अंदमानमधुन सावरकरांचे नाव काढले...

अवलिया's picture
अवलिया in काथ्याकूट
28 Nov 2010 - 12:10 pm
गाभा: 

खरोखर जी गोष्ट स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या करायला हवी होती ती निदान ६० वर्षांनी का होईना केली आहे. अंदमानमधील माहिती पुस्तकातुन विनायक दामोदर सावरकर हे नाव काढुन टाकले आहे.

http://www.esakal.com/esakal/20101126/5636616269938258697.htm

ह्याबद्दल आम्ही मायबाप सरकारचे अभिनंदन करतो.

यानिमित्ताने आमच्या काही मागण्या आहेत
१) याच धर्तीवर अंदमानातील जिथे जिथे सावरकर वगैरे नाव असेल ते काढुन टाकावे

२) काही बिनडोक लोक अंदमानला जावुन सावरकर होते त्या खोलीत जावुन उगाच डोळ्यात पाणी वगैरे आणुन देशप्रेमाच्या गुळण्या टाकतात. त्यावर त्वरीत बंदी आणावी

३)तिथला तो तथाकथित तुरुंग जमीनदोस्त करुन तिथे शेळीपालन केंद्र व बोकड पैदास केंद्र चालु करावे

४) भारतातील इतिहासाच्या पुस्तकातुन सावरकर तसेच इतर सर्व क्रांतीकारक ( खरे तर हे स्वतःच्याच फायद्यासाठी लढले, पण आव मात्र देशप्रेमाचा !) यांची नावे काढुन टाकावीत. थोडक्यात इतिहासाचे पुनर्लेखन करावे

५) भारताचा इतिहास हा इसवी सन १९२० पासुनच पुढे चालु ठेवावा. मागच्या सर्व खुणा पुसुन टाकाव्या. त्यासाठी रायगड, राजगड, सिंहगड इत्यादी सर्व डोंगर सपाट करावे

६) शनीवार वाडा जमीनदोस्त करावा

या व अशाच अनेक मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या अशी आमची इच्छा आहे

प्रतिक्रिया

तिमा's picture

28 Nov 2010 - 12:37 pm | तिमा

आमचा होरा/अंदाज

तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही.

<१) याच धर्तीवर अंदमानातील जिथे जिथे सावरकर वगैरे नाव असेल ते काढुन टाकावे? >ते काम मणिशंकर अय्यर यांनी पूर्वीच केले आहे
<२) काही बिनडोक लोक अंदमानला जावुन सावरकर होते त्या खोलीत जावुन उगाच डोळ्यात पाणी वगैरे आणुन देशप्रेमाच्या गुळण्या टाकतात. त्यावर त्वरीत बंदी आणावी> त्यापेक्षा त्यावर जिझिया कर लावण्याची मागणी करा. जाणारे ही खुष घेणारेही खुष
<३)तिथला तो तथाकथित तुरुंग जमीनदोस्त करुन तिथे शेळीपालन केंद्र व बोकड पैदास केंद्र चालु करावे> या मागणीमुळे आपण मांसाहारा चे व पर्यायाने हिंसेचे पुरस्कर्ते आहात असा भास होतो!
<<४) भारतातील इतिहासाच्या पुस्तकातुन सावरकर तसेच इतर सर्व क्रांतीकारक ( खरे तर हे स्वतःच्याच फायद्यासाठी लढले, पण आव मात्र देशप्रेमाचा !) यांची नावे काढुन टाकावीत. थोडक्यात इतिहासाचे पुनर्लेखन करावे>> जागे व्हा मालक, मुळात १०० पानी इतिहासात २ पाने या सर्वांना मिळतात. तिही हटतील, मागणी नाही केलीत तरी. अस काय करता, अहो २-३ वर्षांपूर्वी एन सी आर टी अभ्यासक्रमांच्या पुस्तकात क्रांतिकारकांचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. माहित नाही का?
<<५) भारताचा इतिहास हा इसवी सन १९२० पासुनच पुढे चालु ठेवावा. मागच्या सर्व खुणा पुसुन टाकाव्या. त्यासाठी रायगड, राजगड, सिंहगड इत्यादी सर्व डोंगर सपाट करावे>>

विनंती अ) <भारताचा इतिहास हा इसवी सन १९२० पासुनच पुढे चालु ठेवाव> यात उल्लेखापेक्षा गाळण्याची यादी जास्त असेल तेव्हा एव्हढा त्रास घेण्यापेक्षा ठराविक एक दोन नावांव्यक्तिरीक्त अन्य कुणाचाही उल्लेख स्वातंत्र्य संग्रामात, चुकलो स्वातंत्र्य प्राप्तिमध्ये असू नये अशी मागणी करा. ब)<रायगड, राजगड, सिंहगड इत्यादी सर्व डोंगर सपाट करावे> असे विध्वंसक विचार मनात आणू नका. त्यापेक्षा या ठिकाणी पर्यटन मंडळाला खाजगी विकासकांच्या मदतीने पर्यटनस्थळे उभारायला सांगा म्हणजे रम, रमा आणि रमी यात रमलेले पर्यटक या वास्तू कुणी बांधल्या असले फलतू प्रश्न विचारणार नाही.
<६) शनीवार वाडा जमीनदोस्त करावा > आत उरलाय काय त्याच्या पाडायला? फार तर नाव बदलाची मागणी करा

सरकार चे डोके ठिकाणावर आहे का ? आयला......त्या वायझेड कांग्रेस वाल्यांना आजन्म कोलू फिरवायची शिक्षा दिली पाहिजे

चिंतामणी's picture

29 Nov 2010 - 10:56 am | चिंतामणी

सरकार चे डोके ठिकाणावर आहे का ?

त्यासाठी डोके असायला लागते.

यकु's picture

28 Nov 2010 - 1:43 pm | यकु

सावरकर डॉट ऑर्ग वर उपलब्ध असलेले खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मृत्यूंजय दिनानिमित्त त्यांनी केलेले एक भाषण ऐकले.
सावरकरांना त्यांची जहागिर परत मिळावी आणि त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी काही लोकांनी भारत सरकारकडे केली होती. याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात -
"आता मला या उपाधीचं काय हो चीज? काय अर्थ आहे हे भारतरत्न... हे शब्द माझ्या छातीवर बसवून? "...हे फक्त आता समाधानासाठी...मला कुणी विचारलं तर मी सांगतो.. अहो, एवढा तीन चतुर्थांश हिंदुस्थान मला परत मिळाला - त्यात माझी जहागिर परत मिळाली नाही?...

सावरकरांना त्यांच्या हयातीतच आपल्याच "भारत सरकार" कडून जो खुन्नसभरा त्रास भोगावा लागला त्यासमोर हे नाव काढून टाकणे वगैरे प्रकार तसे क्षुल्लकच.
सावरकरांनी असल्या ** सरकारकडून कधीच काही अपेक्षा केली नव्हती.
त्यामुळे अवलियांनी उपरोधानं केलेल्या मागण्या रास्त आहेत. :(

हे खरंच दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातल्या आमदार-खासदारांना दिल्ली-दरबारात काय किंमत आहे हे पाहिलेच होते. हे त्याचेच एक ताजे उदाहरण!
कीं या खासदारांनीच आपल्या सक्रीय सहभागाने हे घडवून आणले? श्री अवलियांनी यावर प्रकाश टाकावा! तसेच शक्य झाल्यास टाइम्स किंवा इतर आंग्ल वृत्तपत्रातील दुवा द्यावा. प्रतिभाताईंना (कदाचित्) अद्याप मराठी येत असेल पण 'पप्रं'ना कसे येईल? मग या सबबीचेच वेड ते पांघरतील!!
'सकाळ' पत्राच्या मालकीत भागीदार, सध्याचे कृषिमंत्री आणि बारामतीचे 'पोपु' दिल्लीत असताना असे कां व्हावे? पण भारतीयांची आजकालची एकंदर उदासीनत पहाता त्यात नवल वाटायला नको.
गिलानी-अरुंधती यांच्या दिल्लीत केलेल्या देशविरोधी कारवायांसंबंधी FIR दर्ज "केलीच पाहिजे" असा 'बांबू' दिल्ली पोलिसांना ज्या देशात उच्च न्यायालयाला (हायकोर्टला) द्यावा लागतो त्या देशात देशभक्तीला कसली किंमत!
लोकांच्या मनात या विषयावर जर तीव्र भावना असतील तर त्या "अनिष्ट बघणार नाहीं, अनिष्ट ऐकणार नाहीं, अनिष्ट बोलणार नाहीं" छाप मंत्र्यांना (माकडांना नव्हे) कळणार कशा? पंतप्रधानांना पत्रे लिहून! नाहीं लिहिली तर त्यांना कळणार कसे? पण जो सुचवतो त्याची अस्थानी व विनाकारण कुचेष्टाच केली जाते.
असले अरण्यरुदन काय कामाचे? आपल्या लोकप्रतिनिधींना आपल्या-आपल्या मार्गाने खडबडून जाग आणा!
ज्यांना हे वाचून असे कांहीं करावेसे वाटेल त्यांच्यासाठी तयार माहिती:
पंतप्रधानः
छोट्या मेल साठी (शब्दसंख्येवर ५०० कॅरॅक्टर्सची मर्यादा आहे): webpmo.nic@nic.in
विस्तृत मेलसाठी (शब्दसंख्येवर मर्यादा नाहीं): pmosb@pmo.nic.in (हा पत्ता मला PMO क्डून्च आलेला आहे);
राष्ट्रपती (शब्दसंख्येवर मर्यादा नाहीं): presidentofindia@rb.nic.in
चालवा आपली बोटें कळफलकावर!

