साहित्य-
गव्हाची जाड्सर कणिक-२ वाटी (मध्यम आकाराची)
हळ्द्-चिमुट्भर
खाण्याचा सोडा-चिमुट्भर
मीठ्-चवीनुसार
जीरे,ओवा,तेल गरजेनुसार
क्रुती-
१)एका भांड्यात गव्हाची जाड्सर कणिक घ्यावी (टीप) त्यात हळद ,खाण्याचा सोडा,जीरे,ओवा,चवीनुसार मीठ व पाणी घालुन कणिक मळुन घ्यावी.
२)तयार कणकेचे दोन समान गोल भाग करावेत .
३)त्यापैकी एक गोळा घेउन त्याला हातानेच वाटीचा आकार द्यावा व त्या वाटीत एक चमचा तेल घालावे व वाटीचे तोंड बंद करुन घ्यावे (फोटोत दाखवल्याप्रमाने)
)ईड्लीपात्रात पाणी गरम करत ठेवावे .वरीलप्रमाणेच दुसरा गोळाही वळुन घ्यावा व दोन्ही गोळे ईड्लीपात्रात्(वरच्या जाळीत्)ठेवावे व झाकण लावुन घ्यावे.
)बटटी साधारण २० ते २५ मिनीट वाफवु द्यावी
६)गोळे थंड झाल्यावर सुरीने कापुन घ्यावे व आवडीप्रमाणे डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करावेत व वरणासोबत गरमागरम सर्व्ह करावेत.
टीप्-१-गहु चक्कीवरुन जाड्सर किंवा रवाळ दळुन आणवेत नाहितर गहु व रवा ३:१ या प्रमाणात घ्यावा.
२-आवडत असल्यास तीळही घालु शकतात.
img src="http://lh6.ggpht.com/_qw1hyOKg_lw/TMMfMzEzPMI/AAAAAAAAADQ/ziL9a7RNTJw/s1..." width="300" height="300" alt="batti" />
प्रतिक्रिया
24 Oct 2010 - 12:20 am | डावखुरा
छान ओळख...
कच्ची कैरी नावावरुन पदार्थाची खमंग चव जिभेवर रेंगाळली..
आम्ही पुडाची बट्टी करतो..लाटुन तुला घड्या चौकोनी आकार देउन मग ती चाळ्णीवर वाफवुन घेतो..
नंतर तुकडे करुन मंद आचेवर तळुन घेउन..
बट्टी मोडुन त्यावर गोड..आंबट वरण(चिंच-गुळ) आणि तगावर्आणी तुप ,लिंबु...
अगदी आत्ताही जिभेला पाणी सुटलंय..
किण्वा मस्त खरपुस गरम गरम तळ्लेली बट्टी सोबत कैरीचे तिखट लोण्चे...
तळण नको असल्यास ओवेन मध्ये भाजुन घेउ शकतो..
गोड..आंबट वरणाचीही कृती द्या की सोबत..
24 Oct 2010 - 12:22 am | सुनील
दाल-बाटीचाच प्रकार दिसतोय. छान असावा.
24 Oct 2010 - 1:19 am | रश्मि दाते
आणि या बट्टी सोबत आबंट गोड वरण मस्त लागते.
आंबट गोड वरण
साहित्यः
तुरीची डाळ १ वाटी
फोड्णीचे साहित्य मोहोरि,जीरे,हिंग
हळद्,तिखट
कढ लींब
खोब्रे किसलेले १ चमचा
गुळ लिंबा एवढा
चिंचेचा कोळ २-३ चमचे
तेल
पाणी गरजे प्रमाणे
नेहमी प्रमाणे वरण शीजवुन घ्या
कढईत तेल तापवा
त्यात फोड्णि घाला फोड्णीतच हळ्द आणी तिखट घाला
वरण टाका
पाणी टाका
मिठ्,चिंच्,गुळ घाला
खोबरे घाला
२-३ उकळ्या काढा
गरमा गरम आंब्ट गोड वरण बट्टी सोबत खाय्ला तय्यार् आवडत असल्यास थोडा गोडा मसालाही घालावा
24 Oct 2010 - 6:39 pm | सुहास..
काय पाकृदिनाचा सोहळा चालु आहे काय मिपावर ?
24 Oct 2010 - 7:31 pm | स्वछंदी-पाखरु
काय आज तर मेजवान्याच मेजवान्या आहेत मिपा वर...
पाकृ मस्त लिहीली आहे आहे खास करुन मला सगळ्यात जास्त आवडणारी खान्देशी डीश.....
या मधे जरासं ज्वारीच पीठ पन घालतात ना हो??
याला दाल बाफले अस पण म्हणतात.
खान्देशी बट्टी करायचा अजुन एक प्रकार (लहानपणीपासुन बघत आलेलो)म्हणजे त्याचा असा गोळा तयार करतात.
जमीनी मधे एक छोटासा खड्डा करुन त्यात काटक्यांचा (भूईमूगाचे वाळलेले झाड)विस्तव तयार करतात (हल्ली हे शक्य
नाही मग छोटीशी कोळश्याची शेगडीवर पण करता येत). मग हे गोळे त्या निखार्यांमधे टाकतात.मग ते छान खरपूस
भाजल्या नंतर बट्टी तयार होते. मग ही बट्टी साध्या पण जरासे पातळ वरणा त्यावर कालवून मस्त शुद्ध तुप भरभरुन
टाकतात आणि मग खातात.
बट्टी सोबत तोंडी लावण्यासाठी तिखट वांग- बटाटा ची भाजी कैरी व गुळ घालुन बनवतात.
खान्देशात आपल्या आपल्या आवडी निवडी नुसार बर्याच बट्टी बनवायच्या वेगवेगळ्या पद्ध्ती आहेत. त्यातल्या त्यात मला
ह्या प्रकारच्या बट्ट्या खुप आवडतात.
धन्यवाद...
स्व पा
बट्टी सारखाच माझा आकार गोल गरगरीत आहे
26 Oct 2010 - 2:21 pm | प्राजक्ता पवार
विदर्भातदेखील ही बनवल्या जाते . पण निखार्यावर भाजुन, सोबत तुप, वरण आणी वांग्या-बटाट्याची भाजी. शेतात हुरडा पार्टीप्रामाणे बट्टी पार्टीदेखील करतात. :)
10 Dec 2010 - 7:34 am | निनाद मुक्काम प...
डाळ फळ
ती भटाची बट्टी करायची पध्धत
आमच्या कडे होते .
25 Oct 2010 - 7:34 pm | स्पंदना
आज सगळ्या पाककृती एकदम वाचल्या म्हणुन एकदम प्रतिसाद देते आहे.
१. खान्देशच खाद्य वैभव आमच्या साठी उघडल्या बद्दल धन्यवाद.
२ . नवी नाव!! नव रुप !! अन सारे फोटो अगदी झकास.
कैरी बाइ नावासारख्या तोम्डाला पाणी सुटणार्या पाककृतीम्बद्दल एकदम चार पाच धन्यवाद.
26 Oct 2010 - 12:55 am | मराठमोळा
नुसती बट्टी का बरं? सोबत आंबट्-गोड वरणाची पण पाकृ द्या.
बाकी बट्टी एकदम मस्त दिसतेय. :)
बट्टी ही तळुन, उकडुन, आणि भाजुन सुद्धा बनवतात, मला भाजुन बनविलेली बट्टी फार आवडते.
26 Oct 2010 - 7:18 pm | निवेदिता-ताई
मी बट्टी हा पदार्थ कधीच खाल्ला नाही...जरुर करुन पाहीन...काहीतरी वेगळे.