भारताला लष्करे तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांपेक्षा अतिउजव्या हिंदू गटांकडून अधिक धोका आहे. इति. युवराज.

गांधीवादी's picture
गांधीवादी in काथ्याकूट
18 Dec 2010 - 1:21 pm
गाभा: 

अगदी नेहमीप्रमाणे **** तारे तोडण्यात प्रसिद्ध असलेले माननीय युवराज (भावी पंतप्रधान) यांनी भारतात/जगात हिंदूंना त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल त्यांचे शतश: धन्यवाद. त्यांचे आभार मानावे तितके कमी. 'आज भारताला सर्वात मोठे धोका आहे तो केवळ हिंदू दहशतवाद्यानाकडून' असे सांगून त्यांनी हिंदूंची जी कानउघाडणी केलेली आहे ती नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.

ज्यांना खोटे वाटते त्यांनी घराबाहेर येऊन बघावे,
तर काय दिसते. प्रत्येक हिंदू आज हातात तलवार, मशीनगन घेऊन उभा असतो. रोज हजारो लोकं चौका-चौकात मारली जातात. रात्री ८ नंतर कोणीही घराबाहेर पडू शकत नाहीत. कोणीही कोणाचाही कधीही कत्तल करू शकतो. आणि हे सर्व होत असताना या हिंदुना हे उघडपणे सांगण्याचे धैर्य कोणात नव्हते. ते असीम धैर्य एकटवून माननीय युवराज यांनी हिंदूंना कडू औषधच पाजले आहे. हे प्राशन करून हिंदूंनी लवकरात लवकर खाली दिले आहे त्याप्रमाणे वागावे.

माझे समस्त हिंदूंना आवाहन आहे :
१) बाबांनो पहिले हातातली शस्त्रे खाली ठेवा. सारे जग आपल्या हिंसेमुळे आपल्यावर थुंकते आहे. जगात आज 'हिंदू' असे उच्चारले तरी लगेच सुरक्षा रक्षकांच्या भुवया उंचावल्या जातात आणि आजूबाजूचे संशयित नजरेनं बघतात. बाबांनो अजूनही वेळ गेलेली नाही. हिंदूंनो सुधारा, बंद करा हि हिंसा.
२)कोणीही कुठेही समूहाने जाताना केवळ सर्व हिंदू मिळून जाऊ नका. कोणितर अजून एक-दोन दुसर्या धर्मातील बरोबर असू द्या, त्यामुळे आपण काही अघटीत करायला जात नाही आहात हे सिद्ध होऊ शकते.
३)इथे मिपावर सुद्धा केवळ हिंदुंऐवजी सर्व धर्मियांना सामील करून घ्या, नाहीतर एके दिवशी या मिपाला देखील एक दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करण्याची शक्यता आहे.
४)आपल्याकडील सर्व हत्यारे चाकू सुरे, तलवारी, (लेखणी सकट) जवळच्या पोलीस चौकीत जमा करा.
५)प्रत्येक मंदिरांमध्ये CCTV कॅमेरे बसवा.
६)आपल्या मुलांना केवळ धार्मिक ज्ञान न देता शालेय अभ्यासक्रमात देखील पाठवा.

हिंदू दहशतवादामुळे देशाला अधिक धोका

पण सगळेच हिंदी काही दहशतवादी नसतात आणि हे जगाच्या कानात ठणकावून सांगण्यासाठी आम्ही एक सिनेमा निर्मिती करण्याचे योजिले आहे.
सिनेमाचे नाव असेल : my name is kulkarni* & I am not a terrorist.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------
* हिंदूंमध्ये जे कोणते नाव प्रचीलीत असेल ते. जसे जोशी, पवार, चव्हाण, ठाकरे. वगेरे वगेरे.

प्रतिक्रिया

हा हा,,, मस्त लेख.

(बाकी त्या गांधी युवराजाच्या *** **).

नितिन थत्ते's picture

18 Dec 2010 - 1:53 pm | नितिन थत्ते

लेखाच्या वाक्यावाक्यात इतका मूर्खपणा भरला आहे की काही प्रतिक्रिया देणे शक्य नाही.

चालू द्या.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्या मताचा आदर आहे.
(पण असेच युवराजांच्या मताचा आदर परदेशी लोक करू लागले तर ?)

मला वाटते हे एक गंभीर प्रकरण आहे. राहुलने हे नक्कीच केवळ मतांसाठी केलेले नाही. कारण हे त्याने कुठे उघड स्वरुपात बोललेले नाही.
जगभरात जिथे जिथे भारतीय वावरतात, तिथे तिथे हि बातमी पोहोचलेली असेल.
तुम्हा आम्हाला इथली परिस्थिती काय आहे हे माहित असते, पण हजारो किलोमीटर लांब बसलेल्या परदेशी लोकांना काय माहित असणार ?

ते तर असाच विचार करतील ना , 'यांचाच भावी पंतप्रधाना असे बोलतो आहे तर नक्की काहीतरी गंभीर असणार आहे'. लष्करे-तोयबा तर जगभरात कुप्रसिद्ध आहेच पण हिंदू दहशतवाद्यांना त्याच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचे काम या एक विधानाने केले आहे. इथून पुढे सारे जग हिंदुकडे सुद्धा त्या संशयित नजरेनं बघणार नाही याची काय खात्री. कारण हे वाक्य कोणी सामान्य व्यक्तीने म्हणलेले नाही.

प्रश्न तुमचा माझा नाहीच मुळी, मला चिंता वाटते ती बाहेरच्यांची.

नितिन थत्ते's picture

18 Dec 2010 - 3:08 pm | नितिन थत्ते

पहिली गोष्ट म्हणजे आपण शीर्षकात जे वाक्य लिहिले आहे तेच मी वाचले आहे. पण लेखात मात्र तुम्ही ते "केवळ हिंदू दहशतवाद्यांकडून" असे बदलून लिहिले आहे.

शिवाय शीर्षकातल्या वाक्याचा अर्थ परदेशी लोक आपण लिहिल्याप्रमाणे "रस्तोरस्ती हिंदू खून पाडत आहेत" वगैरे असा का घेतील? कारण शीर्षकातल्या वाक्यातून असे काहीच सूचित होत नाही. डोळ्यावर द्वेषाचा चष्मा चढवला की नसलेले दिसू लागते.

बाकी हिंदू संघटनांच्या दहशतवादी कारवाया आपल्या येथे आत्ता उघडकीस आल्या असतील. पण सी आय ए आदि लोकांना त्या आधीपासून माहिती असण्याची शक्यता आहेच.

गांधीवादी's picture

18 Dec 2010 - 3:19 pm | गांधीवादी

>>शीर्षकातल्या वाक्याचा अर्थ परदेशी लोक आपण लिहिल्याप्रमाणे "रस्तोरस्ती हिंदू खून पाडत आहेत" वगैरे असा का घेतील?
घेतील किंवा न घेतील. 'घेऊ शकत नाही' तसेच 'का घेऊ शकत नाहीत ?'.

काहीही होऊ शकते. असेच होईल कोणी ठाम सांगू शकत नाही. पण शक्यतेची दारे खुली झाली (हे तर नक्की ?).

बाकी ठीक आहे.

चिंतामणी's picture

18 Dec 2010 - 3:28 pm | चिंतामणी

बाकी हिंदू संघटनांच्या दहशतवादी कारवाया आपल्या येथे आत्ता उघडकीस आल्या असतील

कधी उघड झाल्या? निकाल लागला का मालेगाव केस चा?

अजून त्या खटल्याचे कामकाज निट चालत नाही. कारण काय? सज्जड पुरावे आहेत ना तपास यंत्रणांकडे. मग अडचण काय आहे?

एकदा दोषी ठरवा आणि अशी वाक्य लिहा.

चिंतामणी's picture

18 Dec 2010 - 3:28 pm | चिंतामणी

बाकी हिंदू संघटनांच्या दहशतवादी कारवाया आपल्या येथे आत्ता उघडकीस आल्या असतील

कधी उघड झाल्या? निकाल लागला का मालेगाव केस चा?

अजून त्या खटल्याचे कामकाज निट चालत नाही. कारण काय? सज्जड पुरावे आहेत ना तपास यंत्रणांकडे. मग अडचण काय आहे?

एकदा दोषी ठरवा आणि अशी वाक्य लिहा.

रन्गराव's picture

18 Dec 2010 - 4:17 pm | रन्गराव

आयला CIA लईच भारी दिसतय! म्हणजे इथ बोंबलायाला आमच्या पोलिसांना नाय माहित आणि त्यांना माहिती पन झालं. आयला आजपसन मिपावर जरा सांभाळून रावा र पोरानू. नाय तर CIA, FBI, NSI आन ISI सगळे कुत्र्यासारख माग लागतील. संपादक मंड्ळात पन एक दोन CIA वाली घुसल्यात अस ऐकून हाय आम्ही ( संपादक मंड्ळाने ह. घेने) ;)

गांधीवादी's picture

18 Dec 2010 - 4:33 pm | गांधीवादी

>>परदेशी लोक आपण लिहिल्याप्रमाणे "रस्तोरस्ती हिंदू खून पाडत आहेत" वगैरे असा का घेतील? .................डोळ्यावर द्वेषाचा चष्मा चढवला की नसलेले दिसू लागते.
आपण एक प्रश्न विचारलात, आणि त्याचे उत्तर देखील आपणच देऊन टाकले.

परदेशी लोकं (विशेष करून पाकिस्तानी) यांनी तर डोळ्यावर भारत द्वेषाचा चष्मा चढविलेला आहे, हे तर जगजाहीरच आहे. उद्या (देव न करो) अजून एखादा (पलीकडून) अतिरेकी हल्ला झाला आणि त्याबद्दल आपण पाकिस्तानला जाब विचारायला गेलो तर ते राहुल गांधीच्या 'या' विधानाची नक्कीच आठवण करून दिल्या शिवाय राहणार नाहीत. उलट उत्तर देतील कि 'पहिले तुमचे सावरा, मग आमच्याकडे बोट दाखवा'. शेवटी डोळ्यावर द्वेषाचा चष्मा चढवला की नसलेले दिसू लागते. तसे त्यांनाही भारतात भलतेसलते दिसू लागेल.

अनामिका's picture

19 Dec 2010 - 11:46 am | अनामिका

परदेशी लोकं (विशेष करून पाकिस्तानी) यांनी तर डोळ्यावर भारत द्वेषाचा चष्मा चढविलेला आहे,
सहमत्.....पाकिस्तान्यांनी तर त्यांच्या नुकत्याच जन्माला आलेल्या पिढीला देखिल हेच विषमृत पाजलय ज्याचा अनुभव परवाच घेतलाय....अनुभव कथन लवकरच करेन....
केवळ एका उत्तरप्रदेशच्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका जिंकण्यासाठी जर युवराजांनी हि पोपट पंची केली असेल तर मग त्याची लायकी आणि बुद्धी किती प्रगल्भ असेल याचा अंदाज सर्वसामान्य हिंदूना ( जे गर्वाने हिंदु म्हणवतात ते)नक्कीच आला असेल....स्वातंत्र्य मिळवण्यात योगदान देणार्‍या इतक्या जुन्या पक्षाचे झालेले वैचारिक अधःपतन पाहून त्यांचे इहलोकी गेलेले नेते सुद्धा अशृ ढाळत असतील......
असल्या उथळ व्यक्तीला भावी युवराज म्हणुन पुढे आणणे हास्यास्पद तर आहेच पण हिंदुस्थानात केवळ राहुल गांधी एकदम हिरो सारखा दिसतो म्हणुन पंतप्रधानपदी असावा असे मत व्यक्त करणारे तथाकथित उच्चविद्याविभुषित व्यक्ती माझ्या माहितीत आहेत अशा लोकांच्या बुद्धीची किव करावी तितकी कमीच....
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

डोळ्यावर द्वेषाचा चष्मा चढवला की नसलेले दिसू लागते.
आणि ढापणे चढवली कीं कांहींच दिसत नाहीं.