आम्हाला वाटलं पोपु म्हणजे पाडगावकरांनी पोप ला नविन शब्द पाडलाय काय..

असो दुव्यांबद्दल धन्यवाद.. आजच माझ्या भयंकर विंग्रजीत मनमोहन सिंगांना घाम फोडतो..

गांधीवादी's picture

29 Nov 2010 - 9:25 am | गांधीवादी

Veer Savarkar’s photo and name removed from tourist guide in Andaman

New Delhi: Tourist guide booklet published by the Government for attracting more tourists to Andaman and Nicobar has excluded the name of Swatantryaveer Savarkar although the place has become famous after Savarkar was kept in imprisonment here. His name has been excluded even from the pamphlet published on tourism. The above fact was accepted in writing by the Government in the Parliament.

'रिमोट कंट्रोल च्या खेळण्याला पत्र पाठवून काहीतरी बदल होईल आणि चक्क असा चमत्कार सुद्धा घडू शकतो' हि वेडी आशा ठेऊन मी देखील एक पत्र धाडतोय.

बाकी सर्व मान्यवरांनी स्पष्ट केले आहेच.

टीप : सदर चर्चचा दुवा मित्रांना पाठविलेला आहे, तसेच त्यांना देखील तसे पत्र पाठविण्याचे आवाहन केलेले आहे. शंभरच्या ऐवजी हजार पत्रे येऊन पडली तर माननीय पंतप्रधान आणि (अति)माननीय राष्ट्रपती निदान एक तरी पत्र वाचतील (हि सुद्धा एक वेडी आशा, बरंका)

नगरीनिरंजन's picture

28 Nov 2010 - 2:01 pm | नगरीनिरंजन

हा देश आपला नाही राहिला गड्या.

आंतरजालावरचे मला न आवडणारे पण लोकप्रिय शब्द वापरायची वेळ आणि तेवढा राग शक्यतो येत नाही.. पण..

****** **** ** **** *** *** *****

असो..

तर नानाच्या सगळ्या मागण्यांना अनुमोदन.. आणखी एक मागणी.. आमच्या सर्वांच्या हृदयात तात्याराव आहेत ती हृदयंही काढुन घ्या म्हणावं.. नावनोंदणी कुठं करायचिये सांगा..

आमच्यासारख्या षंढांना काळीजं असायचा अधिकारच काय...

आम्ही नुसतं म्हणायचं....

स्वातंत्र्य लक्ष्मी की जय.

अप्पा जोगळेकर's picture

30 Nov 2010 - 9:10 am | अप्पा जोगळेकर

आमच्या सर्वांच्या हृदयात तात्याराव आहेत ती हृदयंही काढुन घ्या म्हणावं.. नावनोंदणी कुठं करायचिये सांगा..
आमच्यासारख्या षंढांना काळीजं असायचा अधिकारच काय...

टाळीबाज ड्वायलाक.

सुधीर काळे's picture

28 Nov 2010 - 2:35 pm | सुधीर काळे
डावखुरा's picture

28 Nov 2010 - 2:49 pm | डावखुरा

@सुधीर काळे:
आणि हे पत्र आहे १६ डिसेंबर २००८ चे! http://www.thejakartapost.com/n
=
404 Page Not Found

The page you requested was not found.

सुधीर काळे's picture

28 Nov 2010 - 3:31 pm | सुधीर काळे

दोन दुवे दिले आहेत. एक २६/११/२०१०चे पत्र आणि दुसरे १६/१२/२००८चे.
http://www.thejakartapost.com/news/2008/12/16/letter-indiapakistan-ties-... (किंवा http://tinyurl.com/2cqh4t9)
दुसरा दुवा २०१०च्या पत्राच्या खालीही (वरून दुसरा) आहे
मी हा http://tinyurl.com/2cqh4t9 दुवा माझ्या स्वाक्षरीत टाकत आहे.
सांगितल्याबद्दल धन्यवाद.

आपल्या देशातील भिकार नेत्यांकडुन अजुन काय अपेक्षित असणार आहे ? भ्रष्टाचाराचा "आदर्श" समाजा समोर ठेवणारी ही मंडळी स्वतः देशद्रोही असुन, देशभक्तांच्या उरल्या सुरल्या खुणा सुद्धा नष्ट करण्याच्या मागावर आहेत हे या भिकार कॄतीतुन दिसुन आलेच आहे.
अंदमानमधील पर्यटनविषयक प्रसिद्धिपत्रकांतून सावरकरांचे नाव गायब झाल्या बद्धल मी तीव्र निषेध नोंदवत आहे.

अप्पा जोगळेकर's picture

28 Nov 2010 - 5:04 pm | अप्पा जोगळेकर

काही विशिष्ट लोकांच्या प्रतिसादांची वाट पाहात आहे.

अतिशय अतिशय दुर्दैवी घटना.

स्वाती दिनेश's picture

28 Nov 2010 - 7:46 pm | स्वाती दिनेश

अतिशय अतिशय दुर्दैवी घटना.
यशोसारखेच वाटते.
स्वाती

इंटरनेटस्नेही's picture

28 Nov 2010 - 5:42 pm | इंटरनेटस्नेही

.

अमोल खरे's picture

28 Nov 2010 - 6:44 pm | अमोल खरे

ते ब्राम्हण होते.........त्यामुळे जरी आता त्यांच्या विरोधात कोणी काहीही बरळले तरी मोर्चे निघणार नाहीत, तोडफोड होणार नाही, मुख्यमंत्री / पंतप्रधान लक्ष घालणार नाहीत.

एका ब्राम्हण व्यक्तिला बदनाम करत आहेत म्हणाल्यावर बाकी मराठी लोक (काही अपवाद वगळता) शांतच बसणार हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. सुभाषचंद्र बोसांबद्दल काही बोलले तर अख्खा बंगाल पेटेल.........इथे काहीही होणार नाही. अमराठी लोकांमध्ये सावरकरांबद्दल जास्त माहिती असेल असे वाटत नाही त्यामुळे त्याचा नॅशनल इश्यु वगैरे काही होणार नाही. हिंदुत्ववादाचा तथाकथित पुरस्कार करणारी भाजपा ह्याविषयी काही करेल असे वाटतच नाही. उरताउरली फक्त शिवसेना आणि मनसे. त्यांनी काही केले तर चांगले आहे....... नाही केले तरी आम्ही काय करु शकतो....... देशासाठी इतका मोठा त्याग करुन हेच मिळत असेल तर कशाला करायचा त्याग ? आहे कोणाकडे उत्तर ? सावरकरांच्या निधनानंतर त्यांना सरकारी इतमामात निरोप दिला गेला नाही. शेवटी आचार्य अत्र्यांनी धावपळ करुन लष्करी वाहनासारखी प्रतिकृति अ‍ॅरेंज केली असे ऐकिवात आहे. ज्या माणसाची ब्रिटिशांना इतकी दहशत होती, त्याची इतकी अवहेलना स्वतंत्र भारतातच होईल असे ब्रिटिशांनाही वाटले नसेल. "सावरकरांनी चालवलेल्या गप्पांच्या कार्यक्रमाला लहानपणी वेलणकर हे जायचे (भारताचे बहुदा पहिले पोस्टमास्टर जनरल....भारतातील पिन कोड चे जन्मदाते) म्हणुन त्यांना ब्रिटिश सरकारने आय सी एस केले नव्हते. (हे पुढे त्यांना एका ब्रिटिशानेच सांगितले). आणि आता सावरकरांवर ही वेळ येते.........आणि माझ्यासारखी लोक त्यावर प्रतिसाद देत बसतात.....काहीही उपयोग होणार नाही हे माहित असुन सुद्धा......... चांगलं आहे.

सावरकर हयात असतानाही त्यांची सरकारने अवहेलनाच केली होती.तीच परंपरा दुर्दैवाने आजही चालू आहे.

