साहित्य :
पनीर टिक्का : पनीर - २५० ग्रॅम
लाल , पिवळी, हिरवी सिमला मिरची
आले लसुण पेस्ट - १ चमचा
मीठ
लाल मिरची पावडर - १ चमचा
गरम मसाला - १/२ चमचा
आमचुर पावडर - १ चमचा
लिंबाचा रस - १ चमचा
घट्ट दही - १/२ वाटी
तंदुरी कलर
चाट मसाला - १ चमचा
तेल - १ चमचा
चटणी : दही - १/२ वाटी
कोथिंबीर
हिरवी मिरच्या - २
मीठ
साखर- १/२ चमचा
लसुण पाकळ्या -२
कृती :
पनीर व सिमला मिरची यांचे समान आकारचे जरा जाडसर असे काप करावेत.
एका भांड्यात दही, आले-लसुण पेस्ट, लाल तिखट , मीठ, गरम मसाला , चाट मसाला , आमचुर पावडर ,
लिंबाचा रस , तंदुरी कलर, तेल एकत्र करुन फेटुन घ्या.
ह्या मिश्रणात पनीर व सिमला मिरचीचे काप व्यवस्थीत घोळवुन घ्या व फ्रीजमध्ये १० मिनिटे ठेवुन द्या.
१० मिनिटांनंतर हे सर्व काप बार्बेक्यु स्टीक्सवर एका मागोमाग एक याप्रकारे लावा.
ओव्हन १० मिनिटे प्रिहीट करुन नंतर त्यात ठेवुन १० मिनिटे ग्रील करा. घरी मिनी तंदुर असेल तर त्यावरही भाजता येईल.
चटणी : सर्व साहीत्य मिक्सरमध्ये एकजीव वाटुन घ्या.
गरमगरम पनीर टिक्का चटणी व सॅलड सोबत खायला द्या
प्रतिक्रिया
13 Dec 2010 - 10:24 am | वेताळ
आपल्याला पनीर व चिकन टिक्का खायला आवडते.
13 Dec 2010 - 10:35 am | चिंतामणी
एका भांड्यात दही, आले-लसुण पेस्ट, लाल तिखट , मीठ, गरम मसाला , चाट मसाला , आमचुर पावडर ,
लिंबाचा रस , तंदुरी कलर, तेल एकत्र करुन फेटुन घ्या.
त्या थोडी कसूरी मेथी घालावी. तेल मोहरीचे घालावे. शक्य असल्यास दह्या ऐवजी चक्का वापरावा. म्हणजे पाणी कमी सुटते आणि फ्रीजमधे ठेवायची जरूरी भासत नाही. कसूरी मेथी आणि मोहरीचे तेलाने खुमारी वाढेल.
ह्या मिश्रणात पनीर व सिमला मिरचीचे काप व्यवस्थीत घोळवुन घ्या व फ्रीजमध्ये १० मिनिटे ठेवुन द्या.
१० मिनिटांनंतर हे सर्व काप बार्बेक्यु स्टीक्सवर एका मागोमाग एक याप्रकारे लावा.
फक्त सिमला मिर्ची न घालता त्याबरोबर टोमॅटो आणि कांद्याचे कापसुध्दा घोळवुन लावावे. मॅलिग्नेशन करायला हे मिश्रण लावुन (वे़ळ असेल आणि जास्त चविष्ट खायचे असेल तर) जास्तवेळ ठेवावे.
13 Dec 2010 - 10:45 am | टारझन
ह्या टिक्क्यासाठी लागणार्या त्या सळया भारतात ( पक्षी पुण्यात) कुठे मिळतात ? ह्या ण्यु इयर पार्टीला आमचा बार्बेक्यु करण्याचा विचार आहे .. बार्बेक्यु च्या सामाणाबद्दलही काही माहीती देता आली तर खुप आभारी राहीन मी.
आगाऊ धन्यवाद .
-( चेफ ) टार्जन
13 Dec 2010 - 10:56 am | चिंतामणी
ह्या टिक्क्यासाठी लागणार्या त्या सळया मंडईचे समोर मिळतात. बाबु गेनु मंडळाचा गणपती जेथे बसतो तेथे. बार्बेक्यू म्हणून तीथे मिळणा-या शेगड्या वापरु शकतोस. कोळसा तुला रहाळकर राम मंदिराचेजवळ (शनीपाराकडुन ज्ञान प्रभोदिनीचे दिशेन जाताना) अथवा नारायण पेठेत काकासाहेब गाडगिळांचा वाड्याचे रस्त्यावर वखारीत मिळेल.
बार्वेक्यू घ्यायचा असेल तर कुंभारवाड्यात मिळेल.
13 Dec 2010 - 11:02 am | टारझन
लई भारी ! धन्यवाद ...