पहिली गोष्ट म्हणजे आपण शीर्षकात जे वाक्य लिहिले आहे तेच मी वाचले आहे. पण लेखात मात्र तुम्ही ते "केवळ हिंदू दहशतवाद्यांकडून" असे बदलून लिहिले आहे.

वरच्या लेखातील जोडणी पाहिली आहेत का? निळ्या अक्षरातील जोडणीवर टिचकी मारा. बातमीत शिर्षकात म्हणलेलेच वाक्य आहे. तेच गांधीवादींनी लिहीले आहे. .

खाली सौम्य शब्दात लिहीले ही मात्र त्यांची चूक आहे. :D

चिंतामणी कधी कळणार तुम्हाला -खेळ चालू झाल्या झाल्या हुकमी एक्का काढायचा नसतो. आता कुठ रंगात यायला सुरुवात झाली होती. कुणीही न बोलावता स्वतःच येवून आधी खेळ फालतू आहे म्हणणे. मग भाव खावून खेळायला तयार होने आणि खेळाचे एक मात्र चँपियन असल्याप्रमाणे खेळी. किती छान योजना आखली होती. पानी ओतलस त्यावर. कुठ फेडाल ही पापं? ;)

चिंतामणीसाहेब,
गंमत म्हणजे या बातमीबरोबर 'सकाळ'ने जे छायाचित्र छापले आहे त्यात राहुलजींनी चक्क 'उभे' गंध किंवा कुंकू लावले आहे! हे कसे काय बॉ? लक्षात आलेले दिसत नाहीं साहेबांच्या!
पण या लेखाखाली आमच्या-तुमच्यासारख्यांचे जे प्रतिसाद आलेले आहेत ते खूपच वाचनीय आहेत. त्यातले कांहीं निवडक प्रतिसाद खाली देत आहे. आक्रस्ताळे प्रतिसाद मी निवडलेले नाहींत.
हे पोर हिंदुना दहशतवादी समजते ह्याचात आश्चर्य वाटण्या सारखे काय आहे? आजोबा, आई, हे काही भारतीय न्हवेत, आणि एकंदर कुटुंबातील वातावरण काही पारंपारिक नाही. पण लाजिरवाणी गोष्ट म्हणजे इतर काँग्रेसवाले ह्या अडाणी पोराला डोक्यावर घेउन नाचतात काय त्याचे जोडे उराशी घेउन कवटाळतात काय.
On 18/12/2010 12:27 PM ravijambhulkar said:
एकच विनंती आहे हिंदू आणि मुस्लीम बांधवांना कि तुम्ही आपापसात गोड राहा हे नालायक राजकारणीच आपल्यात भांडणे लावत असतात. ओ तमाशा पाहत राहतात
On 18-12-2010 09:44 AM eknath said:
अरे वाचवा रे ह्या देशाला नाहीतर या italian राजपुत्रासारखे नेतृत्व या देशाला खड्ड्यात घालेल ......यांना हिंदू संस्कृती ची जाण नाही आहे, जाणून बुजून विदेशी पोरग ते ............ खरच राहुल ला हिंदू संस्कृती जाणून घेण्याची गरज आहे .........हजारो लोकांचा जीव घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना पोसून ह्यांना हिंदू दहशत वादी दिसताहेत ....खरच हे पाकिस्तान चे प्रेसिडेंट शोभतील .............
राजपुत्र वेडा वाया गेला, मुसलमानाचे आणि इतर धर्मिन्चे लाड करता करता स्वताच धर्म विसरला, त्यांना आपला धर्म तरी माहित आहे का?
On 18/12/2010 09:26 AM sunil modak said:
कुमार राहुल, आपल्या ह्या शोधाबद्दल आपल्याला नोबेल पारितोषिकच मिळायला हवे. खरच आपले ज्ञान , आपला अभ्यास, आपले चिंतन, आपली विचारसरणी हि अजोड आहे. एव्हड्या लहान वयात संपूर्ण देश पालथा घालून आणि तुफान अभ्यास करून आपण हि ज्ञान संपत्ती मिळवलीत त्याबद्दल आपले अभिनंदन. आम्हाला आपले उगाच वाटायचं कि शिवाजी, टिळक, सावरकर, आगरकर, सुभाषबाबू, नेताजी पालकर, भगत सिंघ, महात्मा गांधी, शाहू महाराज, वल्लभ भाई पटेल आणि अन्य अने तत्सम माणसे हि ह्या देशातील मोठी माणसे होऊन गेली म्हणून.....
On 18/12/2010 09:04 AM avinash said:
खर तर राहुल गांधीनी असे वारंवार बोलण्याची गरज आहे त्याशिवाय भारतीय जनता त्यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारेल असे वाटत नाही. त्यांना दिग्विजयसिंगांची शिकवणी चालूच ठेवा. लोकांची स्मरणशक्ती नसतेच त्यामुळे ते नक्कीच पंतप्रधान बनतील. आणि हो सोनिया बाईनी दुटपी बोलण्याचा हे धोरण राहुल ला चांगले शिकवले आहे. राहुल गांधी भावी पंतप्रधान्की जय हो..
On 18/12/2010 08:21 AM indian indian said:
राहुल सारखे लोक देशाला विबक्त कराचे काम करतात .पण जर जे बिहारात झाले ते आता महाराष्ट्रात होणार सर्व देशात होणार जातीय राजकारण करणारांना आता घरी बसावे लागणार आहे कारण लोक आता काम पाहतात जात नाही जो काम करेल तोच राहील
On 18/12/2010 07:25 AM vivek said:
कुठल्या हिंदू दहशतवादाच्या गोष्टी करतोय हा. स्वताचे सरकार, CBI, कोर्ट असूनही एकही माणसाला मुद्देमालासकट पकडायचे सोडा पण मुद्दामून गोवूहि शकलेले नाहीयेत. सहिष्णुता आमच्या धर्माचा पाया आहे. दहशतवाद सोडा, वाईट संगतीत नुसते दिसलो तरी घरी कान्फाडून काढतील. धर्माची रचनाच पहा -प्रत्येकाला आपापल्या नुसार परामेश्वराची भक्ती करण्याची साधने आणि मार्ग उपलब्ध आहेत. कट्टर होण्याचा इथे संबंधाच नाहीये. राहुल गांधी सडक्या मेंदूचा आहे, उगाच शांतीप्रिय निधर्मी हिंदूंना बदनाम करतोय भिकारडा. नपुसक कॉंग्रेस असलेच आहे

पण बिहारमध्ये xx मार खाऊनसुद्धा राहुलजींना अक्कल आलेली दिसत नाहीं.

विकि's picture

18 Dec 2010 - 5:36 pm | विकि

थत्ते काकांनी लिहीलेल्या लेखाची चांगलीच थट्टा उडवली.

नितिन थत्ते's picture

21 Dec 2010 - 10:06 am | नितिन थत्ते

मी कुठे लेख लिहिला आहे?

तो तर स्यूडोगांधीवादींनी लिहिला आहे.

गांधीवादी's picture

21 Dec 2010 - 10:51 am | गांधीवादी

>>स्यूडोगांधीवादींनी लिहिला आहे.
कृपया संपादकांनी याची नोंद घ्यावी.

तुम्ही हिंदू असल्याने संपादक दखल घेतीलच असे नाही... भलत्या अपेक्षा ठेवु नका

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 3:57 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्ही हिंदू असल्याने संपादक दखल घेतीलच असे नाही... भलत्या अपेक्षा ठेवु नका

मला हा प्रतिसाद धार्मिक विद्वेष पसरवणार वाटतो आहे.

संपादक दखल घेतील काय ?

अवलिया's picture

21 Dec 2010 - 3:59 pm | अवलिया

तुम्हाला काय वाटते यावर संपादकांचे काम अवलंबुन नसते. संपादक स्वतंत्र विचाराचे असुन नि:पक्षपाती निर्णय घेण्यास समर्थ आहेत असे आमचे मत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 4:03 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्हाला काय वाटते यावर संपादकांचे काम अवलंबुन नसते.

आम्ही गुडबुकातले आहोत. पुढे ?

संपादक स्वतंत्र विचाराचे असुन नि:पक्षपाती निर्णय घेण्यास समर्थ आहेत असे आमचे मत आहे.

हेच काहीसे आमचे देखील मत असून आम्ही आमचे विचार त्यांच्यापर्यंत पोचवलेले आहेतच.

मात्र तुम्ही ह्या लेखाचे शिर्षक कसे योग्य आहे हे आपल्या कृतीतुन दाखवत आहात असे वाटते.

अवलिया's picture

21 Dec 2010 - 4:06 pm | अवलिया

>>>आम्ही गुडबुकातले आहोत. पुढे ?

पुलीस के साथ न दोस्ती अच्छी न दुश्मनी...
-- देवानंद (जॉनी मेरा नाम)

>>>>संपादक स्वतंत्र विचाराचे असुन नि:पक्षपाती निर्णय घेण्यास समर्थ आहेत असे आमचे मत आहे.
>>हेच काहीसे आमचे देखील मत असून आम्ही आमचे विचार त्यांच्यापर्यंत पोचवलेले आहेतच.
अभिनंदन... !

>>>मात्र तुम्ही ह्या लेखाचे शिर्षक कसे योग्य आहे हे आपल्या कृतीतुन दाखवत आहात असे वाटते.
हॅ हॅ हॅ .... कस्चं कस्चं !

गांधीवादी's picture

22 Dec 2010 - 6:35 am | गांधीवादी

संपादकांन व्यनी करून आत्ता तर कुठे १२ तास झालेले आहेत, बघूयात.

चिंतामणी's picture

22 Dec 2010 - 8:35 am | चिंतामणी

;)

पण सगळेच हिंदी काही दहशतवादी नसतात आणि हे जगाच्या कानात ठणकावून सांगण्यासाठी आम्ही एक सिनेमा निर्मिती करण्याचे योजिले आहे.
सिनेमाचे नाव असेल : my name is kulkarni* & I am not a terrorist.

परा कडून चित्रपटाचे परीक्षण वाचायला आवडेल :)

योगी९००'s picture

18 Dec 2010 - 1:58 pm | योगी९००

मा. राहूल गांधी (इथे मा. म्हणजे माननिय असे ही आपण समजू शकता), यांनी काहीच वेगळे बोलले नाही. फक्त वोट बॅकेसाठी त्यांनी मुस्लिमांना चुचकारण्यासाठी असले विधान केले आहे.

पण आपले भारतिय सुक्षिशित मुस्लिम बांधव हा त्याचा कावा समजूनच घेतीलच..

अवलिया's picture

18 Dec 2010 - 2:02 pm | अवलिया

मला नाही वाटत. कारण ते कुठल्या निवडणुक रॅलीमधे बोलत नव्हते तर एका देशाच्या राजदूताशी बोलत होते. म्हणजेच जर ते वाक्य विकिलिक्सतर्फे जाहिर झाले नसते तर ते नक्की काय बोलले हे जाहिर झाले नसते. जाहिर न होण्यासारख्या संभाषणातुन तथाकथित व्होटबॅंकेसाठी असे बोलले हा संशय फायदा कसा देता येईल? म्हणजेच ते त्यांच्या मनातलेच वाक्य असुन त्यात त्यांची हिंदूविरोधी भुमिका पुरेसी स्पष्ट होते.

बबलु's picture

18 Dec 2010 - 2:04 pm | बबलु

+१.
कडक प्रतिसाद.

स्पा's picture

18 Dec 2010 - 2:05 pm | स्पा

+२

शिल्पा ब's picture

18 Dec 2010 - 2:11 pm | शिल्पा ब

+१

चिंतामणी's picture

18 Dec 2010 - 2:53 pm | चिंतामणी

फक्त वोट बॅकेसाठी त्यांनी मुस्लिमांना चुचकारण्यासाठी असले विधान केले आहे.

