अणु युध्द आणि भारत : कधी आणि का ?

वडिल's picture
वडिल in काथ्याकूट
23 Dec 2010 - 12:04 pm
गाभा: 

अणुयुध्दा बद्दल चर्चा जरी भयावह वाटली तरी ते एक सत्य आहे आणि नाकारता येणार नाहि.
अणुयुध्द होणार आणि भारतीय भुखंडात ते भोगावे लागणार हे जवळ जवळ सत्य आहे. प्रश्व येवढाच आहे कि ते कधी आणि कसे ?
भारताने किती हि शांती चा पुरस्कार करत अणुकार्यक्रम कार्यरत ठेवला तरी एके दिवशी सत्या ला समोरे जात...जे गरजेचे आहे ते करावे लागेल. अणुशस्त्रां मधे जेवढी गुंतवणुक होते आहे कि एके दिवशी ह्या गुंतवणुकीच्या रीटर्नस साठी तरी अणुयुध्द्द गरजेचे होइल.
अणुभट्ट्या जरी उर्जे साठि वापरल्या तरी त्या अत्यंत धोकादायक असतात. फ्रांस आणि उत्तर अमेरीकेत अणुउर्जे च्या प्रकल्पां च्या सुरक्षे चा खर्च लक्षणिय आहे. हा खर्च गरीब देशांना झेपणारा नाहि.. त्यांना अजुन गरीब करण्याचे हे एक साधन आहे ( कारस्थान !!!)
असा अनुमान आहे कि अणुयुध्द्दा ची सुरवात हि महासत्तां कडुन न होता.. एखाद्या गरीब राष्ट्रा कडुन होइल..
उदा..( उ कोरीया, पाकिस्तान, भारत, अफ्रिकेतील एखादा देश, इस्लामिक मिडल इस्ट )

प्रगत राष्ट्रे ह्या सर्व हालचालीं वर बारीक लक्ष ठेवुन आहेत. जर युध्द झाले तर त्याची झळ आपल्या प्रदेशा पर्यंत पोचु नये म्हणुन अमेरीका भरपुर गुंतवणुक करत आहे. शिवाय स्वत:च्या बाजार पेठा सुरक्षित ठेवण्या चा आटोकाट प्रयत्न करत आहे.
इस्लामी आतंकवादाचा विमोड करणे व भारत आणि चीन ची प्रगती खुंटवत ठेवण्या साठि अशा युध्दाचा वापर होण्याची शक्यता आहे.
जर असे युध्द भारतीय भुखंडात झाले तर ते महाशक्तिंच्या फायद्याचे ठरु शकते.. २०१२ च्या आसपास असे झाले तर जागतिक अर्थव्यवस्थे ची सुंठी वाचुन सर्दि जाइल !!

प्रतिक्रिया

अवलिया's picture

23 Dec 2010 - 12:09 pm | अवलिया

अरे बापरे! अमेरिकेतच जावे म्हणतो... आमचे एक आजोबा आहेत तिथे... येवु का आजोबा ?

अगदि .. अगदि...
सगळे म्हणुन तर अमेरीके कडे धाव घेत आहेत !!
आपल्या देशात स्वाभिमानाने काहि काळ जगण्या पेक्षा अनादि काला पर्यंत अमेरीकेत गुलामगीरी करणे हेच बरे ! कसे ?

अवलिया's picture

23 Dec 2010 - 12:17 pm | अवलिया

अनादी की अनंत?

बहुतेक अनादिच ... अनंत काहि सोप नसतं !!

अवलिया's picture

23 Dec 2010 - 12:19 pm | अवलिया

अनादी म्हणजे काय?

पिवळा डांबिस's picture

23 Dec 2010 - 12:24 pm | पिवळा डांबिस

आता त्यांना नाही माहिती!! असं उगाच कुणाला छळू नये, छळलिया!
आणि ये, उदईक येणार ते आजच येणे! दारू-बिडी महझूद आहे!!!!
:)

अवलिया's picture

23 Dec 2010 - 12:25 pm | अवलिया

हांग आश्शी ! च्यामारी इथं फुकाट मेलो तर तुमच्याशी भांडणार कोण ? ऑ !
निदान भांडायला तरी दोस्त असावे असं म्हणतात ;)

शक्यता नाकारता येत नाही.

