समाजाच प्रबोधन करण्याची गरज.....

निरंजन's picture
निरंजन in काथ्याकूट
29 Nov 2010 - 9:17 pm
गाभा: 

आपल्या समाजात एकीकडे बर्‍याच वैचारीक चर्चा होतात. तर त्याच वेळी दूसरीकडे जुन्या विचारसरणीचा पगडा दिसतो.

आपल्या समाजात पैसे खाणारा, गुंडगीरी करणारा, दारु पिऊन गटारात लोळाणारा, स्त्रीयांवर बलात्कार करणारा माणुस एकवेळ उजळ माथ्यानी फ़िरु शकतो तसच एखादा वेश्येकडे नेमानी जाणारा माणुससुद्धा समाजात उघडपणे वावरु शकतो पण जोरजबरदस्तीनी वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेली एखादी वेश्या, तीची मुलं, तीला सहानुभुती दाखवणारी मंडळी ही मात्र समाजाच्या दृष्टीनी नालायक ठरतात.

वेश्या, त्यांची मुलं व HIV बाधीत व्यक्तींबाबत समाजाची दृष्टी इतकी कलुषीत असते की आपण कल्पनाच करु शकत नाही. मी या बाबतीत काही काम करतो म्हणल्यावर माझ्या अनेक मित्रांनी माझ्याशी संबंध तोडले. ऑरकुटवर अनेक मित्रांनी मला फ़्रेंड लिस्टमधुन डिलिट केलं. अर्थात अनेक नवीन मित्र मिळाले.

आपल्या सुशिक्षित समाजातसुद्धा ( अर्थात सुशिक्षित कोणाला म्हणायच हा प्रश्नच आहे ) हीच कल्पना आहे की या प्रकारचं काम करणारे कार्यकर्ते हे वेश्येकडे जात असलेच पाहिजेत. आपल्या समाजात कोणी नुसती कुजबुज केली की अमका अमका माणूस वाईट आहे, त्याच्या चारित्र्याबाबत बोलल की लगेच ऎकणार्‍याला खर वाट्तं, पण एखादा माणूस खुप चांगला आहे अस म्हणल. तर "काय सांगाव, खर खोट त्या प्रमेश्वरालाच माहिती" असा लगेच रिमार्क येतो.

एकीकडे लिव्ह-ईन रिलेशनस्‌ला व समलिंगी विवाहांना कायदा मान्यता देण्याच्या विचारात आहे. तृतिय पंथियांना कायद्यानी मतदानाचा हक्क मिळालय, रेशन कार्ड मिळालय. त्यांना लिंग बदलाचा हक्क मिळाला आहे. तर दूसरीकडे आजही विधवा, घटस्पोटीत व अनाथ व्यक्तींकडे बघण्याची समाजाची दृष्टी कलुषीत दिसते. एखाद्या लग्न मोडलेल्या व्यक्तीबाबत वाटेल त्या वावड्या उठवल्या जातात. घटास्पोटित व्यक्तिंना अपमानीत वागणुक मिळते. एखाद्या मुलं न झालेल्या जोडप्याकडे समाज अशा नजरेनी बघतो की त्यांना मेल्याहुन मेल्यासारखं होतं. मला एक कार्यकर्ता माहीती आहे की ज्याच लग्न, तो HIV ची माहिती तरुण वर्गापर्यंत नेण्याच काम करतो, या एकाच कारणास्तव मोडल आहे.

माझी एक विद्यार्थिनी आहे, ती एका वेश्येची मुलगी आहे. ही वेश्या हैद्राबादच्या खानदानी वेश्या कुटुंबातली आहे. (यात सुद्धा खानदानी हा प्रकार आहे बरं का ! ) त्यांचे संबंध पूर्वी राजे रजवाड्यांशीच असायचे, सध्या ते असतात मोठ्या उद्योगपतींशी. ही मुलगी अत्यंत सुंदर आहे, एक खानदानी सौन्दर्य आहे तीच्याजवळ. प्रचंड बुद्धीमत्ता आहे, नम्रता आहे, विचार करण्याची क्षमता आहे. या मुलीला ग्रॅज्युएट झाल्यावर चांगली नोकरी मिळाली. बरे दिवस आले आईनी वेश्याव्यवसाय बंद केला. या मुलीच्या प्रेमात मुलं नाही पडली तरच नवल. पण अनेकजण ती एक वेश्येची मुलगी आहे, तेव्हा तीची छेड काढायला आपल्याला पूर्ण परवानगी आहे, असाच अर्थ घेतात व तीच छेड काढायचा प्रयत्न करतात. कॉलेजचे प्रोफ़ेसरसुद्धा यात मागे नाहीत. आज ही समाजाची विचारसरणी आहे.

