गाभा:
बाबासाहेबांच्या धाग्यावरून एक आठवले अन प्रश्न पडला...
असे म्हणतात कि आंबेडकरांनी फक्त दहा वर्ष आरक्षण सांगितले होते पण नंतरच्या नेत्यांनी मत मिळवण्याच्या आशेने आत्तापर्यंत तेच चालू ठेवले आहे.
आरक्षण म्हणजे आपल्यात काही कमी असेल तर मुख्य प्रवाहामध्ये कमी त्रास व्हावा म्हणून मागितले जाते ते अशी माझी समजूत...उदा. अपंगासाठी वेगळी पार्किंग वगैरे.
मग आरक्षणाच्या ऐवजी दलित समान संधीच का मागत नाहीत? ते तर बाजूलाच पण आता मराठा समजही आरक्षण मागू लागला आहे....अशाने काय होणार?
आणि आरक्षण मागून स्वतःच आपल्यात काहीतरी कमी आहे अन बाकीचे आपल्यापेक्षा उच्च आहेत हेच नाही का कबुल करत?
टीप: मला कोणाचाही अपमान किंवा उपहास करायचा नाही...केवळ एक genuine प्रश्न पडला म्हणून विचारले.
प्रतिक्रिया
6 Dec 2010 - 1:59 pm | अन्या दातार
प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच असे नाही.
अनेकदा उत्तर माहीत असुनही त्याचा उहापोह करणे टाळणे उत्तम.
6 Dec 2010 - 2:05 pm | नितिन थत्ते
लोकांना खरंच उत्तरे माहिती नसतात की मुद्दाम तेच प्रश्न विचारतात?
उत्तर द्यावे का नाही या संभ्रमात. :(
6 Dec 2010 - 2:10 pm | डावखुरा
थत्ते काका उत्तर माहीत असेल तर नक्कि द्या किंवा व्यनि करा ...कारण या प्रश्नाच्या उत्तरासाठी आतुर आहे..
6 Dec 2010 - 2:21 pm | गवि
गहन आहे विषय..पण करतो प्रयत्न.
आपल्यात काही कमी किंवा जास्त आहे अशा भावनेपेक्षा व्यवहारातला फायदा नेहमीच वरचढ ठरतो.
आपण असे समजू की एका सिनेमाच्या तिकिटाच्या मैलभर लांब लाईनीस पाहून मी आणि माझी पत्नी हबकलेले आहोत. तेवढ्यात लक्षात येतं की बाजूला एक फक्त "लेडीजसाठी" लाईन आहे आणि ती तुलनेत लहान आहे. तर मी आणि पत्नी झटक्यात निर्णय घेतो की तिने त्या रांगेत उभं रहावं.
स्त्री म्हणून वेगळी रांग म्हणजे कमीपणा वगैरे असा विचार त्यावेळी मनात येत नाही.
ठराविक जातीला केवळ त्या जातीचा असल्याचा फायदा मिळतोय म्हटल्यावर बाकीच्या जातीही आपला फायदा (वेगळी रांग) मागणार.
जातपात नको बुवा असं म्हणून केवळ सांपत्तिक स्थिती (दारिद्र्य / निम्न मध्यम / उच्च मध्यम गट) असं करून आरक्षण सुरु केलं तर मग आपल्याला "आरक्षित" गटात शिरता यावं म्हणून लोक स्वतःला गरीब सिद्ध करतील. आणि अशीच तीस चाळीस वर्षं गेली की श्रीमंतही "श्रीमंत वर्गाला ठराविक कोटा द्या. हवं तर पैसे मोजतो.." म्हणून वेगळी रांग मागतीलच.
एकदा समानता नाही म्हटलं की असले घोळ उभे राहणारच.
6 Dec 2010 - 2:28 pm | बबलु
उत्तम विषयाला तोंड फोडलेत. उत्तर अजून तरी माहित नाही.
प्रतिक्रिया वाचायला उत्सुक.
(आरक्षण सिस्टिमचा बळी) बबलु
6 Dec 2010 - 2:30 pm | अब् क
एकदम सहमत!!!!!!!!!!!
6 Dec 2010 - 2:39 pm | टारझन
मार्टिन ल्युथर किंग आणि क्रिस्तियानो रोणाल्डो (पाचवा) शी सहमत. त्यांचे विचार मला नेहमी पटत आलेले आहेत.
- लुतिक लोशन
6 Dec 2010 - 3:18 pm | गांधीवादी
आज लोकशाहीचा डोलाराच ह्या 'आरक्षण' आणि 'जातपात' ह्यावर आधारलेला आहे, त्यामुळे त्यात सराईत झालेले इतक्या सहजासहजी आपलेच स्थान गमून बसतील असे वाटत नाही.
आणि ज्या देशात उच्चतम उच्च व्यक्ती हीच एक रिमोटने चालणारी बाहुली असेल तर तिथे असला काही विचार करणे म्हणजे दिवास्वप्न पाहण्यासारखे आहे.
जर बदलायचेच असेल तर मूळ ह्या राजकारणाचा पाया ज्यावर आधारलेला आहे तिथेच घाव घातला पाहिजे, मगच हे प्रश्न सुटण्यास मदत होईल.
इथे काही विचार मांडलेले आहेत.
देशहिताचे निर्णय घेणे हा जरी सरते शेवटी बहुमतात आलेल्या सरकारचे काम आहे हे माहित असले तरी हे सरकार म्हणजे वेगवेगळ्या विभागातून निवडून आलेले उमेदवारच असतात. आजच्या लोकशाही प्रमाणे त्यांना स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या विभागाची एक खास अशी काळजी घ्यावीच लागते आणि हीच काळजी घेताघेता देशहिताचा लवकरच विसर पडतो
टीप : मागे झालेल्या चर्चेत बर्याच मान्यवरांनी सविस्तर प्रतिक्रिया देतो असे जाहीर केले होते, त्यांच्या प्रतिक्रियांची पूर्तता ह्या निमित्ताने होऊ शकते.
6 Dec 2010 - 7:03 pm | देवदत्त
काही (४/५ असेल) वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या महाचर्चा कार्यक्रमात की कशात तरी ह्याच विषयावर चर्चा चालू होती. तेव्हा आरक्षणाबाबत आंबेडकरांचे म्हणणे त्यांनी बदलून असे सांगितले होते की, "आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे १० वर्षे आरक्षण ठेवून मग ते हळू हळू वाढवत न्या." ह्यावर कोणी आक्षेप घेतला नाही.
स्वत:च्या फायद्याकरिता गोष्टी, वाक्ये बदलून आपल्याला पाहिजे तसे वापरणे हेच आज सर्वत्र चालले आहे.
(ह्यातूनच आंबेडकरांचे अनुयायी म्हणवत जे लोक दरवर्षी ६ डिसेंबरला मुंबईत येतात त्यात खरेच किती अनुयायी आहेत आणि किती फक्त फुकटात मुंबईला जायला मिळते म्हणून येतात असा प्रश्न पडत असतो.)
6 Dec 2010 - 8:09 pm | नीलकांत
ज्या आरक्षणाला कालमर्यादा असावी असं बाबासाहेब बोलले होते ते आरक्षण केवळ राजकीय स्वरूपाचं होतं. म्हणजे की आज जे मतदारसंघ आरक्षीत असतात ते काही काळानंतर आरक्षीत नसल्यास चालतील असं त्यांचं मत होतं. त्यामागे असा आशावाद होता की आरक्षण देऊन आणि शिक्षणाची, प्रगतीची संधी उपलब्ध करून दिल्यास मागसवर्ग अगदी झपाट्याने प्रगती करेल आणि मग त्यावेळी प्रस्थापित झालेली समता लक्षात घेता अश्या राजकीय आरक्षणाची गरज उरणार नाही असा विचार त्यामागे होता.
मात्र हे एकतर माहिती नसल्ल्यामुळे किंवा कित्येकदा मुद्दामच मोघमपणे बोलून ही कालमर्यादा सर्वच (विशेषतः शैक्षणीक) आरक्षणाबाबत असल्याचे पसरवले जाते. असे मुळीच नाही. आजही असे लाखो लोक आहेत ज्यांच्या घरातील पहिली पिढी आता शिकायला लागली आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या सोई किती परिणामकारक राबवल्या गेल्या हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे यापुढील काळात सुध्दा आरक्षण आवश्यक आहेच. मात्र त्याचा अतिशय परिणामकारक उपयोग केल्या गेला पाहिजे. कारण आरक्षणाचा वापर सुध्दा अतिशय असमान झालेला दिसून येतो.
मात्र ज्यांनी अश्या आरक्षणाच्या परिणामकारक अंमलबजावणीची मागणी केली पाहिजे ते त्यांचे जवळच्यांचे हितसंबंध आड येतात म्हणूण गप्पं आहेत आणि अन्य जे आरक्षणाबाबत बोलतात त्यांचा मूळी आरक्षणावर रागच आहे त्यामुळे त्यांच्या हेतूवर शंका येणे रास्त आहे. अश्या अडचणीत आज आरक्षण आहे. त्यामुळे किमानपक्षी आज आहे ते पुरेसे आहे अश्या विचारात जनता आहे.
बाकी मागासवर्गीय जनतेचे आजच्या काळात खुल्या गटातून प्रवेश किंवा नोकरी पटकावण्याचे वाढते प्रमाण बघता. लवकरच खुल्या जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत करा असा लढा उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- नीलकांत
6 Dec 2010 - 9:01 pm | इंटरनेटस्नेही
यापुढील काळात सुध्दा आरक्षण आवश्यक आहेच. मात्र त्याचा अतिशय परिणामकारक उपयोग केल्या गेला पाहिजे. कारण आरक्षणाचा वापर सुध्दा अतिशय असमान झालेला दिसून येतो.
सहमत.
बाकी मागासवर्गीय जनतेचे आजच्या काळात खुल्या गटातून प्रवेश किंवा नोकरी पटकावण्याचे वाढते प्रमाण बघता. लवकरच खुल्या जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत करा असा लढा उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सहमत.
(खुल्या प्रर्वगातला) इंटेश.
6 Dec 2010 - 9:52 pm | देवदत्त
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद नीलकांत.
6 Dec 2010 - 10:17 pm | श्रावण मोडक
नीलकांत,
याचा काही संदर्भ देता येईल का? तो आवश्यक आहे. कारण आरक्षणाच्या कालमर्यादेबाबतचा युक्तिवाद कायम केला जातो. तो खोडून काढायचा झाला तर हा संदर्भ आवश्यक आहे... :)
6 Dec 2010 - 10:35 pm | नितिन थत्ते
खाली १० वर्षांविषयी प्रश्न उपस्थित केल्यावर शोधाशोध केली असता या दुव्यावर खालील मजकूर वाचायला मिळाला.
Honourable Sardar Vallabhbhai J. Patel: Sir, I move the proviso to the first item-
"Provided that. as a general rule, there shall be reservation of seats for the minorities shown in the schedule in the various legislatures on the basis of their population :
Provided further that such reservation shall be for 10 years, the position to be reconsidered at the end of the period."
I move this for the acceptance of the House.
सरदार पटेल यांनी ही सूचना मांडली असल्याचे दिसते.(ती राजकीय आरक्षणाबाबत असल्याचे 'सीट्स' या शब्दावरून दिसते).
सरदार पटेल यांनी ही सूचना "अल्पसंख्यांकांविषयीच्या सल्लागार समितीच्या" अहवालाला अनुसरून केली होती.
संबंधित चर्चेत १० वर्षांनंतर सर्व लोक समान पातळीवर येतील असा आशावाद दिसतो.
6 Dec 2010 - 10:51 pm | श्रावण मोडक
उत्तम. किती तारखेचे प्रोसिडिंग आहे? मी थोडा आळस करतोय हे माहितीये... पण... माफी असावी. :)
हा संदर्भ पक्का मानता, आता एक संभाव्य निष्कर्ष असा:
आरक्षणाबाबत दहा वर्षांच्या मर्यादेची सूचना आंबेडकरांनी केलीच नव्हती. ती पटेलांनी केली होती. आणि तीही राजकीय आरक्षणाबाबत होती.
हे निर्विवाद सिद्ध होण्यासाठी नीलकांतने आंबेडकरांबाबत जो उल्लेख केला आहे त्याचा काही पुरावा / संदर्भ आहे का, हे पहावे लागेल आणि तो नसेल तर तो उल्लेख रद्द मानावा लागेल. मग नितिन थत्ते यांनी मांडलेला संदर्भ टिकून राहतो. त्याच्या विरोधात, आंबेडकरांनी जर इतर आरक्षणाबाबत दहा वर्षांची सूचना केल्याचा संदर्भ कुणी मांडला तर हे दोन वेगळे स्वतंत्र मुद्दे होतात. दोन्हीचे स्थान वेगळे राहील.
आपल्या या चर्चेतून ही गोष्ट काही प्रमाणात निर्विवाद सिद्ध झाली तर हवीच आहे!
7 Dec 2010 - 7:26 am | नितिन थत्ते
२७ ऑगस्ट १९४७.
6 Dec 2010 - 10:49 pm | रन्गराव
>>कारण आरक्षणाच्या कालमर्यादेबाबतचा युक्तिवाद कायम केला जातो.
त्याला एक कारण आहे. समजा आज समाजात काही लोक मागासलेले आहेत. त्याचे दोन गट करूयात 'अ' आणि 'ब'. 'अ' गटात शुन्य लोक आहे सुरुवातीला.
काहि लोकांना आरक्षणाचा फायदा मिळायला सुरुवात झाली. त्यांना आता अ गटात नेवूयात. पण एका इटिरेशन मध्ये सर्व परिस्थिती सुधाणार नाही. अजून ब गटातल्या इतर लोकांना काहीच उपयोग झालेला नाही. . म्हणून काही पिढ्या हे चालत राहीलं पाहिजे. आणि एकदा एखाद्याला आरक्षणाचा फायदा मिळाला की त्याने त्याच्या पुढच्या पीढीला तो वापरण्याची गरज पडू नये ह्याची काळजी घेतली पाहिजे, म्हणजेच तो मागासलेला नाही. आणि त्याची पुढची पिडी आता अ गटामध्येच रहाणार. त्यामुळे आरक्षणाच्या पूढच्या काही इटीरेशन्स मध्ये 'ब' गटातल्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि ते अ गटात येतील. अस करत करत काही कालाने सगळे अ गटात असतील आणि ब गटात कोणीच नसेल. मग आरक्षणाची गरज राहणार नाही. ही झाली आदर्श पद्धत.
पण सत्य परिस्थिती अशी आहे. दोन गट आहेत ब आणि क. ब गटातले लोक आरक्षणाचा फायदा घेतात पण अ गटात जात नाहीत. आणि क गटातले लोक सोपा उपाय म्हणून ब गटात जातात. त्यामुळे ब गट कधी शुन्यावर येतच नाही.
आरक्षणाचा फायदा फक्त एकदाच का असायला हवा?
उत्तर: समजा दोन मागासलेले कुटूंब आहेत. त्यातेली एकाला आरक्षणाचा फायदा आज मिळाला. दुसर्याला मिळाला नाही. आता पुढच्या पीढीत येवू. आरक्षाणातील जागाही मर्यादीत असल्यामुळे तिथही स्पर्धा आहेच. तेव्हा ह्या दोन कुटंबातील मुलांमधील स्पर्धा फेअर असेल का?
6 Dec 2010 - 9:19 pm | नितिन थत्ते
आंबेडकरांनी १० वर्षे आरक्षण ठेवा असे सांगितल्याचे अनेक वेळा वाचायला मिळते. त्याच्या संदर्भाचा शोध घ्यायचा प्रयत्न केलेला नाही. पण ते खरेच असे म्हणाले होते (आणि १० वर्षांनी रिव्यू करू असे म्हणाले होते) असे समजून उत्तर देत आहे.
