विमानतळावर सुरक्षा सुची

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in काथ्याकूट
11 Dec 2010 - 11:32 am
गाभा: 

आपण जेव्हा विमानतळावरच्या सुरक्षा कक्षेत (सिक्युरीटी साठी) जातो तेव्हा आपल्याला एक सुची लावलेली दिसते. त्यात अशा व्यक्तींची नावे असतात ज्यांना सिक्युरीटी तून सूट दिले गेली आहे सरकारने. साधारण २१ पदांची नावे आहेत त्या सुचीत. त्या पदावर जर कोणी असेल तर त्या इसमाला सूट.

शेवटचे नाव रॉबर्ट वाढरा नामक ईसमाचे आहे. आता हा रॉबर्ट वाडरा कोण. त्याने असे काय केले की त्याला सूट आहे. भारतात जर अजुन कोणी त्याच नावाची असतील त्या सगळ्यांना सूट आहे का. अजुन कोण कोण पात्र होतील त्या सुचीत नाव सापडण्या योग्य.

लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर इत्त्यादीं चे नाव येऊ शकते का.

प्रतिक्रिया

प्रसाद_डी's picture

11 Dec 2010 - 11:53 am | प्रसाद_डी

रॉबर्ट वाढरा या देशा चा जावई आहे... आहो काय हे चितळे साहेब.....

अमोल केळकर's picture

11 Dec 2010 - 12:09 pm | अमोल केळकर

:)

माझं णाव टाकलेलं ... पण मीच णको म्हणालो , उगाच कशाला गांधी घराण्याशी आपल्याला काही संबंध ठेवायचे नाहीत बॉ :)

नितिन थत्ते's picture

11 Dec 2010 - 2:35 pm | नितिन थत्ते

राष्ट्रस्पाउस आहेत.

शाहरुख's picture

11 Dec 2010 - 12:46 pm | शाहरुख

>>शेवटचे नाव रॉबर्ट वाढरा नामक ईसमाचे आहे.
बोर्ड रंगवणारा पेंटर असेल कदाचित ! :-)

बाकी यादी असेल तर द्या की इथे..उत्सुकता आहे !

रणजित चितळे's picture

11 Dec 2010 - 1:01 pm | रणजित चितळे

सुची देतो मिळाली की

नितिन थत्ते's picture

11 Dec 2010 - 1:07 pm | नितिन थत्ते

शाहरुख's picture

11 Dec 2010 - 1:27 pm | शाहरुख

धन्यवाद !

या बातमीचा आधार घेऊन सदर गोष्टीचा सौम्य निषेध व्यक्त करतो !

रणजित चितळे's picture

11 Dec 2010 - 2:46 pm | रणजित चितळे

थत्ते साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद.
इतक्या पटकन तुम्ही यादी शोधुन ती दिल्या बद्दल.

चिंतामणी's picture

11 Dec 2010 - 3:04 pm | चिंतामणी

पण एक शंका आहे.
हिंदीतील यादीत २३ पदे/नावे आहेत. परन्तु इंग्लीशमधील यादीत ३१ दिसत आहेत.

हा फरक काय आहे??????

पिवळा डांबिस's picture

12 Dec 2010 - 8:56 am | पिवळा डांबिस

वाचून लई मज्जा आली!
आता यातील किती लोकांविरुद्ध कोर्टात केसेस दाखल आहेत?
नाय, सहज शंका आली म्हणुन विचारतो!!!!

गांधीवादी's picture

11 Dec 2010 - 1:04 pm | गांधीवादी

Robert Vadra is an Indian businessman notable as the husband of Priyanka Gandhi and a member of the Nehru-Gandhi family by marriage
http://en.wikipedia.org/wiki/Robert_Vadra

देवदत्त's picture

11 Dec 2010 - 1:13 pm | देवदत्त

त्याच दुव्यावर ही माहिती आहे.

He, along with other VIPs like HH the Dalai Lama and the Chief Justice of India, has been exempted from frisking at airports The list of such VIPs was compiled and forwarded to the concerned authorities by the government on 26 September 2005. Others on the list include the President, the Prime Minister, former Presidents and PMs and SPG protectees[4]. This move has come under scrutiny since more important entities on the warrant of precedence, like the Chiefs of Army, Navy and Air Force staff are not extended this waiver. However, BCAS Commissioner S R Mehra declined comment[5].

देवदत्त's picture

11 Dec 2010 - 1:07 pm | देवदत्त

साधारण २१ पदांची नावे आहेत त्या सुचीत.
पदांची नावे असताना इसमाचे नाव कसे आले?
की सर्व पदांसमोर त्या त्या पदावर सद्य व्यक्ती कोण आहे ते लिहिले आहे?