वेश्यागृहातुन सोडवलेल्या बाईला व तीच्या मुलांना कामं मिळत नाहीत. चांगल शिक्षण मिळत नाही. एखाद्या हिजड्याला भिक मागणं वा शरिर विक्रय करणं या शिवाय दूसरा कोणाता तरी उद्योग करावा अस वाटत असेल तर त्याला समाज उभा करत नाही. त्यांना जर शरिरविक्रय करायचा नसेल, भिक मागायची नसेल, तर एकमेव मार्ग उरतो व तो म्हणजे गुन्हेगारी वा गुन्हेगारांना मदत करणं. खर तर या लोकांच योग्य पद्दतीनी पुर्नवसन नाही केल तर ते आपल्या सर्वांसाठी फ़ार धोक्याच आहे.

वेश्या व त्यापेक्षाही हिजड्यांच पुर्नवसन किती कठीण आहे, ते या काही दिवसांमधे अनुभवल आहे. एक हिजडा आहे ग्रॅज्युएट आहे. त्याला भिक मागायची नाही व शरिरविक्रय करायची इच्छा नाही. त्याला साध सकाळी पेपर व दूध घरोघर टाकायच काम दिलं. तर लोकांना तो सकाळी सकाळी घरी आलेला नको आहे. हे एक तुमच्या आमच्या सारख व्यवस्थित बोलणारा व बर्‍यापैकी इंग्रजीत संभाषण करणार्‍या हिजड्याबाबत लिहिल. त्यापेक्षा कमी शिकलेल्या व तोंडात शिव्या असलेल्या हिजड्यांना तर कोणी समोर उभ करत नाही.

सर्वात जास्त दया येते ती वेश्यांच्या मुलांची. त्यांची काहीच चुक नसताना त्यांना एक अघोरी शिक्षा मिळत असते. मी त्याबाबत इथे लिहित नाही. त्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळात नाही. शिक्षणासाठी पोषक वातावरण नसत. खर तर या मुलांना इतर मुलांपेक्षा शिक्षणाची जास्त गरज असते. एकतर त्यांच्या कुटुंबाला लागलेला काळिमा पुसायसाठी, जिवनात मिळालेला एकटेपणा दूर करण्यासाठी व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी संपूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर पेलायसाठी. जेव्हा त्याला अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षण या मुलभुत गरजा पुर्ण करता येत नाहीत तेव्हा हेच मुलं छोटे मोठे गुन्हे करायला लागत व मग ते आपल्या समाजाला तापदायक ठरत.

वेश्याव्यवसाय नक्किच वाईट आहे. या वेश्यांकडे जाणारे आपल्या आजुबाजुचीच मुल व पुरुष असतात. मी नेहेमी जाणार्‍यांच्या बाबतीत जास्त लिहित नाही पण ही लहान मुल, नुकती मिसरुढ फ़ुटलेली मुलं जेव्हा वेश्यांकडे जाताना दिसतात. तेव्हा खुप काही तरी चुकतय अस जाणावत. ही मुल बरेच वेळा चांगल्या कुटुंबातली व चांगल्या शाळांमधली असतात.

या मुलांना सेक्सबाबत व ऎडस् बाबत अर्धवट माहिती असते. विवाहापूर्वसंबंध किती घातक आहेत याची त्यांना मुळिच कल्पना नसते. खर तर या मुलांना योग्यवेळी काऊंसिलिंगची गरज असते. समुपदेशनानी जर दारू , जुगर व ड्रग सारखी व्यसन कमी होऊ शकतात तर वेश्यागमन का कमी नाही होणार ? नक्कीच होईल. काही देशांनि हा प्रयोग केला आहे व त्यात ते बर्‍याच प्रमाणात यशस्वी झालेले आहेत. आज ऎड्‌स्‌ बाबत जनजागृती झालेली आहे व त्यामुळे ऎड्‌स्‌च प्रमाण बरच कमी झालेल आहे. ऎड्‌स्‌च्या जाहिराती या फ़क्त "निरोध वापरा" अशाच असतात. पण असे संबंधच ठेवू नका अश्या जाहिरात केल्या जात नाहीत. घरांमधुन व शाळांमधुन या गोष्टींची वाच्चताच केली जात नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी गोंधळलेल्या मनस्थितीत असतात. अश्यावेळी ते सल्ला घेतात तो नेमक्या चुकीच्या माणासाचा व चुकीच्या मार्गानी जातात. आज या मुलांना योग्य संस्कारांची गरज आहे.

