मराठी मुद्दा ....

अवलिया's picture
अवलिया in काथ्याकूट
9 Dec 2010 - 1:20 pm
गाभा: 

राम राम मंडळी

महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी माणुस यावरुन बरेच वादळ अधुन मधुन उठत असते. ज्यावेळेस जेव्हा जेव्हा मराठी असा संदर्भ असलेला मुद्दा पुढे येतो तेव्हा तथाकथित विचारवंत त्याला नाके मुरडत हा जागतिकीकरणाविरोधी मुद्दा आहे, अशा प्रकारे कुणीही वागु नये इत्यादी मुद्दे उपस्थित करुन मराठी विरोधात मते मांडत असतात.

ब्रिटिश भारतात (विशेषतः महाराष्ट्रात ) येण्यापूर्वी इथे (महाराष्ट्र आणि भारतातला बराचसा भुभाग) हिंदू धर्मियांचे राज्य होते. त्याचे कारण महाप्रतापी छत्रपती श्री शिवाजी महाराज हेच होय याबद्दल तरी कुणाच्या मनात शंका नसावी. ज्यांच्या मनात काही शंका असेल त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा.

माझ्या मनात काही शक्यतांचे विचार आले...

अ) समजा शिवाजी महाराजांचे असे राज्य स्थापन झाले नसते आणि मोगलांनी अदिलशाही बुडवली नसती तर महाराष्ट्रात अदिलशाही किंवा कुठली तरी शाही राहिली असती. ते ब्रिटिशांना शरण न जाता समजा काश्मिरी राजाप्रमाणे स्वतंत्र राहिले असते तर (ज्यात कदाचित मुस्लिम राजा बहुसंख्य मुस्लिम प्रजा किंवा मुस्लिम राजा बहुसंख्य हिंदू प्रजा) ....

ब) गोव्यात जशी पोर्तुगीज सत्ता होती तशी पोर्तुगीज सत्ता राहिली असती आणि ब्रिटिशांचा अंमल नसता लागु झाला तर...

क) पेशवे समजा आंग्लांविरुद्ध जिंकले असते आणि येनकेन प्रकारे काश्मिर राजाप्रमाणे महाराष्ट्राची स्वतंत्र स्थिती असती (ज्यात कदाचित हिंदू राजा बहुसंख्य हिंदु प्रजा किंवा हिदू राजा बहुसंख्य मुस्लिम प्रजा) ...

असे असते तर मला पडलेले प्रश्न असे आहेत -

१)भारतात विनाअट सामिल असलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या मराठी मुद्द्याला विचारवंतांनी पाठिंबा दिला असता का?

२)महाराष्ट्रात बहुसंख्य प्रजा मुस्लिम असती आणि मराठी त्यांची मातृभाषा आणि ओळख असती तर विचारवंतांच्या भुमिकेत काय फरक पडला असता?

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

9 Dec 2010 - 2:02 pm | शैलेन्द्र

थोडक्यात आज विचार्वंतांच खर नाही, कुणी असाल इथे मिपावर तर पटकन पळा..

छोटा डॉन's picture

9 Dec 2010 - 2:10 pm | छोटा डॉन

ह्या वादाला अजुन स्पेसिफिक स्वरुप द्यायचे म्हणुन माझे काही प्रश्न :

१. 'विचारवंत' ह्या गटाची नक्की व्याख्या काय ?
२. 'विचारवंत' ह्या गटात सामिल होण्यासाठी वय, जात, धर्म किंवा इतर अनेक बाबींसंबंधी काही मार्गदर्शक तत्वे आहेत काय ?
३. एकुणात ह्यांची % किती आहे ?
४. ह्यांचा काही दबावगट वगैरे आहे का की जो सरकारी किंवा वैधानिक निर्णयात प्रभावी भुमिका बजावु शकतो किंवा त्या त्या निर्णयात संबंधित 'विचारवंता'ना आरक्षण वगैरे आहे काय ?
५. 'विचारवंतां'ना बाजुला सारुन एखादी कृती केली तर त्याचे दुष्परिणाम काय संभवतात व त्यावर उपाययोजना करण्यासंबंधी काही विचार झाला आहे का ?
६. 'विचारवंत' गटाशी 'समझोता / तोडपाणी ' करण्याचा प्रयत्न झाला आहे का ?
नसल्यास का नाही ?

- छोटा डॉन

विजुभाऊ's picture

9 Dec 2010 - 2:26 pm | विजुभाऊ

६. 'विचारवंत' गटाशी 'समझोता / तोडपाणी ' करण्याचा प्रयत्न झाला आहे का ?

अधोरेखीत शब्द मी चुकून "गटारी " असा वाचला

राजेश घासकडवी's picture

9 Dec 2010 - 2:53 pm | राजेश घासकडवी

१. 'विचारवंत' ह्या गटाची नक्की व्याख्या काय ?