श्री राहुल गांधीचे मेव्हणे व श्रीमती प्रियंका गांधी चे पती आहेत. इतर २२ पदावरील लोक वारंवार बदलत असतात. वडार साहेब आहे तिथेच राहणार आहेत.म्हणुन त्याचे नाव दिले असेल.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2010 - 2:39 pm | परिकथेतील राजकुमार

इतर २२ पदावरील लोक वारंवार बदलत असतात. वडार साहेब आहे तिथेच राहणार आहेत.म्हणुन त्याचे नाव दिले असेल.

किंवा वरच्या २२ पैकी कुठल्याही पदावर ते हवे तेंव्हा विराजमान होउ शकत असतील म्हणुन देखील त्यांचे नाव दिले असेल.

चिंतामणी's picture

11 Dec 2010 - 3:25 pm | चिंतामणी

वडार साहेब ????? :(

;)

वेताळसाहेब,
वडार साहेब आहे तिथेच राहणार आहेत.
येथे वडेरा किंवा वधेरा असे नाव हवे.
आपण उल्लेखलेले नाव हे विशिष्ठ जमातीचे आहे.
मिपा धोरणानुसार अश्या प्रतिसादास परवानगी नाही.

नितिन थत्ते's picture

11 Dec 2010 - 2:52 pm | नितिन थत्ते

यादीत रजनीकांतचे नाव का नाही?

परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2010 - 3:04 pm | परिकथेतील राजकुमार

देवळात देवाचे नाव नसते. देणगीदारांची नावे असतात चाचा.

बादवे आत्ताच आलेला एक समस असे सांगतो की भारताचे नविन रुपायाचे सिंबॉल हे म्हणे रजनीकांतची सही आहे.

चिंतामणी's picture

11 Dec 2010 - 3:27 pm | चिंतामणी

=)) =)) =))

आळश्यांचा राजा's picture

12 Dec 2010 - 6:21 pm | आळश्यांचा राजा

लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर इत्त्यादीं चे नाव येऊ शकते का

थत्तेसाहेबांनी वर फोटोस्वरुपात दिलेल्या यादीनुसार भारतरत्न पुरस्कारित व्यक्ति यात येतात (१४ नंबरवर). लता मंगेशकर अर्थातच येतात.

@ देवदत्त -

This move has come under scrutiny since more important entities on the warrant of precedence, like the Chiefs of Army, Navy and Air Force staff are not extended this waiver.

त्याच यादीनुसार, २४ नंबरला फुल जनरल (ऑर इक्विव्हॅलंट) आहेत.

तसेच, रॉबर्ट वधेरा यांच्याप्रमाणेच व्यक्तिनामाने उल्लेख केलेले दलाई लामा आहेत. (इथे दलाई लामा हे पदनाम मानलेले नसून श्री. कुंदन यांनाच दलाई लामा म्हणलेले असावे असे वाटते.)

बाकी रॉबर्ट वधेरांचे नाव इथे या यादीत कसे आणि का यावर चर्चा चालू द्यात!

(वाचक)

(इथे दलाई लामा हे पदनाम मानलेले नसून श्री. कुंदन यांनाच दलाई लामा म्हणलेले असावे असे वाटते.)

हे पदनामच आहे. तुम्ही गुगलुन बघीतलेत तरी तेथे असेच दिसेल. He is Holiness the 14th Dalai Lama.

विकीपेडीया काय म्हणते हे बघा.

The Dalai Lama is a Buddhist leader of religious officials of the Gelug or "Yellow Hat" branch of Tibetan Buddhism. The name is a combination of the Mongolian word Далай "Dalai" meaning "Ocean" and the Tibetan word བླ་མ ་"Blama" (with a silent b) meaning "chief" or "high priest." "Lama" is a general term referring to Tibetan Buddhist teachers.

http://en.wikipedia.org/wiki/Dalai_Lama

आळश्यांचा राजा's picture

14 Dec 2010 - 10:34 pm | आळश्यांचा राजा

दलाइ लामा हे पदनामच आहे. वाद नाही. म्हणूनच कंस टाकून 'इथे' आणि 'वाटते' असे शब्द वापरले होते. असे वाटण्याचे कारण दलाइ लामा हे भारतातील सांविधानिक वगैरे पद नाही. या चौदाव्या दलाई लामांनंतर होणारे सगळे दलाई लामा याच देशात तळ ठोकून राहणार आहेत (आणि त्या सर्वांनाच अशी सवलत दिली जाईल) असेही मानण्याचे कारण नाही. त्यामुळे सध्या दलाई लामा या रुपात/ पदावर कार्यरत वगैरे असलेल्या हिज होलीनेस श्री कुंदन यांच्यासाठी ही सवलत दिलेली असावी असे मला वाटते. असे नसण्याची शक्यता आहेच. त्यामुळे गल्लत नाही.

