उपवासाची बटाटा भाजी

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
17 Nov 2010 - 11:20 pm

From

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

18 Nov 2010 - 12:50 am | मेघवेडा

आयला हे भारीये! पब्लिक पाकृंमध्ये फोटो टाकत नाही म्हणून बोंबा मारल्या आजवर, हे काय उलटंच आज?

निवेदिता-ताई's picture

22 Nov 2010 - 11:00 pm | निवेदिता-ताई

माझी भाजीची कॄती कुठे गेली...................

सुनील's picture

18 Nov 2010 - 1:01 am | सुनील

माझा अंदाज -

१) बटाटे उकडून घ्या.
२) एका भांड्यात तूप गरम करा.
३) तुपात जिरे घाला.
४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला.
५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ (कदाचित हिरव्या मिरचीदेखिल) घाला.
६) झालं!

बरोबर है ना तै?

शुचि's picture

18 Nov 2010 - 2:39 am | शुचि

वाईची साखर बी चालतीया.

स्पंदना's picture

18 Nov 2010 - 9:08 am | स्पंदना

वाईचीच का? सातारची का न्हाय चालणार? म्हारांजांचा कारखाना हाय म्हनुन?

सूड's picture

18 Nov 2010 - 1:25 pm | सूड

खरच डायबेटीक माणसांना किती वाईट वाटत असेल हे डिस्कशन वाचून? सॅकरीन चालेल का यात ?

स्पंदना's picture

18 Nov 2010 - 9:09 am | स्पंदना

ए गप ए! त्या खाताहेत.
डिस्टर्ब नको करु.

चिंतामणी's picture

22 Nov 2010 - 9:09 am | चिंतामणी

१) बटाटे उकडून घ्या.
२) एका भांड्यात तूप गरम करा.
३) तुपात जिरे घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरचीदेखिल घाला.
४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला.
५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ आणि चवीपुरती साखर घाला.
६) थोडी वाफ येउ द्यावी.
७) वरून बारीक चिरलेली कोथींबीर भुरभुरावी.

पर्नल नेने मराठे's picture

21 Nov 2010 - 3:17 pm | पर्नल नेने मराठे

मी दाण्याच कुट घालत नाही ह्या भाजीत..
हिर्वी मिर्ची हविच..
साखर घालते अर्धा चमचा.