गाभा:
नाव : ओप्रा विन्फ्रे
जन्म : २९ जानेवारी, १९५४
व्यवसाय : जनसामान्यांशी गप्पा!
वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी गरोदर, अत्यंत गरीब परिस्थिती, हलाखीचे जगणे या सर्वांवर मात करुन वयाच्या २० व्या वर्षी सौन्दर्य स्पर्धा विजेती, उत्तरोत्तर एक यशस्वी टॉक शो होस्ट, आणि पहिली कृष्णवर्णीय महिला अब्जोपती! जिद्द आणि मेहनत यांच्या बळावर तिने आयुष्यात संपादन केलेले यशाचे शिखर भल्याभल्यांना गाठता नाही आलेले! सविस्तर महिती पुढील संकेत स्थळावर!
http://www.esakal.com/esakal/20101213/5522047777492239244.htm
http://en.wikipedia.org/wiki/Oprah_Winfrey
प्रतिक्रिया
14 Dec 2010 - 3:53 pm | टारझन
वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी गरोदर होण्याचा पराक्रम केल्यानंतर बाकीचे पराक्रम खुजे आणि अणुशंगाणे आलेले वाटतात :)
अवांतर : व्यवसाय भारी आहे बाईंचा :)
- कोप्रा पक्डे
14 Dec 2010 - 3:58 pm | स्वैर परी
तसे नाहिये! टार्झन दादा, आपण लेख वाचलेला दिसत नाहिये :) .. वयाच्या १४ व्या वर्षी गरोदर पणा तिला तिच्यावर झालेल्या "रेप" मुळे मिळाला होता!
14 Dec 2010 - 4:09 pm | टारझन
सॉरी शक्तिमान.
15 Dec 2010 - 11:41 am | शिल्पा ब
नीट वाचत जा मेल्या.. |( \( :angry:
ओप्रा फ्यान
14 Dec 2010 - 5:45 pm | गणेशा
धन्यवाद ..
माहिती वाचली .. खरेच खुप छान वाटले वाचुन
14 Dec 2010 - 6:23 pm | गांधीवादी
>>पैशांअभावी लहानपणी ओप्राची एक ख्रिसमस संध्याकाळ उदासवाणी बनली होती. अशा वेळी अनपेक्षितपणे दारात उभ्या राहिलेल्या तीन नननी तिच्या चिमुकल्या हातात दिलेल्या ख्रिसमस गिफ्टने ओप्राची ख्रिसमस ईव्ह सुंदर बनून गेली. हा प्रसंग ओप्राच्या मनात कायम रुतून बसला. त्या तीन नन कोण, कुठून आलेल्या, हे आजही ओप्राला माहीत नाही; पण घेण्यापेक्षा देण्यातला आनंद काय असतो हे त्या नन तिला शिकवून गेल्या. आजही ओप्राला हा देण्यातला आनंदच महत्त्वाचा वाटतोय.
ओप्रा चे महानपण या एकाच ओळीतून व्यक्त होते. लेख वाचून भारावून गेलो.
सलाम
एक प्रभावशाली व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल धागाकर्ते 'स्वैर परी' यांना धन्यवाद.
14 Dec 2010 - 6:33 pm | स्वैर परी
मीही तो लेख वाचल्यनंतर अशीच स्तब्ध झाले होते! तसे पाहता, सामान्यतः इतक्या संकटाना सामोरे जाता जाता माणुस इतका खचुन जातो कि, यश वगैरे सोडाच, निव्वळ जगणे हि नकोसे होउन जाते! पण त्याहि परिस्थितीत या स्त्रीने इतकी प्रगती केली, त्याबद्दल तिचे मनापासुन कौतुक आहे!
14 Dec 2010 - 6:46 pm | शुचि
मी पहील्यांदा ऑपरा ची माहीती पुस्तकविश्व वर "झोपी गेलेल्याला जागे करा" या धाग्यावर वाचली. आरागॉर्न यांच्या त्या धाग्यामधील हा उतारा - http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80...