ते ब्राम्हण होते.........त्यामुळे जरी आता त्यांच्या विरोधात कोणी काहीही बरळले तरी मोर्चे निघणार नाहीत, तोडफोड होणार नाही, मुख्यमंत्री / पंतप्रधान लक्ष घालणार नाहीत.

सावरकर ब्राम्हण होते ही त्यांची मिस्टेक की काय मला कल्पना नाही.पण मला वाटते की आज त्यांच्या विरोधात कोणी काहीही बरळले तरी झाडाचे पानही हलणार नाही याचे कारण म्हणजे ते हिंदुत्ववादी आणि विज्ञाननिष्ठ दोन्हीही होते.ज्यांना त्यांचा हिंदुत्ववाद पटला त्यांना त्यांची विज्ञाननिष्ठा पटली नाही आणि ज्यांना त्यांची विज्ञाननिष्ठा पटली त्यांना त्यांचा हिंदुत्ववाद पटला नाही.आणि ज्यांना त्यांचे हिंदुत्व पटले त्यांना तरी सावरकरांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व (जातीभेदविरहित समाजरचना, कर्मकांडांना फाट्यावर मारणे वगैरे) पटले होते की केवळ ’हिंदुत्व’ हा सामायिक शब्द त्यात होता म्हणून ते त्यांना पटले हे सांगता येणे अवघड आहे.थोडक्यात काय की सावरकर हा फार फार मोठा माणूस होता.पाच आंधळे आणि हत्ती या गोष्टीप्रमाणे बहुतेकांना ते पूर्णपणे समजलेच नाहीत. तेव्हा मला वाटते की सावरकरांची ’मिस्टेक’ काही असेल तर ते इतर कोणाच्याही आवाक्याबाहेरचे असामान्य व्यक्तिमत्व होते.आणि त्या कारणाने सावरकरांचे वरवर समर्थन करणारे अनेक आढळले तरी त्यांचे कट्टर अनुयायी त्यामानाने थोडे आहेत.

तात्याराव म्हणायचे की मी जे आज सांगतो ते लोकांना दहा वर्षांनी पटते आणि त्यासाठी दहा वर्षे थांबायची माझी तयारी आहे.दुर्दैवाने दहा वर्षांची शंभर वर्षे होत आहेत पण एक ना एक दिवस आपल्याच समाजाचे डोळे उघडतील आणि सावरकरांचे विचार पटतील. मग मणिशंकर अय्यरसारख्या झुरळांची पर्वा करायची गरज नाही.

यशोधरा's picture

28 Nov 2010 - 8:45 pm | यशोधरा

>>हिंदुत्ववादी आणि विज्ञाननिष्ठ दोन्हीही होते.ज्यांना त्यांचा हिंदुत्ववाद पटला त्यांना त्यांची विज्ञाननिष्ठा पटली नाही आणि ज्यांना त्यांची विज्ञाननिष्ठा पटली त्यांना त्यांचा हिंदुत्ववाद पटला नाही.

मृत्युन्जय's picture

28 Nov 2010 - 9:39 pm | मृत्युन्जय

मला ते आवडतात कारण ते प्रखर राष्ट्रप्रेमी होते. त्यांचे हिंदुत्ववादी, विज्ञाननिष्ठ किंवा ब्राह्मण असणे माझ्यासाठी दुय्यम आहे.

नगरीनिरंजन's picture

28 Nov 2010 - 8:37 pm | नगरीनिरंजन

>>ते ब्राम्हण होते..
का तुम्ही त्यांच्या विचारांच्या चिंधड्या करताय आणखी?

रन्गराव's picture

28 Nov 2010 - 10:12 pm | रन्गराव

>>एका ब्राम्हण व्यक्तिला बदनाम करत आहेत म्हणाल्यावर बाकी मराठी लोक (काही अपवाद वगळता) शांतच बसणार हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही.

खरे साहेब हे वाक्य परत परत वाचा. ह्यात एक विसंगती आहे आणि एक शब्द जास्ती आहे.
सावरकर "प्रखर हिंदूत्ववादी होते" हा प्रचार एक राजकीय चाल होती आणि तो कट होता त्यांच्या प्रखर देशभक्तीला धार्मिक रंग चढवून त्याच तेज कमी करण्याचा. आणि तुम्ही तर आता जात मध्ये आणून त्या सुर्याला ग्रहणच लावायला निघाला आहेत. तुम्ही केलेल्या अशा विधानांचा उपयोग सावरकरांच्या विरूद्धच केला जाईल. ते एक देशभक्त होते. त्यांना त्याचं इतिहासाच्या पुस्तकातल स्थान दुदैवान मिळाल नाही, आता जातीयवादामुऴं लोकांच्या मनातलं स्थान डळमळीत झाल नाही म्हणजे मिळवल. बाकी पवार साहेबांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलीच आहे.

अमोल,
लोकशाहीत संख्येला महत्व असते. माझी कितीही चेष्टा/कुचेष्टा झाली तरी मी मला चीड आणणार्‍या राजकीय/सामाजिक विषयांवर PM व Pres या दोघांना पत्रे लिहितोच. माझ्यासारख्या ५-१० पत्रांकडे कुणी ढुंकूनही पहाणार नाहीं हे माहीत असूनही. पण 'pmosb' या पत्त्यावर पाठविलेली पत्रे नक्की वाचली जातात कारण माझ्या काहीं माहितीवजा प्रश्नांना उत्तरेही आलेली आहेत.
माझ्यासारख्या लोकांची संख्या वाढली पाहिजे म्हणून मी हे वारंवार लिहितो. कारण असे करण्यावर माझा विश्वास आहे! त्यावर कांहीं लोक कुत्सितपणे (थेट किंवा आडून-आडून) शेरेही मारतात. पण अशा शेर्‍यांकडे मी लक्ष देत नाहीं. कारण माझ्या मते लोकशाहीत वाईट गोष्टींबद्दल निषेध करून त्या मागे लोटण्याचा हा एकच योग्य मार्ग आहे. कारण दुसरा मार्ग आहे हिंसापूर्ण क्रांतीचा! कदाचित माओवादी हेच करत आहेत, त्यांच्या रास्त मागण्यांकडे लक्ष न दिल्यामुळे ते संघटित झाले आहेत असे 'मिपा'वरील कांहीं लेखांवरून वाटते!!
निवडणुकांच्या आधी बरीच प्रलोभने दाखवून मतदारांचे लक्ष दुसरीकडे खेचले जाते व हे महत्वाचे मुद्दे तसेच उरतात.
प्रगल्भ लोकशाही देशांमध्ये हे सर्रास केले जाते. आपली लोकशाही अद्याप तान्ही आहे. त्याला वळण आपणच लावायचे आहे.
आता मी श्री अवलियांच्या इंग्लिश दुव्याची वाट पहात आहे. तो मिळाला कीं PM ना निषेध कळवेनच. प्रतिभाताईना तर लिहिलेसुद्धा!
असो. आली जर तिरमिरी तर जरूर लिही! न लाजता लिही.

अवलियांच्या मागण्यांशी सहमत.
जसे तुरुंगात शेळीपालन व बोकडपैदासकेंद्र चालू व्हायला हवे तसे राजगड, रायगड, सिंहगड सपाट करून तिथे मंत्र्यांच्या बांधकाम कंपन्यांना वेगळाली शहरे वसवायची परवानगी बिनशर्त मिळाली पाहिजे. ब्राह्मणद्वेष्टे असल्याने असे करतात म्हणावे तर स्वजातियांनाही लुटल्याच्या कहाण्या दोनवर्षापूर्वी ऐकून आले होते. आपण पुढच्या आपल्याच पिढीचे किती नुकसान करून जात आहोत हे ध्यानात येत नसल्यासारखे वागतात. आधी वाटले फक्त पैसा हेच ध्येय असावे पण तोही पुरेसा मिळवून झाल्यावर नविन काय करायचे? शांत बसवत नाही. दोन वर्षांपूर्वी म्हणे शहराच्या आजूबाजूच्या छोट्या वाड्या वस्त्यांवरच्या शेतकर्‍यांच्या जमिनी जबरदस्तीने (बराच) पैसा देवून नवीन शहर वसवण्यासाठी घेतल्या आहेत. त्या शेतकर्‍यांची पुढची पिढी आता शहरात ड्रायव्हर, कुठे मजूर म्हणून काम करतात असे आमच्या गाडीचा ड्रायव्हर सांगत होता.

वेताळ's picture

28 Nov 2010 - 8:00 pm | वेताळ

खरतर मला सोनिया गांधी व राहुल गांधी ह्याच्या शिवाय कोणत्याच स्वातंत्र्यसैनिकाचे नाव ठावुक नाही.