कारण आता स्मग्लर, अतिरेकी आणी समाजकंटकही आपले नाव कायदेशिर रित्या बदलुन रॉबर्ट वडेरा करतील आणी ही सुट मीळवतील.

नितिन थत्ते's picture

14 Dec 2010 - 9:51 am | नितिन थत्ते

नाही. रॉबर्ट वधेरा एकटा गेला तर त्याची तपासणी होणार आहे. "व्हेन अ‍ॅकंपनीड बाय एस पी जी प्रोटेक्टीज" असे लिहिले आहे. एस पी जी प्रोटेक्टीज म्हणजे ज्यांना एस पी जी प्रोटेक्शन आहे असे. म्हणजे बहुधा प्रियांका, सोनिया, राहूल इत्यादि असावेत. त्यांच्याबरोबर असतील तरच सूट आहे.

आंसमा शख्स's picture

14 Dec 2010 - 8:59 am | आंसमा शख्स

हे चुकीचे आहे. सुरक्षा ही सर्वांना सारखी असली पाहिजे.
त्यात कुणाचे अपवाद कशाला? हा मुद्दा वर्तमानप्त्रात आणि चॅनलवर दिला पाहिजे.

इंटरनेटस्नेही's picture

14 Dec 2010 - 12:44 pm | इंटरनेटस्नेही

हे चुकीचे आहे.

अजिबात नाही.

सुरक्षा ही सर्वांना सारखी असली पाहिजे.

या न्यायाने उद्या तुम्ही असेही म्हणाल भिंगवडी बुद्रुक म्धील टुकारवाडी च्या शिक्षण सेवकालाही पंतप्रधानां साराखी सुरक्षा पाहिजे.

त्यात कुणाचे अपवाद कशाला?
कारण प्रत्येकाचा दर्जा वेगळा असतो.

हा मुद्दा वर्तमानप्त्रात आणि चॅनलवर दिला पाहिजे.
लोल्स! मिपा वर दिलात ना, पुरे झालं. :D

-
मुंबई प्रदेश अध्यक्ष,
मिसळपाव दुर्ल़क्षित पँथर.

त्यात कुणाचे अपवाद कशाला?
कारण प्रत्येकाचा दर्जा वेगळा असतो.

रॉबर्ट वढ्राचा दर्जा वेगळा म्हणजे काय आणि कसा आहे?

इंटरनेटस्नेही's picture

14 Dec 2010 - 3:05 pm | इंटरनेटस्नेही

रॉबर्ट वढ्राचा दर्जा वेगळा म्हणजे काय आणि कसा आहे?

ते एक सीक्रेट आहे.. आम्ही नाही सांगणार जा! ;)

सिरीयस : आंसमा ताई म्हणतात त्यातुन असे ध्वनीत होते की त्या सर्व २३ लोकांना सामान्यजनांच्या अ‍ॅट पार वागणूक द्यायला हवी.

मुंबई प्रदेश अध्यक्ष,
मिसळपाव दुर्ल़क्षित पँथर.

स्पा's picture

14 Dec 2010 - 3:08 pm | स्पा

इंटेश बुवांचा म्हनं पटतंय ब्वा

हर्ष भोगलेंनाही हेच आधीपासून म्हणायचे होते. किंवा मग मिपावर वाचून त्यांनीही आज सकाळी हा मुद्दा उचलला. ;)
http://twitter.com/bhogleharsha/status/14521798037086209

इंटरनेटस्नेही's picture

14 Dec 2010 - 4:33 pm | इंटरनेटस्नेही

सदर यादीत मिसळपाव.कॉम चे संपादक व मालक यांचा उल्लेख नसल्याबद्दल त्रिवार निषेध व्यक्त करतो.
(सर्व संबंधितांनी हलकेच घ्यावे ही विनंती.)

-
मुंबई प्रदेश अध्यक्ष,
मिसळपाव दुर्ल़क्षित पँथर.

स्पा's picture

14 Dec 2010 - 5:26 pm | स्पा

छ्या.............

:)

मगतर आपल्या मिपा दुर्लक्षित पान्थर च्या संस्थापकांचा सुद्धा समावेश व्हायला हवा होता