आमच्या इमारती च्या चौथ्या मजल्यावर एक मोठे मधमाश्यांचे पोळे आहे . सदरचे पोळे काढण्यासाठी माणूस मिळत नाही . पुणे शहरात कोणी असे काम करणारी एजन्सी कोणाला माहित असेल तर कृपया त्यांची माहिती द्यावी , हि विनंती !
ओके. बर पण उत्तर देण्याआधी मला काही शंका आहेत, धागाप्रवर्तक त्याचे निरसन करतील असे वाटते
आमच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक मोठे मधमाश्यांचे पोळे आहे .
सदर इमारत ही आमची म्हणजे स्वतःची, की वडीलोपार्जित की कंपनीची की भाड्याची की अजुन कशी?
चौथा मजला हा तळमजला शून्य धरुन की एक धरुन ?
प्रत्येक मजल्याची उंची किती?
पोळे मजल्याच्या वर आहे की त्या मजल्यावर बाहेरच्या बाजुने आहे की आतुन आहे?
पोळे मधमाशीचे आहे की गांधीलमाशीचे आहे की अजुन काही आहे?
मोठे म्हणजे नक्की किती मोठे?
पोळ्याचा सरासरी आकार किती असतो?
त्यापेक्षा किती मोठे छोटे?
पोळ्यापाशी जाणे या दृष्टीने कोणती साधने उपलब्ध आहेत?
धागाप्रवर्तकांकडुन असे सहाय्य मिळेल की बाहेरुन आणावे लागेल?
सदरचे पोळे काढण्यासाठी माणूस मिळत नाही .
पोळे काढणारा माणुस अशी पाटी असलेली दुकाने तपासली का?
स्वतः काढण्याचा प्रयत्न केला का?
पुणे शहरात कोणी असे काम करणारी एजन्सी कोणाला माहित असेल तर कृपया त्यांची माहिती द्यावी , हि विनंती !
अशा प्रकारच्या एजन्सीजची चौकशी यलो पेजेस मधुन केली का?
आजुबाजुला कुणाला विचारले का?
यापुर्वी त्याठिकाणी पोळे होते का?
तेव्हा ते कसे काढले होते?
एकुणात मला असे वाटते आहे की अवलियाला जोडीला घेऊन स्वतः ते पोळे ( मधमाश्यांचे - आमच्या सोसायटीच्या इमारतील चौथ्या मजल्यावर (तळमजला शून्य धरून ) अंदाजे ३० फूट उंचीवर मजल्याच्या बाहेरील बाजूस असणारे ) काढण्यास ह्या विकांताचा मुहूर्त बघ्यास हरकत नाही !
जमा होणाऱ्या मधाचे पऱ्या, अवलिया आणि धुमकेतू असे तीन हिस्से करण्यात येतील !
पोळ्याचे की करावे ह्याचा विचार चालू आहे !
Paste Control वाले हे काम करतात.
तुम्ही विचारून पहा तुमच्या ओळ्खीच्या Paste Control वाल्यांना.
आमच्या बाल्कनीमध्ये १/२ दा झाले होते पोळे. आमच्या नेहमीच्या Paste Control वाल्यांनी ते काढले होते.
माझ्याकडे आत्ता फोन नंबर नाहिये. सोमवारी देऊ शकेन. मला वाटते साधारण ५००/६०० रु घेतात. नक्की किती घेतले ते आठवत नाहि.
मधमाशांचे पोळे मिपावर लावायचे. फक्त योग्य त्या आयडीच्या नावाने लावायचे. (योग्य कोण ते विचारू नका! ती माहिती इथे खूप जण देतील)
लावल्यावर अर्ध्या दिवसात उडेल ह्याची गॅरंटी! नामोनिशान तक नही रहेंगा!
