सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)
नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार मंत्रिमंडळाने महिला अत्याचार विरोधी कायद्याला (Protection of Women against Sexual Harassment at Workplace Bill, 2010 ) मंजुरी दिली असुन पुढिल कारवाई लवकरच होणार आहे. अनेकदा कामाच्या ठिकाणी अनेक स्त्रियांना आपल्या पुरुष सहकार्यांकडुन अपमानास्पद वागणुक मिळते. या कायद्यामुळे त्याचे समुळ उच्चाटन झाले नाही तरी किमान पायबंद बसेल असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे.
मनुष्य शिकला पण सुसंस्कृत झाला नाही असे आपल्याला आजुबाजुला पाहिले की दिसते. परस्त्री मातेसमान मानावी असे हिंदू धर्मातील अनेक पंथांचे म्हणणे असते. परंतु धर्माचा धाक अनेक नतद्रष्टांना नसतो त्यांना कायद्याचा धाक दाखवावा लागतो. सदर कायदा कसा आहे याविषयीची माहिती त्याचप्रमाणे सदर कायद्याचा अवलंब करुन पिडीतांना न्याय मिळवण्याची प्रक्रिया कशी आहे हे लवकरच समजेल. परंतु असा काही कायदा बनला आहे आणि आपण सदर कायद्याच्या कचाट्यात सापडु अशा भावनेने काही पिसाट मनोवृत्तीचे लोक जे बेताल वागत असतात त्याला आळा बसावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे.
खरोखर समाजाने आता एकजुटीने पुढे येवुन स्त्रियांवर त्या केवळ काही वैयक्तिक कारणास्तव, किंवा भीडेमुळे किंवा कोण काय म्हणेल या भावनेने आपल्यावर अत्याचार होत आहे हे लपवुन ठेवतात त्यांना मदत करणे गरजेचे आहे. अत्याचाराचे स्वरुप हे नेहमीच शारीरीकच असते असे नाही तर कित्येक वेळा जिव्हारी लागणारे शब्द, उगाचच जाता जाता केलेली कॉमेंट, अनावश्यक तर्हेने केलेला उपमर्द, वैयक्तिक टिका टिपण्णी हे सर्व मानसिक छळात येते आणि अशा प्रकारच्या छळाला कुठलाही पुरावा त्या पिडीत महिलेकडे नसतो.
अचकट विचकट कॉमेंट स्त्री सहकार्याबद्दल करुन आपल्या टवाळखोर मित्र मैत्रिणींसमवेत फिदी फिदी हसणे आणि जग हे असेच असते, जगात रहायचे तर असेच रहावे लागेल असे तोंड वर करुन बोलायचे हा बेशरमपणाचा कळस आहे आणि हे असे अनेक जण अगदी शिकले सवरलेले करत असतात ही बाब अत्यंत लांच्छनास्पद आहे. आम्ही ज्या संस्कृतीत वाढलो त्या संस्कृतीत विचार स्वातंत्र्य असले तरी काही काही बाबींमधे "कृष्णधवल असे काही नसते असतात त्या फक्त छटा" हे विचार आम्हाला मान्य नसतात. त्यामुळे काही गोष्टी या नेहमी चूकच असतात आणि काही गोष्टी या नेहमी बरोबरच असतात. त्यावर चर्चा करणे आम्हाला अजिबात पसंत नसते. अशा प्रकारे जी गोष्ट चूक आहे ती जर कुणी करत असेल तर त्या विरोधात पाठपुरावा आम्ही करत होतो, करत आहोत आणि करत राहु.
सदर कायदा काय आहे याबद्दल माहिती पुढे येईलच. त्याचबरोबर त्यात काही त्रुटी असल्यास त्या योग्य मार्गाने सरकार नामक यंत्रणेपर्यंत पोहोचवणे आम्ही आमच्या मित्रांच्या सहाय्याने करत राहुच याबद्दल शंका नाही.
सदर बातमीचा दुवा - http://www.pib.nic.in/release/release.asp?relid=66781&kwd=
मिपा ध्येयधोरणानुसार अनावश्यक मजकूर संपादीत.
पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा !
प्रतिक्रिया
4 Nov 2010 - 1:18 pm | आंबोळी
नान्याच्या लेखाशी सहमत...
अवांतर : अजुन युयुत्सु लॉगिन झालेले नाहीत वाटत...
4 Nov 2010 - 1:21 pm | मितान
ही आनंदाची बातमी दिल्याबद्दल आभार :)
शुभ दीपावली :)
4 Nov 2010 - 1:22 pm | यशोधरा
>>नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार मंत्रिमंडळाने महिला अत्याचार विरोधी कायद्याला (Protection of Women against Sexual Harassment at Workplace Bill, 2010 ) मंजुरी दिली >> चांगली बातमी.
