एका तडीपाराची जबानी

यकु's picture
यकु in काथ्याकूट
4 Nov 2010 - 4:37 pm
गाभा: 

ही जाहीर जबानी सुरू करण्याअदुगर सम्पाद्क मंडळाम्होरं काही मुद्दे मांडू इच्चितो. कारन मी ल्हिलेलं त्येंनी पुसून टाकल्यास पब्लिकला ही जबानी वाचाय कशी मिळ्णार? तर क्रपया हे पुसू नै.
१. आताचा मी यशवंत एकनाथ म्हणजे पूर्वीचा यशवंतकुलकर्णी; जो त्यानं इथं काही गुन्हे केल्यानं तुमच्या नजरेत सध्या तडीपार हाये.
२. आताचा यशवंत एकनाथ हा आयडी दोन वर्सांपूर्वी मला देन्यात आला हुता. काल पात्तुर मी ह्यो कदीच वापरलेला न्हाई कारन तो मला देन्यात आला हाये हेच मला ठावं नव्हतं. तडीपारीच्या काळात जुन्या वह्या चाळताना मला हा आयडी गावला आन तो वापरून मिसळपावच्या दाराला सहज धक्का मारला तर काय! खुल्ललं ना दार! मंग काय आलो मी आत.
३. असं हाय की सुसंस्क्रत मानसं कायदा पाळतात. मी सुसंस्क्रत है की नाही ते मला ठावं नाही तशेच एका तडीपाराच्या सुसंस्क्रतपणाच्या दाव्यावर कुनी इश्वासही ठिवणार नाही. पन इथं माझ्या हातावर तडीपारीचा शिक्का गोंदवला गेला असल्यानं आणि इथंच तो पुसला जावा अशी माजी इच्चा असल्यानं मी पुन्यांदा इथं आलोय.
४. एकदा तडीपार केल्याच्या बाद बी, बाकायदा तडीपारी संपन्या अदुगर इथं येन्याचं कारन काय? त्येची कारनं दोन - एक म्हंजी माजा तयार आयडी आन दुसरं कारन मला मिसळपावबिगर र्‍हाहवत नाई !
५. सम्पाद्क मंड्ळ काही दिवसानंतर माजी तडीपारी संपवनार हायेच; पन नेमकं कदी ते ठावं न्हाई.
६. अजून एक सवाल असा की, केलेले गुन्हे आन मिळालेली तडीपारी याचा इच्यार करूनही मला पुन्यांदा इथं का यिऊ द्यावं? मी फुडं गुन्हे करणार नाही याची काय हमी?

तर मी कोंचीबी नशापानी न करता, पूर्न शुद्धीत, कोनाच्याबी दबावाबिगर आजच्या तारखेला अशे हमीपत्र देतो की -

१. मी माजी खरडवही वापरनार नाई; जेनेकरुन कोनाला काही बोलन्याचा अथवा कुनाचे काही ऐकून घेन्याचा प्रसंगच येनार न्हाई.
२. मी माज्या नजरेतून लोककल्ल्याणकारी पोस्टी टाकन्याचा धंदा इथं पुन्यांदा सुरू करनार न्हाई! आणि सदश्यांन्ना कसल्याबी प्रकारे कोन्तेच उत्तर देनार न्हाई.

जन्तेचे मनोरंजन करून त्येंच्याकडून कसल्याच प्रकारे दाद वसूल करन्यात मला वैयेक्तीक कसलाच विंट्रेस्ट नाई.
पन कायम हेच धरुन बसलो तर माजे कसब निरुपयोगी व्हईल - म्हनून मला जे-जे सुचलं ते ते इथं टाकत र्‍हाईन पन त्यादरम्यान प्रतिसाद देत अस्ताना कुनालाही शिक्षन देनार न्हाई किंवा इतर कोन्त्याबी प्रकारे त्यांच्या "अहं" ला धक्का पोचवनार न्हाई किंवा कुनाच्या "अहं" च्या बांदनुकीत बी वाटा उचलनार न्हाई जेनेकरून मी कंपूबाजीपासून दूर राहीन.

सम्पाद्क मंडळ आन सर्व सदश्यांन्ना इनंती की आवाजी मतदान करून निर्नय द्यावा.
निर्नय माज्या इरोदात गेल्यास मी या आयडीचा कद्दी-कद्दी वापर न करता घरात गपचीप बसून मिसळपावचा वाचकमात्र राहिन!

