बिर्याणी विथ बटर चिकन ग्रेवी
बिर्याणी साठी : - अर्धा किलो तांदूळ ,अर्धा किलो चिकन , ३ चमचे दही ,तमालपत्र ,शहाजिरे ,दालचिनी , लवंग ,काळेमिरे,मोठा वेलदोडा ,
आल लसून पेस्ट २ चमचे , २ मोठे कांदे उभे चिरलेले ,२ मोठे टोमाटो चिरलेले ,.कोथिंबीर ,हिरवी मिरची ५-६ ,हळद ,मीठ .१-२ चमचे बिर्याणी मसाला ,१ चमचा लाल तिखट
कृती :- तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा , चिकन मध्ये थोडेस दही ,हळद,आणि आल लसून पेस्ट घालून कुकरमध्ये एक शिट्टी काढून घ्या ,पाणी थोड जास्त असू द्या , (हे पाणी आपण ग्रेवी साठी वापरणार आहोत)
आता आल लसून ,कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट मिक्सी मधून बारीक करून घ्या
पातेल गरम केल कि त्यात आधी ३ चमचे (मोठे ) तूप /तेल घाला .नंतर खडा मसाला टाकून उभे चिरलेले कांदे घाला ,गुलाबी परतल्या नंतर ,
आल-लसून मिरची पेस्ट घाला टोमाटो घाला , छान परतून घ्या थोडी हळद ,चवीनुसार मीठ , बिर्याणी मसाला आणि लाल तिखट (जेवढ हव )
घाला फोडणीचा खमंग वास सुटला ना ,आता त्यात चिकन पिसेस घाला मस्त मिक्स करा आणि तांदूळ घाला आणि अंदाजे शिजेल एवढ पाणी घाला ,(तांदूळ घातल्यावर जास्त हलविले तर शीत मोडतात )
कोळशाची शेगडी असेल तर क्या बात हे ! गरम निखार्यावर बिर्याणी मस्त फुलून येते
बिर्याणी होत आली कि त्यावर तळलेले काजू , कोथिंबीर ,घालून सजवा .
बटर चिकन ग्रेवी
बिरयानी करताना चिकन शिजवायला जे पाणी वापरले आहे तेच पाणी ग्रेवी साठी वापरायचे आहे
ग्रेवी साठी :- पाव किलो चिकन , बटर ३ चमचे (तुम्हाला जे वापरायचे ते घ्या ) ,
अर्धी वाटी मगज पेस्ट (खरबूजा बी )
२ कांद्याची बारीक पेस्ट ,१ टोमाटो बारीक चीरलेल ,१ चमचा आल लसून पेस्ट , १ चमचा दही , १ चमचा लाल तिखट ,१ चमचा गरम मसाला ,१ चमच चिकन मसाला ,मीठ ,हळद बस्स..............
फोडणी :- बटर गरम झाले कि ,त्यात १ दालचिनी आणि तेज पत्ता तुकडा घाला ,कांदा पेस्ट घाला , आल लसून पेस्ट घाला ,मस्त गुलाबी रंग येऊ द्या आता लाल तिखट घाला ,मग टोमाटो घाला ,मस्त ढवळून घ्या गरम मसाला ,चिकन मसाला .मगज पेस्ट घालून छान परतावा ,तेल सुटू लागले कि चिकन पिसेस घालून ,छान हलवून घ्या ,आणि मग चिकन शिजवलेल पाणी घाला , मीठ आणि थोडी हळद घाला ५-७ मिनिट शिजल कि घट्ट रवाळ ग्रेवी तयार होईल , हव तस सजवा .....................
(टीप :- ग्रेवीला लाल भडक तरी येण्यासाठी कांदा परतला कि लाल तिखट घाला ,म्हणजे खतरनाक कलर येईल तुमच्या ग्रेविला ..)
प्रतिक्रिया
29 Dec 2010 - 3:29 pm | गवि
खल्लास.. लजीझ..
अव्वल..
