गाभा:
हेअर स्ट्रीटनिंग हा कुरल्या केसाना सरळ करण्याचा उपाय किती परिणामकारक असतो.. त्याने काही दुष्परिणाम होतात का..मी नेटवर बरीच माहिती वाचली पण मन द्विधा अवस्थेत आहे.. कुरल्या केसांचा जाम वैताग आला आहे आणि आता काहीतरी वेगळे करायचे आहे केसांचे..
सरळ करणे हा उपाय सुचवायचा नसल्यास कुरल्या केसांची काळजी कशी घ्यावी ते सुचवा.
आपल्यापैकी कुणी केले असल्यास तुमचे अनुभव पण सांगा.
प्रतिक्रिया
24 Nov 2010 - 12:10 pm | नगरीनिरंजन
खाली आलेल्या सर्व प्रतिक्रिया वाचून तुम्ही एका गंभीर आणि वैश्विक समस्येला तोंड फोडले आहे याची जाणीव झाली. त्याबद्दल आपले अभिनंदन. शिवाय दर्जेदार व फुटकळ नसलेल्या धाग्यांअभावी मिपावर निर्माण झालेली पोकळी या धाग्याने भरून काढली या बद्दल आभार!
कुठलेही केस सरळ वा कुरळे करून घेण्याचा वा देण्याचा वा झालेले पाहण्याचा अनुभव नसल्याने त्यावर मी काहीही मतप्रदर्शन करू शकत नाही याबद्दल क्षमस्व.
24 Nov 2010 - 10:57 am | विजुभाऊ
डोके पूर्ण भादरून घ्या.
24 Nov 2010 - 11:05 am | रमणरमा
हो ना मी पण ऐकले आहे की डोके पूर्ण टक्कल केले की नवीन ग्रोथ चांगली येते. पण ट्राइ करायची भीती वाटते..
आलेच नाही परत केस तर काय घ्या..
24 Nov 2010 - 11:01 am | स्पा
कुरल्या केसांचा जाम वैताग आला आहे
कुरल्या कि कुरळ्या ?
24 Nov 2010 - 11:07 am | रमणरमा
तेच म्हणायचे आहे लिहिता नाही आले.. समजून घ्या ताई / दादा.
24 Nov 2010 - 11:03 am | छोटा डॉन
शक्यतो 'हेअर स्ट्रेटनिंग' ह्या भानगडीत पडु नका.
एक तर ती प्रोसेस एकदाच करुन भागत नाही, दर महिन्याला केस वाढले की पुन्हा ते करावेच लागते, त्याचा दर वेळी ताप आहेच.
शिवाय बर्याचदा ह्यामुळे केस गळतात.
अजुन केसांच्या आरोग्याच्या दृष्तीने इतरही दुष्परिणाम आहेत.
शक्यतो ह्या भानगडीत न पडलेले उत्तम :)
24 Nov 2010 - 11:08 am | रमणरमा
धन्यवाद!
24 Nov 2010 - 11:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या इथल्याच एका मैत्रिणीने केस सरळ केले आहेत आणि (इ.स. २०१०च्या) ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून तिचे केस सरळच दिसत आहेत. तिच्या म्हणण्याप्रमाणे काही रसायन लावून केस सरळ केले आहेत त्यामुळे नीट काळजी घेऊन केस धुतले की केस सरळच रहातात आणि केस गळण्याचं प्रमाण वाढलेलं नाही. अर्थात केस वाढताना पूर्वी होते तसेच वाढणार आणि काही महिन्यांनी/वर्षांनी (केसांच्या लांबी आणि वाढीवर अवलंबून) केस पुन्हा कुरळे होतीलच.
केसांचं गळणं प्रत्येकाच्या बाबतीत वेगळं असेल. तुम्हाला एवढाच कंटाळा आला असेल तर केस सरळ करून पहाच. पण त्याआधी सरळ केस कुरळे कसे करायचे आणि करावे का नाही याबाबत काही सल्ला मला द्या.
24 Nov 2010 - 11:16 am | रमणरमा
मी तर म्हणेन की चांगले आहे केस नॅचुरली सरळ आहेत ते! कुरळे केस मेण्टेन करणे खूप अवघड असते आणि मेण्टेन नाही केले की बिलकुल चांगले दिसत नाही. पण ते सर्व करायची तयारी असेल तर प्रयत्न करण्यात काहीच हरकत नाही..