- पणतु

भाऊ पाटील's picture

23 Dec 2010 - 1:03 pm | भाऊ पाटील

शमत हाये.

- खापरपणतु

पिवळा डांबिस's picture

23 Dec 2010 - 12:35 pm | पिवळा डांबिस

तर तुमच्याशी भांडणार कोण ?
आरं तिच्या! आमची म्हणजे पेल्यातली (ग्लासातली?) वादळं! रात्री वाद घालणार आणि सकाळ झाल्यावर विसरून जाणार!!!
तेढ लक्षात ठेवण्याइतके आम्ही प्रगल्भ (विचारवंत?) नाही हो!!!
:)
पण अणुयुद्ध तर होणार आणि मग तुमची वाट आहे!!!
आम्हाला अणुयुद्धाची भीती नाही कारण आम्ही रहातो तिथे दोन-दोन अणुबॉम्ब सवे घेउन फिरणार्‍या क्षेपणास्त्रांचा सुळसुळाट आहे!!! त्यामुळे भीती मेलीय!!!
:)

जे तुम्हाला हवं ते घ्या.. गोड मानुन

विजुभाऊ's picture

23 Dec 2010 - 1:05 pm | विजुभाऊ

कान्द्याचे चढे भाव.. ९/११ च्या मागील गुपिते.. जागतीक अर्थव्यस्था....इस्लामी दहशतवादी.... अणू यूद्ध. व भारत.. यूरोपीयन राष्ट्रांची बाजारपेठ नीति
धागालेखकाची जब्बरदस्त रेन्ज आहे.
त्याना गरीबांचे "सुधीर गाडगीळ "पुरस्कार देवू यात. असा प्रस्ताव मांडतो. अनुमोदन द्या

पिवळा डांबिस's picture

23 Dec 2010 - 1:16 pm | पिवळा डांबिस

त्यापेक्षा त्यांना 'गरिबांचे सुधीर काळे' असा पुरस्कार द्यावा असा प्रस्ताव मांडतो, अनुमोदन द्या...

अनुमोदन नाकारण्याची शक्यता नाकारता येत नाहि.

- डांबिल

भाऊ पाटील's picture

23 Dec 2010 - 4:11 pm | भाऊ पाटील

तुमची सर्व क्षेत्रातील विद्वत्ता, ज्ञान, भविष्य वर्तवता येईल इतपत दूरदृष्टि, कुठल्याही विषयात लिलया संचार आणि अभ्यासू मते पाहता, मिपावर एक 'बाप'माणूस आला आहे ह्याची खात्री पटली.
_/\_ तुम्हाला (अगदी कोपरापासुन)

- सावत्र भाऊ

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार

धागा रतिब युध्द आणि मिपा :)

बाकी चालु द्या..

जरा नेमकी तारीख वगैरे कळेल का ? २०१२ हे फारच मोघम झालंय.
त्याचं म्हणजे असं आहे की ही पापड करायचे , पापड करायचे म्हणून मागं लागली आहे .
असं नको व्हायला की गच्चीवर पापड वाळत घातले आणि वरनं अणुबॉम्ब पडला त्यावर.

बहुधा २१ डिसेंबर २०१२ असावी. मायन कॅलेंडर तीच तारिख सांगत आहे

चैत्रात पापड होऊन जातील.. थोडे वडे आणि पापड्या पण करायला सांगा.. वड्याची आमटी लै झाक लागते... साबुदाण्याच्या पापड्या.. क्या कहने !

वडिल's picture

23 Dec 2010 - 12:39 pm | वडिल

अवलियाजी बरी आठवण करुन दिलीत... मायन कॅलेन्डर च्या कॉन्स्पिरसी वर एखादि लेख मालिका लिहिण्याचा मानस आहेच...
(टारु बाळाचा बाप)

कर्त काहीच नाही, तूमचा पूढला लेख यिस्तवर अणूबाँम्ब पडायचा मिपा वर.