मस्त फोटो. दुसरा फोटो दिसत नाही. पहिला दिसतोय, इमेज पाथ चुकला वाटतं.
29 Dec 2010 - 4:02 pm | पियुशा
ह घे दुसरा

29 Dec 2010 - 4:24 pm | गणपा
अगं हा तर पहिलाच आहे ;) आम्ही दुसरा कुठाय ते विचारल.
29 Dec 2010 - 3:37 pm | खादाड अमिता
ग्रेवीला लाल भडक तरी येण्यासाठी कांदा परतला कि लाल तिखट घाला ,म्हणजे खतरनाक कलर येईल तुमच्या ग्रेविला- खूप उपयोगी टिप
29 Dec 2010 - 3:37 pm | पियुशा
मेरे साथ हि क्यु होता हे यार?
बघते टाकते ,पुन्हा एक फोटो परत ओके
29 Dec 2010 - 3:42 pm | स्पा
अजून ३ ४ क्लोज फोटू टाक ... एवढ्या लांबून नीट दिसत नाहीये...
पण लझीझ खरच
29 Dec 2010 - 3:47 pm | पियुशा
हो हो टाक्तेय एक फोटो अजुन थाम्बा जरा
29 Dec 2010 - 3:43 pm | जागु
सह्ही.
29 Dec 2010 - 3:47 pm | मुलूखावेगळी
खरेच लजीझ आहे
आता खावीशी वाटत आहे.
फोटो किती आहेत मला तर १ च दिसतोय
आनि तळलेले काजू , कोथिंबीर ,घालून सजवा .
>>>> ह्यात कान्दा नाही घालाय्चा?
का सध्या महागाइ मुळे स्किप केलाय?
29 Dec 2010 - 3:55 pm | गणपा
झक्कास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
तर्री तर एकदम जब्रा दिस्तेय.
29 Dec 2010 - 4:07 pm | धमाल मुलगा
अशक्य!
पियुशा, जाव...तुला कुतुबमिनार, चारमिनार, ताजमहाल सगळं गिफ्ट देऊन टाकलं :)
अवांतरः पा.कृ.झक्कासच. जेवायला कधी येऊ? :D
29 Dec 2010 - 4:11 pm | गणेशा
गाववाले, एकट्यासाठीच काय विचारता आहेत . आम्ही पण येतो की बोलावल्यावर तुमच्या संगतीनं..
बाकी :
पा.कृ.. झक्कास .. हे पाककला मधेय येवुन अवांतर मध्ये लिहायला कोंबडीचे जीगर लागते ..
29 Dec 2010 - 4:17 pm | धमाल मुलगा
बास का द्येवा?
पियुशानं आमंत्रण तर देऊ द्या...सगळी मिपाची ग्यांगच जाऊ की सोबत. :D
>>हे पाककला मधेय येवुन अवांतर मध्ये लिहायला कोंबडीचे जीगर लागते ..
आँ? कोंबडीचे जीगर? म्हणजे काय ओ गाववाले?
29 Dec 2010 - 4:19 pm | परिकथेतील राजकुमार
हेच विचार्तो.
आपल्या करिश्मा आणि महादेव देवगणची जीगर माहिती आहे.
29 Dec 2010 - 7:33 pm | गणेशा
जीगर असेच म्हणायचे होते .. आता वरती बिर्यानी होती म्हनुन तेथे चुकुन कोंबडीचे जीगर आले ..
असो .. तात्पर्य असे होते की : च्या मारी , पाककृती वाचायची आणि ती झक्कास झाले हेच अवांतर असते ?
29 Dec 2010 - 4:25 pm | पियुशा
सर्वाना आमंत्रण कधी ही या खादाडयाला
29 Dec 2010 - 4:33 pm | गवि
सर्वाना आमंत्रण कधी ही या खादाडयाला
>>>>
कुठे?
कधी ?
अशी मुद्द्याची माहिती न देता तोंडभर आमंत्रण देणारे लोक कोणत्या शहरात असतात हे सांगणे न लगे.