24 Nov 2010 - 11:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
केस मेण्टेन करण्यासाठी मला खास कष्ट करावे लागत नाहीत. आता केस गळण्याचं प्रमाण अंमळ जास्त आहे त्याचा दोष मी पुण्याच्या पाण्याला लावून मोकळी होते, त्यामुळे ती ही चिंता नाही.
रमणरमाजी, पुण्याचा उल्लेख तुमच्या धाग्यात केला आहे, आता धागा हिट व्हायला पाहिजे. नाही झाला, तर पुण्याच्या पाण्यातच दोष आहे ही माझी थिअरी सिद्ध होईल. ;-)
24 Nov 2010 - 11:58 am | Nile
हाफिसात कामं नसली की असे उद्योग करता क अहो तुम्ही?
(१०% इकडे पाठवुन द्या)
24 Nov 2010 - 12:12 pm | रमणरमा
अहो पुण्याचे पाणी ते.. इतक्या सहजासहजी त्याने आपला गुण सोडला तर काय बिशाद!
चालायचेच.. काही दिवसाणी तुम्ही केस गळले तरी चालतील पण मला पुण्यातच राहायचे आहे असे म्हणाल :)
( ही लव्हज मी ही लव्हज मी नॉट च्या चालीवर
धागा हिट होणार धागा हिट नाही होणार )
25 Nov 2010 - 10:05 am | टिउ
हे म्हणतांना डोक्यावरचा एक एक केस उपटा म्हणजे केस सरळ करावे की नाही हा प्रश्न पडणार नाही!
24 Nov 2010 - 11:24 am | विजुभाऊ
डानराव हे केसांच्या बाततीतले तज्ञ मानले जातात.
माझी केस सध्या काहिशी गॉन केस आहे.
पण माझ्या आणि डॉनरावांच्या बाबतीत दोन साम्य स्थळे आहेत.
१) आम्ही दोघे ही सहा महिन्यातून एकदा न्हाव्या ला भेट देतो
२) आमचे केस कापण हे प्रत्येक न्हाव्याला आव्हानात्मक वाटते
24 Nov 2010 - 11:04 am | नितिन थत्ते
केसाविषयी सर्व शंका डॉनराव यांच्याकडे विचाराव्या.
24 Nov 2010 - 11:07 am | Nile
डॉनरावांचे ऐकु नये, त्यांच्या केसांपेक्षा जावळीचे(पुर्वीचे) जंगल बरे अशी वदंता आहे.
24 Nov 2010 - 11:10 am | रमणरमा
लोल :)
24 Nov 2010 - 11:13 am | अविनाशकुलकर्णी
पुर्वि राजाराणी साबण मिळायचा
24 Nov 2010 - 11:58 am | मधु बन
हेअर स्ट्रेटनिंग मधे २ प्रकार असतात
परमनंट स्ट्रेटनिंग आणि आय्रनिंग
परमनंट (?)स्ट्रेटनिंग जर योग्य काळजी घेतली तर जास्तित जास्त ४-५ महिने टिकत.
आय्रनिंग मॅक्झिमम २-३ दिवस टिकत.
पण दोन्हिमुळे केस खुप प्रमाणात गळतात.
24 Nov 2010 - 2:12 pm | स्वानन्द
आयर्निंग !!! म्हणजे इस्तरी करतात ??? गो बाबो !
24 Nov 2010 - 2:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे बाळा, केसांची इस्तरी वेगळी असते. ही पहा:
24 Nov 2010 - 2:27 pm | स्वानन्द
अशी असते होय. सोफिस्टिकेटेड दिसते की एकदम ! स्टेपलर ची मोठी बहीण वाटते.
24 Nov 2010 - 2:49 pm | मेघवेडा
हो, केस गळायला लागले की टकलाला ष्टेपल करून ठेवायचे!! ;)
24 Nov 2010 - 3:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ए गपे, उगाच माझं गुपित का फोडतोस?
24 Nov 2010 - 3:36 pm | स्वानन्द
पॉईंट टू बी नोटेड रमा ताई...
याचाच अर्थ, या महिला आपल्याला इतका वेळ चूकीचा सल्ला देऊन आपली दिशाभूल करत होत्या. वेळीच सावध व्हा आणि डॉन्रावांचे ऐका.. :)
24 Nov 2010 - 11:27 pm | रमणरमा
आता एक कौल टाकते ...
१. डॉनरावांचा सल्ला ऐकावा
२. महिला मंडळाचे ऐकावे
३. डॉनरावांचे ऐकल्यासारखे दाखवून महिला मंडळाने सांगितलेले करावे
४. महिला मंडळाचे ऐकल्यासारखे दाखवून डॉनरावांचा सल्ला वापरावा.