अवलिया's picture

23 Dec 2010 - 2:08 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

पापड करायची तसदि नका घेवु.. आयतेच आणा..

अडगळ's picture

23 Dec 2010 - 12:35 pm | अडगळ

घ्या. तरीच म्हटलं .
अणुयुद्धाची भिती दाखवून तयार पापड विकण्याचे हे कारस्थान आहे तर .

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 12:36 pm | परिकथेतील राजकुमार

कोण लिज्जत का लिज्जत ?

नगरीनिरंजन's picture

23 Dec 2010 - 12:40 pm | नगरीनिरंजन

किंवा नवीन ब्रँड असेल - हुज्जत.

पिवळा डांबिस's picture

23 Dec 2010 - 12:38 pm | पिवळा डांबिस

म्हणजे "वडील" हा मंगेश पापडगांवकरांचा आयडी आहे का?
:)

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 12:41 pm | परिकथेतील राजकुमार

मग आता हे 'अणुयुद्धात मेले अनेक उंदिर' अशी कविता लिहिणार का ?

अडगळ's picture

23 Dec 2010 - 12:45 pm | अडगळ

पण ' मिपात मेले ओल्या उंदीर ' हे कसं वाटतंय ?

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार

पण शेवटी कविच ना? ;) साला आपल्याला कवितेतले काय कळत नाही तर कविंमधले कधी कळणार ?

'मिपात मेले..' पण भारी आहे हान. जोडीला 'धाग्यात मेले...' असे एक विडंबन पण येउ द्या.

विजुभाऊ's picture

23 Dec 2010 - 12:54 pm | विजुभाऊ

पण ' मिपात मेले ओल्या उंदीर ' हे कसं वाटतंय ?

त्या पेक्षा
" मिपात मेले प्याले उंदीर" हे कसे वाटतय
( इथे मेले हा शब्द क्रीयापद नसुन नाम विषेशण आहे. "मेले "हा शब्द "शिंचे" या शब्दाच्या जातीतील आहे )

पिवळा डांबिस's picture

23 Dec 2010 - 12:45 pm | पिवळा डांबिस

ओ राजकुमार,
ते मेले उंदीर वाले (मला वाटतं)मर्ढेकर हो!!
हे पापडगावकर..
हे "बॉम्बच्या उत्सर्गाने भरला, गगनाचा गाभारा" लिहिणार!!!!
:)

नगरीनिरंजन's picture

23 Dec 2010 - 12:47 pm | नगरीनिरंजन

किंवा मग
"बॉम्बगोळा म्हणजे बॉम्बगोळा असतो
तुमचा आमचा सगळ्यांचा चोळामोळा असतो."

आत्मशून्य's picture

23 Dec 2010 - 3:50 pm | आत्मशून्य

.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 12:49 pm | परिकथेतील राजकुमार

"बॉम्बच्या उत्सर्गाने भरला, गगनाचा गाभारा"

=)) =))

माफी माफी पिडा काका. आमचे कवि आणि कवितांचे ज्ञान शून्य आहे हो.

शक्यता नाकारता येणार नाही !

- सावत्र वडिल

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 12:34 pm | परिकथेतील राजकुमार

ए टार्‍या काय करतोयस रे ?

ऋषिकेश's picture

23 Dec 2010 - 12:41 pm | ऋषिकेश

>>अणुयुध्द होणार आणि भारतीय भुखंडात ते भोगावे लागणार हे जवळ जवळ सत्य आहे.
खरं की काय!?? बरं बरं चालु दे :) ;)

क्लिंटन's picture

23 Dec 2010 - 12:43 pm | क्लिंटन

प्रगत राष्ट्रे ह्या सर्व हालचालीं वर बारीक लक्ष ठेवुन आहेत. जर युध्द झाले तर त्याची झळ आपल्या प्रदेशा पर्यंत पोचु नये म्हणुन अमेरीका भरपुर गुंतवणुक करत आहे. शिवाय स्वत:च्या बाजार पेठा सुरक्षित ठेवण्या चा आटोकाट प्रयत्न करत आहे.

