गाभा:
असे म्हणतात, किंवा मानले जाते कि हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत.....
इतके देव? एका देशाची लोकसंख्या एवढी होऊ शकते...
मला एवढीच माहिती हवी आहे कि आपल्याला जास्तीत जास्त २५ ते ५० देवांची नावे माहित आहेत ...
मग बाकीच्या देवांचं काय?
कुठल्या ग्रंथात याचा उल्लेख आढळतो काय?
प्रतिक्रिया
1 Dec 2010 - 3:17 pm | परिकथेतील राजकुमार
आमच्या विजुभौंनी खुप पुर्वी ह्याचा उपापोह मिसळपाव वर केलेला आहे. तो वाचा, आपल्या ज्ञानात भर पडेल.
1 Dec 2010 - 3:28 pm | स्पा
धन्यवाद........................
बघूया काही माहिती मिळतेय का ते?
1 Dec 2010 - 3:36 pm | गवि
आणि ते सर्व गायीत आहेत हे विशेष...
2 Dec 2010 - 9:26 am | पंगा
एकंदरीतच आपल्या संस्कृतीत, आपल्या परंपरांमध्ये (येथे 'आपली संस्कृती' आणि 'आपल्या परंपरा' या शब्दसमूहांचे अर्थ आपापल्या सोयीप्रमाणे हवे तसे घ्यावेत.) प्राणिमात्रांच्या शरीरांस अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे अभ्यासाअंती लक्षात येते. आणि जेथेजेथे म्हणून हे महत्त्व विशद करणारे दाखले सापडतात, तेथेतेथे 'धारणक्षमता' (अर्थात मराठीत 'कप्यासिटी') या एकमेव गुणधर्माचा उदोउदो झालेला आढळतो.
याकरिता Bos primigenius indicus (?) (अर्थात गाय किंवा गोमाता) या प्रजातीचे उदाहरण (गायीच्या शरीराची कप्यासिटी तेहतीस कोटी देव एवढी मोठ्ठी असणे, वगैरे) हे जरी सर्वज्ञात असले, तरी हे काही एकमेव उदाहरण नाही. याचे अन्य ढळढळीत दाखलेही भरपूर आहेत.
गोमातेप्रमाणेच Equus africanus asinus (अर्थात रासभ, गर्दभ अथवा गाढव) या प्रजातीतील प्राण्याचे उदाहरण हे तसे आपल्या नेहमीच्या पठडीतले असले, तरी अतिपरिचयामुळे त्याची अवज्ञा झाल्याने चटकन लक्षात येत नसावे. या प्राणिविशेषाच्या पचनसंस्थेचे निम्नांग हे जगातील एकमेवाद्वितीय आणि अजब वस्तुसंग्रहालय म्हणून गणता यावे. जगातील कोणतीही व्यक्ती अथवा वस्तू घ्या, कोणी ना कोणी कधी ना कधी तिची रवानगी या स्थळविशेषात केलेली असतेच. त्यामुळे नुसते तेहतीस कोटी देव वगैरे काय घेऊन बसलात, पण जगातील कोणतीही वस्तू अथवा व्यक्ती (संग्राह्य असो वा नसो. येथे 'संग्राह्य'ऐवजी 'संग्रहणीय' हा शब्द वापरण्यास प्रत्यवाय नसावा; किंबहुना हा दुसरा पर्याय अधिक चपखल बसावा.) या ठिकाणी सापडू शकते. (आपले जुन्या, हरवलेल्या मित्रांची पुनर्भेट घ्यायची झाल्यास या स्थळास जरूर भेट द्यावी. बहुधा तेही आपल्या शोधात येथेच आलेले असण्याची शक्यता दाट आहे.) सबब धारणक्षमतेच्या दृष्टीने हे स्थळविशेष (आणि पर्यायाने गर्दभशरीर) हे वस्तुतः गोमातेच्या शरीराहूनही अधिक उजवे ठरते, असा आमुचा विनम्र दावा आहे.
