यु ट्युब वरचे व्हिडीओज कसे डाउनलोड करतात??

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
21 Dec 2010 - 4:58 pm
गाभा: 

यु ट्युब वर विविध विषयांवरील माहितीपर व्हिडीओ उपलब्ध असतात.
उदा: लहान मुलांसाठी वैज्ञानिक प्रयोग, नृत्य शिकवणार्‍या स्टेप्स, विविध बालगीते वगैरे.

यु ट्युब वरील व्हिडीओ आपल्या कॉम्प्युटर मध्ये डाऊनलोड कसे करतात याबद्दल कुणाला माहित असल्यास कृपया येथे सांगावे.
सर्वांना त्या माहितीचा उपयोग होईल.
धन्यवाद!

प्रतिक्रिया

अशी छोटीशी माहिती हवी असल्यास ते खरडफ्ळ्यावर लिहायाचा नियम आहे म्हणे..
पण असो.
इंटरनेट डाऊनलोड म्यानेजर नावाचे एक सोफ्ट्वेअर फुकट मिळते.
ते उतरवून घेऊन इन्स्टाल करावे.
कुठलाही व्हिडीओ इंटरनेटवर पाहात असताना त्याच्या शेजारीज आयडीएम चा "डाऊनलोड" बार दिसू लागतो... त्यावर क्लिक कराय्चे. बस्स.. :)

आत्मशून्य's picture

21 Dec 2010 - 10:46 pm | आत्मशून्य

काय ?

टारझन's picture

21 Dec 2010 - 5:04 pm | टारझन

१. युट्युब संगणकावर फुल्स्क्रिन मधे खेळवा . (मराठीत प्ले करा)
२. मग आपल्या मोबाईलवर विडिओ शुटींग सुरु करुन तो रेकॉर्ड करा.
३. डेटा केबल ने मोबाईल संगणकाला जोडुन तो व्हिडिओ उतरवुन घ्या.

षिंपल .

- टेक गुरु

योगी९००'s picture

21 Dec 2010 - 6:31 pm | योगी९००

इतका षिंपल उपाय असेल हे माहीत ण्हवते..आज पहिल्यांदा आम्हाला आमच्या मोबाईलच्या कॅमेराचा खराखूरा उपयोग समजला.

बाकी मराठीत प्ले करा म्हणजे काय? विडिओ चे मोबाईलवरून विडिओ शुटींग सुरू करून मराठीत मध्ये मध्ये बडबड करणे म्ह्णणजेच मराठीत प्ले करा काय?

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 5:06 pm | परिकथेतील राजकुमार

ते इथे सांगणे कायद्याविरुद्ध आहे. कृपया ह्यापुढे असले चुकीचे धागे काढू नयेत अशी विनंती.

गणपा's picture

21 Dec 2010 - 5:08 pm | गणपा

बरेच उपाय असतात.......पण तुनळीवाले पक्के लबाड आहेत. थोड्याच दिवसात तो ऑप्शन ब्लॉक करुन टाकतात.
सगळ्यात बेस्ट म्हणेज यु ट्युब व्हिडियो चालु करायचा. संपला की मग इंतरनेट च्या टेंपररी फोल्डर मध्ये जाउन सगळ्यात मोठ्या झाईझची फाईल चोप्य करुन हव्या त्या नव्या फोल्डर मध्ये सेव्ह करायची आणी त्या फाईलं नाव बदलायच. नाव बदलताना (abc.mpeg / abc.flv) तीच एक्टेंशन पण टाकायच.
बास शिंपळ.

मध्यंतरी मी एक टुलबार डाउन लोडवला होता. त्याच्या मदतीने मी बरेच इडो डाउनलोडवले. पण आता त्या तुनळीने तो ब्लॉक केलाय. :(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Dec 2010 - 10:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लिनक्स इन्स्टॉल करा.
यू ट्यूबवरचा आख्खा व्हीडीओ कॅश झाला की \tmp फोल्डरमधे जाऊन ls -lrt टाईप करा. शेवटच्या एक दोन फाईल्सवर file नावाची कमांड चालवा. ज्या फाईल्सचं आउटपुट flv, mpg अशा प्रकारचं असेल तो तुमचा इप्सित व्हीडीओ. मग cp कमांड वापरा आणि इच्छित ठिकाणी आणि इप्सित नावानेत ती फाईल सेव्ह करा.

अधिक माहितीसाठी पराला व्यनी करणे.

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 11:23 am | आजानुकर्ण

मला वाटते ~/.Mozilla/firefox//Cache मध्ये ही फाईल तयार होत असावी. /tmp मध्ये नाही.

