मटार पॅटीस

जागु's picture
जागु in पाककृती
14 Dec 2010 - 4:44 pm

भाजीचे साहित्य
मटार दाणे अर्धा किलो
कांदे २ छोटे चिरुन
आल लसुण पेस्ट
टोमॅटो १ बारीक चिरुन
राई, जिर, हिंग, हळद, मसाला
१/२ चमचा गरम मसाला
मिठ
तेल
ओल खोबर

कव्हरसाठीचे साहित्य:
१ किलो बटाटे चांगले उकडून
मिठ
रवा किंवा बटरचा मिक्सरमधुन काढलेला चुरा.
तळण्यासाठी तेल

पाककृती:
प्रथम वरील भाजीचे साहित्य घेउन तेलावर राई, जिर, हिंग ची फोडणी देउन कांदा गुलाबी रंगावर परतवायचा. नंतर त्यावर आल लसुण पेस्ट, हळद व मसाला घालून मटार टाकायचा. आता वरती झा़कण ठेउन त्यावर पाणी ठेउन मटार वाफेवर शिजुन घ्यायचा. शिजला की बारीक चिरलेला टोमॅटो, ओल खोबर, गरम मसाला, मिठ घालुन थोडावेळ वाफवुन त्यावर खोबर घालुन गॅस बंद करायचा.

भाजी होत असतानाच बटाटे कुकरला किंवा टोपात चागले शिजवुन घ्यायचे व गरम असतानाच त्याची साल काढून स्मॅश करुन घ्यायचे. गरम असताना चांगले स्मॅश होतात. अगदी पिठाप्रमाणे बटाटा करुन घ्यायचा. पिठामध्ये चविपुरते मिठ घालुन एकदा हा लगदा चांगला मळून घ्यायचा.

पॅटीस करताना लिंबाएवढा बटाट्याचा लगदा घेउन त्याची मोदकासाठी करतो तशी वाटी करायची.

मग त्यात १ चमचा भाजी भरुन घ्या

आता ही भरलेली वाटी मोदक वळतो त्याप्रमाणे वळा

वळत वळत वरुन बंद करुन हलक्या हाताने दाबुन चपटी करायची.

आता हा पॅटीस रवा किंवा बटरच्या चुर्‍यामध्ये घोळवुन घ्या.

आता हे पॅटीस गरम तव्यावर मंद फ्लेम ठेउन शॅलोफ्राय करत ठेवा. आधी ५-६ पॅटीस करुन घ्यायचे मग तव्यावर टाकायचे म्हणजे गॅस व वेळ वाचतो.

हे घ्या तयार आहेत गरमा गरम पॅटीस. सॉस सोबत चांगले लागतात.

वरील पध्दतीने करताना वेळ जास्त लागतो. जर कमी वेळात करायचे असतील तर बटाट्याच्या लगद्यातच भाजी मिक्स करुन घ्यायची.

त्याचे कटलेट करुन मंद गॅसवर तळावेत. २ तास वरचा प्रकार चालु होता. कारण आमची फॅमिली मोठी तशी कॉन्टिटी ही मोठी. मी शेवटी कंटाळा आल्यावर खालचा प्रकार केलाय. ह्यांचा रंग छान आला पण चव ती नाही येत.

अधिक टिपा:
बटाट्याच्या लगद्यात ब्रेडचा चुरा करुनही पिठ मळतात. त्यामुळे पॅटीस तुटत नाहीत. पण मी नेहमी नुसतेच करते कारण चवीत फरक पडतो.
हे पॅटीस मका, तुरीचे दाणे तसेच इतर कडधान्य घालुनही करता येतात.
जर मांसाहारी असाल तर हेच पॅटीस खिमा, करंदी घालुन करता येतात. तसेच रव्या ऐवजी अंड्यामध्ये घोळवुन तळता येतात.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

14 Dec 2010 - 4:46 pm | अवलिया

मेलो ! मेलो ! मेलो !!

परिकथेतील राजकुमार's picture

14 Dec 2010 - 4:52 pm | परिकथेतील राजकुमार

अरे ह्या जागुतैचा आयडी रद्द करा रे !!

आता रात्री कावेरीत जाताना मटार पॅटीस घेउनच जावे लागणार.

गणपा's picture

14 Dec 2010 - 4:54 pm | गणपा

कावेरी ????
पुनमला सोड्चिठ्ठी की काय ;)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Dec 2010 - 4:57 pm | परिकथेतील राजकुमार

..

परिकथेतील राजकुमार's picture

14 Dec 2010 - 4:56 pm | परिकथेतील राजकुमार

कावेरी ????
पुनमला सोड्चिठ्ठी की काय

समुहाने (कुंपुगिरी) असेल तर पुनम आणि एकटा जीव सदाशिव असेल तर रोजचे कावेरी.

गणपा's picture

14 Dec 2010 - 4:52 pm | गणपा

यम! यम !!! यम !!!

गवि's picture

14 Dec 2010 - 4:52 pm | गवि

सध्या डायेटची भानगड नसती तर उद्याच आमच्या घरी हा मस्त प्रकार बनला असता.. :(

अवलिया अमृत मारते जिवंत व्हा.

