विकी/गुगल : मदत हवी आहे

अवलिया's picture
अवलिया in काथ्याकूट
29 Dec 2010 - 5:38 pm
गाभा: 

नमस्कार!
सध्या मी मिपा संकेतस्थळाचा सदस्य असुन आता मी गुगल आणि विकीचा वापर करुन प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. आता नंतर किमान दररोज २ तरी कोठेही, कोणत्याही प्रकारचे विकी आणि गुगल वापरुन प्रतिसाद देणार आहे.
या पार्श्वभुमीवर मला काही प्रश्न पडले आहेतः
(पराला याबद्दल विचारले असता तुझं तु पाहुन घे असे तुटकपणे सांगून वाटेला लावले.)
१. विकी अथवा गुगलवरुन माहितीचे मराठीकरण कसे करावे?
२. मी असेही ऐकले आहे की गुगल ट्रान्सलेटचा वापर करुन हिंदीमधे भाषांतर करता येते, त्यावरुन मराठीकरण सोपे जाते. असे खरेच आहे का?
३. जर आता विकी अथवा गुगल वापरुन प्रतिसाद दिले तर लोक मला विचारवंत समजतील तर पुढे ते किती सोयीचे/गैरसोयीचे आहे?

कृपया या संबंधी निर्णय घेण्यासाठी मर्गदर्शन करावे. मिपाकरांच्या योग्य सल्ल्याच्या प्रतिक्षेत!!

प्रतिक्रिया

१. विकी अथवा गुगलवरुन माहितीचे मराठीकरण कसे करावे?
सध्या मराठीसाठी तशी यांत्रिक सोय उपलब्ध नाही. म्यानुअल अनुवाद करावा लागतो. ()
२. मी असेही ऐकले आहे की गुगल ट्रान्सलेटचा वापर करुन हिंदीमधे भाषांतर करता येते, त्यावरुन मराठीकरण सोपे जाते. असे खरेच आहे का?.
India registered only their second Test victory on South African soil when they beat the Proteas by 87 runs on the fourth day of the second Test at Kingsmead in Durban. या वाक्याचे हिंदी भाषांतर गुगल

भारत केवल अपने दक्षिण अफ्रीका की धरती पर दूसरा टेस्ट जीत दर्ज की है जब वे दूसरे टेस्ट के चौथे दिन पर 87 रन से दक्षिण अफ्रीका डरबन में हराया किंग्समीड में.

असे करून मूळ आशयाचा बोर्या वाजवतो.

३. जर आता विकी अथवा गुगल वापरुन प्रतिसाद दिले तर लोक मला विचारवंत समजतील तर पुढे ते किती सोयीचे/गैरसोयीचे आहे?
मायनर आहे.

विजुभाऊ's picture

29 Dec 2010 - 5:52 pm | विजुभाऊ

आयडीया चांग्ली आहे. आंतर्जालावरील तज्ञांचा सल्ला घ्यायला हरकत नसावी

(पराला याबद्दल विचारले असता तुझं तु पाहुन घे असे तुटकपणे सांगून वाटेला लावले.)

सच्चा **कर

छोटा डॉन's picture

29 Dec 2010 - 5:59 pm | छोटा डॉन

सदर निर्णय घेण्यामागची पार्श्वभुमी जाणुन घेण्यास आवडेल.
म्हणजे असे काय घडले की आपण सदर प्रकारचे प्रतिसाद देण्यास इच्छुक झालात ?

- छोटा डॉन

अवलिया's picture

29 Dec 2010 - 6:02 pm | अवलिया

फार मोठी ष्टुरी आहे ती... त्यावर तुमच्याशी एकदा चर्चा करायची आहे.

छोटा डॉन's picture

29 Dec 2010 - 6:09 pm | छोटा डॉन

हरकत नाय नानबा.
तसेही आम्ही आजकाल काही ठिकाणी ह्या विकी / गुगलाळ ( शप्पत सांगतो, ह्या शब्दाचे क्रेडिट माझेच आहे ) प्रतिक्रियांची पॉप्युलॅरिटी पहात आहोतच, भलताच मान सन्मान मिळतो हो ह्याने.
शिवाय दुमत रहात नाही, काही झाले की सरळ वरिजनल डॉक्यु. तोंडावर हाणायचे.

