कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि लसूण ..लसूण इथे जरी गड्डाभर दाखवली असली तरी इतकी जास्त नको, नाहीतर झोंबरा व्ह्यायचा पदार्थ.
मिरच्यांची संख्या दुस-या दिवशी सुट्टी आहे की हापिसला जायचे आहे त्यावर आणि आपापल्या भौगोलिक पार्श्वभूमीनुसार ठरवून घ्यावी. (सांगली, कोल्हापूर, कोकण, मुंबई, अमेरिका वगैरे लक्षात घेऊन..) शिवाय आपण विकत घेतलेला मिरचीचा प्रकार कोणता (ब्याडगी, लवंगी, भूत झोलकीया..!!) यावरही ही संख्या अवलंबून ठेवावी. "कॉनसीक्वेन्शियल" ड्यामेजेसना प्रस्तुत लेखक जबाबदार नाही.
उपरिनिर्दिष्ट चिजा पाट्यावर किंवा मिक्सरात वाटून निम्ननिर्दिष्ट खर्डा उत्पन्न होईल. याचा वास जीवघेणा असेल.
(ब्याचलर टिप:आपल्या महालात मिक्सर वा पाटा दोन्ही नसण्याचीच शक्यता जास्त असल्याने इथे अडकून पडण्याची शक्यता आहे. तेव्हा सर्व पदार्थ सुरीने अत्यंत बारीक चिरून हाताने एका वाटीत जेझरले तरी चालेल. नंतर हात पाचेक वेळा धुवावेत. अन्यथा पुन्हा कॉनसीक्वेन्शियल ड्यामेजेस..!!)
घरी लावलेले घट्ट दही किंवा (ब्याचलरांसाठी) अमूल नेसलेचे डब्यातले दोन तीन मोठे चमचे भरून घ्या.
या दह्यात वर तयार केलेला खर्डा अंडे फेटतात तसा फेटून मिक्स करा. त्यात शुगर फ्री नेच्युरा दोन चहाचे चमचे किंवा आपापल्या अंदाजाने टाका. ज्यांच्या मागे डायेटची ब्याद नाही त्यांनी सरळ साखर टाका. चिमूटभर मीठ टाका.
अशा रीतीने खालील प्रमाणे "विनामेयोनीज विनाचीज विनाबटर" वालं आपलं मस्त "स्प्रेड" किंवा "डिप" तयार होईल.
एक मेथी खाखरा घ्या. दाढी करताना साबू लावतो तसं त्याला वर बनवलेलं स्प्रेड फासा.
मग या सर्व प्रकरणावर अजून एक खाखरा ठेवून डबल लेयर बनवा.
आणि दहा पंधरा मिनिटांतच पोटातही दडपा नाहीतर ओला होईल.
(ब्याचलर मित्रहो: "खर्डा" जास्तीचा बनवून एक दोन आठवडे बाटलीत ठेवता येतो. खाखराही आणून बरेच दिवस ठेवता येतो. फक्त हापिसातून येताना किंवा सकाळी उठून लुंगीवरच बनियन अडकवून जांभया देत वाण्याकडे गेलं आणि दही आणलं की झालं..
ब्याचलर डिश असल्याने जास्त कॉप्लिकेशन नाय. कांदा चिरायची हौस असेल आणि विशेषत: रॉयल च्यालेंज, हेवर्ड वगैरे पेयांसोबत ही रचना पेश करत असाल तर थोडा कांदा टोमॅटो चिरून वरून पसरावा..!!)
प्रतिक्रिया
6 Dec 2010 - 11:07 am | सुप्रिया
प्रिंटआउट काढली आहे.
घरी खाकरे पण आहेत. आजच करून बघते.
- सुप्रिया
6 Dec 2010 - 2:42 pm | डावखुरा
ईकडे पण का..
मस्तच आजच बनेल पदार्थ...
6 Dec 2010 - 3:13 pm | चिंतामणी
पाकृ फोटो सगळेच छान.
पण शुगरफ्री कशाला????
कितीशी साखर लागणार आहे चवीसाठी. हे काय श्रीखंड आहे का?
6 Dec 2010 - 3:30 pm | टारझन
तोंड लाळावले.
-गमनबिहारी
6 Dec 2010 - 4:12 pm | गवि
गमन"बिहारी" ?
गमनमराठी तरी म्हण टार्झनभौ..
नपेक्षा मनसे माझ्या मागे लागेल रे..
6 Dec 2010 - 3:36 pm | परिकथेतील राजकुमार
वाह एकदम खर्डा पाकृ हो !
अवांतर :-
ह्या वाक्यात 'भौगोलिक' हा शब्द आला नसता तर वाक्य अजुन अर्थवाही झाले असते असे आमचे मत आहे. ;)
6 Dec 2010 - 4:10 pm | गवि
येकदम मान्य..
अर्थवाही आणि कदाचित "प्रवाही.." ;)
6 Dec 2010 - 5:43 pm | धमाल मुलगा
कोटीच्या(वर) कोटी ! :D
बरं, आमच्यासारख्या वेड्यंना खाकरा हा प्रकार आवडत नाही. तर त्याला पर्यायी काय वापरता येऊ शकेल सायबा? :)
6 Dec 2010 - 5:48 pm | गवि
मलाही आवडत नाही एरवी. पण असा मस्त लागतो.