सर्वांना समान संधी आणि कोणत्याही प्रकारे भेदभाव नसावे हे एक आदर्श तत्त्व म्हणून योग्य आहे. परंतु ते तत्त्व अंमलात आणण्यासाठी स्पर्धा समान व्यक्तींमध्ये आहे हे तपासायला हवे. उदा मुष्टीयुद्धाची स्पर्धा घेताना ७५ किलो वजनाच्या स्पर्धकाची ५० किलो वजनाच्या स्पर्धकाशी मॅच ठेवत नाहीत. त्यांचे वेगवेगळे गट ठेवून वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात.
त्याच तत्त्वावर आधारून आरक्षणाची कल्पना निर्माण झाली होती. जे शेकडो वर्षे शिक्षणापासूनच नाही तर मानव्यापासूनही वंचित ठेवले गेले आहेत त्यांना मुख्यप्रवाहात येण्याची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना असमान स्पर्धेत थेट उतरायची सक्ती होऊ नये अश्या हेतूने आरक्षण ठेवण्याची योजना सुरू झाली. या मागे सवर्णांच्या मनातील गिल्टचाही भाग असणार.
दुसरे म्हणजे आंबेडकर हे घटनेच्या 'मसुदा समिती'चे अध्यक्ष होते. घटनेत काय असावे काय नसावे हे एकतर्फी ठरवण्याचा अधिकार आंबेडकरांना नव्हता. घटना समितीमध्ये होणार्या चर्चांमधूनच या तरतुदी ठरत असणार. त्यामुळे आंबेडकर म्हणाले म्हणून आरक्षण दिले गेले असे नसणारच. माझ्या समजुतीप्रमाणे आंबेडकरांचे "१० वर्षांनी रिव्ह्यूचे" वक्तव्य अजिबात आरक्षण नको असे म्हणणारे आणि आरक्षण हवे म्हणणारे यांच्या मधील तडजोड म्हणून आले असावे. १० वर्षांनी आरक्षण रद्द व्हावे असे आंबेडकरांना खरोखर म्हणायचे होते की नाही हे माहिती नाही.
खरोखर किती वर्षे समानता निर्माण व्हायला आवश्यक आहेत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्याचे उत्तर मला माहिती नाही. ६० वर्षांत समानता निर्माण झाली आहे असे मला वाटत नाही.
एकीकडे घटनेत आरक्षण देण्याबरोबरच समाजातली जातपात आणि भेदभाव नष्ट व्हावेत आणि उच्चवर्गीयांनी मागासांना मनःपूर्वक आपले मानून व्यवहार करावा अशीही अपेक्षा नव्हती. त्या अपेक्षेच्या पूर्तीच्या जवळपासही आपण अजून पोचलेलो नाही. [प्रत्यक्षानुभवांवरून आढलेला निष्कर्ष आहे]. सामाजिक समानता निर्माण करण्यात हयगय झाली असूनही आरक्षण हटवण्याची मात्र घाई सुटलेली आहे.
आरक्षण दिल्यामुळे मागासांपैकी काहींना तरी पुढे येण्याची संधी मिळाली आहे यात संशय नाही. आरक्षण नसताना ती मिळाली नसती. (आरक्षण नसतानाही आंबेडकर पुढे आलेच हा युक्तिवाद योग्य नाही कारण मग पुढे येण्याचा मार्ग आंबेडकरांसारखाच खडतर असता आणि ते अत्यंत थोड्याच व्यक्तींना शक्य झाले असते).
सध्या आरक्षण ठेवून क्रीमी लेयर काढण्याची तडजोड झाली आहे ती योग्य आहे असे मला वाटते पण क्रीमी लेयर खुल्यावर्गातही लागू करावा असे माझे मत आहे.
7 Dec 2010 - 5:59 am | पंगा
बाकी सर्व ठीक आहे, पण...
हा मुद्दा समजला नाही.
माझ्या अर्धवट (आणि कदाचित चुकीच्याही) समजुतीप्रमाणे, क्रीमी लेयर हा (एरवी सामूहिक निकषानुसार आरक्षणास पात्र असलेल्यांपैकी) काहींना आरक्षणातून वगळण्याचा निकष आहे. (समजूत चुकीची असल्यास जरूर दुरुस्त करावी.)
अशा परिस्थितीत, क्रीमी लेयर खुल्या प्रवर्गास नेमका कसा लावता यावा? ज्यांना मुळात आरक्षणच उपलब्ध नाही, त्यांना आरक्षणातून वगळायचे म्हणजे नेमके काय करायचे?
कृपया खुलासा व्हावा.
7 Dec 2010 - 7:25 am | नितिन थत्ते
वाइल्ड थॉट आहे.
माझा मुद्दा शैक्षणिक आरक्षणाला लागू आहे. आजच्या परिस्थितीत एखाद्याला इंजिनिअर व्हायचे असेल तर त्याला ते होता येते (कितीही कमी गुण असले तरी) कारण आज इतकी कॉलेजेस आहेत की कुठेनाकुठे प्रवेश मिळतोच. (म्हणजे आरक्षण आहे म्हणून एखाद्या खुल्या प्रवर्गातल्या मुलाला इंजिनिअर होता येत नाही अशी परिस्थिती नाही). पण त्यासाठी पैसा लागतो. म्हणजे मग प्रश्न राहतो सरकारी कॉलेजात सबसिडाइज्ड शिक्षण मिळण्याचा.
दुसरीकडे क्रीमी लेयरच्या कल्पनेत ज्यांना आधी आरक्षणाचा फायदा मिळाला त्यांना तो परत परत मिळू नये आणि त्या ऐवजी दुसर्या गरजूस मिळावा असे अपेक्षित आहे.
आता प्रश्न फक्त सबसिडाइज्ड शिक्षणाचा आणि आधी फायदा मिळालेल्याला पुन्ह फायदा मिळू नये असा असेल तर ज्याला आधी खुल्यावर्गातून सबसिडाइज्ड शिक्षण मिळाले आहे त्याच्या मुलांना सबसिडाइज्ड शिक्षण न देता दुसर्यांना सबसिडाइज्ड शिक्षण द्यायला हवे. उदा. माझे वडील आणि मी (खुल्या प्रवर्गातून) सबसिडाइज्ड शिक्षण घेऊन इंजिनिअर झालो. म्हणून माझ्या मुलीला सबसिडाइज्ड शिक्षण वर्ज्य असायला हवे (भले तिला ९०-९५-१००-१०५ कितीही टक्के मिळालेले असो). त्या ऐवजी आधी सबसिडाइज्ड इंजिनिअरिंग शिक्षण न मिळालेल्यांच्या मुलांना (खुल्या वर्गातील) प्रवेश मिळायला हवा.
7 Dec 2010 - 9:49 am | पंगा
मुद्दा विचार करण्यासारखा आहे, पण दोन मुद्द्यांच्या तपशिलांबद्दल शंका आहे.
सध्या याची अंमलबजावणी आरक्षित वर्गांत नेमकी कशी होते? म्हणजे केवळ एखाद्या कुटुंबातील दोन पिढ्या आरक्षणाच्या आधारावर शिकल्या म्हणून त्या कुटुंबास यापुढे आरक्षण वर्ज्य, असे, की यामागे काही आर्थिक निकष आहेत?
आयआयटीसारख्या संस्थांमध्ये काय करावे? (नक्की खात्री नाही, पण आयआयटीमधील शिक्षण सब्सिडाइज़्ड असते, असे वाटते. नसल्यास चूभूद्याघ्या.) येथे केवळ सबसिडीचा प्रश्न नाही, तर दर्जाचाही प्रश्न आहे असे वाटते. (अनेक खाजगी इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश मिळणे शक्य असेल, परंतु आयआयटीसारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ पाहणारे केवळ सब्सिडाइज़्ड शिक्षण मिळते म्हणून आयआयटीचा प्रवेश घेऊ पाहत असतील, असे वाटत नाही.)
आयआयटीच कशाला, कित्येक सरकारी इंजिनियरिंग कॉलेजांचे कोणते ना कोणते विभाग दर्जेदार शिक्षणासाठी नावाजलेले आहेत. तेथे विद्यार्थी केवळ सबसिडीसाठी प्रवेश घ्यायला धावत असतील, असे वाटत नाही. उदा. कोणत्यातरी फलाण्याठिकाण्या खाजगी कॉलेजापेक्षा यूडीसीटीमधून केमिकल इंजिनियरिंग करणे हे निदान वीसपंचवीस वर्षांपूर्वी तरी होतकरू विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून (म्हणजे निदान पर्सेप्शनमधून तरी - प्रत्यक्षात माहीत नाही) श्रेयस्कर ठरले असते, आणि यात सबसिडीचा विचारदेखील त्या होतकरू विद्यार्थ्याच्या मनास शिवला असता, असे वाटत नाही. अगदी प्रस्तुत होतकरू विद्यार्थी गर्भश्रीमंत असला, खाजगी कॉलेजांची फी मागचापुढचा विचार न करता सहज परवडण्यासारखी असली, तरीही. (आणि गेल्या वीसपंचवीस वर्षांत एक तर खाजगी कॉलेजांची परिस्थिती फारच सुधारली असल्याशिवाय किंवा यूडीसीटीसारख्या संस्थांची पातळी फारच खालावली असल्याशिवाय यात आजही फार फरक पडला असावा असे वाटत नाही. अर्थात गेल्या किमान वीस वर्षांतील परिस्थितीची मला फारशी कल्पना नाही, तरीही.)
येथे प्रश्न पूर्णपणे सबसिडीचा नसून पर्सीव्ड दर्जाचाही आहे, ही अडचण आहे.
कदाचित एका मार्गाने याचे निराकरण करता येऊ शकेल. जर सरकारी कॉलेजांची शुल्केसुद्धा बाजारभावाएवढी केली, आणि फक्त काही टक्के जागा सब्सिडाइज़्ड ठेवल्या, तर आपण म्हणता तशी योजना शक्य आहे. पण सरकार मुळात अशी कॉलेजे एक सार्वजनिक सुविधा या तत्त्वावर चालवत असल्यामुळे सरकारी कॉलेजांतून बाजारमूल्याप्रमाणे शुल्कांची अंमलबजावणी सरकार कधी करेल का, याबद्दल निदान मी तरी साशंक आहे.
मुळात सरकारने शिक्षणाच्या (किमान उच्चशिक्षणाच्या तरी) धंद्यात असावे का, हा मुद्दा पूर्णपणे वेगळा.
7 Dec 2010 - 10:21 am | नितिन थत्ते
मी मांडलेला मुद्दा एक वाइल्ड थॉट आहे. खुल्या वर्गातल्या होतकरूंना जवळ पैसा नसल्याने थोडे कमी गुण मिळतात आणि प्रवेश मिळत नाही या मुद्द्यावरचा उपाय म्हणून आहे.
शिवाय त्याच्या डिटेलबाबत अजून फार विचार केलेला नाही.
7 Dec 2010 - 10:53 am | बिपिन कार्यकर्ते
करूही नका. रोगापेक्षा इलाज भयंकर वाटतो आहे. ;)
7 Dec 2010 - 10:58 am | पंगा
बाकी सर्व बाबी (जसे शिक्षणाचा दर्जा वगैरे) समान असता केवळ सबसिडीचा अथवा तिच्या अभावाचा (आणि म्हणूनच केवळ मूल्याचा) फरक असल्यास आपला मुद्दा योग्यच आहे.
दुर्दैवाने प्रत्यक्षात तशी परिस्थिती असण्याबाबत साशंक आहे. खाजगी कॉलेज (= अधिक शुल्क) याची परिणती दर्जेदार (किंवा किमानपक्षी तितक्याच दर्जाच्या) शिक्षणात होईलच, असे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत केवळ गेल्या दोन पिढ्यांनी सरकारी कॉलेजांत शिक्षण घेतले म्हणून एखाद्या (अन्यथा पात्र) होतकरू विद्यार्थ्यास एखाद्या नावाजलेल्या परंतु सरकारी (पर्यायाने सब्सिडाइज़्ड) कॉलेजात प्रवेश नाकारणे उचित ठरणार नाही. (सबसिडी नाकारल्यास, म्हणजेच बाजारभावाने फी लावल्यास, समजण्यासारखे आहे, पण प्रवेशच नाकारणे योग्य वाटत नाही. अशा विद्यार्थ्यास खाजगी कॉलेजचा पर्याय तरीही राहील, खाजगी कॉलेजची फी परवडण्यासारखीही असेल कदाचित, पण कोणीही-उठतो-खाजगी-कॉलेज-काढतो-च्या जमान्यात त्या खाजगी पर्यायाचा दर्जा जर खूपच कमी असेल, तर केवळ पाठच्या दोन पिढ्या सरकारी कॉलेजात शिकल्या म्हणून अशा विद्यार्थ्यास दर्जेदार शिक्षण नाकारणे हे काउंटरप्रॉडक्टिव ठरेल. अर्थात सगळीच खाजगी कॉलेजे ही टाकाऊ असतात असे म्हणण्याचा उद्देश नाही, पण तरीही. त्याऐवजी अशा विद्यार्थ्यास सदर नावाजलेल्या सरकारी कॉलेजात प्रवेश दिला, पण बाजारभावाप्रमणे मजबूत फी आकारली, तर त्या विद्यार्थ्यावरही अन्याय होणार नाही, आणि क्रीमी लेयरचाही कार्यभाग साधेल, असे वाटते.)
6 Dec 2010 - 11:03 pm | शैलेन्द्र
अत्यंत किचकट व जिवघेणा विषय...
मुळात आरक्षण आहे साधारण ४०-४५% जागांवर, आणि ज्यांना आरक्षण आहे त्यांची लोकसंख्या यापेक्षा कितीतरी जास्त आहे. तरी आरक्षणाचा फायदा का होतो? कारण या समाजातुन स्पर्धक कमी असतात. कारण काय? इतका मोठा जनसमुह नालायक आहे असे मानायला मी अजिबात तयार नाही, फक्त आज सक्षमतेच्या ज्या फुटपट्ट्यांनी आपण गुणवत्तेचे मोजमाप करतो त्यात ते कमी पडतात. ही सक्षमता मीळेल अशी परीस्थीती त्यांना लाभली नाही. शैक्षनीक यशासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा एक वातावरण हवे असते. तसे वातावरण येवढ्या मोठ्या समुदायाच्या वाट्याला का आले नाही? नोकरी अंतर्गत आरक्षण अजिबात नसावे पण शैक्षणीक व रोजगार यंत्रणेत प्रवेश मिळवण्यासाठी त्याची आजही गरज आहे.
मागे आमच्या मित्रांत हाच वाद एकदा झाला होता, "लेले" आडनावाच्या एका अस्सल चितपावनाने मांडलेला मुद्दा परत मांडतो, तो म्हणाला होता, जोवर जन्माच्या एकमेव आधारावर, ब्राम्हन समाज, "पौरोहीत्य" या व्यवसायाचे आरक्षण उपभोगतो तोवर, इतर कोणत्याही आरक्षणावर बोलायचा आपल्याला हक्क नाही.
7 Dec 2010 - 1:31 pm | आदिजोशी
"पौरोहित्य" ह्या शाखेला असलेलं तथाकथित आरक्षण हे कायद्याने मिळालेलं नाही. त्यामुळे सरकारी नोकरीत आरक्षणाने जागा राखीव ठेवणे आणि ब्राम्हणेतरांना पौरोहित्य करू न देणे ह्यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टींची तुलना अतिशय अयोग्य आहे. हे लेल्यांनाही सांगा.
आजकाल अनेक ब्राम्हणेतर लोकंही पौरोहित्य करू लागली आहेत. आणि जुन्या काळी पौरोहित्य केवळ इतर समाजातील लोकांसाठीच नव्हे तर मुंज न झालेले ब्राम्हण आणि ब्राम्हण स्त्रिया ह्यांच्यासाठीही वर्ज्य होतं.