अहो डानराव, जे कोणी स्वतंत्र विचार करतात, आपले विचार मांडतात, व लोकांची मतं बदलण्याचा प्रयत्न करतात ते सर्व विचारवंत. आता हा लेख लिहिणारे लेखक देखील विचारवंतच.

२. 'विचारवंत' ह्या गटात सामिल होण्यासाठी वय, जात, धर्म किंवा इतर अनेक बाबींसंबंधी काही मार्गदर्शक तत्वे आहेत काय ?

छे छे. असं गटबाजीचं - डेमोग्राफिक्सचं राजकारण करण्याबद्दल तुमचा निषेध. कोणीही उठावं आणि विचारवंत बनावं. आणि त्याच न्यायाने इतर विचारवंतांना विचारवंत म्हणून हिणवावं.

३. एकुणात ह्यांची % किती आहे ?

एके काळी ती टक्केवारी साडेतीन होती असे अनेक विचारवंत छातीठोकपणे सांगतात. पण आता ती वाढलेली आहे.

४. ह्यांचा काही दबावगट वगैरे आहे का की जो सरकारी किंवा वैधानिक निर्णयात प्रभावी भुमिका बजावु शकतो किंवा त्या त्या निर्णयात संबंधित 'विचारवंता'ना आरक्षण वगैरे आहे काय ?

दबावगट कसला? तेच बहुतांशी आपल्या संसाराच्या दबावाखाली असतात. जे कृती करणारे असतात ते करून खोऱ्याने पैशे मिळवतात. म्हणतात ना, दोज हू कांट, टीच. शिकवणारे थिअरीवाले, म्हणजे विचारवंतच असतात.

५. 'विचारवंतां'ना बाजुला सारुन एखादी कृती केली तर त्याचे दुष्परिणाम काय संभवतात व त्यावर उपाययोजना करण्यासंबंधी काही विचार झाला आहे का ?

हे काय बोलणं झालं? शिवाजी महाराजांनी राज्य स्थापण्याचा विचार केला, तेव्हा त्यांनी दुसऱ्या विचारवंतांना विचारलं नाही. त्यांनी स्वतःच विचार केला. म्हणजे तेवढ्यापुरते ते स्वतःच विचारवंत झाले. पण ते आचारवंतही होते. पण त्याच मापाने आपण आंग्लांबरोबर हरलो तेव्हासुद्धा कोणीतरी काहीतरी विचार (व आचार) केलाच होता. थोडक्यात काय, बरोबर विचार करणारे असतात किंवा चुकीचा विचार करणारे असतात. पण सगळे विचारवंतच.

६. 'विचारवंत' गटाशी 'समझोता / तोडपाणी ' करण्याचा प्रयत्न झाला आहे का ?
नसल्यास का नाही ?

पुन्हा गटबाजी राजकारणाचा निषेध. आपण व ते असं नसतं. आपण सगळेच विचारवंत.

छोटा डॉन's picture

9 Dec 2010 - 3:15 pm | छोटा डॉन

जे कोणी स्वतंत्र विचार करतात, आपले विचार मांडतात, व लोकांची मतं बदलण्याचा प्रयत्न करतात ते सर्व विचारवंत.

ओक्के, ही व्याख्या पटण्याजोगी आहे. बरोबर आहे, विचार करणे आणि मत मांडणे म्हणजे विचारवंतपणा.
म्हणजे विक्रोळीच्या पुलाखालचा 'वो साला चेतन शर्मा को अक्कलैच नहीं' असे ठाम मत मांडणारा तो १ विचारवंत आणि 'प्रसंगी (बंदुकीतल्या ) गोळ्या खाऊ पण जैतापुर अणुप्रकल्पाची १ वीट बसु देणार नाही' असे धाडसाचे विधान करणारेही विचारवंतच. भलतेच इंटरेस्टिंग आहे हो हे सगळे !

आता हा लेख लिहिणारे लेखक देखील विचारवंतच.

नक्की कल्पना नाही, तसे त्यांना माझ्याकडे काही सुतोवाच केले नाही, तुम्हाला त्यांनी तसे खासगीत सांगितले असल्यास माझी हरकत असण्याचे कारण नाही.
पण त्यानंतर आपलेच दात आपल्याच ओठांना का चावत आहेत असा प्रश्न पडतो, असो.

असं गटबाजीचं - डेमोग्राफिक्सचं राजकारण करण्याबद्दल तुमचा निषेध.

आम्ही केवळ प्रश्न विचारला, बाकी सर्व श्रेय 'त्या'चे.

कोणीही उठावं आणि विचारवंत बनावं. आणि त्याच न्यायाने इतर विचारवंतांना विचारवंत म्हणून हिणवावं.

ओके, म्हणजे 'कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ' ही म्हण प्रामुख्याने विचारवंत 'गोटा'त जास्त प्रचलित असावी असा तर्क अपाल्या विधानातुन निघतो.

एके काळी ती टक्केवारी साडेतीन होती असे अनेक विचारवंत छातीठोकपणे सांगतात. पण आता ती वाढलेली आहे.