राजकुमार ती कावेरी काय ?

गणपा यमाला बोलावताय की यम्मी आहेत पॅटीस ?

गगनविहारी आठवड्यातुन एकदा नसतो पाळायचा डाएट.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Dec 2010 - 5:46 pm | परिकथेतील राजकुमार

ते पाणवठ्याचे नाव आहे ग ;) गैरसमज नको.

बाकी हा पदार्थ चकण्यासाठी अतिशय उत्तम व भक्कम आहे असे आमचे अनुभवी मत आहे.

एकदम.. खल्लास.. आम्ही पहिल्या फोटोतल्या स्टेजपर्यंत पोहोचलो तरी खूप आहे! :D

सूड's picture

14 Dec 2010 - 7:26 pm | सूड

+१

पाकृ व फोटू छान दिसतायत.
तू फ्रोझन मटार वापरलेस कि ताजे?

परिकथेतील राजकुमार's picture

14 Dec 2010 - 5:48 pm | परिकथेतील राजकुमार

रंग आणि आकारावरुन तरी भिजवलेले मटार वाटत आहेत.

पारखी

जागु's picture

15 Dec 2010 - 11:05 am | जागु

मटारच आहेत ते.

चिंतामणी's picture

14 Dec 2010 - 6:03 pm | चिंतामणी

तेच घ्यावे. त्याची चव वेगळीच असते फ्रोजनपेक्षा.

ऑफसिजनला फ्रोजन वापरा.

सुहास..'s picture

14 Dec 2010 - 5:57 pm | सुहास..

ये हुवी ना बात !!

या पाकृ करिता व्यनी करणारच होतो ...रविवारची खादाडी फिक्स ग जागु ताइ !!

गवि's picture

14 Dec 2010 - 6:04 pm | गवि

सुहास,
वडापावाऐवजी पॅटिसचीच गाडी लावूया काय? मी पण येतो भांडवलापोटी तवा आणि शेगडी घेऊन. गाडीचे तुम्ही जमवाल काय?
;)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Dec 2010 - 6:06 pm | परिकथेतील राजकुमार

वडापावाऐवजी पॅटिसचीच गाडी लावूया काय? मी पण येतो भांडवलापोटी तवा आणि शेगडी घेऊन. गाडीचे तुम्ही जमवाल काय?

गॅस दोघे मिळुन भरणार का? ;)

सुहास..'s picture

14 Dec 2010 - 6:09 pm | सुहास..

गॅस दोघे मिळुन भरणार का? >>>

अर्थातच (आम्ही काय ' गॅसदान' वाले वाटलो की काय या पर्‍याला ? )

असो .

गगनदा , गाडीच जमवुयात आणि तिथच गुरुद्वाराच्या शेजारीच टाकु या गाडी , सरदारकडे जाणारी काही मंडळी आपल्याकड व़ळतील !!

प्रकाश१११'s picture

14 Dec 2010 - 7:37 pm | प्रकाश१११

की हाताची ही जादू ?
नि करामत त्या बोटांची
हे दिसते प्याटीस भारी
मन कासावीस होई

मज नको दाखवू बाई
हे असले काही बाही
नुसती छबी बघोनी
जीव कासावीस होई ...!!

छान आणि मस्त . मटार माझा जीव..!!

संजयशिवाजीरावगडगे's picture

14 Dec 2010 - 7:39 pm | संजयशिवाजीरावगडगे

व्वा मस्तच आहे !

पिंगू's picture

14 Dec 2010 - 7:47 pm | पिंगू

जीव गेला पाहून.. आता काय करु.. सध्या पी.जी मध्ये स्वंयपाकघर नाहीये.. :(
आता विकांतची वाट बघतोय. घरी गेल्यावर करुन बघता येईल..

- (प्याटिसप्रेमी) पिंगू

निवेदिता-ताई's picture

14 Dec 2010 - 10:22 pm | निवेदिता-ताई

एकदम मस्त ....मुलीला फ़ार आवडेल...........करतेच येत्या रविवारी..

डावखुरा's picture

14 Dec 2010 - 10:33 pm | डावखुरा

मस्त किलर ....

प्राजु's picture

14 Dec 2010 - 11:05 pm | प्राजु

भन्नाट!

प्राजक्ता पवार's picture

15 Dec 2010 - 9:50 am | प्राजक्ता पवार

पाकृ व फोटो दोन्ही छान :)

स्वानन्द's picture

15 Dec 2010 - 11:16 am | स्वानन्द

वा वा... रविवारी असे पॅटीस करायचा प्रयत्न करून बघतो

sneharani's picture

15 Dec 2010 - 11:26 am | sneharani

मस्त रेसिपी!!

भानस's picture

15 Dec 2010 - 10:25 pm | भानस

एकदम मस्तच. माझे आवडते.

इंटरनेटस्नेही's picture

16 Dec 2010 - 8:05 am | इंटरनेटस्नेही

मस्त! टोन्डाला पाणी सुटले!

मनीषा's picture

16 Dec 2010 - 8:48 am | मनीषा

मस्तं मस्तं पॅटीस .

करुन बघायचा विचार करते आहे ...