मंत्रोच्चारात सगळ्यात जास्त महत्व शब्दोच्चारांना असतं. तसे योग्य शब्दोच्चार करू शकणारी कोणतीही व्यक्ती पौरोहित्य करण्यास समर्थ आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. अशुद्ध उच्चार असलेले गुरुजी कोण खपवून घेईल? ब्राम्हणेतर व्यक्ती तरी असे गुरूजी बोलावतील का?
7 Dec 2010 - 2:09 pm | परिकथेतील राजकुमार
अदिभौशी सहमत आहे.
मुळात अनेक समाजात पौरोहित्य (ह्यात मी लग्न लावण्यापासुन ते अंत्यविधी पर्यंत सर्व विधी पकडले आहेत) हे ब्राम्हणाकडून न होता त्या त्या समाजातील पुरोहिताकडुन केले जाते.
आमचे आरक्षण उपभोगणारे एक मित्रवर्य कायम म्हणायचे, "बामणांनी मांस-मटण महाग करुन ठेवलय आन आम्ही शिक्षण."
7 Dec 2010 - 3:27 pm | शैलेन्द्र
""पौरोहित्य" ह्या शाखेला असलेलं तथाकथित आरक्षण हे कायद्याने मिळालेलं नाही. त्यामुळे सरकारी नोकरीत आरक्षणाने जागा राखीव ठेवणे आणि ब्राम्हणेतरांना पौरोहित्य करू न देणे ह्यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टींची तुलना अतिशय अयोग्य आहे."
लेल्यांचे मत मला पुर्ण पटले असे नव्हे, पण,कायद्यापेक्षाही प्रभावी अस सामाजीक दडपण असताना कायदा करायची गरजच काय?
"आजकाल अनेक ब्राम्हणेतर लोकंही पौरोहित्य करू लागली आहेत. आणि जुन्या काळी पौरोहित्य केवळ इतर समाजातील लोकांसाठीच नव्हे तर मुंज न झालेले ब्राम्हण आणि ब्राम्हण स्त्रिया ह्यांच्यासाठीही वर्ज्य होतं."
असे किती जण आहेत? शेकडा ०.१% ? अपवादाने नियमच सिध्द होतात.
दुसरे, करु शकणे आणी करण्याची संधी उपलब्ध करुन देणॅ यात फरक आहे. ज्यांनी पौरोहीत्य करण्याची संधी इतरांकडुन हिसकावुन घेतली त्यांनीच पुढाकार घेवुन ह्या वर्गाला यात सामावुन घ्यायला हवे. "चातुर्मासात लग्न केली तर चालतील, बदलत्या काळानुसार ते धर्मसंमत आहे", असे ठराव करायला एकत्र येणार्या धर्म मार्तंडांनी या बाबत काय पुढाकार घेतला?
"मंत्रोच्चारात सगळ्यात जास्त महत्व शब्दोच्चारांना असतं. तसे योग्य शब्दोच्चार करू शकणारी कोणतीही व्यक्ती पौरोहित्य करण्यास समर्थ आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. अशुद्ध उच्चार असलेले गुरुजी कोण खपवून घेईल? ब्राम्हणेतर व्यक्ती तरी असे गुरूजी बोलावतील का?"
तोतर्या भटजींची किती ऊदाहरणे देवु? गर्दीच्या वेळी चालवुन घ्याव लागत. माझ्या स्वता:च्या घरी गणपतीला येणारे गुरुजी प्रकांडपंडीत किंवा विद्या-वाचस्पती नाहीत, पण त्या वेळी इतर कुणी मिळत नाही.
खरंतर हल्ली या पेशात यायची कुणाचीच इच्छा नाही.
7 Dec 2010 - 3:46 pm | आदिजोशी
पण, कायद्यापेक्षाही प्रभावी अस सामाजीक दडपण असताना कायदा करायची गरजच काय?
कायद्याबद्दल बोलताना कायद्यात बसणार्या गोष्टींबद्दल चर्चा करावी. माझ्या मते सामाजीक दडपण ही "पत्रिका जुळत नाही" सारखी सोयिस्कर पळवाट आहे.
दुसरे, करु शकणे आणी करण्याची संधी उपलब्ध करुन देणॅ यात फरक आहे.
संधी उपलब्ध होणे हे ब्राम्हणांच्या हातात राहिले आहे काय? ३% लोक ह्याबाबत समाजात दबाव निर्माण करू शकतात का? जे पुरोहितांना घरी बोलावतात तो समाज नक्कीच जास्त मोठा आहे. संख्याबळाच्या दृष्टीने ब्राम्हण नगण्य आहेत. इतरांनी जर आपल्यातलेच गुरुजी बोलवायचे असं ठरवलं तर ब्राम्हणेतरांना संधी का मिळणार नाहीत? आणि ते जर असं करत नसतील तर तो दोष ब्राम्हणांचा आहे का?
खरंतर हल्ली या पेशात यायची कुणाचीच इच्छा नाही
खरं बोललात. पण मग असे असताना ह्या संदर्भातले लेल्यांचे उदाहरण, जे तुम्हाला स्वतःलाही पूर्णपणे पटलेले नाही, ते इथे देऊन नेमका काय मुद्दा मांडायचा प्रयत्न होता.
7 Dec 2010 - 4:14 pm | शैलेन्द्र
"खरं बोललात. पण मग असे असताना ह्या संदर्भातले लेल्यांचे उदाहरण, जे तुम्हाला स्वतःलाही पूर्णपणे पटलेले नाही, ते इथे देऊन नेमका काय मुद्दा मांडायचा प्रयत्न होता."
मुद्दा हाच की आपण सगळे स्वार्थी आहोत, जे हातात आहे ते कोणीही सोडणार नाही, ब्राम्हण असो कि दलित कि इतर कुणी. जे आरक्षण आज ज्यांच्या हातात आहे ते कोणत्याही नैतीक अनैतीक कारणासाठी ते सोडणार नाही. समाज म्हणुन आपण सगळे दांभिक आहोत. सो, ज्याची जितकी ताकद, तो तितका ओरबाडुन घेणार, वांझोट्या चर्चा करण्यात अर्थ नाही.
"कायद्याबद्दल बोलताना कायद्यात बसणार्या गोष्टींबद्दल चर्चा करावी. माझ्या मते सामाजीक दडपण ही "पत्रिका जुळत नाही" सारखी सोयिस्कर पळवाट आहे."
कित्येक गोष्टी कायदा नसतानाही पाळल्या जातात किंवा कायदा असुनही पाळल्या जात नाही. सामाजिक दडपणाला इतक कमी नका लेखु..
7 Dec 2010 - 9:21 pm | आदिजोशी
परत घोळ घालताय.
जर मी ठरवलं की आरक्षीत जागेवर नोकरी मिळवायची तर ते मला कदापी शक्य नाही, कितीही गुणवत्ता असली तरी. पण जर एखाद्याने ठरवलं की पौरोहित्य शिकून तो व्यवसाय म्हणून स्विकारायचा तर त्याला ते शक्य आहे.
हाच फरक मी दाखवून देऊ इच्छितो.
आता त्या पुरोहिताला समाज स्विकारतो की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण सुरुवात तर करू शकतो. पण आरक्षणामुळे लायक व्यक्तींना लायकी नसलेल्या व्यक्तीच्या हाताखाली काम करावे लागणार असेल तर त्याचा गुणवत्तेवर परिणाम होणार नाही का?
आणि ह्याच कारणामुळे प्रायव्हेट सेक्टर वाल्यांनी नोकर्यांमधे आरक्षण देण्याच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला.
7 Dec 2010 - 10:26 pm | शैलेन्द्र
"परत घोळ घालताय.
जर मी ठरवलं की आरक्षीत जागेवर नोकरी मिळवायची तर ते मला कदापी शक्य नाही, कितीही गुणवत्ता असली तरी. पण जर एखाद्याने ठरवलं की पौरोहित्य शिकून तो व्यवसाय म्हणून स्विकारायचा तर त्याला ते शक्य आहे."
चुक
कोणत्याही जागा १००% आरक्षीत नसतात, उदा. शिक्षकाच्या १० जागा असतील तर त्यात ४ आरक्षीत असतात, म्हणुन जर तुम्हांला शिक्षक व्हायचे असेल तर गुणवत्तेच्या जोरावर तुम्ही नक्किच होवु शकता.
"आता त्या पुरोहिताला समाज स्विकारतो की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण सुरुवात तर करू शकतो."
इथेच तर खरी गम्मत आहे, ५०-६० वर्षापुर्वी नोकरी धंद्याच्या निमीत्ताने मुख्य प्रवाहात येवु पाहणार्या उपेक्षीतांच्या पहिल्या पिढीने हा भेदभाव पुरता भोगलाय (आज अनेक ठीकानी गंगा उलट वाहतीय तो भाग अल्हीदा), बढतीमधील आरक्षण याच प्रकाराने सुरु झाले.
"पण आरक्षणामुळे लायक व्यक्तींना लायकी नसलेल्या व्यक्तीच्या हाताखाली काम करावे लागणार असेल तर त्याचा गुणवत्तेवर परिणाम होणार नाही का?"
हॅ हॅ, तुमचा आवेश असा आहे जणु आरक्षण घेणारे सगळे नालायल असतात वा बढतीवर परीणाम करणारा आरक्षण हा एकच घटक आहे. सरकारी नोकरीतील बरीच प्रमोशन "टाइम बाउंड" असतात, आरक्षण ही एक शीडी नक्किच आहे पण विना आरक्षण हेड क्लार्क किंवा डेप्युटी अकाउंटंट झालेली व्यक्ती ३-४ वर्ष जुन्या रंगरुटाहुन फार श्रेष्ट असते असे नाही. परफॉरमन्स हा निकष सरकारी नोकरीत फार कमी वेळा असतो. खाजगी नोकर्यात तर आरक्षण नाही, मग सगळेच बॉस आपल्यापेक्षा जास्त कर्तब्गार असतात का?
"आणि ह्याच कारणामुळे प्रायव्हेट सेक्टर वाल्यांनी नोकर्यांमधे आरक्षण देण्याच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला"
आरक्षण ही "आयडीयल" सिस्टीम नक्किच नाही, पण समाजातील सर्व घटकांना विकासाची संधी देण्याच्या दृष्टीने उपलब्ध व राबवता येणार्या पर्यांयांपैकी तो "कदाचीत" सर्वोत्तम पर्याय आहे. खाजगी क्षेत्राने त्याला विरोध करणे स्वाभावीक आहे, कारण सामाजीक बांधीलकीसाठी, आपल्या नफ्यावर परीणाम करुन घेणे त्यांना परवडणारे नाही. तशी अपेक्षाही नाही.
6 Dec 2010 - 11:07 pm | लॉरी टांगटूंगकर
सध्या आरक्षण ठेवून क्रीमी लेयर काढण्याची तडजोड झाली आहे ती योग्य आहे असे मला वाटते पण क्रीमी लेयर खुल्यावर्गातही लागू करावा असे माझे मत आहे.
मान्य आहे .पण क्रीमी लेयर मर्यादा बरीच वर आहे असे वाटते (दारिद्र्या रेषेशी तुलना करता)आणि मा.भुजबळ वगैरे अजून वर नेण्याच्या गोष्टी करतात .आणखी म्हणजे या वर्गातील एका गट आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे .आणि दुसरा त्याच (दुर्दैवी) परिस्थितीत आहे .
क्रीमी लेयर खुल्यावर्गातही लागू करावा असे माझे मत आहे.---हे पूर्ण मान्य
6 Dec 2010 - 11:13 pm | डावखुरा
>>>सर्वांना समान संधी आणि कोणत्याही प्रकारे भेदभाव नसावे हे एक आदर्श तत्त्व म्हणून योग्य आहे. परंतु ते तत्त्व अंमलात आणण्यासाठी स्पर्धा समान व्यक्तींमध्ये आहे हे तपासायला हवे. उदा मुष्टीयुद्धाची स्पर्धा घेताना ७५ किलो वजनाच्या स्पर्धकाची ५० किलो वजनाच्या स्पर्धकाशी मॅच ठेवत नाहीत. त्यांचे वेगवेगळे गट ठेवून वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. >>
थत्ते काका हे पटतंय हो..
१]पण आता हे आरक्षण जातीवरुन होते की आर्थिक परिस्थितिवरुन..
२]हे आरक्षण फक्त बौद्ध समाजापुरता मर्यादित होते की सगळ्या समाजातील भरडलेल्यांसाठी?
>>>>>"१० वर्षांनी रिव्ह्यूचे" वक्तव्य अजिबात आरक्षण नको असे म्हणणारे आणि आरक्षण हवे म्हणणारे यांच्या मधील तडजोड म्हणून आले असावे.>>>>>
हं हे एकवेळ असु शकते.. कारण हा निर्णय समितीद्वारे चर्चा घडुनच झालेला असला पाहीजे..
खरोखर किती वर्षे समानता निर्माण व्हायला आवश्यक आहेत? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे
खरंच..
थत्ते काका आता मतांकरिता राज्कारण होते आणि त्या घटनेतील तरतुदीचा गैरवापर होताना दिसुन येतो..पण एक विचार करुन पहा डॉक्टर आंबेडकर हे संघर्षतुन वर आले ते भारताच्या घटनेचे शिल्पकार बनले..
पण त्यांना ती प्रतिकुल परिस्थिती होती म्हणुन त्या परिस्थीती शी झगडण्याची प्रेअरणा मिळुन ते अनेक संघर्ष करत वर आले..
त्यामुळे मला तुमचा हा आरक्षण नसताना ह्या लोकाना पुढे यायची संधी मिळाली नसती हे जरा पटत नाही पण हे माझे मत आहे..
आणि आरक्षण देउन्ही किती फरक पडला आहे हे तर आपल्या डोळ्यासमोर आहेच...तथाकथित १० वर्ष मुदतीचे आरक्षण आता साठ वर्ष होउनही आपले उद्दिष्ट्य साध्य करु शकले नाही आणि अजुन क्लिष्टच होत आहे..
आरक्षित लोकाना फक्त चैत्यभुमीवर जाण्यात धन्यता वाटते असे दिसुन येते....
तिथे जाताना होणारे प्रकार मांडुन मी ह्या प्रतिसादाला स्फोटक रुप देउ ईच्छित नाही..
आणि क्रिमिलेयर हा काय प्रकार आहे..? (कृपया जरा विस्तृत माहीती कुठे उपलब्ध असेल तर दुवा )
आणि जातीचा दाखला असुन ही त्याला दरवर्शी वॅलिडिटी ची गरज का की दरवर्षी जात बदलणार आहे...
पण साला ही जातच का..
गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश द्या ..
मग तो आरक्षित जातीतील असो किंवा अनारक्षित...
>>>>>>>>>एकीकडे घटनेत आरक्षण देण्याबरोबरच समाजातली जातपात आणि भेदभाव नष्ट व्हावेत आणि उच्चवर्गीयांनी मागासांना मनःपूर्वक आपले मानून व्यवहार करावा अशीही अपेक्षा नव्हती.>>>>
अशी अपेक्षा नवह्ती ??????
मग कशी होती??
माझ्यामते हे भेदभेदाची दरी मिटुन सलोखा, समानता स्थापन व्हावा ह्या दॄष्टीकोणातुन हे आरक्षण जन्माला आले असेल...
आणि माझ्या वाचनात असे आले आहे की दर १० वर्षानंतर ह्या आरक्षणाचा काय परिणाम समाजावर झाला आहे याचा आढावा घेउन त्या निष्कर्षाच्या आधारे ही आरक्षण पद्धती पुढे परत क्चालु ठेवायची की नाही ही तर्तुद आहे .. पण तसे काही झालेले दिसुन येत नाही..
