राष्ट्रस्पाऊस

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
10 Dec 2010 - 11:08 am
गाभा: 

मराठीत बरेच शब्द हे पुरुष वाचक आहेत
जसे राज्यकर्ता , मंत्री , महापौर , ससा , मासा या शब्दांचे स्त्रीलिंगी शब्द मराठीत लिहिले जात नाहीत
अर्थात बरेच शब्द हे स्त्री लिंगी आहेत त्यांचे पुल्लिंगी शब्द मराठीत नाहीत
जसे: माशी वाटी
पण त्यामुळे पंचाईत होते.
यावर जायच्या अगोदर इंदीरा गांधी ना रशियन अधिकार्‍यानी त्याना काय संबोधले जावे अशी विचारणा केली "हर एक्सेलन्सी "की "हर हायनेस" किंवा "मॅडम प्राईममिनिस्टर" इंदीरा गांधी म्हणाल्या की त्यामुळे काही फरक पडत नाही. त्यावर त्या रशियन अधिकार्‍याने विचारले की तुमचा स्टाफ तुम्हाला काय संबोधतो. इंदीरा गांधी उत्तरल्या " सर"
अधीकारी ही व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकते. पण बहुतेक पदांची नावे मात्र पुरुष वाचक आहेत.
उदा : चेअरमन.... आता एखादी स्त्री एखाद्या संस्थेची चेअरमन असेल तर त्या पदाला चेअरवुमन असे संबोधावे की काय असा पेच निर्माण झाला याला उत्तर म्हणून त्या पदाचे नाव चेअर पर्सन असे करण्याची सूचना पुढे आले.
याच न्यायानुसार राष्ट्रपती पदावर एखादी महिला विराजमान झाली तर त्या पदाचे नाव काय करायचे अशी एक विचारणा केली जावू लागली.
प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यानन्तर ही चर्चा फारच प्रकर्षाने होऊ लागली.
कोर्टात पती किंवा पत्नी यांचा उल्लेख वेगळा करण्यापेक्षा दोंघांसाठी स्पाऊस हा शब्द वापरला जातो ( हाय कोर्टाच्या दोस्तानानिर्णयानन्तर हा शब्द किती उपयोगी आहे ते कळून आले )
स्पाऊस या शब्दा पती आणि पत्नी या दोन्हीं शब्दांचा समावेश होतो.
त्या न्यायाने राष्ट्रपती हा पदवाचक शब्द राष्ट्रस्पाउस असा बदलावा का?
समानतेच्या युगात हा महीलाना समान न्याय ठरेल

प्रतिक्रिया

अपूर्व कात्रे's picture

10 Dec 2010 - 11:17 am | अपूर्व कात्रे

पती या शब्दाचा अर्थ केवळ "नवरा" असा नसून अधिपती किंवा मुख्य असाही आहे. यावरूनच राष्ट्राचा मुख्य तो राष्ट्रपती हा शब्द आला असावा. लखपती, करोडपती, धनपती हे शब्दही असेच बनले असावेत असा माझा अंदाज आहे. राष्ट्रपती या शब्दातील "पती" हा शब्द नवरा या अर्थाने घेतला तर आदरणीय प्रतिभा पाटील बाईंना राष्ट्रपत्नी असे म्हणायला लागेल. :D :D :D :D

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2010 - 11:24 am | परिकथेतील राजकुमार

राज्यकर्ता = राज्यकर्ती

मंत्री = मंत्रीण

महापौर = महापौरीणबै

ससा = सशी

मासा = मासोळी

हे शब्द अनेकदा वाचल्याचे स्मरते.

मासा चे माशी किंवा माशिण केले नाहीस ... परा, त्याबद्दल अभिनंदन भाऊ! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2010 - 11:21 am | परिकथेतील राजकुमार

मासा चे माशी किंवा माशिण केले नाहीस ... परा, त्याबद्दल अभिनंदन भाऊ!

=)) =))

पण मासोळी हा शब्द बरोबर आहे का नाही ? सर्रास वापरला जातो हा. ह्या नावाची एक नदी आहे, अभयारण्य आहे.

'जाळ्यात मासोळी गावायची नाय' असे एक गाणे पण आहे ;)

शैलेन्द्र's picture

11 Dec 2010 - 5:52 pm | शैलेन्द्र

मस्त.. पण जनरली मासोळी हा शब्द "मासा" याचे अनेकवचन म्हणुन वापरला जातो, खास करुन कोळी लोक तो तसा वापरतात. तो लिंगवाचक म्हणुन वापरत नाही.