नुसत मुलांचच नाही तर आज सर्वच समाजाच प्रबोधन करण्याची गरज आहे.

माझी विनंती आहे की खाली दिलेला व्हिडीओ आपण कृपाकरुन बघावा. मी यावर काहीच लिहिणार नाही

http://www.youtube.com/watch?v=jeOumyTMCI8

.......निरंजन प्रधान

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

29 Nov 2010 - 9:21 pm | ऋषिकेश

नुसत मुलांचच नाही तर आज सर्वच समाजाच प्रबोधन करण्याची गरज आहे.

हे अगदी खरं आहे. प्रश्न असा आहे की हे प्रबोधन करायचं कसं?

खुप उत्तम पद्धतीने आपण बोलत आहात ..
सर्व मनापासुन पटले .. एकदम बरोबर आहे ..
तुम्ही यीतके जबरदस्त पद्धतीने लिहिले आहे की आम्हाला काय बोलावे तेच कळत नाहिये ..
अश्या लेखनामुळे आणि त्यातील विचारांच्या देवान्घेवान करण्यामुळे ही नक्कीच समाजात उल्लेखनिय बदल घडतीलच घडतील.. आणि असे वैचारीक पद्धतीने समाजात सर्व ठीकाणी माहीती दिली गेली पाहिजे असे वाटते ..

मी-सौरभ's picture

29 Nov 2010 - 11:28 pm | मी-सौरभ

निशब्द...:(

प्राजु's picture

29 Nov 2010 - 11:40 pm | प्राजु

विषय अतिशय उत्तम रितीने मांडलेला आहे.
यावर प्रतिक्रिया काय येतात तेच बघयाचे आहे.

तुमचा अभिमान वाटतो तुम्ही अशा प्रकारचे काम करता त्याबद्दल.!!

तुम्ही चांगले काम करताहात आणि मगच लिहिताय हे महत्वाचं.
तुम्ही दिलेल्या व्हिडिओचा दुवा पूर्वी मिपावर देण्यात आला होता. समोर बसलेल्यांपैकी कितीजण 'राम' (एकपत्नी या अर्थी) असतील?

शाळांमधून लैंगिक शिक्षण सक्तीचे असायला हवे. आपल्याकडे एखाद्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून पाहण्याची सवय तर आहेच पण कायद्याने तो गुन्हा ठरत नाही हे वाईट (आणि ठरला तरी कोण जुमानतय?).

तुम्ही उल्लेख केलेला तृतीयपंथी कोणते कपडे करतो यावरही लोकांची प्रतिक्रिया अवलंबून आहे असे वाटते.

गांधीवादी's picture

30 Nov 2010 - 6:49 am | गांधीवादी

आपल्या कार्याला पाठींबा आहे.

मुलांचच नाही तर आज सर्वच समाजाच प्रबोधन करण्याची गरज आहे.

खरे आहे.

आपल्याकडे लहान मुलांशी एड्स , एच आय व्ही बद्दल बोलणे म्हणजेच बिघडवणे असे समजतात...त्यांना पूर्ण माहिती नसते किंवा असली तरी काहीतरी अर्धवट असते... अशी माहिती घातकच.
दुसरे म्हणजे वेश्यांची मुले हा प्रश्न लवकर सुटणारा नाही...खरे म्हणजे घरातील आईनेच मुलांवर संस्कार केले पाहिजेत मुलींशी कसे वागावे त्याचे...पण आयाच शिकवतात कि अशा कपडे घातलेल्या मुली तशाच, यांचे असेच वगैरे..(मी पाहिलेले आहे )...आता घरातील एक मुख्य बाईच असे म्हणत असेल तर मुलांना काय वाटणार? भले ती कोणाचीही मुलगी असो.

बाकी समाजमन हळूहळू बदलले आहे बऱ्याच गोष्टींबाबत तर याविषयीही बदलेल हळूहळू...फक्त वृतपत्र, ब्लॉग्स, अशी संस्थळे इ. ठिकाणाहून या विषयी प्रबोधन करणारे लिहिले गेले पाहिजे.

नगरीनिरंजन's picture

30 Nov 2010 - 8:03 am | नगरीनिरंजन

उत्तम लेख! परिस्थितीने नाडलेल्या लोकांशी सुस्थितीतले लोक कसे वागतात हे पाहण्यासारखे असते.
असो. वेश्याव्यवसाय कायदेशीर करण्याबाबत तुमचे मत काय आहे? यासाठी काम करणार्‍या एखाद्या संस्थेबद्दल तुम्हाला माहिती आहे काय?

