नुकत्याच कार्यविषयाशी संबंधित घडलेल्या एका कॉर्पोरेट ताणाताणीचा विषय इथे मांडतोय.
जनरलीच जसंजसं तंत्रज्ञान फैलावतंय तसंतसं एटीम , महत्वाच्या ठिकाणचे दरवाजे किंवा तत्सम उपकरणं आता पिन (पासवर्ड किंवा अन्य कोड) ऐवजी अंगठ्याचा स्कॅन, डोळ्यांच्या बाहुलीचा स्कॅन अशा मार्गाने वापरणार्याला "ऑथराईझ" करण्यासाठी (तिळा उघड..!!) बनवली जात आहेत. त्याचा वापर सर्वत्र व्हावा (खेडेगावे, अशिक्षित वर्गासाठी विशेषतः आणि हाय सिक्युरिटी एरियामधे..) असा विचार चांगलाच जोर धरायला लागलाय.
मी थोडक्यात काही मुद्दे खाली लिहितो:
१) अंगठ्याचा ठसा एकमेवाद्वितीय असतो हे एक गृहीतक आहे. शेकडो वर्षं आपण आयडेंटिफिकेशनसाठी अंगठ्याचा ठसा वापरतोय आणि अजून कधी एकासारखे दोन सापडले नाहीत म्हणून "ब्रॉडली" हे गृहितक मान्य आहे. पण जसाजसा अधिकाधिक संवेदनशील कारणांसाठी (उदा. आर्थिक/ सुरक्षितता) हा वापर वाढेल तसंतसं हे गृहितक "फारच गृहित धरल्या" सारखंही वाटायला लागेल. गुन्ह्याच्या तपासातही "ठसे जुळले नाहीत" म्हणजे त्या गुन्ह्याशी संबंधित दहावीस लोकांच्यात एकमेकांसारखे ठसे आढळले नाहीत एवढंच.
"अंगठ्याचा (किंवा कोणत्याही बोटाचा) ठसा / डोळ्याची बाहुली इ.इ.एकमेवाद्वितीय असतो" हे सिद्ध करणं ही मानवी शक्ति आणि क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे (सध्यातरी). त्यासाठी अब्जावधी हातांच्या प्रत्येकी दहा दहा बोटांचे ठसे (किंवा प्रत्येकी दोन दोन डोळ्यांचे स्कॅन्स ) घेऊन त्याची प्रत्येकाची एकमेकांशी होणारी कल्पनेपलीकडल्या संख्येइतकी काँबिनेशन्स तपासावी लागतील.
२) सध्या रूढ असलेला "पासवर्ड" बदलता येतो. तो "लीक"झाला तरी बदलून वापरता येतो, री-इश्यू करता येतो. थंबप्रिंटची माहिती (छाप)सुद्धा शेवटी कुठेतरी "लीक" होऊ शकतेच, आणि तसा झाला तर तो बदलताही येत नाही. तो कायमचा चोरला जातो.
३) वेगवेगळ्या अकाउंटसना वेगवेगळा पासवर्ड ठेवण्याची सोय असते. थंबप्रिंट / डोळ्यातल्या बाहुलीची प्रिंट ही एकदा चोरीला गेली तर सर्वच अकाउंटसची सुरक्षितता एकत्रच धोक्यात येते.
म्हणून मी पासवर्ड "ऐवजी" बायोमेट्रिक वापरण्याच्या तंत्राला आणि ट्रेंडला विरोध केला.
तुमचं काय मत?
प्रतिक्रिया
15 Dec 2010 - 11:34 am | गवि
शेवटी एक प्रश्न उपस्थित करायचा होता तो राहून गेला:
"तुम्ही स्वतः बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन" असलेले एटीएम कितपत कंफर्टेबली वापराल. .? वापराल का?
15 Dec 2010 - 1:17 pm | देवदत्त
तसे आताही खात्यांना पुर्ण सुरक्षितता असण्याची खात्री नाहीच. तरीही आपण वापरतोच की.
बाकी 'क्रिश' चित्रपटाप्रमाणे डोळ्याचे पटल आणि हृदयाचे ठोके दोन्ही जुळणे पाहिले तरच एकदम सुरक्षित.
15 Dec 2010 - 4:02 pm | पुष्करिणी
मी रोज माझा कंप्युटर बोटाच ठसा वापरून चालू करते. पासवर्ड आणि ठसा मॅप केलेत.