रेवती's picture

29 Nov 2010 - 5:23 pm | रेवती

खी खी खी!
धन्य आहात हो वेताळसाहेब!

मृत्युन्जय's picture

29 Nov 2010 - 5:25 pm | मृत्युन्जय

राजीवजींचा विसर पडलेला दिसतोय तुम्हाला?

नितिन थत्ते's picture

28 Nov 2010 - 8:30 pm | नितिन थत्ते

चुकीची गोष्ट घडली आहे याबाबत सहमत.

बाकी चालू द्या.

प्रशु's picture

28 Nov 2010 - 8:46 pm | प्रशु

तीव्र निषेध.. ह्या पेक्षा जास्त लिहिवत नाही........

इन्द्र्राज पवार's picture

28 Nov 2010 - 9:07 pm | इन्द्र्राज पवार

"....एका ब्राम्हण व्यक्तिला बदनाम करत आहेत म्हणाल्यावर बाकी मराठी लोक (काही अपवाद वगळता) शांतच बसणार हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही...."

~ हे वाक्य जर तात्यांनी वाचले असते तर व्यक्तिशः त्यांना किती वेदना झाल्या असत्या हे सांगायला खरेतर कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. श्री.खरे यांच्या मतस्वातंत्र्याच्या हक्काला मी बाधा आणू शकत नाही, तरीही त्यानी 'सावरकर ब्राह्मण म्हणून मराठा शांत' ही सांगड का घातली हे अनाकलनीय आहे. असे म्हणायचे कारण खुद्द तात्यांनी असा भेदभाव बाळगण्याला कायम विरोध केला होता. सावरकरांनीच लिहिले आहे की, "आज आपल्या हिंदूत जो जन्मजात म्हणून म्हणविला जातो, तो जातिभेद निव्वळ पोथीजात आहे. पानपतचा सेनानी भाऊ ब्राह्मण, 'यातिशूद्र' वंशातील तुकाराम परमसंत ! आज ज्या जाती म्हणून मानल्या जातात, त्यात वर्ण वा गुण वा कर्म यांच्या कसोटीत संघश: असा कोणताही ठाम जन्मजात वेगळेपणा आढळत नाही. आजचा जातिभेद हा जन्मजात म्हणविला जात असला, तरी तो आहे निव्वळ पोथीजात...निव्वळ मानीव, खोटा !"

असे रोखठोक मत असणार्‍या सावरकरांवरील प्रेम, आदर प्रदर्शित करीत असताना ते 'ब्राह्मण' होते म्हणून 'मराठा' विरोध करणार नाही हा समास कसा काय सुटला जातो, हे अनाकलनीय आहे. माझ्या माहितीचे कित्येक असे मराठे आहेत की एखाद्या ब्राह्मणाच्या घरात आढळणार नाही इतके सावरकर वाङ्मय त्यांच्या कपाटात आहे. शिवाजीनंतर दुसरा फोटो असेल त्या घरात तर तात्यांचा ! त्या मराठ्यांना आनंद झाला असेल केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री सुलतान अहमद यांनी दिलेल्या उत्तरामुळे?

आज रविवार दि.२८ नोव्हेम्बर....तर सकाळची बातमी आली शुक्रवारी...जी वाचल्या क्षणीच आम्ही तीन (मराठा जातीच्या) मित्रांनी स्वतंत्रपणे ई-मेलद्वारे या घटनेचा निषेध केंद्राकडे नोंदविला आहे. अशा पत्रांची (श्री.सुधीर काळे म्हणतात त्याप्रमाणे....) कुठेना कुठे तरी नोंद होत असतेच...भले त्याची पोच येवो अथवा ना येवो. आम्ही लोकशाही तत्वे मानतो, त्यानुसार निषेधासाठी म.न.से. वा संभाजी ब्रिगेडचा रस्ता आम्हाला सातत्याने त्याज्य आहे...पण म्हणून आम्ही नेभळट ठरत नाही. टॅक्स्या फोडणे आणि ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तके जाळणे हे ज्याना पुरुषत्वाचे लक्षण वाटते ते त्या मार्गाने जातील, त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. पण एखाद्या व्यक्तीचा अपमान तो अमुक जातीचा आहे म्हणून दुसर्‍या जातीच्या माणसाला संतोषाची घटना वाटत असेल असे मानणे ही घातक वंचना ठरेल, पण त्याहूनी ज्या व्यक्तीच्या आपलेपणाबद्दल श्री.खरे यानी तसे उदगार काढले आहेत त्या व्यक्तीच्या शिकवणीचाही तो अपमान असेल.

धागाकर्त्यांनी औपराधिक भूमिकेतून 'सावरकरांच्या कोठडीत जावून काही लोक डोळ्यात पाणी वगैरे आणुन देशप्रेमाच्या गुळण्या टाकतात. त्यावर त्वरीत बंदी आणावी...' असे सुचविले आहे. अंदमानातील त्या कोठडीत असे डोळ्यात पाणी आलेल्यांपैकी मी एक क्षुद्र मराठा सावरकर भक्त होतो....आणि माझ्या आजुबाजूला तिथे जे लोक बसले होते, त्यांचीही स्थिती माझ्यापेक्षा काही वेगळी नव्हती.....!

.... सुदैवाने कुणाच्याही डोळ्यातील अश्रूंना 'जात' नव्हती.

इन्द्रा

रन्गराव's picture

28 Nov 2010 - 10:21 pm | रन्गराव

.... सुदैवाने कुणाच्याही डोळ्यातील अश्रूंना 'जात' नव्हती.
पवार साहेब, आपण जिंकला आहात.

शिल्पा ब's picture

29 Nov 2010 - 1:12 am | शिल्पा ब

+१
बाकी कसला कोण तो मणिशंकर हरामखोर अय्यर अन काय त्याची लायकी? त्याच्या असल्या कर्तुत्वाने सावरकरप्रेमाला तडा जाणार नाही ... अन लिखित स्वरुपात निषेध नोंदवला कि त्याची नोंद होतेच त्यामुळे तो एक पर्याय वापरावा कारण अशे काँग्रेसी किडे चेचायला आपल्याकडे तेवढा पैसा नाही...ताकद नाही.

जोशी &#039;ले&#039;'s picture

29 Nov 2010 - 9:22 am | जोशी 'ले'

त्या हरामखोर मनिशंकर चा इतिहास काय आहे ?
हा पुर्वी कम्युनिस्ट होता आणि जेव्हा भारत - चीन युध्द्द चालु होते तेव्हा हा हरामखोर लंड्न ला शिकत होता व तेथे त्याने चीन साठी मदतनीधी गोळा करायची मोहिम उघड्ली होती, काय दुदैव आहे असा *****,####,@@@ हरामखोर अजुनहि जिवंत आहे...

सुधीर काळे's picture

29 Nov 2010 - 8:06 am | सुधीर काळे

"जय हो!" इंद्रा!
सुरेख प्रतिसाद! खास करून ".... सुदैवाने कुणाच्याही डोळ्यातील अश्रूंना 'जात' नव्हती." हे वाक्य!!
सावरकरांबद्दलची ही बातमी तू जर इंग्लिश वृत्तपत्रात वाचली असशील तर त्याचा दुवा पाठव.
धन्यवाद

विकास's picture

29 Nov 2010 - 9:15 am | विकास

सुरेख प्रतिसाद! खास करून ".... सुदैवाने कुणाच्याही डोळ्यातील अश्रूंना 'जात' नव्हती." हे वाक्य!!

१००००% सहमत!

अर्धवट's picture

29 Nov 2010 - 9:36 am | अर्धवट

.... सुदैवाने कुणाच्याही डोळ्यातील अश्रूंना 'जात' नव्हती.

देवाधिराज स्वर्गाधिपती इद्रदेवांचा विजय असो..

ग्रेट प्रतिसाद इंद्राजी

सुदैवाने कुणाच्याही डोळ्यातील अश्रूंना 'जात' नव्हती हे पटले

अप्पा जोगळेकर's picture

30 Nov 2010 - 9:01 am | अप्पा जोगळेकर

अगदी समर्पक प्रतिसाद दिला आहे. दुर्दम्य पुस्तकातलं एक वाक्य आठवलं. जेंव्हा लोकमान्य टिळाक वारले तेंव्हा महात्मा गांधी खांदा देण्यासाठी पुढे झाले. तर एकजण म्हणाला की तुम्ही ब्राम्हण नसल्याने खांदा देउ नये. तेंव्हा गांधीजी म्हणाले होते , "लोकसेवकाला जात नसते."


~ हे वाक्य जर तात्यांनी वाचले असते तर व्यक्तिशः त्यांना किती वेदना झाल्या असत्या हे सांगायला खरेतर कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.