अरे हाकानाका :)
24 Nov 2010 - 11:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे ध्यानप्रेमी स्वानंद, माझे केस नैसर्गिकरित्या (नको तेवढे, माझ्यासारखेच) सरळ आहेत, माझे केस गळतात. माझ्या मैत्रिणीचे केस नैसर्गिकरित्या कुरळे आहेत, तिने ते सरळ करवून घेतले आहेत आणि तिचे केस गळणं एवढं होऊनही वाढलेलं नाही. रमणरमाजी, तुम्ही या पोरग्यांकडे लक्ष देऊ नका; 'पाशवी' शक्तींचा विजय असो, विजय असो, विजय असो.
24 Nov 2010 - 11:44 pm | शिल्पा ब
<<<माझे केस नैसर्गिकरित्या (नको तेवढे, माझ्यासारखेच) सरळ आहेत,
स्वताची टिमकी वाजवलीच पाहिजे का?
25 Nov 2010 - 1:53 am | रेवती
आता पाशवी शक्ती म्हणजे जर बायका असल्या तर हा विजय मध्येच येण्याची हिंमत करतो तरी कशी? म्हणते मी!;)
25 Nov 2010 - 10:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पाशवी रेवतीताईचा पाठींबा असल्यामुळे पळून गेला बहुतेक तो ...
25 Nov 2010 - 10:52 am | मधु बन
केस नुसते गळणारच नहित, जस्त वेळ ष्टेपल करायला जाल तर जळतील पण.
24 Nov 2010 - 12:03 pm | मस्त कलंदर
केसांची निगा कशी राखावी याबद्दल नंदनचे मत ऐकायला आवडेल.
@ अदिती, पॅराशूट्चं कसलं तरी 'थेरपी' नावाचं चंदेरी रंगाच्या बाटलीतलं तेल वापरून पाहिलं. केस गळायचे पुष्कळच कमी आलेयत माझे.
24 Nov 2010 - 12:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नंदनचं मत ... नंदन फक्त लिंका देतो असं आमचं मत हो! ;-)
मके, खुलाशाबद्दल धन्यवाद. ते ही वापरून पहाते, पण पुण्याच्या पाण्यावर कोणाचा इलाज चालणार ना! ;-)
24 Nov 2010 - 2:16 pm | स्वानन्द
>>पण पुण्याच्या पाण्यावर कोणाचा इलाज चालणार ना!
ते तर आहेच. भल्याभल्यांचे हातपाय गळतात. केस तर मामुली गोष्ट आहे. गळाले तर त्यात काय विशेष?
24 Nov 2010 - 11:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
केसांना मामुली म्हणतोस? अरे इथे एक आख्खा धागा निघालाय त्यावर आणि म्हणे मामूली! याला कोणीतरी पाशवी शक्तींचा हिसका दाखवलाच पाहिजे!
25 Nov 2010 - 11:14 am | स्वानन्द
हॅ... एकच धागा ना... पुण्याच्या पाण्यावर तर धागेच धागे निघतात... त्यापुढे हा असा एखादा केस... सॉरी धागा म्हणजे काहीच नाही.
बाकी सत्त्व गुणांपुढे पाशवी शक्तींना नमते घ्यावेच लागेल. इतिहासच आहे तसा. :) ( उदाहरणादाखल : शक्तीमान विरुद्ध किल्विष )
हा हा हा....
सत्वगुणी ( स्वानन्द )
25 Nov 2010 - 1:10 am | Nile
नंदनला उगाच मध्ये आणु नका!! त्याची 'केस'च वेगळी आहे, त्याच्या डोस्क्याला आख्ख्या मराठी जालविश्वाचा ताप आहे.
25 Nov 2010 - 11:22 am | मस्त कलंदर
धंदा कसा करावा यापेक्षा काय केल्याने तो बुडतो हे कळणं महत्वाचे. म्हणून नंदनची 'केस' रे!!!
24 Nov 2010 - 12:16 pm | अश्विनीका
माझ्या एका मैत्रिणिने केस सरळ करून घेतले आहेत. तिचे जरा अतिच कुरळे केस होते. केसात कंगवा तरी जात असेल की नाही असे वाटण्याइतपत कुरळे. आता सरळ केल्यावर छान दिसतात तिचे केस. केस गळतात असे तिच्याकडून अजूनतरी ऐकले नाही. आणि एकदा केले की २-३ महिने ते छान रहातात. (नक्की किती महिने ते तिला विचारून सांगते).