करू द्यात हो असली स्टेटमेंटस.

बिहार निवडणुकीच्या वेळी राज ठाकर आणि इतर मराठी नेत्यांवर चिखलफेक केली.

रा.स्व.संघाची तुलना सिमीशी केली.

रेल्वेतुन बिहार ते मुंबई प्रवसाचा स्टंट केला.

निकाल काय लागला माहीत आहे ना.

क्लिंटन's picture

18 Dec 2010 - 2:11 pm | क्लिंटन

भारताला लष्कर-ए-तोयबापेक्षा हिंदू दहशतवाद्यांकडून धोका जास्त आहे या खासदार आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस (युवराज किंवा भावी पंतप्रधान नव्हे) राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध.

मूळ लेखात लिहिलेल्या इतर गोष्टी (सहा कलमी आवाहन आणि चित्रपटनिर्मिती) कोणतेही भाष्य करण्यासारख्या आहेत असे वाटत
नाही तेव्हा त्यावर काही लिहित नाही.

क्लिंटन

गांधीवादी's picture

18 Dec 2010 - 3:11 pm | गांधीवादी

>>भारताला लष्कर-ए-तोयबापेक्षा हिंदू दहशतवाद्यांकडून धोका जास्त आहे या खासदार आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस (युवराज किंवा भावी पंतप्रधान नव्हे) राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध.
अपेक्षित होते.

>>मूळ लेखात लिहिलेल्या इतर गोष्टी (सहा कलमी आवाहन आणि चित्रपटनिर्मिती) कोणतेही भाष्य करण्यासारख्या आहेत असे वाटत नाही तेव्हा त्यावर काही लिहित नाही.
आपल्याला माझे उपाय पटलेले नाहीत असे मानतो, मग ह्या लष्करे-तोयबा पेक्षा घातक असलेल्या हिंदू दशतावाद्यांना आळा घालण्याचा आपणच काहीतरी उपाय सुचवावा.

तिमा's picture

19 Dec 2010 - 11:10 am | तिमा

विषय महत्वाचा पण थिल्लरपणे हाताळलेला असल्यामुळे प्रतिसाद नाही.
इथे चर्चा कशाला करत बसता, पुढच्या निवडणुकीला याचे उत्तर काँग्रेसला मिळणारच आहे.

अनामिका's picture

19 Dec 2010 - 11:38 am | अनामिका

सहमत!
आता एकदाच पण कायमचे लक्षात राहिल असे सणसणीत उत्तर देण्याची वेळ आलीच आहे. आणि एकगठ्ठा मतदान करुन काँग्रेसला व बगलबच्च्यांना त्यांची खरी जागा दाखवून द्यायलाच हवी...."अती झाल आणि हसु आल 'म्हणायची वेळ आणली आहे या मुर्खांनी .

गांधीवादी's picture

19 Dec 2010 - 6:01 pm | गांधीवादी

>>आणि एकगठ्ठा मतदान करुन **** व ******* त्यांची खरी जागा दाखवून द्यायलाच हवी....
सहमत.
इतरत्र गुजराथ आणि बिहार येथे जसे कोन्ग्रेसच्या विरोधात जनतेला एक सक्षम पर्याय मिळाला, त्याचप्रमाणे इथे महाराष्ट्रात कोण असू शकेल ?

खर पाहता या प्रश्नाचे उत्तर मी देखिल शोधायचा प्रयत्न करते आहे....विरोधीपक्ष म्हणून जी काही बांधलेली मोट सध्या उपलब्ध आहे त्यांच्यात स्वतःत देखिल एकवाक्यता नाही आणि एका पक्षा पासून फारकत घेवून वेगळी चुल मांडलेला दुसरा पक्ष अजून तरी बाल्यावस्थेत आहे व हे सगळेच सक्षम विरोधी पक्ष म्हणून एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडया करण्यात धन्यता मानत आहेत....पण काँग्रेसला व त्याचेच प्रतिबिंब असलेल्या राष्ट्रवादीला पर्याय शोधायचाच झाला तर या समोर असलेल्या ३ पर्यायांमधूनच शोधावा लागेल्....बाहेरुन आयात तर कुणाला करता येणे शक्य नाही.....पण जर जनता जागरुक आहे हे लक्षात आले तर याच पर्यायांमधिल एखादा पर्याय महाराष्ट्राला एक सक्षम राज्यकर्ता व उत्तम शासक व शासन देऊ शकेल याची खात्री आहे......

प्रदीप's picture

19 Dec 2010 - 6:36 pm | प्रदीप

थोडक्यात असा पर्याय सध्या उपलब्ध नाही, इतकाच तो ह्या गोलमाल उत्तराचा मतितार्थ आहे.

इतरस्त्र ह्याच धाग्यावर तुम्ही लिहीलेतः

केवळ एका उत्तरप्रदेशच्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका जिंकण्यासाठी जर युवराजांनी हि पोपट पंची केली असेल तर मग त्याची लायकी आणि बुद्धी किती प्रगल्भ असेल याचा अंदाज सर्वसामान्य हिंदूना ( जे गर्वाने हिंदु म्हणवतात ते)नक्कीच आला असेल....

निवडणूकांचा प्रश्न उमस्थित होतोच कसा हे समजले नाही. की

१.

(अ) अमेरीकन एम्बसीच्या पदाधिकार्‍याकडे जे काही बोलले जाईल ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर फुटेल अशी राहूल गांधींना शंका/खात्री होती (कॉन्स्पिरसी थेयरी) म्हणून

(ब) निवडणूकांवर डोळा ठेऊन राहून गांधीने ते मूर्ख विधान केले

असे तुम्हाला म्हणायचे आहे;

किंवा

२.

राजकीय नेते जसे पुढला मागला कसलाही विचार न करता नुसती बेफाट वक्तव्ये करतात तसे तुम्ही येथे केले आहे (कोण जाणे तुम्हीही राजकीय नेत्या आहात किंवा त्या मार्गावर आहात?)

ह्यांपैकी नक्की काय आहे?

अनामिका's picture

19 Dec 2010 - 7:55 pm | अनामिका

श्री प्रदिप
जय महाराष्ट्र!
बरोबरच आहे तुमच....
"केवळ एका उत्तरप्रदेशच्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका जिंकण्यासाठी जर युवराजांनी हि पोपट पंची केली ".
इथे थोडा मागचा संदर्भ देण्याची तसदी मी घ्यायला हवी होती...पण अंमळ माझच चुकल्....
येत्या काहि दिवसात अथवा महिन्यात तामिळनाडु ,पश्चिम बंगाल,या राज्यांमधे तर उत्तरप्रदेश सारखे मुस्लिममतदारांचे प्रमाण जास्त असलेल्या राज्यात २०१२ला विधानसभा निवडणुका होवू घातल्या आहेत्..या सगळ्यावर नजर ठेवूनच काँग्रेसने येऊ घातलेल्या निवडणु़कीत मुस्लिम मतदारांना खुष करण्यासाठी हि विखारी मोहिम फार आधी पासुन राबवली असावी...( नव्हे आहेच)
याआधी देखिल राहुलने अश्या प्रकारची उथळ व बिनबुडाची विधाने केली आहेतच उदा: सिमी व संघ यांना एकाच पारड्यात तोलणे .....व अश्याच प्रकारची इतर अवास्तव विधाने राहुल यांच्या सुमार बुद्धीची चुणूकच दाखवतात..दिगविजयसिंग व चिदंबरम यांचे भगवा दहशतवाद या अनुशंगाने आलेले बेफाम वक्तव्य हा काँग्रेसच्या एका राजकिय षडयंत्राचाच भाग आहे.विकिलिक्स मार्फत झालेल्या एका खुलाश्यात काँग्रेसने २६/११चे देखिल राजकारणच केले आणि प्रसंगी काँग्रेस सत्तेवर येण्यासाठी धर्माचे हिन राजकारण करत कुठल्याही थराला जाऊ शकते "हे सत्य देखिल बाहेर आले आहेच....राहुलच्या विधानाचा विकिलिक्सने केलेला खुलासा हा एक कर्मधर्म संयोग आहे इतकच....
ज्या प्रकारे सध्या भ्रष्टाचाराचे रोज नवनवीन खुलासे होत आहेत ते पाहता उद्या मध्यावधी निवडणु़का जाहिर झाल्याच तर नवल नक्कीच वाटणार नाही.....आणि महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर सध्या महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या राज्यात ज्या प्रकारे भ्रष्टाचार बोकाळलाय ते पाहता बदल आवश्यक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे ..आणि गांधीवादी यांनी पर्याय काय असेल ?असा प्रश्न विचारला म्हणुन केवळ मी असलेल्या पर्यांयांमधूनच तो निवडावा लागेल असे मत दिले......
अवांतर-आजच्या काँग्रेसच्या अधिवेशनात राहुल विकिलिक्सने केलेल्या खुलाश्या बद्दल स्पष्टिकरण देणार असा होरा होता .पण सोयिस्कर रित्या मुख्य मुद्द्याला बगल देण्यात आली...बाकीचे प्रवचन खरे तर काँग्रेसने जनतेला देण्याची गरज नक्कीच नाही... काँग्रेसच्या करणी आणि कथनी मधे याआधी देखिल कधीच ताळमेळ नव्ह्ता आणि यापुढे देखिल असेल अशी अपेक्षा निदान माझी तरी नक्कीच नाही....आणि (कॉन्स्पिरसी थेयरी)बद्दलची शंका काँग्रेसजनांनाच होती मला असण्याचे कारण नाही......
आणि मी कुठ्ल्याही पक्षाची नेती वगैरे नक्कीच नाही. आणि तत्सम कुठल्या मार्गावरही नाही..............
ह्म्म! एका पक्षाची विचारसरणी अंगिकारते हे मात्र नक्की.....कारण गुलामगीरीचे जोखड मानेवर बाळगत ,गांधी घराण्याला जणू हा देश आंदण दिलाय आणि त्यांच्या शिवाय हिंदुस्थानाचे तारणकर्ते कुणी दुसरे राज्यकर्ते असू शकत नाही अश्या प्रकारची मानसिकता माझी नाही...
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

विकि's picture

21 Dec 2010 - 1:10 am | विकि

मी तुमच्याशी सहमत आहे, मुळात तुम्ही ज्यांना हा प्रतिसाद लिहीला आहे त्यांनी राहूल गांधी द्वेषातून अगदी बाळबोध लिहीले आहे.
त्या लेखिकेने असे लिहीले आहे की निवडणुका जवळ येत आहेत आणि राहूल गांधी काही कडव्या हिंदूना दहशतवादी म्हणाला म्हणजे मुस्लीम खूश होतील. असे लेखिकेने लिहीणे म्हणजे तिचे मुसलमान समुदायावर संशय घेणे असाच होत आहे. हे विधान राहूल वैयक्तिक किंवा राजकारणाने प्रेरीत असेलही पण त्याच्या विधानाने एखादा समाज आनंदीत होईल असे म्हणणे चुकिचे आहे.
आणि कोणीही कितीही शिव्या हासडल्या तरी लोकसभेत गांधी घराण्याशिवाय देशाला पर्याय नाही हे कटू सत्य आहे., आजवर त्यांना अनेकदा हरवण्याचे प्रयत्न झाले पण काही वर्षे सोडली तर तेच सत्तेत आहेत आणि यापुढे ही असणार. लोकांना काँग्रेसची सवय झाली आहे.

नितिन थत्ते's picture

21 Dec 2010 - 7:41 am | नितिन थत्ते

>>कोणीही कितीही शिव्या हासडल्या तरी लोकसभेत गांधी घराण्याशिवाय देशाला पर्याय नाही हे कटू सत्य आहे.,

असहमत. त्यांना हरवायला जमत नाही हे बरोबर पण पर्याय नाही हे बरोबर नाही.

