शक्यता नाकारता येत नाही.

नरेशकुमार's picture
नरेशकुमार in काथ्याकूट
25 Dec 2010 - 10:02 am
गाभा: 

आज सकळी झोपेतुन उठलो.
थोडा वेळ मिपा वाचले.
मग आवरायला घेतले.
दाढि करायचि होती, दात घासायचे होते,
पण टुथपेस्ट मध्येच चुकुन दाबली गेलि. कशेतरि दात घासले. दाढि केलिच नाही. मग टॉयलेट ला बसलो. टॉयलेट झाल्यावर त्याचे सीट नकळत वरच ठेउन दिले. बायकोने अजिबात चिड्चिड केली नाहि,
बायकोशी काहीही गप्पा मारल्या नाहि, त्याऐवजी मित्रान्ना कॉल करत बसलो.
कॉल झाल्यावर मस्त पैकी SALT सिनेमा लावला, (आयला काय दिस्ते ति जुली.)
पिच्चर बघता बघता पोटोबा केला, त्यानंतर पिच्चर संपल्यावर मित्रांनकडे उनडक्या करयला भायेर पडलो. तरीही बायकोने अजिबात आक्शेप घेतला नाहि,
रस्त्यात एक बिग बाझार होतं, एक पेन ड्राईव्ह घेतला. २ मिनिटांत तिथुन भायेर पडलो.
मित्रांकडच्या उनाडक्या झाल्यावर घरी येउन पोहे करायला घेतले तर पाणि समजुन तेलच ओतले, सगळं मुसळ केरात, मग मी तिलाच उलट आरडाओरडा केला कि तेलाच्या मगावर 'तेल' असे लिहित जा. घोळ होतो. तरी बायकोने अजिबात ठणाणा केला नाहि.
मग बायकोच्या हातचे खाउन झाल्यावर जेवनाचे ताटच हातातुन खालि पडले, सगळिकडे पसरा झाला. मि ते सोडुन वर जाउन मस्त ताणुण दिली. बायकोने अजिबात ठणाणा केला नाहि,
सन्ध्याकाळि भायेर पडलो. एका मित्राने घरि बोलावले होत, घर काय सापडेना, आख्खा शहर पालथा घातला, पेट्रोल चि टाकी रिकामि झालि तरिपन बायकोने अजिबात क्रोध केला नाहि,
मित्राकडे जायचे सोडुन मग घरी परतलो, सचिन चि बॅटिंग चाले होति, बायकोने मस्त फक्कड चहा टाकला, तो पीत पीत मॅच बघु लागलो. मग रत्रिचे जेवन छान कर अशी ऑर्डर सोडली, ति बायकोने गप गुमान ऐकून कामाला लागली. बायकोने अजिबात संताप केला नाहि.
रत्रिचे जेवन जेवताजेवता तिला जेवनाचे धडे दिले. तिला सांगितले कि जरा आई कडे जाउन शिकुन घे जेवन कसे करतात ते. पन तिला हे सुध्हा सांगितले कि 'तुला काय तसे जेवन बनविने आयुश्यात जमनार नाही'. बायकोने अजिबात रागराग केला नाहि.
रात्रि पलंगावर बायकोने पाय चेपुन दिले आनि मी निद्रासन्न झालो.

तर मंडळि अशि बायको ताब्यात ठेवन्यासाठि 'दुर्बलांचा लढा' हे पुस्तक एक्दा वाचाच.

लेखक : धमु सान
प्रकाशक : नरेश सान
किंमत : रु. ४२० फक्त.
मीपा सदस्याना खास सवलत. एका व्यक्तिला एकच (भले त्याचे कितिहि आयडि असुदेत) पुस्तक मिळेल. त्वरा करा.

प्रतिक्रिया

सूर्यपुत्र's picture

25 Dec 2010 - 10:41 am | सूर्यपुत्र

>>तर मंडळि अशि बायको ताब्यात ठेवन्यासाठि 'दुर्बलांचा लढा' हे पुस्तक एक्दा वाचाच.

नक्की कुणाची बायको ताब्यात ठेवण्यासाठी??

पुस्तक हवे आहे, भविष्यात उपयोगी पडू षकेल (??)

कल्याण's picture

25 Dec 2010 - 10:46 am | कल्याण

:)

कानडाऊ योगेशु's picture

25 Dec 2010 - 2:05 pm | कानडाऊ योगेशु

आयला आता ह्या लेखाचे स्त्रीभूमिकेतुन मांडलेले "अबलांचा लढा" असे विडंबन येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- (उनाड नवरा) योगेश

रन्गराव's picture

25 Dec 2010 - 2:41 pm | रन्गराव

"अ बला" नाही हो "आ बला" ;)

रन्गराव's picture

25 Dec 2010 - 2:43 pm | रन्गराव

कॉल झाल्यावर मस्त पैकी SALT सिनेमा लावला, (आयला काय दिस्ते ति जुली.)

पिक्चर बघितलेला दिसत नाही. काय राहील नाही तिच्यात आता. पार थकली आहे!

उल्हास's picture

25 Dec 2010 - 6:27 pm | उल्हास

स्वप्न भंग पावले हे राहीलेय काय /

नरेशकुमार's picture

25 Dec 2010 - 10:51 pm | नरेशकुमार

शक्यता नाकरता येत नाही.

आत्मशून्य's picture

25 Dec 2010 - 8:38 pm | आत्मशून्य

मस्त खील्ली ऊडवलीय....... त्या लेखाची :)

हॅट्...कसली यांत्रिक बायको आहे तुमची.
पगार घेणारे नोकर सुध्दा इतकं यंत्रवत काम करत नाहीत.

छत्रपती's picture

26 Dec 2010 - 3:22 pm | छत्रपती

नर्या ,
भारि लिखेला हय.
दे तडाका-धुमधडाका.

kamalakant samant's picture

27 Dec 2010 - 9:49 am | kamalakant samant

अतिशयोक्ती हा विनोदाचा आत्मा आहे,
हे पटायला लागले.

सुधारक's picture

27 Dec 2010 - 7:52 pm | सुधारक

लेखाची सुरवात पाहून मला वाटले लेबलांचा लढा सुरू झाला.