चीनचे मनसे.

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
22 Dec 2010 - 11:03 am
गाभा: 

चीन सरकारने एका अध्यादेशाद्वारे चिनी भाषेत इतर भाषीक शब्द येवून त्यामुळे चिनी भाषेत भेसळ होऊ नये म्हणून इतर भाषीक शब्दाची सरमिसळ करण्यास मनाई केलेली आहे.
http://www.bbc.co.uk/hindi/news/2010/12/101221_china_english_ak.shtml
हे भाषेची जपणूक करण्याचे आदर्ष उदाहरण ठरेल. किंवा चीन सरकार्ची प्रषंसा केली जाईल. मराठी लोकानी असे केले तर ते म्हणे नतद्रष्तपणाचे ठरते.
मराठीवर हिंदी भाषेचे जे आक्रमण चालले आहे ते पहाता मराठी भाषेला सर्वात मोठा धोका इंग्रजीपासून नाही तर हिन्दी भाषे पासून आहे.

गुजरातमध्ये देखील गुजरात सरकारने दुकानांचे फलक गुजरातीमध्येच असणे आवश्यक आहे नियम केला आहे.
अहमदाबाद मध्ये दुकानदारांवर याची सक्ती केली जात आहे.
कर्नाटक सरकारने तर कन्नड भाषी सक्ती प्राथमीक शाळेपासून केली आहे.
सगळे तेज खबर वाले या बाबत आळीमिळी साधून आहेत
महाराष्ट्र सरकारने असे काही केले तर सरसकट देशद्रोही ठरवले जाते.
हा दुजाभाव मराठी माणूस का सहन करतो?
बाय द वे
मातृभाषेला योग्य सन्मान देणार्‍या आनि मातृभाषेला संरक्षण देवून जपणूक करणार्‍या चीन सरकारचे अभिनन्दन.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

22 Dec 2010 - 11:07 am | अवलिया

चीन सरकारचे मनापासुन अभिनंदन..

मध्यंतरी चीनी लोकांनी इंग्लिश शिकावे म्हणुन सरकारी प्रयत्न पण चालू होते असे समजले. पण त्यांनी दोन्ही गोष्टित गल्लत केलेली नाही हे स्पृहणीय.

महेश-मया's picture

22 Dec 2010 - 11:08 am | महेश-मया

धन्यवाद विजुभाऊ माहिती बद्द्ल,

हेच काम आपले राज ठाकरे करत आहे, आणि त्याला माझा पाठीबा आहे. आपले मत काय आहे?

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2010 - 11:08 am | परिकथेतील राजकुमार

विजुभौंच्या ह्या लेखनात कधी न्हवे ते कुठेही संघ अथवा भाजपावर टिका केलेली नसल्याने हा त्यांचा लेख फाऊल धरुन उडवण्यात यावा.

अवलिया's picture

22 Dec 2010 - 11:10 am | अवलिया

आणि राम, हिंदू, धर्म, संस्कृती यावर हिंदूद्वेषप्रणित कागदपत्रे वाचून गरळ पण ओकलेली नाही... जियो ! विजुभाउ जियो !

मातृभाषेला सन्मान देणाऱ्या लेखात शुद्धलेखनाच्या खालील चुका सापडल्या. मातृभाषेला योग्य सन्मान देण्यासाठी त्या सुधारण्यात याव्यात अन्यथा हे नक्राश्रू आहेत असे मानण्यास हरकत नसावी.

चीन सरकारने एका अध्यादेशाद्वारे चिनी भाषेत इतर भाषीक शब्द येवून त्यामुळे चिनी भाषेत भेसळ होऊ नये म्हणून इतर भाषीक शब्दाची सरमिसळ करण्यास मनाई केलेली आहे.
http://www.bbc.co.uk/hindi/news/2010/12/101221_china_english_ak.shtml
हे भाषेची जपणूक करण्याचे आदर्ष उदाहरण ठरेल. किंवा चीन सरकार्ची प्रषंसा केली जाईल. मराठी लोकानी असे केले तर ते म्हणे नतद्रष्तपणाचे ठरते.
मराठीवर हिंदी भाषेचे जे आक्रमण चालले आहे ते पहाता मराठी भाषेला सर्वात मोठा धोका इंग्रजीपासून नाही तर हिन्दी भाषे पासून आहे.

गुजरातमध्ये देखील गुजरात सरकारने दुकानांचे फलक गुजरातीमध्येच असणे आवश्यक आहे नियम केला आहे.
अहमदाबाद मध्ये दुकानदारांवर याची सक्ती केली जात आहे.
कर्नाटक सरकारने तर कन्नड भाषी सक्ती प्राथमीक शाळेपासून केली आहे.
सगळे तेज खबर वाले या बाबत आळीमिळी साधून आहेत
महाराष्ट्र सरकारने असे काही केले तर सरसकट देशद्रोही ठरवले जाते.
हा दुजाभाव मराठी माणूस का सहन करतो?
बाय द वे
मातृभाषेला योग्य सन्मान देणार्‍या आनि मातृभाषेला संरक्षण देवून जपणूक करणार्‍या चीन सरकारचे अभिनन्दन.

मातृभाषेला सन्मान देणाऱ्या लेखात शुद्धलेखनाच्या खालील चुका सापडल्या. मातृभाषेला योग्य सन्मान देण्यासाठी त्या सुधारण्यात याव्यात अन्यथा हे नक्राश्रू आहेत असे मानण्यास हरकत नसावी.

मी इथे आलो
मी इथं आलो
म्या इडं आलु
म्या इत्तं आलु

हे मराठीतील वाक्य नाहीत का?

केवळ प्रमाणलेखनानुसारच बोलणे आणि लिहिणे म्हणजेच मातृभाषेबद्दल प्रेम का?

(अवांतर - माझ्या माहिती नुसार विजुभाउंची मातृभाषा मराठी नाही, पण मला जेवढे मराठीबद्दल प्रेम आहे तितकेच त्यांना आहे याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे)

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 11:21 am | आजानुकर्ण

मी इथे आलो
मी इथं आलो
म्या इडं आलु
म्या इत्तं आलु

हे मराठीतील वाक्य नाहीत का?

एवढे जर तुम्हाला कळते तर मग मराठीत हिंदीतले शब्द आल्याने नक्की काय फरक पडतो हे समजावून सांगा.

काय फरक पडतो हे समजण्यासाठी अभ्यास वाढवा!

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 11:24 am | आजानुकर्ण

काय ते समजले. धन्यवाद. :-)

विजुभाऊ's picture

22 Dec 2010 - 11:39 am | विजुभाऊ

एवढे जर तुम्हाला कळते तर मग मराठीत हिंदीतले शब्द आल्याने नक्की काय फरक पडतो हे समजावून सांगा.

साधे उदाहरण घ्या मी "लहानपणी गर्वाचे घर खाली" असा धडा शिकलो होतो. त्यात गर्व असणे / गर्विष्ठ असणे हा वाईट गुण आहे मानसाने गर्व करू नये. नम्र असावे अशी शिकवण दिली होती.
हिन्दी भाषेने मात्र गर्वाला फार आदराचे स्थान दिले. त्यामुळे आपण गर्वाने म्हणतो मी मराठी आहे.
अशी अनेक उदाहरणे आहेत.
भाषा जपली संस्कृती जपली. भाषा संपली संस्कृती संपली

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 11:45 am | आजानुकर्ण

अच्छा म्हणजे 'गर्व से कहो हम हिंदू है.'वाले का ;)

पंगा's picture

24 Dec 2010 - 10:59 am | पंगा

साधे उदाहरण घ्या मी "लहानपणी गर्वाचे घर खाली" असा धडा शिकलो होतो.

मग पुढे काय घडले त्या धड्यात? मोठेपणी गर्वाला भाडेकरू मिळाला का?

शक्यता नाकारता येत नाही.

- पुंण्याचे गाववाले

पुण्याच्या पेशव्यांशी सहमत आहे :)

ब्रिटिश टिंग्याशी सहमत आहे :)

तु "ब्रिटिश टिंगी" शी सहमत आहेस की "ब्रिटिश टिंग्या" शी ? हे असं बोलतोय कारण की ह्यात जी गल्लत होते आहे ती भाषेचा अभ्यास वाढवुन कमी करता येणार नाहीये.

- भेंडीश वांग्या

अवलिया's picture

22 Dec 2010 - 11:33 am | अवलिया

अरे बापरे... मग रे आता कसे करावे?

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Dec 2010 - 12:06 pm | llपुण्याचे पेशवेll

छोटी टिंगीशी सहमत व्हावे.
अवांतरः हा टारझन माझ्याशी फार वाईट वागतो. मला सारखे खाली दाखवतो (हे हिंदीतील "निचा दिखाना" चे मराठीकर्ण आहे). असो. हिंदी शब्द आले म्हणून कुठे बिघडले आहे ?

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 12:09 pm | आजानुकर्ण

मला सारखे खाली दाखवतो

अश्लील अश्लील.

अहो हिंदी शब्द मराठीत वापरताना मराठीत त्याचा काय अर्थ होतो हे तरी लक्षात घ्या की.

टारझन's picture

22 Dec 2010 - 12:12 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =))
तेरे को कितने मार्क गिरे रे ? हा इंजिनियरींग ला असतानाचा वाक्प्रचार आठवला =))

स्मिता.'s picture

22 Dec 2010 - 3:41 pm | स्मिता.

मी एकाला तर बर्‍याच वेळा 'क्या फर्क गिरता है' असे बोलताना ऐकले आहे!!

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Dec 2010 - 12:14 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो हिंदी शब्द मराठीत वापरताना मराठीत त्याचा काय अर्थ होतो हे तरी लक्षात घ्या की.

ऑल हिंदी वर्डस् कमिंग टू मराठी आर ईक्वल बट सम आर मोअर इक्वल.
(वाह इतके सगळे इंग्रजी शब्द पण मराठीत आले तर मराठी कशी जागतिक भाषा होईल नै!)

गर्व से कहो हम हिंदी हई.

पंगा's picture

24 Dec 2010 - 11:10 am | पंगा

गर्व से कहो हम हिंदी हई.

सांभाळून हो!

नाही म्हणजे, इथे 'हिंदी हैं हम, वतन है हिंदोस्ताँ हमारा' याचा अर्थसुद्धा कोणी 'हिंदुस्थान हिंदीभाषकांचा, तस्मात् हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा?

(*बाकी या असल्या भाषांतरास प्रॉपगांडा व्हॅल्यू मजबूत आहे, नाही? ;-))

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 12:38 pm | llपुण्याचे पेशवेll

हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा?

सहमत आहे. असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात.

हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा?
सहमत आहे. असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात.

पंगा /पुपे हा अनुभव मलादेखील आला आहे. एकाला मी हिन्दी ही राष्ट्रभाषा नाहिय्ये असे सांगितले तेंव्हा तो म्हणाला की मग या देशाचे नाव हिंदुस्थान कशाला आहे.
त्या बेण्याला तिथेच एक खॅळ्ळ खॅटॅक करून त्याच्या तोंडातले फर्निचर बाहेर काढावेसे वाटले.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 4:32 pm | आजानुकर्ण

देशाची भाषा आणि देशाचे नाव यांचा काही संबंध नसावा. अनेक हिंदू हिंदी न वापरताही हिंदू आहेत. देशाचे नाव हिंदुस्थान/हिंदीस्तान नाही. हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 4:35 pm | llपुण्याचे पेशवेll

देशाची भाषा आणि देशाचे नाव यांचा काही संबंध नसावा
सहमत. पण हे मत्प्रिय उप्र, भिहारी बांधवको पता नसते.

हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे.

वा म्हणजे अरब हिंदुत्ववादी होते तर.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 4:45 pm | आजानुकर्ण

सहमत. पण हे मत्प्रिय उप्र, भिहारी बांधवको पता नसते.

हो पण त्यांच्या मूर्खपणामुळे आपणही मूर्खासारखे वागलेच पाहिजे असे थोडी आहे.

वा म्हणजे अरब हिंदुत्ववादी होते तर.

देशाचे नाव हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांचे पिलू आहे.

समजले का? काळजीपूर्वक वाचल्यास असा प्रसंग येणार नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 5:01 pm | llपुण्याचे पेशवेll

हो पण त्यांच्या मूर्खपणामुळे आपणही मूर्खासारखे वागलेच पाहिजे असे थोडी आहे.

काहो दुसर्‍याचे अज्ञान दूर करना मूर्खपणा है असं आपको वाटता है का?

देशाचे नाव हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांचे पिलू आहे.

स्तान आणि स्थान यात अर्थाच्या दृष्टीने फारसा फरक नसल्याने आमच्या वाक्यातही फारसा फरक पडत नाही.

समजले का? काळजीपूर्वक वाचल्यास असा प्रसंग येणार नाही.


अर्थ लक्षात घेऊन वाचल्यास फारसा फरक नाही. तरीही सूचनेचा विचार करू.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 5:03 pm | आजानुकर्ण

काहो दुसर्‍याचे अज्ञान दूर करना मूर्खपणा है असं आपको वाटता है का?

नाही.

तरीही सूचनेचा विचार करू.

धन्यवाद.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 5:04 pm | llपुण्याचे पेशवेll

ओक्के.

पंगा's picture

24 Dec 2010 - 6:52 pm | पंगा

हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे.

याबद्दल साशंक आहे.

म्हणजे 'हिंदोस्ताँ'करिता मराठीत 'हिंदुस्थान' हा शब्द नेमका कधी वापरला जाऊ लागला, कोणी बनवला याबद्दल कल्पना नाही, परंतु जुन्या (म्ह. आमच्या आजोबांच्या वगैरे) पिढीपासूनच्या लोकांच्या तोंडून (आणि लेखी वापरातसुद्धा) हा शब्द सरसकट असाच ऐकलेला (आणि वाचलेला) आहे. असा वापर करणारांपैकी अनेकांचा 'हिंदुत्ववादा'शी दूरान्वयानेही संबंध नसावा (किंवा असलाच तर विरोधापुरता असावा).