अंगठा ॥ ॥।
यशवंतकुलकर्णी उर्फ
यशवंत एकनाथ

-० जबानी पुर्न ०-

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

4 Nov 2010 - 4:41 pm | इंटरनेटस्नेही

ह्म्म्म..

हा धगा उडणार, नक्कीच.

-
इंट्या साळगांवकर.

आपली तडीपारी रद्द होवो ह्याच शुभेच्छा.

सिद्धार्थ ४'s picture

4 Nov 2010 - 5:36 pm | सिद्धार्थ ४

वेलकम (म्हणावे का सायमन गो) ब्याक :)

पर्नल नेने मराठे's picture

4 Nov 2010 - 5:56 pm | पर्नल नेने मराठे

अच्र्त बव्ल्त

तिमा's picture

4 Nov 2010 - 6:28 pm | तिमा

ही नजरेला व कानाला गोड वाटणारी 'चुचु' वाणी ऐकण्यासाठीतरी तुमची तडीपारी रद्द होवो.

अर्धवटराव's picture

5 Nov 2010 - 12:25 am | अर्धवटराव

तुमची तडीपारी का झाली हे मला अजुनही कळलेले नाहि. पण असो.
सणासुदीला परत आलात. छान झालं.

(स्वागताभिलाषी) अर्धवटराव

प्रियाली's picture

5 Nov 2010 - 12:34 am | प्रियाली

हा काय प्रकार आहे?

एखाद्या सदस्याला अशाप्रकारे जाहीर जबानी द्यावी लागू नये असे वाटते.

सहमत.
सदस्याने लिहिलेल्या लेखावर आक्षेप घेण्याजोगे दिसत नसले तरी गरज नसताना असे धागे काढले जावू नयेत.
जे काय झालं ते कारण नसताना लेखक स्प्ष्ट करत आहेत. तुम्ही परत आलात ठिक्......चर्चा नको असे वाटते.

पक्या's picture

5 Nov 2010 - 2:41 am | पक्या

>>तुम्ही परत आलात ठिक्......चर्चा नको असे वाटते
रेवती ताई , तुम्हाला नीट कळाले नाही बहुतेक असं तुमच्या प्रतिसादावरून वाटले.
त्यांना तडीपारी यशवंत कुलकर्णी ह्या आयडीसाठी रद्द करून हवीय . आत्ता ते वेगळया आयडीने आले आहेत.

रेवती's picture

5 Nov 2010 - 3:04 am | रेवती

त्यांना तडीपारी यशवंत कुलकर्णी ह्या आयडीसाठी रद्द करून हवीय
हा प्रस्ताव आधीही आला होता आणि तो संपादक मंडळाच्या विचाराधीन आहे.

असा कोणताही प्रस्ताव यापूर्वी मी पुढे केलेला नाही.
विचाराधीन असण्याचा प्रश्न नाही.
इथं येऊ इच्छिणारे, असलेले लोक फक्त संपादक मंडळासाठी लेखन करीत नाहीत.
नेमकं काय होतंय ते सदस्यांनाही कळणं महत्वाचं आहे, त्यात त्यांचाही सहभाग असणं महत्वाचं आहे म्हणून हा जाहीर धागा टाकलाय.

यापूर्वी माझ्याबद्दल सद्भावना दाखवून कुणी संमं मध्ये रदबदली केली असेल तर त्याची मला काहीही कल्पना नाही.
असे कृपया करू नये असे मी स्पष्ट केले होते.
असे एककल्ली प्रस्ताव दाखल केल्याबद्दल आणि ते दाखल करून घेतल्याबद्दल आणि विचाराधनतेच्या कपाटात ठेवल्याबद्दल - अर्थातच धन्यवाद!

एखाद्या सदस्याला अशाप्रकारे जाहीर जबानी द्यावी लागू नये असे वाटते.

ठळक भाग पुन्हा एकदा वाचाला का जरा?

मी जबानी देत नाहीय; द्यावी लागत आहे.
हे जर न करता इथं वावरू लागलो तर हाकलून दिलेले असतानाही बुरखा घालून इथं लोक वावरतात अशा चर्चा करायलाही लोक पुन्हा मोकळे.
ही धर्मशाळा असेल तर तसे सांगा!

असे असेल तर तुम्ही या बाबतीत संपादक मंडळाला आधीच संपर्क करणे आवश्यक आहे.

रणजित चितळे's picture

6 Nov 2010 - 2:40 pm | रणजित चितळे

कोणी प्रकाश टाकेल काय. तुम्ही का गेलात का आलात व ही जबानी काय काही समजले नाही.