दिनांक ४ जाने २०११ रोजी सकाळी ९ वाजून ०२ मि सायन मकर राशीत १३ अंशावर ३८ मि अमावस्या होत असून ही अमावस्या सूर्यग्रहणयुक्त असून वर्षारंभीच होत आहे. २०११ मध्ये एकंदर ४ सूर्यग्रहणे आहेत बाकीची या प्रमाणे -
० १ जून २०११ सायन मिथुन रास ११ अंश १ मि
० १ जुलै २०११ सायन कर्क रास ९ अंश १२ मि
० २५ नोव्हे २०११ सायन धनू रास २ अंश ३६ मि
ही सर्व ग्रहणे खण्डग्रास प्रकारची असणार आहेत.
दिनांक ४ जाने २०११ रोजी होणारे ग्रहण गोचर नेपच्यून आणि गोचर शनी यांजबरोबर अनुक्रमे अर्धकेंद्र आणि केंद्र योग करत असल्याने बर्याच प्रमाणात अशुभ किंवा त्रासदायक ठरणार आहे.
ज्या जन्म दिनांकाना हे ग्रहण विशेष त्रास ठरेल त्या जन्म तारखांचे गणित करून पुढे दिल्या आहेत. खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत शनी सक्रिय होत असल्याने शनीने केलेल्या योगानुसार ग्रहणयुक्त अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.
२८ एप्रिल १९३८ ते ६ जून १९३८, २५ सप्टें १९३८ ते २३ नोव्हे १९३८
५ जाने १९३९ ते २६ फेब्रु १९३९
१५ जून १९४५ ते १६ जुलै १९४५
२२ नोव्हे १९५१ ते १ एप्रिल १९५२
१६ ऑगस्ट १९५२ ते २२ सप्टे १९५२
१९ जाने १९६० ते २७ फेब्रु १९६०
३० जून १९६० ते २६ नोव्हे १९६०
२४ जून १९६७ ते २५ ऑगस्ट १९६७
६ मार्च ते सात एप्रिल १९६८
२६ जुलै ते ३१ ऑगस्ट १९७४
४ जाने १९७५ ते १९ मे १९७५
खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत हर्षल सक्रिय होत असल्याने हर्षलने केलेल्या योगानुसार ग्रहणयुक्त अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.
२५ ऑगस्ट ते १८ डिसे १९५१, १० जून ते १३ जुलै १९५२
१ मार्च ते १३ एप्रिल १९५३
१३ नोव्हे १९७० ते ३० मार्च १९७१, ३० ऑगस्ट ते ४ नोव्हे १९७१
२१ एप्रिल ते १९ ऑगस्ट १९७२
खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत नेपच्युन सक्रिय होत असल्याने नेपच्युनने केलेल्या योगानुसार ग्रहणयुक्त अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.
४ नोव्हे १९४७ ते १ एप्रिल १९४८
६ सप्टे १९४८ ते २८ ऑक्टो १९४९
१९ एप्रिल १९५० ते ३० एप्रिल १९५०
खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत प्लुटो सक्रिय होत असल्याने प्लुटोने केलेल्या योगानुसार ग्रहणयुक्त अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.
३० डिसे १९७५ ते २९ जाने १९७६
६ ऑक्टो १९७६ ते २२ मे १९७७
२५ मार्च १९७८ ते १५ सप्टे १९७८
या शिवाय कोणत्याही सनात पुढे दिलेल्या तारखाना जन्मलेल्या व्यक्ती ग्रहणाची त्रासदायक फले अनुभवतील -
२ जाने ते ७ जाने
१ एप्रिल ते ५ एप्रिल
४ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर
४ जुलै ते ९ जुलै
टीप -आपल्या पैकी कुणाला जन्मपत्रिकेचे एबर्टिनप्रणित तंत्राने विष्लेषण करून हवे असेल तर माझ्याशी ई-मेल वर संपर्क साधावा. हे विश्लेषण फक्त इंग्लिश मध्ये पुढील काही दिवस माझ्या ब्लॉगच्या वाचकाना नि:शुल्क करून मिळेल. काही विशिष्ट समस्यांसाठी मार्गदर्शन हवे असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल.
ज्यांना हे विश्लेषण कसे असते याचा अंदाज घ्यायचा आहे, त्यांनी या (http://yuyutsu.webs.com/Sample%20Report.pdf) लिंकवर टिचकी मारून नमूना विश्लेषण उतरवून घ्यावे.
प्रतिक्रिया
20 Dec 2010 - 5:50 pm | परिकथेतील राजकुमार
एकुणात १९७८ सालानंतर जन्मलेले सगळे सुखी आहेत.
साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपुर्ण.
20 Dec 2010 - 7:41 pm | उपास
ख्ररं तर ऑक्टो ७८ नंतरचे ;)
20 Dec 2010 - 5:52 pm | पर्नल नेने मराठे
काही विशिष्ट समस्यांसाठी मार्गदर्शन हवे असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल.