किंवा कदाचित याचे मूळ 'हिंदुत्ववाद्यां'त (म्ह. कोण? सावरकर वगैरे?) असेलही, परंतु हा शब्द मराठीतील सामान्य वापरात ('हिंदुत्ववाद्यां'मध्ये आणि इतरांमध्येसुद्धा) अशाच स्वरूपात गेल्या किमान तीनचार पिढ्यांत तरी रुळलेला आहे, आणि तो मराठीत 'हिंदुस्तान' असा कधीही म्हटलेला किंवा लिहिलेला निदान माझ्या तरी ऐकण्यापाहण्यात आलेला नाही. मग म्हणणारा/लिहिणारा 'हिंदुत्ववादी' असो वा नसो.

उलटपक्षी, मराठीखेरीज इतर भाषांत हा शब्द 'हिंदुस्थान' असा लिहिलेला किंवा म्हटलेला (अगदी 'हिंदुत्ववाद्यां'कडूनसुद्धा) वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेला नाही.

त्यामुळे हा शब्द मराठीत 'हिंदुस्थान' तर इतर भाषांत 'हिंदुस्तान/हिंदोस्ताँ' असा असावा, आणि वापरणार्‍याच्या 'हिंदुत्वा'शी (किंवा 'हिंदुत्व'वादाशी) संबंध नसावा, अशी निदान माझी तरी धारणा आहे. (कदाचित मराठीतील 'हिंदुस्थान' हे 'हिंदोस्ताँ'चे अपभ्रष्ट रूप असू शकेल. मुंबईत एकदा 'रिचर्डसन अँड क्रूडास' या कंपनीचे नाव 'रिचर्डसन अँड गुरदास' असे सामान्यजनांकडून ऐकलेले आहे, तद्वत.)

(बाय द वे, माझ्याच घरातील उदाहरण घ्यायचे झाल्यास, हा शब्द माझ्या घरात नेहमी 'हिंदुस्थान' असाच वापरण्यात आलेला आहे. माझ्या आजोबांबद्दल कल्पना नाही, परंतु माझे वडील 'हिंदुत्ववादा'चे कट्टर विरोधक होते आणि मीही 'हिंदुत्ववादी' नाही.)

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 8:00 pm | आजानुकर्ण

विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण हिंदुस्तान/हिंदुस्थान आणि हिंदीस्तान याचा संबंध नसावा हा मुख्य मुद्दा आहे.

(पूर्वपदस्थ) आजानुकर्ण

पंगा's picture

24 Dec 2010 - 10:13 pm | पंगा

बाय द वे, हिंदुस्थानाकरिता तुर्की भाषेत 'हिन्दिस्तान' असा शब्द असावा असे वाटते. हवे तर तुर्कस्थानातील* भारतीय वकिलातीच्या वेबसाइटीस भेट देऊन खात्री करून घ्यावी.

*पुन्हा स्थान!

तसेही 'हिंदी' या शब्दाचा अर्थ 'हिंदचा (म्ह. हिंदुस्थानचा) रहिवासी' असा आहे, आणि योगायोगाने हिंदुस्थानच्या एका मोठ्या भागात बोलल्या जाणार्‍या भाषेचेही ते नाव आहे, असे वाटते.

तसेही भौगोलिकदृष्ट्या 'हिंदुस्थान' हा शब्द वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थांनी, कधी 'आसिंधुसिंधुपर्यंत' अर्थाने, कधी 'ब्रिटिश इंडिया' अशा अर्थी, कधी 'भारतीय गणराज्य' अशा अर्थी तर कधी केवळ उत्तरेकडील मैदानी प्रदेशासाठी (पहा: 'हिंदुस्थानचे मैदान') वापरला जातो, असे वाटते.

तसेही 'हिंद' किंवा 'हिंदोस्ताँ'चा मूळ अर्थ 'उत्तरेकडील गंगायमुनांच्या खोर्‍यांतील मैदानी प्रदेश'** असा काहीसा लक्षात घेता, ऐतिहासिकदृष्ट्या 'हिंदची (किंवा हिंदोस्ताँची) भाषा ती हिंदी (किंवा हिंदोस्तानी)', यात काहीही गैर नाही. 'हिंदोस्ताँ'(या संज्ञे)ची व्याप्ती नंतर वाढली, त्याला कोण काय करणार?

** दख्खनचे पठार हे 'हिंदोस्ताँ' संज्ञेच्या मूळ व्याप्तीच्या बाहेर होते असे विकीवरून कळते. चूभूद्याघ्या.

आजानुकर्ण's picture

25 Dec 2010 - 6:50 pm | आजानुकर्ण

प्रतिसाद आवडला :santa:

असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात.

माझा रोख 'हिंदी इतर भाषांना गिळंकृत करून राहिली आहे'-छाप अपप्रचार करणारांकडे होता. अशा अपप्रचारकांकरिता अशा (मुद्दाम लावलेल्या) अर्थास बरीच प्रॉपगांडा-व्हॅल्यू आहे, असे म्हणायचे होते.

बाकी उत्तर भारतवासी हिंदीभाषक बांधवांच्या याबद्दलच्या (आपण म्हणता तशा) विचारांबद्दल बोलायचे झाल्यास, होय, याचाही थोडाफार अनुभव आहे. (म्हणजे अगदी बिगर-हिंदीभाषकांनी हिंदुस्थानात राहू नये वगैरे इतकी नव्हे, पण बिगरहिंदीभाषकांबद्दल - विशेष करून हिंदी पट्ट्याच्या दक्षिणेकडील रहिवाशांबद्दल - एकंदर तुच्छतेची भावना वगैरे पाहिलेली नाही असे नाही. दिल्लीच्या बसेसमध्ये 'भारत की सभी भाषाएं हमारी अपनी भाषाएं हैं' अशी 'सरकारी' घोषणा मुद्दाम लावावी लागते हे चित्र पुरेसे बोलके आहे. अर्थात ही परिस्थिती सार्वत्रिक नाही, पण नाही असेही नाही.) पण त्याची दखल घेण्याची गरज आहे असे वाटत नाही. भारताच्या एका छोट्या भागातील मर्यादित लोकांना उर्वरित भारतीयांबद्दल काय वाटते यावरून त्या उर्वरित भारतीयांचे भारतीयत्व ठरू नये, आणि त्या उर्वरित भारतीयांनी तर ते तसे मुळीच ठरवून घेऊ नये. गेले उडत!

आणि तशीही इतरप्रांतीयांबद्दल तुच्छता ही एकंदर भारताचीच (किंवा कदाचित मानवजातीची) खासियत असावी. खुद्द महाराष्ट्रात, दक्षिणेकडील हेल काढून बोलणार्‍या लोकांबद्दल आणि त्यांच्या भाषांबद्दल विनाकारण तुच्छतेची - किमानपक्षी टिंगलटवाळीची - भावना परवापरवापर्यंत - अगदी आमच्या आईवडिलांच्या पिढीपर्यंत किंवा कदाचित आमच्याही पिढीपर्यंत - होती, आणि कदाचित अजूनही असल्यास आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना, (केवळ भाषेच्याच नव्हे, तर इतरही बाबतींत) भक्कम परस्परतिरस्काराच्या मजबूत बांधणीवर भारत टिकून आहे, असे म्हटल्यास बहुधा वावगे ठरू नये.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2010 - 11:24 am | परिकथेतील राजकुमार

अवांतर - माझ्या माहिती नुसार विजुभाउंची मातृभाषा मराठी नाही, पण मला जेवढे मराठीबद्दल प्रेम आहे तितकेच त्यांना आहे याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे

+१ सहमत आहे बॉस. विजुभौंच्या मराठी प्रेमाबद्दल पुर्ण खात्री आहे.

मात्र आजकाल मिपावर शुद्धलेखन वगैरेचे चिकित्सा व्हायल लागलेली बघुन गहिवरुन आले.

जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा मनुष्य शुद्धलेखनाचा वाद काढतो असे कूठेतरी वाचले होते ते आठवले

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2010 - 11:27 am | परिकथेतील राजकुमार

असेल असेल. किंवा कधी कधी 'तिकडचे' प्रतिसाद 'इकडे' देखील पडत असावेत.

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 5:29 pm | आजानुकर्ण

मी या खोडसाळ आणि वैयक्तिक प्रतिसादाला दिलेले परखड उत्तर संपादित झाले. मात्र हा एकांगी आरोप संपादित झाला नाही याचे आश्चर्य वाटते. वर मी हिंदी शब्द आल्याने काय तोटा होतो हे स्पष्ट करण्यास सांगितले तर या महाशयांनी स्वतःकडे मुद्दे नसल्याने 'अभ्यास वाढवा' असा चोमडेपणाचा सल्ला दिला आहे. तो सल्ला आणि वरील प्रतिसाद संपादित व्हावा ही संपादन मंडळाला विनंती.

आमोद शिंदे's picture

24 Dec 2010 - 11:09 am | आमोद शिंदे

सहमत आहे. सदर सदस्याची सही आणि एकंदरीत सगळेच चाळे इथे का खपवून घेतले जातात ह्याचा खुलासा संपादक मंडळ करेल काय?

घाशीराम कोतवाल १.२'s picture

22 Dec 2010 - 11:29 am | घाशीराम कोतवाल १.२

आजकाल मिपावर शुद्धलेखन वगैरेचे चिकित्सा व्हायल लागलेली बघुन गहिवरुन आले.

+ १ मला तर गदगदुन आले आणि माझे डोळे पाणावले

तात्पर्य काय : मिपा उपक्रमी आनि मनोगती होणार

विजुभाऊ's picture

22 Dec 2010 - 11:33 am | विजुभाऊ

शुद्धलेखन आनि मातृभाषेला योग्य सन्मान देणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
एक सांगा
व्हता हा शब्द अशुद्ध आहे. मग नव्हता हा शब्द शुद्ध कसा?

अवांतर" आणि हा शब्द टंकताना तो आनि असा टंकला गेला यात शुद्धातेपेक्षा कळफलक आणि घाई गडबड जबाबदार आहे.
टिळकानी संत हा शब्द सन्त सनत असा तिन्ही प्रकारे लिहीला होता.
सदाशिवपेठी पुणेरी मराठी हीच प्रमाण मराठी मानायची हा पुणेकरांचा अट्टाहास असतो.
त्याच पुण्यात सदाशिव पेठेपासून हडपसर कडे थोडे दूर गेलो की " कुठे "या शब्दाचा उच्चार "कुढं" पुढे या शब्दाचा उच्चार "फुडं" अस केला जातो.
त्याच पुण्यात खडकी दापोडी भागात येवू र्‍हायला जावू र्‍हायला असे शब्द वापरले जातात.
मॉडेल कॉलनीत , आयडीयल कॉलनीत " मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला डिफिकल्ट जाते"
फुले मंडैत इकडे तिकडे वावरताना हिकडं तिकडं होते.
ही तर्‍हा आहे महाराष्ट्रावर प्रमाणभाषेचा तोरा मिरवणार्‍या पुणेकरांची

व्हता हा शब्द अशुद्ध आहे. मग नव्हता हा शब्द शुद्ध कसा?

हा फुलराणीतला डायलॉग आहे वाटतं.

बरं हे देशद्रोही नक्की कोण ठरवते? महाराष्ट्रात पूर्वीपासूनच मराठी पाट्यांची सक्ती आहे. पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Dec 2010 - 12:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>महाराष्ट्रात पूर्वीपासूनच मराठी पाट्यांची सक्ती आहे. पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे
प्रॉब्लेम असा आहे की पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे. मुंबईत येऊन बघा. आणि पुण्याची आजची स्थिती पाहता आपण काही नाही केले तर आज जे मुंबईत होते आहे ते १०-१५ वर्षात पुण्यात होणार(If not earlier)

स्वैर परी's picture

22 Dec 2010 - 3:53 pm | स्वैर परी

असेच म्हणते!

इतके सगळे प्रकार पुण्यात दिसत असताना मग तुम्ही नेहमी घाऊक द्वेष करता तो नक्की 'कुठल्या' पुण्याचा?

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2010 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार

सदाशिवपेठी पुणेरी मराठी हीच प्रमाण मराठी मानायची हा पुणेकरांचा अट्टाहास असतो.
त्याच पुण्यात सदाशिव पेठेपासून हडपसर कडे थोडे दूर गेलो की " कुठे "या शब्दाचा उच्चार "कुढं" पुढे या शब्दाचा उच्चार "फुडं" अस केला जातो.
त्याच पुण्यात खडकी दापोडी भागात येवू र्‍हायला जावू र्‍हायला असे शब्द वापरले जातात.
मॉडेल कॉलनीत , आयडीयल कॉलनीत " मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला डिफिकल्ट जाते"
फुले मंडैत इकडे तिकडे वावरताना हिकडं तिकडं होते.
ही तर्‍हा आहे महाराष्ट्रावर प्रमाणभाषेचा तोरा मिरवणार्‍या पुणेकरांची

हे धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड .... आले आले वरिजनल विजुभौ आले !!

चिंतामणी's picture

24 Dec 2010 - 11:49 pm | चिंतामणी

हे धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड .... आले आले वरिजनल विजुभौ आले !!

अजून वरिजनल विजुभौ हायेत. त्यांनी नवीन वर्षापासुन (म्हणजेच २०११ आहे हे गृहीत धरले आहे) पुणे आणि पुणेकरांना नाव ठेवणार नाही असा "पण" केला आहे.

जाउ देत परा. शेवटचे ४-५ दिवस राहीलेत. त्यामुळे दुर्लक्ष कर आत्ता.