पैसा's picture

12 Dec 2010 - 11:27 pm | पैसा

तुम्ही म्हणता तो अनेकवचनी शब्द "मासळी". लहानशा माशाला "मासोळी" म्हणतात, आणि तो स्त्रीलिंगीच उच्चारतात.

अरुण मनोहर's picture

11 Dec 2010 - 7:30 am | अरुण मनोहर

परा ---- परी
जालावर सापडली का?

अतिशय षेंषेषणल विषयाला हात घालुन विजुभौंनी फार मोठे मौलीक कार्य केले आहे . विजुभाऊ आज का सलाम , आप के नाम.
बाकी पोहणारा मासा आणि उडणारी माशी .. ह्यांन्ना लिंगानुसार संबोधणे खरोखर अवघड आहे .
तसेच "कुत्रा" ह्या प्राण्याचं आहे. कुत्रा चे स्त्रीलिंग कुत्री आहे .. तर अनेक वचन सुद्धा कुत्रीच आहे .. त्यामुळे आम्ही गणितानुसार एक सिद्धता मांडली होती ( जी बर्‍याच अंशी खरी आहे )

अनेक ( कुत्रा ) = कुत्री
म्हैला ( कुत्रा ) = कुत्री
म्हणुन ,
अनेक (कुत्रा) = म्हैला ( कुत्रा)
कुत्रा कुत्रा गेट कँसल .... पुढचं तुम्ही बघा .. माझं गणित आजकाल बहिसटलं आहे.

बाकी राष्ट्रपतीचं जर राष्ट्रपत्नी केलं तर खरोखर अनर्थ होतो !

विजुभाऊ's picture

10 Dec 2010 - 12:23 pm | विजुभाऊ

टार्‍या इन्क्लूड राहीले की
आणि लायब्ररी फंक्षन कुठे आहे
# विजुभाऊ #

मिसळभोक्ता's picture

10 Dec 2010 - 2:05 pm | मिसळभोक्ता

विजूभौ,

आता तुम्ही हँड्स-ऑन राहिले नाही, ह्याचेच सदर प्रतिसाद प्रतीक आहे. (हात तिथून काढा, कामाला लावा :-)

ते खरे,

#इन्क्लूड <टार्‍या.एच>

असे हवे.

विनायक प्रभू's picture

10 Dec 2010 - 2:33 pm | विनायक प्रभू

मिभो शी सहमत.

विजुभाऊ's picture

10 Dec 2010 - 3:41 pm | विजुभाऊ

अरे बाबा मी लोकाना कामाला लावतो. < आणि दोन्हीकडून शिव्या खातो.एच >

स्वानन्द's picture

10 Dec 2010 - 11:30 am | स्वानन्द

राष्ट्रप्रमुख.

तसेच वर, अपूर्व च्या प्रतीसादाशी सहमत.

पिवळा डांबिस's picture

11 Dec 2010 - 4:05 am | पिवळा डांबिस

राष्ट्रप्रमुख हेच बरोबर!!

सुधिर बेल्हे's picture

10 Dec 2010 - 11:46 am | सुधिर बेल्हे

अपुकत्र्कत्रेन्च्या मताशि सहमत आहे.

विजुभाऊ's picture

10 Dec 2010 - 11:48 am | विजुभाऊ

आ( भा) दरणीय पराजी

मंत्री = मंत्रीण
महापौर = महापौरीणबै
ससा = सशी

ससा चे सशी हे स्त्रीलिंगी रूप आहे हा शोध लावल्याबद्दल तुमचे अभिनन्दन. आत्तापर्यन्त हा शब्द मी कुठेच वाचला नव्हता. माझे अगाध अज्ञान्दूर करण्यात मदत केल्याबद्दल आभार.

मराठीत मंत्र्याच्या बायकोला मंत्रीण बै म्हणतात. जसे पाटलाच्या पत्नीला पाटलीण .
डॉक्टरच्या पत्नीला डॉक्तरीण बाई असे म्हणतात. पण वैद्य असलेल्याच्या पत्नीला वैद्यीण वगैरे म्हनत नाहीत.
महीला डॉक्टर ला डॉक्टरईण बाई असे म्हनता कुठे कुठे पण त्यांच्या ( डॉक्तर नस्लेल्या )पतीला डॉक्टर वगैरे म्हणत नाहीत.
नर्स हा शब्द केवळ स्त्री साठी वापरला जातो. पुरुष नर्स साठी नर्सोबा हा शब्द वापरावा का?