ही मैत्रीण यूसमधे रहाते. भारतात केस सरळ करण्यासाठी पार्लरमध्ये नक्की किती काळजी घेतात , काय काय वापरतात ते मला माहित नाही . तरीही आपण एकदा ट्राय करुन पहावे आणि चांगल्या पार्लरमधून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केस सरळ करून घ्यावेत .
24 Nov 2010 - 12:26 pm | रमणरमा
केस सरळ करून घेण्याबद्दल महिला मंडळाने दाखव्लेल्या उत्सहाबद्द्ल धन्यवाद!
आता प्रोत्साहन मिळालेच आहे तर झटपट डिसीजन लॉक करून टाकते!!
<मूजीक > न न ना ना नाना
न न ना ना नाना < / मूजीक>
माझे केस सरळ करणार
:)
24 Nov 2010 - 12:42 pm | आंबोळी
आता प्रोत्साहन मिळालेच आहे तर झटपट डिसीजन लॉक करून टाकते!!
तसे असेल तर , केल्या नंतर "बिफोर" / "आफ्टर" छापाचे फोटु पण डकवा या धाग्यावर...
24 Nov 2010 - 3:11 pm | विजुभाऊ
<मूजीक > न न ना ना नाना
न न ना ना नाना < / मूजीक>
माझे केस सरळ करणार
नान्या आता हे पण सुरु केलेस का
24 Nov 2010 - 11:31 pm | रमणरमा
नानांचे केशकर्तनालय आहे का?
24 Nov 2010 - 12:58 pm | इंटरनेटस्नेही
या लेखातील केसांसंबंधी विचारलेला प्रश्न पाहुन आमच्या डोक्यात एक भयानक जोक आला आहे.. पण सध्या तो मोह आवरता घेतो.
(इच्छुकांनी व्यनि करावा!)
24 Nov 2010 - 2:27 pm | इंटरनेटस्नेही
काही सदस्यांनी मागणी नोंदवली देखील!...अन्य सदस्यांनी देखील व्यनि धाडावा!
24 Nov 2010 - 11:32 pm | रमणरमा
आमी नाय जा!
24 Nov 2010 - 11:09 pm | शिल्पा ब
अम्च्या सुद्धा ;)
25 Nov 2010 - 1:46 am | इंटरनेटस्नेही
शिल्पा आणि रमणमणा ताई... __/\__
तो ज्योक मी तुम्हाला सांगितला तर माझी इमेज डगाळाली जाऊन मला सदस्यत्त्वाचा राजीनामा द्यवा लागेल.. ;)
25 Nov 2010 - 1:59 am | मेघवेडा
रमणमणा
=)) =))
इंट्या मेल्या, वर एका प्रतिसादात अदितीने ष्ट्यापलर सारख्या यंत्राचा एक फोटू टाकलाय बघ.. जीभ सरळ करून घे तुझी त्यात.. अशी सरकणार नाही परत! =)) =))
25 Nov 2010 - 10:04 pm | पैसा
तुला मणामणाची रमणी असं म्हणायचं होतं का मेल्या?
26 Nov 2010 - 1:48 am | इंटरनेटस्नेही
त्यांच सदस्यनाम उच्चरायला इतकं कॉमप्लीकेटेड आहे की नीटपणे रिकॉलच झालं नाही.. शेवटी जसं आठवलं तसं लिहिलं!
असो. मिपावरवचे भाषाशास्त्रज्ञ यावर अधिक प्रकाश टाकु शकतील.
_
इंटेश.
26 Nov 2010 - 4:16 am | रमणरमा
फिंटेश मिपावरच्या भाषाशास्त्रज्ञ ना काय विचारतोस..मी सांगते ना...
रमणरमा माझ युजर नेम आहे.. रमा हे खर खर नाव आहे.. त्याच उलट केल की मार होत... हे हे हे
( समझदार को इशारा काफ़ि होता है )
आणि हो फिंटेश मुद्दाम लिहल आहे. फिटटम फाट झाली आता.
26 Nov 2010 - 11:39 am | मृत्युन्जय
गंमत आहे मग. तुम्ही मग रमणमर असे करा. बेष्ट.. उलटसुलट सेम.
26 Nov 2010 - 4:28 am | रमणरमा
@पैसा
तुम्ही न ला ण मनता का ?