आल्टर्नेट हवाच तर जिरापुरी/शेवपुरीची कडक पण खुसखुषीत चपटी पुरी ट्राय करावी.
नायतर मग टेन्शन क्यों लेनेका, मोनॅको खानेका.
छोटे छोटे चकणे होतील..(!!!!!!)
6 Dec 2010 - 5:55 pm | धमाल मुलगा
पर्फेक्ट पर्याय दिलात :)
>>छोटे छोटे चकणे होतील..(!!!!!!)
हा हा हा!!! कधी भेटताय द्येवा? आम्ही स्वहस्ते छोटे छोटे चकणे बनवुन देऊ तुम्हाला. ;)
अवांतरः पुरीच्या विशेषणात 'चपटी' शब्द वाचून डोळे पाणावले आणि घसा कोरडा पडला. ;)
6 Dec 2010 - 11:05 pm | चिंतामणी
पुरीच्या विशेषणात 'चपटी' शब्द वाचून डोळे पाणावले आणि घसा कोरडा पडला
=)) =)) =))
=))=))
=))
7 Dec 2010 - 11:56 am | छोटा डॉन
>>आमच्यासारख्या वेड्यंना खाकरा हा प्रकार आवडत नाही. तर त्याला पर्यायी काय वापरता येऊ शकेल सायबा?
:)
बरं, मग 'लस्सी' देऊ का साह्येब ? ;)
अवांतर : आयला पाकृ कडकच आहे असे दिसतेय, ते खाकरा वगैरे विकत आणायचे शारिरीक आणि आर्थिक कष्ट सोडले तर नावे ठेवायला जागा नाही.
झकासच :)
- छोटा डॉन
7 Dec 2010 - 12:02 pm | कुंदन
पन्हे दे रे , पुणेरी आहे ना तो.
7 Dec 2010 - 12:23 pm | गवि
आयला पाकृ कडकच आहे असे दिसतेय
>>>
कडक नाही हो डॉन्राव.. कुरकुरीत..
ते खाकरा वगैरे विकत आणायचे शारिरीक आणि आर्थिक कष्ट सोडले तर
>>>>
ते बियर वगैरे आणायचे शारिरीक आणि आर्थिक कष्ट कसे जाणवत नाहीत फारसे म्हणतो मी ? ;)
6 Dec 2010 - 3:37 pm | नगरीनिरंजन
चविष्ट चटकदार चमचमीत!
6 Dec 2010 - 4:37 pm | स्पंदना
निम्ननिर्दिष्ट??????
पहिल्यांदा वाचला हा शब्द भाउ? काय अर्थ हो?
परांचा ' पराचा कावळा' करणारा प्रतिसाद अतिशय आवडला.
आणि एक आणि एक्...ते दाढी एल्या सारख स्प्रेड कश कलाच?
6 Dec 2010 - 4:47 pm | गवि
निम्ननिर्दिष्ट??????
पहिल्यांदा वाचला हा शब्द भाउ? काय अर्थ हो?
मलाही न ठावे ताइ..म्याही पैल्यांदाच लिवला.
ते दाढी एल्या सारख स्प्रेड कश कलाच?
ब्लष घ्यून नै का कलतो अपन् तश्शच
6 Dec 2010 - 5:20 pm | स्पंदना
मी नाय ना कलत! मी ताई नाई का?
6 Dec 2010 - 5:26 pm | गवि
होक्कि तै..
ख्रचकि
.. म तु द्तान्ना ल्वते न ब्लशन पेस्त. तस लाव.
6 Dec 2010 - 8:37 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्तच पाकृ..
एका वाटीत जेझरले तरी चालेल... शब्द एकदम मनाला भिडला
6 Dec 2010 - 9:07 pm | पिंगू
गगनविहारी भारी पर्याय दिलास. चिंतेत होतो सकाळच्या नाश्त्यासाठी.
- (खाकराप्रेमी) पिंगू
7 Dec 2010 - 6:29 am | गुंडोपंत
मस्त जमतो. आवडला!
तळलेल्या शिळ्या पोळ्यांचेही उत्तम खाकरे बनतात.
त्यावर लावायला मजा आली हा प्रकार.
करून पाहिल्यावर प्रतिसाद दिल्याने उशीर झाला. :)
7 Dec 2010 - 6:48 am | सुनील
मस्त!
खर्ड्यात थोडा आल्याचा तुकडा टाकल्यास मस्त स्वाद येतो!
7 Dec 2010 - 11:51 am | पियुशा
बायको सुखि आहे तुम्चि!
8 Dec 2010 - 12:36 pm | आचारी
मस्त !! पण इथे कोणि खाकरा कसा करयचा हे सान्गु शकेल का?
8 Dec 2010 - 12:38 pm | गवि
इंदुबेन आहेत का इथे?
शोधायला हवे.
10 Dec 2010 - 3:24 am | इंटरनेटस्नेही
मस्त! करुन बघतो आणि प्रतिसाद देतो!
14 Dec 2010 - 10:11 am | आंसमा शख्स
वेळेला भाकरी आनि मिरची पन मस्त लागते.
फक्त मिरची मिठ आणि लसून ताजा मळ्यातला आणि तिथेच दगडावर वाटून घ्यायचा. एक्दम मस्त लागते. भूक लागलेली पायजे फक्त.