ज्या माणसाने आयुष्यभर हारच खाल्ल्ली आणी दरखेपेला हरल्यानंतर ज्या माणसाचे तेज आणि शक्ती दसपटीने वाढत गेली त्या महामानवाच्या डोळ्यांमध्ये इतक्या क्षुद्र पातळीवरच्या कॉमेंटपायी अश्रू तरळले असते किंवा त्यांनी त्रास करुन घेतला असता असं अजिबात वाटत नाही. अहो, हीन भावनेचे सार्वजनिक विसर्जन करणारे लोक जागोजाग असतातच. त्यावेळेलाही तसे लोक असणारच.

सर्वसाक्षी's picture

28 Nov 2010 - 10:38 pm | सर्वसाक्षी

पवार साहेब
स्वातंत्र्यवीर सावरकर काय अथवा छत्रपती शिवाजी महाराज काय, इतक्या महान व्यक्तिमत्त्वांना जात नसते हे खरे आहे.

श्री. अमोल यांना असे म्हणायचे असावे की मराठा समाजातील थोर व्यक्तिविषयी काही अनुचित घडले असते तर ते करणार्‍याला इतके सोपे गेले नसते कारण आज महाराष्ट्र शासनात तसेच केंद्रातही काँग्रेसला घसरणीच्या दिवसात पश्चिम महाराष्ट्रातुन भरघोस मिळाली त्यामुळे त्या समाजाला दुखावताना सरकारला विचार करावा लागेल. शिवाय मागे जेम्स लेन प्रकरणात मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व सांगणार्‍यांनी रौद्र रूप धारण केले होते तेही ध्यानात असावे. दुसरीकडे मागासवर्गीय/ अनुसुचित जातीच्या व्यक्तिविषयी कुणी काही बोलल्यास कायद्याचा बडगा + बहुजनसमाजाचे आंदोलन यांना सामोरे जावे लागेल. ब्राह्मण समाज बरा. कुणीही या आणि झोडपा, यांना वाली नाही.

त्यात पुन्हा स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकेकाळी काँग्रेस सरकारने ठरवु घातलेले भयंकर गुन्हेगार, पुरावा नसल्याने त्यांना नाईलाजाने सोडावे लागले. पण तेव्हा पासून त्यांचे चरित्र्यहनन करण्याचा वा त्यांना उपेक्षित ठरविण्याचा काँग्रेस सरकारचा डाव आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रस्तावित स्मारकासाठी फ्रान्स सरकारने जागा देण्याचे तयारी दर्शविली होती पण त्यांचे असे म्हणणे आहे की हिंदुस्थान सरकारने तशी कोणतीही मागणी / विनंती फ्रान्स सरकारकडे अधिकृतरित्या केलेली नाही असे ऐकुन आहे. अंदमानातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदगार मागे याच सरकारचे मंत्री असलेल्या मणीशंकर अय्यर यांनी उखडुन टाकले होते, त्यांचे काय कुणी वाकडे केले?

स्वातंत्र्यवीर सावरकरच काय अन्य कुणाही देशभक्ताचा स्वातंत्र्यप्राप्ती हाच धर्म होता आणि देशभक्त हीच जात होती. हे सर्व महान क्रांतिकारक जात व धर्म यापलिकडचे होते. पण राज्यकर्ते तसे नाहीत. अजुनही राजकारणात जात या विषयाला अनन्यसाधारण महत्व आहे, प्रत्येक मतदार संघात उमेदवार उभा करताना त्या मतदार संघात कुठल्या जातीचे मतदार बहुसंख्येने आहेत याचाच विचार केला जातो.

रन्गराव's picture

28 Nov 2010 - 10:55 pm | रन्गराव

>>ब्राह्मण समाज बरा. कुणीही या आणि झोडपा, यांना वाली नाही.

वाली असा वरून पडत नसतो तो आपण बनवावा लागतो. त्यासाठी एखादा धर्मनिरपेक्ष ( धर्मनिरपेक्ष ह्याचा "minority appeasement" हा प्रचलित अर्थ लावू नये. ) उमेद्वार उभा करून त्याला निवडून दिलं पाहिजे. मराठी पाउल पडते पुढे ह्या गाण्यातला एक श्लोक आठवतो -
"स्वै शस्त्र देशार्थे हाती धरावे,
चितावे रिपूला रणि वा मरावे,
तुझ्या रक्षणा तुच रे सिद्ध होई,
सदा संकटी देव धावून येई"

हा श्लोक रचणारेही ब्राह्मण होते आणि त्याच अनुकरण करनारेही काही ब्राम्हण होते उदा पहिले बाजीराव. ( खरं तर जातीन काही एक फरक पडत नाही पण जातही ग्प्प बसण्याची excuse असू शकत नाही) .
हा श्लोअक आजही लागू आहे. फक्त तलवारी जावून लेखण्या आल्या आहेत आणि मेडिया रणांगण झालं आहे. त्यामुळे जात माग ठेवून आता लढायला हरकत नसावी. :)

अर्धवटराव's picture

29 Nov 2010 - 12:27 am | अर्धवटराव

बातमी वाचून आनंद झाला.

(दु:खी) अर्धवटराव

इन्द्र्राज पवार's picture

29 Nov 2010 - 10:50 am | इन्द्र्राज पवार

माझा काहीसा भावुक वाटणारा प्रतिसाद आवडल्याचे लिहिल्याबद्दल सर्व स्नेहीप्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. श्री.सर्वसाक्षी यानी अचूकपणे म्हटल्याप्रमाणे (स्वातंत्र्यवीर सावरकर काय अथवा छत्रपती शिवाजी महाराज काय, इतक्या महान व्यक्तिमत्त्वांना जात नसते हे खरे आहे. ) सर्वानीच 'महनीय' नावाबद्दल असा भाव मनी बाळगणे सद्यस्थितीत फार गरजेचे आहे.

आदर भावनेची जी गोष्ट सावरकरांबाबत तीच गोष्ट गांधी-नेहरू यांच्याबद्दलही. भले या लोकांचे राजकारण आपल्याला पसंत असो वा नसो, पण म्हणून बोलताना/लिहिताना त्यांचे एकेरीत ('एमके, मोहन, जवाहर') उल्लेख करावेत असेही नसावे. शेवटी त्यांच्या कार्याचा देशपातळीवर जमाखर्च झालेला असतो आणि उरते ती त्यांची आठवण, ती काढत असताना निदान सौजन्य म्हणून तरी भाषेचा तोल जावू देऊ नये...इतकेच.

श्री.सुधीर काळे यांनी शासकीय पातळीवर "पत्रे पाठवणे" किती गरजेचे आहे हे वारंवार विविध प्रतिसादातून स्पष्ट केले आहे व अगदी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या कार्यालयांची ई-मेल्सही दिली आहेत. मी (याच नव्हे...तर) विविध विषयावर पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवित असतो, ज्यावर काय कार्यवाही व्हायची ती होवो वा न होतो, पण पोच मात्र जरूर येते. डॉ.एपीजे कलाम हे पत्रव्यवहाराबाबत अतिशय दक्ष असत. (श्री.काळे यांच्यासाठी ~~ http://www.hindujagruti.org/news/10746.html इथेही "ते' वृत्त टिपणीसह आहे.)

तरीही वरील 'सावरकर' प्रकरणात आम्ही मित्रांनी राष्ट्रपती/पंतप्रधान याना ई-मेल न करता 'जॉईन्ट सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ टूरिझम, भारत सरकार' याना पत्र पाठविले आहे. हे अशासाठी केले आहे की, टूरिझम डीपार्टमेन्ट वेळोवेळी ज्या पुस्तिका प्रकाशित करत असते, तीत अद्ययावत घडामोडींचा उल्लेख येण्यासाठी दक्ष असते. "अंदमान पुस्तिके"तून सावरकरांचे नाव वगळले म्हणून जर त्यांच्याकडे पत्रे आली तर त्याबद्दलची एक श्वेतपत्रिका सचिवपातळीवर तयार केली जाते व संबंधित मंत्रालयाकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी दिली जाते. त्यांचा ई-मेल आहे amitabhk@nic.in

मला माहित आहे की सचिव पातळीवर [जिथे आय.ए.एस. दर्जाचे लोक असतात.... पत्रही दोन पॅरेग्राफपेक्षा जास्त होऊ देऊ नये....या लोकांना पत्रलेखकाला नेमके काय म्हणायचे आहे एवढेच अपेक्षित असते] अशा पत्राची गांभीर्याने दखल घेतली जातेच जाते.