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2010 - 11:53 am | परिकथेतील राजकुमार

हे बघा विजुभौ तुम्हाला पटत नसेल तर द्या सोडून. सगळ्या महान शोधांना लोकांनी आधी असेच नाकारले होते.

विजुभाऊ's picture

10 Dec 2010 - 12:07 pm | विजुभाऊ

पटत ना. तुमचे हे नवे शब्द पेटन्ट सहीत नेमाड्यांना कळवतो
( हल्ली गुजरातेत असल्यामुळे आसपास सगळेच पटेल )
बाय द वे
शाळेत शिक्षीकेला ओ बाई असे बोलावतात
शिक्षकाला ओ बुवा असे का बोलावत नाहीत

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2010 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार

शाळेत शिक्षीकेला ओ बाई असे बोलावतात
शिक्षकाला ओ बुवा असे का बोलावत नाहीत

अता नाही आवडत एखाद्याला. काय करणार आपण ? ;)

बाकी तुम्ही इंचा इंचाने ह्या धाग्याच्या जो काश्मिर करत आहात तो पाहून आम्ही सदगदित झालोय.

मुलूखावेगळी's picture

10 Dec 2010 - 12:19 pm | मुलूखावेगळी

>>>>>पुरुष नर्स साठी नर्सोबा हा शब्द वापरावा का?

हाहा........................... सहीच हा

दाजीबा, म्हसोबा,खन्डोबा,आजोबा शब्द कसे आले ते कळ्ले आता.

नितिन थत्ते's picture

10 Dec 2010 - 2:55 pm | नितिन थत्ते

>>पुरुष नर्स साठी नर्सोबा हा शब्द वापरावा का?

चालूद्या. मी जरा नर्सोबाच्या वाडीला जाऊन येतो. :)

नरेशकुमार's picture

10 Dec 2010 - 6:32 pm | नरेशकुमार

अजुन आले का नाय ?

"राष्ट्रध्यक्ष" हा शब्द कसा वाटतो.(फार तर "राष्ट्राध्यक्षा" असा बदल करावा लागेल्,पण अवघडल्यासारखं नाही होणार.)बरेच देश सध्या हाच शब्द वापरताना दिसतात.
आता माझ्या डोक्यातले काही पर्यायः-

राष्ट्रप्रमुख (Head Of State)
राष्ट्राधिकारी(CEO,MD ह्यासारखा, आख्य्ख्या देशाचा अधिकारी/officer,)
राष्ट्रशासक ((राष्ट्रप्रमुख (Head Of State) प्रमाणेच))
राष्ट्रपालक(स्त्रिलिंगीही हेच नाव खपुन जाइल.) (राष्ट्राचा (प्रतिकात्मकरित्या) प्रतिपाळ करणारा,सांभाळणारा,caretaker, "राज्यपाल" हे नाव वापरतोच ना आपण,अगदि तस्सच)
राष्ट्रस्वामी/राष्ट्रस्वामिनी (राष्ट्रप्रमुख (Head Of State) प्रमाणेच)

राष्ट्रमित्र (हे आपलं असच, ह्या नावाच पद फक्त आपल्याच देशात असेल आणि एक वेगळं, designation statement बनेल आपल्या देशाचं)

राष्ट्रमूर्ती ( "न्याय मूर्ती " म्हणतो ना आपण्,तसच. प्रतिकात्मक दृष्टीनं राष्ट्रपती म्हंजेच राष्ट्र. किंवा राष्टृअपती म्हंजे साक्षात आख्य्ख्य देशाचं one person प्रतिनिधित्व.)

प्रथमनागरिक(हे सध्याच वापरात असलेलं नाव्/कार्य)
अंतिम अधिकारी( Final Word,final authority असणारं स्थान)

हे शब्द पहिल्यांदाच ऐकतोय म्हणुन वेगळे वाटु शकतात. पण ह्यातले बहुतांश शब्द सवयीने रुळु शकतात अशी मला खात्री आहे.
(च्यायला,इतक्या भारी भारी आयड्या आहेत आपल्याकडं, पाठवाव्या काय गव्हर्मेंट ला? ;-))

आपलाच मनोबा.