टारझन's picture

22 Dec 2010 - 11:33 am | टारझन

सहमत :) पण ते जरका मॉझिला वापरत असेल तर .. :) दुसर्‍या ब्राऊझर्स विषयी कल्पणा नाही. .. बाकी आमुक टमुक रिक्वायरमेंट साठी ओएस किंवा कंप्युटर बदलुन टाकणे म्हणजे .. "माझी बायको मला एकेरी उल्लेख करते म्हणुन बायको बदला " असा सल्ला देण्यासारखे आहे =)) बाकी कंप्युटर बदलण्या ऐवजी थोडे डॉलर खर्ची करुन प्रिमियम मेंबरशीप खरेदी करुन डायरेक्ट डाऊनलोड करुन घेता येतात "कसले" पण व्हिडिओ ... जाणकारांनी परकास टाकावा

भडकमकर मास्तर's picture

21 Dec 2010 - 5:54 pm | भडकमकर मास्तर

रिअल प्लेयरचे १० च्या पुढचे वर्जन असले तर वरती ऑप्शन येतो ..त्यावर टिचकवले की डायरेक्ट डाउनलोड होतो

रमताराम's picture

22 Dec 2010 - 11:52 am | रमताराम

कर्सर त्या विडिओवर नेल्यावर त्याच्या डोक्यावर एक बटण अवतीर्ण होते त्यावर क्लिक केले की झाले. खात्रीशीर उपाय. (पण रियल प्लेअर एरवी वैताग देणारा आहे, आमची आवड वीएलसी प्लेअर.)

पिंगू's picture

21 Dec 2010 - 5:57 pm | पिंगू

सगळ्यात भारी उपाय जे मी वापरलेत ते असे आहेतः

- रियल प्लेयर १० वापरा. तूनळीवरील बरेच व्हिडिओ डाऊनलोड करता येतील.

- अग्निकोल्हा वापरत असाल तर ग्रीसमंकी नावाचे अड-ऑन उतरवून इन्स्टॉल करुन घ्या आणि तुनळी
साठी स्क्रिप्ट इन्स्टॉल करा आणि हे तूनळी वाल्यानां ब्लॉक करता येत नाही.. :)

- पिंगू

(अधिक माहितीठी व्यनी करा)

योगी९००'s picture

21 Dec 2010 - 6:22 pm | योगी९००

http://keepvid.com/
तुमच्या आवडत्या तुनळीवरील चित्रफितीचा दुवा वरील दुव्यातील टेक्स बॉक्स मध्ये डकवा. नंतर डाऊनलोड वर क्लिक मारा..

त्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन्स मिळतील. त्यातील mp4 ऑप्शनवर क्लिक करून चित्रफित तुमच्या संगणकावर उतरवा.

पण कीपव्हिडला बर्याच मर्यादा आहेत.. एकेकाळी मी पण वापरलय.. पण इतकं परिणामकारक नाहीये..

मदनबाण's picture

21 Dec 2010 - 10:10 pm | मदनबाण

हे वापरा हे ब्येस्ट हाय...:--- http://www.downloadhelper.net/
म्या हेच वापरतोया... अग्नीकोल्हाला हे चिकटवायच बास्स्स... :)

आशिष सुर्वे's picture

21 Dec 2010 - 11:31 pm | आशिष सुर्वे

येवढे करूनही जर इडिओ डाउनलोड होत नसेल तर्र.. कम्प्युटर बदला..
:)

मराठे's picture

22 Dec 2010 - 12:49 am | मराठे

उदा: लहान मुलांसाठी वैज्ञानिक प्रयोग, नृत्य शिकवणार्‍या स्टेप्स, विविध बालगीते वगैरे.

बालगीते वगैरे डाउनलोड करण्यासाठी भलताच खटाटोप चालवलाहै ! नक्की बालगीतंच डाउनलोड करायची आहेत का आँ? ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Dec 2010 - 5:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

यूट्यूबवर 'तसलं' काही टिकत नाही रे!

योगी९००'s picture

22 Dec 2010 - 11:07 am | योगी९००

यूट्यूबवर 'तसलं' काही टिकत नाही रे!
तुम्हाला कसं काय माहीत?

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2010 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार

यूट्यूबवर 'तसलं' काही टिकत नाही रे!

टिकवले की सगळे टिकते. तुझ्या अंगात मोडतोड वृत्तीच फार ! खळ्ळ्ळ खट्टाक...

आणि यूट्यूबवर नाहीच टिकले तर मेटाकॅफेवर टिकते ;)