गाभा:
हल्ली मला मूळचे फारसी आणि आता मराठीत रुळलेले शब्द शोधायचा छंद लगला आहे.
काही शब्द अगदी बेमालूमपणे (बेमालूम शब्दाप्रमाणेच) मराठी भाषेत सामील (हाही तसाच) झाले आहेत.
दोन शब्दांविषयी शंका आहे.
श्रीखंड हे अगदी संस्कृतजन्य वाटणारे नाव आहे. पण फारशीत कंद म्हणजे साखर. जसे गुलकंद, कलाकंद वगैरे. आणि शीर म्हणजे दूध (जसे शीरपेडा, शीरकुर्मा). तर श्रीखंड हा शब्द हा शीर+ कंद चा अपभ्रंश आणि मुळात फारसी आहे का? संस्कृतमधे (माझ्या मर्यादित ज्ञानानुसार) श्रीखंडचा तसा काही अर्थ लागत नाही.
दुसरा शब्द फन्ना. उदा. फराळाचा फन्ना उडवला/केला. काही वर्षापूर्वी आमिरखानचा फना हा सिनेमा आला होता. त्यामुळे उर्दूतला फना हा शब्द नाश, नष्ट होणे ह्या अर्थी वापरला गेल्याचे पाहिले.
फन्ना ह्या शब्दाचा उगम हा ह्या फना शब्दापासून आहे का?
प्रतिक्रिया
6 Dec 2010 - 12:40 pm | विजुभाऊ
फना चा एक्झॅक्ट अर्थ. उध्वस्त होणे ( स्वतः उध्वस्त होणे )
6 Dec 2010 - 1:02 pm | शिल्पा ब
जमले तर अशा फारसी - मराठी शब्दांचा एखादा धागा काढा....वाचनखूण नसली तरी बुकमार्क करून ठेवता येईल.
सामील हा शब्द फारसी आहे हे माहित नव्हते...मला वाटले सामायिक वगैरेसारखा आहे कि काय...सामायिक हा संस्कृतोत्भव असावा असे वाटले...फारसी म्हणजे नक्की कोणते लोक?
6 Dec 2010 - 1:10 pm | विजुभाऊ
पर्शियन
6 Dec 2010 - 1:13 pm | शिल्पा ब
थोडक्यात इराणी
6 Dec 2010 - 7:12 pm | वाहीदा
Dari, Tajik, Farsi, Isfahani and Khurasani are different dialects of the Persian language, unlike Kurdish and Sughdian which are different languages in the Iranian branch languages.
Oficially the best form (words, accent ) of Farsi-Dari is the one spoken in Tehran (formal language). And the rest of cities in Iran (also countries like Afghanistan) speak the same language but just with different Dialect (which means the slight difference exists but as it's not a real language these differences do not exist in written form). :-)
मराठीत न लिहिल्याबध्द्ल क्षमस्व !
6 Dec 2010 - 2:04 pm | अविनाशकुलकर्णी
श्री़खंडा बद्दल काय बोलणार????/
भुखडांचे फन्ने उडवले असे वाचले होते...
6 Dec 2010 - 3:48 pm | चिंतामणी
धाग्याचे नाव वाचुन कात्रजचा घाट दिसतो.
6 Dec 2010 - 3:48 pm | प्रशु
श्रीखंडाचा शोध हा महाभारतात भीमाने लावला असे मी दुर्गा भागवतांच्या पुस्तकात वाचले आहे. ...
7 Dec 2010 - 5:44 am | हुप्प्या
आत्तापर्यंत सापडलेल्या पुराव्यानुसार महाभारत हे काल्पनिक काव्य आहे असे वाटते. कारण ते घडले ह्याचा कुठलाही भौतिक पुरावा आजवर सापडलेला नाही (माझ्या माहितीनुसार) त्यामुळे भीमाने शोध लावला असे म्हणणे म्हणजे ज्युल्स व्हर्नच्या क्याप्टन नीमोने पाणबुडीचा शोध लावला म्हणण्यासारखे आहे.
