हे शक्य आहे का?

प्रमोद सावंत१'s picture
प्रमोद सावंत१ in काथ्याकूट
8 Nov 2010 - 12:37 pm
गाभा: 

नेत्यांचे महत्व वाढले म्हणजे देशाची प्रगती झाली असे होत नाही. सामान्य लोकांना जेव्हा जगताना नैराश्य येणार नाही, त्यांच्या गरजा पूर्ण होतील. मुलांच्या नोकरीची खात्री वाटेल, वीज- पाणी- शौचालयाची सोय असेल, तेव्हा आपली प्रगती झाली असे आपण समजू शकतो. हा प्रवास जेव्हा मागासलेल्या जिल्ह्यांत ठोसपणे सुरू होईल व शहरातील झोपडपट्टीचे प्रमाण दरवर्षी किमान १०-१५ टक्क्यांनी होईल, तेव्हाच आपण योग्य मार्गावर चाललो आहोत, असे म्हणता येईल. जेव्हा हिंदू- मुस्लिम, उत्तर- दक्षिण भारतीय यांच्यातील वाद संपेल तसेच शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत आत्महत्या होणे बंद होतील, तेव्हाच आपल्याला माणुसकीचा अर्थ समजला आहे, असा आपल्याला दावा करता येईल. जेव्हा आपण गरिबांचे अश्रू पुसू, एक आरोग्यदायी समाजनिर्मिती करू व उंच इमारती बांधण्यासाठी निसर्गावरचे आक्रमण पूर्णपणे थांबवू तेव्हाच आपला प्रवास अंत्योदयाच्या मार्गाने सुरू होईल.
संदर्भ- एका दिशेचा शोध, लेखक- संदिप वासलेकर, प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे
वासलेकरांनी योग्य दिशा दाखवलेली आहे. परंतु मुद्दा असा आहे की ही दिशा प्रत्यक्षात केव्हा अवतरेल. आपणांस काय वाटते?
अधिक माहितीसाठी पहा- http://www.facebook.com/profile.php?id=100001646993870#!/pages/Eka-Dishe...

प्रतिक्रिया

स्पा's picture

8 Nov 2010 - 12:39 pm | स्पा

:(

एका दिशेचा शोध

दहा दिशा आलरेडी माहीत आहेत.
पुन्हा अकरावी दिशा कुठून तयार करायची? आणि कशासाठी?
तु म्हाला दिशा सापडलेली नाहीय; फिरून फिरून धाग्यावर येताय.

दिशा शोधली की मात्र कळवा.

स्पा's picture

8 Nov 2010 - 12:50 pm | स्पा

:)

चिरोटा's picture

8 Nov 2010 - 2:00 pm | चिरोटा

हे वासलेकर कोण आहेत? दर आठवड्याला त्यांचे एक पुस्तक प्रकाशित होतेय असे दिसते.

तिमा's picture

8 Nov 2010 - 8:17 pm | तिमा

अशा धाग्यांची संपादकमंडलाने योग्य ती 'वासलात' लावावी.

अविनाशकुलकर्णी's picture

8 Nov 2010 - 8:43 pm | अविनाशकुलकर्णी

प्रमोद राव यांच्यावर संदिप वासलेकर, यांनी मुठ मारुन भानामति करुन हे झाड भारुन टाकले आहे..
प.रा यांनी यावर जीन..व्हिस्की ..कोंबडी यांचा उतारा शोधावा.