उलट एकगठ्ठा मतांसाठी....त्यांचा विकास त्यांना गोंजारुन व सुविधांच्या नावाखाली त्यांचा विकास खूंटवुन त्यांना निवड्णुका जवळ आल्या की गोंजारण्याचे धोरण आपल्या राजकीय शिलेदारांनी अंगिकृत केल्याने दिसुन येते..
यावर आपले मत काय?
लालसा
6 Dec 2010 - 11:23 pm | शैलेन्द्र
"१]पण आता हे आरक्षण जातीवरुन होते की आर्थिक परिस्थितिवरुन..
२]हे आरक्षण फक्त बौद्ध समाजापुरता मर्यादित होते की सगळ्या समाजातील भरडलेल्यांसाठी?"
नक्किच जातीवरुन, मला वाटत, तुंम्ही स्वता:च जरा वाचन करुन माहिती काढा.
"पण साला ही जातच का..
गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश द्या ..
मग तो आरक्षित जातीतील असो किंवा अनारक्षित..."
गुणवत्ता कशी मोजायची? रघुनाथ माशेलकर वा नरेंद्र जाधवांबरोबरच डॉक्टरेट केलेले अनेक आहेत, ते तितकी उंची का गाठु शकले नाही? एखाद्याची किंमत तो माणुस कुठे पोचला यावर ठरत नसुन तो कुठुन आला यावर ठरते.
7 Dec 2010 - 10:25 pm | आजानुकर्ण
आरक्षित समाजाची अशी एकगठ्ठा मते आहेत असे वाटत नाही. किंबहुना इथल्या अनेकांचा रोख नवबौद्धांवर आहे, त्यांचे डेडिकेटेड असे किमान १४ नेते व तितकेच पक्ष आहेत.
6 Dec 2010 - 11:34 pm | सुहास..
घाई करतो आहेस असे वाटले,
( दरवर्षीप्रमाणे ) अजुन प्रतिसादांची वाट बघत आहे .
सोशल इजिंनयिरिंग कोळुन प्यालेला
वाश्या
6 Dec 2010 - 11:40 pm | शैलेन्द्र
"घाई करतो आहेस असे वाटले,"
झोप आलिय हो...
"
एकवेळ वडापावची गाडी लावेन, पण सर्कारी नौकरी करणार नाही."
मस्त, आपण पण हेच केलं....
7 Dec 2010 - 10:43 am | आदिजोशी
१. आरक्षण आर्थिक परिस्थिती वर आधारित असावे.
२. जातीवर आधारीत आरक्षण असेल तर ते एका व्यक्तीला आयुष्यात एकदाच मिळावे. शिक्षण घेताना आरक्षण, नोकरी मिळताना आरक्षण आणि ह्यावर कडी म्हणजे प्रत्येक पदोन्नतीच्या वेळीही आरक्षण असा विनोदी प्रकार आहे. शिक्षण घेताना आरक्षण समजू शकतो. नोकरी मिळताना आरक्षण दिले तरी एकवेळ चालवून घेता येईल. पण पदोन्नतीने येणार्या जबाबदार्या आणि निर्णय क्षमता केवळ जातीमुळे एखाद्या माणसात लवकर कशी येते हे आकलना पलिकडे आहे.
चतूर्थश्रेणी कामगार म्हणून सुरुवात करून हेड-क्लार्कच्या पदावर आरक्षणाच्या जोरावर १५ वर्षात पोचलेल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली २०-२२ वर्ष अनुभव असलेल्या व्यक्ती काम करत असल्याचे भयानक चित्र स्वतः बघितले आहे.
7 Dec 2010 - 4:02 pm | मृत्युन्जय
जातीवर आधारीत आरक्षण असेल तर ते एका व्यक्तीला आयुष्यात एकदाच मिळावे.
त्रिवार सहमत.
चतूर्थश्रेणी कामगार म्हणून सुरुवात करून हेड-क्लार्कच्या पदावर आरक्षणाच्या जोरावर १५ वर्षात पोचलेल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली २०-२२ वर्ष अनुभव असलेल्या व्यक्ती काम करत असल्याचे भयानक चित्र स्वतः बघितले आहे.
गुड. आणि आशा करतो की हेदेखील बघितले असेल की हेड क्लार्क ला डोंबलाचं काहीच येत नसते आणि त्याला काही येणे हे तसे अपेक्षितही नसते. सगळे काम हाताखालचा माणूस करत असतो (जर तो आरक्षणाने तिथे पोचलेला नसेल तर)
7 Dec 2010 - 11:51 am | अब् क
चतूर्थश्रेणी कामगार म्हणून सुरुवात करून हेड-क्लार्कच्या पदावर आरक्षणाच्या जोरावर १५ वर्षात पोचलेल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली २०-२२ वर्ष अनुभव असलेल्या व्यक्ती काम करत असल्याचे भयानक चित्र स्वतः बघितले आहे.
अगदि हेच!!!!!!!!
7 Dec 2010 - 12:13 pm | नितिन थत्ते
असहमत.
त्यात भयानक काय आहे हे कळले नाही. १५ वर्षात केवळ आरक्षणामुळेच ती व्यक्ती हेडक्लारक झाली काय?
7 Dec 2010 - 12:23 pm | छोटा डॉन
>>१५ वर्षात केवळ आरक्षणामुळेच ती व्यक्ती हेडक्लारक झाली काय?
थत्तेचाचा, ही 'आरक्षणामुळे' नावाची शक्यता चुक आहे काय ?
असे घडु शकत नाही काय ? तुम्ही अशी उदाहरणे पाहिली नाहीत काय ?
बाकी शिक्षणसंस्थात आणि अ-कुशल कामात 'आरक्षण असावेच' ह्या मागणीचा मी समर्थक आहे, मात्र त्या कुबड्या प्रमोशन आणि इतर फायद्यांसाठी वापरण्यासंबंधी आरक्षण आणणे हे मला पटत नाही.
- छोटा डॉन
7 Dec 2010 - 12:31 pm | नितिन थत्ते
>>मात्र त्या कुबड्या प्रमोशन आणि इतर फायद्यांसाठी वापरण्यासंबंधी आरक्षण आणणे हे मला पटत नाही
मलाही पटत नाही.
मी प्रश्न विचारण्याचे कारण १५ वर्षे हा फार लहान कालावधी नाही. कोणत्याही कंपनीत देखील १५ वर्षे अनुभव असलेले लोक २०-२० वर्षे अनुभव असलेल्यांचे बॉस असल्याचे आपण पाहतो. तेव्हा तो हेडक्लारक झाला तो केवळ आरक्षणामुळेच झाला की कसे हे तपासून पहायला हवे असे वाटते.
कंपॅरिझन ४-५ वर्षे आणि २०-२२ वर्षे अशी असती तर आरक्षणामुळेच हे मान्य केले असते.
7 Dec 2010 - 12:47 pm | छोटा डॉन
बहुतेक तपशीलात गोंधळ होतो आहे.
मुळ प्रतिसादात त्यांना 'सरकारी क्षेत्र ( की जेथे 'आरक्षण' असते )' अपेक्षित असावे असे वाटते, कारण सध्याही खासगी क्षेत्रात आरक्षण नाही त्यामुळे त्याचा फायदा घेऊन बढती मिळवण्याचा प्रश्नच नाही.
असो, सरकारी क्षेत्रात ( इथे सरकारी, निम-सरकारी, सरकारी अखत्यारीत येणार्या इत्यादी इत्यादी सेवा ) ही बाब सहज शक्य आहे असे वाटते.
खासगी क्षेत्रात मात्र असे घडेल किंवा नाही ह्यावर नक्की असे सांगता येणार नाही, तुम्ही म्हणता ते 'कोणत्याही कंपनीत देखील १५ वर्षे अनुभव असलेले लोक २०-२० वर्षे अनुभव असलेल्यांचे बॉस असल्याचे आपण पाहतो' हे उदाहरण योग्य आहे पण तितकेच 'चतुर्थश्रेणी कामगाराचे हेडक्लार्कच्या पोस्टपर्यंतचे ( किंवा हापिस बॉयचे प्रोजेक्ट मॅनेजर / डिलिव्हरी मॅनेजर ) प्रमोशन हे तितके सहज नजरेस पडणारे नाही असे मला वाटते, अर्थात अपवाद असु शकतो व सध्यातरी तो माझ्या पाहण्यात नाही. ट्रेनी म्हणुन जॉइन झालेला माणुस व्हाईस प्रेसिडेंट झालेला मी पाहिला आहे पण म्हणुन मशिनिस्ट किंवा हेल्पर बॉयला हे शक्य असेल असे वाटत नाही.
त्यामुळे मुळ प्रतिसादात त्यांना 'सरकारी क्षेत्र'च अपेक्षित असावे असे वाटते आणि तिथे असणार्या आक्षरण तसेच बढतीच्या इतर नियमांमुळे उपरोक्त बाब सहज शक्य आहे असे मी मानतो.
- छोटा डॉन
7 Dec 2010 - 12:51 pm | नितिन थत्ते
सरकारी क्षेत्रात आरक्षणामुळे शक्य आहे हे मान्यच आहे. फक्त ते तसेच आहे याची खात्री करून घेतली का? एवढाच मूळ प्रतिसादकाला प्रश्न आहे.
7 Dec 2010 - 1:06 pm | आदिजोशी
फक्त ते तसेच आहे याची खात्री करून घेतली का?
हा प्रकार सरकारी नोकरीतच घडलेला आहे. प्रमोशन मिळालेली व्यक्ती आणि हाताखाली काम करणारी व्यक्ती ह्या दोघांशीही माझी ओळख आहे. तसंच प्रमोशन मिळालेल्या व्यक्तीला केवळ जातीमुळेच ते मिळालं आहे ह्याचीही खात्री करून घेतली आहे. तसेच दोघांचेही शिक्षण समान असल्याचीही करून घेतली आहे. अजून काही शंका?
अवांतरः प्रमोशन मिळालेल्या व्यक्तीने खासगीत बोलताना ह्या प्रकाराचा उल्लेख "काय **गिरी आहे ही. ज्यांच्याकडून अकाउंटच्या एंट्री शिकलो आज त्यांनी बनवलेल्या फाईल्स तपासतोय." असा केला आहे. पण ही **गिरी असूनही ती नाकारली मात्र नाही. आहे की नाही आरक्षणाची गंमत :)
7 Dec 2010 - 1:08 pm | नितिन थत्ते
माहितीबद्दल धन्यवाद. शंका मिटली. :)
7 Dec 2010 - 1:13 pm | आदिजोशी
शंकानिरसन होण्याआधी मताची पिंक का टाकली जावी ही शंका आता मला आहे.
7 Dec 2010 - 1:35 pm | अवलिया
सवय ! ;)
7 Dec 2010 - 2:27 pm | नितिन थत्ते
मताची पिंक टाकली नव्हती. शंका विचारली होती.
स्वतःचे अपयश झाकण्यासाठी अवांतर कारणे सांगण्याची माणसांची प्रवृत्ती असते. खाजगी क्षेत्रात "साहेबाच्या पुढे पुढे करणे" हे कारण सांगितले जाते तसे सरकारी क्षेत्रात आरक्षण हे पटण्यासारखे कारण म्हणून वापरले जाऊ शकते म्हणून.
7 Dec 2010 - 2:34 pm | आदिजोशी
असहमत.
हे मत नाही काय?
7 Dec 2010 - 12:00 pm | आदिजोशी
आमच्या शाळेला सरकारची ग्रँट मिळाली म्हणून शिक्षकांची काही रिक्त पदे आरक्षणातून भरली गेली. नववी सारख्या महत्वाच्या वर्षात आम्हाला मराठी शिकवायला आलेले सर मराठीचा येता जाता मर्डर करत असत. प्रमाणित मराठी योग्य की अयोग्य ह्या वादात पडायचे नाही. पण मार्क्स मिळवण्यासाठी पुस्तकातील मराठीच पेपरात लिहावी लागते. पेपरात आनी, पानी लिहिलं की शुद्धलेखनाचे मार्क कापले जातात.
महत्वाचे म्हणजे हेच सर आम्हाला पि.टी.ला सुद्धा होते. आहे की नाही आरक्षणाची गंमत :)
7 Dec 2010 - 12:14 pm | नितिन थत्ते
शाळेच्या व्यवस्थापनाने मिस्चिफ केली असणे शक्य आहे.
7 Dec 2010 - 1:02 pm | बिपिन कार्यकर्ते
मान्य आहे. आमच्या शाळेनेही हीच मिस्चिफ केली होती. खात्री करून घेऊ शकता. ;)
अजून बर्याच शाळा ही मिस्चिफ करतात असेही ऐकून आहे. आजकाल तर ब्वॉ शाळाच मुलांपेक्षा खोडकर झाल्यात!!! ;)
7 Dec 2010 - 1:10 pm | आदिजोशी
हो ना बिका भाऊ. अनेक शाळा असा खोडकरपणा करतात. आणि मुलं पण पेपरात अशुद्ध लिहायचे सोडून शिक्षकांविरूद्ध तक्रार करतात. सगळाच खोडकरपणा आहे.
7 Dec 2010 - 1:11 pm | आदिजोशी
शाळेच्या व्यवस्थापनाने मिस्चिफ केली असणे शक्य आहे
भयानक विनोदी आणि विरोधासाठी विरोध म्हणून अविचारपूर्वक देण्यात आलेला एक भन्नाट प्रतिसाद
7 Dec 2010 - 1:35 pm | अवलिया
भयानक विनोदी आणि विरोधासाठी विरोध म्हणून अविचारपूर्वक देण्यात आलेला अजुन एक भन्नाट प्रतिसाद
7 Dec 2010 - 1:37 pm | बिपिन कार्यकर्ते
चुकून अतिविचारपूर्वक असे वाचले. ;)
7 Dec 2010 - 10:36 pm | आजानुकर्ण
मला वाटते, त्या शिक्षकांची कोअर कॉम्पिटन्सी मराठी असूनही शाळेच्या गरजेपोटी (पुरेशा शिक्षकांची अनुपलब्धता वगैरे) त्यांनी पीटी शिकवण्याचीही जबाबदारी स्वीकारली. याला टेकिंग इनिशिएटिव किंवा "कॉन्ट्रिब्युटिंग बियाँड स्कोप ऑफ वर्क" असे म्हणता येईल.
8 Dec 2010 - 10:26 am | आदिजोशी
त्या शिक्षकांची कोअर कॉम्पिटन्सी मराठीच होती पण ती मार्क मिळवून देणारी नव्हती. त्यांनी पिटी शिकवून शाळेवर उपकारच केले पण फक्त पिटी शिकवली असती तर विद्यार्थ्यांवरही उपकार झाले असते.
भोकनीच्या, आगं बोंबल की जोरानं काय मुळू मुळू बोलतियास, हानंन एक थोबाडात, इत्यादि गोड मराठी शब्द त्यांच्या तोंडून ऐकत ऐकत आमचं मराठी ज्ञानविश्व समॄद्ध झालं.
8 Dec 2010 - 10:41 am | मृत्युन्जय
भोकनीच्या, आगं बोंबल की जोरानं काय मुळू मुळू बोलतियास, हानंन एक थोबाडात, इत्यादि गोड मराठी शब्द त्यांच्या तोंडून ऐकत ऐकत आमचं मराठी ज्ञानविश्व समॄद्ध झालं.
ही सुद्धा मराठी भाषाच आहे. माझ्यामते अश्या भाषेतले एक दोन धडे प्रत्येक वर्षी मराठी भाषेत असतात देखील. तुम्ही पुण्या मुंबैकडचे झंटलमन लोकं उगाच गावाकडच्या भाषेला नावं ठेवता. खरे म्हणजे तिच खरी भाषा. ती भाषा जास्त लोक बोलतात. राहता राहिला परीक्षेत मार्क मिळवण्याचा प्रश्न तर तुम्ही शिकता ते मार्क मिळवण्यासाठी की ज्ञान मिळवण्यासाठी. खरे ज्ञान मिळत असेल तर मार्क कमी मिळाले तर बिघडले कुठे. आपण एवढे एक्झाम ओरिएंटेड का झालो आहोत?