पण सध्या तरी एटीम वापरेन का नाही शंका आहे...
आयडेंटी थेफ्टचा धोका तसा बोटांच्या ठशांशिवायही आहेच
15 Dec 2010 - 4:17 pm | मेघवेडा
सर्व मुद्दे एकदम पटेश. मला तरी कम्फर्टिबल वाटणार नाही सगळीकडे बायोमॅट्रिक्स वापरणे.
15 Dec 2010 - 4:22 pm | परिकथेतील राजकुमार
याहु मेल ने देखील आता बोटाचा ठसा चालु केला आहे.
15 Dec 2010 - 4:25 pm | यकु
एटीएम / डेबिट कार्डेच नीट चालवायला शिकलं नाही पब्लिक अजून खाल्लाकडंच..
पण अंगठ्याचा ठसा सहज चोरता येण्यासारखा आहे ठरवलं तर..
सिगरेट्चं पाकीट पुढे केलं.. मिळाला ठसा ( साभार, एक नावाचा सिनेमा, नाना पाटेकर )
ग्लासात पाणी प्यायला दिलं.. मिळाला ठसा.. ( साभार, तिसरा डोळा टाईप सिरीयल्स )
वेटरनं नजर ठेऊन चमचा चोरला.. मिळाला ठसा
पण डेबिट कार्डे अडकत का होईना, पण चालतात तरी.. आणि हरवली तर पासवर्ड जातो.. मिळतो लगेच परत..
तस्मात ए स्ट्रॉंग नो फॉर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन
15 Dec 2010 - 5:47 pm | चिगो
मुद्दा पटतोय तुमचा...
पण "आयरीस स्कॅन" कसा चोरणार?
15 Dec 2010 - 6:46 pm | यकु
अनेकांना कॅटरॅक्ट असते (त्याचा स्कॅन अॅक्सेप्ट होतो काय?)
अनेकांचे डोळे येतात (साथ आली तर आर्थिक व्यवहार बंद्च काय?)
काही लोकांचे डोळे जिथे असायला पाहिजे तिथे नसतात (म्हणजे तिरळे वगैरे.. ऑथेंटीफिकेशन करताना नसता ताप)
15 Dec 2010 - 11:44 pm | रेवती
हो, हे मान्य!
अमेरिकेत इमिग्रेशनच्यावेळेस फोटू आणि बोटांचे ठसे घेतले जातात आणि सुदैवाने अजूनतरी आम्हाला प्रॉब्लेम आला नाहीये.
गेल्या मे महिन्यात माझ्या मामेबहिणीला मात्र हा प्रश्न चांगलाच भेडसावला.
यावर्षी मे महिन्यात आपल्याकडे नेहमीपेक्षा जास्त उन्हाळा होता. आधीच या तापमानाची सवय मोडलेली त्यातून जास्तीच्या उन्हाळयाने तिच्या हाताच्या बोटांना भेगा पडल्या. आणखी अंगठ्याला सुरीने कापले होते म्हणून बँडेड लावले होते. परत अमेरिकेत आल्यावर इमिग्रेशनच्या काऊंटरवरून तिला सरळ जास्तीच्या सुरकक्षा कक्षात नेले. तिच्या नवर्यालाही कारण कळू दिले नाही. छोट्या मुलाला जवळ बोलावण्याची परवानगी मात्र मान्य झाली. तीन तास वेगवेगळ्याप्रकारे प्रश्न आणि कागदपत्रे तपासल्यावर सुटका झाली तोपर्यंत तिच्या नवर्याला मात्र काळजी लागून राहिली होती.
17 Dec 2010 - 7:18 am | निनाद मुक्काम प...
युके साठी भारतातून कोणत्याही विसा साठी निवेदन केले असता अंगठा व डोळ्यातील बाहुल्या चे ठसे घेतले जातात ,अर्थात अजून जर्मनीत हे प्रकार सुरु झाले नाही आहे .माझ्या मते ह्यात रेवती ह्यांनी त्यांच्या मैत्रिणीचा जो अनुभव सांगितला. त्यावरून असे वाटते .ह्यात सुधारणेला अजून वाव आहे .जेणेकरून हि टेक्नोलॉजी अधिकाधिक ग्राहकाभियोग करता येईल .