26 Nov 2010 - 5:23 am | शिल्पा ब
@रमणरमा , तुम्ही म्हणतात ला मनतात म्हणता का?
26 Nov 2010 - 1:55 am | इंटरनेटस्नेही
इंट्या मेल्या, वर एका प्रतिसादात अदितीने ष्ट्यापलर सारख्या यंत्राचा एक फोटू टाकलाय बघ.. जीभ सरळ करून घे तुझी त्यात.. अशी सरकणार नाही परत!
लोल्स! :) पण क्रिएटीव्हीटे लै भारी आहे तुमची.. !
24 Nov 2010 - 2:28 pm | स्पा
आमच्या कडे बी एक इनोद हाई.......
(इच्छुकांनी व्यनि करावा!)
24 Nov 2010 - 2:34 pm | परिकथेतील राजकुमार
एकाच शब्दाची एक अतिशय हिणकस प्रतिक्रीया सुचली होती पण स्वतःला आवर घालत आहे :)
24 Nov 2010 - 2:53 pm | मेघवेडा
'इच्छुकांनी व्यनि करावा' असे कंसात नमूद न केल्याने फाऊल धरण्यात येत आहे! ;)
24 Nov 2010 - 3:00 pm | परिकथेतील राजकुमार
ते न लिहिताच इच्छुकांचे व्यनी सुरु झाले आहेत ;)
24 Nov 2010 - 3:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कुठला व्यनी? धन्यवाद. ;-)
24 Nov 2010 - 3:13 pm | मेघवेडा
आपण पॉप्युलर आहोत हे सिद्ध करण्याची वेळ परावर येईल असे वाटले नव्हते! ;)
24 Nov 2010 - 3:14 pm | विजुभाऊ
एकाच चिन्हाची एक अतिशय हिणकस प्रतिक्रीया सुचली होती पण स्वतःला आवर घालत आहे .
( ते चिन्ह म्हणजे फुल्या फुल्या फुल्या फुल्या )
24 Nov 2010 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार
संघाचा विजय विजुभौंनी फारच मनाला लावुन घेतलेला दिसत आहे ;)
परा गोळवलकर
24 Nov 2010 - 10:40 pm | एक
झाले ? ;) (" केस कुरळे होणे" हा एक पुण्यातला वाक्प्रचार आहे?)
कुरळ्या केसांवर काहीही उपाय नाही हे सत्य गेल्या ३० वर्षांच्या अनुभवातून शिकलो आहे.
सरळ केसांचे मित्र "तुझं बरं आहे, काही मेंटेनन्स नाही " असं म्हणून उलट वरती मीठ चोळतात..
केस ट्रीम करताना त्यांच्या पहिल्या "टर्नींग पॉईटच्या" च्या जवळच कापणं आणि ते वारंवार करत रहाणं हाच एक उपाय आहे.
नसतात काही गोष्टी नशिबात सोडून द्या. :)
24 Nov 2010 - 11:13 pm | शिल्पा ब
आसल ते मिटवा न नसल ते भेटवा
24 Nov 2010 - 11:50 pm | आमोद शिंदे
ते कुठले केस आहेत ह्यावर अवलंबून आहे. (असा प्रभुमास्तरांचा प्रतिसाद कसा काय आला नाही अजून?)
25 Nov 2010 - 1:36 am | इंटरनेटस्नेही
माझा ज्योक ढापल्याबद्द्ल शिंदे साहेबांचा निषेध!
25 Nov 2010 - 2:00 am | रेवती
रमा, माझ्या मामेबहिणीने तिचे अतोनात कुरळे केस सरळ करून घेतले त्याला निदान सहा वर्षे तरी झालीत. तशी कोणतीच तक्रार नाही. सहावर्षापूर्वी तिने पाच हजार कि असेच कितीतरी पैसे मोजले होते.
25 Nov 2010 - 11:42 pm | आमोद शिंदे
अच्छा हाच होय तो इनोद!
डिस्क्लेमरः शिंद्यांनी कुणालाही व्यनि केलेला नाही.
25 Nov 2010 - 7:01 am | कुळाचा_दीप
देवाने जे न्याचरलि दिलय ...त्यात कहितरि तथ्य असावे ... माझे स्वत:चे केस बिल्डिन्गच्या प्लानच्या काग्दान सारखे आहेत. कितिदहि सरळ केले तरि त्यान्चि आपलि सुरळी होतेच. त्यामुळे वैताग आला कि मी हेअर श्टाइल बदलतो... :)