळे's picture

1 Jan 2011 - 7:56 pm | रणजित चितळे

जाळणारी लोकं मुर्ख आहेत.

अहो पण कुणी नीट बघितलं का? त्या पत्रिकेवर विश्व हिंदू परिषदेचा शिक्का आहे. नक्की हे काय असावे?

- पिंगू

मराठीत त्याला Inward म्हणतात. :)

नावातकायआहे's picture

1 Jan 2011 - 10:22 pm | नावातकायआहे

थंडी आहे त्यामुळ शेकोटी करणार असतील ;-)

आत्मशून्य's picture

2 Jan 2011 - 1:38 am | आत्मशून्य

.

देवदत्त's picture

2 Jan 2011 - 10:14 am | देवदत्त

ह्यावर तुमचे काय मत आहे?
जाणार आहात, निषेध करणार आहात की आणि काही?

जाळण्यानेही, आणि धागाप्रवर्तकाचे त्याबद्दल काहीही मत असले तरी?

अविनाशकुलकर्णी's picture

2 Jan 2011 - 11:40 am | अविनाशकुलकर्णी

मराठीत त्याला Inward म्हणतात.

वेताळ's picture

2 Jan 2011 - 12:02 pm | वेताळ

ख्रिस्ती धर्मात नव् नवीन विचार सतत येत असतात. त्यामुळे त्या धर्माकडे वैचारिक लोकांचा ओढा खुप वाढत आहे.आता होली वॉर किंवा होली शिट हे कायाअहे हे एकादा ख्रिस्तीच सांगु शकेल.
आता पुस्तके जाळण्याने काय होणार हे मला पण कळत नाही. मध्ये अमेरिकेत एक पादरेबाबा कुरान जाळणार होते त्यामुळे नेमकी कोणती क्रांती घडणार हे त्या विचारसरणीचे होलीवॉर वाले, तालिबानी किंवा सनातनीच सांगु शकतील.

वरच्या पत्रातील फक्त शब्द बदलून, असलेच सेम पत्र साल्व्हेशन आर्मीला ईमेल करता येईल.
आणि बैबलच्या प्रती कुठेही फुकट मिळतात - त्यांचा शेक घेण्यासाठी सक्काळी सक्काळी वापरही चांगला होईल.
यूट्यूबवरही ते सहज टाकता येते.
पण
.
.
.
.
.
.
.
.
.
असले फालतू धंदे नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात करण्याऐवजी इतर बरीच कामे आहेत.. ती आधी..

असे धार्मिक ग्रंथांचे ज्वलन केल्याने काही जातींच्या/लोकांच्या मनातील काही क्लेश दूर होणार असतील तर हि नक्कीच काही मोठी किंमत नाही.
तथापि त्यांनी ग्रंथ ज्वलन करण्याअगोदर खालील बाबींचा विचार करावा.
१) ज्वलन काळजीपूर्वक करावे. ज्वलन केल्याने उपस्थित असलेल्या कोणाही बांधवास इजा होऊ नये.
२) ज्वलन करण्यास काही प्रती कमी पडत असतील तर कळवावे, आमच्याकडे काही प्रती आहेत, त्या आणून देऊ.
३) विनाकारण जास्त प्रतींचे ज्वलन करू नये. (ग्लोबल वार्मिंग धोक्याची घंटा देत आहे)
४) जर काही लोक आजकालच्या थंडीत कुडकुडत असतील तर प्रतींचे ज्वलन त्यांच्या इथे करावे, जेणेकरून त्यांना त्याची उब मिळेल.

बाकी, प्रज्वलन कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा ! ! !

या बाबत कोणी खूलासा करेल काय ?

पंगा's picture

3 Jan 2011 - 7:36 pm | पंगा

आता भारतात, पक्षी हैदराबादेत, दोन तारीख उलटून गेली असेल, नाही का? पुढे काय झाले हो त्या जाळपोळीचे? पेपरांत काही बातमी तर दिसली नाही - अगदी हैदराबादेच्या पेपरांतसुद्धा?

विहिंप स्वतःची वृत्तपत्रे वगैरे छापते काय? नाही म्हणजे, तिथे नक्की असेल बातमी छापलेली, म्हणून विचारतो...

आणि हो, 'साल्वेशन आर्मी'बद्दल ऐकलेले आहे, थोडीफार त्या संस्थेच्या कामाबद्दल कल्पनाही आहे (ते असल्या उद्योगांत असल्याचे पाहिलेले नाही), पण हे 'लॉर्ड्ज़ साल्वेशन आर्मी' नाव नव्यानेच ऐकतोय. काय भानगड आहे हो ही? विहिंपचाच एखादा कक्ष वगैरे आहे काय, बाय एनी चान्स? (आणि असल्यास, त्यांच्या आणि विहिंपच्या खाजगी पत्रव्यवहारात सगळ्यांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा काय म्हणून आहे?)

मुक्तसुनीत's picture

3 Jan 2011 - 11:23 pm | मुक्तसुनीत

'लॉर्ड्ज़ साल्वेशन आर्मी' नाव नव्यानेच ऐकतोय.
"लॉर्डस् सॅल्व्हेशन आर्मी" हा षष्ठी तत्पुरुष समास असावा.

पंगा's picture

3 Jan 2011 - 11:53 pm | पंगा

समास षष्ठी तत्पुरुषच आहे, पण कंस नेमका कोठे अध्याहृत आहे, याबद्दल आपल्याला काही शंका आहे का? :~

पिवळा डांबिस's picture

4 Jan 2011 - 6:56 am | पिवळा डांबिस

महाभारत आणि गीतेची पुस्तकं जा़ळून काय होणार?
हिंदूंचा धर्म काय त्यांच्या पुस्तकात दडलेला आहे?
खुळे तिच्यायला!!!
पुस्तकं सोडा...
पूर्वी मिशनर्‍यांनी तर गोव्यात अ‍ॅकच्युअल हिंदू माणसं (बाटायला नकार दिला म्हणून) जाळली होती!!!
काय झालं?
आजही गोव्यात लक्षावधी हिंदू आहेत!!!
आणि नगार्‍यांच्या दणदणाटात ते रोज सकाळ-संध्याकाळ हिंदू आरत्या करताहेत!!!!!
:)
या जे. एस. थॉमससाठी फक्त चुचुचाच अभिप्राय लागू पडतो...
"अच्रत! बव्लत!!"