साहित्य :- एक पाव मुग डाळ, एक पाव गूळ, साजूक तूप एक वाटी.
कॄती :- मुगडाळ खमंग भाजून घ्या. गार करायला ठेवा.
मिक्सरमधुन दळून घ्या, थोडी रवाळ असावी.
आता मुगाचे पिठ, गूळ चिरुन घ्यावा म्हणजे त्यात खडे नसावेत-मउ झालेला असावा.व साजुक तूप
पातळ करुन घ्यावे,
आता सगळे चांगले एकत्र करुन घ्या आणी लाडू वळा.
हे घ्या तय्यार लाडू--
प्रतिक्रिया
25 Nov 2010 - 12:16 pm | चिरोटा
मस्त आहेत.
25 Nov 2010 - 12:17 pm | जागु
वा मुग-गुळाचे लाडू छान आहेत. वेलची, जायफळ किंवा इसेन्स वगैरे नाही का घालत ?
25 Nov 2010 - 12:27 pm | निवेदिता-ताई
वेलची, जायफळ किंवा इसेन्स वगैरे नाही घालत कारण मुगाचा खमंग वासच छान येतो.
25 Nov 2010 - 1:01 pm | रत्नागिरीकर१
एक पाव = पाव किलो का?
25 Nov 2010 - 1:12 pm | निवेदिता-ताई
हो पाव किलो........पण आमचे इकडचे भागात एक पाव द्या... असेच म्हणतात.
बेकरीतला पाव वाटला काय तुला................हा हा हा
25 Nov 2010 - 6:12 pm | मनीषा
छान दिसताहेत लाडू...
पाककृती सुद्धा सोपी आहे .. करून बघीन .
माझ्या मुलाच्या " काही गोड आहे का ? " या प्रश्नाला हे चांगले उत्तर आहे .
25 Nov 2010 - 6:44 pm | नगरीनिरंजन
लाडू एकदम करणेबल आणि दिसायला आकर्षक आहेत.
25 Nov 2010 - 6:55 pm | डावखुरा
मस्तच...!!
25 Nov 2010 - 7:12 pm | परिकथेतील राजकुमार
पॉशच !
एकदा सोमवरी मुगाचा लाडु खाल्ला म्हणुन आमची आजी वसकन ओरडली होती हे अजुन आठवते.
साला मुगाचे लाडू पण हिरवे दिसले असते तर मजा आली असती.
27 Nov 2010 - 1:28 am | कुंदन
>>साला मुगाचे लाडू पण हिरवे दिसले असते तर मजा आली असती.
मुगाचे लाडू पण हिरवे दिसले असते तर , लाडु बरोबरच तुला ईनो घेणेही अपरिहार्य झाले असते.
25 Nov 2010 - 7:25 pm | स्वाती२
मस्तच!
25 Nov 2010 - 7:29 pm | मदनबाण
मस्त... :)
26 Nov 2010 - 2:26 am | अर्चु
सुंदर दिसताहेत लाडू.... नक्की करून बघेन.
26 Nov 2010 - 6:46 am | रत्नागिरीकर१
बेकरीतला पाव नाही वाटला.... मुम्बइत अर्धा पाव भाजी मागतात तस काही असावे असे वाटले...
26 Nov 2010 - 6:53 am | रत्नागिरीकर१
करुन पाह्ते.... healthy आहेत्...मुलाना द्यायला...
26 Nov 2010 - 11:27 am | निवेदिता-ताई
हो हे लाडू खूप पोष्टीक असतात...आजारी, लहान मुले, आणी इतर सगळ्यांसाठी सुद्धा हे हेल्दी आहेत
26 Nov 2010 - 12:53 pm | गवि
आम्हास फक्त बेसनाचे लाडू आवडत होते आत्तापर्यंत..
रवा लाडू वगैरे अजिबात नाही आवडत्..ती तर ऐनवेळी आलेल्या पाहुण्याची बोळवण (वाटीत दे गं एक लाडू त्याला..)
.. मुगाची कल्पनाही आतापर्यंत पटत नव्हती. (विकतचे खाल्लेत..)
पण ही पोस्ट वाचून आता आम्ही बनवून खाणारच.
मत बदलले.
26 Nov 2010 - 12:54 pm | गवि
बादवे:
श्री बेसनलाडू यांची काय प्रतिक्रिया आहे या पोस्टवर..?
26 Nov 2010 - 2:41 pm | पियुशा
सुन्दर आनि रुच्कर
26 Nov 2010 - 11:49 pm | ज्योति प्रकाश
यात भाजलेल्या शेन्गदाण्याचे तुकडे घालुन पण सुन्दर लागतात.