7 Dec 2010 - 1:25 pm | स्वानन्द
ठीक आहे. तसे सद्ध्या पुरते सत्य मानले तर असं म्हणूया, की तो शोध व्यासांनी लावला.
7 Dec 2010 - 3:10 pm | प्रशु
ते तसे घडले नाही ह्याचा पुरावा द्या...
8 Dec 2010 - 7:05 am | हुप्प्या
महाभारतकालीन नाणी, शिलालेख, भूर्जपत्रे, गाडगी-मडकी, दागिने, हाडे, वाडे, अवजारे असे आजवर काहीही सापडलेले नाही.
मोहंदजडो, इजिप्त, मेसोपोटेमिया, चीन ह्या जागी महाभारतापेक्षा जुन्या संस्कृतींचे असे अवशेष सापडलेले आहेत.
9 Dec 2010 - 7:48 am | शिल्पा ब
पाण्याखाली गेलेली द्वारका सापडली असे डिस्कव्हरी वरच्या एका डॉक्युमेंटरीत पाहील्याचं आठवतंय.
8 Dec 2010 - 12:41 pm | विजुभाऊ
आत्तापर्यंत सापडलेल्या पुराव्यानुसार महाभारत हे काल्पनिक काव्य आहे असे वाटते. कारण ते घडले ह्याचा कुठलाही भौतिक पुरावा आजवर सापडलेला नाही
मला वाटत होते की रामायणाचे पुरावे नाहीत मात्र महाभरतातील गोष्टींचे पुरावे आहेत. उदा: दिल्लीतील ( इम्द्रप्रस्थातील ) द्रौपदीचा महाल ( पुरानाकिल्ला) ,बेट द्वारका , कुरुक्षेत्रावरील यूद्धभुमी वगैरे.
आजवर सापडलेला नाही (माझ्या माहितीनुसार)
महोदय तुम्हाला माहीत नाही याचा अर्थ ती गोष्त आस्तित्वातच नाही असला सोयीस्कर बुद्धीप्रामाण्यवाद सोडून द्या.
महाभारतकालीन भौतीक पुरावे बरेच सापडले आहेत. रामायणकालीन पुरावे मिळत नाहीत.
8 Dec 2010 - 1:04 pm | नरेशकुमार
8 Dec 2010 - 11:40 pm | हुप्प्या
>>
महोदय तुम्हाला माहीत नाही याचा अर्थ ती गोष्त आस्तित्वातच नाही असला सोयीस्कर बुद्धीप्रामाण्यवाद सोडून द्या.
महाभारतकालीन भौतीक पुरावे बरेच सापडले आहेत. रामायणकालीन पुरावे मिळत नाहीत.
<<
मी माझे मत पुरेशा अभ्यासानंतरच बनवलेले आहे. रिकामटेकडी आगपाखड करण्यापेक्षा नीट पुरावे द्या.
निव्वळ द्वारका नावाचे बेट अस्तित्वात आहे वा होते यावरून कृष्ण खरा होता हे कसे काय सिद्ध होते? द्रौपदीचा महाल, कुरुक्षेत्र या जागा खर्या असतील. पण त्याने महाभारत घडल्याचे सिद्ध होत नाही. कार्बन डेटिंग वा अन्य पुरातत्त्वशास्त्राची उपकरणे वापरून ह्या दाव्यांची सत्यता शोधली आहे का? माझ्या माहितीनुसार नाही. तुमची माहिती वेगळी असेल तर सांगा की सविस्तरपणे.
तसेही महाभारतातील अनेक अचाट गोष्टी जसे सूर्यापासून पुत्र होणे, वायूपासून पुत्र होणे, गांधारीला शंभर पुत्र होणे हे बघता ते काल्पनिक असणे जास्त शक्य वाटते.
डॅन ब्राऊनच्या दा विन्ची कोडमधे अनेक खर्याखुर्या जागांचा उल्लेख आहे म्हणून आणखी हजार वर्षानी तो इतिहासच आहे असे म्हणता येईल का?