शिवाय असे बघा कित्येक ओपन वाल्यांची मराठी पण अशुद्ध असते. उगाचा रिझर्वेशनला नावे का ठेवावीत.
शिवाय त्यांचा ऊद्धार करण्यासाठी काही लोकांना नौकरी मिळाली आणि त्यामुळे काही ओपन वाल्या लोकांच्या मुलांची भाषा बिघडली (बिघडली म्हणजे काय हाही एक प्रश्न आहेच) तर बिघडले कुठे. त्यांच्या पंखात बळ मिळावे म्हणुन तुम्हाला ४-२ काटे टोचले तर एवढे का विव्हळताय? आठवा तुमाच्या समाजाने त्यांच्यावर शतकोनुशतके केलेला अन्याय. आता त्यांची पाळी आहे. आता तुम्ही सहन करा. वावगे काय त्याच्यात?
शिवाय असे बघा वरती कोणितरी छान उपाय सांगितला आहेच. देश सोडुन जा. पल्याडला जास्त संधी आहेत. तुम्ही जर गुणवान असाल तर तिकडे संधी मिळतील. नसाल तर उगा कशाल बोंबा मारताय?
8 Dec 2010 - 4:12 pm | परिकथेतील राजकुमार
आमचे इतिहासाचे शिक्षक 'द ग्रेट मराठा' ह्या शिवाजी महाराजांच्या इंग्रजी धड्यातील दख्खनचा उच्चार कायम डेक्कन असा करायचे. आणि आम्ही देखील तो तसाच करावा असा त्यांना आग्रह असायचा :)
8 Dec 2010 - 4:25 pm | कानडाऊ योगेशु
ह्याबाबतच एक किस्सा ....
शिक्षक पाणी ला पानी म्हणाले आणि मुले हसली.
मुलांना का हसलात असे शिक्षकांनी विचारल्यावर मुले म्हणाली गुरुजी तुम्ही पानी म्हणालात पाणी नाही.
गुरुजी पुढे म्हणाले बाळांनो मी पानी म्हणालो नाही मी पाSSनी म्हणालो.
8 Dec 2010 - 4:59 pm | आदिजोशी
हान् तिज्यायला
7 Dec 2010 - 1:43 pm | अन्जन
प्रशन अर्धवट वाटतो, तो असा असावा, आंबेडकरांनी फक्त दहा वर्ष आरक्षण सांगितले होते पण नंतरच्या नेत्यांनी मत मिळवण्याच्या आशेने आत्तापर्यंत तेच चालू ठेवले आहे तो का? त्यात आताच्या इतर समाजातिल नविन पिडिचा काय दोष आहे काय?
7 Dec 2010 - 8:35 pm | तिमा
आधी कुणीतरी मला 'भीम' आणि 'भिम' या दोन व्यक्ति होत्या का एकाच व्यक्तिची दोन नांवे आहेत हे सांगावे, त्यानंतर आरक्षणाबद्दल बोलता येईल.
7 Dec 2010 - 10:22 pm | आजानुकर्ण
आरक्षण व्यवस्थेतून (बापाच्या जातीचा फायदा घेऊन) शिकून आलेले मागासवर्गीय लोक गुणवत्ताधारक नसतात आणि खुल्या प्रवर्गातील (बापाने भरलेल्या भरपूर पैशाने मिळालेल्या पेमेंट सीटवरून) शिकून आलेले लोक गुणवान असतात असा अनेकांचा सोयीस्कर गैरसमज दिसत आहे. कोणीही पेमेंट सीट स्वरूपातील आर्थिक आरक्षणाचा उल्लेखही केलेला नाही यावरून हा निष्कर्ष मी काढला आहे.
असो.
मागासवर्गीय लोक गुणवान नसतात याबाबत कोणतेही पुरावे किंवा आकडेवारी उपलब्ध नाही. खुल्या प्रवर्गातील मुलांना जी परीक्षा द्यावी लागते तीच मागासवर्गीयांना द्यावी लागते. दोघांचे पेपर तपासणारे शिक्षक एकच असतात. त्यामुळे गुणवत्तेचा मुद्दा अग्राह्य धरावा.
यात भयानक काय आहे? चतूर्थ हा अशुद्ध शब्दच जास्त भयानक वाटला.
आम्हाला देशपांडे आडनावाचे एक सर होते त्यांनी मर्ढेकरांची 'प्रेमाचे लव्हाळे' ही कविता शिकवताना लव्हाळे या शब्दाचा अर्थ 'लव्ह + आळे' असा सांगितला होता. या उदाहरणावरून सर्व देशपांडे गुणवान नसतात असा निष्कर्ष मी काढला नाही.
थोडक्यात anecdotal पुरावे हवे तेवढे देता येतील. महाराष्ट्र - (कोल्हापूर वगैरे) व दक्षिण भारतात (म्हैसूर राज्य) इंग्रजांच्या काळापासूनच शिक्षणासाठी आरक्षण आहे. त्यामुळे सामाजिक प्रगती व एकंदर विकासास हातभार लागला आहे.
बाकी चालू द्या.
7 Dec 2010 - 10:31 pm | शैलेन्द्र
+१
8 Dec 2010 - 12:43 am | हुप्प्या
कुणी स्वतःच्या कमाईचे पैसे खर्चून पेमेंट सीट मिळवली तर त्याला जातीवर आधारित आरक्षणाच्या पंक्तीत बसवणे अत्यंत तर्कदुष्ट आहे. शिक्षणाला खर्च येतो. शिक्षकांचे पगार, वर्गातील सोयी, प्रयोगशाळेतील उपकरणे, पुस्तके, फळे, खडू सगळे काही पैशानेच विकत मिळते. पेमेंटवाल्या सीटमुळे एक मोठी रक्कम शिक्षण संस्थेला मिळते आणि ती चालवण्याकरता सरकारकडे तोंड वेंगाडावे लागत नाही.
मला वाटते आपल्या देशाला जे समाजवादी बाळकडू मिळाले आहे त्यामुळे कुणी पैसेवाला असेल तर त्याला नाक मुरडणे हा एक स्थायीभाव बनला आहे. सगळेच काही पैसेवाले दुसर्यांचे गळे वा खिसे कापून गब्बर होत नाहीत ( ह्या वाक्याला शिंपी लोकांनी माफ करावे). अपार कष्ट, बुद्धी, प्रतिभा अशा गोष्टी वापरुनही लोक श्रीमंत होतात. आणि आपल्या मुलाच्या शिक्षणाकरता स्वतःचाच पैसा जास्त प्रमाणात खर्च करणे कमीपणाचे का समजले जावे?
जातीवर आधारित आरक्षणामुळे असे काही होत नाही. शिक्षणाचा खर्च काही अचानक कमी होत नाही.
प्रवेश मिळाल्यावर (बहुधा) सगळ्यांना सारख्याच परीक्षा द्याव्या लागतात. त्यामुळे त्यानंतर जे काही बरेवाईट होणार ते त्या विद्यार्थ्याच्या हातात.
8 Dec 2010 - 5:50 am | पंगा
बाकीचे मुद्दे पटण्यासारखे आहेत, पण...
पेमेंट सीटची (आर्थिक) आरक्षणाशी तुलना तितकीशी सयुक्तिक वाटली नाही.
शिक्षण ही बाजारातील एक कमॉडिटी आहे अशा दृष्टीने विचार करू. म्हणजे मागणीपुरवठा तत्त्वानुसार मूल्यनिश्चिती, ज्याला परवडेल त्याने घ्यावे, ज्याला परवडणार नाही त्याने घेऊ नये, वगैरे वगैरे. (गुणवत्ता, बारावीचे मार्क वगैरेंचा विचार केलेला नाही. एक म्हणजे बारावीचे मार्क आणि गुणवत्ता / पात्रता यांचा अर्थाअर्थी काही थेट संबंध असतोच, याबद्दल साशंक आहे, आणि दुसरे म्हणजे समजा असलाच, किंवा अन्य प्रकारे गुणवत्ता असली, तर त्याचा उपयोग फारफार तर पुढील शिक्षणाशी अधिक सुलभतेने cope up करण्यासाठी त्या विद्यार्थ्यास होऊही शकेल, पण तो त्या विद्यार्थ्याचा खाजगी मामला आहे. कमॉडिटीविश्वात आपल्याला त्याचा विचार करण्याची गरज नाही, आणि प्रवेशासाठी निकष म्हणून तर त्याच्याशी काहीच घेणेदेणे नाही. कोणीही यावे आणि खुल्या बाजारातून शिक्षण विकत घ्यावे, परवडत असेल तर उत्तम, नाही तर टफ लक - पण मूल्य हे मागणीपुरवठा तत्त्वावरच राहील. वगैरे वगैरे.)
या दृष्टिकोनातून पाहिल्यास पेमेंट सीट हा वास्तविक खुला प्रवर्ग (कदाचित एकमेव खुला प्रवर्ग) ठरावा, आणि उलट (थत्त्यांनी वर म्हटल्याप्रमाणे) नॉन-पेमेंट सीट (सरकारी किंवा खाजगी, तथाकथित 'आरक्षित' किंवा तथाकथित 'खुला प्रवर्ग') या सर्वच 'आरक्षण क्याटेगरी'त मोडाव्यात.
(खाजगी कॉलेजांतील 'पेमेंट सीट'च्या बाबतीत खाजगी कॉलेजची जबरदस्त फी - जी खाजगी कॉलेजांत प्रवेश घेऊ पाहणार्या सर्वांनाच द्यावी लागते - ही तर असतेच, शिवाय कॉलेजला देणगी हाही प्रकार असतो, अशी माझी समजूत आहे - चूभूद्याघ्या. म्हणजे खाजगी कॉलेजांत नॉन-पेमेंट सीटसाठीसुद्धा सबसिडीचा प्रश्न येणार नाही असा याला आक्षेप घेता येईल. हरकत नाही. पेमेंट सीट ही बाजाराच्या तत्त्वानुसार 'टू द हायेस्ट बिडर' विक्री आहे हे लक्षात घेता, हा खुल्या बाजाराचा, आणि म्हणूनच 'खुल्या प्रवर्गा'चा प्रकार मानता यावा, असे वाटते. उलटपक्षी तथाकथित 'आरक्षित' जागांबरोबरच तथाकथित 'खुल्या प्रवर्गा'तील जागा - खाजगी अथवा सब्सिडाइज़्ड - या तथाकथित 'गुणवत्ते'साठी - म्हणजे बारावीच्या मार्कांसाठी वगैरे - जरा कमी पैसे देऊ शकणार्यांसाठी आरक्षित जागा म्हणता येतील.)
मुळात शिक्षण - त्यातसुद्धा खास करून उच्चशिक्षण - ही एक कमॉडिटी न मानता (१) एक मूलभूत मानवी हक्क, किंवा (२) गुणवंतांची मक्तेदारी/हक्क यांपैकी काहीही (किंवा दोन्ही) मानण्यातून हा सगळा गोंधळ आहे. मुळात शिक्षण हा कोणाचाही हक्क का असावा? त्यातसुद्धा एखादा गुणवंत आहे म्हणून त्यास काहीही करून संधी उपलब्ध करून दिलीच पाहिजे, याला काय आधार आहे? जमत असेल, परवडत असेल तर त्याने शिक्षण घ्यावे, नाही तर स्वतःच्या उन्नतीचा अन्य काही मार्ग शोधावा! कोणीही कोणालाही चरितार्थ देणे लागत नाही, सरकार तर नाहीच नाही. आणि सरकारने (स्वस्त दरात) सार्वजनिक शिक्षणाच्या धंद्यात का असावे?
नाही, यातून सरकारी सब्सिडाइज़्ड शिक्षणास विरोध करण्याचा उद्देश नाही, वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजनांनाही विरोध करायचा नाही आणि आरक्षणाला तर मुळीच विरोध करायचा नाही. शिक्षण हे जितक्या जास्त जणांपर्यंत जितके अधिक पोहोचेल तितके ते समाजाच्या फायद्याचेच आहे, आणि म्हणून त्या उद्देशाने जे जे काही करता येईल किंवा केले जाईल ते ते स्वागतार्हच आहे. मात्र हे सर्व करायचे ते त्यातून समाजाचा अंततः फायदा होतो म्हणून स्वागतार्ह आहे; कोणाचा 'मूलभूत हक्क' आहे, किंवा कोणाची 'पात्रता' (आणि म्हणूनच अप्रत्यक्ष मक्तेदारी) आहे, म्हणून नव्हे, एवढेच मांडायचे आहे.
सहमत.
शुद्धलेखन, व्याकरण किंवा तर्क ही कोण्या एकाच वर्गाची मक्तेदारी नाही. उलटपक्षी, शुद्धलेखनाचा मुडदा, व्याकरणावर बलात्कार किंवा तर्काशी फारकत हीदेखील कोण्या एकाच वर्गाची मक्तेदारी नाही.
पण लक्षात कोण घेतो?
8 Dec 2010 - 7:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पंगा, तुमच्या बहुतेक सर्वच मुद्द्यांशी सहमत आहे.
इथे कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो. अजूनही आपल्या देशात अभियांत्रिकी क्षेत्र फार जास्त पुढारलेलं आहे असं म्हणवत नाही. (माझं म्हणणं खोटं असेल तर आनंदच आहे.) अशा वेळी देशात चांगले इंजिनियर (फक्त इंजिनियरच का, डॉक्टर, सर्वच क्षेत्रातले संशोधक, इ.इ.) तयार झाले पाहिजेत आणि ते भारतातच राहिले पाहिजेत आणि त्यांना चांगल्या संधी मिळाल्या पाहिजेत ....
अभियांत्रिकी शिक्षणाला फक्त कमॉडीटी म्हणावं अशी आपल्या देशाची आज स्थिती आहे काय? पण हा प्रश्न सदर धाग्यात कदाचित अवांतर ठरावा.
8 Dec 2010 - 10:35 am | आदिजोशी
मागासवर्गीय लोक गुणवान नसतात याबाबत कोणतेही पुरावे किंवा आकडेवारी उपलब्ध नाही.
असं मी कुठेही म्हटलेलं नाही. मी त्या उदाहरणा संबंधात बोलत होतो. उगाच वादासाठी जनरलायझेशन नको.
खुल्या प्रवर्गातील मुलांना जी परीक्षा द्यावी लागते तीच मागासवर्गीयांना द्यावी लागते. दोघांचे पेपर तपासणारे शिक्षक एकच असतात. त्यामुळे गुणवत्तेचा मुद्दा अग्राह्य धरावा.
खरंय. पण खरी मजा गुण मिळाल्यावर येते. एकाला ८५% मिळूनही प्रवेश नाही आणि दुसर्याला ५०% मिळाले तरी आनंदाने प्रवेश. इथे प्रॉब्लेम आहे. जो आरक्षण घेतो तो खरंच मागासलेला असेल तर काहीच हरकत नाही. पण आर्थिक दृष्ट्या सबल वर्गातली मंडळी जेव्हा केवळ जात वेगळी म्हणून वेगळा सवलती मिळवतात तेव्हा त्रास होतो.
8 Dec 2010 - 4:35 am | शुचि
कालच मी दोन चिमणे पाहीले. एक चिमणा जिथे टिपत होता तिथेच दुसर्याला टिपायचं होतं. बाकी ठीकाणी रान मोकळं होतं पण हे दोघं एकमेकांचं अन्नच टिपायच्या मागे लागले होते.
मला हे कळत नाही आता जगभर मुबलक संधी उपलब्ध झाल्या असताना आपल्या देशातल्या आरक्षणांसाठीच भांडण्यात काय अर्थ आहे? मूव्ह ऑन!!!!