विजुभाऊ's picture

10 Dec 2010 - 12:09 pm | विजुभाऊ

"राज्यपाल" हे नाव वापरतोच ना आपण,अगदि तस्सच)

नगरपाल हा शब्द ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने नगरपालीका हा शब्द वापरला जात नाही

कानडाऊ योगेशु's picture

10 Dec 2010 - 12:05 pm | कानडाऊ योगेशु

विजुभाऊ..
राष्ट्रस्पाऊज हा तर हायब्रीड शब्द झाला.
(प्रेसिडेंट हा शब्द जेंडर बायस्ड नाही आहे.)
राष्ट्रपती हा संस्कृत शब्द आहे.
स्पाऊजला समानार्थी संस्कृत शब्द आहे काय?

विजुभाऊ's picture

10 Dec 2010 - 12:11 pm | विजुभाऊ

स्पाऊज ला समानार्थी मराठी शब्द " साथीदार / जोडीदार "
पण चोरांचे साथीदार असतात. आणि भ्रष्टाचार्‍यांचे जोडीदार

स्पा's picture

10 Dec 2010 - 12:15 pm | स्पा

स्पा

माझ्या नावाचं अनेकवचन वाटतंय..... ;)

अप्पा जोगळेकर's picture

10 Dec 2010 - 5:13 pm | अप्पा जोगळेकर

'संपादक मंडळ' हा आय डी नेहमी खटकतो. संपादिका मंडळ का नाही. हा महिलांना मुद्दाम सिंगल आउट करण्याचा प्रकार आहे. सरपंच ह्या आय डी ची सुद्धा तीच कथा.

पंगा's picture

11 Dec 2010 - 7:49 pm | पंगा

'मंडळ' हा शब्द नपुंसकलिंगी आहे, याची कृपया दखल घ्यावी.

त्यामुळे यात महिलांना सिंगल-आऊट करणे किंवा पुरुषप्राधान्य यांपैकी काहीही दिसते असे वाटत नाही.

चूभूद्याघ्या.

(गुडबुकाचा आवेदनकर्ता!)

विजुभाऊ's picture

10 Dec 2010 - 5:46 pm | विजुभाऊ

अरे बापरे.....
ओ अप्पाकाका.....
मंडळ म्हणजे कोणी व्यक्ती नसते.
असो.
इतिहासात क्लीओपात्रा ला किंवा तिची बहीण अर्सीनी याना लोक काय म्हणायचे ते कळाले तर बरे होईल
पितामह भीष्माना सामोरे जाणारा शिखंडी हा/ही /हे तृतीय पन्थी होता/होती/होतं म्हणून भीष्माने लढायचे नाकारले.
शिखंडी ला लोक काय संबोधायचे कोण जाणे. ( भीष्माला सामोरे जाण्याचा मान मिळवणारी व्यक्ती किमान राजपुत्र तरी असेल ना )

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2010 - 5:55 pm | परिकथेतील राजकुमार

पितामह भीष्माना सामोरे जाणारा शिखंडी हा/ही /हे तृतीय पन्थी होता/होती/होतं म्हणून भीष्माने लढायचे नाकारले.
शिखंडी ला लोक काय संबोधायचे कोण जाणे. ( भीष्माला सामोरे जाण्याचा मान मिळवणारी व्यक्ती किमान राजपुत्र तरी असेल ना )

विजुभौंचा नविन शोध. शिखंडी तॄतीय पंथी होता.
आता हे आणि कोणी सांगीतले तुम्हाला विजुभौ ? त्याचा जन्म स्त्रीरुपात झाला होता व पुढे त्याचे पालनपोषण मात्र पुरुषासारखे केले गेले. काही वर्षांनंतर त्याला यक्षाच्या आशिर्वादाने पुरुषत्व प्राप्त झाले. तो पुरुष बनला असला तरी आधी स्त्रीच होता म्हणुन त्याच्याशी लढण्याचे भिष्मांनी नाकारले होते.

श्री. शरद ह्यांनी ह्यावर अत्यंत सुंदर लिखाण केले आहे ते वाचा.

प्रेमदान चळवळीतील चिटोरे वाचुन हिंदू रिती रिवाज धर्म संस्कृती समजुन घेण्याचा प्रयत्न केला की असेच होते. विजुभाऊंचा दोष नाही. त्यांना योग्य गुरु न मिळाल्याने त्यांचे विचार भरकटले आहेत.