चिंतामणी's picture

24 Dec 2010 - 11:50 pm | चिंतामणी

" कुठे " चे "कुढं" किंवा "फुडं" झाले तरी किंवा येवू र्‍हायला जावू र्‍हायला असे शब्द वापरले तरी पुण्यात मराठीचाच वापर होतो हे तुम्ही सिध्द केल्याबद्दल मंडळ आभारी आहे. (बंबईया भाषेबद्दल न बोलणे चांगले)

बाकी लो.टिळकांबरोबर स्वत:ची तुलना करण्याचा प्रयत्न करून आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रकार भारी होता.

विजुभाऊ's picture

22 Dec 2010 - 11:48 am | विजुभाऊ

पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे.

महाराष्ट्रात मुम्बई आणि ठाणे नावाची दोन गावे आहेत. तेथे दुकानाच्या पाट्या / फलक मराठीत हवेत अशी आंदोलने मनसे आनि शिवसेनेला करावी लागतात. शासकीय नियम असूनही तसे करायला गेले की हिन्दी भाषीक लोक आणि त्यांचे कैवारी त्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती असल्याप्रमाणे मराठी विरोधात एकत्र गोंधळ घालतात हे ठाऊक नाही वाटते आपल्याला.
नक्की कुठल्या भूभागावर राहता ?

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 11:56 am | आजानुकर्ण

महाराष्ट्रात मुम्बई आणि ठाणे नावाची दोन गावे आहेत. तेथे दुकानाच्या पाट्या / फलक मराठीत हवेत अशी आंदोलने मनसे आनि शिवसेनेला करावी लागतात. शासकीय नियम असूनही तसे करायला गेले की हिन्दी भाषीक लोक आणि त्यांचे कैवारी त्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती असल्याप्रमाणे मराठी विरोधात एकत्र गोंधळ घालतात हे ठाऊक नाही वाटते आपल्याला.
नक्की कुठल्या भूभागावर राहता ?

मी पुण्यात राहतो. :-)

गेले अनेक दिवस याबाबतीत काही बातम्या वाचनात आल्या नाहीत त्यामुळे हा वाद मिटला असावा असे वाटले. मला वाटते पाट्या-फलक मराठीत - पक्षी देवनागरीत - आल्याने हिंदी भाषकांचा फायदाच होणार आहे. पुरेसे शिक्षण न मिळाल्याने अनेक युपी बिहारी लोकांना इंग्रजी वाचता येत नाही मात्र देवनागरीतल्या पाट्या मात्र त्यांना चोख वाचता येतील. किंबहुना मराठी देवनागरीतल्या पाट्या या त्यांच्या हिताच्याच आहेत हे लाई चना वगैरे कार्यक्रमात श्री. ठाकरे (ठाकरे कुटुंबियांपैकी सध्या जे कोणी पदावर असतील त्यांनी) हिंदी भाषकांना समजावून सांगणे आवश्यक आहे.

मला तर वाटते हा मराठी पाट्यांच्या विरोधातला कट हा हिंदी भाषकांचा नसून गुजराती भाषकांचा आहे. विरेन शाह वगैरे शाह मंडळी या कटाच्या अग्रभागी आहेत. (फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन व रूपम ग्रुप)

(तुम्ही मुंबई असा मराठमोळा शब्द असताना बम्बईपासून प्रेरणा घेऊन मुम्बई असा शब्द का बनवला? मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला जातो.)

मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला जातो.)

तुमचे व्याकरण कच्चे असावे असा संशय होता. आतातर इतिहास देखील कच्चा आहे असे वाटायला लागलेय.
लो. टिळकानी एकदा संत हा शब्द सन्त , सनत ( यीतील न चा पाय मोडलेला समजावा ) असा लिहीला होता.
व्याकरणदृष्ट्या तीनही शब्द बरोबर आहेत.
मुंबई हा शब्द मुम्बई किंवा मुम्बै असा लिहीला तरी बरोबर आहे.
देवनागरी लिपीतील अक्षर हे उच्चाराचे चित्र प्रातिनीधीत्व करते.

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 12:24 pm | आजानुकर्ण

माझे व्याकरण कच्चेच आहे त्यामुळे मराठी संकेतस्थळांवर येऊन मी व्याकरण शिकायचा प्रयत्न करतो.
असो.
संत, सन्त किंवा सन्‌त असे शब्द पुलंनी 'आम्ही सूक्ष्मात जातो' मध्ये वापरल्याचे आठवते. (त्यात या शब्दांच्या जोडीला नम्र, नम्‍र, नम्‌र हेही होते)

मी माझ्या वाक्यात 'शक्यतो' हा शब्द वापरला होता. मुंबई हा शब्द मुम्बअ‍ि असाही लिहिता येतोच की.)

देवनागरी लिपीतील अक्षर हे उच्चाराचे चित्र प्रातिनीधीत्व करते.

हा हा म्हणजे प्रत्येक शब्द हे 'अक्शर्चिन्ह' असते असे सतीश रावले म्हणतात तसे का?

मुंबई हा शब्द मुम्बअ‍ि असाही लिहिता येतोच की
"मुम्बअ‍ि" शब्दात " अ" अक्षरावर्ची वरची वेलान्टी दीर्घ हवी

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 1:29 pm | आजानुकर्ण

नोंद घेतली आहे. आता मुम्बअ‍ी असे लिहीत जाईन.

टारझन's picture

22 Dec 2010 - 1:33 pm | टारझन

=)) =)) =)) वरिल भाषिक उहापोहाला करवंदना केलेली आहे... =))

लो. टिळकानी एकदा संत हा शब्द सन्त , सनत ( यीतील न चा पाय मोडलेला समजावा ) असा लिहीला होता.

अहो पण टिळकांनी तो शब्द तसा केवळ दिपोटींशी पंगा घेण्यासाठी लिहिला होता. (शेवटी मूळचे पुण्याचे नसले तरी रेट्रोअ‍ॅक्टिव इफेक्टने वाण नाही पण गुण लागायचाच. असो.) त्यानंतरच्या महाराष्ट्राच्या उभ्या इतिहासात (म्हणजे, महाराष्ट्राचा बसलेला इतिहास पाहिलेला नाही. तसेही आपण इतिहासतज्ज्ञ नाही. असो.) तो तसा तीन वेगवेगळ्या प्रकारे (एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या वेळी सुटा) लिहिला गेल्याची उदाहरणे (वर आजानुकर्ण यांनी म्हटल्याप्रमाणे पु.लं.चा अपवाद वगैरे वगळता) फारशी नसावीत. (नाही म्हणायला हा शब्द 'सन्त' असा लिहिणारे तुरळक खाजाळू असतीलसुद्धा, परंतु 'सन् त' - मधली रिकामी जागा वगळून - असा लिहिणारे महाभाग टिळकांअगोदर किंवा नंतर झाल्याचे ऐकिवात नाही.)

असो.

(अवांतर: बाकी, टिळकांची संतत्रयीची किंवा 'मी शेंगदाणे खाल्लेच नाहीत'वाली गोष्ट काय किंवा गांधींची 'केट्ल'च्या स्पेलिंगची गोष्ट काय, या गोष्टी या कोणीतरी उठवून दिलेल्या वावड्या असाव्यात, अशी मला दाट शंका आहे.)

पण खरच मराठी जपलीच पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारी तसेच निमसरकारीही कामांचे दस्ताऐवज मराठीतुन केले पाहीजे.

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 8:33 pm | नरेशकुमार

you are absolutely right. I agree with you.

भाषा आपोआप जपली गेली तर जगते. नियम, सक्ती, कायदे असे काही करुन सोवळ्याचे फडके बांधून लोणच्यागत टिकवली तरी फार काळ तग धरेल असे नाही.

लवचिक भाषा जगतात.

बाहेरच्यांना अजिबात प्रवेश न देणार्‍या. शब्दांची जराही मोडतोड न होऊ देणार्‍या कडक नियमवाल्या भाषा काळाच्या धुरळ्यात गडप होतात. किंवा फक्त म्यूझियम / ऐतिहासिक व्हॅल्यूच्या (ममिफाईड) बनतात. उदा संस्कृत.

जे शब्द सहज रुढ होताहेत ते गुलामगिरी, परभाषा वगैरे असे जुने संदर्भ न आणता सामील करुन घ्यावेत हे हिताचे.

टिकण्यायोग्य असते ती भाषा टिकतेच.

मराठीचे तरी काय?:
अगदी पहिले सापडलेले मराठी वाक्यः

"चामुंडरायै सुत्ताले करवियले. श्री गंगरायै सुत्ताले करवियले"

नंतर बखरींमधे..

"जैसे भडबुन्जे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडाका जाहला.."

या भाषेपेक्षा तुम्ही आम्ही बोलतोय ती (या लेखाची आणि प्रतिक्रियांची धरुन) मराठी भाषा यांत लिपी सोडून काय साम्य आहे?
त्यावेळची मराठी संपली. पण आता वेगळे रुप जिवंत आहे.

तिमा's picture

22 Dec 2010 - 12:51 pm | तिमा

चीनचे एवढे कौतुक नको. काही वर्षांनी आपल्या इथे पण सगळ्या पाट्या चायनीज भाषेतच लागणार आहेत. आणि त्या सक्तीने वाचाव्या पण लागतील.

इन्द्र्राज पवार's picture

22 Dec 2010 - 1:20 pm | इन्द्र्राज पवार

धाग्याचे जे मूळ कारण आहे "चिनी भाषेची प्युरिटी राखण्यासाठी त्या सरकारने उचललेले पाऊल...", त्याविषयी मत व्यक्त करीत आहे.

त्या बातमीवरून (तसेच या धाग्यावरून) असे वाटण्याची शक्यता आहे की चीनची इंग्लिश भाषेशी दुश्मनी आहे. पण प्रत्यक्षात तसे नसून तो आदेश काढण्याचे कारण "लिपी" आहे. म्हणजे असे की, चिनी वर्तमानपत्राला आता बातमीत वा लेखात English Word वा Phrase द्यायची असेल तर ती 'चिनी लिपीत' देता येणार नाही. उदा. आपण महाराष्ट्र टाईम्स वा सकाळ या वर्तमानपत्रात असे वाचू शकतो की "वर्ल्ड कप फूटबॉल" साठी आयोजनासाठी भारत उत्सुक. चीनचे वर्तमानपत्रही ही बातमी देणार असेल तर या शीर्षकातील "वर्ल्ड कप फूटबॉल" त्याला 'चिनी लिपी' त देता येणार नाही. हा एवढाच शब्द World Cup Football असा देऊन त्याचा चिनी भाषेत कंसात अनुवाद द्यावा लागेल.

चिनी लिपी ही खरे तर चित्रलिपी असल्याने वर्तमानपत्रांना बातमीमध्ये एखादेवेळी इंग्लिश संक्षिप्त रूपे UNO, GDP, WTC, NBA द्यायची असल्यास ते चिनी लिपी वापरत (जसे आपण मराठीत 'युनो, जीडीपी, एनबीए' वापरली असती), त्यामुळे त्या लिपीतील इंग्लिश शॉर्टफॉर्म्सचे अनेकविध अर्थ निघू शकतात (इथे भाषेच्या Purity चा प्रश्न आला होता).....हे त्या सरकारच्या The General Administration of Press and Publication या विभागाच्या लक्षात आल्याने त्यानी "इंग्रजी शब्दांची संक्षिप्त रूपे देऊ नयेत" असा जरी आदेश जरी जारी केला असला तरी त्यात 'If necessary' ची एक पळवाट ठेवली आहेच अन् ती म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे शब्दाचे पूर्ण रूप देऊन त्याचा चिनी भाषेतील अनुवाद कंसात देणे.

इन्द्रा

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 2:06 pm | आजानुकर्ण

दुर्दैवाने मराठी आणि हिंदीची लिपी एकच असल्याने विजुभौंना भीती वाटणारे हिंदी शब्द ओळखण्यास अंमळ अडचण येणार आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Dec 2010 - 2:42 pm | llपुण्याचे पेशवेll

अडचण येणार नाही असे वाटते. सम मोअर इक्वल शब्द लगेच ओळखता येतील की? जसे की एखाद्याला तू किती बिझी आहेस हे विचारताना मी त्याला "तेरा व्यस्त प्रमाण काय आहे?" असे विचारीन. हिंदी शब्द मराठीत आल्याने काही अडचण होणार नाही असे मानून हेही वाक्य चालून जाईल असे वाटते.

"गर्वाने सांगा हम मराठी आहे"

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 5:24 pm | आजानुकर्ण

हिंदी शब्द मराठीत आल्याने काही अडचण होणार नाही असे मानून हेही वाक्य चालून जाईल असे वाटते.

चालणार नाही. किंबहुना हे तुमच्या प्रतिसादाइतकेच अर्थहीन वाक्य आहे. वाक्यरचना योग्य नसल्याने ती समोरच्याला समजणार नाही. तो तुम्हाला वेडा समजण्याचा धोका इथे नमूद करावासा वाटतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Dec 2010 - 5:53 pm | llपुण्याचे पेशवेll

चालणार नाही. किंबहुना हे तुमच्या प्रतिसादाइतकेच अर्थहीन वाक्य आहे. वाक्यरचना योग्य नसल्याने ती समोरच्याला समजणार नाही. तो तुम्हाला वेडा समजण्याचा धोका इथे नमूद करावासा वाटतो.

यू सेड इट. वर कोणीतरी हिंदी शब्द मराठीत आल्यामुळे काय बिघडतं असे विचारले होते. तिथे हा चोप्य पस्ते करावा असा विचार करतो आहे.

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 5:55 pm | आजानुकर्ण

अहो महाशय,

स्वतःला पटणारे सोयीस्कर उदाहरण घेऊन सिद्धता होत नसते. तुम्ही चुकीच्या ठिकाणी हिंदी काय अगदी संस्कृत शब्द घातला तरी तिथे बिघडणारच. याउलट योग्य ठिकाणी हिंदी शब्द चालूनही जाईल. थोडा विचार करा.

