ओबामांचा दौरा - लोकसत्ताचा मस्त आढावा

यकु's picture
यकु in काथ्याकूट
6 Nov 2010 - 9:23 am
गाभा: 

भारत-पाकीस्तान-अमेरिका-रशिया यांच्या संबंधाचा लोकसत्तामधील मस्त आढावा.

[http://tinyurl.com/2ws6epa]

ओबामांचा भारत दौरा अमेरिकनांना रोजगार हमी देण्यासाठी अशीही बातमी आहे.
अभ्यासूंनी मतं मांडावीत.

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

6 Nov 2010 - 10:15 am | गांधीवादी

ओबामांना दाखवा 'भ्रष्टाचाराचा ओसामा'

ह्या ब्लॉग मधील काही विचार :
ओबामांना 'आदर्श सोसायटी' दाखवायलाच हवी. आमच्या देशात शहीद आणि त्यांच्या पत्नींनी काय 'मान' दिला जातो, हे त्यांना यामुळे लक्षात येईल. कॉमनवेल्थ गेम्समधील भ्रष्टाचारामुळे जगप्रसिद्ध झालेले सुरेश कलमाडी, सासू आणि मेहुण्यांच्या फ्लॅट्समुळे गोत्यात आलेले अशोक चव्हाण, झेंडा मार्चसाठी वसुली अभियान करणारे माणिकराव ठाकरे यांची तर ओबामांनी स्वतंत्रपणे तासभर भेट घेतली पाहिजे. मुले, पत्नी यांच्या नावे फ्लॅट्सची तजवीज करणारे कुटुंबदक्ष सरकारी अधिकारी यांच्याकडूनही ओबामांना बरंच काही शिकता येण्यासारखं आहे.

चिरोटा's picture

6 Nov 2010 - 11:12 am | चिरोटा

बातमीतली ती माहिती इकडून 'उचलली' असावी. "http://www.nytimes.com/2010/11/06/opinion/06obama.html?_r=1&hp"
त्या बातमीतूनच-

It is for this reason that I set a goal of doubling America’s exports in the next five years. To do that, we need to find new customers in new markets for American-made goods

मध्यावधी निवड्णूकीतील निकालावरून ओबामांना तसे बोलणे/करणे आवश्यकच आहे.संरक्षण सामुग्री,विमानांचे अर्थातच मोठ्या प्रमाणावर अमेरिका निर्यात भारताला करेल्.बाकी रिटेल,वीमा क्षेत्रातही भारत सरकारने दारे पूर्ण उघडी करावीत ह्यासाठीही प्रयत्न होतील.बदल्यात भारत आपल्या पदरात व्हिसावाढी पलिकडे आणखी काय पाडून घेतो ते बघायचे.

मदनबाण's picture

6 Nov 2010 - 11:37 am | मदनबाण

रिटेल रिटेल रिटेल...

अवांतर :--- साला, अमेरिकेत मंदी आहे म्हणे !!!
कुठली मंदी ? कसली मंदी ?
पाकड्यांना मुक्त हस्ताने पैसे देणारी हीच अमेरिका...
पाकड्यांना मुक्त हस्तानेच करोडो डॉलरची शस्त्रे देणारी हीच अमेरिका...
ओबामा भेटीवर (अंदाजे) दिवसाला ९०० कोटी रु.खर्च करणारी हीच ती अमेरिका...
इराकच्या युद्धावर भरमसाठ खर्च करणारी देखील हीच अमेरिका...

जाता जाता :--- हे फिरंगी लोक त्यांचा कसा फायदा करुन घेतात हे मी काही वेगळं सांगायला नको...६५च्या युद्धात पाकड्यांनी आपल्या विरुद्ध जे Patton M-47 and M-48 tanks वापरले होते, ते याच अमेरिकेने दिले होते.

रणजित चितळे's picture

6 Nov 2010 - 1:56 pm | रणजित चितळे

आपला भ्रष्टाचार ओबामा यांना दाखवुन काय मिळणार. आपल्या घराला लागलेली आग आपणच विझवायला पाहीजे - बाकीचे दिवाळी समजुन टाळ्या मारतील व आनंद घेतील. ज्या भारतात लोकांच्या भ्रष्टाचार संबंधीत संवेदना बधिर झाल्या आहेत त्यांना काय समजणार व काय सांगणार. जो भ्रष्टाचार करत नाही तो मुर्ख व भ्रष्टाचार करणारा स्मार्ट असे जिथे गणले जाते तिथे सगळा असाच सावळा गोंधळ चालणार.

जाता जाता :--- हे फिरंगी लोक त्यांचा कसा फायदा करुन घेतात हे मी काही वेगळं सांगायला नको...६५च्या युद्धात पाकड्यांनी आपल्या विरुद्ध जे Patton M-47 and M-48 tanks वापरले होते, ते याच अमेरिकेने दिले होते.