महाराष्ट्रात अनेक जागी इथे भीमाने अमके केले, तमके केले अशा आख्यायिका सांगणार्या जागा आहेत. मला वाटते बोरिवलीच्या आसपासही असे काही आहे. पण हे सगळे खरे असेलच असे नाही. पुरातत्त्वखात्याने काही ठोस संशोधन करून तसे सांगितले असेल तर गोष्ट वेगळी.
9 Dec 2010 - 7:52 am | शिल्पा ब
सुर्यासून पुत्र वगैरे माझ्यामते कुमारी माता झाल्यावर काहीतरी सांगायचे म्हणून सांगितले अन लोकांनी त्याला आक्षेप घेतला नाही त्या काळी...बाकी शंभर पुत्र म्हणजे दत्तक घेतलेले असू शकतात किंवा इतर अनेक राण्यांपासून, दासिंपासून वगैरे असू शकते...दत्तक घेतल्याचे मी कुठेतरी वाचले होते, संदर्भ- पुस्तक आठवत नाही कारण मी अगदी १२-१३ वर्षाची असताना वाचले होते.
9 Dec 2010 - 9:29 am | नरेशकुमार
महाभारत/रामायण खरंच झाले कि नाहि ?
हि वेगळि चर्चा चालु करावि असे आवाहन करत आहे.
7 Dec 2010 - 1:27 pm | स्वानन्द
शोध म्हणजे त्या पाककृतीचा शोध लावला असे म्हणायचे असेल ना? पण महाभारतात 'श्रीखंड' असा त्या पदार्थाचा उल्लेख आहे का?
7 Dec 2010 - 3:13 pm | प्रशु
जिथे ७०० वर्ष जुन्या ज्ञानेश्वरांवर प्रश्नचिन्ह उभे रहाते तिथे तुम्ही ५००० वर्षा पुर्वीच्या व्यासांचा काय दाखला देताय राव...
8 Dec 2010 - 6:54 am | कुळाचा_दीप
प्रश्नचिन्ह तर ३०० वर्ष जुन्या शिवाजी महाराजांवर पण उभे रहाते!
9 Dec 2010 - 7:54 am | शिल्पा ब
ते तर गांधी घराण्यावर सुद्धा लागले आहे.
6 Dec 2010 - 5:17 pm | तर्री
श्री . अविनाश बिनिवाले याचे गौतमी प्रकाशनाचे "शब्दगंध" हे पुस्तक वाचनात आहे होते.
आत्या / गौडबंगाल / विलायत / नाताळ / मालक ह्या व अनेक शब्दांची व्युत्पत्ती विनोदी शैली मध्ये प्रस्तुत केली आहे.
क्षीर म्हण्जे संस्कृतात दूध ( नीर क्षीर विवेक) +खंड म्हण्जे भाग , असा श्रीखंडाचा मला लागलेला अर्थ आहे.
7 Dec 2010 - 5:40 am | हुप्प्या
क्षीर ह्या संस्कृत शब्दाचा श्री असा अपभ्रंश होईल? मला खरे वाटत नाही. साधारण अपभ्रंश होतो तेव्हा त्याचे कंगोरे घासले जातात. क्षीरचा खीर असा अपभ्रंश झालेला आहेच. क्षेत्रचा खेत असा झाले आहे.
खंड म्हणजे भाग असेल तर तो अर्थ ह्या संदर्भात अगदी चुकीचा वाटतो.
6 Dec 2010 - 6:41 pm | चिरोटा
आत्या हा शब्द बहुतेक आत्ते(कन्नडमध्ये सासु) वरुन आला आहे बहुतेक.तसेच ताई(तायी-म्हणजे आई).
विलायत blighted वरून आला आहे.
7 Dec 2010 - 1:05 am | शेखर
श्रीखंड हे अगदी संस्कृतजन्य वाटणारे नाव आहे. पण फारशीत कंद म्हणजे साखर. जसे गुलकंद, कलाकंद वगैरे. आणि शीर म्हणजे दूध (जसे शीरपेडा, शीरकुर्मा).
फारसी शीर हा शब्द क्षीर ( संस्कृत मधे दुध) चा अपभ्रंश आहे असे दिसते ....