ता क
पूर्वी साक्षरता प्रसार च्या जाहिरातीत एक खेडूत किंवा शहरातील मोलकरीण शिकल्यावर कुठल्याश्या सरकारी ऑफिसात किंवा ठेकेदाराकडे पैसे घेतल्यावर तो जेव्हा अंगठ्याचा ठप्प घेण्यासाठी शाहीची पेटी पुढे करतो तेव्हा हि लोक अत्यंत अभिमानाने पेन मागून सही करतात .तेव्हा वाटायचे आपल्याला (५वित असतांना ) अंगठा द्यायची कधीच वेळ येणार नाही .पण दैव गती न्यारी म्हणतात ना तेच खर .
17 Dec 2010 - 8:40 am | नगरीनिरंजन
>>टेक्नोलॉजी अधिकाधिक ग्राहकाभियोग करता येईल
ग्राहकाभियोग म्हंजे काय?
18 Dec 2010 - 9:14 am | स्वानन्द
'ग्राहकाभिमुख' असं म्हणायचं असेल त्यांना.
15 Dec 2010 - 4:28 pm | स्पा
+१
15 Dec 2010 - 9:00 pm | गणेशा
नव्या तंत्रज्ञानास बर्याचदा विरोध होतो.. खास करुन तसेच काम जुन्या गोष्टींनी, युजर च्या म्हणण्याने व्यवस्थीत असेल तर तो बदलाकडे आपल्याला जमेल का किंवा आपण योग्य पद्धतीने हे हाताळु शकतो का ? ह्या शंकेन बर्याचदा विरोध करतो असे मला वाटते.
-----------------
असो मुद्द्याकडे येवू ..
बायोमॅट्रीक पद्धतीने वापर हा अत्यंत सेक्युरीटी असलेला मार्ग आहे असे माझे मत आहे.
शास्त्रीय दृष्ट्या कोणत्याही २ माणसाचे अंगठ्याचे (बोटाचे) ठसे सारखे नसतात आणि डोळ्याचे रेक्टीना पण.
जरी प्रत्येक पर्म्युटेशन कोम्बिनेशन शक्य नसले तरी मला वाटते ते योग्य आहे.
आणि चुकुन २ जन सारख्याच ठश्यांचे/बुबळाचे असतील असे माणले तरी ते त्यांना थोडेच माहित असणार ..
ते पासवर्ड हॅक साठी प्रयत्नच करणार नाही असे वाटते.
आताच्या सिस्टीम मध्ये पासवर्ड हॅक करण्यासाठी प्रयत्न केला जातो , तो सरस्वि बंद होयील ..
दुसरा मुद्दा असा की पासवर्ड बदलता येतो तो ..
आताचा पासवर्ड हा मेमरीमध्ये माणुस ठेवतो .. काहि वेळेस तो विसरु शकतो .. काही वेळेस शेअर केल्याने तो बदलु इच्छितो ..
पण डोळ्याचे बुबुळ वगैरे लक्षात ठेवण्याचीच गरज नाही आणि तो कुठे शेअर ही केला जात नाही .. त्यामुळे तो बदलण्याचा प्रश्नच येत नाही.
जरी डोळ्याला /हाताल आघात झाला तरी तसे आपण रीलेटेड संस्थेशी बोलुन त्यावर नविन उपाय्/तातपुर्ती सोय करु शकतो .. जसे की आता ए.टी.एम. कार्डच हरवले की आपण करतोच तसेच काहितरी ..
असो तिसरा मुद्दा चोरीचा आहे आणि त्यात खुप कंडिशन आहेत .. आता ही धमकावुन / डांबुन पासवर्ड घेवु शकतो आपण .. आणि पासवर्ड घेवुन जर तो कायम वापरायचा असेल तर त्या माणसास कायमचा संपवता येवु शकतो ..
असो थांबतो
बायोमॅट्रीक पद्धत मला तरी योग्य वाटते ..
पण आपल्याकडे ती वापरात कधी यीइल त्याची श्वास्वती नाही ..
16 Dec 2010 - 7:30 pm | स्वानन्द
गणेशा जी इथे मुद्दा चोरीचा नाही, तर चोरी झाल्यानंतर पर्यायी उपाय योजना उपलब्ध आहे की नाही असे वाटते.
म्हणजे पासवर्ड मी पुन्हा बदलून वापरू शकतो. पण फिंगर प्रिंट चं कृत्रीम रीत्या पुनरुत्पादन (कधी शक्य झालंच तर )केलं तर तुमचे फिंगर प्रिंट्स कसे बदलणार हाही एक प्रश्न आहे.