इन्द्रा

अप्पा जोगळेकर's picture

30 Nov 2010 - 9:09 am | अप्पा जोगळेकर

आदर भावनेची जी गोष्ट सावरकरांबाबत तीच गोष्ट गांधी-नेहरू यांच्याबद्दलही. भले या लोकांचे राजकारण आपल्याला पसंत असो वा नसो, पण म्हणून बोलताना/लिहिताना त्यांचे एकेरीत ('एमके, मोहन, जवाहर') उल्लेख करावेत असेही नसावे.
कुठे येऊन सांगताय हे इंद्रराज साहेब. मागे एकदा खुद्द तात्यांनी महात्मा गांधींची टिंगल करण्यासाठी गांधीजींचा आणि दारुची बाटलीचा असे दोन फोटो बाजूबाजूला लावले होते. आणि त्याचा आनंद झालेले असंख्य लोक इथे आहेत.
तुमच्या प्रतिसादाची जागा चुकली आहे. इथे महात्मा गांधींना कुणी वाली नाही.

नितिन थत्ते's picture

30 Nov 2010 - 9:51 am | नितिन थत्ते

>>मागे एकदा खुद्द तात्यांनी महात्मा गांधींची टिंगल करण्यासाठी गांधीजींचा आणि दारुची बाटलीचा असे दोन फोटो बाजूबाजूला लावले होते.

अहो चालतंय. असल्या गोष्टींनी (किंवा ती पहा ती पहा गांधीजींची ...... इत्यादि विडंबनांनी) गांधींची टिंगल वगैरे काही होत नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 Dec 2010 - 1:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>असल्या गोष्टींनी गांधींची टिंगल वगैरे काही होत नाही
सहमत !!! आकाशावर थुंकल्याने आकाशाचा अपमान होत नाही, जो थुंकतो त्याच्याच तोंडावर ती थुंकी पडणार. गांधीजींची अशी टिंगल करण्याने गांधीजींचा जितका अपमान झाला त्यापेक्षा करणाऱ्याची बौद्धिक पातळी जगजाहीर झाली नाही का?

>>त्याचा आनंद झालेले असंख्य लोक इथे आहेत
काही जणांना जेनुईन आनंद झाला असेल तर ती त्यांची समज. काही लोकांनी लांगुलचालन केले असेल. असेही गांधीजी महान होते हे सिद्ध करायची गरज नाही. आणि तसे करायची गरज पडली तर मिपा हे त्यासाठी योग्य स्थळ नाही.

>>तुमच्या प्रतिसादाची जागा चुकली आहे. इथे महात्मा गांधींना कुणी वाली नाही.
असे गृहीत धरू नये. आणि तसे खरे असले आणि आपण अल्पमतात असलो तरीही मत मांडावेच.

इन्द्र्राज पवार's picture

2 Dec 2010 - 8:12 pm | इन्द्र्राज पवार

".....असे गृहीत धरू नये. आणि तसे खरे असले आणि आपण अल्पमतात असलो तरीही मत मांडावेच...."

~ या विचाराशी मी पूर्ण सहमत आहे. निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी अशा मताची खूप आवश्यक असते. ८० च्या घरात येऊन पोहोचलेले कोल्हापूरचे कॉम्रेड गोविंद पानसरे हे मत सातत्याने आपल्या भाषणातून, लिखाणातून व्यक्त करीत असतात. "इथे कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराचा निवडणुकीत पराभव होणार हे नक्की माहित असतेच, पण जरी आमचा पक्ष अल्पमतात असला तरीही विजयी होऊ घातलेल्या कॉन्ग्रेसच्या उमेदवाराला व त्याच्या पक्षश्रेष्ठीना हे कळलेच पाहिजे की त्यांच्या धोरणाना इथे विरोध करणारेही, अल्पमतात असले तरी, आहेतच."

हाच नियम आपल्याला ज्या व्यक्तिमत्वाविषयी आदर वाटतो, त्यांच्याबाबतीतही लागू होतोच होतो.

इन्द्रा

चिंतामणी's picture

2 Dec 2010 - 3:29 pm | चिंतामणी

कुठे येऊन सांगताय हे इंद्रराज साहेब. मागे एकदा खुद्द तात्यांनी महात्मा गांधींची टिंगल करण्यासाठी गांधीजींचा आणि दारुची बाटलीचा असे दोन फोटो बाजूबाजूला लावले होते. आणि त्याचा आनंद झालेले असंख्य लोक इथे आहेत.

अप्पा, संदर्भ देता का? स्वा.सावरकरानी हे कृत्य केंव्हा आणि कुठे केले.

आमच्या ज्ञानात भर घाला ही मौलीक माहिती देउन.

नितिन थत्ते's picture

3 Dec 2010 - 7:43 am | नितिन थत्ते

=))

हा ज्योक शॉल्लेट आहे ब्बॉ.

विसोबा खेचर यांना 'तात्या' हे टोपणनाव वापरायला बंदी घालावी हे बरे. ;) ते काहीबाही लिहिणार आणि सावरकरांची फुकट बदनामी.

चिंतामणी's picture

3 Dec 2010 - 8:42 am | चिंतामणी

विसोबा खेचर यांना 'तात्या' हे टोपणनाव वापरायला बंदी घालावी हे बरे. Wink ते काहीबाही लिहिणार आणि सावरकरांची फुकट बदनामी.

नितिन थत्ते याच्याशी (बहुदा प्रथमच) सहमत. पण हा विनोद "खुद्द तात्यांनी" असे लिहील्यामुळे झाला हे लक्षात घ्या.

इन्द्र्राज पवार's picture

3 Dec 2010 - 9:23 am | इन्द्र्राज पवार

".....हा विनोद "खुद्द तात्यांनी" असे लिहील्यामुळे झाला हे लक्षात घ्या...."

~ बाप रे ! अन् मी ज्या क्षणाला श्री.जोगळेकर यांचे 'ते' वाक्य वाचले त्या वेळेपासून अक्षरशः सावरकर 'व्यक्ती आणि इतिहास' यावर अधिकारवाणीने बोलणार्‍या (स्थानिक) किमान अर्धा डझन ज्येष्ठांना प्रत्यक्ष भेटून हे "बाटली फोटो" प्रकरण यावर विचारले आणि अकारण त्याना गोंधळात पाडले. दोन रात्री गुगलिंग आणि विकोबाही केले...पण उत्तर शून्य (मूळात आडातच नव्हते, तर पोहर्‍यात येणार कसे...असाच प्रकार झाला). मी स्वतःला 'सावरकरांचे साहित्य आणि जीवनशैली' वाचणारा व त्यावर बर्‍यापैकी लिहू शकणारा असे मानत असल्याने श्री.आप्पांच्या त्या वाक्याने चांगलाच सटपटलो होतो...म्हणून त्यावर काही पाहणी आणि अभ्यास करूनच इथे उत्तरासाठी यावे असे ठरविले होते.

पण आता 'ते' करणारे 'तात्या' हे दुसरेच आहेत असे दिसते.

असो.

इन्द्रा

मूळ बातमी आणि इतर तपशील वाचून असं वाटतं की हे कोणाच्या आदेशाने झालेले नसून निष्काळजीपणामुळे झाले असावे.

मुद्दाम नाव काढायला लावणे आणि ढिल्या कारभारामुळे ते राहून जाणे यात फरक आहे आणि संसदेत इतका गोंधळ झाल्यामुळे ते सर्वांच्या दृष्टीस पदले आहेच. तर ते आता परत इन्क्लूड करण्यात येईल असे वाटते.

बाकी मुद्दाम केलं असेल तर अत्यंत नीच कृत्य आहे. सावरकर हे काही पुराणकालीन व्यक्तिमत्व नव्हे की त्यांचे कार्य धूसर /शंकास्पद आणि पोथ्यांमधे हरवलेले असावे.

आत्ता आत्ता पर्यंत त्यांना समोरून पाहिलेले आणि ओळखणारे लोक अस्तित्वात होते. आजही माझ्या मागच्या पिढीने त्यांना जिवंत पाहिलंय. मी स्वतः त्यांच्या निवासस्थानाजवळून (पतित पावन मंदिर) शाळेत असताना खूपदा मधल्या सुट्टीत गेलो आहे. तिथे स्थानिक लोकांकडून त्यांच्या कथा ऐकल्या आहेत.

अंदमानला जाऊन त्या कोठडीत माझ्याही डोळ्यात पाणी आलं आहे.

त्यांनी जे केलं त्या कर्तबगारीचे एक दोन साक्षीदार कदाचित अजून जिवंतही असतील.

तेव्हा असल्या फालतू शंका घेणं हे गलिच्छ आहे.

नजरचूकच असावी अशी आशा.