पण धूमकेतू, खरोखरच मदत हवी असेल तर पुण्यात मॉडेल कॉलनी मध्ये युनिव्हर्सिटी रोड वर (पोलिस परेड मैदानालगत) असलेल्या सी बी आर आय (Central Bee Research and Training Institute) इथे चौकशी करा, माहिती आणि मदत नक्की मिळेल.
प्रथम ज्या ब्लॉकच्या खिडकीच्या जवळ ते पोळे आहे त्या ब्लॉकमधे जा. एका काठीला फडकी गुंडाळून ती रॉकेलमधे भिजवा. आजुबाजुच्या लोकांना खिडक्या लावून घ्यायला सांगा. स्वतः , पुण्यातल्या मुली स्कूटरवर बसताना जशी तोंडावर फडकी गुंडाळतात तशी गुंडाळून घ्या. काठीचे रॉकेलमधे भिजलेले टोक पेटवा आणि पोळ्याच्या खाली धरा. सर्व माशा पळून जातील. त्यानंतर पोळे ढोसून पाडा. पोळ्याच्या जागी कीटकनाशक लावा म्हणजे परत तिथे पोळे होणार नाही.
हा उपाय अनुभवसिध्द आहे.
प्रतिक्रिया
24 Dec 2010 - 2:15 pm | परिकथेतील राजकुमार
मधाचे काय करणार आहात ?
गांव बसा नही लुटेरे हाजिर ;)
24 Dec 2010 - 2:23 pm | अवलिया
उरलेल्या पोळ्याचे काय करणार आहात?
24 Dec 2010 - 2:28 pm | परिकथेतील राजकुमार
अवलियाजीसाहेब श्री......
धाग्याचा खफ करण्यापेक्षा तुमचे विचार मांडावेत अशी अपेक्षा आहे.
कुठेतरी सीरीयस होऊन प्रतिसाद द्यावे ही विनन्ती.
पराभाऊ
24 Dec 2010 - 2:51 pm | अवलिया
ओके. बर पण उत्तर देण्याआधी मला काही शंका आहेत, धागाप्रवर्तक त्याचे निरसन करतील असे वाटते
आमच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक मोठे मधमाश्यांचे पोळे आहे .
सदर इमारत ही आमची म्हणजे स्वतःची, की वडीलोपार्जित की कंपनीची की भाड्याची की अजुन कशी?
चौथा मजला हा तळमजला शून्य धरुन की एक धरुन ?
प्रत्येक मजल्याची उंची किती?
पोळे मजल्याच्या वर आहे की त्या मजल्यावर बाहेरच्या बाजुने आहे की आतुन आहे?
पोळे मधमाशीचे आहे की गांधीलमाशीचे आहे की अजुन काही आहे?
मोठे म्हणजे नक्की किती मोठे?
पोळ्याचा सरासरी आकार किती असतो?
त्यापेक्षा किती मोठे छोटे?
पोळ्यापाशी जाणे या दृष्टीने कोणती साधने उपलब्ध आहेत?
धागाप्रवर्तकांकडुन असे सहाय्य मिळेल की बाहेरुन आणावे लागेल?
सदरचे पोळे काढण्यासाठी माणूस मिळत नाही .
पोळे काढणारा माणुस अशी पाटी असलेली दुकाने तपासली का?
स्वतः काढण्याचा प्रयत्न केला का?
पुणे शहरात कोणी असे काम करणारी एजन्सी कोणाला माहित असेल तर कृपया त्यांची माहिती द्यावी , हि विनंती !
अशा प्रकारच्या एजन्सीजची चौकशी यलो पेजेस मधुन केली का?
आजुबाजुला कुणाला विचारले का?
यापुर्वी त्याठिकाणी पोळे होते का?
तेव्हा ते कसे काढले होते?
धन्यवाद !!!!
24 Dec 2010 - 2:54 pm | धुमकेतू
मिपा परिवारामधील जो कोणी अश्या एजन्सी ची माहिती सांगेल त्या सदस्याला एक बाटली मध देण्यात येईल :)
आणि उरलेल्या पोळ्याचे काय करता येईल ह्याबद्दल प्रतिक्रिया कळवा !