नगरीनिरंजन's picture

23 Dec 2010 - 7:14 am | नगरीनिरंजन

तुम्हाला काय म्हणायचंय ते कळतंय. जसे फारसी, अरबी आणि संस्कृत शब्द मराठीत आले तसे काही हिंदी शब्द आले तर काहीच हरकत नाही हे तत्वतः मान्य आहे. परंतु तुम्ही जर आजकाल वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर दिसणारी आणि बर्‍याच लोकांच्या तोंडी असणारी भाषा पाहिलीत तर योग्य तेच हिंदी शब्द मराठीत येत आहेत असे म्हणाल?
शिवाय मराठीत आधीच त्या अर्थाचे अनेक शब्द असताना (भले ते पुर्वी इतर भाषेतून आलेले असो) विनाकारण नवीन प्रतिशब्द आयात करून जुने शब्द विस्मरणात घालवायची किंवा त्यांचे अर्थ बदलायची गरज काय?
वरती पुपे म्हणाले तसं, "मी व्यस्त आहे", "मला गर्व आहे", "माझी मदत कर"इत्यादी चुकीचे वाक्यप्रयोग आणि प्रेक्षकांसाठी दर्शक असे चुकीचे शब्द आजकाल सर्रास वापरले जातात.
इतकाच जर हिंदीचा सोस आहे तर हिंदीच बोलूया ना. कशाला पाहिजे मराठीतरी? ज्याला शब्दांचा पोत, छटा आणि रुप पाहता येते त्याला थोड्या छटेच्या फरकानेही खडा लागल्यासारखे होते. इथे तर ढळढळीत काहीही शब्द वापरले जातात आणि वर भावना पोचल्या म्हणजे झाले ना अशी रंगसफेती केली जाते. जर भावना पोचणेच फक्त महत्त्वाचे असेल तर माकडेही एकमेकात संवाद साधतात त्या आणि इतर भाषांमध्ये फरक काय?

सुनील's picture

22 Dec 2010 - 8:17 pm | सुनील

हे जपानी भाषेने ह्यापूर्वीच अंगिकारले आहे.

जपानीत मूळ जपानी शब्द हे कांजी ह्या चीनकडून आयात केलेल्या लिपीत लिहिले जातात तर, जपानीबाह्य शब्दांसाठी काताकाना ही लिपी वापरली जाते.

सुनील-सान

सुधीर काळे's picture

22 Dec 2010 - 10:10 pm | सुधीर काळे

'हिरागाना' राहिली कीं!

पंगा's picture

24 Dec 2010 - 10:24 pm | पंगा

सुनील-सान

स्वतःस उल्लेखताना 'सान'प्रत्यय लावण्याची जपानीत प्रथा नसावी, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

नरेशकुमार's picture

25 Dec 2010 - 7:00 am | नरेशकुमार

शेमत
केवळ दुसर्‍याचा आदारार्थी उल्लेख करतानाच 'सान' लावतात,

कळाले का, सुनील सान.

चीन ने देश में अख़बारों, पत्र-पत्रिकाओं और वेबसाइटों पर विदेशी शब्दों और विशेष रूप से अंग्रेज़ी के शब्दों का प्रयोग करने पर पाबंदी लगा दी है.

मुळ लेखात 'अन्य भाषीक' ऐवजी विदेशी शब्दों और विशेष रूप से अंग्रेज़ी असा स्पष्ट उल्लेख असताना इथे विशेष टिप्पणी करताना, मराठीत हिंदी मग हळुच कन्नड, गुजराथी भाषा व त्या प्रातांचे नियम इ. काढून देशांतगर्त भाषिकांमधेच दुरावा निर्माण करायचा प्रयत्न तर नव्हे? मराठीत इंग्रजी अथवा अन्य विदेशी भाषांबद्दल बोलत असाल तर एकवेळ तो समान धागा असेल. बाकी सध्या महाराष्ट्रात रुळलेल्या मराठीत अन्य भाषेतले (देशी, परदेशी) शब्द बिल्कुल नाहीत असे आपले म्हणणे आहे का?

चीन मधे देखील वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी भाषा बोलणारे लोक आहेत. 'कोणतीही भाषा बोला पण जितक्या चांगल्याप्रकारे बोलता / वापरता येईल तितकी बोला / वापरा' हे जगातल्या कोणत्याही भाषा बोलणार्‍याला तत्वता पटेल असेच आहे. चीन मधील दोन प्रांतांच्या सीमावर्ती भागात, तसेच मोठ्या शहरात रहाणारे लोक चीन मधे बोलल्या जाणार्‍या अन्य भाषेतले शब्द वापरत नाहीत असे आपले ठाम म्हणणे व वस्तुस्थिती आहे काय?

खरे तर मराठी भाषा बोलणार्‍यांनी हिंदीच्या वाटेला जाउ नये असे कोणत्याही हिंदीभाषकाला मनापासून वाटेल :-)
तुमने कभी अस्सल मराठी मानुस हिंदी बोल्तेहूए ऐक्या है क्या? वो एक कणेकर लेखक करके है एकजन, उनकी लिही हुवी वाक्ये वाचो कभी|
तरी मराठीला धोका हिंदीपासुन वगैरे वक्तव्ये खोडसाळ वाटतात.

भारतात ज्या प्रांतात आपण रहातो तेथील भाषा, हिंदी व इंग्रजी भाषा (अगदी क्वचित प्रसंगी सरमिसळ, संभाषण कळावे म्हणुन ) वापरुन संभाषण करण्यात, सरकारी काम करण्यात कोणाला कसली अडचण नसावी.

विजुभाऊ's picture

22 Dec 2010 - 2:43 pm | विजुभाऊ

भारतात ज्या प्रांतात आपण रहातो तेथील भाषा, हिंदी व इंग्रजी भाषा (अगदी क्वचित प्रसंगी सरमिसळ, संभाषण कळावे म्हणुन ) वापरुन संभाषण करण्यात, सरकारी काम करण्यात कोणाला कसली अडचण नसावी.

राज ठाकरे देखील हेच म्हणतात. पण आपले थोर सबसे तेज चॅनेलचे रीपोर्टर्स महाराष्ट्राच्या मुख्यमन्त्र्यानासुद्धा हिन्दीत बोला असे सांगतात तेंव्हा त्या माजुर्डेपणाला काय म्हणायचे?
पुण्यात राहूनही मराठी न येता माझे काही अडत नाही असे अभिमानाने म्हणणारे हिन्दीभाषीक मराठी भाषेला कमी लेखतात . त्याना तुम्ही ही वाक्ये का नाही समजून सांगत?
वर पुन्हा हिन्दी ही राष्ट्रभाषा आहे . ती सर्वानी बोलायलाच हवी असा वृथा तोरा मिरवतात.
मी मराठी बोलणारच नाही . मला कळावे म्हणून तुम्हीच हिन्दीत बोला हा अट्टाहास कशाला?
आमच्या देशात्/प्रान्तात यायचे इथेच जगायचे पैसे मिळवायचे आणि वर आम्हालाच शहाणपण शिकवायचे हा माजुर्डेपणा मराठी माणसाने कशासाठी सहन करायचा.
मराठी माणसाने या बाबतीत तमीळ लोकांचा आदर्श समोर ठेवावा.

सहज's picture

22 Dec 2010 - 3:03 pm | सहज

माजुर्डेपणाला सडेतोड उत्तर द्यायला मराठी माणसाचे हात कोणी बांधले नाहीत. की अश्या माजुर्डेपणाचे समर्थन कोणीच करणार नाही.

बाकी चीनने इंग्रजी भाषा की अन्य चीनी बोली भाषेबाबत फतवा काढला आहे ते लिहले नाहीत.

'मराठीवर अन्य भाषांचे आक्रमण' हा एक न संपणारा विषय वाटतो आहे.

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 5:21 pm | आजानुकर्ण

महाराष्ट्रातील मराठी लोक मराठी बोलत नाहीत, मराठी चित्रपट पाहत नाहीत, मराठी लिहीत नाहीत याला उत्तरेकडच्या वाहिन्या किंवा उत्तरेतून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेले हिंदीभाषक जबाबदार कसे काय असतील. मराठी लोकांनी मराठीत बोलू नये म्हणून त्यांनी तोंडे धरून ठेवली आहेत का?

हिंदी वाहिनीने हिंदीत बोला असे मुख्यमंत्र्यांना सांगणे हे त्या वाहिनीचे काम असावे. (हिंदी वाहिनीचा प्रेक्षकवर्ग हिंदी जाणणारा असतो) पण मुख्यमंत्र्यांनी मराठीतच उत्तर द्यायला काय हरकत आहे. मराठीत न बोलण्याचा दोष मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाच आहे.

या मुद्यावर आजानुकर्णाशी बाडिस (माफ करा ) १००% सहमत.

तरी मराठीला धोका हिंदीपासुन वगैरे वक्तव्ये खोडसाळ वाटतात.

हिन्दी भाषेने बर्‍याच भाषा गिळंकृत केल्या आहेत.
राजस्थानी ही भाषा पूर्वी हिन्दीची पोटभाषा मानली गेली. पण आता तर त्या भाषेचा अस्त होऊ लागलाय.
तीच गत हरयाणवी ची , मैथीली अंगीका या भाषांची.
मराठीवर हिंदीचे हळूहळू आक्रमण होतच आहे.
वर्तमानपत्रातल्या /टीव्हीवरील जहीरातीतील भाषा पहा// तुम्हाला जाणवेल
मराठी सीरीयल्स मधील पात्रे चुकीचे ( हिन्दी धाटणीचे ) शब्द प्रयोग करू लागलीत.
उदा :मला मदत करशील हे वाक्य ( मेरी मदद करोगे?) या प्रमणे माझी मदत करशील असे बोलतात.
"गर्व " या शब्दाबद्दल अगोदरच लिहीले आहे.
" सकाल प्रहर पासून एकसारख्या ताजगी साठी " अशी जहीरात करणार्‍याला मराठीत सकाळ हा शब्द आहे आणि त्यासाठी प्रहर हा शब्द वापरावा लागत नाही. " ताजगी " या ऐवजी "उत्साह , ताजेपणा" हे शब्द आहेत हे माहीत नाही. लोक तेच चालवून घेतात आणि हळूहळू चुकीचे शब्द बरोबर आहेत असे लोकाना वाटू लागते.
ही वस्तुस्थिती आहे त्यात खोडसाळ पणा काय झाला. मराठीला मराठीचे हिन्दीकरण होण्याचा धोका आहेच.
भाषा जगली संस्कृती जगली. भाषा संपली संस्कृती संपली

सुहास..'s picture

22 Dec 2010 - 5:47 pm | सुहास..

राजस्थानी ही भाषा पूर्वी हिन्दीची पोटभाषा मानली गेली. पण आता तर त्या भाषेचा अस्त होऊ लागलाय.
तीच गत हरयाणवी ची मैथीली अंगीका या भाषांची.

हम्म ! आता कस ?

विजुभाऊंशी १००% सहमत !

" सकाल प्रहर पासून एकसारख्या ताजगी साठी " अशी जहीरात करणार्‍याला मराठीत सकाळ हा शब्द आहे आणि त्यासाठी प्रहर हा शब्द वापरावा लागत नाही. " ताजगी " या ऐवजी "उत्साह , ताजेपणा" हे शब्द आहेत हे माहीत नाही. लोक तेच चालवून घेतात आणि हळूहळू चुकीचे शब्द बरोबर आहेत असे लोकाना वाटू लागते.

श्री. विजुभाऊ तुमची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. पण हा मुद्दा शेवटी प्रमाणलेखनाशीच निगडित आहे ना. हळूहळू चुकीचे शब्द बरोबर वाटण्याचा प्रकार अशुद्ध शब्दांनीही होणारच ना. तुम्ही 'सकाळ' या शब्दाचा 'सकाल' असा उच्चार चुकीचा असल्याचे लिहिले आहे. पण 'नलाच्या बाजूच्या तलातल्या खोलीतल्यांचे' उच्चार असेच असणार ना. मग मी शुद्धलेखनाचा मुद्दा काढला तो चुकीचा कसा काय?

सुहास..'s picture

22 Dec 2010 - 6:06 pm | सुहास..

आजानुकर्णजी
बोलीभाषेत आणि लेखी भाषेत बरीचशी गल्लत होते आहे आपली असे वाटते आहे

बाकी चालु द्या

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 6:08 pm | आजानुकर्ण

हो पण विजुभाऊंचा हा चर्चाप्रस्ताव हा 'लेख'च आहे ना. मी चर्चाप्रस्तावाच्या लेखी भाषेबाबतच माझा मुद्दा मांडला होता. विजुभाऊंनी पॉडकास्टवर ही चर्चा उपलब्ध करून दिली असेल तर सपशेल माफी मागतो.

सुहास..'s picture

22 Dec 2010 - 6:18 pm | सुहास..

आपण त्याच्यां भावनांना समजायचे होते, आपण तर त्यांच्या भावनेला आपले समजायला लागलो आहे . ;)

असो

पंगा's picture

24 Dec 2010 - 12:42 pm | पंगा

आपण त्याच्यां भावनांना समजायचे होते

साफ चूक!

'आपण त्यांच्या भावना समजून घ्यायच्या होत्या'!

साफ चूक!

'आपण त्यांच्या भावना समजून घ्यायच्या होत्या'! >>>

पंगोपंत !! त्याच करिता मुद्दामुन टाकले होते. पण चिकित्सकांनी भ्रमनिरास केले मला. ;)

इन्द्र्राज पवार's picture

22 Dec 2010 - 3:34 pm | इन्द्र्राज पवार

"....भाषा जगली संस्कृती जगली. भाषा संपली संस्कृती संपली...."