__
काही चुकतय का माझं?
8 Dec 2010 - 11:15 am | बेसनलाडू
दोन चिमणे 'एकमेकांचं' अन्न टिपायच्या मागे लागले होते, असे निश्चित म्हणता येणार नाही. मुळात जे अन्न आहे ते 'फक्त' माझ्यासाठीच असा दोहोंपैकी कोणत्याही चिमण्याचा समज झाल्यास तो चुकीचाच आहे. ते सर्व चिमण्यांसाठी आहे. दुसरे म्हणजे समजा दुसर्या चिमण्याला हवे असणारे अन्न अशा रानात आहे जेथे जाण्यासाठी त्याला ठराविक बँक बॅलन्स, व्हिजादी सोपस्कार, स्थलांतरादी कर्मे इ. आवश्यक (मॅन्डेटरी या अर्थाने) ठरणार आहे नि यांपैकी एक किंवा अनेक काही कारणांनी शक्य होणारे नाही; मग त्यावेळी सध्याच्याच रानात असलेले अन्न टिपायचे प्रयत्न त्याने केले तर त्याचे काय चुकले?
पण दुसर्या रानात जाऊन दाणे टिपणे 'सहज' शक्य असलेला पहिला चिमणा जर या रानात दाणे टिपत असेल, तर या दुसर्या चिमण्याचा तळतळाट अस्थानीही मानता येणार नाहीसे वाटते. मला वाटते देशातील आरक्षणाबद्दल अशीच काहीशी परिस्थिती असावी.
(पक्षीप्रेमी)बेसनलाडू
भारतातील ठराविक संधीसाठी स्पर्धा करणारे - एक खुल्या प्रवर्गातील नि दुसरा आरक्षित वर्गातील - भारताबाहेर कोणत्याही स्वरूपाच्या आरक्षणासाठी पात्र ठरत नसले (विशेषतः जातीवर आधारीत) तरीही नागरिकत्त्व आणि त्यायोगे मिळणार्या सवलतींचा लाभही ते घेऊ शकत नाही. ज्या संधी केवळ त्या त्या देशांतील नागरिकांसाठी किंवा कायमस्वरूपी राहणार्यांसाठी 'राखीव' आहेत, तेथे हे दोघेही स्पर्धा करू शकत नाहीत. त्यामुळे मूलतःच देशातील उपलब्ध संधी आणि इतरत्र (पक्षी देशाबाहेरच्या) उपलब्ध असलेल्या (जागतिकीकरण किंवा अन्य कारणांनी) संधी यांचा विचार समान पातळीवर करण्यात अर्थ नाही.
(जागतिक)बेसनलाडू
8 Dec 2010 - 5:09 am | उपास
माफी करा पण हे ब्रेड नाही तर केक खा सांगण्यासारखे नाही का? अहो त्यातला एक चिमणा अशक्त आहे त्याच मनोबल खच्ची झालय इतक्या दशकांत.. त्याला उडण्यासाठी पंखात बळ नको का द्यायला.. त्याची शैक्षणिक, सामाजिक प्रगती नको का बघायला एकूण चिमण्यांची प्रगती व्हायला हवी असेल तर?
- (चिमणा) उपास
8 Dec 2010 - 6:14 am | पंगा
मला वाटते त्यांना नेमके उलट म्हणायचे असावे.
म्हणजे ज्यांना केक मिळू शकतो त्यांनी केकच्या मागे (हिरव्या कुरणांकडे?) "मूव्ह ऑन" व्हावे, (आधीच तुटपुंज्या असलेल्या) ब्रेडसाठी रडत बसू नये. ब्रेडचे वाटेकरीही कमी होतील, आणि केकमागल्यांनाही समाधान मिळेल.
पुढेमागे ब्रेडमागल्यांच्या पंखात बळ आले की तेही केकमागे धावतील, वगैरे वगैरे. पण सगळ्यांनी त्याच तुटपुंज्या ब्रेडसाठी भांडण्यात काय हशील आहे?
(अवांतरः 'आरक्षणामुळे आमची जागा गेली' हे रडणे तितकेसे पटत नाही. एक म्हणजे कमी जागांसाठी स्पर्धा इतकी प्रचंड आहे, की जर जागा मिळाली नसेल, तर ती आरक्षण नसते तर नक्की मिळाली असती, या म्हणण्याला काहीही आधार नाही. बहुधा तरीही मिळाली नसतीच. दुसरे म्हणजे इतर संधी उपलब्ध नाहीत असेही नाही. मात्र त्यांचा उपयोग करण्याची (मानसिक) लवचिकता पाहिजे. जगातील - किंवा गेला बाजार भारतातील - सर्वांनी इंजिनियर, डॉक्टर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर झालेच पाहिजे, आणि न झाल्यास जग बुडाले, असे काहीही नाही. डोळे उघडे ठेवल्यास संधी सहसा कोठे ना कोठे सापडते, ब्रेड मिळतो, कधीकधी केकही मिळू शकतो. जी मिळेल ती संधी घेण्याची आणि तिचा उपयोग करून घेण्याची मानसिकता मात्र पाहिजे.)
थोडक्यात, 'आरक्षणाविरुद्ध बोंब मारत बसणे हे डिफीटिस्ट मनोवृत्तीचे लक्षण आणि काउंटरप्रॉडक्टिव आहे' असे त्यांना म्हणायचे असावे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
8 Dec 2010 - 6:21 am | उपास
छान.. असेच असावे.. पटलेच. :) काय लोभस चित्र आहे! सशक्त चिमणे केक पाठी (पक्षी: अमेरिका) उडताहेत तर विकसनशील चिमणे तेथेच (भारतात) ब्रेड खात बागडतायत... जो जे वांच्छील तो ते लाहो!
8 Dec 2010 - 6:28 am | शुचि
नाही मला काय वाटतं - लेट मी ट्राय. एक तर विचार शब्दांत मांडता येत नाहीत मला.
___
बरोबर - पण हेच :) ....... जेव्हा मोठ्ठा दगड समोर येतो तेव्हा २ च पर्याय असतात त्या दगडावर डोकं फोडणे अथवा वळसा घालून मूव्ह ऑन!!!!!
8 Dec 2010 - 6:40 am | उपास
शुचि, २ पेक्षा अधिक पर्याय खचितच असू शकतात की.. म्हणजे दगडातून मूर्ती बनविणे.. किंवा दगड रस्त्यात असेल तर तो (एकट्याने जमत नसेल तर चार जणांनी मिळून) बाजूला करणे किंवा तेही शक्य नसेल तर वळसा घालून पुढे गेल्यावर, तो दगड तिथे आहे त्याच काही तरी करायला हवं अशी संवेदनशीलता ठेवून, जबाबदारीचे भान ठेवून त्याप्रमाणे विचार आणि कृती करायला हवी.. त्यामुळेच विश्वास आणि आनंदाचे वातावरण निर्माण होऊन समाज प्रगतिमान होईल.. मुव्ह ऑन पण डोंट रन अवे :)
8 Dec 2010 - 7:02 am | पंगा
एक म्हणजे आजकाल अमेरिकेत केक तितकासा उरलेला नाही. (दुरून डोंगर साजरे म्हणतात, पण) त्या मानाने आजकाल भारतात (निदान काही क्षेत्रांत तरी) केक मिळण्याची शक्यता त्या मानाने बरी असावी, असे वाटते.
पण ते जाऊ द्या.
केक म्हणजे अमेरिकाच असायला पाहिजे, असे काही नाही. केक कोठेही असू शकतो - भारतातसुद्धा. आणि केक ज्याला दिसू शकतो, जेथे कोठे दिसू शकतो, आणि मिळवता येतो, त्याने अशा केकमागे जाण्यात काहीही गैर नाही. (मात्र केक दिसावा लागतो.)
दुसरे म्हणजे, केकमागेच धावले पाहिजे, असेही नाही. दुसरा ब्रेड दिसत असेल तर त्यामागेही धावण्यास हरकत नसावी. एकाच तुटपुंज्या ब्रेडसाठी सगळ्यांनी झगडण्यात, आणि मग 'त्याने माझा ब्रेड हिसकावला' म्हणून रडण्यात काय हशील आहे? जरा इतरत्रही बघावे - डोळे उघडे असले तर ब्रेड कोठे ना कोठे सापडावाच. 'तो ब्रेड आहे' हे ओळखण्याची नजर मात्र पाहिजे.
8 Dec 2010 - 7:41 am | नरेशकुमार
जौद्या, उगा झगडु नका,
ब्रेड आनि केक हलका घ्या.
8 Dec 2010 - 7:48 pm | उपास
पंगा, तुमच्या आणि शुचिच्या मताशी सहमत आहेच.. केक खाण्यात आणि आपला मार्ग आपण शोधण्यात गैर नाहीच उलट चांगलेच, पण माझे म्हणणे इतकेच की केक खाताना जे ब्रेड खातायत त्यांच्या बद्दल संवेदनशीलता बाळगून त्यांच्या पंखात बळ कसे येईल हे पहायलाच हवे इतकच. दुसरीकडे उडून जाऊन आपल्या सामाजिक जबाबदारीकडे दुर्लक्ष होता कामा नये असे वाटते, अमेरिकेचे एक सर्वमान्य उदाहरण (गेल्या १० वर्षांचा [१० महिन्यांचा नाही] पक्षांचा प्रवाह बघता)म्हणून दिले बाकी ब्रेड/ केक शोधक नजर पाहिजे हे तर खरेच..
आरक्षणाच्या संदर्भात, जोपर्यंत मनापासून दोन स्तर एक मेकांजवळ येत नाहीत तोपर्यंत आरक्षण हा पर्याय अपरिहार्य वाटतो, त्याला नेमकी अमुकेक (उदा. दहा)वर्षे असं ठेवता येण म्हणूनच कठीण आहे.
9 Dec 2010 - 5:04 pm | पंगा
आरक्षणाचा हेतू, स्कोप इ. दोन स्तरांना मनापासून एकमेकांजवळ आणणे हा नसून, विकासाच्या पातळीवर एकमेकांजवळ आणणे हा आहे, असे वाटते.
मानसिक दरी, इतिहासात काय घडले वगैरे बाबींचा आरक्षणाशी, आरक्षणाच्या हेतूशी काहीही संबंध नाही. विकासाची पातळी असमान आहे याच्याशी निश्चित आहे. (मानसिक दरी, इतिहासात काय घडले वगैरे पूर्णपणे वेगळे मुद्दे आहेत. त्याचा आरक्षणाशी काहीही संबंध नाही.)
विकासाची पातळी समान व्हायला जो काही वेळ लागेल तो लागेल. त्याला कालमर्यादा लावता येणार नाहीच. आणि त्यासाठी जेवढा वेळ आरक्षणासारख्या योजनांची गरज भासेल, तोवर त्या राबवणे इष्टच आहे. त्यात काहीही गैर नाही.
मात्र त्यात इतर मुद्द्यांची सरमिसळ करणे काउंटरप्रॉडक्टिव ठरेल.
8 Dec 2010 - 10:31 am | नितिन थत्ते
>>(अवांतरः 'आरक्षणामुळे आमची जागा गेली' हे रडणे तितकेसे पटत नाही. एक म्हणजे कमी जागांसाठी स्पर्धा इतकी प्रचंड आहे, की जर जागा मिळाली नसेल, तर ती आरक्षण नसते तर नक्की मिळाली असती, या म्हणण्याला काहीही आधार नाही. बहुधा तरीही मिळाली नसतीच.
स्वानुभवावरून सहमत आहे.
माझा गेट स्कोअर ७६
माझ्या मित्राचा ५५
मला एमटेकसाठी प्रवेश मिळाला नाही. त्याला मिळाली. प्रथमदर्शनी मत- आरक्षणामुळे मला प्रवेश नाही.
आरक्षण नसते तरी मला प्रवेश मिळालाच नाही. लिस्टमधला माझा क्रमांक एकूण जागांच्या जवळपासही नव्हता.
नंतर तो "सर्व विद्यार्थ्यांसाठी समान असलेले आय आय टी-एम टेकचे शिक्षण" घेऊन आणि "सर्वांना समान असलेली परीक्षा" देऊन एमटेक झाला.
8 Dec 2010 - 12:02 pm | गवि
वरील सर्व चर्चेत बर्याच जणांना "आरक्षण असलं म्हणून काय झालं? इतर संधी आहेतच आणि त्या शोधल्या पाहिजेत, हिंमत पाहिजे, मूव्ह ऑन.." असं वाटतंय हा त्यांच्या कर्तबगारीचा आणि उमदेपणाचा पुरावाच आहे.
मूळ प्रश्न होता (जसाच्या तसा):
मग आरक्षणाच्या ऐवजी दलित समान संधीच का मागत नाहीत? ते तर बाजूलाच पण आता मराठा समजही आरक्षण मागू लागला आहे....अशाने काय होणार?
आणि आरक्षण मागून स्वतःच आपल्यात काहीतरी कमी आहे अन बाकीचे आपल्यापेक्षा उच्च आहेत हेच नाही का कबुल करत?
मला वाटतं यातून बहुधा असे समानार्थी प्रश्न निघत होते की:
"आरक्षण असावं का?", "योग्य आहे का?","ठराविक जातीचे म्हणून किंवा ठराविक वर्गात जन्माने आहोत म्हणून काही सवलती मिळाव्यात आणि इतरांना त्याच कारणाने (ठराविक जातीचे म्हणून किंवा ठराविक वर्गात जन्मान) त्या मिळू नयेत हा न्याय करण्याचा बेसिस योग्य आहे का?"
सूडगत न्याय हा प्रकार (तू माझी गाय मारली म्हणून मी तुझी गाय मारतो.. किंवा तुझ्या बापाने माझ्या बापाच्या घरी चोरी केली म्हणून मी तुझ्या घरी करणार आणि तीही कायद्याने) भारतीय दंडसंहितेत तरी अग्राह्य आहे हे सर्वांनाच कबूल असेल.
मग आताच्या चालू चर्चेचा रोख पाहून, चर्चा ही "मुळात आरक्षण आहेच" हे गृहित धरून मग त्याचं प्रमाणच कसं कमी आहे, इतर काय काय उपाय करुन "अनारक्षित" वर्गाने स्वतःचे समाधान करावे किंवा मार्ग काढावा , किंवा अशीही त्यांना ती संधी मिळालीच नसती, आरक्षणामुळे नाही काही गेली ती संधी, मुळुमुळू रडत बसू नका, आपले भविष्य आपण घडवू. वगैरे या वळणावर कशाला?
मग ती वेगळीच चर्चा होईल ना : विषय" आरक्षणाला कसे स्वीकाराल / तोंड द्याल"
कसे? :)
8 Dec 2010 - 2:55 pm | मधुकर
आरक्षणामुळे मागच्या ५०-६० वर्षात दलित समाजाचा बराच विकास झाला. पण दलित समाजाची लोक संख्या पाहता मिळणारं आरक्षण फारच कमी आहे. दलिताना मुख्य प्रवाहात सामावुन घेणे देशाच्या हिताचं काम आहे. काहि बामणाना देशाचं हित नको आहे. म्हणुन ते दलितांच्या विकासाचे मार्ग बंद करण्याच्या मार्गाने प्रयत्नशिल असतात.