अभिनंदन !
ह्यालाच म्हणतात सर्वांगीण प्रगती.
आदरणीय बापुंच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात आंग्लांना चारीमुंड्या चीत करुन आपण जो दैदिप्यमान विजय मिळवला व त्याच्याच पायावर आदरणीय आणि प्रात:स्मरणीय नेहरुचाचांच्या कारकिर्दीत भारतीय महासत्ताचे जे भुमीपुजन झाले त्या काळापासुन ते आदरणीय, द्रष्टा नेता आणि स्वयंभु लोकहृहयसम्राट श्री. राहुलजी गांधींच्या मार्गदर्शनाखाली ह्या 'विचारवंत' गटाने जी प्रगती केली आहे ते पाहुन खरोखर आश्चर्यचकित व्हायला होते.

तेच बहुतांशी आपल्या संसाराच्या दबावाखाली असतात.

खरं आहे, परवा बराक ओमाबा पण आपल्या भाषणात असेच काहीतरी म्हणाले, म्हणजे ते खरेच असावे.

जे कृती करणारे असतात ते करून खोऱ्याने पैशे मिळवतात.

तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे ?
कृती करण्याला की खोर्‍याने पैसे मिळवण्याला ?

म्हणतात ना, दोज हू कांट, टीच. शिकवणारे थिअरीवाले, म्हणजे विचारवंतच असतात.

हो हो, अलबत, तुम्ही म्हणता तसेच असावे, इअन्फॅक्ट तसेच असेल.

थोडक्यात काय, बरोबर विचार करणारे असतात किंवा चुकीचा विचार करणारे असतात. पण सगळे विचारवंतच.

तसे असल्यास हा अजुन सविस्तर अभ्यासाचा विषय होईल.
धागाप्रवर्तकांना नक्की कुठला प्रकार अपेक्षित आहे ह्यासंबंधी त्यांचे मत वाचायला आवडेल, कॉलिंग अवलिया !

आपण व ते असं नसतं. आपण सगळेच विचारवंत.

तात्विक असहमती आहे असे सांगतो.
वर उल्लेखलेल्या काही प्रश्नांची योग्य उकल झाल्याशिवाय हे ठरवणे अशक्य आणि चुक आहे असे निक्षुन सांगतो.

- छोटा डॉन

राजेश घासकडवी's picture

9 Dec 2010 - 4:25 pm | राजेश घासकडवी

'प्रसंगी (बंदुकीतल्या ) गोळ्या खाऊ...

नाही नाही, जे गोळ्या खायला तयार असतात ते आचारवंत नाही का? पण एकंदरीत तुमचा मुद्दा लक्षात येतो आहे. फुटकळ विचार करणारे विचारवंत, व महत्त्वाचे विचार मांडणारे विचारवंत असे वेगवेगळे लोक असतातच. गाणी सगळेच म्हणतात, पण बाथरूम सिंगर्स व लता मंगेशकर यांपैकी बाथरूम सिंगर्सवर टीका करायची असेल तर सगळ्यांनाच 'गायक भसाडे गातात' असं जनरल परपज विधान केलं तर ते निरुपयोगी ठरतं. इतकंच.

तुम्हाला त्यांनी तसे खासगीत सांगितले असल्यास माझी हरकत असण्याचे कारण नाही.

सांगण्याची गरजच नाही. विचारवंतांशिवाय काथ्याकूट कोण करतं, ऑ?

पण त्यानंतर आपलेच दात आपल्याच ओठांना का चावत आहेत असा प्रश्न पडतो, असो.

उपमा थोडीशी चुकली. विचार व विरुद्ध विचार यांचा संघर्ष म्हणजे दात व ओठ नसून, वरचे दात व खालचे दात यांचं भरडणं आहे. एखाद्या घटनेचं व्यवस्थित पचन होण्यासाठी हे घर्षण, चर्वण अत्यावश्यक आहे.

ह्यालाच म्हणतात सर्वांगीण प्रगती.

शिवाय इंटरनेट क्रांती व घराघरात टीव्ही जाण्याने क्रांती झाली ती व साक्षरतेत भर पडली त्यामुळे जनमानसाची विचार वाचण्याची भूक वाढली. मार्केट इकॉनॉमिक्स हो साधं!

तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे ? कृती करण्याला की खोर्‍याने पैसे मिळवण्याला ?

आक्षेप नाहीच. उलट पाठिंबा आहे. कोणीच कृती केली नाही, तर विचारवंत वाढणार नाहीत का? ते कोणाला हवंय? कृती करणारे करत राहातात, जीडीपी वाढवतात, झालंच तर इतिहास वगैरे घडवतात - त्यामुळे विचार करणाऱ्यांना व मांडणाऱ्या सर्वांनाच मोकळीक मिळते.

तसे असल्यास हा अजुन सविस्तर अभ्यासाचा विषय होईल.