वरील वाक्यातील भावार्थ जसाचा तसा घेऊनही मी असे म्हणतो की, इतकी शेणगोळ्यासम लेचीपेची मराठी संस्कृती आहे का, की भाषेत (देशातीलच) दुसरी भाषा, व्यवहाराकरीता, आली म्हणून तिला उर्ध्व लागावा? भाषा हे सुशिक्षित तसेच अशिक्षित माणसांमधील संवादाचे माध्यम आहे (लिपीचा इथे विचार करीत नाही) तर विविध ढंगी भाषांचे महत्त्व भारतासारख्या बहुभाषी देशात विशेषच आहे. घटनेने देशात कुणालाही कुठेही प्रवासासाठी, रोजीरोटीसाठी मुभा दिली असल्याने त्या त्या प्रांतातील भाषेचे अनेकविध कंगोरे आपल्या भाषेत अवतरणारच, पण त्यामुळे आपली भाषा "भ्रष्ट" झाली असे मानण्याचे काही कारण नसते.

मराठी भाषेचा अभिमान बाळगणार्‍या व्यक्तीच्या मुलीला "डॉक्टर" जावई सांगून आला तर तो आपल्या पाहुणे-परिवारात "माधवीच्या लग्नासाठी वैद्य मुलगा आलाय" असे सांगेल का? तिथे मात्र अभिमानाने "डॉक्टर" असे इंग्रजी नामच वापरण्याची ती व्यक्ती काळजी घेईल. असे शब्द आणि ते ज्यातून येतात त्या भाषा म्हणजे संस्कृतीचाच एक पूल असतो. इंग्रजीचे स्थान जसं भारत भ्रमणात महत्वाचे ठरते तद्वतच माझ्यासारख्या पक्क्या मराठी नागरिकाला पोटासाठी पंजाब वा हरियाणा इथे जावे लागते त्यावेळी 'हिंदी' चा (भले कितीही मोडकातोडका का असेना) आधार घ्यावाच लागतो. या दोन्ही प्रांतातील (शीख आणि जाट) व्यावसायिक बंधू माझे कोल्हापुरी हिंदी ऐकून ("मेरे पीठको घाम आयाला है"...पद्धतीचे) बेशुद्ध पडलेले नाहीत किंवा "ओये पुत्तर पंजाबी सिख लेना जल्दी जल्दी....!" अशी प्रेमळ धमकीदेखील देत नाहीत.

अमृतसर, गुरुदासपूर, लुधियाना, फिरोझपूर, बर्नाला आदी मेट्रो शहरे तर सोडाच पण अगदी आतील ग्रामीण भागातदेखील हिंदी भाषा बोलून कुणी व्यवहार करीत आहे हे पाहून गावकर्‍याची भुवई वक्र होत नाही...किंबहुना रोहटक आणि अंबाला या दोन हरियाणवी जिल्ह्यात तर परक्या व्यक्तीने (इथे मी...) बोललेले हिंदी कळत नसले तरी तो दुकानदार्/कंडक्टर्/बॅन्क कर्मचारी थोडावेळ थांबून समजून घेऊन योग्य ते मार्गदर्शन करतोच करतो....अशावेळी त्यांच्या मूळच्या भाषेचा तिथे काही अवमान होत आहे असे त्याला वाटत नाही.

"महाराष्ट्रातून चार लोक येऊन पंजाबी भाषा आणि संस्कृतीवर घाला घालत आहेत..." अशी समजूत तिथे कुठे रुजल्याचे मला आजअखेर आढळलेले नाही.

'भाषेच्या अस्मितेचा प्रश्न' हे मनसेच्या राजकारणातील अस्तित्वासाठी एक प्रभावी शस्त्र आहे....त्याचा संबंध आपण भाषावृद्धी आणि संस्कृती यांच्याशी जोडू नये.

इन्द्रा

गांधीवादी's picture

22 Dec 2010 - 3:56 pm | गांधीवादी

अति अति अवांतर :
आताच एक मित्राबोबर ह्या विषयी चर्चा करीत होतो, त्या पट्ठ्याने एक नवीनच माहिती दिली.

Sentence of the year :
बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बिहारी जनतेने विकासाला जो अभूतपूर्व कौल दिला, त्याला खरे कारणीभूत कोण ? त्यांची निद्रावस्थेत गेलेली अस्मिता जागृत करण्याचे कार्य केले ते 'राज ठाकरे' यांनी.

धमाल मुलगा's picture

22 Dec 2010 - 4:01 pm | धमाल मुलगा

"महाराष्ट्रातून चार लोक येऊन पंजाबी भाषा आणि संस्कृतीवर घाला घालत आहेत..." अशी समजूत तिथे कुठे रुजल्याचे मला आजअखेर आढळलेले नाही.

बिहारींबद्दल काय समजूत आहे तिथे?

इन्द्र्राज पवार's picture

22 Dec 2010 - 5:54 pm | इन्द्र्राज पवार

श्री.धमु....

पंजाब असो वा हरियाणा, या दोन्ही प्रांतांची देशभर ओळख आहे ती मुख्यत्वे करून शेतीउद्योगाशी आणि काही प्रमाणात कारखानदारीच्या क्षेत्रातील त्यांची भरारी. इथे २४ तास राबणारा शेतकरी जसा दिसतो (जो गव्हाच्या रूपाने सोन्याची पैदास करतो असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही) तसाच लुधियानाच्या घराघरातून चाललेले कारखानदारीशी संबंधित कुटिरोद्योग पाहिले तर अन्य प्रांतियांनासुध्दा तिथे "नोकरी" निमित्ताने येण्याची गरज वाटावी. पण आलेच (आणि तसे बिहारी आले असले तरी का कोण जाणे पंजाबी लोक त्याना 'परके' मानत नाहीत....किंबहुना त्याला काही ऐतिहासिक कारणदेखील असू शकेल) तर ते इथल्या मातीत असे मिसळून गेलेले आहेत की, आपल्यासारख्या महाराष्ट्रीयानास असेच वाटेल की ते मुळचेच इथले आहेत. भाषा-वेषभूषा-खाण्याच्या पद्धती-राहणीमान, सणवार अगदी त्या मातीतीलच. (हे महाराष्ट्रात आलेले बिहारीदेखील करीत असतील तर वादाचा मुद्दाच राहणार नाही). पण असे आहे म्हणून त्यांच्यापेक्षाही घाम गाळून काम करतात ते स्थानिक लोक. बाहेरच्यांची गरज भासणार नाही अशी जबरदस्त वातावरण निर्मिती शीख आणि हरियाणवी युवक-युवतीच काय पण प्रौढानीसुद्धा (स्त्री-पुरुष) निर्माण केली आहे; पण म्हणून जे आले आहेत त्याबद्दल (मला तरी) कुठे असंतोष खदखदत आहे असे दिसलेले नाही (अर्थात माझी झाडाझडती फक्त दोन-तीन जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे, हेही इथे नमूद करणे आवश्यक आहे). सतत कामात असतात हे लोक, शिवाय अमुक एक काम 'हलके' वा 'माझे नव्हे' अशीही भावना कुठे दिसत नाही. माझ्यासमोर ट्रॅक्टर चालविणारा कदाचित त्या गावातील लखपती आणि मुखियादेखील असू शकतो, पण पेहेरावावरून तो आपल्याकडील रामा-शिवा-तुक्या सारखाच दिसतो.....खाण्यातही बिलकुल नखरे नसतात. दालरोटी तसेच चनाभटोरा, लस्सीचा ग्लास समोर आले की गडी खुश !

त्यामुळे परिस्थिती अशी आहे की; अशा मेहनतीच्या/कारागिरीच्या कामासाठी बाहेरचे हवेतच असे चित्र जरी नसले तरी जे बिहारी आता गेली २०-२५ वर्षे झाली त्या दोन राज्यात आहेत त्याना हुसकाविण्यासाठी काही चळवळी दिसत नाहीत (असल्या तर त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे असे म्हणतो). काही बॅन्किंग आणि सरकारी नोकरीनिमित्य येणे झाले म्हणून आले आणि कायमच्या वास्तव्यासाठीदेखील राहिलेले आहेत. माझ्यासारखे काही तुरळक महाराष्ट्रीयन दिसत असले तरी ते कायमच्या वास्तव्यासाठी नसून तेथील काही संस्थांशी भागिदारीचे छोटेमोठे व्यवहार झालेले असतात या कारणासाठीच.

या किंवा अशाच कारणामुळे या दोन राज्यातील जनतेला अन्य राज्यातून आलेल्या भय्यांमुळे कसलीही चिंता वाटत नाही असेच चित्र आहे. त्यातही मुंबईसारखेच बिहारी बाबूंना "नवी दिल्ली" चे आकर्षण आहे पण 'अमृतसर' वा 'चंदिगड' चे तितके नाही असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही.

इन्द्रा

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Dec 2010 - 6:09 pm | llपुण्याचे पेशवेll

तर ते इथल्या मातीत असे मिसळून गेलेले आहेत की, आपल्यासारख्या महाराष्ट्रीयानास असेच वाटेल की ते मुळचेच इथले आहेत. भाषा-वेषभूषा-खाण्याच्या पद्धती-राहणीमान, सणवार अगदी त्या मातीतीलच. (हे महाराष्ट्रात आलेले बिहारीदेखील करीत असतील तर वादाचा मुद्दाच राहणार नाही).
इंद्रा तुम्हीच कारणही लिहीले आहे. विचार करून बघा. आपल्या आजूबाजूच्या महाराष्ट्रातील महानगरांमधे ही परिस्थिती आहे का? ४ मराठी माणसांमधे १ बाहेरचा माणूस असेल तर त्याच्यासाठी सर्वांनी का म्हणून हिंदी बोलावे. आणि हा एकटा असलेला माणूस तुम्ही हिंदीत बोला असे म्हणायला धजावतो हा त्याचा माजुरडे पणा आहे ज्याला आजकाल काही लोक शूरपणा संबोधत असले तरीही. मी अशाप्रकारे समजा ४ इतरभाषिकांच्यात असलो असतो तर त्यांना माझ्यासाठी हिंदीत बोला हे कधीच सांगितले नसते. याचे कारण शारीरीक वा मानसिक दौर्बल्य हे नसून मला त्या लोकांच्या भाषाप्रेमाचीही कदर आहे . आणि असा मोठ्यामनाने वागण्याचा संस्कार माझ्यावर आहे. पण माझ्या शहराची, गावाची व्यवहार भाषा जर बदलत असेल तर तो बदल थांबवणे हे माझे कर्तव्य आहे असे मी मानतो . आणि ते सर्वांच्या प्रयत्नातूनच शक्य आहे. त्यासाठी मित्रांचे प्रबोधन करतो. आणि त्यासाठी योग्य तिथे बोलतो, इतर मराठी मित्रांना मराठी बोलताना मदत करतो. ते वापरत असलेल्या हिंदी शब्दाला योग्य तो मराठी शब्द सांगतो.

इन्द्र्राज पवार's picture

22 Dec 2010 - 6:53 pm | इन्द्र्राज पवार

"....पण माझ्या शहराची, गावाची व्यवहार भाषा जर बदलत असेल तर तो बदल थांबवणे हे माझे कर्तव्य आहे असे मी मानतो...."

श्री.पु.पे. तुमच्या या मताचा मी नि:संशय आदर करतो इतके ते निखळ आहे. मी पाहिलेल्या (तसेच काम करीत असलेल्या काही) राज्यातील परिस्थिती मात्र अशी आहे की, त्या राज्याचे कायमचे रहिवासी झालेल्या बिहारी लोकांनी जशी स्थानिक बोलीभाषा आत्मसात केली आहे तद्वतच जर ते एखाद्या वेळी एखाद्या 'सिंग' बरोबर संवाद साधताना हिंदीचा आसरा घेत असतील तर ते सिंग याना खटकत नाही (नसावे....तसे पाहिल्यास शीख समाजालाही पंजाबीइतकीच उर्दु आणि हिंदी प्रिय आहे, हेदेखील कारण असू शकेल.). आत्ता लुधियाना (पॉवरफुल इंडस्ट्रियल बेल्ट) शहरात आणि तालुका पातळीवर मात्र अलिकडे निर्माण झालेल्या अशांततेच्या वातावरणामुळे छोट्यामोठ्या संघटना बांधून राहण्याची हे बिहारी बाबू दक्षता घेत आहेत आणि हिंदीशिवाय संवाद करीत नाहीत. (त्यासाठी नकळत वा छुप्या मार्गाने का होईना बिहार सरकारचादेखील पाठिंबा आहे). याला प्रत्युत्तर म्हणून लुधियानामधे शिखांच्या संघटनांनी आता हात सरसावले आहेत. (अर्थात ही परिस्थिती फक्त लुधियानामध्ये असल्याने पंजाबच्या अन्य जिल्ह्यात अजून परराज्यातील मायग्रंट्समध्ये भीतीसम वातावरण नाही.)

मात्र महाराष्ट्रातच हे बिहारी (संघटनेच्या जोरावर) उर्मटपणे 'हिंदी' भाषेतूनच आपले व्यवहार करीत असल्याचे दिसत असल्याने त्यावर 'मनसे' चे जे काही उपाय असतीत ते असो, पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निदान पहिली पायरी म्हणून का होईना मराठी लोकानीच रोजच्या व्यवहारात त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग आलाच तर जाणीवपूर्वक मराठीचाच पाठपुरावा करणे हा एक सरळमार्गी आणि प्रभावी उपाय होऊ शकेल.

इन्द्रा

सुहास..'s picture

22 Dec 2010 - 7:20 pm | सुहास..

महाराष्ट्रातच हे बिहारी (संघटनेच्या जोरावर) उर्मटपणे 'हिंदी' भाषेतूनच आपले व्यवहार करीत असल्याचे दिसत असल्याने त्यावर 'मनसे' चे जे काही उपाय असतीत ते असो, >>>

धन्यवाद !

विषय संपला !

कुत्सीत हास्य >> मागची पिढी << संपले.

