मोरावळा-----

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
30 Oct 2010 - 11:25 am

साहित्य:- दहा-पंधरा चांगले मोठे आवळे, एक किलो साखर, पाकासाठी थोडेसे पाणी.

कॄती :- आवळे स्वच्छ धुवुन घ्या, एका पातेल्यात पाणी घालून त्यावर चाळण ठेवा, त्यात आवळे घाला,
दहा मिनिटे वाफ़वून घ्या.
जरा गार झाल्यावर त्यातील बिया काढून टाका, व त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करा.
आता त्या मोजा किती वाट्या आहेत फ़ोडी, त्याच्या दुप्पट साखर घेउन त्यात थोडेसे पाणी घालून पाक
करण्य़ास ठेवा, चांगले बुडबुडे येइपर्यंत पाक होवु द्यात,

From !!
नंतर त्यात आवळ्य़ाच्या फ़ोडी घालून पुन्हा दहा-पंधरा
मिनिटे शिजवा.
From !!

पातेले खाली उतरवून ठेवा. गार झाल्यावर बरणीत भरुन ठेवा.
हा मोरावळा पित्त नाशक आहे, रोज अनुशापोटी खाल्ला तर पित्त होत नाही,
पचन सुधारते, खूप औषधी आहे.

From !!

प्रतिक्रिया

पिंगू's picture

30 Oct 2010 - 11:34 am | पिंगू

मोरावळा उत्तम आहे आणि सोपी पाककृती दिल्याबद्दल अभिनंदन...

- (मोरावळाप्रेमी) पिंगू

"मुरावळा " कि "मोरावळा"

आज आईने डब्यात मुरावळाच दिलाय................

निवेदिता-ताई's picture

30 Oct 2010 - 2:39 pm | निवेदिता-ताई

आमी नाय बाबा पोळीबरोबर खात ...नुसताच खातो..

डावखुरा's picture

12 Nov 2010 - 2:10 pm | डावखुरा

मस्त..
हिवाळ्यात उत्तम..

कच्ची कैरी's picture

14 Nov 2010 - 7:24 pm | कच्ची कैरी

मी याच रेसेपीच्या शोधात होते.इतक्या छान रेसेपीबद्दल धन्यवाद.

काजुकतली's picture

16 Nov 2010 - 11:22 am | काजुकतली

अगदी सोप्पी पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद. मी पुस्तकात वाचली होती, त्यात आवळे टोचुन एक दिवस पाण्यात ठेवायला सांगितले होते. पण टोचुन वर पाण्यात बुडवुन ठेवले तर त्यातले क जीवनसत्व निघुन जाईल असे वाटले.