यात आपल्याला काहीच विसंगती वाटत नाही का?समजा अणुयुध्द झालेच तर भारताचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल आणि भारतात गरीबी प्रचंड प्रमाणावर वाढेल.आज भारतातील मध्यमवर्गीयांची संख्या पूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.युरोपातील देश आणि अमेरिकेने जो अर्थव्यवस्थेत सावळा गोंधळ घातला आहे त्यांना त्यामुळे भारतातील ग्राहक हा एक मोठा त्राता आहे.तीच बाजारपेठ अणुयुध्दामुळे मुळात उखडली गेली तर त्यात आपल्याबरोबरच युरोप आणि अमेरिकेचेही नुकसान होणार आहे.मग आपल्या बाजारपेठा अमेरिका-युरोपातील देश सुरक्षित ठेवतात म्हणजे नक्की कुठल्या बाजारपेठा तुम्हाला अभिप्रेत आहेत?

पिवळा डांबिस's picture

23 Dec 2010 - 12:53 pm | पिवळा डांबिस

ए तुला काय अभ्यास, केसपेपर वगैरे काही नाही का रे!
मोठ्या लोकांत बोलू नये उगीच!!!
परीक्षा आहे ना उद्या!!! चल लाग बघू अभ्यासाला!!!
:)

वडिल's picture

23 Dec 2010 - 12:54 pm | वडिल

यु हॅव अ पॉइन्ट मि क्लिन्टन..
अभिनंदन...

पण जर इस्लामिक मिलिटंट लोकांना अमेरीकेची बाजारपेठ नष्ट करायची असेल तर ते पहिला अणुबॉम्ब भारतावरच टाकतील. नाहि का ?
म्हणजे काहि झाल तरी भारतावर अणु बॉम्ब पडणारच !!

पिवळा डांबिस's picture

23 Dec 2010 - 1:00 pm | पिवळा डांबिस

अहो, तो असले नसते पॉईंटस काढतो म्हणून तर त्याला अभ्यासाला बसवला होता!!!!
त्याला काय आज ओळखतोय आम्ही!!!
:)

शक्यता नाकारता येत नाही.

- वकिल

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 3:25 pm | नरेशकुमार

Clinton have point, & 'Mr. wadil' you have the line, plane, circle, solid.square............

गांधीवादी's picture

23 Dec 2010 - 12:44 pm | गांधीवादी

अणुयुध्द होणार आणि भारतीय भुखंडात ते भोगावे लागणार हे जवळ जवळ सत्य आहे.

म्हणजे पुण्यात नाही ना, ब्बास. चला सुटलो

पुण्यावर अणुबॉम्ब पडण्याची शक्यता तशी कमीच आहे.

टारझन's picture

23 Dec 2010 - 1:10 pm | टारझन

शक्यता नाकारता येत नाही.

- पडिल

गांधीवादी's picture

23 Dec 2010 - 12:47 pm | गांधीवादी

काही हिंदू दहशतवादी, स्वामींना न जुमानता, गणपतीच्या अंगावरचे स्वेटर घालून, अनु बॉम्ब टाकतील अशी शक्यता असू शकते..

शक्यता नाकारता येत नाही.

- मावस भाऊ

गांधीवादी's picture

23 Dec 2010 - 1:19 pm | गांधीवादी

शनिवार वाड्यावर बॉम्ब पडेल का हो ?

मावस भावाचा काका.

शक्यता नाकारता येत नाही.

- गांधिल

गांधीवादी's picture

23 Dec 2010 - 1:21 pm | गांधीवादी

गांधील माशी.
कुठेही चावते नाही का ?

शक्यता नाकारता येत नाहि.

-वादिल

गांधीवादी's picture

23 Dec 2010 - 1:36 pm | गांधीवादी

हसून हसून मेलो.

