Bachelor's चिकन करी

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in पाककृती
29 Dec 2010 - 11:29 am

ह्या चिकन करीला bachelor's हे विशेषण देण्याचे कारण हे कि ही चिकन करी बनवायला काही पण वाटणे, घोटणे, कालवण करावे लागत नाही. फक्त एक कुकर आणि तो ही नसेल तर एक मोठं भांडं लागतं. तर तुमच्या मित्रांना किंवा (अम्म्म्म ... ) मैत्रिणींना impress करायचं असेल तर ही चिकन करी नक्कीच तुमच्या मदतीस येईल.

सामग्री:

४०० - ४५० ग्राम बोनलेस अथवा विथ बोन चिकन
४ कांदे, एकदम बारीक चिरलेले
४ टोमाटो, बारीक चिरलेले
१ इंच आलं, बारीक चिरलेले
१ लसून, बारीक चिरलेला
४ मोठे चमचे तेल
४ चमचे लाल तिखट
१ चमचा दही
मीठ चवीनुसार
१ ग्लास पाणी
३ चमचे meat मसाला

कृती :

- चिकन चांगले धुवून साफ करून घ्या. एक सोप्पा मार्ग म्हणजे hypercity, more सारख्या दुकानातून आधीच साफ केलेले चिकन आणा. मग ह्या चिकन ला दही, १ चमचा मीट मसाला, १ चमचा लाल तिखट आणि एक चमचा मीठ चांगलं कालवून, चिकन ला व्यवस्थित चोळून, त्याला marinade करा.
- मग सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. आल लसून ची तयार पेस्ट (बाजारातली) वापरू नका, त्याच्यातल्या preservative मुळे चिकन ची चव छान लागत नाही.
- कुकर मध्ये अथवा एका भांड्यात तेल गरम करून त्यात आलं लसून आणि कांदा चांगला लाल (almost काळा) होईपर्यंत परता.
- मग त्यात टोमाटो घाला आणि वरून तिखट आणि मसाला व थोडा मीठ घालून, टोमाटो शिजून बारीक होईपर्यंत परता.
- आता चिकन घाला आणि परता.
- आता एक ग्लास पाणी घालून,नीट हलवून कुकर चा झाकण लावा आणि मध्यम आचेवर दोन शिट्या होईस्तोवर शिजवा.
- कुकर च 'झाकण पडल' की बघा कसा छान तवांग आलाय चिकन करी वर ते! गरम गरम पोळ्या आणि अशी मस्त चिकन करी- क्या बात हे!

प्रतिक्रिया

टारझन's picture

29 Dec 2010 - 11:34 am | टारझन

मस्त रे अमिता . एक नंबर .. विकांताचा बेतंच पक्का केला लेका तु .. आत्ताच सामग्री गोळा करायच्या तयारी ला लागतो.
एक शंका : चिकन मधे तेला ऐवजी तुप टाकल्यास चालते काय ?

- टारझन

टारुभाऊंशी सहमत.

अवांतर : अमिताजी, आपली ही ब्याचलर पाकृ फारच खास आणि सोपी असावी
कारण त्यामुळे (ब्याचलर)"टारॅम्बो खुश हुआ.." :)

(विवाहित) गवि.

खादाड अमिता's picture

29 Dec 2010 - 11:49 am | खादाड अमिता

चिकन मधे तेला ऐवजी तुप टाकल्यास ते जरा मिळमिळीत लागेल. तूप तिखटाचा 'आहा' 'मस्त मजा' पणा कमी करतं.

शेखर's picture

29 Dec 2010 - 7:44 pm | शेखर

खुप तिखट वापरणार असशील तर तुपच वापर... दुसर्‍या दिवशी आग जरा कमी होईल ;)

पर्नल नेने मराठे's picture

29 Dec 2010 - 11:39 am | पर्नल नेने मराठे

माझा कान्दा, बटाता, टोमॅतॉ रस्सा अगदी असाच दिसतो ;)
(शाकाहारी)

पर्नल नेने मराठे's picture

29 Dec 2010 - 11:39 am | पर्नल नेने मराठे

माझा कान्दा, बटाता, टोमॅतॉ रस्सा अगदी असाच दिसतो ;)
(शाकाहारी)

अरे वा! चुचू ताई तुमच्या कांदा बटाटा रस्याची कृती आम्हाला पण सांगा न ! आणि हो, फोटो नक्की लावा.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 2:05 pm | परिकथेतील राजकुमार

माझा कान्दा, बटाता, टोमॅतॉ रस्सा अगदी असाच दिसतो

मराठे काका तर सांगत होते की तुझ्या सगळ्याच भाज्या एक सारख्या दिसतात.

गणपा's picture

29 Dec 2010 - 2:13 pm | गणपा

=)) =))
हा परा एक नंबरचा हल्कट आहे.

जिवाणू's picture

29 Dec 2010 - 12:09 pm | जिवाणू

एकदम सोप्पी आणि झटपट पाककृती..........!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Dec 2010 - 1:12 pm | निनाद मुक्काम प...

@आल लसून ची तयार पेस्ट (बाजारातली) वापरू नका, त्याच्यातल्या preservative मुळे चिकन ची चव छान लागत नाह
आणि हा सल्ला एक अस्सल गृहिणीच देऊ शकते .
परिपूर्ण पाककृती .

गणपा's picture

29 Dec 2010 - 1:40 pm | गणपा

टोंडाला पानी सुत्ल. :)

जागु's picture

29 Dec 2010 - 3:19 pm | जागु

छान रेसेपी.

स्वाती२'s picture

29 Dec 2010 - 5:25 pm | स्वाती२

मस्त, सोपी कृती!

सुनील's picture

29 Dec 2010 - 8:50 pm | सुनील

वेळ नसेल तेव्हा करायला चांगली पण चांगले कांद्या-खोबर्‍याचे वाटण घालून केलेल्या चिकन्/मटण करीची सर ह्याला नाही!