असो, चेंज नेहमीच प्रगतीला पोषक असतो, नानाने आज या दिशेला वेळीच पाऊल उचलले आहे, त्याचे मनःपुर्वक अभिनंदन.

बाकी तुम्ही म्हणता तशी चर्चा करुच कधीतरी :)

- छोटा डॉन

परवा ३१ ला संध्याकाळी मोकळे आहात आय डॉण्राव?
तेव्हा चर्चेत चांगले रंग भरले जातील याची गॅरंटी ;)

छोटा डॉन's picture

29 Dec 2010 - 6:17 pm | छोटा डॉन

>>परवा ३१ ला संध्याकाळी मोकळे आहात आय डॉण्राव?

=)) =)) =))
गणपाचा कावा कळाला आम्हाला, हळुहळु तो काही 'हलकट मिपाकराच्या सवयी' शिकत आहे ( आता हे म्हटल्याबद्दल कुणी सांगलीहुन आणलेला चिवडा खाऊन टाकला तरी आमची ना नाही, चालु द्यात ).
असो, ३१ ला वेळ नाही असे सांगतो.

आम्ही चाललो आहोत बाहे ३१श्ट शेलेब्रेट करायला, बाकी अवांतर ह्या धाग्यावर नको, नान्या मला व्यनीतुन शिव्या घालतो.

- छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 6:18 pm | परिकथेतील राजकुमार

परवा ३१ ला संध्याकाळी मोकळे आहात आय डॉण्राव?
तेव्हा चर्चेत चांगले रंग भरले जातील याची गॅरंटी

गेल्या चार ते पाच ३१ डिसेंबरांना काय घडलय ते त्यांना अजुन आठवत नाहीये ;) दरवेळी कोणितरी बाटली उघडलेली तेवढी आठवते.

आणि बुचाचे काहीच आठवत नाही असे का ?

छोटा डॉन's picture

29 Dec 2010 - 6:23 pm | छोटा डॉन

>>आणि बुचाचे काहीच आठवत नाही असे का ?

खरे आहे.
गेल्या काही वर्षांपासुन नाना स्वतः बुचांची व्यवस्थित काळजी घेत असल्याने आम्हाला नंतर बुचांचे काय होते हे आठवण्याची गरजच पडत नाही, असो.

- छोटा डॉन

सहमत आहे. ३१ डिसेंबरची सगळी बुचे आम्ही जपुन ठेवतो.

अधुन मधुन योग्य ठिकाणी मारतो.. :)

मागच्या वर्षात जरा जास्तच लागली होती.. ;)

यावर्षी लागणार नाहीत असे आमचे गुप्तहेर कळवतात

छोटा डॉन's picture

29 Dec 2010 - 6:30 pm | छोटा डॉन

हरकत नाही.

- छोटा डॉन

पर्नल नेने मराठे's picture

29 Dec 2010 - 6:25 pm | पर्नल नेने मराठे

मी आइक्लेय कि सगळी बुचे नाना भंगारवालिला देउन म्हणे लसुण घेतो =)) =)) =))

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 6:04 pm | परिकथेतील राजकुमार

(पराला याबद्दल विचारले असता तुझं तु पाहुन घे असे तुटकपणे सांगून वाटेला लावले.)

प्रतिक्रीया राखुन ठेवत आहे.

लवकरच आम्ही आम्हाला योग्य वाटेल अशी प्रतिक्रीया लिहुन पुर्ण करु. ती पुर्ण झाली की मग मिपावरील काही खास तज्ञ व्यक्तींकडुन ती प्रतिक्रीया ह्या धाग्यासाठी योग्य आहे का? , ती अवांतर नाही ना ? , ती फालतु नाही ना? ह्या सर्वाची चाचणी करुन घेउ आणि सर्व परिक्षात ती प्रतिक्रीया पास झाली तर इथे डकवु.

धन्यवाद.

सर्व परिक्षात पास होणारी प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक!!

--असुर

परिकथेतील राजकुमार's picture

30 Dec 2010 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार

१. विकी अथवा गुगलवरुन माहितीचे मराठीकरण कसे करावे?