24 Dec 2010 - 3:07 pm | धुमकेतू
एकुणात मला असे वाटते आहे की अवलियाला जोडीला घेऊन स्वतः ते पोळे ( मधमाश्यांचे - आमच्या सोसायटीच्या इमारतील चौथ्या मजल्यावर (तळमजला शून्य धरून ) अंदाजे ३० फूट उंचीवर मजल्याच्या बाहेरील बाजूस असणारे ) काढण्यास ह्या विकांताचा मुहूर्त बघ्यास हरकत नाही !
जमा होणाऱ्या मधाचे पऱ्या, अवलिया आणि धुमकेतू असे तीन हिस्से करण्यात येतील !
पोळ्याचे की करावे ह्याचा विचार चालू आहे !
24 Dec 2010 - 3:02 pm | Pearl
Paste Control वाले हे काम करतात.
तुम्ही विचारून पहा तुमच्या ओळ्खीच्या Paste Control वाल्यांना.
आमच्या बाल्कनीमध्ये १/२ दा झाले होते पोळे. आमच्या नेहमीच्या Paste Control वाल्यांनी ते काढले होते.
माझ्याकडे आत्ता फोन नंबर नाहिये. सोमवारी देऊ शकेन. मला वाटते साधारण ५००/६०० रु घेतात. नक्की किती घेतले ते आठवत नाहि.
24 Dec 2010 - 3:10 pm | धुमकेतू
धन्यवाद Pearl ,
कृपया सोमवारी मला त्यांचा फोन नंबर ध्या !
(आणि तुमचा पत्ता पण :), मधाची एक बाटली पाठवीन म्हणतो :)
27 Dec 2010 - 12:29 pm | Pearl
pest control चा फोन नंबर आपणास व्यं. नि. ने कळवला आहे.
24 Dec 2010 - 3:26 pm | परिकथेतील राजकुमार
५००/६०० रुपये ??
बाप रे !!
त्यापेक्षा आमच्या घाशाला १ क्वार्टर पाजा तो ५ मिनिटात काढून देईल.
24 Dec 2010 - 5:01 pm | धुमकेतू
एक आपली शंका,
क्वार्टर कशाची ?
अ) देशी
ब) विदेशी
क) मधाची
द) आणि दुसऱ्या कशाची !
शंकेखोर-केतू
24 Dec 2010 - 5:07 pm | परिकथेतील राजकुमार
ते आम्हाला काय इचारते ? घाशालाच इचारना.
25 Dec 2010 - 5:20 am | मराठे
Paste नाय हो! pest control !!!
24 Dec 2010 - 3:15 pm | Pearl
धुमकेतू ,
नाहितर अस करू. आधी तुम्ही मला तुमचा पत्ता द्या.
बाटल्या मी पाठवते. त्या तुम्ही भरून पाठवा ;-)
24 Dec 2010 - 3:21 pm | धुमकेतू
ह्या शक्यतेचा विचार करायला हरकत नाही .......
टारुकेतू
24 Dec 2010 - 3:47 pm | यकु
धाडस करायची तयारी असेल तर मोहोळ कसं हुलवायचं त्याची कृती देऊ शकतो.
24 Dec 2010 - 3:53 pm | स्पा
धाडस करायची तयारी असेल तर मोहोळ कसं हुलवायचं त्याची कृती देऊ शकतो
बघा धुमकेतू राव
५००/६०० पण वाचतील आणि अख्खा मध एकट्याने चाटू शकाल.....
- साडेसातु
24 Dec 2010 - 4:08 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
मधुकेतु
24 Dec 2010 - 5:07 pm | धुमकेतू
एकट्याने मध चाखण्याची कल्पना चांगली आहे पण मधमाश्या मला मध चाख्ण्याच्या अवस्थेत ठेवतील का याची थोडी भीती वाटते !!!!