या देशाचं नुकसान करणारा समाज म्हणजेच ब्राह्मणी समाज ज्यानी दलितांची, मागासलेल्या वर्गाची निर्मीती करुन एका संपन्न देशाला देशो धडिला लावलं, ते परत आरक्षण बंदिचा कट रचुन परत एकदा देशाला अंधारात नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
देशातील बहुसंख्य समाज हा दलित समाज आहे, आणि ज्या देशाचा एक मोठा समाज मागासलेला असेल तो देश पुढे जाणार नाही हे उघड आहे. ईथे आर्थिक निकषाला पुढे करुन संवर्णाना मलाई वाढण्याचा कावा दिसतोय. हे संवर्ण इन मिन ३% आहेत. या बामणानातिल जवळपास सगळेच संपन्न आहेत. समजा संपुर्ण ३% बामण भिकेला लागले असे जरी गृहित धरले तरी देशाच्या प्रगतीवर काहिच बाधा येणार नाही. मग उगीच या तिन मधिल काहिना आर्थिक निकषावर का म्हणुन आरक्षण दयावे. पण दलित, बहुजन समाज जो देशातील बहुसंख्य समाज आहे त्यांचा विकास महत्वाचा आहे. किंवा हा समाज मागे राहिला तर त्या मुळे येणारं परिणाम हे मोठ्या प्रमाणत असेल. आणि हा परिणाम देशाचं नुकसान करेल. अगदी याच्या उलट ३% वाल्यांचा परिणाम आला तरी तो जाणवणार नाही.
म्हणुन कुठल्याच किमतीत आर्थिक निकषाला पुढे करुन इतराना आरक्षण देऊ नये. कारण या इतरांमुळे देशाच्या कुढल्याच घटकावर फारसा प्रभाव पडणार नाही.
पण बहुजन समाज मागे राहिला तर सगळ्याच घटकांवर प्रभाव पडेल आणि परत देशाचं (जो आता कुढे सावरायल लागला) वाट्टोळं होईल.
8 Dec 2010 - 3:37 pm | मृत्युन्जय
आपण बामण शब्दाऐवजी ब्राह्मण असा योग्य शब्द वापरलात तर आख्या समाजावर उपकार होतील. बामण हा शब्द जसा ब्राह्मणांना हिणवण्यासाठी वापरला जातो तसाच तो इतर जातींना हिणवण्यासाठी देखील वापरला जातो. या शब्दाचा उगम बा + म्हण या दोन शब्दांत आहे. म्हणजे जो आपला बाप म्हणण्यासारखा असतो तो बामण.
शब्द कुठल्याही अर्थाने वापरला गेला तरी तो हिणकस जातिवाचक शब्द आहे आणि त्यामुळेच अयोग्य आहे. आपण आपला प्रतिसाद संपादित करुन योग्य त्या सुधारणा केल्या तर बरे होइल.
8 Dec 2010 - 4:01 pm | टारझन
बा आणि ब्रा मधे खुप फरक असल्यामुळे ब्राम्हण हाच शब्द योग्य वाटतो असे सुचवु इच्छितो .
8 Dec 2010 - 5:36 pm | मृत्युन्जय
तुम्ही बा च्या जागी ब्रा घालता हे वाचुन बरे वाटले.
8 Dec 2010 - 7:20 pm | टारझन
आम्ही घातल्यावर आपल्याला बरे वाटते हे पाहुन डॉळा पाणावला.
8 Dec 2010 - 2:53 pm | गणेशा
आरक्षण ही समाजाला लागलेली कीड आहे ..
बाबासाहेबांनी घेतलेली निर्णय योग्य होता .. कालावधी ठरवुन घेतलेले आरक्षण योग्य होते ..
परंतु राजकारणं करुन तसेच जे आरक्षण उपभोगत आहेत त्यांनाच या गोष्टीची पर्वा नाहीये ... त्यांनाच या महामाणवाचे शब्द आठवत नाही .. तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते ?
मराठा समाज आरक्षण मागत आहे .. हे मान्य असले तरी सगळ्या मराठ्यांना आरक्षण नको आहे.
आरक्षण मागणार्यांनी सर्वांची मते गृहीत कशी धरली हेच कळत नाही .
एक मराठा असुनही मला ह्या असल्या लोकांची घ्रूणा आहे.. स्वताच्या भल्यासाठी .. स्वताला मोठे करण्यासाठी आपल्या
जातील लोक कसे उपेक्षित रहात आहे हे चित्र दाखवुन हे स्वताला बाबासाहेब समजु लागले आहेत असे वाटते ..
सामान्य माणुस आदराने जगु इच्छितो ..
मात्र धर्मांद माणसे अआणि राजकारणी यांनीच .. ब्राम्हण कसा श्रेष्ठ .. मराठा कसा मोठा .. दलीत कसे पिडीत .. हे अमके अआणि तमके .. असले प्रश्न निर्माण केले आहेत ..
वाईट वाटते .. पण काहीच करु शकत नाही . ह्याचा खेद आहेच .. पण कोठे अश्या चर्चा झाल्याकी माझे म्हणने कसे बरोबर ह्यावर्च भांडन होताना पाहिले आहे .. ते ही वाईटच ..
माणसाने माणुस म्हणुन जगावे असे खुप वाटते .. पण जणावरांना कीतीही घरात घेतले तरी ते आपली तंगडी वर करणारच ..
काय करणार .. सवय ही अशीच असते ..
8 Dec 2010 - 3:58 pm | मधुकर
मृत्युंजय,
तुम्ही तुमचा अर्थ घ्यावा, मी माझा घेतो.
आणि माझा अर्थ असा आहे.
ब्राह्मण = एक जात.
बामण= जातियवादी म्हणुन संबोधताना वापरण्यात येणारा शब्द.
काय आहे, बामणानी भुतकाळात ईतकी पापं केलीत ना, की त्याचे परिणाम उभ्या देशाला भोगावे लागत आहेत. त्यानी हे सगळं केलं नसतं तर आज सगळे समान असेत, म्हणजे आरक्षणाची गरजच पडली नसती.
आता काहिजण असा युक्तिवाद करतील की, त्यांच्या नावाने आजुन किती दिवस खडे फोडणार? पण त्यावर मला असे म्हणायचे आहे की, ठिक आहे मग तुम्ही आरक्षणाच्या नावाने खडे फोडु नका.
बामणी व्यवस्थासुद्धा त्यांच्या समाजाला फायदा पोहचविण्याच्या हेतुने (वाईट मार्गाने ) काम करत होती (आणि संधी मिळाली तर आजही तसेच वागेल). जर त्यावर बोलायचे नको तर मग आरक्षण ( जो चांगल्या हेतुने) राबविल्या जाते त्यावर बोट उचलण्याचेही कारण नाही.
काही नाही, बहुजनांचा विकास डोळ्यात खुपतं, आजुन काय नाही.
8 Dec 2010 - 4:24 pm | परिकथेतील राजकुमार
वाह बामणांना निदान भुतकाळ तरी होता हे एकुन आनंद झाला :) विशेषतः ज्यांना भुतकाळच काय तर वर्तमान देखील मान्य न्हवता म्हणुन ज्यांनी धर्म बदलला त्यांच्या तोंडुन तर हे ऐकुन अजुन आनंद झाला.
एखाद्या जातीच्या नावाने इतक्या खालच्या दर्जाला जाउन टिका होत असताना देखील संपादक शांत आहेत हे बघुन आश्चर्य वाटले. हिच टिका 'बामणेतरांवर' अथवा इतर धर्मावर असती तर आतापर्यंत बर्याच कारवाया झाल्या असत्या :)
असो....
8 Dec 2010 - 5:41 pm | अवलिया
>>>>एखाद्या जातीच्या नावाने इतक्या खालच्या दर्जाला जाउन टिका होत असताना देखील संपादक शांत आहेत हे बघुन आश्चर्य वाटले. हिच टिका 'बामणेतरांवर' अथवा इतर धर्मावर असती तर आतापर्यंत बर्याच कारवाया झाल्या असत्या
चालायचेच. असो. ज्याची त्याची जाण समज अक्कल हेतु इत्यादी... पण असो... शांतता ठेवायची आहे आपल्याला आणि ती सुद्धा एकतर्फी !!
8 Dec 2010 - 5:34 pm | मृत्युन्जय
तुमच्या बामण या उपाधीत मग अन्याय करणारे मराठा (पक्षी क्षत्रिय) आणी वैश्य लोक सुद्धा येतात का? सवर्णांमध्ये हे पण येतात आणु चातुर्वर्ण्य पद्धतीचा लाभ / दुरुपयोग यांनी पण केला. शिवाय बामण हे ब्राह्मण लोकांबद्दलच केवळ बोलतात हे न कळण्याएवढे मुर्ख तुम्ही असाल असे वाटत नाही. (चुकीचे असेल तर माफ करा एक डाव).
पुर्वी हे असे झाले म्हणुन आज त्याच्या उलटे व्हायला पाहिजे ही सुलतानी पद्धत झाली. शिवाय पुर्वी एखाद्याने विवक्षित जातीवर्गावर अन्याय केला म्हणुन आज त्याच्या वंशजांना जातिवाचक अपशब्द वापरणे योग्य आहे असा तर्क तुम्ही कुठुन लढवता आहात हे कळाले तर आनंद होइल.
अन्याय करणारे सगळे ब्राह्मण म्हणजे बामण असा तर्क तुम्ही कुठल्या मुद्द्यावर लढवता आहात तेही कळु देत. अजुनही काही लिहिणार होतो पण प्रतिसादांना पंख लागतील आणि समोरचा माणूस हिणकस प्रतिवाद करतो म्हणुन मी पण करतो असा कोणाचा समज होउ नये म्हणुन अधिक काही लिहित नाही.
बाकी संपादक मंडळ योग्य ती दखल घेत आहे अशी आशा करतो.
8 Dec 2010 - 7:40 pm | रन्गराव
>>काय आहे, बामणानी भुतकाळात ईतकी पापं केलीत ना, की त्याचे परिणाम उभ्या देशाला भोगावे लागत आहेत. त्यानी हे सगळं केलं नसतं तर आज सगळे समान असेत, म्हणजे आरक्षणाची गरजच पडली नसती.
एक महत्वाचा मुद्दा सांगतो इथं. फक्त एका जातीला ह्या साठी वेठीस धरणे चुकीच आहे. कारण स्वतःला उच्च म्हणवणार्या सर्व जातींनी हात धुवून घेतले आहेत. महाजनांना गावाबाहेर काढण्या इतक प्रभुत्व ब्राह्मणांकड कधीच नव्हतं. फार तर मंदीरात कुणाला घ्यायच आणि कुणाला नाही इतकाच अधिकार त्यांच्याकडे असावा. आणि त्यांनी तस शिकवलं म्हणून क्षत्रिय तस वागले आणि व्यापारी वर्गानं त्यांची साथ दिली हा युक्तीवाद हा मूर्खपणाचा कळस आहे. क्षत्रिय आणि व्यापारी वर्गानं आपली डोकी कुठ गहान ठेवली होती?
आणि आज जे आरक्षण आणि इतर कायदे वगैरे सुधारणा झाल्या आहेत त्या घडवून आणायला काही ब्राह्मणनांनीच पुढाकार घेतला होता. अगदी आंबेडकरांना प्रेरणा देणारे त्यांचे गुरुजीही ब्राह्मणच होते. आजची तुमची ही प्रतिक्रिया बाबासाहेबांनी जर वाचली असती तर शरमेने मान खाली झुकली असती त्यांची. त्यांनी ब्राह्मण द्वेष कधीच केला नाही. ह्याचा एक ठळक पुरावा म्हणजे त्यांनी आपल आम्बेडकर हे ब्राह्मणी आडनाव कधीच बदलल नाही.
>>आता काहिजण असा युक्तिवाद करतील की, त्यांच्या नावाने आजुन किती दिवस खडे फोडणार? पण त्यावर मला असे म्हणायचे आहे की, ठिक आहे मग तुम्ही आरक्षणाच्या नावाने खडे फोडु नका.
Two wrongs don't make a right !
>>बामणी व्यवस्थासुद्धा त्यांच्या समाजाला फायदा पोहचविण्याच्या हेतुने (वाईट मार्गाने ) काम करत होती (आणि संधी मिळाली तर आजही तसेच वागेल). जर त्यावर बोलायचे नको तर मग आरक्षण ( जो चांगल्या हेतुने) राबविल्या जाते त्यावर बोट उचलण्याचेही कारण नाही.
संधी मिळालेकी सगळेच फायदा घेतात. त्याला बहुजनही अपवाद नाहीत. काही जण आज तिसर्या पिढीतही आरक्षणाचा फायदा घेतात. अजून असे बरेच बहुजन आहेत ज्यांना हा फायदा कधीच मिळाला नाही. मग शिकलेले आणि आर्थिक परिस्थिती चांगले असेलेल लोक ती अडमीशन किंवा नोकरी इतर जास्ती गरज असलेल्या बहुजनांसाठी का नाही सोडत? अपवाद आहेत पण फार कमी. म्हणजे बघा बहुजनांमधेच आरक्षाणामुळे काही ब्राम्हण तयार नाही का झाले. तुमच्या मतानुसार फार वाईट झालं नाही का? विरोध मुळात आरक्षणाला नाही आहे. त्याचा जो गैरवापर होतो त्याला आहे.
>>काही नाही, बहुजनांचा विकास डोळ्यात खुपतं, आजुन काय नाही.
स्वार्थ, द्वेष आणि इतर कुठली ही भावना अगदी त्याग सुद्धा जात बघून निपजत नाही. जाती व्यवस्था चुकीची होती, त्याच्या पलिकड जावून विचार करणं गरजेच आहे.
8 Dec 2010 - 11:35 pm | बेसनलाडू
काही नाही, बहुजनांचा विकास डोळ्यात खुपतं, आजुन काय नाही.
हाहाहाहा .. भारी!! सकाळी सकाळी हापिसात चाय-काफी घेताना असं काही हसू आणणारं वाचलं की किती छान वाटतं! पुढचा सगळा दिवस छान जाणार याची खात्रीच पटते.
(चाकरमानी)बेसनलाडू
8 Dec 2010 - 4:09 pm | गवि
सर्व मान्य करु म्हणतानाही:
आता काहिजण असा युक्तिवाद करतील की, त्यांच्या नावाने आजुन किती दिवस खडे फोडणार? पण त्यावर मला असे म्हणायचे आहे की, ठिक आहे मग तुम्ही आरक्षणाच्या नावाने खडे फोडु नका.
या लॉजिकविषयी संभ्रमित झालो.
तपशील आवश्यक वाटल्यासः
त्यांच्या नावाने आजुन किती दिवस खडे फोडणार? याच अन्यायकर्त्यांच्या पूर्वजांच्या नावाने खडे फोडण्याचे कायदेशीर रूप "आरक्षण" हे असेल तर मग
तुम्ही आरक्षणाच्या नावाने खडे फोडु नका.
हे म्हणजे प्रोग्र्याम लूपमधे फसल्यासारखे झाले.
8 Dec 2010 - 5:08 pm | आदिजोशी
विषय आरक्षणावरून ब्राम्हण बॅशिंगकडे वळल्यामुळे ह्यावर बोलणं थांबवत आहे.
आजकालच्या युगात ब्राम्हणांना भटे, बामन म्हणून हिणवलेलं चालतं. पण ब्राम्हणांनी कुणाला महार चांभार म्हणलं की मात्र कायदेभंग होतो. कलियूग आहे, चालायचंच.
सगळ्या क्षेत्रात आंधळं आरक्षण राबवल्याचे परिणाम आपण बघतोच आहोत. इति लेखन सीमा.
8 Dec 2010 - 7:11 pm | तिमा
फक्त साडेतीन टक्क्यांची भीति उरलेल्या शहॅण्णौ पूर्णांक पाचांना का वाटावी ? आणि तेही इतके दिवस ?
कोण आहे रे तिकडे ? या साडेतीन टक्के पाप्यांना देशोधडीला लावा.
8 Dec 2010 - 9:13 pm | आजानुकर्ण
येथे प्रतिसाद देताना बहुसंख्य सदस्यांनी आरक्षणामुळे तथाकथित ढासळणार्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केल्याने पेमेंट सीटवरील 'गुणवंतां'मुळे ही गुणवत्ता वृद्धींगत होते काय असा मला पडलेला प्रश्न होता. त्याऐवजी कॉलेजांचे अर्थकारण हा मुद्दा चर्चेला घेतल्याबद्दल धन्यवाद.