अतिशय सुंदर असा प्रश्न इथे नानासाहेबांनी उपस्थीत केलेला आहे. माझ्या आंतरजालावरच्या वास्तव्यात मी अनेकदा गुगल आणि विकी ह्यांची माहिती जाणुन घ्यायचा प्रयत्न केला आणि माझ्या लक्षात आले की अरे हा तर ज्ञानाचा अथांग सागर आहे. मुळ प्रश्नाकडे वळण्या आगोदर आपण विकी व गुगल म्हणजे नेमके काय आहे हे जाणुन घेणे गरजेचे आहे.

गुगल :-
गूगल (किंवा गूगल इनकॉर्पोरेटेड) (इंग्लिश: Google, नॅसडॅक: GOOG) नावाची अमेरिकन कंपनी गूगल शोधयंत्र, ऑर्कुट, यूट्यूब, अॅडसेन्स व इतर अनेक सेवा पुरवते.

गूगल कंपनी विशेषत: आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. डिसेंबर ३१, २००६ रोजी गूगल मध्ये १०,६७४ लोक काम करीत होते. गूगलचे मुख्यालय अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. गूगलची स्थापना लॅरी पेज व सर्गेई ब्रिन यांनी सप्टेंबर ७, १९९८ रोजी केली. एरिक श्मिट हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

गूगल हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे. एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे.

प्रकार :- सार्वजनिक कंपनी
स्थापना :- मेन्लो पार्क, कॅलिफोर्निया सप्टेंबर ७, १९९८
मुख्यालय :- माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया, अमेरिका
महत्त्वाच्या व्यक्ती :- एरिक ई. श्मिट :-मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक
सर्जी ब्रिन :- सहसंस्थापक, तंत्रज्ञान अध्यक्ष
लॅरी पेज :- सहसंस्थापक, उत्पादन अध्यक्ष
उद्योगक्षेत्र :- इंटरनेट, संगणक सॉफ्टवेअर
महसुली उत्पन्न :- १०,६०४ अब्ज अमेरिकन डॉलर (२००६)
एकूण उत्पन्न (कर/व्याज वजावटीपूर्वी) :- ३,०७७ अब्ज अमेरिकन डॉलर (२००६)
कर्मचारी :- १५,९१६ (सप्टेंबर ३०, २००७)
ब्रीदवाक्य :- Don't be evil
संकेतस्थळ :- www.google.com

ह्यानंतर विकी म्हणजे काय हे जाणुन घेणे महत्वाचे.

विकी :-
मराठी विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प असून हा ज्ञानकोश आपण घडवू शकता. सध्या मराठी विकिपीडियातील लेखांची एकूण संख्या ३२,१२० आहे. विकिपीडियामध्ये लेखांची भर घालण्यापूर्वी लेखकाने आपले विकिपीडिया खाते उघडलेले असणे सर्वांनाच सोयीचे आहे.

विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असल्यामुळे सर्वसमावेशक पण तरिही तटस्थ दृष्टीकोनातून संदर्भासहीत लेखन करणे हा विकिपीडियाचा गाभा आहे. कोणतेही विषय लिहिताना सर्वसाधारणपणे कसे हाताळावेत किंवा काय काळजी घ्यावी ह्याची माहिती विकिपीडिया:परिचय ह्या लेखात उपलब्ध आहे.

अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरे यांची स्वतःची एक लेखनशैली असते. काही वेळा ही लेखनशैली प्रत्यक्षरीत्या किंवा जाहीररीत्या चर्चिली जाते तर काही वेळा ती फक्त त्या माध्यमाशी निगडित व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहते. विकीपीडिया लेखनशैली ही अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु विकिपीडियासाठी काही नमुना मांडणीचे लेख लिहिलेले आहेत सोबतच विकिपीडिया मुखपृष्ठ सदरातील लेखांची मांडणी सुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. ह्या लेखांची मांडणी (लेख नव्हे) जरी अंतिम नसली तरी बर्‍याच आवर्तनांनंतर ती तशी बनलेली आहे. लेख लिहिताना इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द पारिभाषिक संज्ञा या लेखामध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. ह्यात अधिकाधिक सुधारणा होतच राहतील. लेखांबद्दल आपले मत आपण नोंदवू शकता.

विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत

लेखांची आणि पानांची शीर्षके (नावे) शक्यतो मराठी भाषेतच (देवनागरी लिपीत) असावीत. अगोदर सहमती न केलेली देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत. ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे करावे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य मार्गदर्शक सहाय्यता पाने इतर (इंग्रजी) भाषेत उपलब्ध केलेली आहेत. इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेल्या मराठी लोकासाठी त्यांच्या सहाय्यास्तव (मदतीसाठी) योग्य मार्गदर्शक सहाय्यता पाने तयार केली जातील परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल.

आंतरविकि संपर्क करू इच्छिणार्‍या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज (पान) केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे. चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजे नुसार मुभा सर्वांनाच आहे, तरीपण तेथे सुद्धा शक्यतो मराठीचा वापर करणे अपेक्षीत व स्वागतार्ह आहे.

आणि बर का मित्रांनो येत्या १५ जानेवारी २०११ ला विकिपीडियाचा दहाव्या वर्धापनदिन आहे. त्या निमीत्त समस्त विकिपीडिया चाहत्यांचे आणि विकिपरिवाराचे हार्दिक अभिनंदन आणि सोबतच येत्या नववर्षाकरिता नववर्षाभिनंदन !!!

२. मी असेही ऐकले आहे की गुगल ट्रान्सलेटचा वापर करुन हिंदीमधे भाषांतर करता येते, त्यावरुन मराठीकरण सोपे जाते. असे खरेच आहे का?

काही दीवसांपुर्वी मी एका लेखामध्ये वाचले होते की जगभरातील इंटरनेट मजकुरापैकी ९०% मजकुर हा इंग्लीश भाषेमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात ईंटरनेटवरील ज्ञानावर फक्त इंग्रजी भाषा येणार्‍यांचाच हक्क आहे असे म्हणणे वावगे होणार नाही. (मला हे बिलकुल मान्य नाही म्हणुनच मोठ्या प्रयत्नाने मी मराठी आणि इंग्लीश या दोनही भाषांमधुन लिखाण करत असतो.) माझ्याप्रमाणेच गुगल काकांनाही हे मान्य नाही म्हणुनच गुगल काकांनी एक अप्रतीम सुविधा जगभरच्या नॉन्-इंग्लीश भाषीकांसाठी उपलब्ध करुन दीली आहे. सध्या प्रायोगीक तत्त्वावर सुरु करण्यात आलेल्या या सुविधेचं नाव आहे गुगल ट्रान्सलेशन टुलकीट (Google translation toolkit).

गुगल ट्रान्सलेशनची सुविधा यापुर्वीही गुगलच्या होमपेजवर उपलब्ध होती मात्र त्यामध्ये बर्‍याच सुधारणा करुन ट्रान्सलेशन टुलकीट सुरु करण्यात आले आहे. उदाहरणार्थ यापुर्वीच्या ट्रान्सलेशनमध्ये उपलब्ध नसलेल्या या काही सुविधा ट्रान्सलेशन टुलकीट मध्ये उपल्ब्ध आहेत.

१. यामध्ये संगणकावरील फाइल्स तसेच पुर्ण वेबसाईट भाषांतरीत करता येते. एवढेच नव्हे तर विकिपेडीया किंवा नॉल (Knol - वीकीपेडीयाला मात देण्यासाठी गुगलने सुरु केलेला उपक्रम. मात्र Knol फारसे यशस्वी झालेले नाही) या साईट्सवरील लेख देखील पुर्णपणे भाषांतरीत करता येतात.
२. भाषांतरीत केलेला मजकुर संपादीत करता येतो (Edit)
३. भाषांतरीत केलेला मजकुर पाहण्यासाठी तसेच त्यामध्ये बदल करण्यासाठी इतरांना आमंत्रीत करता येते.
४. भाषांतरीत केलेल्या फाइल्स संगणकावर आणि ऑनलाइन सेव्ह करता येतात.

३. जर आता विकी अथवा गुगल वापरुन प्रतिसाद दिले तर लोक मला विचारवंत समजतील तर पुढे ते किती सोयीचे/गैरसोयीचे आहे?

ह्यावर जाणकारांची मते वाचण्यास उत्सुक आहे.