त्याचा जन्म स्त्रीरुपात झाला होता व पुढे त्याचे पालनपोषण मात्र पुरुषासारखे केले गेले. काही वर्षांनंतर त्याला यक्षाच्या आशिर्वादाने पुरुषत्व प्राप्त झाले. तो पुरुष बनला असला तरी आधी स्त्रीच होता म्हणुन त्याच्याशी लढण्याचे भिष्मांनी नाकारले होते
अंबालीका ही नव्या जन्मात शिखंडी बनून आली होती. हे भीष्माना ठौक होते.
अर्जूनसुद्धा एक वर्षे बृहन्नडा म्हणून वावरला होता. त्याच्या बाबत भीष्मानी कधी आक्षेप घेतला नव्हता

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2010 - 6:15 pm | परिकथेतील राजकुमार

अंबालीका ही नव्या जन्मात शिखंडी बनून आली होती. हे भीष्माना ठौक होते.
अर्जूनसुद्धा एक वर्षे बृहन्नडा म्हणून वावरला होता. त्याच्या बाबत भीष्मानी कधी आक्षेप घेतला नव्हता

ते जौ द्या ! वरच्या शोधाचे काय ते बोला.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Dec 2010 - 8:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ओ इजुभाऊ, अंबालिका नाय, ती अंबा व्हती हो. अम्बालिकेने लगीन केले इचीत्रविर्याशी...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Dec 2010 - 8:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विजुभाऊ जर भीष्म असतील तर त्यांना माहित ना जास्त अंबा का अंबालिका ते! ;-)

काय राव, तुम्ही कोणाला इतिहास शिकवता आहात, व्याकरणमहर्षि, सुसंगतीसम्राट, इतिहासाचार्य, योगाचार्य विजुभाऊ यांना?

त्याचा जन्म स्त्रीरुपात झाला होता व पुढे त्याचे पालनपोषण मात्र पुरुषासारखे केले गेले. काही वर्षांनंतर त्याला यक्षाच्या आशिर्वादाने पुरुषत्व प्राप्त झाले.

म्हंजी ट्रान्ससेक्शुअल का रे परा?

नरेशकुमार's picture

10 Dec 2010 - 6:30 pm | नरेशकुमार

नाय,
मार्फयकल जारफॅक्स्न

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2010 - 6:49 pm | परिकथेतील राजकुमार

मराठीत विचार रे निळोबा :( विंग्रजी अंमळ कच्च आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Dec 2010 - 6:42 pm | बिपिन कार्यकर्ते

विजुपर्सन, छानच चर्चा हो. खूपच मौलिक माहिती मिळाली.

धमाल मुलगा's picture

10 Dec 2010 - 6:47 pm | धमाल मुलगा

गुजरातेत कायमची दारुबंदी का ते!

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2010 - 6:48 pm | परिकथेतील राजकुमार

भाड्या

आत्मशून्य's picture

10 Dec 2010 - 6:52 pm | आत्मशून्य

तूम्ही

प्राजु's picture

10 Dec 2010 - 10:01 pm | प्राजु

प्रचंड करमणूक होतेय... प्रतिसाद आणि चर्चा वाचून.
चालू द्या. आहेच मी वाचायला.. मोठ्ठा पॉपकॉर्न चा डबा आणून ठेवलाय. संपला की पुन्हा आणेन..
आमच्या बाजूच्या दुकानदारणी कडे भरपूर पॉपकॉर्न मिळतात. ;)

अविनाशकुलकर्णी's picture

11 Dec 2010 - 9:32 am | अविनाशकुलकर्णी

पेशवाईत एकाने नाइक हे पद नकारले कारण त्याच्या बायकोला सारे नायकिण म्हणु लागले

विजुभाऊ's picture

11 Dec 2010 - 10:18 am | विजुभाऊ

नायकाची बायको नायकीण. पण तमाशाच्या फडाच्या मलाकाची बायको ( असे समजू काही क्षण ) अथवा एखाद्या कळपाच्या नायकाची आवडती स्त्री ( अशी की तो नायक जिच्या कह्यात असेल )
यात व्याकरणदृष्ट्या चूक काहीच नाही. पण मराठी व्यत्यास भोवतो

अवांतरः ढालगज या शब्दाचा अर्थ झेंड्याचा हत्ती , मानाचा हत्ती , जो सर्वात पुढे असतो
ढालगज भवानी हा त्याचा व्यत्यास.