एकट्याने मध चाखण्यासाठी भलते धाडस केलेले अंगाशी येऊ शकेल !!!!!
मध-केतू
24 Dec 2010 - 5:14 pm | ए.चंद्रशेखर
एखादे अस्वल पाळा . अडचण सुटू शकेल.
24 Dec 2010 - 5:32 pm | धुमकेतू
अस्वल पाळण्याची कल्पना चांगली आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो ठराव नाकारला जाण्यची शक्यता नाकरता येत नाही ......
जंगलीकेतू
24 Dec 2010 - 5:20 pm | अरुण मनोहर
मधमाशांचे पोळे मिपावर लावायचे. फक्त योग्य त्या आयडीच्या नावाने लावायचे. (योग्य कोण ते विचारू नका! ती माहिती इथे खूप जण देतील)
लावल्यावर अर्ध्या दिवसात उडेल ह्याची गॅरंटी! नामोनिशान तक नही रहेंगा!
24 Dec 2010 - 5:39 pm | परिकथेतील राजकुमार
ओह्ह !
मी चुकुन योग्य त्या अवलियाच्या नावाने लावायचे असे वाचले.
24 Dec 2010 - 7:56 pm | बहुगुणी
पण धूमकेतू, खरोखरच मदत हवी असेल तर पुण्यात मॉडेल कॉलनी मध्ये युनिव्हर्सिटी रोड वर (पोलिस परेड मैदानालगत) असलेल्या सी बी आर आय (Central Bee Research and Training Institute) इथे चौकशी करा, माहिती आणि मदत नक्की मिळेल.
११५३ गणेशखिंड रोड, दूरध्वनी क्र. २५६५५३५१, २५६७५८६५
(मध कुठे पाठवायचा त्याचा पत्ता व्य नि ने कळवेनच ;-))
24 Dec 2010 - 8:06 pm | तिमा
प्रथम ज्या ब्लॉकच्या खिडकीच्या जवळ ते पोळे आहे त्या ब्लॉकमधे जा. एका काठीला फडकी गुंडाळून ती रॉकेलमधे भिजवा. आजुबाजुच्या लोकांना खिडक्या लावून घ्यायला सांगा. स्वतः , पुण्यातल्या मुली स्कूटरवर बसताना जशी तोंडावर फडकी गुंडाळतात तशी गुंडाळून घ्या. काठीचे रॉकेलमधे भिजलेले टोक पेटवा आणि पोळ्याच्या खाली धरा. सर्व माशा पळून जातील. त्यानंतर पोळे ढोसून पाडा. पोळ्याच्या जागी कीटकनाशक लावा म्हणजे परत तिथे पोळे होणार नाही.
हा उपाय अनुभवसिध्द आहे.
25 Dec 2010 - 9:04 am | टारझन
झबरदस्त लेखण !! अश्या तुफान लेखांना प्रोत्साहन मिळण्यासाठी राजाश्रय मिळावा असे मी प्राडॉ. प्रोत्साहन मंडळातर्फे सुचित करु इच्छितो.
25 Dec 2010 - 9:05 am | अवलिया
सहमती देतो
25 Dec 2010 - 11:41 am | आशिष सुर्वे
इथे संपर्क करा:
http://pcilindia.com/home.asp
http://www.indiamart.com/ipm/pest-control-services.html
http://pune.justdial.com/honey-comb-removal_Pune.html
अवांतरः
रजनीकांत ला पाचारण करा..
असे म्हणतात तो मधमाश्यांना असे गुंगवतो की मधमाश्या आपणहून बाटलीत मध भरून आणून देतात!!
27 Dec 2010 - 12:38 pm | दिपक
सभांळून!! हल्ली मधमाश्या बेल पण वाजवतात म्हणे! :-)
27 Dec 2010 - 4:09 pm | जागु
फायर ब्रिगेड वाल्यांना सांगा.