कायदेशीर झाल्यावर कायदेबाबू हा एक पिपासू घटक त्यांच्या साडेसातीत जमा होईल दुसरे काही नाही.

नगरीनिरंजन's picture

30 Nov 2010 - 8:27 am | नगरीनिरंजन

बरोबर आहे पण सध्याच्या पोलिसांच्या क्रूर छळापासून तर सुटका होईल ना? परिस्थितीवश अडकलेल्यांनाच गुन्हेगार ठरवणे हे कोणत्या न्यायात बसते? कायदेशीर केला तर कमीतकमी त्यांच्या कामाच्या वेळा, किमान वेतन वगैरे ठरवणारे कायदे कागदावर का होईना पण येतील. पुढे मागे सुधारणेला वाव तरी राहील.

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 8:31 am | मिसळभोक्ता

कुठलीही गोष्ट कायदेशीर करणे, याचा अर्थ एकच. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर ट्याक्स लावणे. किमान वेतन, किमान वेळा.. ह्याबरोबरच कामाचे स्वरूप कायदेशीर भाषेत वाचायला आवडेल !

नगरीनिरंजन's picture

30 Nov 2010 - 8:48 am | नगरीनिरंजन

आपल्या प्राचीन व महान आणि लवकरच महासत्ता होऊ घातलेल्या देशाच्या सरकार, कायदा वगैरे बाबींबद्दल बर्‍याच लोकांच्या मनात असलेला विश्वास आणि आदर पाहून ऊर आणि डोळे भरून आले. :-)

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 8:52 am | मिसळभोक्ता

डोळेच भरून आले ना ?

की आणखी काही ??

असो, जरा ह्या कायदेशीर वेश्याव्यवसायाची कायदेशीर व्याख्या करून दाखवा ना भौ !

(ओह, आणि कॉलिंग युयुत्सु.....)

नगरीनिरंजन's picture

30 Nov 2010 - 9:06 am | नगरीनिरंजन

कायदेशीर व्याख्या वगैरे कीस काढायला ही जागा नाही. अनिच्छेने वेश्याव्यवसायात आलेल्या किंवा ढकलल्या गेलेल्या स्त्रियांना गुन्हेगार समजले जाऊ नये ही साधी भावना आहे या मागे. यातून तुम्हाला टॅक्स आणि त्या व्यवसायाचे कायदेशीर वर्णन याच गोष्टी रोचक वाटत असतील तर आपण वेगवेगळ्या दिशांना पाहत आहोत हे स्पष्ट आहे. असो. सद्यपरिस्थितीत मी या बाबतीत निष्क्रीय असल्याने यापुढे वाद घालायची माझी इच्छा आणि लायकी नाही.
धन्यवाद.

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 9:08 am | मिसळभोक्ता

अरेरे वाईट वाटले. अशी वेळ कुणावरही यायला नको.

नगरीनिरंजन's picture

30 Nov 2010 - 9:13 am | नगरीनिरंजन

:-) खरं आहे. तुमच्यावर ती वेळ आलेली नाही आणि तुम्ही सक्रीय आहात याबद्दल तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे अभिनंदन!

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 9:18 am | मिसळभोक्ता

अभिनंदनाबद्दल धन्यवाद !

नगरीनिरंजन's picture

30 Nov 2010 - 9:21 am | नगरीनिरंजन

धन्यवाद देण्यातका सुसंस्कृतपणा दाखवल्याबद्दल धन्यवाद!

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 9:23 am | मिसळभोक्ता

धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद.
(ता. क. वन ई इज मिसिंग इन युवर प्रतिसाद.)

निरंजनसाहेबांचे त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल आणि इतका सुंदर लेख इथे पोस्ट केल्याबद्दल अभिनंदन.
त्याबरोबरच अहमदनगरच्या निरंजनसाहेबांचे त्यांच्यावर झालेले हल्ले सामर्थ्याने परतविल्याबद्दल खास अभिनंदन.

रेवती's picture

1 Dec 2010 - 3:04 am | रेवती

सहमत.

बेसनलाडू's picture

1 Dec 2010 - 2:47 am | बेसनलाडू

लेखातील विचारांशी बराचसा सहमत आहे.
(सहमत)बेसनलाडू

एकंदर निराशाजनक परिस्थितीतही यासारख्या लक्षवेधी बातम्यांनी दिलासा मिळत असतो, हेही तितकेच खरे.
(दिलासित)बेसनलाडू