याचप्रमाणे Bubalus bubalis (अर्थात पाणम्हैस अथवा भारतीय म्हैस) या प्रजातीचाही शारीरिक धारणक्षमतेबद्दलचा दावा सामान्य माहितीत असावा. परंतु तज्ज्ञांच्या मतानुसार वरील दोहोंच्या तुलनेत प्रस्तुत धारणक्षमता ही खूपच कमी मानली जाते. (गर्दभशरीराप्रमाणेच प्रस्तुत प्राणिविशेषाच्या मादीच्या शरीरातील प्रजननसंस्थेचे विस्तृत मुख हेही अनेक गोष्टींचे लोकप्रिय संग्राहक असले, तरी येथे सापडणार्या वस्तूंमध्ये तितके वैविध्य दिसत नाही, अशी तक्रार आहे. किंबहुना - विशेषकरून व्यक्तींच्या बाबतीत - येथे रवानगी होणार्या व्यक्तींचा मूळ स्रोत हा बहुतकरून येथीलच असणे आवश्यक असून, केवळ 'जेथून आलात तेथे परत' या बोलीवर त्यांची पुनर्पाठवणी येथे होते, अशी किंवदंता आहे. आणि ग्राहकसेवातत्परतेकरिता जरी 'माल पसंत न पडल्यास परत' हे एक अतिशय चांगले तत्त्व असले, तरी इतक्या टोकाच्या परतीचे जगातील हे एकमेव उदाहरण असावे.) या कारणाकरिता हे उदाहरण सुपरिचित असूनसुद्धा हा दावा गांभीर्याने घेतला जात नाही, याचे एक मराठी माणूस या नात्याने आम्हांस अतीव दु:ख होते. वास्तविक म्हैस हा आम्हा मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय (पहा: पु.ल.: "म्हैस".) आणि मराठी जीवनशैलीचे अतूट अंग आहे. इतर प्रांतांच्या तुलनेत महाराष्ट्रात गायीच्या दुधाच्या मानाने म्हशीचे दूध बर्यापैकी लोकप्रिय आहे हे लक्षात घेता, उत्तरभारतीयांची भलेही गोमाता असेल, पण आम्हा मराठीजनांच्या नसांनसांतून वाहणारे रक्त हे आम्ही प्राशन केलेल्या आमच्या महिषीमातेच्या स्तन्यापासून बनलेले असून, त्या महिषीमातेचे आम्ही सुपुत्र आहो. अशा या आमच्या महाराष्ट्रात म्हशीच्या - साक्षात आमच्या मातेच्या - एका साध्याशा दाव्याकडे फुटकळ कारणे देऊन दुर्लक्ष केले जाते, ही लांच्छनास्पद बाब आहे. मराठी अस्मितेचे तारणहार (जर म्हशीचे दूध प्याले असतील तर) याकडे लक्ष देतील काय?
(तळटीप: येथे उल्लेखिलेली सर्व ल्याटिन प्रजातिनामे ही विकीवरून साभार. त्यांच्या येथील उद्धरणात जर काही चूकभूल झालेली असेल, तर ती सर्वस्वी माझी.)
2 Dec 2010 - 9:34 am | स्पा
एवढी विस्तृत माहिती दिल्याबद्दल आभार...
1 Dec 2010 - 5:06 pm | शैलेश हिंदळेकर
३३ कोटी देवही कमी पडतात. एवढे देव असूनही लोकांना बाबा आणि महाराजांची गरज पडते आहे.
1 Dec 2010 - 5:15 pm | विजुभाऊ
शंका: गायीला अपचन झाले तर पोटातल्या ३३ कोटींनी त्यावेळेस कोणता स्टॅन्ड घ्यावा याचे मार्गदर्शन कोण करते
1 Dec 2010 - 11:11 pm | मूकवाचक
आई मुलाचे अपराध पोटात घेते असे पण म्हणतात. तिला अपचन झाले तर हे अपराध काय स्टॅन्ड घेतात अशी मला पण एक (लघु?)शन्का आहे.
(आपल्याला अपचन झाले असेल तर म्हशीच्या दुधापेक्षा गायीचे (देशी, जर्सी नव्हे) दूध सुपाच्य असते असे मार्गदर्शन वैद्य लोक करतात असे ऐकून आहे. खरे की खोटे माहित नाही. )
1 Dec 2010 - 5:18 pm | स्पा
गायीला अपचन झाले तर पोटातल्या ३३ कोटींनी त्यावेळेस कोणता स्टॅन्ड घ्यावा याचे मार्गदर्शन कोण करते
हॅ हॅ :)
1 Dec 2010 - 5:59 pm | गणेशा
नोट : (खालील माहीती ही धार्मिक लोकांना न पटण्यासारखी आहे, कृपया याचा उहापोह करु नये अशी विनंती,
माझे आई वडिल ही देवाला माणतात .. मी त्यांच्या साठी देवाला जातो .. पण माझ्या कल्पना वेगळ्या आहेत त्या देतोय ..