आता फक्त पेठ कोणती आणि घर नं सांगा.
तारीख आणि वेळ सांगा.
किती लोक येणार हे कळलं म्हणजे बनवायलाही अंदाज येतो नं..
आम्ही येतोय.
29 Dec 2010 - 4:40 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
हाईईट्ट! जब्बर्रा टाकलाय. _/\_
29 Dec 2010 - 4:08 pm | गणेशा
एकदम छान , आताच बिर्यानी खाल्ली आणि येथे येवुन रेसेपी पण मिळाली काय बात आहे ..
फोटो जरी दिसत नसले तरी वरील रिप्लायवरुन अंदाज आला आहे ..
अवांतर :
कॉलेजला असताना तोडकी मोडकी बिर्यानी करत असु , चिकन मध्ये दही मिसळतात हे मला माहित नव्हते तेंव्हा ही .. तसे अजुनपर्यंत माहित नव्हतेच, पण मध्ये हैद्राबादी बिर्यानी खाल्ली तेंव्हा तेथील मोठे मोठे चिकन हाडापासुन कसे काय अलगद बाजुला निघते आणि तसेच ते इतके सुंदर कसे शिजते येव्हडे मोठे असुन हि , आम्ही तर पार लहान तुकडे करायचो तरी शिजायचे नाहि म्हणुन मग शोध घेतला तर असे कळाले दह्यामुळे ...
बरोबर आहे का ते दह्यामुळे हा परिनाम होतो का ? आमच्या घरी मी सोडलो तर भात कोणी जास्त(जवळ जवळ नाहीच) खात नाही त्यामुळे बिर्यानी जास्त नसतेच .. त्यामुळे घरी कधी ही माहिती मिळाअली नाहीये..
29 Dec 2010 - 4:10 pm | अवलिया
पत्ता व्यनी करा... आलोच !
29 Dec 2010 - 4:14 pm | परिकथेतील राजकुमार
हे घ्या मजा करा.
29 Dec 2010 - 4:22 pm | पियुशा
अरे पर्या हा फोटो मुद्दाम नव्हता टाकला रे क्लिअर नाहिये ना म्हनुन असो धन्यु
29 Dec 2010 - 4:35 pm | परिकथेतील राजकुमार
ते महत्वाचे नाही. लोकांची जळजळ होणे महत्वाचे.
29 Dec 2010 - 4:37 pm | गणपा
पर्याशी सेंट-पर्सेंट सहमत. ;)
29 Dec 2010 - 5:20 pm | स्वाती२
मस्त! ताट बघुन भूक लागली!
29 Dec 2010 - 5:41 pm | ज्ञानराम
यम्मि..... पण ,, खरबूजा बी , कुठे मिळेल ? आणि ते काय असतं???
29 Dec 2010 - 5:54 pm | वेताळ
मस्त जेवन बनवतेस तु. आत जेवायला कधी बोलवतेस बघुया.
29 Dec 2010 - 6:07 pm | पिंगू
पियुषा, ह्याच व्हेज वर्जन आणं.. तर मला आवडेल..
बाकी भारी.
- शाकाहारी पिंगू
29 Dec 2010 - 9:05 pm | सुनील
झक्कास! ३१ चा मेन्यू ठरला! फक्त चिकनऐवजी मटण बिर्याणी!
29 Dec 2010 - 9:33 pm | कच्ची कैरी
पियुशा तु पियुशा नाहीस तर लझिझा आहेस्,मस्त रेसेपी.
30 Dec 2010 - 7:39 am | Nile
पत्ता आम्हाला पण धाडा हो! मी एकटा दोन प्लेट खाईन म्हणतो.
30 Dec 2010 - 3:25 pm | प्रकाश१११
मी अगदी तृप्त झालो. असा सुरेख फोटो नि डिशमधला लाल तरंग .मस्त पुलाव .
बाईगे तुझ्यात साक्षात अन्नपूर्णा वसली आहे. आंणी अप्रतीम मांडणी.
खूप शुभेच्छा