4 Nov 2010 - 2:27 pm | वाहीदा
पण
Women prefer change of job than to face the Sexual Harassment as the pain, mental trauma, suffering and emotional distress caused to the person aggrieved.
कारण आपण Sexual Harassment चे शिकार आहोत हे कोणतीही मुलगी / महिला सहजा - सहजी सांगू शकत नाही कारण social and psychological dilemmas she may have to face (as consequences) shivers down to spine :-(
4 Nov 2010 - 2:59 pm | ५० फक्त
आतापासुनच प्रोटेक्शन ऑफ मॅन अग्नेस्ट द मिस युज ऑफ द अॅक्ट ऑफ Protection of Women against Sexual Harassment at Workplace Bill, 20ऑफ, हि चळवळ सुरु करावी लागेल.
माझ्या कंपनीत एका नवरा बायको जोडिने सध्या या बाबत माझ्या कंपनीत असलेल्या नियमांचा वापर करुन एका सिनियरला कंपनी सोडायला लावली.
कोणताही कायदा हा दुधारी तलवार असतो, जसा तो एखाद्याला वाचवतो तसांच तो दुस -याचा जिव पण घेतो. आणि सरकार जेंव्हा फक्त तलवारींचेच उत्पादन करणार असेल तर ढाली कोणितरी बनवायलाच हव्यात ना.
हर्षद
4 Nov 2010 - 3:14 pm | आंबोळी
हर्षत्सुंशी सहमत!
4 Nov 2010 - 4:54 pm | शुचि
बाळांचे पायाचे तळवे गुलाबी आणि मऊसर असतात पुढे ते घासले जाऊन , काट्याकुट्यात राठ बनतात. आणि मग एक वेळ अशी येते की तळव्यांची अपेक्षाच बनते काटेकुटे खायची.
अन्याय सहन करून करून काही व्यक्तींची मनं तशीच मुर्दाड होत असावीत असं वाटतं. मग फक्त निगरगट्टपणा अंगी बाणवून घेऊन जगणं आणि आजूबाजूकडून अन्यायाची अपेक्षा करणं हेच त्यां ना जमत असावं. अशा लोकांनी हिमालयावर जाऊन रहावं की काय कळत नाही जे की स्वतःच्या स्वाभिमानासाठीदेखील ब्र काढू शकत नाहीत. कशाला यांनी मोठ्या गप्पा माराव्या? का यांनी मुलांना जन्म द्यावा? काय देऊ शकतात हे त्यांच्या मुलांना - जे स्वतःचं रक्षण करू शकत नाहीत त्यांनी कोणाची जबाबदारी घ्यावीच कशाला.
नालायक आहेत ही मुर्दाड मनं!!!!
4 Nov 2010 - 5:39 pm | वेताळ
स्त्री संरक्षणप्रेमी नानांना कळेल अशी अपेक्षा आहे.
4 Nov 2010 - 5:01 pm | प्रियाली
मागे माझ्या ऑफिसात एका बनेल पुरुषाने एका स्त्रीला बॉस सेक्शुअल हॅरेसमेंट करतो अशी खोटी कम्प्लेंट करायला लावली होती. अशा कायद्याने बायकांचा फायदा होईलच, सोबत अशा बनेल पुरुषांचाही फायदा होईल. :)
बाकी, युयुत्सूंच्या प्रतिक्रियेबद्दल उत्सुकता आहे.
4 Nov 2010 - 5:54 pm | मुक्तसुनीत
रोचक.
- विचारजंत, ज्याची आयमाय कुणीही काढावी असा - आणि हो , श्वानसमूहाचा सभासद आणि तृतीयपंथी अशा उपाधी लागू केलेला.
(क्षमा करा, मूळ उपाधी येथे लिहील्या असत्या ...पण वातावरण सुसंस्कृत ठेवायचे ना ! )
;-)
4 Nov 2010 - 6:21 pm | आंबोळी
विचारजंत, ज्याची आयमाय कुणीही काढावी असा - आणि हो , श्वानसमूहाचा सभासद आणि तृतीयपंथी अशा उपाधी लागू केलेला.
बापरे!
आणि हा उपाधीदाता कोण म्हणे?
4 Nov 2010 - 6:54 pm | मुक्तसुनीत
बापरे!
आणि हा उपाधीदाता कोण म्हणे?
पहा नि घाबरून घ्या ! हाहाहा
http://www.misalpav.com/node/12834#comment-205547
बाय द वे : हे झाले फक्त सँपल ....असो. असो. आपण आपले वातावरण सुसंस्कृत ठेवूया.
4 Nov 2010 - 7:05 pm | यशोधरा
कोणाची बाजू घ्यावयाची वा न घ्यावयाची असे नाही, पण http://www.misalpav.com/node/12834#comment-205547 ही कमेंट ज्या "मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे" ह्या परा ह्यांच्या लेखातील आहे, त्या लेखातच "विचारजंत" ह्या शब्दावर बराच उहापोह आहे. असो.