*प्रतिसाद देण्यासाठी आंतरजालावरील माहितीस्त्रोताचा देखील वापर केलेला आहे.

(सदर प्रतिक्रीया हि मिपावरील जेष्ठ सदस्य श्री. अवलिया ह्यांच्याकडून तपासुन घेतलेली असुन, ती फालतु, विषयाला सोडून अथवा अवांतर नाही असे त्यांनी मान्य केले आहे. धन्यवाद. )

आज मिपा ( आणि त्याबरोबार मी ) खर्‍या अर्थाने प्रगल्भ झाले असे म्हणायला हरकत नाही. डोळे पाणावले , आणि बरीच णवी माहिती मिळाली ;)

अवलिया's picture

30 Dec 2010 - 1:07 pm | अवलिया

साधु ! साधु !

साक्षात बृहस्पती धरतीवर आला की ज्ञानसागराचा उदय झाला की उदधीला आपल्या हस्ताने ढवळुन काढुन ज्ञानाचे मोती शिंपले आम्हा सामान्य जनांवर त्याची अतिशय कृपाळु होऊन उधळण केली !!
अहाहा ! आमचे पुर्वजन्माचे पूण्य आज फळाला आले आणि ज्ञानवर्षावात आम्ही तुडूंब भिजुन पावन झालो !!

आज मिपा पावन झाले ! प्रगल्भ झाले !!

अजि सोनियाचा दिनु .... !!

पर्नल नेने मराठे's picture

29 Dec 2010 - 6:22 pm | पर्नल नेने मराठे

श्रीयुत टारझन भाउजींच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्शेत....

चुचुच्या बान्गड्या ;)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 6:26 pm | परिकथेतील राजकुमार

चुचु अग मध्यमवर्गीय आहेस ना तू ? मग हुच्चभ्रुंसारखी प्रतिक्रीयेची प्रतिक्षा काय करतेस? निदान पैठणीची तरी कर.

चुचु मध्यमवर्गीय? ड्रायव्हींग लायसेन्सला १०००० दिरहॅम्स देते ती..

छोटा डॉन's picture

29 Dec 2010 - 6:28 pm | छोटा डॉन

नाना, तुझ्या धाग्याचा मुळ विषय काय रे ?

असो, सहजच आपले गुगलुन पाहिले रे ;)

- छोटा डॉन

अवलिया's picture

29 Dec 2010 - 6:33 pm | अवलिया

असला विचार करुन मी माझ्या डोक्याला ताण देत नाही. संपादक मंडळ आहे त्याचा विचार करायला ;)

छोटा डॉन's picture

29 Dec 2010 - 6:34 pm | छोटा डॉन

म्हणजे तुझी तक्रार नाही ना ?

अवलिया's picture

29 Dec 2010 - 6:36 pm | अवलिया

अजिबात नाही.. तुम्हाला अडचण नाही ना?

छोटा डॉन's picture

29 Dec 2010 - 6:39 pm | छोटा डॉन

आम्हाला कशाला अडचण ?
उगाच तुम्हालाच योग्य माहिती नाही मिळायची, तुम्हाला विकीछाप / गुगलाळ प्रतिसाद न देता आल्याने तुमची गोची व्हायची एवढीच चिंता आम्हाला.

बाकी काय असो आहेच की, नै का ?

- छोटा डॉन

अवलिया's picture

29 Dec 2010 - 6:40 pm | अवलिया

ते आम्ही जमवतोच बघाच आता तुम्ही..
पान पान भर प्रगल्भ मराठीत प्रतिक्रिया देतोच...
वाचा म्हणजे झाले ;)

छोटा डॉन's picture

29 Dec 2010 - 6:42 pm | छोटा डॉन

अलबत !
हे अत्यंत अभिनंदनीय आणि स्पॄहणीय पाऊल उचलल्याबद्दल मी इथे नानाच्या अभिनंदनाचा ठराव मांडतो.
( इथेच करा, वेगळा धागा नको ;) )

बरं वेगळा धागा नाही उघडत आता तुम्ही म्हणताच आहात तर ;)

पैसा's picture

30 Dec 2010 - 1:13 am | पैसा

परा शुचि च्या अभिनंदनाचा धागा काढणारे एक नवीन!
;)

पर्नल नेने मराठे's picture

29 Dec 2010 - 6:35 pm | पर्नल नेने मराठे

कधी कधी मला छोटा दॉण चुपा संपादक अस्ल्याचा दाउत येतो :(

छोटा डॉन's picture

29 Dec 2010 - 6:37 pm | छोटा डॉन

अरेच्च्या, असे आहे काय ?
हे फारच धोकादायक आहे, ताबडतोब तक्रार करा !