थोडं विस्तारून सांगतो. माझा आक्षेप आहे तो सरसकट सगळ्यांना 'विचारवंत' या एका लेबलाच्या बरणीत भरून त्यांविषयी बोलण्याला आहे. चांगले विचार करणारे, पुरोगामी विचार करणारे, सकारात्मक विचार करणारे, वाईट विचार करणारे, यडपट विचार करणारे, चुकीचा विचार करणारे, धर्माधिष्ठित विचार करणारे अशा सब-क्याटेगऱ्या करून विशिष्ट क्याटेगरीविषयी बोलणं उत्तम असं माझं मत आहे. उदाहरणार्थ, 'सर्व हिंदू वाईट' असं जर कोणी म्हटलं तर ते आक्षेपार्ह होईल. त्यापेक्षा 'वर्णव्यवस्थेचा वापर स्वार्थासाठी करून जाणूनबुजून काहींना पीडित ठेवून शोषण करणारे वाईट' असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरतं. मग हिंदू हे मिसलिडिंग लेबल काढून टाकलं तरी चालतं. कारण या प्रवृत्ती सर्वत्र आहेत. उगाच 'हिंदू वाईट' हे चुकीचं विधान का करावं? तसं काहीसं.

तात्विक असहमती दर्शवता आहात याचाच अर्थ तुम्ही विचार करून तो मांडता आहात असं नाही का होत? असो. विचारवंत या शब्दाची व्याख्या एकदा नीट व्हावी असं तुमचंही म्हणणं दिसतंय. त्याला अनुमोदन. नाहीतर साप म्हणून प्रत्येक जण आपल्याला हवी ती भुई धोपटत राहील.

छोटा डॉन's picture

9 Dec 2010 - 4:57 pm | छोटा डॉन

नाही नाही, जे गोळ्या खायला तयार असतात ते आचारवंत नाही का?

असं का, नाही माझे काय मत होते की 'गोळ्या खाणे' आणि 'गोळ्या खातो असे म्हणणे' ह्यातुनच विचारवंत आणि आचारवंत ह्या भिन्न प्रवृत्ती आणि गट तयार होत असावेत, अर्थात हा समज चुकीचा असु शकतो हे मान्य.
किंवा, आचारवंतच हा विचारवंताचा एक लहानसा भाग असावा असेही असु शकते, असो, आमचा एवढा अभ्यास नाही.

फुटकळ विचार करणारे विचारवंत, व महत्त्वाचे विचार मांडणारे विचारवंत असे वेगवेगळे लोक असतातच.

बरोबरच आहे, अर्थात तसे असने आवश्यक आहे हा सृष्टीचा नियम आहे. जर कुणी फुटकळ विचार केलाच नाही तर महत्वाचा विचार काय असतो हे काय आपल्याला खळ्ळं कळणार ?
अत्यंत अचुक विश्लेषण, आभार !

विचार व विरुद्ध विचार यांचा संघर्ष म्हणजे दात व ओठ नसून, वरचे दात व खालचे दात यांचं भरडणं आहे. एखाद्या घटनेचं व्यवस्थित पचन होण्यासाठी हे घर्षण, चर्वण अत्यावश्यक आहे.

ओ हो , ओ हो, ओ हो, त्याचा असा संदर्भ आहे काय ?
म्हणजे हा संघर्ष आजचा नसुन अनादी काळापासुन चालत आलेल्या कुठल्याही सनातन व्यवस्थेच्या उतरंडीतुन जन्माला आलेल्या संघर्षाचे हे आजचे स्वरुप. खरं तर असा विषय चर्चेला घेतला म्हणुन मी श्री. अवलिया ह्यांचे आभारच मानायला हवेत.
तज्ज्ञांनी ह्यावर अधिक प्रकाश टाकाव अशी मी विनंती करतो.

आक्षेप नाहीच. उलट पाठिंबा आहे. कोणीच कृती केली नाही, तर विचारवंत वाढणार नाहीत का? ते कोणाला हवंय? कृती करणारे करत राहातात, जीडीपी वाढवतात, झालंच तर इतिहास वगैरे घडवतात - त्यामुळे विचार करणाऱ्यांना व मांडणाऱ्या सर्वांनाच मोकळीक मिळते.

अच्छा, म्हणजे हे पण मार्केट इकॉनॉमिक्स का ?
असु द्यात , आमचा आक्षेप नाही !

माझा आक्षेप आहे तो सरसकट सगळ्यांना 'विचारवंत' या एका लेबलाच्या बरणीत भरून त्यांविषयी बोलण्याला आहे

खरे आहे, मी आपल्याशी सहमत आहे आणि आपल्या विचारांना पाठिंबा देतो.

चांगले विचार करणारे, पुरोगामी विचार करणारे, सकारात्मक विचार करणारे, वाईट विचार करणारे, यडपट विचार करणारे, चुकीचा विचार करणारे, धर्माधिष्ठित विचार करणारे अशा सब-क्याटेगऱ्या करून विशिष्ट क्याटेगरीविषयी बोलणं उत्तम असं माझं मत आहे.