मीच गांधीवादी

अवलिया's picture

23 Dec 2010 - 3:19 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

सविता's picture

23 Dec 2010 - 10:54 pm | सविता

टेप अडकली काय?

-गारझन

चिरोटा's picture

23 Dec 2010 - 12:56 pm | चिरोटा

समजा अणुयुध्द झालेच तर भारताचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल आणि भारतात गरीबी प्रचंड प्रमाणावर वाढेल

(जर उत्तम दर्जाचा बाँब पाक्/चीनने टाकला तर!)अणुयुद्धात प्रचंड प्रमाणावर मनुष्यहानी होईल्. नेहमीप्रमाणे मरणार्‍यांत गरीबांची संख्या जास्त असेल त्यामुळे गरीबी कमी व्हायची शक्यता नाकारता येत नाही!!!.
बाँब पडल्यावर भविष्यकाळात भारतातून सोनी,होंडा,टोयोटासारखे ब्रँड तयार व्हायची शक्यता किती वाटते?

वडिल's picture

23 Dec 2010 - 1:00 pm | वडिल

काहिहि अशक्य नाहि ...

:)
(टारुबाळाचा बाप)

टारझन's picture

23 Dec 2010 - 1:08 pm | टारझन

(टारुबाळाचा बाप)

जानी .. जिनको खुद का बाप पता नही होता .. वो दुसरो के बाप नही बना करते. :)

( वडिलांचा बाप) खोडील

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 3:22 pm | नरेशकुमार

जानी .. जिनको खुद का बाप पता नही होता ..
कस काय शक्य आहे. बाप असेल पन महित नसेल असे काय तरि असु शकते. शक्यता आहे.

वो दुसरो के बाप नही बना करते.
आता दुस्रे अगोदरच अस्ताना त्यान्चे बाप कसे बनता येइल ? कितिहि प्रयत्न केला तरि शक्य नाहि.

टारु हलक घे रे, जिव नको घेउ.

आत्मशून्य's picture

23 Dec 2010 - 3:47 pm | आत्मशून्य

शक्यता नाकारता येत नाही!!!.

म्हणजे अस हाय की समजा

टारूला वाटलं
तूम्हाला बी पटलं
आन म्हून दत्तक घेउन टाकलं

झाला की नाय दूसरोंके बाप ?

असा अनुमान आहे कि अणुयुध्द्दा ची सुरवात हि महासत्तां कडुन न होता.. एखाद्या गरीब राष्ट्रा कडुन होइल..
उदा..( उ कोरीया, पाकिस्तान, भारत, अफ्रिकेतील एखादा देश, इस्लामिक मिडल इस्ट )

यात अजून काही नावे अ‍ॅड करावी लागतील.
उदा माल्टा , सुरीनाम , नोउरु , मॉनॅको , तुवालु ,मार्शल आयलन्ड्स ,सेन्ट किट्स & नेव्हीस , सान मारिओ , लिचेन्स्टाईन ,अन्डोरा , बार्बाडोस ,पालाऊ ,ग्रेनडा या देशांचा समावेश करावा लागेल


.. २०१२ च्या आसपास असे झाले तर जागतिक अर्थव्यवस्थे ची सुंठी वाचुन सर्दि जाइल !!

जागतीक अर्थव्यवस्थेला नक्की कोणती सर्दी आहे आणि तिला कोणत्या सुंठी ची गरज आहे?
बाय द वे " सुंठे वाचून खोकला गेला" अशी म्हण आहे. सर्दी कुठून आणलीत

प्रसाद_डी's picture

23 Dec 2010 - 1:57 pm | प्रसाद_डी

>>>>(टारुबाळाचा बाप)

>>>>जानी .. जिनको खुद का बाप पता नही होता .. वो दुसरो के बाप नही बना करते.

>>>>( वडिलांचा बाप) खोडील

दुसर्‍याच (बाप-लेक /लेक-बाप (कोण कोणाचा कोण ) ''शु**' णुयुध्द्दा ची सुरवात व्हायची शक्यता नाकारता येत नाही !