पैसा's picture

22 Dec 2010 - 8:34 pm | पैसा

८/१० दिवसांपूर्वीची गोष्ट. मी चष्मा घ्यायला बँकेच्या खालीच भर पणजी बाजारात एका दुकानात गेले, आणि "मातसो चष्मो दाखय मरे" म्हणून दुकानदाराला सांगितले. पठ्ठ्या मला म्हणतो," वो सब मुझे आता नहीं"म्हणजे 'कोकणी' हा शब्द सुद्धा तोंडातून काढायची तयारी नाही. तुम्ही कुठले म्हणून विचारताच "बिहार से" म्हणून उत्तर आलं.

गोव्यातले लोक मराठी लोकांपेक्षा गरीब स्वभावाचे. त्यानी रस्त्यात दिसलेल्या कोणाही नवीन लोकांबरोबर निमूट राष्ट्रभाषेत बोलायला सुरुवात केलीय हल्ली!

चिंतामणी's picture

25 Dec 2010 - 12:04 am | चिंतामणी

शक्यता नाकारता येत नाही. (मी एव्हढेच लिहून थांबणार नाही.) हा कोकण रेल्वेचा एक तोटा आहे असे म्हणावेसे वाटते.

या कोकण रेल्वेच्या सर्व स्टेशनवर केटरींग कॉन्ट्राक्टर बिहारीच असतो आणि काम करणारे सुद्धा.

कोकण रेल्वेमुळे कोकण आणि गोवावासियांना प्रवास सोपा झाला एव्हढाच फायदा झाला असे नाईलाजाने म्हणावे लागेल.

प्रसन्न केसकर's picture

23 Dec 2010 - 3:47 pm | प्रसन्न केसकर

तुमचे सद्यपरिस्थितीचे वर्णन कदाचित बरोबर असेल. परंतु खलिस्तान चळवळ नक्की काय होती? तेव्हा पंजाब व्यतिरिक्त अन्य भारताबाबत शत्रुत्व नव्हते काय? नक्कीच होते. पंजाबमधील शीखांना हरयाणा, राजस्थान आणि त्याहीपेक्षा जास्त युपी, बिहार, बंगाल हे आपली लुबाडणुक करतात असेच वाटत होते. पंजाब चळवळीच्या सुरुवातीच्या काळात तरी शीखांवर भावनिक्-सांस्कृतीक-धार्मिक अतिक्रमण होते आहे, लुबाडणुक होते आहे ही भावना नक्कीच होती. जसजसा त्या चळवळीचा जोर ओसरला तसतशी ती भावना कमी होत गेली असेलही कदाचित.

दुसरे म्हणजे पंजाबमधे मराठी माणसांकडे पाहण्याच्या दृष्टीकोणाबाबतचा मुद्दा. मराठी माणसांकडे पंजाबी, काश्मिरी किंवा आसामी जनता शत्रुत्वाने पहात नाही हे खरेच आहे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे या राज्यांमधे फुटिरतावादी वृत्ती जोर धरत होती तेव्हा महाराष्ट्रातील (आणि केवळ महाराष्ट्रातील) लोकांनी त्यांच्याबरोबर समान पातळीवर भावनिक नाते स्थापन करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केले. तुम्ही आणि आम्ही एकाच देशाचे भाग आहोत, आपले प्रश्न समान आहेत. बिहार, बंगाल सारख्या राज्यांची परिस्थिती वेगळी असली तरीही ती या देशाचेच भाग आहेत आणि त्यामुळे आपण त्यांना समजावुन घेणे भाग आहे असा विचार या राज्यांत जाऊन तेव्हा केवळ मराठी माणसांनी दाखवला. याच संबंधांमुळे या राज्यांमधील माणसांचे महाराष्ट्राशी वेगळे भावनिक नाते आहे. दुर्दैवाने गेल्या दोन दशकात महाराष्ट्रातीलच परिस्थिती बदलत गेली आणि तेव्हा पंजाब, आसाममधील अनेक लोक करत तसा विचार मराठी माणसेही करु लागली.

तरीही महाराष्ट्रात पंजाब, हरयाणाबद्दल संताप नाही. पंजाबी, हरयाणवीबद्दल राग देखील नाही. इथे लोकांमधे संताप आहे तो केवळ युपी, बिहार आणि हिंदीबाबतच.

सुहास..'s picture

23 Dec 2010 - 3:56 pm | सुहास..

महाराष्ट्रात पंजाब, हरयाणाबद्दल संताप नाही. पंजाबी, हरयाणवीबद्दल राग देखील नाही. इथे लोकांमधे संताप आहे तो केवळ युपी, बिहार आणि हिंदीबाबतच. >>>

एकदम सहमत. उगाच नाशकात एकदम चार सिटं लागली ..पब्लीक कुठल्या बाजुला वळतय हे देखील समजत नाही काही लोकांना...

म्हणतात ना डोळे मिटुन...

इन्द्र्राज पवार's picture

23 Dec 2010 - 7:31 pm | इन्द्र्राज पवार

श्री.प्रसन्न जी...

थोडा सविस्तर खुलासा करणे क्रमप्राप्त आहे.

'खलिस्तान' चळवळीच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास एक गोष्ट प्रखरपणे समोर येते की, देशाच्या स्वातंत्र्याची पहाट अगदी दोन-तीन आठवड्यावर आली होती आणि ज्यावेळी सिरिल रॅडक्लिफ ब्रिटिश-इंडियातील अवाढव्य अशा पंजाबच्या फाळणीचा नकाशा तयार करण्यात मग्न होते; त्यावेळीही जवळपास सर्वच शीख आणि त्याप्रांतात बहुसंख्येने असणार्‍या हिंदुना (अखंड पंजाबात हिंदू टक्केवारीने जास्त होते) असे वाटत होते की 'लाहोर' सह एकच पंजाब तयार होईल....लाहोर हे त्या काळातही पूर्णपणे 'मुस्लिम डॉमिनेटिंग सिटी' नव्हते आणि आजही तिथे उर्दु आणि पंजाबी भाषा गुण्यागोविंदाने नांदतात. पण फाळणी झाली आणि पुढे हिंसेचे जे काही रामायण घडले तीत फटका बसला होता तो प्रामुख्याने शिखांना (या विषयात जास्त खोल जात नाही). त्यामुळे झाले असे की, अगदी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी असो वा अकाल तख्त, यांच्यात 'आता जो काही पंजाब राहिला आहे तो हिंदू आणि मुस्लिम यांच्याशिवाय टिकविला पाहिजे' हा विचार बळावला आणि अगदी 'भारतीय प्रजासत्ताक घटना समितीने' तयार केलेल्या पहिल्या खर्ड्यात शीख प्रतिनिधीने त्यावेळी (सन १९४९) लेखी स्वरूपात त्यातील तरतुदीविषयी समस्त शीख समुदायाच्यावतीने विरोध दाखल केला होता. घटनेच्या त्या खर्ड्यानुसार घटक राज्यातील शीख, जैन आणि बुद्ध धर्मीयांना 'हिंदू' असेच ओळखले जाईल अशी तरतुद होती. म्हणजे अल्पसंख्य जैन आणि बुद्धांना त्याबद्दल तक्रार नसली तरी शीख 'ते' लेबल मान्य करतील अशी परिस्थिती नव्हती आणि पुढे तर ज्यावेळी फाळणीनंतर अस्तित्वात आलेल्या पंजाबमधुन हिंदूंचे प्राबल्य असलेल्या जिल्ह्यांना वेगळे करून अनुक्रमे हरियाणा आणि हिमाचल प्रदेशाची निर्मिती झाली त्यावेळी तर राहिलेल्या 'पंजाब' चे स्वतंत्रच अस्तित्व का असू नये असे शिखांतील जहाल गटाला वाटू लागले आणि तिथून सुरू झाली ती 'खलिस्तान' चळवळ; जिला अकाली तख्ताचे आशीर्वाद होतेच पण अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये मोठ्या संख्येने स्थायिक झालेल्या धनवान शीखांचे आर्थिक पाठबळ लाभले; त्यासाठी वा त्या दरम्यान तिथे जाऊन जगजितसिंग चौहानाने केलेल्या प्रभावी भाषणबाजीचाही हातभार लाभला. अगदी 'खलिस्तान'चे स्वतंत्र चलन आणि झेंडादेखील तयार करण्यापर्यंत त्या चळवळीने मजल मारली होती....पुढे भिन्द्रनवाले यांचा उदय आणि अंत, रक्तरंजीत इतिहास, ऑपरेशन ब्ल्यू स्टार...इंदिराजींची हत्या....या ठळक घडामोडी तर सर्वांनाच माहिती आहेत. सांगायचा मुद्दा असा की, पंजाबचे 'त्या' अर्थाने भारतातील अन्य राज्यांशी शत्रुत्व नव्हते...(म्हणजे युपी, बिहार, बंगाल आदी राजे हे आपली लुबाडणूक करतात असे वाटणे). त्यांची - खलिस्तानची - चळवळ ही 'स्वतंत्र अस्तित्व' यासाठीच होती आणि या घडीला ती अत्यंत क्षीण जरी झाली असली तरी ती पूर्णपणे संपुष्टात आली आहे असे नवी दिल्लीदेखील मानत नाही.

पण एक आहे की कोणत्याही अनुकुल्/प्रतिकुल परिस्थितीत पंजाबने आपली 'कष्टकरी' ही प्रतिमा डागाळून घेतलेली नाही. अगदी भिन्द्रनवाले यांच्या 'टेरर' काळातदेखील पंजाबात उत्पादन झालेला गहू सार्‍या देशाला पुरत होता. तीच गोष्ट लुधियाना बेल्टची, जिथे तंत्रज्ञानाशी निगडीत व्यापारउदीम फोफावला आहे....आणि इथे मात्र बिहारी अन्य राज्यांतील नागरिकांपेक्षा मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. (त्यामुळे त्या जिल्ह्यात दोन गटात होऊ घातलेल्या झगड्याविषयी चर्चा झालेलीच आहे, त्याची द्विरूक्ती इथे करत नाही).

तुम्ही प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे 'मराठी' माणसाबद्दल तेथील हवेत भावनिक नाते आहेच आहे. महाराष्ट्रातून आलेली व्यक्ती ही त्याना 'आपली' का वाटते याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न मी गेल्या दोन वर्षातील तिथल्या भेटीदरम्यान घेतला असता असे आढळते की, एकतर 'शिवाजी' हे नाव पंजाबला अगदी देवासम वाटते (एक गंमतीची गोष्ट सांगतो : गुरुदासपूरमध्ये तर महाराजांची दाढी आणि जिरेटोप यांचे पंजाब्यांना आदरमिश्रीत कौतुक वाटते, इतके की त्या पेहरावामुळे ते त्याना आपल्यातीलच एक वाटतात, इतकेच नव्हे तर महाराजांप्रमाणे आताचा मराठा समाज दाढी का राखत नाही याचेही कुतहूल वाटतेच)....कारण अर्थातच शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला दिलेली यशस्वी टक्कर, शिवाय मुघलांचा खर्‍या अर्थाने अखेरचा सम्राट 'औरंगजेबा' चा मृत्यु झाला तो त्याच्या दख्खन स्वारीत, महाराष्ट्रातच. सैन्यातही शीख आणि मराठा रेजिमेंटस यांनी लढवय्ये म्हणूनच ओळखले जात असल्याने आर्मीत दोन्ही जमाती अगदी बंधूसम वागताना दिसतात. या बाबी पंजाबच्या इतिहासाला आवर्जुन नोंदाव्याशा वाटल्या आहेत. शिवाय फाळणीनंतर "मुंबई" ने शीखांना जी जवळीक दिली (जो आजही आहे) त्याचाही कुठे ना कुठे तरी संबंध आहे. त्यामुळेच असेल कदाचित मला (एक मराठा या नात्याने) त्या भागात कधीही परके वाटलेले नाही, किंबहुना तेथील स्थानिकांनी तसे कधीही जाणवूनही दिलेले नाही.

इन्द्रा

मी जे लिहिले होते ते ८०च्या दशकात मी जे अनुभवले, पाहिले आणि त्यानंतरही माझे शीख समाजाशी जे संबंध राहिले त्यावर आधारित होते. पाकिस्तान निर्मिती, पंजाबची फाळणी आणि भारतातील खलिस्तान चळवळीचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. (कॅनडामधे तसा तो लावला गेला पण तो फक्त अनेक युद्धे केलेल्या पाकिस्तानशी हातमिळवणी करण्याचे समर्थन होते.) हा इतिहास भिंद्रावाले यांनी कधीही सांगीतलेला नाही किंवा त्यांच्या आधिच्या निहंग नेत्यांनीही सांगीतलेला नाही. हरयाणाचा संदर्भ होता तो अबोहर-फाजिल्का, चंदीगढ पुरताच. तेथेही स्वातंत्योत्तर भारतातील आर्थिक विषमता हाच भाग मोठ्या प्रमाणात होता.
सैन्याबाबत व अन्य दलांबाबत बोलायचे तर तेथे असंतोष होताच आणि ऑपरेशन ब्ल्यु स्टार नंतर तो अधिकच वाढला. याचे अनेक दाखले आहेत. ते देण्यासाठी ही योग्य जागा आहे असे मला वाटत नाही.
सिव्हिलियन्समधे सध्या जी शीख-मराठी जवळिक दिसते ती ८० च्या दशकात महाराष्ट्राने घेतलेल्या पुढाकारामुळेच. आणि या जवळिकीबाबत सर्वाधिक समानत्व दिसते ते संत नामदेवांमुळे आणि गुरु गोविंदसिंहांमुळे.

इन्द्र्राज पवार's picture

24 Dec 2010 - 5:53 pm | इन्द्र्राज पवार

".....ते देण्यासाठी ही योग्य जागा आहे असे मला वाटत नाही....."

~ त्या दाखल्यांच्या निमित्ताने खूप चांगली चर्चा करता आली असती त्या विषयावर....पण तुम्ही म्हणता तसे "ही योग्य जागा आहे..." असे मलाही वाटत नाही. [सध्याच्या मिपावरील हवेत तर ते शक्यच नाही.]