करेक्ट, असं व्हायलाच हवं, स्टेरिओटाईम मताला किंमत नसावीच.

उदाहरणार्थ, 'सर्व हिंदू वाईट' असं जर कोणी म्हटलं तर ते आक्षेपार्ह होईल.

आक्षेपार्ह्य ?
जोड्याने मारावा असा नराधमास ...

त्यापेक्षा 'वर्णव्यवस्थेचा वापर स्वार्थासाठी करून जाणूनबुजून काहींना पीडित ठेवून शोषण करणारे वाईट' असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरतं.

तुम्ही म्हणता ते बरोबर असले तरी ते सिद्ध करण्याजोगे सर्वामन्य होऊ शकतील असे पुरावे मिळवणे अवघड आहे.
प्रयत्न करायला हरकत नाही.

मग हिंदू हे मिसलिडिंग लेबल काढून टाकलं तरी चालतं. कारण या प्रवृत्ती सर्वत्र आहेत. उगाच 'हिंदू वाईट' हे चुकीचं विधान का करावं? तसं काहीसं.

बरोबर, 'हिंदु वाईट' हे सरसकट विधान चुकच आहे, एक वेळ 'हिंदु कादंबरी भिकार आहे' हे तुमचे वैयक्तिक मत असले म्हणुन त्यामुळे आख्खे मराठी साहित्यच भिकार ठरवण्यासारखे झाले हे, काय, बरोबर ना ? ;)

- छोटा डॉन

राजेश घासकडवी's picture

9 Dec 2010 - 6:07 pm | राजेश घासकडवी

'गोळ्या खाणे' आणि 'गोळ्या खातो असे म्हणणे' ह्यातुनच विचारवंत आणि आचारवंत ह्या भिन्न प्रवृत्ती आणि गट तयार होत असावेत... आचारवंतच हा विचारवंताचा एक लहानसा भाग असावा

काय बोललात डानराव! हे विचार माझ्या डेस्कावर मी करकटकने कोरून ठेवणार आहे. मी 'शिवाजीने विचार केला व आचारही केला' म्हटलं तेव्हा असंच काहीसं म्हणायचं होतं.

जर कुणी फुटकळ विचार केलाच नाही तर महत्वाचा विचार काय असतो हे काय आपल्याला खळ्ळं कळणार ?

हेही थोडंसं बरोबर. मात्र उच्च-नीच विचार ओळखणं यासाठी विचार करण्याची आवश्यकता असल्यामुळे नेहेमीच ते तितकं सरळ असतं असं नाही. काही वेळा लहान गोष्ट जवळ असली की मोठी दिसते, व दूरची उगाचच लहान वाटते. दृष्टीकोनावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्यामुळे त्रांगडं होतं.

खरं तर असा विषय चर्चेला घेतला म्हणुन मी श्री. अवलिया ह्यांचे आभारच मानायला हवेत.

आभार मानण्याऐवजी तुम्ही माफी मागावी अशी सूचना करतो. तुम्हाला त्यांचं म्हणणं कळलं आहे असंच तुमच्या या विधानावरून सिद्ध होतं. मग खालच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही वेड पांघरून पेडगावलाच नव्हता का जात? वर त्यांना पलायनवादी म्हटलंत. हे बरं नाही.

तुम्ही म्हणता ते बरोबर असले तरी ते सिद्ध करण्याजोगे सर्वामन्य होऊ शकतील असे पुरावे मिळवणे अवघड आहे.

तुमचा गैरसमज होतोय. ते विधान सत्य आहे असं मुळीच म्हणायचं नव्हतं. हिंदू संस्कृतीबद्दल मला कमी का आदर आहे? उगाच उठसूठ, पुराव्याशिवाय असे शोषण वगैरेसारखे आरोप कसे करीन मी? कमी चुकीचं विधान कसं करावं याबद्दल मी दाखला देत होतो इतकंच.

एक वेळ 'हिंदु कादंबरी भिकार आहे' हे तुमचे वैयक्तिक मत असले म्हणुन त्यामुळे आख्खे मराठी साहित्यच भिकार ठरवण्यासारखे झाले हे

अहो माझा डेस्क छोटा आहे हो. इतकी जबरदस्त वाक्यं एकामागून एक टाकू नका. किती कोरून ठेवू? मला वाटतं लवकरच त्या जगदीश पटवर्धनांना बोलवून बारीक बारीक कोरून घ्यावं लागेल.