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 3:17 pm | नरेशकुमार

>>>>जानी .. जिनको खुद का बाप पता नही होता .. वो दुसरो के बाप नही बना करते.

नाही रागाउ नगस पन कसं काय रं , एखाद्याला बाप अस्न्याचा आनि त्यानि बाप बनन्याचा काय संबंध ?
आता मी उदाहरण देउ शकतो.

ते हलक का म्हनत्यात ते घे रे बाबा. म्या आप्ला एक डाउट इचारला.

अवलिया's picture

23 Dec 2010 - 2:36 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 3:13 pm | नरेशकुमार

२०१४ ला ब्लॅकहोल येउन पडनार आहे.

अवलिया's picture

23 Dec 2010 - 3:18 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 3:14 pm | नरेशकुमार

आईला एवढा दन्गा झाला, आन आमि हपिसात मारत बस्लो होतो राव.

अवलिया's picture

23 Dec 2010 - 3:19 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

>>> प्रगत राष्ट्रे ह्या सर्व हालचालीं वर बारीक लक्ष ठेवुन आहेत. जर युध्द झाले तर त्याची झळ आपल्या प्रदेशा पर्यंत पोचु नये म्हणुन अमेरीका भरपुर गुंतवणुक करत आहे

फक्त प्रगत राष्ट्रेच ह्या सर्व हालचालींवर का लक्ष ठेवुन असु शकतात .. भारता सारखे राष्ट्र पण नक्कीच अनुयुद्ध आपल्या भुमीत होउ नये म्हणुन प्रयत्नशील असेलच ना ..

आणि भारत -चीन अशी मुख्य बाजारपेठ तर आहेच पण कुशल कामगार .. आउट्सोर्सिंग चे मुख्य कामगार मिळत असतानाच यांना उद्ध्वस्थ करण्यासाठी अमेरीका सारखे देश नक्कीच मुर्ख नाहियेत असे वाटते ..

स्वताचा माल विकावा म्हणुन ते या देशात बर्याच गोष्टींना पाठपुरवठा करत असतील ही पण ह्यांनी अनुयुद्ध करावे आणि आपली जास्त शस्त्रास्त्रे विकली जावीत येव्हडी नीच आणि चुकीची गोष्ट ते कदापी करणार नाहित असेच वाटते ..

तसे असते तर त्यांनी स्वताहुन इराक आणि अफगाणिस्थान मध्ये ही युद्ध केले नसते ...
आपल्या दवाखाण्यात रोगी वाढावेत म्हणुन कोणी पुर्ण शहरात रोगराई पसरवण्याचे प्रकार करते हे जसे हाश्यास्पद आहे तसेच हे वाटते ..

जागतीक अर्थव्यवस्था ही युद्ध (अमेरीका आणि प्रगत राश्ट्रे सोडुन दुसरीकदे )झाल्यावर सुधारणार असे कोणाचे मत आहे ?
नक्कीच अर्थव्यवस्थेला खिळ बसेन .. उलट भारत - चीन सारख्या देशात युद्ध झाल्यास .. या हक्काच्या बाजारपेठामुळे मिळणार्या उत्पनात घट ही होयीलच ..
आणि येव्हदे कळत असताना .. भारत -चीन सारखे देश काय आपली भुमी युद्धासाठीच वापरु म्हणुन तयार बसले असतील काय ?

अनुयुद्ध भारतात आणि चीन मध्ये होणारच नाही असे मला वाटते ..
आणि जरी पाकिस्थान ने युद्धाचा प्रयत्न केला तरी तो मागिल लढाया प्रमाने असेल अनुयुद्ध नसेल ते .. अआणि जरी शक्यता धरली चुकुन त्यांनी तशी पावले उचलली तरी ते ही येव्हडे हुशार नक्की असतील की भारत ही अनुउर्जा असलेला देश आहे त्याने युदधात त्याचा वापर केला तर खुप कमी वेळात पाकिस्थान जगाच्या नकाशातुन उठलेला ही दिसु शकते ...

------

अनुयुद्ध होणार नाही .. अर्थव्यवस्था सुधारण्याच्या सकारात्मक कामामध्ये जुंपल्यास नकारात्मक पद्धतीने अर्थव्यव्स्था सुधारणेची गरज भासणार नाही .. आणि हे सगळे ही जाणुन असतीलच असे वाटते

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 6:25 pm | नरेशकुमार

दन्गा घालुन घालुन सगळे दमुन घरि गेलेले दिसतायेत.

याचि, शक्यता आहे हे मला माहित आहे.

शक्यता नाकारता येत नाहि.

- नरिल

स्मिता.'s picture

25 Dec 2010 - 11:18 am | स्मिता.

ए टार्‍या, बास ना आता...
एकादाचं नाकारून टाक त्या शक्यतेला!!

शक्यता नाकारता येत नाहि.

- स्मितिल

तुम्ही त्याना का छळताय. किती सुंदर माहिती ते देता आहेत अन काही अल्पसंतृष्ट लोक त्याना खिंडीत पकडत आहेत. ओ कुणाचे का असेनात वडील , तुम्ही लिहा हो.......

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 7:26 pm | नरेशकुमार

वडिल वडिलकीच्या नात्याने माहिती देत असताना
याचि शक्यता आहे.

किती सुंदर माहिती ते देता आहेत अन काही अल्पसंतृष्ट लोक त्याना खिंडीत पकडत आहेत.
शक्यता नाकारता येत नाही

ओ कुणाचे का असेनात वडील
याचि शक्यता मी व्यक्तीगत नाकारत नाही,

तिमा's picture

23 Dec 2010 - 9:58 pm | तिमा

तुम्ही डेंकालीच्या जंगलात पाऊल टाकल्यापासून हे बांदर दंगा करत होते. पण आता खुद्द वेताळाने तुम्हाला कवटीगुहेत येण्याचे आमंत्रण दिले आहे. तेंव्हा निश्चिंत होऊन तुमचे सर्वस्पर्शी लेखन चालू ठेवा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Dec 2010 - 10:22 pm | निनाद मुक्काम प...

माह्या राखीव कुरणात अनिर्बंध प्रवेश करून माझ्या हून जास्त प्रतिक्रिया जमविणाऱ्या वडीलधार्या मंडळीचा त्रिवार निषेध

नितिन थत्ते's picture

23 Dec 2010 - 10:22 pm | नितिन थत्ते

काय गडबड चाललीय रे? झोपू द्या की जरा.

हां !!! ते अणुयुद्ध सुरू झालं की मला उठवा बरं का? (कानात बोळे घालायला हवेत ना!!!)

विजुभाऊ's picture

23 Dec 2010 - 10:51 pm | विजुभाऊ

हां !!! ते अणुयुद्ध सुरू झालं की मला उठवा बरं का? (कानात बोळे घालायला हवेत ना!!!)


झोपायच्या अगोदर कानात बोळे घालून झोपु नका बर का. हाका ऐकु यायच्या नाहीत

सविता's picture

23 Dec 2010 - 10:58 pm | सविता

शक्यता नाकारता येत नाही

-छळलिया

पैसा's picture

23 Dec 2010 - 11:05 pm | पैसा

एकदम सह्ही...

-विरजण-

अविनाशकुलकर्णी's picture

24 Dec 2010 - 12:14 am | अविनाशकुलकर्णी

आपला राखि सावंत हा बॉंब सा~या जगाला पुरुन उरेल..नुसत्या किरणोत्सर्गामुळे जग खाक होईल.

अवलिया's picture

24 Dec 2010 - 8:53 am | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

विजुभाऊ's picture

24 Dec 2010 - 10:13 am | विजुभाऊ

राखी सावन्त विचारवन्त आहे

शक्यता नाकारता येत नाहि

- विजुल

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 11:03 am | नरेशकुमार

चुक

राखी सावन्त विचारवन्त सुद्धा आहे.

अवलिया's picture

24 Dec 2010 - 11:04 am | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.