गांधी द्वेषातून बाळबोध लिहिले आहे हेही बरोबर.

"मी तुमच्याशी सहमत आहे, मुळात तुम्ही ज्यांना हा प्रतिसाद लिहीला आहे त्यांनी राहूल गांधी द्वेषातून अगदी बाळबोध लिहीले आहे."

बरोबर आहे विकीराव मी नुसता राहुल गांधीच नव्हे संपुर्ण काँग्रेसपक्षाचा व त्यांच्या बकवास विचारसरणीचा द्वेष करते...आणि हे मी जाहिर पणे मान्य करते ...का काही हरकत आहे का तुमची?

"त्या लेखिकेने असे लिहीले आहे की निवडणुका जवळ येत आहेत आणि राहूल गांधी काही कडव्या हिंदूना दहशतवादी म्हणाला म्हणजे मुस्लीम खूश होतील. असे लेखिकेने लिहीणे म्हणजे तिचे मुसलमान समुदायावर संशय घेणे असाच होत आहे. हे विधान राहूल वैयक्तिक किंवा राजकारणाने प्रेरीत असेलही पण त्याच्या विधानाने एखादा समाज आनंदीत होईल असे म्हणणे चुकिचे आहे."

सुतावरुन स्वर्ग गाठण्याची खोड काही जात नाही काही माणसांची ....समस्त मुस्लिम समुदायावर संशय घेण्याची मानसिकता तुमची असु शकेल माझी असण्याचे कारण नाही......आणि मुख्य म्हणजे सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसपक्षाने मुस्लिम समुदायाचा निव्वळ स्वार्थासाठी वापरच केला आजतागायत हे सत्य आता त्या समाजाला देखिल कळून चुकलेय आणि त्याचा प्रत्यय गुजराथ,बिहारात काँग्रेसच्या झालेल्या पानीपता वरुन येतोच आहे...पुढे पण येईलच

" आणि कोणीही कितीही शिव्या हासडल्या तरी लोकसभेत गांधी घराण्याशिवाय देशाला पर्याय नाही हे कटू सत्य आहे., आजवर त्यांना अनेकदा हरवण्याचे प्रयत्न झाले पण काही वर्षे सोडली तर तेच सत्तेत आहेत आणि यापुढे ही असणार. लोकांना काँग्रेसची सवय झाली आहे"

आजपर्यंत तुंम्हाला डाव्या विचारसरणीचे अर्थात कम्युनिस्ट समजत होते पण तुंम्ही देखिल शेवटी काँग्रेसची विचारसरणी मान्य केलीत ते बघुन अतिव दु:ख झाले. आता कम्युनिस्टांचे कसे होणार?
५७ वर्षे देशावर राज्य करुन ज्या घराण्याने या देशाला भ्रष्टाचाराची किड लावली आणि त्याच अनैतिक मार्गाने स्वत्:च्या व स्वपक्षाच्या तुंबड्या भरत हिंदुस्थानातील जनतेची लुट करत अब्जोकोटि रुपये गोळा केलेत .त्याच काळ्या पैशाच्या वापरातून निवडणूकांमधे झोपडपट्ट्यांमधून अशिक्षित व गरिब मतदारांना पैसा वाटून सत्तेत येण्याचा खेळ करणार्‍या घराण्याला हरवता येणे कुणालाच शक्य नाही....१२५ वर्षात केलेली लुट नक्कॉच मोजदाद करता येण्यासारखी नसेल नाही का?....बाकी पक्षांनी त्यांच्याच कडून धडे घेतलेत म्हणजे आज देशात ज्या काही समस्या निर्माण झाल्यात त्याला सर्वार्थाने काँग्रेसपक्षच जबाबदार आहे नाही का?
पण तरिही आताची परिस्थिती पुर्वी सारखी नाही तेंव्हा लवकरच जनताच आता त्यांना घरी बसवेल......इतक लक्षात ठेवा....आणि काँग्रेसची सवय लोकांना नाही झाली पण तुंम्हास जरुर झाली आहे हे मात्र खरे...उगीच सगळ्यांना त्या मुर्ख राहूल सारख एका तागड्यात तोलू नका!

विकि's picture

22 Dec 2010 - 12:17 am | विकि

मुस्लिम मतदारांना खुष करण्यासाठी हि विखारी मोहिम फार आधी पासुन राबवली असावी...( नव्हे आहेच), हे वाक्य अनामिकाताईंनी लिहीले आहे. या ताईंनी लिहीलेल्या वाक्याचा काय अर्थ निघू शकतो तेच मी मांडले आहे.त्यांनी शेवटी "नव्हे आहेच " हे वाक्य अतिशय ठामपणे मांडले आहे. केवळ राहूल गांधींच्या बोलण्याने मुस्लीम समुदाय खुष होतील ही थिअरी कोणाची आहे, ताईं तुमचीच ना. असे असते तर नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत (तुम्ही ते वर लिहीलेच आहेत पण ते कसे हे पटवून सांगत आहे) काँग्रेस सत्तेत आलीच असती,बिहार मधून तर काँग्रेस केव्हाच हद्दपार झाली आहे. कारण आताचा सत्ताधारी पक्ष लोकांपर्यंत पोहचला आहे,पण मला ताईंनी केलेल्या मुस्लीम द्वेषाबाबत तिव्र दुखः झाले. कारण केवळ माणूस म्हणून जगावे हे तत्व आम्ही स्विकारले आहे.
एक लक्षात घ्या राजकारणात डावपेच हे करावेच लागतात. त्या शिवाय सत्ते येणे मुश्कील .शेवटी अंतिम उद्दीष्ट सत्ता . आणि परिवर्तन करायचे असेल तर त्याबाबत लोकांनी जागरूक राहीले पाहीजे. आणि लोक जे होतय ते पाहत राहीले म्हणूनच सत्ताधार्‍यांचे (यात विरोधकही आले) फावले. ते मालामाल झाले.
अजून एक बुद्धीवादी मंडळी यांनी सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सामाजिक, कामगार चळवळी संपल्या आहेत. आज देशात एकतरी चळवळ गतिमान आहे का? तर नाही . मग दबावगट निर्माण होणार तरी कसे. यामुळेच सत्ताधार्‍यांवर अंकुश राहीला नाही आणि भ्रष्टाचार वाढला. देशात अगदी नगसेवकांपासून सारेच करोडपती आहेत(काही पक्ष सोडून) . आता पैसा फॅक्टर महत्वाचा आहे. जास्त पैसा जास्त मान.
तुम्ही काँग्रेसचा द्वेष करता , पण का ते लिहीले नाहीत. आज जो भ्रष्टाचार बोकाळला आहे तो काही पक्ष सोडून सगळ्याच पक्षांत आहे. मग तुम्ही काँग्रेलाच का घेऊन बसलात. माझी हरकत याला आहे की तुमचा द्वेष तुम्ही पटवून दिला नाही. त्यामुळे मिपावरील थत्ते काकांसारख्या विद्वानांना वाईट वाटले असणार. केवळ द्वेष बुध्दीतून तुम्ही लिहीत सुटलात असे वाटले.
आता तुम्ही विचार करा उदा. महाराष्ट्रात काँग्रेस परत एकदा सत्तेवर आली. तेव्हा सत्तेत येण्याजोगी परिस्थिती नव्हती पण विरोधी पक्ष कमजोर लोकांनी हातालाच कौल दिला. त्यानंतर लोकसभा निवडणूक विरोधक कमजोर परत संपुआ चे सरकार या गोष्टी हेच अधोरेखीत करतात की जनतेला माहीत आहे काँग्रेस शिवाय पर्याय नाही. विरोधक पण तेच करणार (अपवाद काही पक्षांचा)आहेत त्यापेक्षा हातच बरा. कारण हाताला राज्यकारभार करायचे माहीत आहे. जर विरोधक कमजोर असेल तर आपल्याला काँग्रेसला दोष देऊन फायदाच नाही. मुळात हे विरोधक लोकांमध्ये पोहचतच नाही आहेत, आणि तिथेच सत्त्ताधार्‍यांचे फावत आहे.
आता तुम्ही कोणत्या विचारसरणीला जवळ करता ते मला माहीत नाही. मी काँग्रेस विचारसरणी मानली नाही , तर वस्तूस्थिती मांडली आहे. आणि ताईंनी त्याला विरोध केला आहे.

रणजित चितळे's picture

23 Dec 2010 - 11:12 am | रणजित चितळे

अनामिका

आपला सडेतोड प्रतिसाद खुप आवडला. बरीच लोक आपली मते उगाचच लपवुन ठेवतात. आपला प्रतिसाद आवडला

विकि's picture

23 Dec 2010 - 11:22 am | विकि

चितळेंचा प्रतिसाद आवडला. त्यांनी आपले मत लपवून ठेवले आणि लोकांवर घसरले.

त्यानी हिंदु मुलतत्चवादी लोकांच्या मुळे हिंदु-मुस्लिम सहिष्णुतेला धोका आहे असे म्हटले आहे.त्यात बरेच तथ्य देखिल आहे.अमेरिकेचा मुस्लिम तिरस्कार आपल्या सारख्या सहिष्णुततावादी देशाला परवडणार नाही. कारण भारतात जवळ जवळ २० % मुस्लिम राहतात. हिंदु मुस्लिम सलोखा टिकला तर इथे दहशतवादाला थारा मिळणार नाही, हे त्याला सुचित करावयाचे होते असे मला वाटते. नाहीतर सनातनी सारख्या संस्था आपल्याच देशात सुतळी बॉम्ब फोडतच आहेत ना? मग नाकाला इतक्या मिरच्या झोंबण्याची काय गरज आहे.

अनामिका's picture

19 Dec 2010 - 6:28 pm | अनामिका

वेताळ
तुंम्ही सुद्धा?????????????????????

एरवी राहुल गांधी आवडला नसता पण आपण आजपासून फॅन त्याचे. हिंदुंमध्ये पन वेळ पडली तर हत्यार उचलायची हिंमत आहे हे मान्य केले. युवराजांनी प्रशस्तिपत्रक दिल्यावर आज जरा आत्मविश्वास वाढला! ;)

सर्वात आधी त्या लाचार प्रचार माध्यमांरारखे त्याला 'युवराज' संबोधणे थांबवा. (भले मग ते उपरोधाने का लिहिलेल असेना.)
एक वेळ त्या टीव्ही वाल्यांना तस संबोधण्यासाठी कदाचीत पैसे चारत असतील, पाण आपल्या कडुन का फुकाची प्रसिद्धी ?

चिंतामणी's picture

18 Dec 2010 - 3:05 pm | चिंतामणी

त्याला 'युवराज' संबोधणे थांबवा.
पण आपल्या कडुन का फुकाची प्रसिद्धी ?

एकदम बरोब्बर बोल्लात भौ.

१०० % सहमत.

नगरीनिरंजन's picture

18 Dec 2010 - 3:10 pm | नगरीनिरंजन

फारच वाहियात इन्सान आहे हा राहुल गांधी. कै. राजीव गांधींच्या आत्म्याच्या मनाला याचा वाहियातपणा पाहून किती यातना होत असतील तोच (म्हंजे आत्माच) जाणे.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Dec 2010 - 3:21 pm | परिकथेतील राजकुमार

माननिय श्री. राहुल गांधी ह्यांच्याशी सहमत आहे. पुढे जाउन असे म्हणेन की केवळ भारतालाच न्हवे तर मिपाला देखील अतिउजव्या हिंदू गटांकडून अधिक धोका आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Dec 2010 - 3:37 pm | निनाद मुक्काम प...

हे विकीलिक्स ना खूप वाईट आहे.
,आणि ते अमेरिकन राजदूत तर भारी चोंबडे आहेत .
त्यांच्या तोंडावर तीळ भिजत नाही .