असंही असू शकेल/ होऊ शकेल.
कदाचित ही प्रशासनीक कुचराई / नेहमीचाच गलथानपणा म्हणून जाहीर केला जाईल; काही सांगता येत नाही. कारण काहीतरी करून सारवासारव करावी लागणारच.
या मुद्यावरूनच आता दुसरी वेळ आहे. दरवेळी भाजप/शिवसेना काय करते याकडे लोक लक्ष ठेऊन असतात.
पण आता शासनाने काहीच पाऊल न उचलल्यास सावरकरांच्या कार्याची/विचारांची आणि भोगलेल्या कष्टांची चाड असलेल्या प्रत्येकाने (यात हे लिहीणारा आणि वाचणारेही आले) दिल्लीत झोपा काढणार्‍या त्या संबंधीत मंत्र्याला आणि शक्य झाल्यास पंतप्रधानांना जाब विचारायला हवा अशी माफक अपेक्षा ~! काढू म्हणे आपण दोन दिवस दिल्लीच्या रस्त्यांवर.
आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना काय वाटते ते एकदा खणकावून कळू द्या ना त्यांनाही.

kamalakant samant's picture

29 Nov 2010 - 2:43 pm | kamalakant samant

अ॑दमानातून सावरकरा॑चे नाव काढले, हे वाचून नक्की काय वाटले ते सा॑गता येत नाही.
राग ,त्वेष,खेद्,हतबलता,भविष्याची चि॑ता या सर्व गोष्टी॑नी काहूर माजले.
आणि आम्ही फक्त पत्रोपत्री करण्याचा विचार करतो.दुसरे काहीच करु शकत नाही.
त्या धुर॑धरानी दिलेला स॑देश कुठल्या अडगळीत पडला आहे कोण जाणे ?
लेखण्या मोडा आणि ब॑दूका हातात घ्या.
प्राप्त परिस्थितीत ते शक्य नाही हे दिसत असूनही निदान लेखणिनी तरी---
याल तर तुमच्या सह,न याल तर तुमच्या विना,आणि विरोध कराल तर
तो मोडून काढून ---- हा स॑देश द्यायला काय हरकत आहे ?
मला असे वाटते-मार्सेल्स ब॑दराला त्या॑चे नाव द्यावे अशी मागणी फ्रान्स सरकारकडे करावी.
पण अशीही श॑का येते की आपले सरकार अ॑दमान बाबतीत निष्क्रीय राहील आणि फ्रान्स सरकार
मात्र हो म्हणेल.

सुधीर काळे's picture

29 Nov 2010 - 3:37 pm | सुधीर काळे

वा! मला असे वाटते-मार्सेल्स बंदराला त्यांचे नाव द्यावे अशी मागणी फ्रान्स सरकारकडे करावी. पण अशीही शंका येते की आपले सरकार अ॑दमान बाबतीत निष्क्रीय राहील आणि फ्रान्स सरकार मात्र हो म्हणेल. Hats off, Mr Samant!
पण या धाग्यामुळे माझ्या समविचारांचे बरेच सभासद 'मिपा'वर आहेत हे वाचून बरे वाटले.
यातले असे कित्येक सभासद आहेत जे मला 'व्यनि'वर प्रतिसाद देतात व 'लेखाखाली कां लिहीत नाहीं' असे विचारल्यास त्याचे कारण 'कुचेष्टा'च आहे हे समजते.
'मिपा'वर असे भीतीचे जे वातावरण आहे ते दूर करण्यासाठी लागतील ते प्रयत्न झाले पाहिजेत! मी एक-दोन संपादकांना एक महिन्यापूर्वी लिहिले होते.
हे संस्थळ भयमुक्त असले पाहिजे. आज ते तसे नाहीं हे नक्की!

स्वानन्द's picture

29 Nov 2010 - 6:02 pm | स्वानन्द

>>हे संस्थळ भयमुक्त असले पाहिजे

काळे काकांशी अंशतः सहमत. कधी कधी चेष्टेचा अतीरेक होतो. पण मुळात भय वाटूनच्का घ्यावे. आपल्या मताला केला जाणारा विरोध जर 'केवळ खिल्ली उडवण्यासाठी' केलेला असेल तर सर्ळ दुर्लक्ष करावे. आणि जिथे विरोध करणार्‍याचा सूर कुचेष्टेचा नसेल तिथे उलट अधिक चर्चेला वाव राहतो. आणि आपल्याला माहीत नसलेला दृष्टीकोन नव्याने कळतो. चर्चेचा हाच तर फायदा आहे. जिथे मूळ विचार / विश्वास /श्रद्धा यांच्यात फरक असेल, तिथे 'we agree to disagree' म्हणून मोकळं व्हायचं.

'परी तू जागा चुकलासी' असे म्हणावेसे वाटते. कारण जे लोक माझ्याशी फक्त 'व्यनि'द्वारेच बोलतात त्यांच्याविषयी मी तसे लिहिले आहे, स्वतःबद्दल नाहीं. मी भीत असतो तर हे सगळं लिहिलंच नसतं, नाहीं कां!
असो. मी स्पष्ट लिहिल्यामुळे माझ्यासारखाच विचार करणारे बरेच सहसभासद आहेत हे कळून मला खरंच आनंद झाला. आणि हा आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारणारा समुदाय वाढेल व त्यामुळे अशा जनसमुदायाच्या मतांना डावलता येणार नाहीं अशी शक्ती निर्माण होईल अशी आशा करून इथेच थांबतो.
जिथे विरोध करणार्‍याचा सूर कुचेष्टेचा नसेल तिथे उलट अधिक चर्चेला वाव राहतो. आणि आपल्याला माहीत नसलेला दृष्टीकोन नव्याने कळतो. चर्चेचा हाच तर फायदा आहे. जिथे मूळ विचार / विश्वास /श्रद्धा यांच्यात फरक असेल, तिथे 'we agree to disagree' म्हणून मोकळं व्हायचं.
फक्त सहमतच नाहीं तर विविध मतांचे मी स्वागतच करतो!
फक्त "Attack the message, not the messenger" हे लक्षात ठेवले कीं बस्स.

अर्धवट's picture

29 Nov 2010 - 10:35 pm | अर्धवट

च्यायला... काळेकाका.. आमी पाठींबा द्येतो तो तुमी मोजतच नाय का काय...

अंमळ दुखावलो..

शिल्पा ब's picture

29 Nov 2010 - 11:06 pm | शिल्पा ब

तुम्हीच स्वताला अर्धवट म्हणवता...तुम्हाला कोण कशाला मोजील?

स्वानन्द's picture

29 Nov 2010 - 11:59 pm | स्वानन्द

नाही नाही, मी ते तुम्हाला नाही तर केवळ व्यनी करणार्‍यासाठी म्हटलं होतं.

धमाल मुलगा's picture

29 Nov 2010 - 2:56 pm | धमाल मुलगा

चला, आज तात्याराव सावरकरांना वगळलं, उद्या शिवाजीमहाराजांनाही वगळा...किंवा 'ते महाराष्ट्रातील एक लुटारु होते' असं लहान पोरासोरांना शाळांमधून शिकवायला सुरुवात करा!
आम्ही बसलोच आहोत इथे निषेधाचे पाऊस पाडायला.

किंवा 'ते महाराष्ट्रातील एक लुटारु होते' असं लहान पोरासोरांना शाळांमधून शिकवायला सुरुवात करा!

करा? झालंच आहे आधीच... चर्चप्रणीत एका शाळेतला किस्सा सांगितला तर विचारवंत आधीच आमच्यावर डाफरुन असतात ते अजुन डाफरतील... असो. आपलेच दात आपलेच ओठ !!

छोटा डॉन's picture

29 Nov 2010 - 3:06 pm | छोटा डॉन

अवलियाशी सहमत.
मागच्यावेळी जेव्हा IGNOU & अलिगढ युनि. च्या पुढाकाराने जेव्हा नविन अभ्यासक्रम रचला गेला तेव्हा शिवाजी महाराजांची दखल ३-४ वाक्यात घेतली होती असे माहित आहे.

- छोटा डॉन

अवलिया's picture

29 Nov 2010 - 3:17 pm | अवलिया

काहीही करुन मुसलमान, ख्रिश्चनांना दुखवायचे नाही हे कॉन्ग्रेसचे धोरण आहे.
सत्य मांडणारा जातीयवादी, हिंदुत्ववादी.
आणि या कान्ग्रेसी भुमिकेला विचारवंतांचा पाठिंबा असतो.

खरे तर हे असले युरोपी आणि अमेरिकी विचारांवर जगणारे विचारवंत म्हणजेच जिथे खाल्ले तिथेच ताटात ओकणारे नराधम हीच भारताची खरी समस्या आहे,

'ओकण्या'च्या जागी 'वरिजिनल' वापरा कीं!
पण 'समझनेवाले समझ गये हैं, ना समझे?' इतना नासमझ कोई नहीं है!