ह्म्म..
20 Dec 2010 - 6:10 pm | विनायक प्रभू
चुचु चे बारिक लक्ष हो.
चुचु शी अगदी गदगदुन सहमत.
20 Dec 2010 - 6:16 pm | पर्नल नेने मराठे
हे म्हणजे सेलला जावे व आपल्याला हवी असेल ति वस्तु सेल मधे इन्क्लुड नसल्यावर जसे दुख्ह होइल तसेच !!!
कारण PDF विश्लेशणमधे ति मजा वाटली नाही.
21 Dec 2010 - 10:55 am | सहज
इतकी हुशार बाई मुलगी ही चुचु!! पण ती देखील स्व:ताचे फलज्योतिष जाणुन घेण्यास उत्सुक :-(
दुख्ह जह्ले ब्घ!
पिडीतांना मानसिक आधारासाठी कदाचित लागतही असेल पण चुचु .....:-(
बाकी युयुत्सु काका बायकांना पाशवी शक्तिंना भविष्य सांगतात का?
21 Dec 2010 - 11:38 am | पर्नल नेने मराठे
आहेस कुठे तु?
20 Dec 2010 - 5:53 pm | गवि
"पत्रिकेत प्लुटो सक्रिय " म्हणजे नेमके काय होते?
20 Dec 2010 - 5:59 pm | युयुत्सु
प्लुटोच्या कारकत्वाचा आविष्कार होतो.
20 Dec 2010 - 6:06 pm | अवलिया
वाचलो ब्वा !!
आमची जन्म तारिख तुम्ही दिलेल्या तारखांमधे नसल्याने आम्हाला त्रास होणार नाही असे दिसते... की आमच्यामुळे कुणाला त्रास होईल असे काही आहे ? ;)
बाकी तुम्ही काथ्याकुटात का टाकले? आम्ही काय चर्चा करु शकणार ह्याविषयी ? तुम्ही सांगता ते तुमच्या ज्ञानाच्या अनुरोधाने बरोबर असणारच आणि तुम्ही केवळ सजग करत आहात हे तर निर्विवाद सत्य.
असो. या कार्यासाठी तुम्हाला भरपुर आयुक्ष लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना !
20 Dec 2010 - 6:13 pm | योगी९००
४ जानेवारी म्हणजे आर. डीं ची पुण्यतिथी... एवढेच लक्षात आहे.
20 Dec 2010 - 7:03 pm | वेताळ
माझी जन्म तारिख वर दिलेल्यात आली आहे........देव माझे भले करो.
20 Dec 2010 - 9:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अमेरिकेतून म्हणे खग्रास ग्रहण दिसणारे अशी टीव्हीवर जाहीरात सुरू होती. सगळा हिरवा माज नुसता!!
पते की बातः तुमच्याकडे रात्री ढग नसतील तर ग्रहण पहा. आमच्याकडे ढग असणारेत, तस्मात, जे ३१ डिसेंबरला करणार तेच आज रात्री ... झोप काढणार!!
21 Dec 2010 - 11:05 am | विजुभाऊ
तुमच्याकडे रात्री ढग नसतील तर ग्रहण पहा. आमच्याकडे ढग असणारेत,
वावा काय हा चमत्कार.... रात्री सूर्यग्रहण दिसणार. त्या शिवाय ४ जानेवारीला त्यांच्याकडे ढग असणार आहेत . किती प्रगती झालीय .इतके अचूक वेध वर्तवता येतात हल्ली.
20 Dec 2010 - 9:24 pm | नरेशकुमार
माझा जन्म होत नाही आणि मी मरतही नाहि.
अग्नि मला जाळु शकत नाही, वायु मला सुकवु शकत नाही.
मि अनादि काळापासुन आहे, व अनंत काळापर्यंत राहणार आहे.
20 Dec 2010 - 9:27 pm | आत्मशून्य
;)
20 Dec 2010 - 9:35 pm | आत्मशून्य
जरा Intuitive titles लीहीत जावाना राव........
21 Dec 2010 - 10:18 am | युयुत्सु
म्हणजे नक्की कशी हो? जरा उदाहरण द्याल का??
21 Dec 2010 - 9:38 am | अब् क
ह्म्म मला प्रथम वाटले ४ जाने २०११ लाच जग वगैरे बूडनार आहे की काय
आगदि असच वाट्ल!!!!!!!
21 Dec 2010 - 9:48 am | मदनबाण
ह्म्म्म...
चला अपुनका जनम तारिख तो नय हय इसमें... फोक्कट का टेंशन कशाला पाळा ? ;)
बाकी या सूर्यग्रहणा पेक्षा मला तर बाँ सौर वादळांचेच लयं भ्या वाटुन राह्यलय बघा !!!