टारझन's picture

18 Dec 2010 - 4:42 pm | टारझन

थत्तेचाचांना मिपाचे युवराज म्हणावे काय ? :)

रन्गराव's picture

18 Dec 2010 - 5:13 pm | रन्गराव

तुमी म्हणून न म्हणून काय उपेग नाय. किताब-वाटप केंद्र थत्तेंकडेच आहे , त्यांनी स्वतःहून घोषणा केली तरच हा किताब अधिकृत मानन्यात येइल. तेंव्हा त्यांनाच तस सुचवा ;)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Dec 2010 - 5:18 pm | परिकथेतील राजकुमार

थत्तेचाचांना मिपाचे युवराज म्हणावे काय ?

सहमत आहे.

त्यामुळे त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यास सुरुवात होईल काय?

तसेच हातासरशी अवलिया ह्यांना अतिउजव्या गटाचे हिंदू दहशतवादी देखील घोषीत केले जावे.

विजुभाऊ's picture

21 Dec 2010 - 11:39 am | विजुभाऊ

त्यांच्या तोंडावर तीळ भिजत नाही .

तोंदावर नाही भौ.... तोंडात तीळ भिजत नाही असा वाक्प्रचार आहे तो.
तोंडावर तीळ भिजत नाही .
हे षृंगारीक वाटते

आता हे तिळ बिळ कुठुन आणले मधे ? नको तिथे षृंगार ? :) विजुभाउ .. ऑनसाईट कमी करा .. खि खि खि
तुम्ही तिळातिळाने घरच्या काश्मिर मधुन माघार घेताय.

चिंतामणी's picture

18 Dec 2010 - 3:36 pm | चिंतामणी

माननिय श्री. राहुल गांधी असे स्पष्ट लिहील्याबद्दल धन्यवाद.

नुसतेच मा.श्री. राहुल गांधी लिहीले असतेस तर काहिही अर्थ काढला असता मिपाकरांनी. ;)

आत्मशून्य's picture

18 Dec 2010 - 6:11 pm | आत्मशून्य

हा हा हा...

मदनबाण's picture

18 Dec 2010 - 6:13 pm | मदनबाण

सहमत... ;)

मराठी_माणूस's picture

18 Dec 2010 - 3:39 pm | मराठी_माणूस

कुठलाही गुणविषेश नसताना (अपवाद: विशिष्ठ कुटुंबाशी संबधीत), ज्येष्ठ राजकारण्यांच्या कणाहीनते मुळे महत्व प्राप्त झालेले व्यक्तीमत्व . अनुल्लेखाने मारणे योग्य.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Dec 2010 - 3:49 pm | निनाद मुक्काम प...

हे विकीलिक्स ना खूप वाईट आहे.
,आणि ते अमेरिकन राजदूत तर भारी चोंबडे आहेत .
त्यांच्या तोंडावर तीळ भिजत नाही .
अवांतर (आमच्या लग्नाला आम्ही हिंदू म्हणून माझ्या बायकोच्या घरच्यांनी विरोध केला नाही हे अत्यंत गोपनीय गुपित .हे अपेयपान करताना टर्मिनेटर ह्यांना निनाद ह्यांनी सांगितले व म्हणून राजकारणात कोणतेही मोठे पद आम्ही स्वताहून स्वीकारले नाही. .) बाकी मिपा वर आमच्या लग्नाची कहाणी व मोठे पद का नाकारले ह्या टर्मिनेटर च्या प्रश्नावर उत्तर म्हणून एक इ बुक लिहिणार आहोत जे इटालियन व इंग्रजीत लिहिणार आहोत )मराठीत अनुवाद करायचे हक्क मिपा वरील जेष्ठ सदस्यांना बहाल आधीच केले आहे .

सुनील's picture

18 Dec 2010 - 5:08 pm | सुनील

विकिलीक्समधिल मूळ वाक्य असे आहे.

Gandhi said there was evidence of some support for the group among certain elements in India's indigenous Muslim community. However, Gandhi warned, the bigger threat may be the growth of radicalized Hindu groups, which create religious tensions and political confrontations with the Muslim community.

जेव्हा बाह्य शक्तींकडून हल्ला होतो तेव्हा भारतातील सगळी जनता एक होते. हे आपण ७१ च्या युद्धात तसेच २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी पाहिले आहे.

पण देशाला खरा धोका अस्तनीतील निखार्‍यांपासूनच असतो. हे अस्तनीतील निखारे हिंदू अतिरेकी असतील वा मुस्लिम अतिरेकी. त्यांमध्ये हिंदू अतिरेक्यांचा धोका अधिक आहे असे मूळ वाक्य म्हणते.

आता हिंदू ८०% आणि मुस्लिम १२% आहेत हे लक्षात घेतले तर, ह्यात फारसे वावगे वाटत नाही.

बाकी लेख नेहेमीसारखाच! त्यामुळे त्यावर भाष्य नाही!

गांधीवादी's picture

18 Dec 2010 - 5:15 pm | गांधीवादी

>>पण देशाला खरा धोका अस्तनीतील निखार्‍यांपासूनच असतो.
सहमत,
देशाला खरा धोका न भगव्या, न हिरव्या, न लाल दहशतवाद्यांकडून आहे.
देशाला खरा धोका पांढर्या दहशतवाद्यांकडून आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Dec 2010 - 10:25 pm | निनाद मुक्काम प...

देशाला सर्वात जास्त धोका लाल भाई नक्षलवाद्यांचा आहे .त्त्याचा उल्लेख सुध्धा केला नाही .
लालभाई विरुध्ध ऐकायला अमेरिकेला आवडले असते .त्यांचा उल्लेख हि नसावा .

चेतन's picture

19 Dec 2010 - 2:49 pm | चेतन

>>>हा हा हा... वरिल वेवेचन वाचुन "पण देशाला खरा धोका अस्तनीतील निखार्‍यांपासूनच असतो" याची खात्री पटली

विकिलीक्समधिल मूळ वाक्य असे आहे

Responding to the Ambassador's query about Lashkar-e-Taiba's activities in the region and immediate threat to India, Gandhi said there was evidence of some support for the group among certain elements in India's indigenous Muslim community. However, Gandhi warned, the bigger threat may be the growth of radicalized Hindu groups, which create religious tensions and political confrontations with the Muslim community.

यातिल मागिलपुढिल वाक्या़चा संबंध लावालात तर हे नक्कीच वावगे आहे

सुनील's picture

19 Dec 2010 - 5:28 pm | सुनील

ते वाक्य माझ्या प्रतिसादात गृहित धरलेच होते. म्हणूनच तर २६/११ चा उल्लेख मी केला होता.

थोडक्यात, कोणत्याही बाह्य (येथे लश्करे तोयबा) पेक्षा अंतर्गत धार्मिक अतिरेकी (हिंदू बहुसंख्य म्हणून हिंदू अतिरेकी अधिक) अधिक धोकादायक, हे विधान अजिबात वावगे ठरत नाही.

शिल्पा ब's picture

20 Dec 2010 - 12:45 am | शिल्पा ब

<<थोडक्यात, कोणत्याही बाह्य (येथे लश्करे तोयबा) पेक्षा अंतर्गत धार्मिक अतिरेकी (हिंदू बहुसंख्य म्हणून हिंदू अतिरेकी अधिक) अधिक धोकादायक, हे विधान अजिबात वावगे ठरत नाही.

काय म्हंता? तेज्यायला हे हिंदू लैच माजलेत...गपगुमान ऱ्हायचं सोडून ब्वांबची फोडाफोडी करतेत....मी त म्हंते हाकलून लावा त्यांना..कोन हाय रं पलिकडं, या हिकडं...काय म्हंता तुम्ही इऊ र्हायले पन ह्ये लोक तुम्हास्नी अतिरेकी म्हंतेत? आता काय कराव रावं?

काय कराचं वं?

थोडक्यात, कोणत्याही बाह्य (येथे लश्करे तोयबा) पेक्षा अंतर्गत धार्मिक अतिरेकी (हिंदू बहुसंख्य म्हणून हिंदू अतिरेकी अधिक) अधिक धोकादायक, हे विधान अजिबात वावगे ठरत नाही.
>>मान्य, कुठलंही विधान मान्य जर त्याला वास्तवाची जोड असेल तर....

मागील १० वर्षातील काहि उदाहरणे ज्या मुळे देशातील सुरक्षीतता धोक्यात आली?? देशातील शेकडो निरपराध नागरीकांचा मॄत्यू झाला?? देशातील उच्च पदावरील नेत्यांचा मृत्यू झाला??

प्रदीप's picture

19 Dec 2010 - 7:25 pm | प्रदीप

सर्वप्रथम त्या may be विषयी थोडेसे:

एकतर हे जे कोट केले गेले आहे ते अमेरीकन अधिकार्‍याच्या केबलवरून. तेव्हा हे may be राहूल गांधीचे असेलच असे नव्हे (तसे ते नसेलच असेही नव्हे). ह्या may be चा वापर केल्याने तशी शक्यता आहे, ठाम अ‍ॅसर्शन नव्हे, इतकेच स्पष्ट होते. तर मग प्रश्न असा: राहून गांधींना ही शक्यता का वाटली?

तर तुमच्या सरळ (लिनीयर) हिशेबाप्रमाणे देशातील हिंदू व मुस्लिम ह्यांच्या तुलनात्मक टक्केवारीमुळे! इतका सरळ हिशेब जर राजीव गांधी करीत असतील (--तितकेही चातुर्य त्यांच्यात आहे ह्याविषयी शंका आहे, पण त्या थोर वगैरे नेत्याला आपण इथे बेनिफिट ऑफ डाऊट देवू यात--) तर त्यांना देशाचा इतिहास, त्यातील धार्मिक दंगलींचा इतिहास अत्यंत तुटपुंजा माहिती आहे असे म्हणावे लागेल?

वास्तविक त्या गृहस्थाची आतापर्यंतची वाटचाल पहाता इतकाही विचार त्याने केला असेल असे म्हणणे चुकीचे वाटते. आपण (शिक्षीत लोक) असल्या एक्स्क्युजेस देऊन समाजाचा बुद्धिभेद तर करीत नाही आहोत ना?

जेव्हा बाह्य शक्तींकडून हल्ला होतो तेव्हा भारतातील सगळी जनता एक होते. हे आपण ७१ च्या युद्धात तसेच २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी पाहिले आहे

पण २६/११ मधे देशांतील काही व्यक्तिंचा हात होता ना? आणि २६/११ सारखे काही झाल्यावर देशांतर्गत काहीही विपरीत धार्मिक दंगली उसळल्या नाहीत हे जर तुम्हाला अभिप्रेत असेल तर त्याचे श्रेय भारतातील दोन्ही प्रमुख धर्मियांकडे जाते.

ता. क.: तुम्ही केलेला युक्तिवाद हे वक्तव्य उघड झाल्यानंतर काँग्रेसच्य कुठच्यातरी नेत्याने केले आहे का? आज तर खुद्द सोनिया(जी)च वेगळाच (अ‍ॅपोलोजेटीक) सूर लावत असतांना दिसता आहेत!

सुनील's picture

19 Dec 2010 - 7:58 pm | सुनील

हा हा!!

मी काँग्रेसचा प्रवक्ता नाही! किंबहुना मी सातत्याने काँग्रेसलाच मतदान करतो असेही नाही. कालपरत्वे सेना-भाजप वा काँग्रेस-रा.काँग्रेसला मत देतो!

असो.

अल्पसंख्यांकांच्या जमातवादापेक्षा बहुसंख्यांकांचा जमातवाद हा देशाला अधिक धोकादायक असतो, असे माझे प्रामाणिक मत आहे. कारण अल्पसंख्यांकांच्या जमातवादाला फुटीरपणाचे लेबल लावून त्याच्याशी लढता तरी येते. बहुसंख्यांकांचा जमातवाद हा राष्ट्रवादाचे/देशभक्तीचे गोंडस लेबल लावून येतो आणि मग त्याविरुद्ध बोलणाराला सहज देशद्रोही ठरवता येते.

