फेत्तुचीन मारीनारा (पास्ता)

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in पाककृती
28 Dec 2010 - 9:54 am

पास्ता म्हंटल कि कायम 'यमी' असे उदगार कानावर पडतात. पण आमची आई, पास्ता करू न आई, असं आम्ही कितीही केविलवाणे चेहरे करून सांगितलं तरी म्हणायची 'काय ते मेले मैदे, पोटात चिकटून बसतात आणि जाडी वाढवतात'. तेव्हा वाटायचं, आमचीच आई आम्हाला कधी ही पास्ता खाऊ देत नाही! पण आता आई नाही असं म्हणत. कारण आता मी साध्या गव्हाच्या पिठाचा म्हणजेच होल व्हीट फ्लोर चा पास्ता बनवते. हल्ली पुण्या मुंबई कडे तर होल व्हीट पास्ता विकत पण मिळतो. जर पास्ता घरी करायचा नसेल, तर विकतचा पास्ता आणून, त्याले शिजवून, टोमाटो किंवा चीज सोस मध्ये घालावा आणि छान सजवून पेश ए खिदमत करावा. ममी भी खुश और टमी भी खुश!

हॉटेल मध्ये पास्ता खाण्या पेक्षा घरीच खाल्लेला चांगला ह्याच कारण असे कि घरी कुठला हि पदार्थ करताना त्यात किती तेल, तूप, चीज घालायचं हे आपल्या हातात असतं.

सामग्री:
२५० ग्राम पास्ता, उकडलेला (उकळत्या पाण्यात पास्ता आणि मीठ घालून त्या पास्ता ला सुरी अथवा फोर्क ने शिजल्याची खात्री करून, गाळून बाजूला ठेवावा)
२५० ग्राम (४-५) टोमाटो, मिक्सर मध्ये ह्याची प्युरी करून घ्या
२ कांदे, बारीक चिरलेले
मीठ आणि मिरपूड चवीनुसार
१ चमचा साखर
१ चमचा ओलिव्ह ओईल अथवा बटर
१ चमचा द्रायीड मिक्स्ड हर्ब्स
६ लसूण पाकळ्या, बारीक कुटलेल्या

कृती:

- एका नोन स्टिक भांड्यात बटर किंवा ओलिव्ह ओईल गरम करून, त्यात लसूण, मिरपूड, कांदा गुलाबी होई पर्यंत परतावा. मग त्यात टोमाटो प्युरी घालावी आणि मंद आचेवर शिजवावा. टोमाटो सोस जरा दाट झाले कि त्यात पास्ता, मीठ, साखर, हर्ब्स घालून चांगले मिक्स करावे. सोस ची चव बघून गरज असल्यास मीठ मिरपूड घालून, सर्व्ह करावे.

आहे न किती सोप्पी कृती? मग वाट कसची बघताय - हो जाये?

प्रतिक्रिया

द्रायीड मिक्स्ड हर्ब्स कुथे मिळते? अथवा कसे बनवतात?

कवितानागेश's picture

28 Dec 2010 - 11:16 am | कवितानागेश

१. पिझ्झा हट/ गार्सियाज चा पिझ्झा घरी मागवायचा आणी त्यांनाच सांगायचे हर्ब्स एक्स्ट्रा पाठवा.
किंवा
२. फूड बझारमध्ये मिळतात. ओरिगॅनो, बेसिल, पार्सले, रोस्मेरी .... वगरै.

पियुशा's picture

28 Dec 2010 - 11:47 am | पियुशा

धन्यु

कच्ची कैरी's picture

28 Dec 2010 - 2:48 pm | कच्ची कैरी

अमिता रेसेपी तुझी वाचली आज मी धन्य धन्य जाहली
खरच अमिता पास्ता इतक्या सोप्या पद्धतीने बनवता येईल असे माहित नव्हते ,धन्यवाद रेसेपीसाठी.

खादाड अमिता's picture

29 Dec 2010 - 11:12 am | खादाड अमिता

चिकन हान्डी ची रेसिपी अगदी बेस्ट!

आभारी आहे,

अमिता

मलाही मारिनारामधला होल ग्रेन पास्ता आवडतो.
त्यात जरा भाज्या घातल्या तर अजूनच छान!

खादाड अमिता's picture

29 Dec 2010 - 11:14 am | खादाड अमिता

:)

हा पास्ता पट्ट्यांसारखा दिसतो आहे. आमच्या हिते पिळदार नक्षीवाला किंवा मॅक्रोनीसारखा नलिकासदृश असतो. त्याने काही फरक पडत नाही ना शिजण्यात?

कारण आता मी साध्या गव्हाच्या पिठाचा म्हणजेच होल व्हीट फ्लोर चा पास्ता बनवते.

याची ही पाककृती लवकर होउन जाऊ दे. :)

पास्ता बनवण्याची कृती लवकर दे.

स्वाती२'s picture

29 Dec 2010 - 5:32 pm | स्वाती२

जागूशी सहमत! मला इथला होल व्हिट पास्ता अजिबात आवडत नाही.