7 Dec 2010 - 5:37 am | हुप्प्या
फारसी ही देखील एक प्राचीन भाषा आहे. त्यामुळे त्या भाषेतले शब्द सरसकट संस्कृतकडून उचलले आहेत असे म्हणणे धाडसाचे आहे. आपल्या दाव्यामागे काही ऐतिहासिक पुरावा आहे का?
संस्कृत व फारसीत अनेक शब्द सारखे आहेत.
गाढवाला खर हा शब्द दोन्ही भाषेत आहे.
संस्कृतमधले स्थान आणि इ-स्तान जसे पाकिस्तान, अफगाणिस्तान हे जवळपास सारखेच आहेत.
आफत आणि आपत्ती.
आप (सं) आणि आब (फा) (पाणी ह्या अर्थी). आपोहिष्टा मयोभुव..., पंजाब (पंज + आब)
तसेच शीर आणि क्षीर.
प्रत्येक शब्द हा संस्कृत मूळ आणि फारसीने उचलला असे म्हणणे बहुधा चुकीचे असावे.
7 Dec 2010 - 5:56 am | पंगा
नक्कीच चुकीचे आहे.
संस्कृत आणि फारसी या एकाच भाषिक परिवारातील भाषा आहेत, आणि म्हणून अनेक शब्द दोन्ही भाषांत सारखे (किंवा जवळपासचे) असणे साहजिक आहे.
मात्र, याचा अर्थ संस्कृत शब्द मूळ आणि फारसीने उचलला असा नसून, दोन्ही भाषांचे मूळ समाईक आहे, आणि एकाच शब्दाची घडण संस्कृतात एका प्रकारे होत गेली तर फारसीत (किंवा फारसीची जी कोणती आदिभाषा असेल त्या भाषेत) किंचित वेगळ्या प्रकारे झाली, असे म्हणता येईल.
थोडक्यात, फारसी शब्द हा संस्कृत शब्दाचे अपभ्रष्ट रूप नव्हे. फार फार तर संस्कृत शब्द आणि फारसी शब्द हे दोन्ही एकाच मूळ शब्दाची अपभ्रष्ट रूपे आहेत, असे म्हणू या.
दोन्ही भाषांत नाते - जवळचे नाते - आहे, हे निश्चित. पण हे नाते मायलेकींचे नव्हे. आणि उचलाउचलीचे तर नव्हेच नव्हे.
8 Dec 2010 - 11:55 am | सविता
लयी दिसानी दिसलात पंगा साहेब!!!
7 Dec 2010 - 1:42 am | सुनील
श्रीखंड हे काही (खीर किंवा बासुंदीप्रमाणे) थेट दुधापासून बनवत नाहीत. सबब, श्रीचा संबंध क्षीर वा शीरशी जोडणे म्हणजे अगदीच ओढून-ताणून केल्यासारखे वाटते.
ह्या शब्दाची व्युत्पत्ती अशी -
राजाचा वाढदिवस होता. मुदपाकखान्यात वर्दी गेली की एक अगदी नवीन, पूर्वी कधी न बनवलेली गोड पाकृ बनवली जावी. मुख्य बल्लवाचार्य दिवसभर डोके खाजवत बसला. अखेर त्याला ही पाकृ सुचली. पदार्थ तर झक्कास झाला पण त्याला नाव काय द्यायचे?
दिवसभर खाजवलेल्या डोक्याला आता कंड सुटला होता. म्हणून त्याने त्याला शिरी कंड असे नाव दिले. आजचे श्रीखंड हे त्याचेच अपभ्रंशित रूप!
7 Dec 2010 - 5:32 am | हुप्प्या
हो हो. तुमची व्युत्पत्तीच जास्त योग्य वाटते. :-)
एखाद्या पदार्थाची बनवण्याची कृती हळूहळू बदलत गेली पण नाव तसेच राहिले हे शक्य आहे.
त्यामुळे श्रीखंड हे जुन्या काळात वेगळया पद्धतीने बनत होते पण कुण्या चतुर पाकचतुराने ही चक्क्यावर आधारित कृती शोधली असेल.
पण अर्थातच हे अंदाज आहेत.