थॅन्क्स

इन्द्रा

प्रसन्न केसकर's picture

24 Dec 2010 - 7:54 pm | प्रसन्न केसकर

धन्यवाद!

धमाल मुलगा's picture

22 Dec 2010 - 6:19 pm | धमाल मुलगा

:)

पंजाबात असाल तर ऊसतोडणी कामगार आणि अचानक वाढलेले गुन्हे ह्या दोन गोष्टींबद्दल अंमळ चौकशी करा. :)

असो.
आणि भौ, ते 'श्री.धमु' वगैरे नेऊन घाल तिच्यायला बारा गडगड्याच्या विहिरीत्त! च्यायला, झिरमिळ्यांची पगडी घालुन करवतकाठी उपरण्याच्या घड्यांशी खेळत उगाच शब्द चावत वाद घालायला उपक्रमावर जाऊन बसल्यागत वाटतं राव. :)

इन्द्र्राज पवार's picture

22 Dec 2010 - 7:50 pm | इन्द्र्राज पवार

क्रमांक १ ~ नक्कीच शोध घेतो....पण तरीही मी तिथे व्यवसायासाठी ये-जा करतो म्हणजे पूर्ण पंजाब प्रांतात माझी भटकंती असते असा अर्थ होत नाही. दोन जिल्ह्यात असतो, त्याशिवाय रोहटक या हरियाणाच्या आणखीन एका शहरात. तरीही विदा मिळविण्यास काही अडचण येईल असे वाटत नाही....मित्रपरिवार भरपूर आहे त्या भागात.

क्रमांक २ ~ च्यामारी....ही बारा गडगड्याची विहीर (आणि हाळभावी) आमचे प्रिय लेखक जी.ए.कुलकर्णी यांची कॉपीराईट मालमत्ता असताना तुम्ही कशी काय वापरू शकता????

बाकी "झिरमिळ्यांची पगडी घालुन करवतकाठी उपरण्याच्या घड्यांशी"....वाचून अंमळ मोहन आगाशे आठवले...!!

इन्द्रा

बीहारींबद्दल तिकडे ही अवस्था आहे
http://www.bihartodayonline.com/2007/11/punjab-now-land-of-bihari-sardar...
आणि ही देखील आहे
http://www.ambedkar.org/News/hl/Biharigirls.htm

सर्वात महत्वाचे म्हणजे बीहारी लोकांच्या पंजाबमध्ये येण्याबद्दल पंजाबमध्ये असंतोषच आहे
http://www.sikhsiyasat.net/2009/12/06/bihar-asked-punjab-to-explain-the-...
त्या बातमीतला हा मजकूर काय सांगतो
It is notable that the Bihari migrating labour created much disturbance in Ludhiana and burned several vehicles and robbed the general public.

आणि हा
The intentions of the Indian state are clear now. They want to uproot Sikhs from Punjab and in-root Biharis here.” said Bhai Harpal Singh Cheema, a Sikh leader. “It is strange that Bihar Government is demanding security for those who created panic in the city without any reason” said a local resident. “The situation was such that locals felt insecure” he added while explaining the situation created by Biharis in the industrial city of the state.

एकूण काय एक बिहारी सौ बीमारी
आम्ही फक्त हरी हरी हरी हरी

विनायक प्रभू's picture

22 Dec 2010 - 5:43 pm | विनायक प्रभू

विजुभौ चे कान फार लांब आहेत असे वाटते.

मेघवेडा's picture

22 Dec 2010 - 6:02 pm | मेघवेडा

आपल्या सिद्धांताचा व्यत्यास खरा असू शकतो असं वाटतं गुर्जी!

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 6:03 pm | आजानुकर्ण

विजुभौ

एकंदर चर्चा वाचून चतुःसूत्री खालीलप्रमाणे आहे असे मला वाटते.

१. मराठी भाषेतील लेखनाबाबत शुद्धलेखन-प्रमाणलेखन यांचे नियम मानणे वेडगळपणाचे आहे. ती जशी लिहीता किंवा बोलता येईल तशी वाकवली पाहिजे व जगवली पाहिजे.
२. मात्र त्याचबरोबर मराठी भाषेची शुचिता सांभाळली गेली पाहिजे (!) व परकीय ( विशेषतः हिंदी) शब्दांपासून तिला वाचवणे आवश्यक आहे.
३. मराठी भाषा व संस्कृतीला रसातळाला नेण्यात महाराष्ट्रातील व पंजाबातील बिहारी लोकांचा महत्त्वाचा हात आहे.
४. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीत बोलतात व महाराष्ट्रातील सामान्य जनता आपल्या मुलाबाळांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालते याला उत्तरभारतीय जबाबदार आहेत.

मराठी भाषेत याआधीच असलेले पोर्तुगीज, फारसी व इतरभाषिक शब्दांबाबत आपले मत जाणून घ्यायला आवडेल.

विजुभाऊ's picture

22 Dec 2010 - 6:04 pm | विजुभाऊ

विजुभौ चे कान फार लांब आहेत असे वाटते.

थोडे फार असतीलही पण अजूनतरी माझे कान गुढग्यापर्यन्त लांब झालेले नाहीत.

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 6:06 pm | आजानुकर्ण

तीव्र निषेध

सन्जोप राव's picture

22 Dec 2010 - 6:50 pm | सन्जोप राव

माझे कान अद्याप गुडघ्याइतके लांब झाले नाहीत, पक्षी माझा अद्याप आजानुकर्ण झालेला नाही, पक्षी माझी वाढ / उत्क्रांती अद्याप पूर्ण झालेली नाही.
वस्तुस्थिती आहे आक, तुम्ही कशाला रागावता?

विनायक प्रभू's picture

22 Dec 2010 - 6:22 pm | विनायक प्रभू

तुमचा प्रतिसाद क्रिप्टीक वाटला.
काय कल्ले नाही.

अविनाशकुलकर्णी's picture

22 Dec 2010 - 10:18 pm | अविनाशकुलकर्णी

चिन नाय कुनाचा..डाल..भात लोनचा

पूर्वी स्वत: लिहिलेल्या लेखांचे संपादन स्वतः करण्याची सोय होती. ती असती तर ही चर्चा अशी फरफटली न जाता मूळ विषयाशी प्रामाणिक राहिली असती. तरी नीलकांत वगैरे संचालकांना नम्र विनंती कीं ही सोय पुनश्च लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. आज संपादकवर्गाला विनंती करावी लागते व त्यांच्या कामात उगीचच वाढ होते व त्यामुळे त्यांनी जे काम करायला हवे ते राहून जाते.

दोनदा दिसल्याने काढून टाकला आहे.

धनंजय's picture

22 Dec 2010 - 10:41 pm | धनंजय

चीनमध्ये अनेक भाषा आहेत.

बातमीमधली भाषा कुठली? चीनची राष्ट्रभाषा "प्हूथोंगहुआ" (त्याला "मंत्री"/"मांदारीन" असे इंग्रजी नाव आहे) ती भाषा असावी. म्हणजे भारताने सर्वत्र हिंदी भाषेबद्दल कायदा केले तर जसे होईल तसे. राष्ट्रभाषेची सक्ती करणार्‍या चीनची अभिनंदने कशाला करता - त्यांच्यासारखे आपण व्हावे म्हणून? म्हणजे त्यांच्यासारखी एक राष्ट्रभाषा ठरवून तिची सक्ती सर्वत्र करावी म्हणून?

सध्या जितकी मराठी चालते तेसुद्धा सलते की काय या "चीनसारखे-वागू"वाद्यांना? का असे म्हणायचे आहे, की महाराष्ट्र भारतातून फोडा, आणि त्या फुटीर "राष्ट्रा"ची मराठी भाषा आहे, तिने चीनचे अनुकरण करावे? असल्या फुटीरवादाला महाराष्ट्रात सध्या तरी खूप विरोध होईल, आणि माझ्याकडून तर विरोध होईलच.

- - -

मराठीच्या उत्कर्षासाठी खूप विधायक कार्यक्रम आपण हाती घेऊ शकतो. त्या सगळ्या कार्यक्रमांपैकी हा चीनचा कार्यक्रम मुळीच नको.

(मात्र भारतातच जेथवर हिंदी बोलली जाते, त्या ठिकाणी हिंदीच्या उत्कर्षासाठी हा "चीनसारखा" कार्यक्रम राबवला तर काहीच हरकत नाही.)

- - -

(विजूभाऊंना मराठी सलते, असे मला मुळीच वाटत नाही. पण बातमीतली चिनी भाषा म्हणजे त्यांच्या देशातली हिंदीसदृश भाषा आहे, त्यांची मराठीसदृश भाषा नाही, याबद्दल त्यांचे क्षणिक दुर्लक्ष झाले असेल. या बातमीला त्यांनी कृती-मार्गदर्शक मानू नये. त्याआधी मराठीच्या उत्कर्षासाठी त्यांचे जे काय प्रयत्न होते, ते पूर्ववत चालू ठेवावे. अशी विनंती.)

आजानुकर्ण's picture

23 Dec 2010 - 4:17 pm | आजानुकर्ण

या बातमीला त्यांनी कृती-मार्गदर्शक मानू नये. त्याआधी मराठीच्या उत्कर्षासाठी त्यांचे जे काय प्रयत्न होते, ते पूर्ववत चालू ठेवावे. अशी विनंती.

धनंजय यांच्या प्रतिसादाशी सहमत असलो तरी वरील मुद्द्याशी असहमत आहे. विजुभौंच्या प्रयत्नामुळे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते.

सुप्परमॅन's picture

23 Dec 2010 - 4:44 pm | सुप्परमॅन

विजुभौंच्या प्रयत्नामुळे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते.

सहमत.

लेखातले पोटफोडे ष पाहता नरसिंहावतार धारण करून लेखकाला आडवा मांडीवर घेण्याचा मोह झाला.

धमाल मुलगा's picture

23 Dec 2010 - 4:47 pm | धमाल मुलगा

भावनावेग आवरा काकूऽऽ...
हे असं होणं योग्य नाही.

सुप्परमॅन's picture

23 Dec 2010 - 4:50 pm | सुप्परमॅन

हे असं होणं योग्य नाही

का गं तै?

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 7:44 pm | नरेशकुमार

सुप्परमॅन के भेस मे काकू, (हमारि जेल मे सुरंग)
शक्यता नाकारता येत नाय.

जय हो सुप्परकाकु

विजुभाऊ's picture

23 Dec 2010 - 10:30 am | विजुभाऊ

मला एवढेच म्हणायचे आहे की चिनी लोक त्यांच्या भाषेबद्दल जागृत आहेत. त्यांचे कौतूक होते.
आपण मराठी लोक मात्र आपल्या भाषेबद्दल एवढे जागृत नसतो. बिहारी हिन्दी वगैरे मुद्दे ...ते लोक त्यांची भाशा आपल्यावर लादतात आणि आपण ते सोशीकपणे स्वीकारतो. मी बंगळूरात अस्खलीत कन्नड बोलनारा बिहारी पानवाला पाहिला. तो केवळ दोन वर्षेच तिथे होता. महाराष्ट्रात राहून बिहारी लोक त्यांच्या भाषेचा आग्रह सोडत नाहीत. वर उर्मटपणे तुम्हीच हिन्दी बोला असा आग्रह धरतात. अशिक्षीत सोडा पण शिकलेले लोक सुद्धा तसाच आग्रह धरतात. पाच मराठी अस्तील आणि एक हिन्दी भाषीक असेल तर तो म्हणतो तुम्ही सारे माझ्याशी हिन्दीत बोला..... आपण त्याच्या सोयीसाठी समजा इंग्रजीत बोललो तर तो मात्र हिन्दी ची कास सोडत नाही.
आपण मराठी लोक असा आपल्या भाशेचा आग्रह का चालवत नाही. असा माझा प्रश्न आहे. आहे.
बाकी श्री श्री श्री अजानुकर्णजी यांच्या
२. मात्र त्याचबरोबर मराठी भाषेची शुचिता सांभाळली गेली पाहिजे (!) व परकीय ( विशेषतः हिंदी) शब्दांपासून तिला वाचवणे आवश्यक आहे.
३. मराठी भाषा व संस्कृतीला रसातळाला नेण्यात महाराष्ट्रातील व पंजाबातील बिहारी लोकांचा महत्त्वाचा हात आहे.


या शोधाबद्दल त्याना खास कोणतेतरी जागतीक पारितोषीक दिले पाहिजे. मी शक्यतो वैयक्तीक लिहीत नाही.
पण ओढून ताणून त्यानी जे मुद्दे जुळवले आहेत त्याबद्दल त्यांच्या बुद्धीमत्तेची वाखणणी करावी तेवढी थोडीच आहे.
पंजाबातील उदाहरण कोणीतरी पंजाबात बिहारींचा प्रॉब्लेम नाही का ? या साठी उत्तर म्हणून दिला.
मराठीवर हिन्दी भाषा आक्रमण करीत आहे याला कारण हिन्दी भाषीकांचा हिन्दीच रेटून नेण्याचा अट्टाहास आणि मराठी भाषीकांची मातृभाषेबद्दलची अनासक्ती.
या चीन सरकारने जे केले ते मराठी लोकानी का करू नये?