येथे कोणाच्या भावना दुखावल्यास शमस्व, पण वाद घालु नये आपल्या विचारांचा ही आदरच केला जाईल माझ्याकडुन )
---------------------
देव ही संकल्पनाच माणसाने निर्मान केली आहे.
आपल्या मागे कोणाचा तरी भक्कम आधार असावा, कींवा कुठल्यातरी माणसाची शक्ती ही आपल्यापेक्षा जास्त असल्याने तो त्यास मानण्यास लागल्याने त्यास देव ही संकल्पना रुढ झाली असावी अशी माझी समजुत आहे..
कुठलेही कार्य करताना आपल्याबरोबर कोणी असल्यास माणसास आधार मिळतो तशीच एक अज्ञात शक्ती आपल्यामागे आहे मग आपण योग्य काम केल्यावर नक्की फळ मिळेलच या अश्या समजुतीने त्या अज्ञात शक्ती म्हणजे देवाचे स्थान निर्माण झाले असावे असे माझे मत आहे.
मल नेहमी प्रश्न पडायचे की कर्ण सुर्य पुत्र कसा ... भिम पवनपुत्र कसा .. अर्जुन इंद्र पुत्र कसा वगैरे वगैरे ..
मग हा सुर्य कोणाचा पुत्र .. पवन कोणाचा पुत्र , इंद्र कोणाचा पुत्र वगैरे वगैरे ...
नंतर माझ्या लक्षात आले असे काही नाहीच शिवाय हे सर्व माणसाने निर्मिलेले आहे .. इंद्र, यम, चंद्र असे सगळे नक्कीच माणुसच असतील (कदाचीत राजा असतील) लोक त्यांना त्यांच्या कृत्याने ओळखत असतील आणि नंतर त्यांना त्यांच्या कार्यानुसार स्थान दिले असेन त्यांना ... त्यालाच नंतर देव माणण्यात आले असेन .
असे नसेल तर मग मला आणखिन प्रश्न पडतात के मग खरेच देव आहे आणि त्यांनीच सृष्टी निर्मान केली ..
तर महादेव, विष्णु आणि ब्रम्हदेव हे काय फक्त हिंदुस्थानावरच लक्ष ठेवुन होते काय ते ही हिंदुंवर .. बाकीचे जग त्यांनी निर्मिले नव्हते काय ?
त्यांचे अवतार फक्त येथेच का झाले आहेत ..?
यावरुन मला वाटले .. येथील राजे .. अन्यायाविरुद्ध लढणार्या माणसांच्या भाकड कथे मुळे ते पुढे पुढे देव या संकल्पणेत गेले असावेत ...
----
माझे नावच गणेश आहे तरी मला प्रश्न पडतो की गणेशा ला तोंड हत्तीचे कसे काय चिकटले ... बर्र लावले तरी त्याचा मेंदु पुर्ववत माणसा सारखा कसे वर्क करु लागला ...
एका पुस्तकात वाचले होते की कुंती बसली होती .. तीच्या चुकीमुळॅ ती आता कुवारी माता बणनार होती ..
ती पाठमोरी बसली असताना .. उष्ण लोट वाहु लागले .. एक गरम गोळा तीच्या शरीरातुन आरपार गेला आणि ती गर्भवती राहिली ... पुढे तीला कर्ण झाला
हे शक्य तरी आहे का ?
असेच बरेच शे लिहिले गेले असेल .. काहींनी असल्त्या कथेला तुच्छ माणले असेन.. काहींनी काही लेखनाला सध्य परीस्थीती अशीच आहे म्हणुन महाग्रंथ म्हण्ले असेन वगैरे वगैरे ..
स्वर्ग कोठे असते हे कोणालाच माहीती नसते ..
मग अर्जुन स्वर्गात गेला होता ? इंद्र स्वर्गाचा राजा आहे ... अमका नरकाधिपती आहे .. हे कोणी कधी कोणाला सांगितले आहे ?
माणसानेच या कल्पना केल्या आहेत आणि त्या श्रद्धेला तो कुरवाळुन बसला आहे.
बरेच प्रश्न आहेत
३३ कोटीच देव का ? तर तो माणसाने अंदाजपंचे म्हणालेली संख्या आहे .. गाईच्या पोटात असतात .. तात्पर्य यीतकेच असेन की , तुमची गाई आम्हाला दान द्या तुम्ही सुखी व्हाल असे काही तरी चातुर्य असेन.. बाकी यामागे काहीच खरे वाटत नाही.