16 Dec 2010 - 8:22 pm | गणेशा
पण फिंगरप्रिंट (म्हणजेच हा पासवर्ड, ते हि कृत्रीम रित्या) बदलायचाच का ?
बदलायची गरज नाहि च ..( पासवर्ड का बदलावा लागतो हे वरती दिले आहेच .. )
...
आणि जर आंगठा तुटला वगैरे , तर तुम्ही तसे रीलेटेड संस्थेला कळवून दुसर्या अंगठ्याची किंवा त्याला काय जे नविन पाहिजे त्याचे स्कॅन करता येइल.
ए.टी.एम पासवर्ड विसरला किंवा ए.टी.एम कार्डच हरवले तरी आपण तसे बँकेला कळवतोच मग आपल्याला नविन कार्ड किंवा पीन नं मिळतोच ..तसेच हे पण असेन ..
चोरीचा मुद्दा नसला तरी सेक्युरीटी इंपॉर्टन्ट आहेच ..
(असो सद्य चालु असलेले पासवर्ड ओरीएंटेड गोष्टी चांगले नाहिच असे मला म्हनायचे नाहिये .. पण जेथे खरेच सेक्युरीटीची अत्यंत गरज आहे तेथे बायोमॅट्रीकच उत्तम पर्याय आहे )
-------------
15 Dec 2010 - 10:50 pm | पिंगू
मला तरी वर दिलेले मुद्दे पटतात. कारण नवे तंत्रज्ञान चांगले असले तरीही त्याच्या मर्यादा अशा काथ्या-कुटातून उघड झाल्या आहेत.
थंब-प्रिंट असो वा डोळ्यांची बुब्बुळे.. माहिती संगणक बायनरी स्वरुपात साठवते आणि तेच चोरायला काही कठीण नाही.
- (सुलभ टेक्नोलॉजी वापरणारा) पिंगू
16 Dec 2010 - 5:48 pm | गणेशा
>> थंब-प्रिंट असो वा डोळ्यांची बुब्बुळे.. माहिती संगणक बायनरी स्वरुपात साठवते आणि तेच चोरायला काही कठीण नाही.
माहिती बायनरी स्वरुपात असली आणि ती चोरली, तरी अक्सेस मिळण्यासाठी ते माहिती नाही तर तो अंगठा/डोळा च असावा लागेल असे वाटते ..
का ती बायनरी माहिती घेवुन नविन अंगठ्याच्या रेषा त्या बायनरी कोड वाल्या अंगठ्याच्या आहेत तश्या करता येतात का ?
किंवा ती बायनरी माहिती स्कॅनिंगच्या वेळेस समोर धरली तर ती अंगठा/ डोळाच आहे असे समजुन अक्सेस देवु शकेल ?
15 Dec 2010 - 11:18 pm | सुनील
मुद्दा क्रमांक २ आणि ३ अजिबात कळले नाहीत.
आज मला कचेरीत येताना, ओळखपत्र स्वाइप करण्याबरोबरच बोटाचा ठसादेखिल द्यावा लागतो, तरच दरवाजा उघडतो. आता माझ्या बोटाच्या ठशाची माहिती संगणकात साठवली आहे हे खरे. ती जर कोणी चोरून नेली वा विद्रुप केली / झाली तरी, जोवर त्याची पडताळणी करण्यासाठी वापरण्यात येणारे बोट माझ्याच शरीराचा भाग आहे, तोवर त्या चोरीचा उपयोग काय?
थोडक्यात, दुरुपयोगच करायचा असेल तर त्याला माझे बोट चोरावे लागेल संगणीकृत फाईल नव्हे!
मुद्दा क्रमांक १ थोडा पटतो परंतु, तेथेही सारखे ठसे वा बुबुळे असणार्या व्यक्ती शोधणे म्हणजे महासागरात एखादी टाचणी शोधण्यासारखे आहे.
16 Dec 2010 - 9:33 am | मदनबाण
तंत्रज्ञान वापरणार्यां पेक्षा ते तंत्रज्ञान क्रॅक करणारे नेहमीच पुढे असतात हे लक्षात ठेवावे.
असो... या विषयावर सध्या इतकेच.
जाता जाता :--- विकीलिक्स दिसत असताना डेटा सुरक्षित राहु शकतो असे म्हणणारे लोक मला जरा चक्रमच वाटतात !!! ;)