"तिच्या जन्मापासूनच गरीबी सोबतीला होती. आई नोकराणी, बापाचा पत्ता नाही. पहिली सहा वर्षे आजीकडे काढली. गरीबी इतकी की आजी बटाट्याच्या पोत्याचे कपडे शिवून तिला घालायला लावायची. त्यामुळे ती चेष्टेचा विषय बनली होती. ती नऊ वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाला, नंतर नातेवाईक आणि परिचित यांच्याकडून विनयभंगाचे बरेच प्रकार घडले. १४ वर्षांची होती तेव्हा घरातून पळून गेली. गरोदर राहीली, मुलगा जन्मल्यानंतर काही काळातच मेला. इथपर्यंत ऐकल्यावर सहानूभूती वाटते, नाही? आणि आत्ता ती कुठे असेल असे विचारले तर डोळ्यासमोर कितीतरी वाईट पर्याय येतात. खरी परिस्थिती अशी आहे की तिला कुणाच्याच सहानूभूतीची गरज तेव्हाही नव्हती आणि आत्ता तर नाहीच नाही. ती सध्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिला आहे. फोर्ब्ज मासिकाच्या अनुमानाप्रमाणे २०१० मध्ये तिची मालमत्ता $२७० कोटी आहे. याखेरीज तिने लोकांसाठी केलेले काम इतके मोठे आहे की तिचे नावच तिची ओळख आहे - ऑप्रा विनफ्रे. "
मी थक्क झाले, प्रभावीत झाले.
आणि आता हा अतिशय सुंदर शब्दबद्ध केलेला लेख वाचला. आणि माझा आनंद द्विगुणित झाला. धन्यवाद स्वैर-परी.
14 Dec 2010 - 7:01 pm | स्वैर परी
तुम्ही दिलेला परिच्छेद वाचल्यानंतर माझाही आनंद द्विगुणित झाला! :)
15 Dec 2010 - 12:25 pm | वेताळ
हे वाचुन मन थरारुन गेले.९व्या वर्षी बलात्कार व ती मुलगी चक्क १४ वर्षाची होईतोपर्यत चालु होता.तो पर्यत सरकार काय डोळे झाकुन गप्प बसले होते काय? ती मुलगी असला अत्याचार का सहन करीत होती?ह्याच्याबद्दल काही माहिती मिळेल काय?
15 Dec 2010 - 2:34 pm | Pearl
ती मुलगी असला अत्याचार का सहन करीत होती?...
कारण असे असू शकेल की
१.ती मूलगी लहान होती. लहान मुले सर्वांनाच घाबरून असतात.
२.त्यातही ती अत्यंत असुरक्षित कुटूंबात आणि अत्यंत असुरक्षित वातावरणात वाढली असल्याने,
३.तसेच आपले दु:ख, अत्याचार सांगण्याइतके जवळचे, प्रेमाचे, पाठीशी उभे रहाणारे असे कोणी तिला वाटले नसेल कदाचित.
15 Dec 2010 - 3:28 pm | स्वैर परी
अगदी बरोबर! तिच्या जवळ तिची आई देखील नव्हती! आणि आजी कितीसे लक्ष देणार होती!
14 Dec 2010 - 9:41 pm | ५० फक्त
स्वॅर परी, अतिशय धन्यवाद एका खुप मोठ्या व्यक्तिमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल, खरंच आज या आणि अशा खुप माणसांची जगाला गरज आहे.
ह्या अशा माणसांचा आदर्श घेउन आपल्यातील काही जण असेच मोठे व्हावेत ही आपणां सर्वांना शुभेच्छा.
हर्षद.
14 Dec 2010 - 10:26 pm | आत्मशून्य
तीच्या सारखे धाडस आणी प्रसंगाना सामोरे जाण्याची प्रव्रूत्ती सर्व लोकांमधे विशेष करून भारतीय स्त्री पूरूषां मधे येओ हीच प्रार्थना, आणी ओप्राला तीच्या पूढील कार्यासाठी मनःपूर्वक शूभेछा...
15 Dec 2010 - 12:30 am | प्राजु
मी पाहिले आहेत या बाईचे शो टिव्हीवर.
पश्चिम अमेरिकेला रीटा आणि कॅटरीनाने धडक दिल्यानंतर तिथल्या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी या बाईने स्वतः १० लाख डोलर्स (१० की १०० अकडा नक्की माहिती नाही) ची मदत केली होती. आणि जातीने तिथे जाऊन त्यांना घर आणि इतर वस्तू पुरवल्या होत्या.
सलाम या व्यक्तीमत्वाला आणि जिद्दीला!
15 Dec 2010 - 8:22 am | मदनबाण
एक प्रभावित करणारे व्यक्तिमत्व आहे या स्त्रीचे...