सुधीर काळे's picture

29 Nov 2010 - 3:18 pm | सुधीर काळे

नानासाहेब, लिहा ना! आम्ही वाचलेले नाहीं हे 'प्रकरण'!!

विवेक मोडक's picture

29 Nov 2010 - 4:39 pm | विवेक मोडक

@धमु,

आपले अत्यंत लाडके चाचा नेहरु या आधीच शिवाजीमहाराजांना वाट चुकलेला देशभक्त म्हणुन गेले आहेत. आणि तात्याराव सावरकरांचा नेहरु गांधी घराण्याशी संबंध नसल्यामुळे ते देशभक्त असुच शकत नाहित.

स्वैर परी's picture

29 Nov 2010 - 9:59 pm | स्वैर परी

+१

परिकथेतील राजकुमार's picture

29 Nov 2010 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार

सकाळीच वाचलेले आणि फेसबुक स्टेटसला डकवलेले 'If pro is the opposite of con, is progress the opposite of congress? (Richard Lederer)' हे वाक्य आठवले.

चिंतामणी's picture

30 Nov 2010 - 12:16 am | चिंतामणी

'If pro is the opposite of con, is progress the opposite of congress?

आवडले.

अविनाश कदम's picture

30 Nov 2010 - 1:04 am | अविनाश कदम

.........त्यांचा हिंदुत्ववाद पटला त्यांना त्यांची विज्ञाननिष्ठा पटली नाही आणि ज्यांना त्यांची विज्ञाननिष्ठा पटली त्यांना त्यांचा
हिंदुत्ववाद पटला नाही......

घोटाळा हा झाला की सावरकर विज्ञननिष्ट होते हे खरे पण दुर्दैवाने त्यांचा हिदुत्ववाद विज्ञाननिष्ट तत्त्वावर आधारीत नव्हता. समाजाकडे विज्ञननिष्ट दृष्टीकोनातून पहाणारा हिदुत्त्ववादी होऊ शकत नाही. हा विरोधाभास समजला नाही तर सावरकर समजणे कठीण.

क्लिंटन's picture

30 Nov 2010 - 1:35 am | क्लिंटन

सावरकर विज्ञननिष्ट होते हे खरे पण दुर्दैवाने त्यांचा हिदुत्ववाद विज्ञाननिष्ट तत्त्वावर आधारीत नव्हता

मग नक्की कशावर आधारलेला होता? स्पष्टीकरण केल्यास चांगले होईल.

समाजाकडे विज्ञननिष्ट दृष्टीकोनातून पहाणारा हिदुत्त्ववादी होऊ शकत नाही.

हीच तर मोठी गफलत आहे ना.कारण हिंदू धर्म म्हणजे काय याची एक व्याख्या नाही. विविध आचारविचारांचे, रूढीपरंपरांचे लोक एकाच वेळी हिंदू असू शकतात. म्हणजे उपास,पूजाअर्चा, श्राध्दपक्ष आणि विविध कर्मकांडे करणारे पण हिंदूच आणि माझ्यासारखे कर्मकांडामध्ये विश्वास न ठेवणारेही हिंदूच. सिध्दीविनायकाची पूजा करणारे पण हिंदूच आणि मरिआईची पूजा करणारे आदिवासी पण हिंदूच. ख्रिस्ती लोकांमध्ये येशू ख्रिस्त आपल्या पापांकरता क्रुसावर चढला हे मान्य नसेल तर तो मनुष्य ख्रिस्ती असू शकत नाही कारण तो ख्रिस्ती धर्माचा मूळ विश्वास आहे.पण हिंदूंमध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी केली अथवा केली नाही तर तो मनुष्य हिंदू नाही. अर्थात यात काहीही वावगे नाही. मी वैयक्तिक पातळीवर याच aproach चे समर्थन करतो. पण यातून होते काय की हिंदू म्हणजे नक्की कोण आणि हिंदुत्व म्हणजे नक्की काय याची स्पष्ट व्याख्या करता येत नाही.

तेव्हा या सगळ्या जंजाळात सावरकरांची हिंदू शब्दाची व्याख्या म्हणजे "दक्षिणेतील समुद्रापासून उत्तरेतील हिमालयापर्यंत पसरलेल्या या भारत देशाला जो आपली पित्रुभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू". त्या अर्थाचा संस्कृत श्लोकही आहे. आणि त्यापुढे जाऊन हिंदूंनी विज्ञान हाच धर्म मानावा असे त्यांचे मत. म्हणजे कर्मकांडांना फाट्यावर मारावे.सावरकरांची सत्यनारायण पूजा, गाईची पूजा यावरील मते तर प्रसिध्दच आहेत आणि त्यांच्या विज्ञाननिष्ठ निबंधांमधील विचार भल्याभल्यांची भंबेरी उडवतील असेच आहेत.

तरीही सर्वसमावेशक हिंदू परंपरेप्रमाणे एकाही देवाची मूर्तीस्वरूपात पूजा केली नाही, एकही कर्मकांड केले नाही,विज्ञानालाच धर्म मानले तरी असे करणारा सुध्दा हिंदू म्हणूनच स्वत:ला म्हणवून घेऊ शकतो आणि विज्ञाननिष्ठ लोक दिसले तर विटाळ होऊन अंघोळ करणारे सुध्दा हिंदूच.

तेव्हा "समाजाकडे विज्ञननिष्ट दृष्टीकोनातून पहाणारा हिदुत्त्ववादी होऊ शकत नाही" असे म्हणताना कोणते "हिंदुत्व" तुम्हाला अपेक्षित आहे? कारण या वाक्यातच मुळात विसंगती वाटते.

शिल्पा ब's picture

3 Dec 2010 - 3:06 am | शिल्पा ब

एक लक्षात घेतले पाहिजे कि हिंदू धर्म इतरांसारखा कोता नाही...अमुक एक केले कि मी हिंदू असे किंवा उलटे असे नाही..
ज्या काही रूढी, कर्मकांडे आहेत ती त्या त्या समूहाने स्वतःची रोजी रोटी चालू राहावी म्हणून सुरु केलेत असे जाणवते.
अमुक एकाच देवाची पूजा करा, अमकेच कपडे करा...इतर देवांची पूजा केली तर धर्मातून बाहेर हे प्रकार आपल्यात नाहीत..हिंदू धर्म खूप ओपन आहे...
अभ्यासू माझे म्हणणे कदाचित व्यवस्थित मांडू शकतील.

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्
हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५०)

'हिंदू' शब्दाची उत्पत्ती
... आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. आणि त्या जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू हयाच नावाने ओळखत असत. - (१९२३ हिं.,स.सा.वा. ६ : ५)

हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही
महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले गेल्यापूर्वी हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ४६)

हिंदू शब्दाची व्याख्या
आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥

- (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७५)

सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७४)
हिंदुधर्म
'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे. - (१९४९ स.सा.वा. ३ : ७१३)

स्वा.सावरकरांचे विचार समजुन घेण्यासाठी समग्र सावरकर वाङमय वाचावे असे मला वाटते.

नितिन थत्ते's picture

3 Dec 2010 - 8:24 am | नितिन थत्ते
विकास's picture

3 Dec 2010 - 8:49 am | विकास

आणि हे पण... ;)

स्वगतः पर्यावरण विषयात काम करता करता स्वतःचे प्रतिसाद पण रिसायकल/रियुज करता येऊ लागले आहेत... ;)

नितिन थत्ते's picture

3 Dec 2010 - 9:05 am | नितिन थत्ते

आणि या "दुव्या"च्या खालचे प्रतिसादही वाचावे.

डावखुरा's picture

2 Dec 2010 - 11:42 pm | डावखुरा

@ क्लिंटन तो संस्कृत श्लोक "जननी जन्मभूमी स्वर्गदपि गरियसी" हा आहे का?
नसेल तर कोणता आहे?

क्लिंटन's picture

2 Dec 2010 - 11:56 pm | क्लिंटन

माझ्या आठवणीप्रमाणे "आसिंधुसिंधुपर्यन्ता यस्य भारतभू: पितृभू पुण्यभूश्चैव सरैव हिंदूरिती स्मृत:"

चू.भू.दे.घे. पण श्लोकाचा अर्थ वर दिल्याप्रमाणेच आहे आणि ते जास्त महत्वाचे.

विकास's picture

3 Dec 2010 - 2:44 am | विकास

हाच तो श्लोक आहे. मला वाटते सावरकरांनीच तो रचला होता. त्या संदर्भातील थोडक्यात प्रतिसाद येथे पाहू शकता...

तो श्लोक "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि" असा आहे

विकास's picture

3 Dec 2010 - 8:52 am | विकास

तो श्लोक "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि" असा आहे

अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी ॥

असे राम लक्ष्मणाला म्हणतो..