कोठलाही देश स्वतःचा फायदा बघते. अमेरीका स्वतःचा फायदाच बघते. आपला देश स्वतः फायदा बघत नाही
- आपण अजुन सुद्धा बांगलादेशी निर्वासितांना शरण देतो.
- चिन ब्रह्मपुत्रा वळवते आहे त्यांच्या कडे - पण आपण माणुसकी म्हणुन सिंधु नदी वाहु देतो पाकीस्तानात.
- पाकीस्तान अतीरेक्यांना शिकवुन पाठवत आहेत आपल्या कडे व आपण त्यांना पुरग्रस्तांसाठी अपमान सहन करुन मदत पुरवत आहोत.

विकास's picture

6 Nov 2010 - 7:31 pm | विकास

कोठलाही देश स्वतःचा फायदा बघते. अमेरीका स्वतःचा फायदाच बघते. आपला देश स्वतः फायदा बघत नाही

पूर्ण सहमत. आपल्याकडे फायदा फार दूरदृष्टीने बघितला जात नाही असे वाटते.

आपल्याकडे फक्त स्वतःचाच फायदा बघणारी जात शासनकर्ती आहे..

यशवंतसाहेब,
आपण एकोळी, फक्त लिंक असलेले धागे न काढता थोडे तरी विषयाला धरून लिहावे असे सुचवते आहे.
तुम्हाला या विषयावर थोडे लेखन करून धागा पुन्हा प्रकाशित करावयाचा आहे काय?

लिंकमध्ये भरपूर लिखाण आहे; भरपूर दृष्टीकोण मांडले आहेत. त्यापेक्षा आणखी जास्त काय लिहीता येईल? म्हणून काहीही लिहीलेले नाही. अभ्यासूंनी केलेल्या चर्चेतून आणखी माहीती समोर येईल असे वाटले होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Nov 2010 - 1:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेंट झेवियर्सच्या महाविद्यालयातील मुलांनी चांगले प्रश्न विचारले. त्यापैकी, 'पाकिस्तानला आतंकवादी देश म्हणून घोषित का करत नाही' या प्रश्नाच्या उत्तराला बगल देत अतिशय चतुरपणे पाकिस्तानात आता उत्तम बदल होत आहेत. काही इस्लामिक संघटना पाकीस्तानला बदनाम करत आहेत. एक स्थिर पाकिस्तान भारताच्या हिताचे आहे वगैरे.. च्यायला, किती हा डोळेझाकपणा असतो त्याचा उत्तम नमुना आणि आंतराष्ट्रीय राजकारणात कसे चतुरपणे वागावे लागते त्याचा एक आदर्श त्यांच्या या मुलाखतीतून जाणवला.

-दिलीप बिरुटे

स्पा's picture

7 Nov 2010 - 1:22 pm | स्पा

अगदी खरय..............

प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला .. काहीतरी लांबलचक बोलून टोलवत होते, ओबामा महाशय.....

ओबामा भारत भेट -
अमेरिकेची आर्थिक बाजू सावरण्यासाठी सगळी धडपड

His policies are Curbing Outsourcing to India. There would be lot of downsizing, job and Visas cuts but wish to reduce barriers to United States exports and increase access to the Indian market.

What about Indian goods and services ?? आमच्या भारतातही मंदीच आहे, महागाई ने सामान्य माणूस होरपळला आहे अन त्यावर महागडे अमेरिकन सामान घेण्याची ऐपत आम्हा बापड्याकडे कुठून येणार ?? अन आम्ही अमेरिकेचे महागडे सामान का बरे विकत घ्यायचे ? चीन आधीच आपले सामान येथे Dump करत आहे त्यात भर म्हणून आता अमेरिका. :-(

चिरोटा's picture

7 Nov 2010 - 9:45 pm | चिरोटा

ते सामान विकण्यापेक्षा टर्बाइन्स्,विमाने असे सामान विकण्यात त्यांना जास्त रस आहे.!! सध्याच्या बातमी नुसार-
१ )बोईंगला स्पाईस जेटकडून ३० बोईंग विमानांची ऑर्डर आली आहे.(एक ७३७ बोइंग विमान साधारण ३० ते ५०,०००००० डॉलर्सचे असते!)
२) जनरल ईलेक्ट्रिकला रिलायन्सकडून ७५० ००००० डॉलर्स किंमतीची टर्बाइन्स्ची ऑर्डर आली आहे.
३)बाकी नको तेवढी गुप्तता पाळणारे डी.आर.डी.ओ/इस्रो ह्यांच्याकडूनपण बर्‍याच ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

अवांतर- होरपळणारे खूप आहेत पण मिळालेल्या पैशाचे करायचे काय असा विचार करणारेही भारतात खूप आहेत.

अविनाशकुलकर्णी's picture

7 Nov 2010 - 11:15 pm | अविनाशकुलकर्णी

पाक बद्दल बोलायला तयार नाहि