4 Nov 2010 - 7:08 pm | मुक्तसुनीत
कोणाची बाजू घ्यावयाची वा न घ्यावयाची असे नाही,
अरे अरे अरे .....डोळे पाणावले बॉ ;-)
- दूधसे धुला हुआ.
4 Nov 2010 - 7:09 pm | यशोधरा
स्वतःचाच रुमाल घेऊन डोळे पुसा. अजून्ही हे सांगावे लागते का? हद्द आहे! ;)
4 Nov 2010 - 7:10 pm | मुक्तसुनीत
धन्यवाद.
- सौ चूहे खानेवाला. :-)
4 Nov 2010 - 7:12 pm | यशोधरा
>> दूध से धुला हुवा
>> सौ चूहें खानेवाला.
तरीच!
4 Nov 2010 - 7:13 pm | मुक्तसुनीत
हाहा. धन्यवाद.
- शिवराळ "पाध्ये". ;-)
4 Nov 2010 - 7:15 pm | यशोधरा
LOL! पटलं! :)
4 Nov 2010 - 7:16 pm | मुक्तसुनीत
QED.
आय रेस्ट माय केस. ;-)
4 Nov 2010 - 7:23 pm | यशोधरा
म्हंजे आता गप्प बसाल ना? तेवढेच खूप आहे, धन्यवाद.
4 Nov 2010 - 7:26 pm | मुक्तसुनीत
म्हणजे शेवटी "गप्प बसा" वर गाडी येते. अरेरे. सो मच फॉर सेल्फराईचसनेस ;-)
4 Nov 2010 - 7:29 pm | यशोधरा
रेस्ट माय केस म्हणालात की :) आता रेस्ट म्हटले तरी संपले नाही?
बरं बरं चालूदेत.
4 Nov 2010 - 7:11 pm | प्रियाली
कोण कुणाची बाजू कधी आणि कशी घेईल हे गणित कधीच सुटलेले नाही.
बाकी, चालू द्या. :)
4 Nov 2010 - 6:51 pm | शुचि
काही शब्द हे एका विशिष्ठ विचारसरणीवर हल्ला करणारा म्हणून कॉईन झालेले असातात. विचारसरणीला चेहेरा नसतो. कोणी एक व्यक्ती तिची मक्तेदारी घेत नाही. थोडंफार ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स (http://en.wikipedia.org/wiki/Tragedy_of_the_commons ) या वळणावर हा हल्ला जातो. त्याचा विरोध करणारी कोणी "व्यक्त/सदृष" व्यक्ती नसल्याने तो शब्द चालत रहातो.
मग असे हल्ले कोणाकोणावर होतात? -
(१) ज्यांना चेहरा नाही ते उदाहरणार्थ एखादी विचारसरणी/ प्रवृत्ती
(२) आणि जे चेहरा असूनही स्वत:चे रक्षण करण्यास असमर्थ असतात ते लोक. (धरून चाला की असे दुबळे नग एक दोन मिळणारच)
सुसंस्कृत समाजामधे या दोन्ही घटकांना संरक्षण असेल असं वाटतं.
4 Nov 2010 - 6:32 pm | तिमा
युयुत्सु, लवकर प्रगट व्हा.
4 Nov 2010 - 7:00 pm | विसोबा खेचर
छान रे नान्या..
4 Nov 2010 - 7:46 pm | अविनाशकुलकर्णी
मुलींना नोकरी मिळणे कठिण होईल....कोण फुकटची कटकट विकत घेईल?
4 Nov 2010 - 8:49 pm | रेवती
आता यात कटकट कोणती बुवा?
नोकरी पात्रता पाहून देतात कि अपशब्द सोसण्याची ताकद पाहून देतात?
सगळ्यांना समान आणि योग्य वागणूक मिळाली पाहिजेच!
4 Nov 2010 - 10:14 pm | स्वाती२
यात फुकटची कटकट काय आहे?
समजा उद्या तुमच्या घरातील स्त्री ला लैगिक छळ सोसावा लागला तर तुम्ही काय कराल? तिला नोकरी सोडायला सांगाल, निमुटपणे छळ सहन करत नोकरी कर असा सल्ल द्याल की अन्याया विरूद्ध दाद मागण्यासाठी तिला मदत कराल?
घटनेने प्रत्यक व्यक्तीला नोकरी धंदा आत्मसन्मानपुर्वक करण्याचा अधिकार दिला आहे. या अधिकारावर लैगिक छळामुळे गदा येत असेल तर त्या संबंधी काही कायदे नकोत?
6 Nov 2010 - 8:05 pm | वाहीदा
तुमच्या मते तिथे मुलांना / पुरुषांना नोकरी मिळणे कठिण होईल का ??
नसती कटकट स्रियातरी पदरी का पाडून घेणार ;-)