पण तुमच्या या वाक्यात फारच मध्यमवर्गी सरळसोटपणा आहे. ते कळतं. तुम्हाला अवचट आवडतात बहुतेक. लेखकाच्या भाषेत (आधुनिकोत्तरवादी शैलीत) लिहायचं झालं तर
'जर हिंदू हे पुस्तक भिकार असेल असं तथाकथित समीक्षक (म्हणजे नेमाडे द्वेष्टे) म्हणत असतील तर
काही शक्यता
अ. समजा नेमाड्यांनी ते पस्तीस वर्षांपूर्वीच प्रसिद्ध केलं असतं. आणि त्यावेळी नेमाड्यांचा लेखकराव झालेला नसता किंवा पुलं वाचणारी पिढीच ते वाचत असती '
ब. आधुनिकोत्तरपूर्व वाङमयीन अभिरुचीच अजून फोफावत असती व तसंच हिंदुत्ववादी अस्मितेला डोकं वर काढण्याची संधी मिळाली नसती (गर्व से कहो वगैरे म्हटलंच गेलं नसतं...)
क. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झालेल्या नसून शहरीकरणाची लाट, बेलगाम चंगळवादी संस्कृतीचा उदय झाला नसता व मॉल्सचं पेव फुटलं नसताना

-सहाशे रुपयांऐवजी त्यावेळच्या बावीस रुपड्यांना विकलं जाणारं हिंदू पुस्तक नेमाडे द्वेष्ट्यांनी इतकं खपू दिलं असतं का?
-सरकारी चॅनेलवर काहीतरी मुलाखती देऊन पुस्तक खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेमाड्यांना त्यांच्या द्वेष्ट्यांनी कशी वागणूक दिली असती

प्रश्न कसा आखीव रेखीव असावा. गृहितकं कशी स्पष्ट असावीत. तेवढं जरा शिकून घ्या डानराव, मूळ चर्चाप्रस्तावातून.

अवलिया's picture

9 Dec 2010 - 6:49 pm | अवलिया

डान्राव आणि घासकडबीसाहेबांचे विचार आदानप्रदान आटोपले असेल तर संपादक मंडळाने शक्य असल्यास त्या दोघांमधली सदर चर्चा वेगळ्या धाग्यावर हलवावी जेणेकरुन मूळ चर्चा अजुन चांगल्या रितीने चालु राहिल. असो.

राजेश घासकडवी's picture

10 Dec 2010 - 2:47 am | राजेश घासकडवी

चर्चाप्रस्तावकाने 'विचारवंत' या शब्दाची एक नेटकी व्याख्या केली तर हे विचारांचं आदानप्रदान संपेल बहुतेक. डानरावांची देखील व्याख्येची मागणी आहे.

मात्र या प्रतिसादावरून व्याख्येची मागणी म्हणजे अवांतर असं तुम्हाला वाटतंयसं दिसतं. ही अवांतरविरोधी आघाडी म्हणावी का? रोचक. संपादकांना साकडं घालायचं मात्र तुम्ही चालू ठेवलेलं दिसतंय. अहो, ती मंडळी बिचारी आपापले व्याप सांभाळून संपादकपदाची जबाबदारी पार पाडतात. त्यांच्यावर किती ओझं टाकायचं म्हणतो मी.

अवलिया's picture

9 Dec 2010 - 3:42 pm | अवलिया

श्री डान्राव

आपण उपस्थित केलेले मुद्दे रास्त आहेत पण या धाग्याशी संबंधित नाहीत याची तुम्हाला जाणीव करुन देणे माझे कर्तव्य आहे असे मी समजतो.

कृपया आपण केवळ मी उपस्थित केलेल्या प्रश्नांचीच उत्तरे द्यावीत किंवा त्यासंबंधित चर्चा चालवावी. आपणास पडलेल्या प्रश्नांसाठी वेगळा धागा आपण काढावा तिथे आपण चर्चा करु असे मी आपणास तुर्तास मोघम आश्वासन देतो.

कळावे, लोभ असावा

नाना (आपलाच)

छोटा डॉन's picture

9 Dec 2010 - 3:47 pm | छोटा डॉन

श्री. अवलिया

मी उपस्थित केलेले मुद्दे रास्त आहेत आणि या धाग्याशीच संबंधित आहे याची तुम्हाला पुन्हा एकदा जाणीव करुन देणे माझे कर्तव्य आहे असे मी समजतो.
आपण जो कल्पनांचा डोलारा उभा करुन त्यावाटे 'विचारवंता'वर शरसंधान करण्याचा प्रयत्न चालवला आहे त्या 'विचारवंताची व्याख्या काय' असा साधा प्रश्न मी आपल्याला विचारला आहे. पण आपण यातुन 'वेगळ्या धाग्याची' पळवाट काढत आहात ह्याची जाणीव करुन देणे माझे कर्तव्य आहे असे मी समजतो.

कृपया आपण केवळ मी उपस्थित केलेल्या (चर्चेच्या दृष्टीने महत्वाच्या ) उप-प्रश्नांचीच उत्तरे द्यावीत किंवा त्यासंबंधित चर्चा चालवावी.मला पडलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळुन विचारवंतांची व्याख्या ठरल्यास तिथे आपण सविस्तर चर्चा करु असे मी आपणास तुर्तास मोघम आश्वासन देतो.