7 Dec 2010 - 6:49 am | शेखर
>> हो हो. तुमची व्युत्पत्तीच जास्त योग्य वाटते
काय हो हुप्प्या, तुमच्या कडे काय आधार आहे व्युत्पत्ती योग्य वाटण्या बद्दल ? ;)
7 Dec 2010 - 1:35 pm | सूड
'पोस्ट', 'सोमण' या शब्दांची व्युत्पत्ती राघुनानांची कन्येस पत्रे मध्ये पुलंनी सुद्धा छान दिली आहे.
7 Dec 2010 - 3:33 pm | प्रशु
षोडोपचार पुजेत देवाला गंध वाहाताना म्हणायच्या श्लोकात श्रीखंडाचा स्पष्ट उल्लेख आहे. तो तिथे खाण्याचा पदार्थ जरी नसला तरी श्रीखंड ह्या शब्दाची संस्क्रुत व्युत्पती दिसुन येते..
श्लोक खालील प्रमाणे..
श्रीखंड चंदनम दिव्यंम गन्धढ्यं सुमनोरम | विलेपनम सुरश्रेष्ठ चन्दनम प्रतिगृह्यताम ||
8 Dec 2010 - 12:28 am | हुप्प्या
चंदनाला श्रीखंड म्हटलेले मी ऐकलेले आहे. त्यामुळे असेच वाटते की परभाषेतील शब्द स्थानिक भाषेत आणताना साधारण तसाच ऐकू येणारा शब्द निवडला गेला असावा.
उदा. शहामृग. हा एक पक्षी आहे. त्याला मृग म्हणण्याचे खरे तर काही कारण नाही. पण शहामुर्ग्/मुर्घ असे म्हणायला जड जात असावे आणि मृग हा शब्द ओळखीचा आहे जसे मृग नक्षत्र म्हणून ह्या पक्षाचे मराठी नाव शहामृग झाले.
सँटा क्लाराला (सॅन होजे जवळचे, सॅन फ्रॅन्सिस्को परिसरातले एक गाव) ज्येष्ठ मराठी लोक शांता क्लारा म्हणताना ऐकले आहे.
7 Dec 2010 - 5:53 pm | JAGOMOHANPYARE
श्रीखंडाचा शोध भीमाने लावला.. पहिले श्रीखम्ड त्याने श्रीकृष्णाला दिले होते आणि त्याच्याच नावावरुन श्री खंड असे नाव ठेवले असे मी ऐकले आहे...
8 Dec 2010 - 12:23 am | हुप्प्या
मोहसिना मुकादम ह्या खाद्यसंस्कृतीच्या एक विदुषी आहेत. पूर्वी त्यांचे लेख वाचले होते. त्यांच्याकडून ह्या प्रश्नांची उत्तरे मिळणे शक्य आहे.
कुणाला त्यांचा इमेल आयडी माहीत आहे का? त्या बहुधा माटुंग्याच्या रुईया कॉलेजमधे प्राध्यापिका आहेत.
8 Dec 2010 - 12:41 pm | वाहीदा
श्री हुप्प्या ,
मला त्यांच्या घराचा पत्ता माहीत आहे
त्यांचा ईमेल , पत्ता अन फोन नंबर व्यनीतून कळविण्यात येईल
पण त्यांची तशी परवानगी मिळविल्यावरच मी तो तुम्हास देऊ शकते :-)
as without her permission it is not ethical on my part to give to someone to whom even I donot know .
कारण तुमचे खरे नाव मलाही माहीत नाही :-(
धन्यवाद !
8 Dec 2010 - 11:29 pm | हुप्प्या
त्यांची परवानगी मिळेल अशी आशा आहे. आपले मनःपूर्वक आभार.
8 Dec 2010 - 12:18 pm | गवि
व्युत्पत्ति पटतेय.
"फन्ना"च्या बाबतीत, श्रीखंडात वरून आणि साखर आणि तूप घालून पैजा लावून किलो किलो श्रीखंडाने भरलेले ताट ओरपून फन्ना करून यथावकाश हार्टात कळ येऊन आमचे मागील पिढीतील अनेक लोक "फनाह" झालेले पाहिलेत.