आजानुकर्ण's picture

23 Dec 2010 - 10:52 am | आजानुकर्ण

मी शोध लावलेला नाही. चर्चेत जी विविध मते वारंवार आली त्यावरून चार निष्कर्ष मी काढले. ते निष्कर्ष तुम्ही खोडलेले नाहीत. मराठीतील फारसी, पोर्तुगीज वगैरे शब्दांबाबत तुम्ही मत सांगितले नाही. या कोणत्याही मुद्द्यांचे खंडन न करता 'मी वैयक्तिक बोलत नाही' म्हणत हळूच वैयक्तिक बोललात :-)

'मी वैयक्तिक बोलत नाही' म्हणत हळूच वैयक्तिक बोललात

अजानुकर्णजी आपण पुन्हा एकदा माझ्य अवाक्यातील सोयीस्कर शब्द घेतलेत
मी लिहीले होते.
मी शक्यतो वैयक्तीक लिहीत नाही.
शक्यतो हा शब्द तुम्ही सोयीस्करपणे गाळलात.
मराठी भाषेत इतर भाषांमधून बरेच शब्द आले आहेत. तसे ते प्रत्येक भाषेत असतात.
फारसी कन्नड गुजराती अशा बर्‍याच भाषांमधून मराठीत खूप शब्द आले आहेत.ते तसे आले तर भाषा समृद्ध होते.
काही शब्दाना मराठीत शब्दच नाहीत. ते शब्द ज्या वातावरणातील आहेत त्या प्रदेशातील भाषेतून ते शब्द आपल्या भाषेत येतील
माझा आक्षेप आहे तो हिन्दी लोकांच्या "माझी भाषा हिन्दी आहे...म्हणून तू देखील हिन्दीतच बोलले पाहिजे. तू या अरेरावीचा"
तुम्ही मांडलेले मुद्दे हे
शुद्धलेखन : मुद्दा या चर्चेत गैरलागू आहे
मुद्दा क्र २ : वरती स्पष्टीकरण दिले आहे
मुद्द क्र ३: पंजाबातील बिहारीलोकांचा या इथे काय संबन्ध
मुद्दा क्र ४ : महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री हिन्दीत बोलतात याला माझा आक्षेप नाही. आक्षेप आहे तो हिन्दी चॅनेलवाले लोक माजुर्डेपणाने मुख्यमन्त्र्याना सुद्धा हिन्दीत बोला असे ऐकवू लागले आहेत.

असो. मुद्दे भरकटवून टाकायची ही कला वाखाणण्याजोगीच.

आजानुकर्ण's picture

23 Dec 2010 - 1:29 pm | आजानुकर्ण

विजुभाऊ तुमचा मूळ चर्चाप्रस्ताव वाचून माझा समज असा झाला की मराठीत भेसळ करणारे हिंदी शब्द हा तुमचा प्रॉब्लेम आहे. पण आता तुम्ही म्हणता आहात की महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम आहे. नक्की प्रॉब्लेम काय आहे हे निश्चित झाले नाही तर सोल्युशन कसे सापडणार.

बाय द वे, तुम्हाला हिंदीच्या भेसळीचा इतका तिटकारा असूनही 'जी' हे नखशिखान्त हिंदी संबोधन तुम्ही माझ्यासाठी का वापरत आहात. राव, पंत, साहेब वगैरे मराठी संबोधने आहेत ना. तसेही मराठीत काहीही संबोधन वापरले नाही तरी बिघडत नाही.

विजुभाऊ's picture

23 Dec 2010 - 4:02 pm | विजुभाऊ

महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम आहे
पुन्हा गल्लत करताय
महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम नाही तर महाराष्ट्रात राहूनही मराठी न बोलणारे आणि मराठी लोकांवर हिन्दी लादणारे लोक तसेच ही मुस्कटदाबी न जाणवून घेणारे मराठी लोक हा मुद्दा आहे.
हिंदीच्या भेसळीचा इतका तिटकारा असूनही 'जी' हे नखशिखान्त हिंदी संबोधन तुम्ही माझ्यासाठी का वापरत आहात.
मी हिन्दीचा /भेसळीचा तिटकारा आहे असे कधीच म्हंटले नाही. मराठीत अनेक भाषातील शब्द आहेत. तुमच्या नावापुढे "जी" लावले याचे कारण " जी" शब्दाव्वर हिन्दीची मक्तेदारे नाही. तानाजी .बाजी येसाजी असे अनेक "जी" इथे होऊन गेलेत. अर्थात तुमच्या एकुण्च प्रतिसादांवरून महान असलेल्या तुम्हाला " जी" असे संबोधावे असे वाटले.
( एखाद्याला " फार शहाणा आहेस" असे म्हंणतोना तसेच हे काहीसे )

आजानुकर्ण's picture

23 Dec 2010 - 4:14 pm | आजानुकर्ण

महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम नाही तर महाराष्ट्रात राहूनही मराठी न बोलणारे आणि मराठी लोकांवर हिन्दी लादणारे लोक तसेच ही मुस्कटदाबी न जाणवून घेणारे मराठी लोक हा मुद्दा आहे.

मूळ मुद्दा मराठी भाषेतील भेसळीचा आहे की मराठी लोकांवर हिंदी लादण्याचा हे आधी फैनल करा बुवा. मुस्कटदाबी न जाणवून घेण्याचा प्रॉब्लेम मराठी लोकांचाच आहे त्यासाठी बिहारी लोक कसे काय जबाबदार धरले तुम्ही?

मी हिन्दीचा /भेसळीचा तिटकारा आहे असे कधीच म्हंटले नाही

मग चीन सरकारने त्यांच्या भाषेत भेसळ बंद करण्याचा आदेश दिला आहे हा मुद्दा चर्चेला घेण्याचे कारणच नव्हते ना.

तानाजी .बाजी येसाजी असे अनेक "जी" इथे होऊन गेलेत.

या नावांमधील जी हा प्रत्यय नावाचाच भाग असून तो आदरदर्शक म्हणून आलेला नाही. (बाजी चे पाळण्यातील नाव बा असून पुढे त्याचा बाजी झाला असे तुम्हाला म्हणायचे आहे की काय?)

अर्थात तुमच्या एकुण्च प्रतिसादांवरून महान असलेल्या तुम्हाला " जी" असे संबोधावे असे वाटले.

थ्यांक्यू. पण मला मराठी प्रत्यय लावलेले आवडतील.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 11:04 am | llपुण्याचे पेशवेll

या नावांमधील जी हा प्रत्यय नावाचाच भाग असून तो आदरदर्शक म्हणून आलेला नाही. (बाजी चे पाळण्यातील नाव बा असून पुढे त्याचा बाजी झाला असे तुम्हाला म्हणायचे आहे की काय?)

नाही पण तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असा शिवाजीमहाराजांनी केल्याचे अनेक शाहीरांच्या तोंडी ऐकले आहेत. बाळ किंवा बाळ नावाच्या व्यक्तिंचे पुढे बाळाजी झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 3:52 pm | आजानुकर्ण

नाही पण तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असा शिवाजीमहाराजांनी केल्याचे अनेक शाहीरांच्या तोंडी ऐकले आहेत. बाळ किंवा बाळ नावाच्या व्यक्तिंचे पुढे बाळाजी झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.

बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांचे उदाहरण घेतले तरी त्यांचे बाळपणातील नाव बाळ होते असे कुठे वाचले नाही. (तसे पुरावे दिल्यास हे मान्य करता येईल) टिळकांचे बाळ हे नाव पुढे बाळाजी झाले नाही. सिनीयर ठाकरे हे बाळासाहेब म्हणून ओळखले जातात बाळाजी म्हणून नाही. बाळाचे बाळाजी झाल्याची उदाहरणे द्यावीत.

शिवाजी तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असे करत असल्याचे कुठे वाचायला मिळेल? की ही सांगोवांगीची माहिती आहे?

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 4:29 pm | llपुण्याचे पेशवेll

बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांचे उदाहरण घेतले तरी त्यांचे बाळपणातील नाव बाळ होते असे कुठे वाचले नाही.
पडळकर कुलवृत्तांत मिळाला बाजारात तर त्यामधे आताच्या पडळकरांच्या १७पिढ्या आधीचा मनुष्य पडळकरांच्या वंशाचा मूळ पुरुष मानला जातो. त्यांचे नाव बाळा(प्रभू) अथवा बाळाजी असे लिहीलेले सापडेल.

टिळकांचे बाळ हे नाव पुढे बाळाजी झाले नाही. सिनीयर ठाकरे हे बाळासाहेब म्हणून ओळखले जातात बाळाजी म्हणून नाही. बाळाचे बाळाजी झाल्याची उदाहरणे द्यावीत.

टिळकांच्या जमान्यात जी लावायची पद्धत कमी झाली होती असे दिसते. किंवा फार कमी प्रमाणात अस्तित्वात होती. तेव्हा आडनावांना महत्व प्राप्त झाले होते. आणि साहेब किंवा राव असे प्रत्यय (विभक्ती नव्हे आदरार्थी) जोडणे चालू झाले होते.

शिवाजी तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असे करत असल्याचे कुठे वाचायला मिळेल? की ही सांगोवांगीची माहिती आहे?

जुने पोवाडे काढून वाचलेत तर त्यात सापडेल.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 8:43 pm | आजानुकर्ण

जुने पोवाडे काढून वाचलेत तर त्यात सापडेल.

जुने पोवाडे कुठे वाचायला मिळतील? एखाद्या पुस्तकाचे नेमके नाव सांगितले तर ते पाहता येईल.

या निमित्ताने अनेकांशी चर्चा घडली.
काही विचारवन्ताना मराठी भाषेचे काहीही झाले तर आपल्याला काहीच फरक पडणार नाही हे जाणवले.
अवांतरः विचारवन्त हा नक्की कोणाच्या डोक्याने विचार करतो?
अती अवांतरः विचारवन्ताची लक्षणे ही स्थितप्रज्ञाच्या लक्षणाप्रमाणेच असतात का? तज्ञानी मार्गदर्शन करावे

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 10:19 am | आजानुकर्ण

विजुभाऊ,

अशुद्धलेखनाने मराठी भाषेचे नुकसान होत नाही तर परभाषेतून मराठीत आयात होणाऱ्या शब्दांमुळे मराठीचे नुकसान होते या तुमच्या सिद्धांताला कोणताही भाषाशास्त्रीय आधार नाही.

अवांतरः

वीरेन शाह वगैरे शाह मंडळी मराठी पाट्यांच्या विरोधात आहेत याबाबत तुमचे मत तुम्ही सांगितले नाही. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 11:07 am | llपुण्याचे पेशवेll

अशुद्धलेखनाने मराठी भाषेचे नुकसान होत नाही तर परभाषेतून मराठीत आयात होणाऱ्या शब्दांमुळे मराठीचे नुकसान होते या तुमच्या सिद्धांताला कोणताही भाषाशास्त्रीय आधार नाही.

भाषा ही भाषाशास्त्राच्या नियमानुसार चालते, वाढते, बहरते का?

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 11:54 am | आजानुकर्ण

भाषा ही भाषाशास्त्राच्या नियमानुसार चालत, वाढत किंवा बहरत नाही. भाषाशास्त्राचे नियम या चालण्या, वाढण्या किंवा बहरण्याचे वर्णन करतात. भाषाशास्त्राच्या सिद्धांतानुसार भाषेच्या चालण्या, वाढण्या किंवा बहरण्याला अशुद्धलेखनामुळे खीळ बसू शकते. त्याचबरोबर परभाषेतून मराठीत आयात होणारे शब्द बंद केल्यास भाषेचे डबके होऊन भाषेच्या चालण्या, वाढण्या व बहरण्यावर मर्यादा येऊ शकते.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 12:03 pm | llपुण्याचे पेशवेll

भाषाशास्त्राच्या सिद्धांतानुसार भाषेच्या चालण्या, वाढण्या किंवा बहरण्याला अशुद्धलेखनामुळे खीळ बसू शकते. त्याचबरोबर परभाषेतून मराठीत आयात होणारे शब्द बंद केल्यास भाषेचे डबके होऊन भाषेच्या चालण्या, वाढण्या व बहरण्यावर मर्यादा येऊ शकते.

आमच्या अल्पबुद्धीनुसार शब्द हे न वापरल्यामुळे भाषाबाह्य होतात. मूळ मराठी भाषेतले शब्द अन्य भाषेतील आक्रमित शब्दांमुळे भाषाबाह्य होत असतील तर ते मूळ आग्रहाने वापरल्याने टिकून राहतात. राहीला शब्द परभाषेतून मराठीत शब्द घेण्याचा तर ज्या गोष्टींसाठी शब्द नाहीत त्यासाठी शब्द घेणे ठीक पण ज्यासाठी शब्द अस्तित्वात आहेत त्यासाठी परभाषेतला शब्द वापरणे ही लाचारी किंवा आळस कींवा दोन्हीही.

वेताळ's picture

24 Dec 2010 - 11:45 am | वेताळ

माया व इंका संस्कृतीत झाला होता. त्यामुळे त्या लयाला गेल्या. आजकाल त्याबद्दल कोणताच लेखी पुरावा नाही.

अवलिया's picture

24 Dec 2010 - 11:46 am | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

वेताळ's picture

24 Dec 2010 - 12:00 pm | वेताळ

तिथे भाषेचे डबके झाले. कालांतराने ते डबके आटले व त्याचा र्‍हास झाला.

मराठीत परभाषीक शब्द येण्यावर कुणाचेच आक्षेप नाहीत. इंग्रजी भाषेत इतर भाषेतले शब्द आले म्हणून तीचा इतका विस्तार झाला. आक्षेप आहेत ते इतरानी माजुर्डेपणाने इथल्या भाषेला नाकारून त्यांची भाषा इथल्या समाजावर लादण्याबद्दल.
रेल्वे रूळा साठी तुमच्या भाषेत शब्द नसेल तर जो अन्य भाषेत आहे तो च शब्द वापरला जातोय ना.

विजुभाऊ's picture

24 Dec 2010 - 5:00 pm | विजुभाऊ

धाग्यावरील शतकोत्तरी प्रतिसादांबद्दल सर्व प्रतिसाददात्यांचे आभारी.
हा धागा वाचनमात्र करावा अशी संपादकांस विनन्ती

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 8:40 pm | नरेशकुमार

मीपाल धोका, देशाला धोका, मरठिला धोका, शिवाजिला धोका, दादोजिला धोका, कळयान्ना धोका, फळान्ना धोका, लोकांना धोका,
धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका,