नुकतेच एका पीराच्या दर्शनाला जाण्याचा योग आला. बाहेर पाटी होती "स्त्रियांनी पीराला हात लावु नये. डोक्यावर टोपी घालुन किंवा रुमाल, वस्त्राने केस झाकुनच प्रवेश करावा, स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात आत येऊ नये"
मी भेट दिलेल्या अनेक पीरांच्या, दर्ग्याच्या बाहेर अशाच सुचना असतात. आत पिराला सुंदर, झुळझुळीत हिरव्या चादरीने झाकलेले होते. त्यावर फुलांच्या माळा होत्या. एक पोरगेलेसा फकिर हातातल्या चावरीने त्यावरच्या माशा हाकलत होता. पलि़कडे एक मध्यमवयीन फकीर कुराणपठन करत बसला होता. त्याच्याशी अल्लाह, नबी, प्रेषित यांच्या महान कर्तबगारीची चर्चा करत मी माझ्या शंका विचारत होतो. बोलता बोलता सदर पीर फार पावरबाज असल्याचे तिथे कळाले. मी उत्तम आरोग्य, दिर्घ आयुष्य, भरपुर संपत्ती मिळावी यासाठी करुणा भाकली. फकीराने आशीर्वादपर कुराणातील आयता पढल्यावर माझ्या डोक्यावर मोरपीसाने स्पर्श केला आणि दुवा करुन तिथुन बाहेर पडलो.
मला काही प्रश्न पडले आहेत
१) बहुतेक सर्वच पीरांना चादरीने मढवलेले असते.. गणपतीच्या स्वेटरवर चर्चा करणारे विचारवंत पीराच्या बाबत गप्प का असतात?
२) देवळाबाहेरील स्त्रियांसंबंधी पाट्यांबाबत चर्चा करणारे पीर, दर्ग्याबाहेरील पाट्यांबाबात गप्प का असतात?
३) काही थोड्या देवळात स्त्रियांना जायला मनाई असल्याबद्दल चर्चा करणारे कुठल्याच मशिदीत स्त्रियांना प्रवेश नसतो याबाबत गप्प का असतात?
असे अजुन काही प्रश्न आहेत. सवडीसवडीने विचारतो..
प्रतिक्रिया
23 Dec 2010 - 11:42 am | नगरीनिरंजन
पीर म्हणजे काय?
23 Dec 2010 - 11:45 am | स्पा
ए यार धर्मावर अजून एक धागा .................
नाना काय झालाय वो तुम्हाला....
असा अंत नका हो पाहू............
23 Dec 2010 - 11:47 am | छोटा डॉन
त्याचे काय आहे नानबा, माणसला समजा जमीन मऊ आहे असे समजले की तो आपल्या हाताचा कोपरा वापरुन ती खणु लागतो.
म्हणजे काय तर सौजन्य, शांतता, संयम याचा गैरफायदा घेतला जातो.
अवांतर : हे धाग्यांच्याही बाबत लागु होते, नै का ? ;)
- ( संयमी ) छोटा डॉन
23 Dec 2010 - 11:55 am | टारझन
टी.आर.पी चा मोह फार वाईट. :)
(एका व्यनितल्या लायनीचे विडंबण, डाणु ला संदर्भ लागेलंच :) ) :)
23 Dec 2010 - 12:02 pm | छोटा डॉन
असो असो.
थांब जरा, तुला आता एका विडंबणाचा व्यणी टाकतो ;)
- ( व्यनीमनीतला ) छोटा डॉन
23 Dec 2010 - 12:04 pm | अवलिया
सी सी आम्हाला पण पाठवा.. तसे तुम्ही पाठवालच पण मुद्दाम सांगुन ठेवलेले बरे ;)
23 Dec 2010 - 12:05 pm | विंजिनेर
सोप्पय.
मिपावरचे सदस्य देवळांत बहुसंख्येने जातात (आता, हिरीरीने चर्चा करतात म्हंजे जात असतीलच नां?)
म्हणून देवळे आणि त्याबद्दलच्या शंका तेव्हढ्याच पटीत येतात.
पीराचे दर्शन घेणारे कमी => शंका कमी.
गुरूद्वारात जाणारे त्याहून कमी => नो शंका!
फिनीतो!
23 Dec 2010 - 12:13 pm | परिकथेतील राजकुमार
http://72.78.249.107/Sakal/21Dec2010/Normal/PuneCity/page8.htm
कालच ह्या विषयावरुन चर्चा झाली आणि तथाकथीत विचारजंत ह्या विषयांवर कधीच चर्चा का करत नाहीत किंवा चर्चा सुरु झाली तरी पळ का काढतात हेच प्रश्न मागे उरले.
23 Dec 2010 - 1:34 pm | Nile
च्यायला, आधी चुकुन पराची चादर वाचलं. म्हणलं आता ह्यावर पण नानानं काकु टाकला का काय! (टाकला असता तर बोंबलायला आपण काय प्रतिसाद देणार तिथं? असो.)
बाकी ह्या विषयावर नानांना किती प्रतिसाद हवेत? नाही पुर्वी लै देउन झालेत म्हणुन विचारलं.
23 Dec 2010 - 2:27 pm | स्पा
च्यायला, आधी चुकुन पराची चादर वाचलं. म्हणलं आता ह्यावर पण नानानं काकु टाकला का काय!
क---- ह--- र----
23 Dec 2010 - 4:36 pm | sagarparadkar
परि नाही ... परी ....
आणि मी पाहिलेली एक परीराणीच आठवली एकदम ....
23 Dec 2010 - 4:40 pm | विजुभाऊ
च्यायला, आधी चुकुन पराची चादर वाचलं.
अरे मी सुधा ते चुकून " परीची चादर " असे वाचले होते.
आता या बाबतीत मी बोललो की उगाच मोहोळ उठल्यासारखे होईल म्हनून गप्प बसलो
23 Dec 2010 - 7:28 pm | आमोद शिंदे
हाहाहाहहहहा
एक चादर मैलीसी!!
23 Dec 2010 - 12:15 pm | स्पा
लिंक वाचली.....
स्वर्गवासी सुभाष भेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली................
23 Dec 2010 - 12:26 pm | क्लिंटन
आपले म्हणणे रास्त आहे.पण दुसऱ्या धर्मात असे अयोग्य प्रकार आहेत हे आपल्याकडेही तसेच अयोग्य प्रकार ठेवायचे समर्थन कसे होऊ शकते?जे वाईट ते वाईटच मग भले कुठेही होऊ दे.मग काही हिंदू देवळांमध्ये आणि तुम्ही म्हणता त्या प्रमाणे सगळ्या मशीदींमध्ये स्त्रियांना प्रवेश नसणे (माझ्या सख्ख्या बहिणीचा मस्कतमधील मशीदीत काढलेला फोटो माझ्याकडे आहे ती गोष्ट वेगळी) या गोष्टी वाईटच आहेत.त्यांच्याकडील धर्माच्या नावावर लोकांचे मुडदे पाडणे वाईट तसेच अमुकएका जातीत जन्माला आल्यामुळे काही लोकांना आयुष्यभर जनावराहूनही वाईट वागणूक देणे हे पण वाईटच.पण काय असते "बघा त्यांच्याकडे पण असेच असते" असे म्हणून त्या पडद्याआड आपल्याकडील वाईट गोष्टींचेही समर्थन करायचा काहींचा प्रयत्न असतो आणि नेमक्या अशाच गोष्टींना (तुमच्या भाषेतील) विचारवंतांचा विरोध असतो.आणि हे प्रश्न उभे केले तर ते लोक हिंदूद्वेष्टे कसे ठरतात?की हिंदूप्रेम म्हणजे केवळ हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवले म्हणून त्यावर आपला विचार न करता डोळे झाकून त्याचे पालन करणे असा अर्थ होतो का?
एक मोठे विचारवंत (कदाचित तुमच्या व्याख्येप्रमाणे हिंदूद्वेष्टे) अमर्त्य सेन यांनी त्यांच्या Argumentative Indians या पुस्तकात भारतात पूर्वी प्रश्न विचारायची परंपरा कशी मुरलेली होती याचे असंख्य दाखले दिले आहेत.भगवद्गीतेतही गुरूकडून ज्ञान मिळवायचे मार्ग सांगितले आहेत त्यात "परिप्रश्नेन" म्हणजे एकामागोमाग एक प्रश्न विचारणे हा पण एक मार्ग सांगितला आहेच ना?जेव्हा असे एकामागोमाग एक प्रश्न विचारायची परंपरा थांबली आणि "गप्प बसा" संस्कृती वाढली तेव्हा आपल्या अवनतीला सुरवात झाली.भले त्याची कारणे परकीय आक्रमणांमध्ये असतील.
अशा लोकांना विज्ञान/संशोधन अशा गोष्टींचे वावडे असते (तेच लोक पूर्वीच्या कोणकोणत्या परंपरांमध्ये विज्ञान कसे होते हा जयघोष करतात ही गोष्ट वेगळी).आता हे वावडे त्यांना असते हे मी कशावरून म्हणतो? कारण उलटे प्रश्न विचारायला गेले की बिनदिक्कत "हिंदूविरोधी" असे लेबल चिकटवून ते मोकळे होतात.दुसरे म्हणजे विज्ञानात कोणतेही hypothesis सिध्द कसे करायचे?त्याचे अनेक मार्ग आहेत पण त्यातला एक मार्ग म्हणजे मुळातल्या hypothesis ला आव्हान देणारे alternate hypothesis मांडायचे आणि असे सगळे alternate hypothesis अमान्य करता आले की मुळातले hypothesis आपोआप सिध्द होते.म्हणजे मुळातले hypothesis चुकीचे आहे असे म्हणून सुरवात करायची आणि त्याला आव्हान देणारे alternate hypothesis सिध्द करता येतात का हे बघायचे. तसे ते सिध्द करता आले नाहीत तर मात्र मुळातला hypothesis मान्य करायला हवा.मुळातलाच hypothesis बरोबर आहे हे गृहित धरून सुरवात करायची नाही.इथे तर उलट प्रश्न विचारायला म्हणजे alternate hypothesis मांडायलाच बंदी.सुरवातच करायची "हिंदू संस्कृती महान" हेच गृहित धरून.आणि अजून काही बोलायची सोय नाही कारण "तिकडेही असेच असते"!!
असो.लिहावे तितके थोडे.
23 Dec 2010 - 12:53 pm | अवलिया
>>>>आपले म्हणणे रास्त आहे.
धन्यवाद.
>>>>पण दुसऱ्या धर्मात असे अयोग्य प्रकार आहेत हे आपल्याकडेही तसेच अयोग्य प्रकार ठेवायचे समर्थन कसे होऊ शकते?
छे छे अयोग्य प्रकारांचे समर्थन नाहीच. त्याचमुळे अनेक गोष्टींमधे हिंदू समाजाने परिवर्तन केले आहे, करत आहे. मी तर म्हणतो गेल्या शंभर वर्षांत हिंदू जेवढे बदलले तेवढी कोणतीच संस्कृती बदलली नाही. आणि याचा मला अभिमान आहे.
>>>जे वाईट ते वाईटच मग भले कुठेही होऊ दे.
अगदी बरोबर
>>>मग काही हिंदू देवळांमध्ये आणि तुम्ही म्हणता त्या प्रमाणे सगळ्या मशीदींमध्ये स्त्रियांना प्रवेश नसणे (माझ्या सख्ख्या बहिणीचा मस्कतमधील मशीदीत काढलेला फोटो माझ्याकडे आहे ती गोष्ट वेगळी) या गोष्टी वाईटच आहेत.त्यांच्याकडील धर्माच्या नावावर लोकांचे मुडदे पाडणे वाईट तसेच अमुकएका जातीत जन्माला आल्यामुळे काही लोकांना आयुष्यभर जनावराहूनही वाईट वागणूक देणे हे पण वाईटच.पण काय असते "बघा त्यांच्याकडे पण असेच असते" असे म्हणून त्या पडद्याआड आपल्याकडील वाईट गोष्टींचेही समर्थन करायचा काहींचा प्रयत्न असतो
चूक. अगदी चूकीची गोष्ट आहे ही. अशा गोष्टींचे समर्थन कूणीच करायला नको.
>>>आणि नेमक्या अशाच गोष्टींना (तुमच्या भाषेतील) विचारवंतांचा विरोध असतो. आणि हे प्रश्न उभे केले तर ते लोक हिंदूद्वेष्टे कसे ठरतात?
अगदी बरोबर. पण त्याची कारणे कधी शोधलीत का?
>>>की हिंदूप्रेम म्हणजे केवळ हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवले म्हणून त्यावर आपला विचार न करता डोळे झाकून त्याचे पालन करणे असा अर्थ होतो का?
छे छे उलट ते जे काही लिहिले आहे ते मुळातुन वाचणे, समजुन घेणे. त्यावर मनन करणे. आणि ते आपल्यासारख्या इतरांना समजावुन सांगणे हेच खरे हिंदूप्रेम. पण होते काय विचारवंत (आमच्या भाषेतले ;) ) मुळातले लिहिलेले कधी वाचतच नाहीत. वाचले तरी ते असते कुणातरी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेल्या एखाद्याने अनुवादीत केलेले. अहो जर अनुवाद चुकलेला असेल तर त्यावरचे तर्काचे सगळे डोलारे पण कोसळणारच ना? सांगा बरे ! मी काही चुकीचे बोलत आहे का? अगदी दुर्गा भागवतांनी सुद्दा मॅक्स मुल्लर, विंटरनेटज यांनी अनुवाद करतांना कसल्या घोडचुका केल्या आहेत याचे विविध दाखले दिले आहेत. तुम्हाला ते पटावे. मग अशा चुकीच्या माहितीवर चुकीची गृहीतके धरुन चुकीचे आकलन करुन चुकीच्या कल्पना करुन चुकीचे ताशेरे ओढले आणि तेच खरे असे धरुन जर हिंदूंच्या कुठल्याही संकल्पना मोडीत काढायला कूणी निघाले तर ते चूकच ना ? सांगा बरे. पाश्चिमात्य विचारवंताचे लेखन वाचुन विचार करायचा की विवेकानंद, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, अरविंद, राधाकृष्णन यांचे विचार वाचुन विचार करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न खरा ! पण मग विचारांमधे भेद उत्पन्न होण्याची कारणे सुद्धा तिथुनच उगम पावतात हे नक्की ! मग पश्चिमात्य विचारावर आधारीत प्रश्न विचारणारे आणि काहीही ऐकुन न घेणारे हिंदू द्वेष्टे ठरणारच यात शंका नाही.
>>>एक मोठे विचारवंत (कदाचित तुमच्या व्याख्येप्रमाणे हिंदूद्वेष्टे) अमर्त्य सेन यांनी त्यांच्या Argumentative Indians या पुस्तकात भारतात पूर्वी प्रश्न विचारायची परंपरा कशी मुरलेली होती याचे असंख्य दाखले दिले आहेत.
हेच तर आमचे म्हणणे आहे. हीच आमची संस्कृती आहे. प्रश्न विचारा. उत्तरावर मनन करा. मुळ तत्वज्ञान, संकल्पना काय आहेत. ज्याचा आम्हाला अभिमान आहे असे ते संस्कृतीतले हिरे काय आहेत ते समजुन घ्या. तुम्हाला आलेल्या वैयक्तिक कुणाच्या तर्हेवाईक अनुभवावरुन पूर्ण भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाचे आकलन करु जाल तर ते अंतिमतः तुमच्याच तोट्याचे असेल. अर्थात तुम्हाला तसे करायचे असेल तर जरुर करा. तर्क करा पण कुतर्क नका करु. प्रश्न विचारा पण खिल्ली उडवुन शब्दच्छल म्हटले की संवाद खुंटणार. केवळ वादच होणार. वेदात म्हटले आहे जो खिल्ली उडवणारा असेल अशा शिष्याचा त्याग करा. आता वेदात म्हटले म्हणुन तुम्ही मानालच असे नाही..खिल्ली उडवणार... पण विचार करा त्यात चूक काहीच नाही ! नाही का?
>>>भगवद्गीतेतही गुरूकडून ज्ञान मिळवायचे मार्ग सांगितले आहेत त्यात "परिप्रश्नेन" म्हणजे एकामागोमाग एक प्रश्न विचारणे हा पण एक मार्ग सांगितला आहेच ना?
अगदी बरोबर. वरती तेच सांगितले आहे.
>>जेव्हा असे एकामागोमाग एक प्रश्न विचारायची परंपरा थांबली आणि "गप्प बसा" संस्कृती वाढली तेव्हा आपल्या अवनतीला सुरवात झाली.भले त्याची कारणे परकीय आक्रमणांमध्ये असतील.
अगदी बरोबर. पण आम्ही असे बोललो की हिंदुत्ववादी होतो.. असो.
>> अशा लोकांना विज्ञान/संशोधन अशा गोष्टींचे वावडे असते (तेच लोक पूर्वीच्या कोणकोणत्या परंपरांमध्ये विज्ञान कसे होते हा जयघोष करतात ही गोष्ट वेगळी).आता हे वावडे त्यांना असते हे मी कशावरून म्हणतो? कारण उलटे प्रश्न विचारायला गेले की बिनदिक्कत "हिंदूविरोधी" असे लेबल चिकटवून ते मोकळे होतात.दुसरे म्हणजे विज्ञानात कोणतेही hypothesis सिध्द कसे करायचे?त्याचे अनेक मार्ग आहेत पण त्यातला एक मार्ग म्हणजे मुळातल्या hypothesis ला आव्हान देणारे alternate hypothesis मांडायचे आणि असे सगळे alternate hypothesis अमान्य करता आले की मुळातले hypothesis आपोआप सिध्द होते.म्हणजे मुळातले hypothesis चुकीचे आहे असे म्हणून सुरवात करायची आणि त्याला आव्हान देणारे alternate hypothesis सिध्द करता येतात का हे बघायचे. तसे ते सिध्द करता आले नाहीत तर मात्र मुळातला hypothesis मान्य करायला हवा.मुळातलाच hypothesis बरोबर आहे हे गृहित धरून सुरवात करायची नाही.इथे तर उलट प्रश्न विचारायला म्हणजे alternate hypothesis मांडायलाच बंदी.सुरवातच करायची "हिंदू संस्कृती महान" हेच गृहित धरून.आणि अजून काही बोलायची सोय नाही कारण "तिकडेही असेच असते"!!
वरचं काही म्हणता काही कळलं नाही.. तरी पण तर्क शास्त्र, सांख्यिकी याबाबत असावे असे वाटते. तत्वज्ञानातील संकल्पनांना विज्ञानाधिष्टीत सांख्यिकीनुसार तर्कशास्त्राची जोड देता येते का याबाबत मी साशंक आहे. यथार्थ तार्किकवाद माझ्या मते गेल्या शतकात आला आणि संपला. असो. लिहावे तितके थोडे हेच खरे.
23 Dec 2010 - 1:13 pm | टारझन
एवढा रिकामा वेळ आहे तर एखादा फर्मास लेख ल्हि की बी णाण्या .
- नानामामा
23 Dec 2010 - 4:43 pm | sagarparadkar
विस्तृत आणि अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया पाहून मला कोल्हापूरच्या सुहृदाची आठवण झाली , पण ते अजून आलेले दिसत नाहीत.
23 Dec 2010 - 7:32 pm | आमोद शिंदे
पण नक्की कोण? नवपौंगडात आलेले की देवाधिराज?
23 Dec 2010 - 2:24 pm | योगी९००
१) बहुतेक सर्वच पीरांना चादरीने मढवलेले असते.. गणपतीच्या स्वेटरवर चर्चा करणारे विचारवंत पीराच्या बाबत गप्प का असतात?
कारण पुर्वी पासून आपल्याला पीर म्हटलं की चादरच आठवते. पण गणपती किंवा इतर देव (जीझस सुद्धा) म्हणले की त्यांच्या त्यांच्या रुपातच आठवतात. (उगाच) कोणी गणपती किंवा हनूमानाला जीन्स किंवा स्वेटर वगैरे घालून सजवले तर बातमी होणारच. हेच जर पीराच्या बाबतीत केले तरी त्याची बातमी होईल.
२) देवळाबाहेरील स्त्रियांसंबंधी पाट्यांबाबत चर्चा करणारे पीर, दर्ग्याबाहेरील पाट्यांबाबात गप्प का असतात?
३) काही थोड्या देवळात स्त्रियांना जायला मनाई असल्याबद्दल चर्चा करणारे कुठल्याच मशिदीत स्त्रियांना प्रवेश नसतो याबाबत गप्प का असतात?
ह्या दोन्ही प्रश्नांना एकच उत्तर. माझ्यामते "तिकडे" स्त्रियांना इतका मान देत नाहीत. जास्तीत जास्त बंधने स्त्रियांनाच आहेत. याची त्या स्त्रियानांही सवय झाली असावी. म्हणून त्यांना आणि आपल्यालाही इतके विशेष वाटत नसावे. कमी शिक्षण हे ही एक कारण असू शकेल. मी जेवढ्या मुस्लिम सुशिक्षित स्त्रिया पाहिल्या त्यापैकी बर्याचशा इतक्या मॉडर्न होत्या की मला आश्चर्य वाटायचे की ह्या खरोखर मुस्लिम आहेत की नाही. त्यापैकी काही तर धार्मिक सुद्धा नव्हत्या. कदाचित अशा स्त्रिया जर मशिदीत जाऊ लागल्या तर नक्कीच ह्या विरूद्ध आवाज उठवतील (असे मला वाटते)
बाकी क्लिंटन यांचा प्रतिसाद आणि त्यावरचे तुमचे उत्तर आवडले. पुढील वाक्य तर खासच..
"बघा त्यांच्याकडे पण असेच असते" असे म्हणून त्या पडद्याआड आपल्याकडील वाईट गोष्टींचेही समर्थन करायचा काहींचा प्रयत्न असतो
अवांतर :
आजकाल स्त्रियांची खुपच काळजी वाटते नानासाहेब तुम्हाला..? काय विचार आहे?
23 Dec 2010 - 3:12 pm | चिंतामणी
लै भारी.
:)) :)) :)) :))
=)) =))=))
23 Dec 2010 - 3:38 pm | कुंदन
आधी "परीची चादर" असे वाचले.
अवलिया आणि परिकथेतील राजकुमार यांच्या घनिष्ट संबंधांचा हा परीणाम....
23 Dec 2010 - 3:40 pm | परिकथेतील राजकुमार
दुबैत राहून राहून तुझे आचार आणि विचार सगळेच बदलले रे कुंद्या ;)
असो.. तु गिफ्ट वगैरे घेउन येतो आहेस म्हणुन अजुन उडत नाहीये.
23 Dec 2010 - 6:23 pm | वाहीदा
दुबैत राहून राहून तुझे आचार आणि विचार सगळेच बदलले रे कुंद्या
कुंद्या च्या बाबतीत शक्यता नाकारता येत नाहि. ;-)
23 Dec 2010 - 3:42 pm | अप्पा जोगळेकर
श्री. अवलिया,
तुम्ही म्हणजे अगदी ते हिंदू जण्जागॄतीवाले का हो? इथल्या काही थोर व्यक्ती फोन करुन पोकळ धमक्या देतील ना हो. किंवा इ-मेल वरुन निर्बुद्ध शिवीगाळ सुद्धा करतील. उगा भावना दुखवायचं काम नाय.
23 Dec 2010 - 3:56 pm | टारझन
शक्यता नाकारता येत नाहि.
- अपिल