त्याविषयी विस्ताराने नंतर कधीतरी.

महाराष्ट्रातील हिंदूंचे जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड (भले त्या महान लोकांचे नाव घाण करणे का होईना) यांना सगळे बहुसंख्य मान्यता देतात? त्यांच्या मूर्खपणाला आळा बसावा म्हणून काहीच बोलत नाहीत? त्यांना देशभक्त म्हणतात, हि माहिती नवीनच.

प्रदीप's picture

20 Dec 2010 - 7:25 am | प्रदीप

अल्पसंख्यांकांच्या जमातवादापेक्षा बहुसंख्यांकांचा जमातवाद हा देशाला अधिक धोकादायक असतो, असे माझे प्रामाणिक मत आहे.

थोडीफार सहमती. [भारतातील दोन प्रमुख धर्मियांत निव्वळ स्वतःच्या जवळच्या फायद्यासाठी (short term gains) फूट पाडणार्‍या राजकारण्यांचाही तितकाच, किंबहूना त्याहून अधिक धोका आहे असे मला वाटते].

पण इथे प्रश्न केवळ होम-ग्रोन दहशतवादाचा नव्हता, तर भारतात दहशतवादी (अलिकडे हिंदीने आपल्या डोक्यावर मारलेला नवीन शब्दः 'आतंकवादी') काय धुमाकूळ घालू शकतात ह्याविषयी होता. वर चेतन ह्यांनी दर्शवल्याप्रमाणे राहूल गांधींची टिपण्णी अमेरिकन राजदूताच्या 'लष्कर-ऐ-तोयबा' च्या (भारतातील) हालचालींविषयीच्या पृच्छेवर केलेली होती.

Responding to the Ambassador's query about Lashkar-e-Taiba's activities in the region and immediate threat to India, Gandhi said

तुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते आहात असा आरोप मी तुमच्यावर कसा करेन? प्रामणिकपणे सांगतो, मला तुमच्याविषयी आदर आहे आणि तो अशा घाणेरड्या आरोपांनी मी भग्न करणार नाही. मला हे दर्शवायचे होते की काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांच्या सर्वेसर्वा नेत्याही ज्या दु:तर्काचा आधार घेतांना दिसत नाहीत, त्याचा तुम्ही घेतांना दिसत आहात!

सुनील's picture

20 Dec 2010 - 6:46 pm | सुनील

लष्करे तोयबाचा भारताला काय threat असू शकतो? थेट युद्ध (conventional war)? हे शक्य नाही.

मग भारताला नामोहरम करण्याचा दुसरा उपाय म्हणजे येथिल समाजात उभी फूट पाडणे.

हे शक्य आहे.

पण त्यासाठी येथिल बहुसंख्य मुस्लिमांमध्ये Uprising against the state ची भावना निर्माण व्ह्यायला हवी. तरच हे शक्य आहे.

आता वळूयात विकिलीक्सकडे.

राहुल गांधी म्हणतात, भारतातील काही मुस्लिमांचा लष्करे तोयबाला पाठिंबा आहे परंतु देशाला खरा धोका हा हिंदूंमधिल वाढता मूलतत्ववाद हा असू शकतो.

लक्षात घ्या, ह्यातील पहिले वाक्य हे ठाम विधान आहे. त्यात may be वगैरेचा गुळमटपणा नाही. भारतातील काही मुस्लिम हे Uprising against the state च्या भूमिकेत नक्कीच आहेत (पण ते बहुसंख्य नाहीत).

आता दुसरे वाक्य. ह्यात ते म्हणतात, हिंदूंमधिल वाढता मूलतत्ववाद. (सगळे हिंदू मूलतत्ववादी (अतिरेकी) आहेत असे बिलकूल नाही पण त्यांच्यात मूलतत्ववाद वाढतो आहे. हे खरे वा खोटे असेल पण जर ते खरे असेल), तर तो अधिक मोठा धोका असू शकतो.

ह्या वाक्यांत मला तरी काहीही गैर दिसत नाही.

असो. ह्या धाग्यावरील हा माझा शेवटचा प्रतिसाद. पटत नसेल तर let's agree to disagree!

पण त्यासाठी येथिल बहुसंख्य मुस्लिमांमध्ये Uprising against the state ची भावना निर्माण व्ह्यायला हवी. तरच हे शक्य आहे.
दुर्दैवाने मी आणि सुनीलसाहेब एका बाजूला क्वचित् असतो, पण आज त्यांच्या वरील वाक्याशी पूर्ण सहमत.
माझ्या इतरत्र दिलेल्या प्रतिसादात मीसुद्धा हेच लिहिलेले आहे कीं भारताचे नागरिकत्व स्वखुषीने निवडलेल्या मुस्लिम समाजाने व त्यांच्या नेतृत्वाने या सर्व तथाकथित निधर्मी पक्षांना (pseudo-secular political parties) सांगितले पाहिजे आमचा अनुनय थांबवा, आम्हाला इतर नागरिकांइतक्याच सोयी-सवलती द्या आणि आम्हाला इतर नागरिकांत मिळून-मिसळून बंधुभावाने जगू द्या!
हा दिवस मला "याचि देही याचि डोळा" पहायला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

लौकर लिही. हा विषय जोपर्यन्त वरती आहे तोवर लिही.

नंतर लोक विसरुन जातात आणि लिहायचे राहून जाईल.

माझ्या मते काँग्रेसने (व त्यांच्यातून फुटलेल्या राष्ट्रवादी वगैरेंसारख्या उपपक्षांनी व या पक्षांना झालेला फायदा बघून लालू-मुलायम वगैरेसारख्या संधीसाधूंनी) अल्पसंख्यांकांचा बेसुमार अनुनय केला आणि तो चढत्या भांजणीचा होताना दिसतोय त्यामुळे (व केवळ त्यामुळेच) हिंदू जनता नाइलाजास्तव धर्माच्या नावाने एक होऊ लागली! हिंदूंना "गृहीत धरले जाऊ लागल्यामुळे" (taken for granted) आजची परिस्थिती निर्माण होऊ घातली आहे. याला हिंदू जनता जबाबदार नसून निर्लज्जपणे अल्पसंख्यांकांचा अनुनय करणारे राजकारणी (मुख्यतः काँग्रेसी) जबाबदार आहेत. राहुल गांधी हे त्यातले नवे खिलाडी! अजूनही हा अनुनय बंद केला तर हिंदू परत आपल्या मूळस्वभावकडे वळतील.
हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात असे होते यातच हिंदूंचा मोठेपणा आहे आणि भारताचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारलेल्या मुस्लिम समाजाने-त्यांच्या नेतृत्वाने-हा निर्लज्ज अनुनय नाकारण्याची वेळ आता आली आहे.
मुस्लिम बहुसंख्य असलेल्या देशांत काय होते ते आपण पाकिस्तानात व बांगलादेशमध्ये पाहिलेच आहे आणि आजही पहातोच आहोत. अपवाद आहे इंडोनेशियाचा. पण तिथेही परिस्थिती बिघडत चालली आहे असे अलीकडील ख्रिश्चनविरोधी कारवायांमुळे वाटू लागलेले आहे.
(मी भाजपाचा मतदार नाहीं, पूर्वी शिवसेनेचा जरूर होतो. ती फुटल्यानंतर यापुढे काय करायचे ते भारतात परतल्यावर ठरवेन!)

सुहास..'s picture

18 Dec 2010 - 5:17 pm | सुहास..

स्कोर काय झालाय रे पशा ? (दोन्ही पशांना कळल असेल अश्या अपेक्षेत ..)

वाश्या
दोन्ही पश्यांच्या मित्र

पैसा's picture

18 Dec 2010 - 7:26 pm | पैसा

तू मात्रा विसरला नाहीस ना? उत्तर खव मध्ये दिलंस तरी चालेल!

टारझन's picture

18 Dec 2010 - 7:52 pm | टारझन

ओह हाय वाश्या ... गंभिर- शेवाग अनुक्रमे ६१-६२ वर खेळत आहेत ;)

भारत : १३२ / ०

- वनवाश्या

डिजेबॉय's picture

18 Dec 2010 - 8:48 pm | डिजेबॉय

अरे हा दळभद्री मुम्बई ला आला तेव्हा याची दादर ला रस्त्यावरुन जायची हिम्मत नाही झाली, लोकल ट्रेन मधुन गेला साला.. अन पागल मिडिया साठी तो एक स्टन्ट झाला.

आणि फक्त हाच काय, पुर्ण congress च हिन्दुविरोधि आहे. :hat:

अरे हा दळभद्री मुम्बई ला आला तेव्हा याची दादर ला रस्त्यावरुन जायची हिम्मत नाही झाली, लोकल ट्रेन मधुन गेला साला.. अन पागल मिडिया साठी तो एक स्टन्ट झाला.

कृपया वाक्य लिहिताना अन्वयार्थ नि:संदिग्ध राहील याकडे लक्ष द्यावे. नेमके कोणाला / कशाला दळभद्री म्हटले आहे ते लक्षात येत नाही.

बाकी दादरच्या सेनापती बापट मार्ग / रानडे रोड वगैरेंवरून (धक्के खात) एक वेळ चालत जाऊ शकेन, पण दादरचा रेल्वेपूल ओलांडायला (आणि दादरला लोकलमध्ये चढउतार करायला) आपण तरी जाम टरकतो बुवा! त्यामुळे श्रीयुत राहुल गांधी यांनी दादरला रस्त्यावरून चालण्या(चे स्टंट करण्या)ऐवजी लोकलमधून जाण्याचे स्टंट करण्याची हिंमत केली असेल, तर ते (तुलनात्मक, आणि बिगरमुंबईकरासाठी अ‍ॅब्सोल्यूट) शौर्याचेच लक्षण मानायला पाहिजे, असे मला तरी वाटते.

डिजेबॉय's picture

19 Dec 2010 - 9:45 pm | डिजेबॉय

अर्थातच दळभद्री हा शब्द राहुल साठी वापरला आहे.
आणि सोबत पाळीव लोकान्चा समुह असताना लोकल मधे चढण्यात कसले आले शौर्य. :hat:

या हिशोबाने भिकारयाना अनेक शौर्य पदक मिळायला हवेत. [येथे भिकारी हा शब्द मी भिकारयानाच उद्देशुन लिहिला आहे] :hat:

राहुल गांधींनी अखेर कबूल केलं की हिंदू दहशतवादी लष्करे तैयबापेक्षा भारी आहेत. नाही तर काही लोक आपल्याला फारच पुळचट व खुळचट समजत होते. आता राहुल गांधीनीच हे सांगितल्यामुळे लष्करे तैयबाला धडकी भरेल यात शंका नाही. राहुलचा स्पष्टपणा आपल्याला आवडला बुवा.
ते लोक गुप्तपणे कारवाया करतात. घाबरट आहेत. आपण हजारो लोकांनी उघडपने जगभरातल्या लोकांच्या सामनेच बाबरी मशीद पाडून टाकली. कोणी काय पण वाकडे करू शकले नाही. खरंतर तेव्हाच आपली ताकद सिद्ध झालेली आहे. राहुल गांधीना खूप उशीरा लक्षात आलेय. गुजरातमध्ये सुद्धा आपण उघडपणे लफडा करून टाकला. काय पण कोनी वाकडे करू शकले नाही. डिसेंबर १९९२ नंतर आपण पोलिसांच्या साक्षीने उघडपणे मुंबईत पण आपली ताकद दाखवली आहे. आपन जे करतो ते उघडपणे. गुपचुप गुपचुप नाही. म्हणूनच राहुला गांधीला आपला जास्त धोका वाटतो. मालेगाव, अजमेरचे बॉंबस्फोट गुपचूपपने झाले म्हणून ते आपल्या लोकांचं काम नाही हे कोणी पन सांगेल. आपण राडा, लफडी, दंगली यांना घाबरत नाय. जे काय करायचं ते खुल्लम खुल्ला. पाठीमागून वार करण्यात कसला पुरुषार्थ? पण भारताला आपल्यामुळे धोका नाय पाकिस्तानला धोका आहे. हा राहुलने पाकिस्तानला दिलेला इशाराच आहे असं समजा.