आता माझा वैयक्तिक अनुभव हा आरक्षणामुळे प्रवेश मिळालेले मागासवर्गीय विद्यार्थी अधिक झटून अभ्यास करतात असा आहे. शिवाय हल्लीच्या सात आठ वर्षांमध्ये खुल्यावर्गाच्या गुणांची टक्केवारी व मागासवर्गीयांच्या गुणांची टक्केवारी यात फारसा फरक नाही असे दिसून आले आहे. (anecdotal माहिती आहे.) मी 1999 साली इंजिनियरिंगला प्रवेश घेतला तेव्हा खालीलप्रमाणे प्रवेशाची गुणवारी होती.
खुल्या वर्गाचे प्रवेश - 292/300
ओबीसी - 291/300
एससी - 282/300
एनटी - 275/300
एसटी - 260/300
या टक्केवारीत वर उल्लेख केल्यानुसार 85 टक्के व 55 टक्के असा मोठा फरक नाही.
8 Dec 2010 - 9:46 pm | मृत्युन्जय
खुल्या वर्गाचे प्रवेश - 292/300
ओबीसी - 291/300
एससी - 282/300
एनटी - 275/300
एसटी - 260/300
मी एफ वाय बी कॉम ला प्रवेश घेतला (वर्ष १९९९) तेव्हा खुल्या वर्गाचे प्रवेश ८१% ला बंद झाले . आणि त्याचवेळेस ओबीसी गटात ६५% आणि एससी / एनटी गटामध्ये ४०% ला प्रवेश मिळत होते. ही टक्केवारी बी एम सी सी, पुणे येथील आहे. सर्व जागा भरल्यानंतर सायन्स वरुन कॉमर्स ला येणार्या काही मुलांनी अॅडमिशन कॅन्सल केली म्हणुन मला प्रवेश मिळाला (मला ८०.५% होते).
जेव्हा मी कायद्याचा अभ्यास सुरु केला तेव्हा आय एल एस. पुणे मध्ये कायद्याच्या पदवीच्या प्रवेशासाठी खुल्या गटाला ६५% ची अट होती (पदवी परीक्षेला). एस सी / एन टीला इथे देखील फक्त ४०% ची तर ओ बी सी ला ५०% ची अट होती.
जेव्हा मी पुणे विद्यापीठातुन इंपोर्ट एक्स्पॉर्ट चा पोस्ट ग्रेज्युअॅट डिप्लोमा केला तेव्हा खुल्या वर्गातील मुलांसाठी केवळ १० जागा होत्या आणि रेझर्वेशनच्या ३२ जागा होत्या. काही जागा मुलींसाठी राखीव होत्या.
तुमच्या वेळेस फरक फारसा नव्हता हे चांगले झाले. तुम्हाला कदाचित त्याची झळ बसली नाही. पण २ वर्षे प्रचंड मेहनत घेउन ८०.५% मिळवल्यानंतर आपल्याला पाहिजे असलेल्या महाविद्यालयात एफ वाय बी कॉम ला देखील अॅडमिशन मिळु नये. आणी आपल्या डोळ्यासमोर वर्गातल्या सहाध्यायाला (त्याचे वडील गवर्मँट कॉण्ट्रॅक्टर होते. करोडपती होते) केवळ निम्न जातीतील असल्यामुळे ५६% वर प्रवेश मिळावा हे बघणे खुप क्लेशदायक होते.
9 Dec 2010 - 4:59 am | पंगा
पेमेंट सीटचा आणि गुणवत्तेचा संबंध काय? मला वाटते "पेमेंट सीटवरील 'गुणवंतां'मुळे ही गुणवत्ता वृद्धींगत होते काय" हा न-प्रश्न आहे. उत्तर उघड आहे. फुका कळफलकाची वाफ का दवडायची?
तरीही, स्पष्टपणे बोलायचेच असेल, तर पेमेंट सीटचा निव्वळ कॉलेजांच्या अर्थकारणाशीच संबंध आहे, गुणवत्तेशी त्याचे काहीही देणेघेणे नाही.
असो.
9 Dec 2010 - 4:37 pm | पंगा
आपल्याला 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' असे तर म्हणायचे नाही?
8 Dec 2010 - 10:06 pm | योगप्रभू
ब्राह्मण समाजाचा उल्लेख करताना तो 'साडेतीन टक्केवाले' असा करणे बहुधा वस्तुस्थितीशी विसंगत ठरावे.
साडेतीन टक्के हा उल्लेख प्रथम १९३० सालानंतर प्रचलित झाला असावा. कारण त्या वर्षी ब्रिटीश सरकारने मुंबई इलाख्यातील जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर जेधे-जवळकरांच्या लेखनात हा उल्लेख आढळून येतो. काही जण 'साडेतीन टक्केवाले' हा शब्दप्रयोग रुढ केल्याचे श्रेय लक्ष्मण मानेना देतात, पण हा शब्दप्रयोग ब्राह्मणेतर चळवळ ऐन भरात असतानाच म्हणजे १९३० ते १९५० या काळात सर्रास वापरला जात होता.
सांगायचा मुद्दा असा, की स्वातंत्र्यानंतर ब्राह्मण समाजाने कुटूंब नियोजनाचा दूरदर्शीपणा दाखवल्याने अगदी आजही बहुतेक ब्राह्मणांच्या घरात 'हम दो हमारे दो' आणि आता 'हम दो हमारा एक' हा ट्रेंड आढळतो. यामुळे ब्राह्मण समाजाची संख्या उत्तरोत्तर कमीच झाली आहे. सध्या ती दोन-सव्वादोन टक्क्याच्या आसपास असावी, असा अंदाज आहे. निश्चित आकडेवारी सरकारने ताजी जातिनिहाय जनगणना जाहीर केली तर त्यातून स्पष्ट होईलच. पण तोवर १९३० सालचेच प्रमाण नमूद करत बसणे हेही चुकीचे ठरेल.
एरवी मलाही 'साडेतीन टक्के' शब्द खूप आवडतो. किती महत्त्व आहे त्या शब्दाला! देवीची साडेतीन शक्तीपीठे...पेशवाईतील साडेतीन शहाणे...साडेतीन मुहूर्त...एक दोन साडे माडे तीन...मेरी जान आना घर, साडेतीन बजे... आणखी बरेच काही...
10 Dec 2010 - 7:57 am | शिल्पा ब
मायबोलीवर झंडु म्हणुन एक आय डी आहेत त्यांचा प्रतिसाद मला इथे द्यावासा वाटतोय म्हणुन देते. (त्यांची पुर्वपरवानगी घेतली आहे.)
झंडु | 6 December, 2010 - 06:43
मपतप्रदर्शन करण्याचं टाळून आरक्षणाचा इतिहास समोर ठेवतोय..
पहिल्या गोलमेज परिषदेमधे हिंदूंचे प्रतिनिधित्व गांधीजी करत होते तर मुस्लिमांचे आपले स्वतःचे प्रतिनिधी होते. भारताला स्वायत्ता देण्याच्या दॄष्टीने सर्वांचे समाधान होईल अशी राज्यप्रणाली असावी असा हेतू या परिषदेमागे होता. तिथं डॉ आंबेडकरांनी दलित समाजाचे प्रश्न हे हिंदू समाजापेक्षा वेगळे असल्याने त्यांना वेगळा गट समजलं जावं ही मागणी केली. ब्रिटीशांना ते वेगळे कसे आहेत हे पटवून दिल्यानं आणि समाजाची त्यांच्याकडं पाहण्याची दृष्टी, निवडणुका झाल्यास दलित उमेदवाराबाबतची मानसिकता याबद्दलच्या सर्व शंका उपस्थित केल्या. दलित उमेदवारास कुणी मत देणार नाही आणि त्यांना स्वतःच्या प्रश्नाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कुणीतरी मिळायला तर हवा. ज्याला चटका बसलेला नाही त्याला या प्रश्नांची जाण असणार नाही हे त्यांनी ठासून सांगितलं.
यावर उपाय म्हणून दुबार मतदारसंघाची उपाययोजना त्यांनी सुचवली. म्हणजे महाराष्ट्रात ४० जागा असतील तर ४० च्या ४० जागेवर सर्वसाधारन उमेदवार उभे राहतील. त्यानंतर दलितांचे त्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी स्वतंत्ररित्या उभे राहतील. म्हणजे पुण्यात जर दलित उमेदवार असेल तर पुण्यात एकूण दोन उमेदवार उभे राहतील. जिथे दलित लोकसंख्या जास्त आहे तिथंच हा उमेदवार असणार होता. सर्वसाधारण उमेदवारास सर्वच जण मत देतील. कारण काही समस्या या सर्वांच्या सारख्याच असतात. पण दलितांचे विशेष प्रश्न मांडण्यासाठी दलित उमेदवारास फक्त दलित उमेदवाराने मत द्यावं ही सूचना होती. म्हणजेच त्या उमेदवारास सर्वसाधारण गटातील शक्तिशाली गटांचे मत मिळवण्यासाठी तडजोडी कराव्या लागणार नाहीत ही भावना त्यामागे होती..
आज या राखीव जागांवर निवडून येणारे उमेदवार हे त्या त्या पक्षाला बांधील असल्याने ते दलित समाजासाठी काहीच करू शकत नाहीत. पण या जागांमुळे त्या त्या पक्षाला हक्काच्या जागा मिळत असल्याने या जागा बंद होऊ दिल्या जात नाहीत.
दुबार मतदारसंघाच्या या वाताघाटी समजल्यावर गांधीजी इंग्लंडला गेले आणि त्यांनी मुस्लिमांना आपल्या बाजूने केले. त्यासाठी त्यांच्या ब-याचशा अटी त्यांनी मान्य केल्या. या दोन गटांनी एकत्र येऊन मग दलितांच्या हक्कांना विरोध केला. पण बाबासाहेब काही समझोत्यास तयार होईनात.
त्यातून पुढे गांधीजी पुणे येथे येरवडा जेल मधे उपोषणास बसले. प्राणांतिक उपोषणामुळे वातावरण तंग झालं होतं. गांधीजींची प्रकृती जशी ढासळली तशा बाबासाहेबांना धमक्या येऊ लागल्या. या धमक्या वाढल्यानंतर काही मित्रमंडळींनी त्यांना समजावून सांगितलं कि तुमची बाजू योग्यच आहे. न्यायाची आहे. पण ज्यांच्यासाठी ही लढाई तुम्ही लढता आहात तेच असंतोषाचे बळी ठरून मारले गेले तर तुम्ही कुणासाठी लढणार ?
हा प्रश्न योग्य होता..
त्यासाठी बाबासाहेबांनी चर्चेची तयारी दर्शवली. या वाताघाटींदरम्यान दुबार मतदारसंघाचा दावा बाबासाहेबांनी सोडून दिला तर त्याची भरपाई राखीव जागांद्वारे करण्याचं आश्वासन गांधीजींनी दिलं. राखीव जागेबाबत बाबासाहेब साशंक होते म्हणून काही काळासाठी प्रयोग म्हणून हे धोरण राबवून पुढे सुधारणा करण्याचं ठरल.
हे झालं राजकिय क्षेत्रातील राखीव जागांबाबत .
सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्र :
पाकिस्तानला मुस्लिमांच्या संख्येच्या प्रमाणात जमीन आणि वेगळं राष्ट्र दिलं गेलं. त्या काळी रिझर्व बँकेच्या गंगाजळीतील मुस्लिमांच्या वाट्याला येणारी रक्कम सुमारे ५५ कोटी रूपये ही देखील दिली गेली. पण वर्षानुवर्षे सर्वच अधिकारांपासून वंचित असणा-या दलितांचे काय ?
जमिनीचा बोटभर तुकडाही नाही. पशूधन नाही. उपजीविकेचे साधन / व्यवसाय नाही. सगळेच इतरांनी ओरबाडून घेतलेलं. भारत हे एक राष्ट्र नाही. अनेक राष्ट्रांचं बनलेलं ते एक राष्ट्र आहे असं बाबासाहेब म्हणत. मुस्लिमांना ज्याप्रमाणे पाकिस्तान दिलं गेलं त्याप्रंमाणेच बाबासाहेबांनी दलितस्तान मागितलं असतं तर ते नक्कीच द्यावं लागलं असतं. अशा स्वतंत्र राष्ट्रामधे दलितांचंच सरकार असतं, त्यांची स्वतंत्र भूमी असती आणि स्वतःचाच अजेंडा असता. या ठिकाणी राखीव जागांची गरजही भासली नसती. पण बाबासाहेबांनी ही मागणी कधी केली नाही. त्यांना ते योग्य वाटलं नाही.
भारताच्या राष्ट्रीय संपत्तीत दलितांचा ३० टक्के वाटा आहे. दलितांची खरी लोकसंख्या ३० टक्के असल्याचं बोललं जातं. त्यामुळं संपत्तीचं समप्रामाणात वाटप झालं पाहीजे हे कुणीही नाकारू शकणार नाही. पण हे कुणालाच करायचं नसल्यानं तडजोड म्हणून आहे त्या सिस्टीममधे राखीव वाटा लोकसंख्येच्या प्रमाणात ठेवला गेला.
10 Dec 2010 - 8:33 am | रन्गराव
>>भारताच्या राष्ट्रीय संपत्तीत दलितांचा ३० टक्के वाटा आहे. दलितांची खरी लोकसंख्या ३० टक्के असल्याचं बोललं जातं. त्यामुळं संपत्तीचं समप्रामाणात वाटप झालं पाहीजे हे कुणीही नाकारू शकणार नाही. पण हे कुणालाच करायचं नसल्यानं तडजोड म्हणून आहे त्या सिस्टीममधे राखीव वाटा लोकसंख्येच्या प्रमाणात ठेवला गेला.
मान्य. आता ह्या ३०% च्या आत घुसुयात. मी वर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये मांडलेले मुद्दे पुन्हा ह्याच संदर्भात मांडतो. समजा की आपण दोघेही दलित आहोत. पण माझ्या वडीलांनी आरक्षणाचा फायदा मिळाला होता. ते चांगले शिकलेले आहेत आणि माझी आर्थिक परिस्थिती तुमच्यापेक्षा चांगली आहे. तुमच्या घरात शिकणारे तुम्हीच पहिले आहात. आणि तुमची आर्थिक परिस्थिती माझ्या इतकी चांगली नाही. आणि आता आपण बारावीची परीक्षा देवून ईंजिनियरींगला जाणार आहोत. मला क्लासेस आणि इतर सर्व सुविधा आहेत आणि तुम्हाला नाहीत. आणि राखीव जागांमध्येही मार्कांवरच ती कुणाला द्यायची ही ठरते. आणि आपल्या दोघांनाही ओपन कॅटेगरीमध्ये अॅडमिशन मिळण्याइतके मार्क मिळाले नाहीत. इथ जरी हे काल्पनिक दाखवल असल तरी हे प्रत्यक्षात नेहमीच होतं
आता ह्या परीस्थितीवर आधारीत काही प्रश्नांची उत्तरं शोधनं गरजेच आहे.
१. माझ्यातील आणि तुमच्यातील स्पर्धा फेयर आहे का?
२. माझ्या किती पिढ्या तीस ट्क्क्यात राहणार आणि तुमच्या सारख्या इतरांना तुमच्या हक्का पासून वंचित ठेवणार?
३. आणि जर मीच माझ्या दलित बांधवांसाठी ती जागा सोडणार नसेल तर इतर ७०% वाल्यांनी त्यांच्या जागा चांगले गुण मिळालेल्या दलिताला का द्याव्यात?
ह्या प्रश्नांची उत्तरं देणे सोपं नाही आहे. आरक्षणाचा मुळ हेतू कुठ तरी हरवला आहे. मागसलेल असण्याचा फायदा असा त्याचा गैरवापर चालु आहे अस वाटायला लागल आहे :(