कळावे, लोभ असावा

डॉन्या (आपलाच)

अवलिया's picture

9 Dec 2010 - 3:56 pm | अवलिया

श्री डान्राव

तुम्ही केवळ विरोधासाठी विरोध करत आहात याची आपल्या प्रतिसादावरुन खात्री पटत आहे.

आपण जो कल्पनांचा डोलारा उभा करुन त्यावाटे 'विचारवंता'वर शरसंधान करण्याचा प्रयत्न चालवला आहे त्या 'विचारवंताची व्याख्या काय' असा साधा प्रश्न मी आपल्याला विचारला आहे.

इथे आपण म्हणत आहात की आपल्याला विचारवंताची व्याख्या हवी आहे. म्हणजेच तुम्हाला विचारवंत कोण हे माहित नाही असा याचा अर्थ होतो. परंतु त्याआधीच्या वाक्यात आपण विचारवंतांवर शरसंधान वगैरे चालले आहे असे म्हणता. म्हणजेच वाक्याच्या पुर्वार्धात तुम्हाला विचारवंतांवर शरसंधान चालले आहे या ज्ञानातुन विचारवंत कोण आहेत हे समजत आहे असे सुचित होते मात्र त्याच वाक्याच्या उत्तरार्धात तुम्ही विचारवंताची व्याख्या विचारता हे हास्यास्पद आहे. ही सोईस्कर विसर पडण्याची वृत्ती केवळ विरोध करायचा आहे या भुमिकेतुन आहे याबद्दल शंका नाही.

पण आपण यातुन 'वेगळ्या धाग्याची' पळवाट काढत आहात ह्याची जाणीव करुन देणे माझे कर्तव्य आहे असे मी समजतो.

आपण सोईस्कर व्याख्या हवी वगैरे मुद्दे उपस्थित करुन चर्चेला अनर्थक वळण लावत आहात म्हणुन सदर व्याख्येविषयीची चर्चा वेगळ्या धाग्यावर होणे गरजेचे आहे. कृपया आपण केवळ मी उपस्थित केलेल्या (चर्चेच्या दृष्टीने महत्वाच्या ) प्रश्नांचीच उत्तरे द्यावीत किंवा त्यासंबंधित चर्चा चालवावी.

धन्यवाद

नाना
(किती वेळा तुम्हाला आपलं म्हणायचं? तुम्ही सुधरत नाही ते नाहीच)

छोटा डॉन's picture

9 Dec 2010 - 4:09 pm | छोटा डॉन

तुम्ही केवळ विरोधासाठी विरोध करत आहात याची आपल्या प्रतिसादावरुन खात्री पटत आहे.

माझ्या नेमक्या प्रश्नांना आपल्याकडे समर्पक उत्तरे नसल्याने आलेल्या वैफल्यातुन आपण चालवलेली माझी बदनामी मी उदार मनाने माफ करतो

इथे आपण म्हणत आहात की आपल्याला विचारवंताची व्याख्या हवी आहे. म्हणजेच तुम्हाला विचारवंत कोण हे माहित नाही असा याचा अर्थ होतो

अगदी बरोबर, आपण योग्य अर्थ लावलात माझ्या वाक्यांचा.

परंतु त्याआधीच्या वाक्यात आपण विचारवंतांवर शरसंधान वगैरे चालले आहे असे म्हणता.

चुक , आम्ही 'प्रयत्न चालवला आहे' असे लिहले आहे, प्रतिसाद तपासुन पाहु शकता.

म्हणजेच वाक्याच्या पुर्वार्धात तुम्हाला विचारवंतांवर शरसंधान चालले आहे या ज्ञानातुन विचारवंत कोण आहेत हे समजत आहे असे सुचित होते मात्र त्याच वाक्याच्या उत्तरार्धात तुम्ही विचारवंताची व्याख्या विचारता हे हास्यास्पद आहे.

तुमचा हा तर्कच हास्यास्पद आहे असे म्हणतो.
मी माझ्या मागणीवर आणि प्रतिसादावर ठाम आहे, आपण आपल्या मुळ धाग्यात शेवटच्या २ ओळीत समारोप करताना 'विचारवंतांच्या काय भुमिका असतील किंवा विचारवंत काय म्हटले असते' अशा स्वरुपाची विधाने केली आहेत.
ह्यातुन मग स्वाभाविकपणे मला 'विचारवंत म्हणजे कोण?' असा प्रश्न पडतो.

अर्थात आपण धागा प्रवर्तक आहात, आपल्याला व्याख्या नक्की माहित आहे व म्हणुनच आपण शेवटी 'विचारवंतां'च्या भुमिकेच्या अनुषंगाने काही प्रश्न करता. पण आम्हाला उत्तर काही देत नाही.
हा शुद्ध पलायनवाद आहे ....