मस्त प्रतिसाद..मेरेकु आवड्या.

सातबारा's picture

19 Dec 2010 - 9:45 am | सातबारा

रॉबर्टो गांधी (मुस्लीम + सीआयए) व सोनिया मायनो (ख्रिश्चन + केजीबी) यांच्या रॉल मायनो गांधी (युनिव्हर्सल क्रॉस) अशा सुपुत्राकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार ?

पंगा's picture

19 Dec 2010 - 7:14 pm | पंगा

'ख्रिश्चन' आणि 'केजीबी' हे दोन शब्द एकाच दमात उच्चारलेले पाहून अंमळ मौज वाटली. असो.

शिल्पा ब's picture

21 Dec 2010 - 8:36 am | शिल्पा ब

का बरं? आम्हाला पण सांगा ना..

कारण कम्युनिस्ट राजवट होती तेंव्हां कुणालाही कुठलाही धर्म पाळण्याची अनुज्ञा नव्हती. चीनमध्ये आजही तसेच आहे. आमच्याकडे व्यवसायानिमित्त येणार्‍या आणि माझा चांगला परिचय झालेल्या एका चिनी बाईला मी विचारले कीं "एरवी नसेल पण तुझे मूल खूप आजारी पडले तर देवाचा धावा करतेस कीं नाहीं?" ती उत्तरली "नाहीं.". "मग काय करतेस?" इति मी. ती म्हणाली कीं "आम्हाला लहानपणापासून logic वापरायला शिकवलेले असते त्यामुळे डॉक्टर चांगले/विश्वासू आहेत, औषधे बरोबर चालू आहेत या पलीकडे आमचा विचार जातच नाहीं!"
म्हणून ख्रिश्चन आणि केजीबीची मोट जरा विचित्र वाटली पंडित गागाभट्टांना!

प्रशु's picture

19 Dec 2010 - 11:44 am | प्रशु

रोजच्या रोज सापडणारे ह्या आधुनिक गांधीबाबांच्या मंत्रीमंडळातील आणि पक्षातील नेते हेच खरे दहशतवादी आहेत. देश भिकेला लावण्याचे सत्कार्य नित्यनेमाने पार पाडीत आहेत...

अविनाशकुलकर्णी's picture

19 Dec 2010 - 3:39 pm | अविनाशकुलकर्णी
रणजित चितळे's picture

19 Dec 2010 - 4:35 pm | रणजित चितळे

यांनी उचलली जिभ आणि लावली टाळ्याला (त्यांचे नेहमीचेच आहे म्हणा) आपण काही अर्थ निघतो का ते बघतोय.
बेजबाबदार वागणुक. आपला (होउ घातलेला) पंतप्रधान (पण नशिबात काय लिहीले आहे कोणीच सांगु शकत नाही) काय कुवतीचा आहे हे आपण समजुन घ्यायला पाहीजे.

जयेश माधव's picture

19 Dec 2010 - 7:56 pm | जयेश माधव

म्ह्णे भावी प॑तप्रधान्,तो॑ड बघा.......अशी विधाने करुन जर हे महाशय प॑तप्रधान बनणार असतील तर या देशाचे देवच भले करो!...
बाकी गा॓धीवादी॑नी च॑गला विषय मा॑ड्ला आहे.

असा कसा कॉंग्रेसचा देव बाई ठकडा
राहुल वाटे डोक्याने लंगडा ||ध्रु||
दूताघरी जातो तारे तोडतो
करी काँग्रेसी धोरणांचा रगडा ||ध्रु||

असो थट्टा पुरे. जेव्हा जेव्हा पापाचा प्रभाव वाढून धर्म दुबळा होतो तेव्हा मी अवतार घेतो असे भगवान म्हटले आहेत. भगव्या हिंदूत्ववाद्यांच्या पापाचे मडके भरत आले आहे आणि त्यांचे निर्दालन करायला ख्रिस्तीवंशात राहुलजी अवतरले आहेत. लवकरच ते तमा हिंदूत्ववाद्यांचा नि:पात करोत आणि भगवा रंग भारतातून नामशेष होवो अशी आकाशाच्या बापाचरणी प्रार्थना.

राजकारण, नागरी प्रशासन, पोलीस खाते, न्याय व्यवस्था, संरक्षण विभाग... या सर्व संस्था हिंदुच राबवत आहेत. जर या सर्व संस्था देशाचा कचरा करायला निघाल्यात तर त्या इतर कुठल्याहि बाह्य दहशतवादि संघटनेपेक्षा जास्त घातक आहेत. दहशतवादाचि समस्या या अंतर्गत समस्येपेक्षा फार फार सौम्य आहे. इतर समस्यांपुढे सामान्य माणुस हतबल झालेला आहे. तेंव्हा दहशतवादाच्या हिरव्या रंगाला झोडपण्यात भारतीय माणुस धन्यता मानतोय आणि त्याविरुद्ध २-४ वाक्य बोलुन आपण इतर सर्व समस्यांविरुद्ध लढल्याचा आव आणातोय.
दहशतवादाचा मुकाबला संरक्षणसंस्थेनेच करायला हवा. सामान्य नागरीकांची जागरुकताहि आवश्यक आहे. पण हिरव्या विरुद्ध भगवा दहशतवाद जर उभा राहाणार असेल तर देशाचे ३-१३ उद्या वाजायचे ते आज वाजतील. अराजकाशिवाय हाति काहिच पडणार नाहि. हिंसक स्वरुपाच्या भगव्या चळावळीने देशाचा घातच होईल.

अर्थात, राहुलबाबांना असलच काहि म्हणायच होतं अशातला भाग नाहि. त्यांच्याकडे आम्हि फार अपेक्षेने बघतोय, पण दिवसेंदिवस ते आमच्या पदरी निराशाच पाडताहेत :(

अर्धवटराव

गांधीवादी's picture

20 Dec 2010 - 6:50 am | गांधीवादी

>>राजकारण, नागरी प्रशासन, पोलीस खाते, न्याय व्यवस्था, संरक्षण विभाग... या सर्व संस्था हिंदुच राबवत आहेत. जर या सर्व संस्था देशाचा कचरा करायला निघाल्यात तर त्या इतर कुठल्याहि बाह्य दहशतवादि संघटनेपेक्षा जास्त घातक आहेत.
सहमत. आपल्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे. पण माझी चिंता नक्कीच वेगळी आहे.

आज विकीलीक्स ने जे काही प्रसिद्ध करते ते सर्व जगभर पसरायला वेळ लागत नाही. राहुलच्या विधानातून आपण वरील जो काही अर्थ काढला तोच अर्थ बाकीच्या जग काढेल असे नव्हे.

कोणतीही एक संस्था आणि दहशतवादी यांना जर एकाच मापाने जेव्हा तोलले जाते तेव्हा साहजिकच त्या संथ्वीरुद्ध मनात एक काळी प्रतिमा निर्माण होते. माननीय नितीन थत्ते यांच्या बरोबर झालेल्या चर्चेतील एका शंकेनुसार बाहेरच्यांना 'इथे हिंदू रस्तोरस्ती खूप पडत आहे' असे वाटले तर याला जबाबदार कोण ?

bar भारताला भ्रष्ट संस्थाकडून धोका आहे हे वेगळे सांगायची गरजच काय, हे कोणत्याही शेंबड्या पोराला देखील कळते. CWG, 2G, आदी घोटाळ्यांनी हे कधीच सिद्ध झालेले आहे. असे अनेक घोटाळे जगभर गाजले असताना, अमेरिकेच्या राजदूतांना गुप्तपणे हिदू दहशतवाद्यांपासून जास्त धोका आहे असे म्हणणे म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे.

याहून पुढे जाऊन असे म्हणता येतील कि अश्या भ्रष्ट संस्थांना नावे ठेवण्यापेक्षा त्यातील भ्रष्ट कारभार कमी करण्यासाठी राहुल (आणि त्याच्या हातातील खेळण्यांनी) यांनी किती ठोस पाऊले उचलली ?

अर्धवटराव's picture

20 Dec 2010 - 9:50 am | अर्धवटराव

राहुलबाबांची जीभ (आणि त्यामागे काहि विचार असेल तर ते सुद्धा) कधिकधी फारच सैल सुटते. एका निवडणुक प्रचाराच्यावेळी त्यांनी पाकिस्तानची फाळणी आणि बांगलादेशची निर्मिती हि "गांधी घराण्याची अचिव्हमेंट" आहे असं जाहिर विधान केलं होतं (आत्ता त्याचा नेमका संदर्भ आठवत नाहि... पण बहुतेक मागच्या बिहार विधानसभा/लोकसभा निवडणुकिची वेळ असावी). तेंव्हा आमचा प्रथम अपेक्षाभंग झाला :(. त्यानंतरही राहुलबाबा आपली सवय बदलायला तयार नाहि...

(अपेक्षार्थी) अर्धवटराव

एकूण दहशतवाद हा देशाला धोकादायकच. तो हिंदू, असो,जिहादी असो की माओवादी. लहान असो की मोठा. दहशतवादाबाबत जास्त धोकादायक व कमी धोकादायक असे काही नसते. तो सर्वसामान्य निरपराधांचे बळी घेतो. २६/११ च्या हल्ल्यात मुस्लिमही मारले गेले होतेच. दहशतवाद जात-धर्म बघत नाही. त्यामुळे “जास्त धोकादायक” म्हटले येवढ्यावरून नाहक काथ्याकूट करण्यात अर्थ नाही. कमी असो की जास्त जर.दहशतवाद असेल तर ते वाईटच. विकीलीक्स ने उद्या विरोधीपक्षांचीही अंडीपीली बाहेर काढल्यावर परत सत्ताधारी पक्षवाले घोळ घालणारच आहेत. आपण जनतेने यातील तथ्य काय ते ओळखायला हवे

हुप्प्या's picture

20 Dec 2010 - 7:24 am | हुप्प्या

दहशतवादाला धर्म नसतो हे खरे वाटत नाही. मुस्लिम अतिरेकी अल्ला हु अकबरच्या आरोळ्या ठोकत हल्ले करतात. कित्येकदा मुद्दाम शुक्रवारी, नमाजाच्या वेळेस बाँबस्फोट वा अन्य हल्ले केले जातात जेणेकरून धार्मिक मुस्लिम जे नमाज पढत असतील ते वाचावेत. अशा वेळी दहशतवादाला धर्म नसतो म्हणणे ढोंगीपणाचे वाटते.

२६/११ च्या अतिरेक्यांचे संभाषण ऐकले तर हमारे मुस्लिम भाई, हमारा मझहब ह्याचा उल्लेख येतो. मुस्लिम अतिरेकी आपले प्रशिक्षण मदरशात देतात. त्यांचे प्रेमळ अरब बंधु तेलात मिळवलेला पैसा धर्माच्या कामी यावा म्हणूनच अतिरेक्यांना देतात.
तेव्हा दहशतवादाला धर्म नसतो म्हणणे ढोंगीपणाचे वाटते.

बिन लादेन वा जवाहिरी आपल्या टेपा काढतो तेव्हा त्यात कुराणाचे, महंमदाच्या वागण्याचे दाखले देऊन आपण आता काय करणार आहोत ते सांगतो. अशा हल्ल्यापासून वाचायचे असेल तर इस्लाम स्वीकार म्हणतो.
तेव्हा दहशतवादाला धर्म नसतो म्हणणे ढोंगीपणाचे वाटते.