मग गाईचय पोटात ३३ कोटी देव असतील तर सगळ्या गाईंमध्ये तेच ३३ कोटी देव असतात का? की वेगळे ३३ कोटी देव असतात .. ?
बर काही देवांना पुत्र झाले , उदाहरण शंकाराचे घेतो .. त्यांना गणेश .. कार्तिकेय हे पुत्र आहेत .. तर मग त्यांना आता अजुन पुत्र का होत नाहियेत ... देवांना वयाचे बंधन नाहीत म्हनुन स्वर्ग सगळ्या पोरांनी त्यांच्या वारसांनी असे भरु नये म्हणुन त्यांनी नियंत्रण ठेवले आहे का ? (देव अमर आहेत ही संकल्पना लक्षात घेवुन)
यावरुन असे लक्षात येते की माणसाने त्याला जमेल तेव्हडेच देव निर्मान केले आहेत .. कोणा कोणाचे पुत्र हे त्याने एक तर खर्या माणसांचय अस्तीत्वावरुन किंवा अंदाजपंचे सांगितले आहे..
असो थांबतो , जाता जात एक खंत सांगतो .. शिवाजी महाराज जसे जन्माला आले .. त्यांच्यावर लोकांनी प्रेम केले .. माणसांनी त्यांना देवासमान माणुन देवघरात त्यांना स्थान दिले .. अजुनही ते आमच्या देवघरात आहेतच ..
पण अजुन हजार वर्षानंतर जर ही माणव जात अशीच अस्तीत्वात असेन तेंव्हा हे शिवाजी महाराज ही त्या लोकांच्यात देव असतील .. अआणि विष्णु ने जसा रावणाचा वध करण्यासाठी राम अवतार घेतला होता तश्या अनेक कथा यांच्या ही असतील ..
---------
1 Dec 2010 - 6:06 pm | अवलिया
३३ कोटी ? अहो कोणत्या जमान्यात आहात? आम्ही आता लवकरच एक नवे पुराण लिहित आहोत त्यात देवांची संख्या १०० कोटी इतकी दा़खवणार आहोत. ज्यांना आक्षेप असेल त्यांनी योग्य ठिकाणी जावे. नसेल त्यांनी जय देवा म्हणुन जयजयकार करावा !!
धन्यवाद.
1 Dec 2010 - 7:12 pm | नगरीनिरंजन
३३ कोटी देवांची नावं मी आत्ता इथे लिहीली असती पण सेकंदाला एक या वेगाने लिहीलं तरी साडेदहा वर्षं लागतील.
1 Dec 2010 - 7:54 pm | गणेशा
मस्त उत्तर .. आवडले
यावर युक्तीवाद म्हणजे --> म्हणुनच ३३ कोटी देव जीच्या पोटात आहेत तीचे नाव लिहायचे म्हन्जे ३३ कोटी देवांची नावे लिहिल्या सारखेच आहे
1 Dec 2010 - 7:15 pm | स्पा
सेकंदाला एक या वेगाने लिहीलं तरी साडेदहा वर्षं लागतील
खरय.....
म्हणजे या पुराण संकल्पनाच मानायच्या तर......
1 Dec 2010 - 7:28 pm | डावखुरा
अहो नगरीनिरंजन ते सगळे मान्य पण तुम्हाला नक्कि माहीत आहेत का?
आहे तर कुठे आहे ती यादी कोणत्या ग्रंथात?
1 Dec 2010 - 8:05 pm | मूकवाचक
कोटि = प्रकारचे (उदा. झाकिर हुसेन उच्च कोटीचे तबलावादक आहेत)
११ रुद्र
१२ आदित्य
८ दिक्पाल
२ अश्विनी कुमार
= ३३
बाकी चालू द्या ...
1 Dec 2010 - 8:09 pm | नगरीनिरंजन
वा! हे पटलं. आणि गाईच्या पोटात असतात असं का म्हणतात ते पण सांगा माहिती असेल तर.
1 Dec 2010 - 8:25 pm | मूकवाचक
तशी वेळ कुणावर येऊ नये. पण मातेचे स्तन्य काही कारणाने मिळाले नाही तर बाळाला त्यातल्या त्यात गायीचे दूध मानवते असे म्हणतात. गायीबद्दल एका उदात्त भावनेने मातृभाव ठेवणे फारसे चुकीचे ठरेल असे वाटत नाही. आणि तो ठेवला म्हणून बैलाबद्दल पितृभाव ठेवा असा त्यापेक्षाही उदात्त भावनेने कुणी आग्रह धरत असेल, तर त्यानी तसे अवश्य मानावे. मुळीच हरकत नाही.