ह्याचा निषेध म्हणुन आम्ही ह्या धाग्यातुन माघार घेत आहोत !
असले पोकळ संकल्पनेवर आधारित धागे केवळ आणि केवल गैरसमजच पसरवतील ह्याविषयी आमचा मनात अजिबात किन्तु नाही.
इति लेखनसीमा !

कृपया आपण केवळ मी उपस्थित केलेल्या (चर्चेच्या दृष्टीने महत्वाच्या ) प्रश्नांचीच उत्तरे द्यावीत किंवा त्यासंबंधित चर्चा चालवावी.

सल्ल्यासाठी आभार ....
ज्याविषयीच संकल्पनाच क्लियर नाहीत त्याविषयी आम्ही मतप्रदर्शन करत नाहीत, आपल्याला व्याख्या सांगायची नाही व त्यामुळे व्याख्या माहित नसताना आपल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा अधिकार मी राखुन ठेवतो.
धन्यवाद.

पुन्हा एकदा आपल्या पलायनवादी भुमिकेचा निषेध करुन मी ह्या धाग्यातुन माघार घेत आहे असे जाहिर करतो.

- डॉन्या
(सुधरण्याचा आणि आपलं असण्याचा काहीही संबंध नाही, सबब तुम्ही आपलेच आहात )

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 4:16 pm | परिकथेतील राजकुमार

श्री. छोटा डॉन व श्री. अवलिया ह्यांनी कॄपया 'राखी का इन्साफ' येथे हजेरी लावुन आपले वाद मिटवुन घ्यावेत असे मी सुचवतो.

धन्यवाद.

ह्या विषयावर येथील जेष्ठ सदस्या माननिय वाहीदा ह्यांचा प्रतिसाद वाचण्यास मी उत्सुक आहे.

छोटा डॉन's picture

9 Dec 2010 - 4:17 pm | छोटा डॉन

>>श्री. छोटा डॉन व श्री. अवलिया ह्यांनी कॄपया 'राखी का इन्साफ' येथे हजेरी लावुन आपले वाद मिटवुन घ्यावेत असे मी सुचवतो.

ओके.
'राखी ही विचारवंत आहे का?' असा उपप्रश्न विचारतो.

- छोटा डॉन

राखी हिंदू विरोधी, मराठी अस्मिता विरोधी वगैरे असल्यास विचारवंत असु शकते

शिल्पा ब's picture

10 Dec 2010 - 3:33 am | शिल्पा ब

सुश्री राखी या एक न्यायाधीश असाव्यात असे " राखी का इन्साफ " यावरून वाटते. तरी एका स्त्री न्यायाधीशाला "ती" म्हण्यापेक्षा "त्या" म्हणावे अशी अपेक्षा आहे...बाकी खाली प्रतीसादलेले श्री परीकथेतील राजकुमार यांनी सुश्री राखी यांच्या आचारांवर विशेष लोभ दाखवून आपले पुरोगामित्व सिद्ध केले आहे असे वाटते म्हणून त्यांचे अभिनंदन.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 4:32 pm | परिकथेतील राजकुमार

'राखी ही विचारवंत आहे का?' असा उपप्रश्न विचारतो

आम्हाला राखीच्या 'आचारात' जास्ती इंट्रेस्ट असल्याने 'विचारांचा' मुद्दा फाट्यावर मारतो.

स्पष्टवक्ता
परालाडू

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2010 - 2:14 pm | पर्नल नेने मराठे

नाना सोप मराठी वापर ना :(
मला नाहि कळत एव्धे कठिण

शिल्पा ब's picture

9 Dec 2010 - 2:17 pm | शिल्पा ब

नाना सोप मराठी म्हणजे काय? नानाने सोप लावून बोललेलं मराठी? नाना तऱ्हा असलेलं सोप्पं मराठी? का कोण्या नानाला मराठीला चोप द्यायला सांगायचं पण चुकीचं लिहिलंय?

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2010 - 2:21 pm | पर्नल नेने मराठे

नानाला कळली असेल माझी सांकेतिक भाशा =))

नान्या या धाग्यात कल्पलेल्या एका कल्पनेवर आधारीत "गंगाधरपंतांचे पानिपत" या नारळीकरांच्या कथेत सदाशिवराव भाउ पेशवा पानिपताच्या युद्धात गायब झाला नसता आणि मराठे त्वेशाने लढून अब्दालीचा पराभव झाला असता तर भारत आत्ता कसा असता या कल्पनेवर आधारीत एक लॉजीक दिलेले आहे.

इंटरनेटस्नेही's picture

9 Dec 2010 - 4:35 pm | इंटरनेटस्नेही

हे मराठी मराठी मराठी मराठी च दळण बस झाल राव.. कंटाळा आला आता.
-
(वैफल्यग्रस्त) इंट्या.

स्पा's picture

9 Dec 2010 - 7:46 pm | स्पा

+१

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Dec 2010 - 3:12 am | निनाद मुक्काम प...

वागले काका खुश होतील हि बौद्धिक महाचर्चा पाहून