अर्धवटराव's picture

20 Dec 2010 - 10:00 am | अर्धवटराव

आज जगात मुस्लीम=दहशतवाद असं समीकरण नावारुपाला येतय (प्रथम मलासुद्धा हि अतिशयोक्ती वाटायची. पण जे काहि थोडेफार इतर देशातल्या लोकांशी संवाद होतो त्यातुन जवळपास सर्वांच्याच बोलण्यात असलं काहितरी येत असतं) पण याचा फटका सर्वप्रथम शांतीप्रीय मुस्लीमांनाच बसतो. म्हणुन सरसकट असं विधान नाहि करता येत. आणि भारताबद्दल बोलायचं तर आपण या समिकरणानुसार आपल्या भोवताली १२-१५ करोड दहशतवादी आहेत असं काहिसं होईल. आणि असं अजीबात नाहि... नाहितर एव्हाना भारताचे आणखी तुकडे पडले असते.

(भारतीय) अर्धवटराव

सुधीर काळे's picture

20 Dec 2010 - 4:31 pm | सुधीर काळे

खरं तर अमेरिकन राजदूतापाशी बोलताना राहुल यांना ते निवेदन फुटेल असे वाटलेच नसावे. कारण फुटल्यावर सारवासारवीचे एक निवेदन त्यांनी केले होते, पण काँग्रेसचे जे अधिवेशन चालू आहे त्यात त्यांनी याबाबत चुप्पी साधली आहे.
पण आधीच त्यांनी सिमी आणि रास्वसं यांना एकाच पारड्यात घालून त्यांच्या अनुयायांना "मार्गदर्शन" केलेच होते. आता त्यातलेच एक जोरजोराने भुंकत आहेत.
पण ज्या देशाला राहुल आणि दिग्विजय सिंग यांच्यासारखे नेते मिळण्याचे 'भाग्य' लाभले आहे त्या देशाला स्वतःचा सत्यानाश करायला परकीय शक्तींची गरजच नाहीं. राहुल आणि दिग्विजय सिंग यांच्यासारखे नेतृत्व ते एकाहाती करायला समर्थ आहे यात शंकाच नाहीं.
जय हिंद!

विजुभाऊ's picture

20 Dec 2010 - 5:37 pm | विजुभाऊ

तोयबाशी तूलना कोनत्याच अर्थाने होऊ शकत नाही.
कारण कट्टरपणा हिंदूंना जमणारा गुणधर्म नाही
धर्मासाठी सगळे सोडून लश्करची भाकरी भाजणे हिंदूचा गुणधर्म नाही.

अती उजवे हिंदू म्हनजे काय हो गांवा काका

समंजस's picture

20 Dec 2010 - 6:27 pm | समंजस

दिग्विजय सिंग यांचे आणि काँग्रेस पक्षाचे विचार (धोरण) हे नेमके पुर्वीच्या ब्रिटिश सरकारच्या विचारांशी (धोरणांशी) मिळते जुळते आहेत. म्हणजेच "फोडा आणि राज्य करा"

जेव्हाही पक्ष संकटात असेल (निवडणूकीत पराभूत होण्याची दाट शक्यता असेल) आणि भ्रष्टाचार, अकार्यक्षमता हे आरोप जनता करत असेल तेव्हा जातियवादाचं भुत निर्माण करायचं आणि त्या भुताची भिती जनतेला घालावी म्हणजे जनता काँग्रेस पक्षाची /सरकारची अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार विसरणार आणि काँग्रेस पक्ष पराभूत होण्यापासून वाचणार.

हे नेहमीचचं झालंय, काहि नविन नाहि.

[अभिनंदन बिहारी जनतेचे त्यांनी काँग्रेस पक्ष आणि समविचारी/समधोरणी पक्षांच्या असल्या बागुलबोवाला बळी न पडता राज्याच्या तसेच संपुर्ण समाजाच्या विकासाला महत्त्व दिलं, आशा आहे पुढिल निवडणू़कीत देशातील जनता सुद्धा बिहारी जनतेसारखीच परिपक्वता दाखवणार]

हुप्प्या's picture

20 Dec 2010 - 6:48 pm | हुप्प्या

प्रत्येक वेळी मुस्लिम धर्म हा शांतताप्रेमी असल्याचे तुणतुणे वाजवले जाते. पण ह्या अतिरेक्यांची प्रेरणा ही इस्लाम हीच आहे हे नाकारता येणार नाही.
अमुक इतके कोटी मुस्लिम लोक आहेत. सगळेच अतिरेकी कसे असतील वगैरे प्रश्न बरोबर आहेत. पण एक म्हणजे उघडपणे "होय, मी अतिरेक्यांचा समर्थक आहे" असे कुठला मुस्लिम जाहीरपणे म्हणेल? सगळेच काही "सर पे कफन बांध के" नसतात. पण कित्येक जणांची सहानुभूती असते. ९/११ वाईट झाले पण पॅलेस्टाईनमधे इस्रायल तेच करते. २६/११ वाईट आहे पण काश्मीरमधे भारत तेच करते अशी मॉरल इक्विव्हॅलन्सी दाखवणारे मुस्लिम कमी नाहीत. अशा सहानूभूतीमुळे अतिरेकी लोकांना संरक्षण मिळते. अगदी मदत केली नाही तर दुर्लक्ष केले जाते. पांघरूण घातले जाते. अफझल गुरुला फाशी द्यायला काँग्रेस का कचरते आहे? ह्याच कारणाने.

नक्की किती टक्के मुस्लिम अशा प्रकारे थेट वा आडवळणाने अतिरेकी, जिहादी विचाराचे आहेत ह्याची आकडेवारी माहीत आहे का? मला तरी नाही. आणि अशा सर्वेक्षणात सामान्य माणूस खरे तेच सांगेल ह्यावरही माझा विश्वास नाही.

मुस्लिम धर्मात ताकिया नावाचा एक विचार सांगितला आहे. शत्रूशी वागताना लबाडी, खोटेपणा हे सगळे चालते. किंबहुना तसेच करा असे हा धर्म सांगतो. धर्मानेच असे सांगून ठेवले असेल तर खरोखरची आकडेवारी कधी तरी कळेल का? मला वाटत नाही.

सुधीर काळे's picture

20 Dec 2010 - 8:28 pm | सुधीर काळे

'गार्डियन' या वृत्तपत्रात 'विकीलीक्स'वर खालील बातमी आहे:
US embassy cables: Ambassador warned that radical Hindu groups may pose bigger threat than LeT in India | World news
http://www.guardian.co.uk/world/us-embassy-cables-documents/219238
December 20, 2010
Monday, 03 August 2009, 14:29
C O N F I D E N T I A L SECTION 01 OF 02 NEW DELHI 001624
SIPDIS
EO 12958 DECL: 08/03/2019
TAGS PREL, PGOV, IN
SUBJECT: REACHING OUT TO RAHUL GANDHI AND OTHER YOUNG
PARLIAMENTARIANS
REF: SECTO 0008
Classified By: AMB Timothy J. Roemer. Reasons 1.4 (B, D)
Summary
1. In a review of the career and potential of Rahul Gandhi, 40-year old heir apparent to the leadership of India's ruling Congress party, the US ambassador reports conversations with the young politician, speaking appreciatively of recent statements and potential for the future. Key passages highlighted in yellow.
1. (C) Summary: In a candid conversation with the Ambassador during the July 20 lunch hosted by Prime Minister Singh for the Secretary, Indian Congress Party General Secretary Rahul Gandhi described his focus on upcoming state and local elections, expressed concerns regarding the challenges surrounding the UPA coalition's ability to implement its programs, and speculated about radicalization among Hindus and Muslims. Gandhi was interested in engaging with the Ambassador and could become a key interlocutor, along with other young members of Parliament, as we pursue a Strategic Dialogue with India. End Summary.
2. (C) During the Secretary's July 20 meetings in New Delhi (see reftel), Prime Minister Singh hosted a lunch in honor of the Secretary. Among the invitees was Indian Congress Party General Secretary Rahul Gandhi, as well as other prominent figures from politics, business and civil society. Gandhi, who was seated next to the Ambassador, shared his views on a range of political topics, social challenges, and electoral issues for the Congress Party in the next five years.
Rural Strategy
----
3. (C) Gandhi stressed that his focus in the upcoming months would be on state assembly elections in Maharashtra and party building efforts at the local level. He was busy trying to recruit more appealing candidates to run for Member of Legislative Assembly (MLA) positions nationwide. Gandhi's focus was on finding younger party members who would not carry some of the baggage of older Congress candidates. He aimed at rebuilding party structures in small towns and rural areas to attract voters and believed the main opposition Bharatiya Janata Party (BJP) was vulnerable there. He did not seem to be as focused on electoral efforts in bigger cities, such as Delhi and Mumbai.
Honeymoon is Over
----
4. (C) Noting that the Congress Party victory in this past spring's parliamentary elections had put the United Progressive Alliance (UPA) government in a comfortable position, Gandhi still expressed concerns about the numerous challenges regarding the UPA's ability to implement its programs in Parliament. He said that the honeymoon period had been short and he now expected the BJP and Left Parties would be unrelenting critics of the government's program. Speaking while the budget session of Parliament was ongoing, Gandhi touched on the difficulties in keeping the UPA coalition on the right track. (Note: This conversation took place before the full scope of opposition to the July 16 Indo-Pakistani joint statement in Sharm el Sheikh had become apparent. End Note.)
Creeping Radicalization?
----
5. (C) Responding to the Ambassador's query about Lashkar-e-Taiba's activities in the region and immediate threat to India, Gandhi said there was evidence of some support for the group among certain elements in India's indigenous Muslim community. However, Gandhi warned, the bigger threat may be the growth of radicalized Hindu groups, which create religious tensions and political confrontations with the Muslim community. (Comment: Gandhi was referring to the tensions created by some of the more polarizing figures in the BJP such as Gujarat Chief Minister Narendra Modi.) The risk of a "home-grown" extremist front, reacting to terror attacks coming from Pakistan or from Islamist groups in India, was a growing concern and one that demanded constant attention.
Comment
----
6. (C) Gandhi was forthright in describing the challenges faced by the Congress Party and the UPA government in the months ahead. Over the past four years, he was an elusive contact, but he could be interested in reaching out to the United States, given a thoughtful, politically sensitive and strategic approach on our part. We will seek other opportunities to engage with him and with other promising
NEW DELHI 00001624 002 OF 002
young members of the new generation of parliamentarians. Gandhi mentioned that in the recent election 60 members of the new Parliament were 45 or younger. In a system long viewed as relatively static, the influx of new faces and the rising profile of young leaders like Rahul Gandhi provides us an opening to expand the constituency in support of the strategic partnership with a long term horizon.

ROEMER

गांधीवादी's picture

24 Dec 2010 - 5:51 am | गांधीवादी

चार जिहादी दहशतवादी घातपातासाठी मुंबईत घुसले आहेत, आणि या चारही दहशतवाद्यांचे मनसुबे मुंबईतील शांतता आणि सुरक्षितता भंग करण्याचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी कमालीची दक्षता बाळगावी, असेही हिमांशू रॉय या वेळी म्हणाले.

पण हे जाहीर करते वेळी ते हे विसरले कि भारताला तर खरा धोका ह्या लष्करे तोयबाच्या अतिरेक्यांपासून नसून हिंदू दहशतवाद्यांपासून आहे. तर मग हिंदू दहशतवाद्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपाय योजना जाहीर केल्या नाहीत, याचे विशेष वाटते.

असो, मिपाकरांनी आणि सर्वांनी ह्या हिंदू (आणि हो ते आत्ताच आलेले पाहुणे) लष्करे तोयबाचे अतिरेकी यांपासून सावध राहावे.

पण हे जाहीर करते वेळी ते हे विसरले कि भारताला तर खरा धोका ह्या लष्करे तोयबाच्या अतिरेक्यांपासून नसून हिंदू दहशतवाद्यांपासून आहे.

शक्यता नाकारता येत नाहि.

- संग्दिल