- छोटा डॉन

अवलिया's picture

29 Dec 2010 - 6:38 pm | अवलिया

कुणाकडे?

छोटा डॉन's picture

29 Dec 2010 - 6:41 pm | छोटा डॉन

काय सांगता ?

तुम्हाला माहित नाही, मला वाटले की ते विविक्षित पत्ते आणि ई-मेल आयडी तुम्ही फेव्हरिटमध्ये सेव्ह केले आहेत.
असो, आम्ही ही माहिती देऊ शकत नाही, इच्छा नाही असे समजा.

- छोटा डॉन

हॅ हॅ हॅ

६ नोव्हेंबर २०१० ला डिलीट केले ते :)

छोटा डॉन's picture

29 Dec 2010 - 6:44 pm | छोटा डॉन

>>६ नोव्हेंबर २०१० ला डिलीट केले ते

डिलीट ???
अरे नाना तु डिलिट केलेस, तुझ्याकडुन ही अपेक्षा नव्हती, अरे निदान 'रिप्लेस / अपडेट ' हा ऑप्शन तुला माहित नसावा म्हणजे कमाल झाली.

पर्नल नेने मराठे's picture

29 Dec 2010 - 6:44 pm | पर्नल नेने मराठे

*तुम्हाला माहित नाही, मला वाटले की ते विविक्षित पत्ते आणि ई-मेल आयडी तुम्ही फेव्हरिटमध्ये सेव्ह केले आहेत.

हे तर फारच धक्कादायक आहे.
(धक्कादायक शब्द बिप्सकडुण उधार ;) )

अवलिया's picture

29 Dec 2010 - 6:37 pm | अवलिया

=)) =)) =))

पर्नल नेने मराठे's picture

29 Dec 2010 - 6:31 pm | पर्नल नेने मराठे

अजुन दिले नाहियेत तर हे अस्ले आरोप :ऑ म्हणुन मी मधे येणच बन्द केल होत,,,, पण लोकाग्रहासाठी यायला लागले तेच चुक्ले माझं.

जाउ नका काकू .. प्लिज जाउ नका !

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 6:31 pm | परिकथेतील राजकुमार

चुचु मध्यमवर्गीय? ड्रायव्हींग लायसेन्सला १०००० दिरहॅम्स देते ती..

काय बोलतो ? मी कॅफेत २ संगणक वाढवायला ३% पैसे मागीतले तर राँग नंबर म्हणुन ठेवुन दिला तिने.

दुबैतले लोक हल्ली भारतातले फोन घेत नाहीत.

पर्नल नेने मराठे's picture

29 Dec 2010 - 6:28 pm | पर्नल नेने मराठे

बान्देकर भाउजी यायचे बन्द झाले ना मग आता कुठली पैठणी :(

अविनाशकुलकर्णी's picture

29 Dec 2010 - 7:27 pm | अविनाशकुलकर्णी

पराला याबद्दल विचारले असता तुझं तु पाहुन घे असे तुटकपणे सांगून वाटेला लावले.)

हे करुन बघा..

मुलूखावेगळी's picture

30 Dec 2010 - 10:37 am | मुलूखावेगळी

अवलियाजी,
मला हे काही कळाला नाहीये
तुम्ही मला जरा नीट समजावुन सान्गाल का?
ह्याचा काय उपयोग आहे ते

अवलिया's picture

30 Dec 2010 - 11:46 am | अवलिया

ह्याचा खूप खूप उपयोग आहे. डान्रावांना विचारा.. ते समजावून सांगतील

या धाग्यावरील प्रतिक्रियांचा अभ्यास करुन अनेक सदस्यांनी विद्वतापूर्ण धागे काढल्याने / प्रतिसाद दिल्याने मिपाचे मिपाक्रम झाले आहे याचा आनंद आहे.