सूर्य, वरुण इ. ना देवतांचे स्थान देणारे फारसे चूक नसावेत. त्यांची उदात्त भूमिका आपल्या पचनी पडली असती तर ग्रीन हाउस इफेक्ट आणि कार्बन फूटप्रिंट मोजत बसण्याची वेळ यावी इतकी निसर्गावर कुरघोडी करत भोगलालसा वाढलीच नसती असे वाटते. असो.
1 Dec 2010 - 9:34 pm | नगरीनिरंजन
सूर्य, वरुण इ. ना देवतांचे स्थान देणारे फारसे चूक नसावेत. त्यांची उदात्त भूमिका आपल्या पचनी पडली असती तर ग्रीन हाउस इफेक्ट आणि कार्बन फूटप्रिंट मोजत बसण्याची वेळ यावी इतकी निसर्गावर कुरघोडी करत भोगलालसा वाढलीच नसती असे वाटते. असो.
सहमत आहे.
1 Dec 2010 - 10:25 pm | अर्धवटराव
आयला.. तुमचे फंडे कसले क्लीअर आहेत राव.
बाकी तुमचे ते दार्शनीक धागे बंद का पडलेत? पुढील भाग कधी??
(वाचक) अर्धवटराव
3 Dec 2010 - 6:13 pm | चिंतामणराव
मागे ह्याच विषयावरील चर्चेत सांगीतले होते. पुन्हा सांगतो.
१५ वर्षांपूर्वि सेंन्द्रीय (organic fertilizer) खतावर काम करतांना वेगवेगळ्या प्राण्यांच्या शेणाचा अभ्यास केला होता. ओल्या कचर्याचे खतांत रुपांतर करण्यासाठी आवश्यक असणारे Microbes प्राण्यांच्या शेणांत असतात. आम्ही गाय, बइल, घोडा, म्हैस, उंट, सिंह, अस्वल व हत्ती अशा सर्व प्राण्यांच्या शेणाचा अभ्यास केला. आवश्यक असणारे Microbes गायीच्या शेणांत ईतर प्राण्यांच्या तुलनेत १० पट जास्त आढळले. त्यांची संख्या millions मधे मोजावी लाग्ते. गाय काहीही खाउन दुध, गोमुत्र आणि शेण असे आपल्याला उपयोगी असलेले पदार्थ बनऊ शकते ते ह्या ३३ कोटी "देवांच्या " मदतीने.
1 Dec 2010 - 8:36 pm | स्पा
११ रुद्र
१२ आदित्य
८ दिक्पाल
२ अश्विनी कुमार
मग आम्हाला माहित असलेल्या गणपती, कृष्ण, शंकर आदि देवांचा कशात समावेश होतो...?
रुद्रात कि आदित्यांत कि आणखी कशात?
1 Dec 2010 - 10:53 pm | मूकवाचक
या अधिदैविकाच्या शास्त्रातही वेळोवेळी बदल होत गेले आहेत. उदा. आदि शंकराचार्यांनी पंचायतन पूजा रूढ केली. काही मंत्रात सहस्त्रकोटी देवानां, नवकोटी गंधर्वान असे असते.
हेच शास्त्रीय संगीतातल्या रागांचे आहे. पूर्वी राग, रागिण्या आणि त्यांचे पुत्र, पुत्रवधू अशी वर्गीकरण व्यवस्था होती. कर्नाटक संगीतात ८४ थाट मानतात . आपल्याकडे दहा थाटात रागांना कसेबसे कोंबावे लागते. मग गोरख कल्याण राग कल्याण थाटात का हे उत्तर देणे अवघड जाते. (तात्या वगैरे जाणकार लोक यावर सविस्तर लिहू शकतील.)
यामुळे शास्त्रीय संगीत हा उपहास, थट्टा आणि कुचेष्ठेचा विषय झाल्याचे ऐकिवात नाही. तेच आधिदैविक शास्त्राबद्दल करावे असे मी मानतो. अशा प्रश्नान्ची नेमकी उत्तरे देणे अशक्य 'कोटीतले' असेल तरीही. बाकी ज्याची त्याची मर्जी.
2 Dec 2010 - 7:39 am | मिसळभोक्ता
३३० मिल्लियन मेंबर्स !
आय शपथ, एकाचा अपडेट (उद. किडन्याप्ड शचि. सो गूड लेट्स सी विष्नु कौंटर द्याट) एवढ्या मेंबर्सला जाणार ! सगळे एच-बेस झोपेल !