बार्बेक्यु ची पाककृती मी एका इंग्रजी संस्थळावर पाहिलेली आहे . पण ती पुर्ण पाष्चिमात्य स्टाईल मधे आहे. आपल्या इकडे बार्बेक्यु उपलब्ध साधनांमधे कसा करता येईल ह्यावर गणपा , स्वातीतै , प्राजक्ता , चिंतामणी किंवा अजुन कोणी "नविन धागा काढुन " प्रकाश टाकु शकेल काय ?
13 Dec 2010 - 11:06 am | जागु
प्राजक्ता तों.पा.सु.
प्राजक्ता चिंतामणी सांगतात त्याप्रमाणे कांदाही छान लागतो.
13 Dec 2010 - 12:52 pm | पर्नल नेने मराठे
मला शेन्द्री /तन्दुरी रंग कुठे मिळेल ?
13 Dec 2010 - 1:51 pm | प्राजक्ता पवार
फुड कलर , ईसेंस ज्या दुकानात मिळतात तिथेच तंदुरी कलर मिळेल.त्यात दोन प्रकार असतात रेड व ऑरेंज रेड. त्यापैकी ऑरेंज रेड घ्यावा.
13 Dec 2010 - 12:57 pm | रोमना
मस्तच!
13 Dec 2010 - 12:59 pm | परिकथेतील राजकुमार
पनीर उर्फ थर्माकोल हा पदार्थ बिलकुल आवडत नाही. वेळेला आम्ही सोलकढीत बुडवुन रोटी खाऊ पण पनीर नको.
13 Dec 2010 - 2:01 pm | गणपा
चला कुणी तरी भेटला पनीर न आवडणारा. :)
बाकी मागे एकदा मिंटीतैने पण असाच पनीर टिक्क्याचा जहाल फोटु दिला होता.
http://www.misalpav.com/node/6387
पण माझं मत, टिक्का असावा तर तो चिकनचाच. ;)
13 Dec 2010 - 2:46 pm | मस्त कलंदर
>>>चला कुणी तरी भेटला पनीर न आवडणारा.
मी पण आहे रे पनीर न आवडणारी.
तसं तर मी मांसाहारही करत नाही, तरी तुझ्या सगळ्या पाकृंचे कौतुक करते. त्याच धर्तीवर या पनीर टिक्क्याचेही कौतुक... ज्याला/जिला कुणाला खायचे ते बनवून खातीलच. :-)
13 Dec 2010 - 11:49 pm | मेघवेडा
मीही. पण पाकृचे कौतुक. फोटो मस्तच आलाय!
>> वेळेला आम्ही सोलकढीत बुडवुन रोटी खाऊ पण पनीर नको.
हे भारीच! इतकी पराकोटिची नावड नाहीये माझी पण हा अॅटिट्यूड भारीच! ;)
14 Dec 2010 - 9:01 am | विंजिनेर
परा, नुसती रोटी बुडवून खायच्या ऐवजी बटर-रोटी किंवा कुल्चा खा. भारी लागते. आणि हो, सोलकढीत आल्याच्या ऐवजी लसूण वापरणे गरजेचे आहे.
14 Dec 2010 - 10:58 am | परिकथेतील राजकुमार
च्यायला हे नविनच. करुन बघायला पाहिजे प्रकार. एकदा सोलकढी आणुन तिला लसणाची फोडणी देउन बघतो ;)
13 Dec 2010 - 2:28 pm | पियुशा
म्मस्त यम्मि पनीर आवड्त जाम आप्ल्याला
13 Dec 2010 - 9:24 pm | संजयशिवाजीरावगडगे
अप्रतिम पनीर टिक्का ! खुश झालो जाम !!
13 Dec 2010 - 9:40 pm | प्राजु
सह्हीच!! करेन लवकरच. :)
13 Dec 2010 - 11:38 pm | भानस
एकदम टेम्प्टींग दिसतेय. :)
14 Dec 2010 - 9:44 am | आंसमा शख्स
असाच चिक्क्नन टिक्का पण करून पाय्ह्ला पाहिजे.
14 Dec 2010 - 11:41 am | महेश काळे
मस्त फोटु
14 Dec 2010 - 8:39 pm | मदनबाण
आयला !!! पनीररररररररररररररररररररररररर... :)
आपल्याला बाँ पनीरचा कंचा बी पदार्थ लयं आवडतो बघा... :)
पनीर पदार्थाच्या बाबतीत म्या लय हावरट,आधाशी...आणि जे काय असेल ते हाय.;)
कुठल्याही पदार्थात मला पनीर दिसले रे दिसले की मग... खी खी खी !!! ;) समजलेच असेल तुम्हाला मला कसं वाटेत असेल ते. ;)
(पोट पुजारी)
आम्ही सर्व प्रकारच्या पुजेत यक्सपर्ट हावोत !!! ;)