शिल्पा ब's picture

11 Dec 2010 - 11:34 am | शिल्पा ब

<<ढालगज भवानी

:D :-D :lol:

परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2010 - 11:46 am | परिकथेतील राजकुमार

अवांतरः ढालगज या शब्दाचा अर्थ झेंड्याचा हत्ती , मानाचा हत्ती , जो सर्वात पुढे असतो
ढालगज भवानी हा त्याचा व्यत्यास.

विजुभौंचा एक अजुन महान शोध =)) ह्यांना कोणितरी नोबेल द्या रे.

सैन्याच्या अग्रभागी सैन्याचं निशाण घेऊन जाणारा बेफाम असा हत्ती असायचा. ‘ढाल’ म्हणजे निशाण, ‘गज’ म्हणजे हत्ती. पेशव्यांच्या सैन्याच्या अग्रभागी हत्तीण असायची, तिचं नाव होतं, ‘भवानी’. त्यावरून ‘ढालगज भवानी’ हा वाक्प्रचार रूढ झाला.

संदर्भ.

अवलिया's picture

11 Dec 2010 - 12:30 pm | अवलिया

विजुभाउ रॉक्स !

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Dec 2010 - 2:28 pm | बिपिन कार्यकर्ते

रॉक्सचे मराठी भाषांतर करायच्या भानगडीत मुद्दामच नाही पडलो. उगाच लफडी नकोत. ;)

विजुभाऊ's picture

11 Dec 2010 - 5:45 pm | विजुभाऊ

हरकत नाही.
रॉकीपंत असण्यापेक्षा ते बरे

विजुभाऊ's picture

11 Dec 2010 - 1:27 pm | विजुभाऊ

परा यांची ढाल गज याची व्याख्या बरोबर आहे.
पण ढाल गज हा मानाचा हत्ती असायचा.
कंसाच्या दरबारात " कुवलयापीड " नामक एक ढालगज होता. ( मानाचा हत्ती ) त्याला कृष्णाने ठार केले होते.
असो.
ढाल गज हा अग्रणी असायचा तो झेंड्याचा हत्ती देखील असायचा. त्याला विषेश प्रशिक्षण असायचे.
असो
पेशव्यांच्या सैन्याच्या अग्रभागी हत्तीण असायची
असेल. पेशवे मुद्दाम होऊन हत्तीण सर्वात पुढे ठेवतील असे वाटत नाही.
केवळ भवानी या नामामुळे तो हत्ती हा हत्तीण असावा असा शोध परानी लावला असावा
"ढालगज भवानी " हा शब्द हा ज्या अर्थाने मराठीत हल्ली वापरला जातो त्या अर्थाने तो व्यत्यास होऊन आला असावा असे मी म्हटले. त्यात कोणता जावई शोध लावला? ( जावई शोध हा आणखी असाच एक व्यत्यास )

शैलेन्द्र's picture

11 Dec 2010 - 6:07 pm | शैलेन्द्र

"पेशव्यांच्या सैन्याच्या अग्रभागी हत्तीण असायची
असेल. पेशवे मुद्दाम होऊन हत्तीण सर्वात पुढे ठेवतील असे वाटत नाही."

अहो, पेशवे हुषार होते, त्यांचा हत्तीच्या सायकऑलॉजीचा दांडगा अभ्यास होता. हत्तिन पुढे चालली कि बाकीचे हत्ती गप मागुन चालायचे वास काढत.... आधीक माहीती व दृष्यात्मक प्रचीतीसाठी, जेष्ट दक्षिण भारतीय तारका खुश्बु/ रंभा व इतर यांच्यावर चित्रीत झालेले गाणे बघावे.

तिमा's picture

12 Dec 2010 - 12:13 pm | तिमा

सर्व प्रतिक्रिया वाचल्यावर नर्स - नर्सोबा या प्रतिक्रियेला ' विनर' घोषित करण्यात येत आहे.

'राष्ट्राध्यक्ष' आणि 'राष्ट्राध्यक्षा' हे शब्द असताना इतकं कशाला शोधायचं?
भारताचेच फक्त राष्ट्रपती असतात काय? बाकीचे देश 'राष्ट्राध्यक्ष' आणि 'राष्ट्राध्यक्षा' हे शब्द वापरतात असे वाटते.