लोकसत्तेमध्ये मागील ३/४ दिवसात फारच सुंदर अग्रलेख आले आहेत. जगातून जातीयवादी शक्तींना नाहीसे करण्याचा लोकसत्तेने जो विडा उचलला आहे तो खरोखर स्पृहणीय आहे. जगात घडत असणाऱ्या सर्व वाईट गोष्टीना सर्वस्वी संघपरिवार उत्तरदायी आहे यात काहीही दुमत असण्याचे कारणच नाही. लोकसत्तेचा २५ ऑक्टोबरचा भगवे दहशतवादी हा अग्रलेख हा याच मालिकेतील एक दुवा आहे. संघाचे कोणालाही माहित नसलेल्या छुपे अतिरेकी मनसुब्यांचा लोकसत्ताने या अग्रलेखात पडदाफाश केला आहे. गुजरात मध्ये विकासाचे ढोंग करणाऱ्या नरेंद्र मोदींना यात चांगलेच झोडपले आहे. त्सुनामी, भूज चा भूकंप आणि लेह मधील ढगफुटी यात देखील संघाचा हात आहे का यावर लोकसत्तेने शोधपत्रकारिता करण्याची आता गरज आहे. आजच्या (२९ ऑक्टोबर) च्या अग्रलेखातसुद्धा ओबामा कर्नाटकात न जाण्याला तेथील भाजप सरकार कसे जबाबदार आहे ते सांगितले आहे. अमेरिकेच्या आतल्या गटातील बातम्या फक्त आणि फक्त लोकसत्तेला काळात असल्याने त्यांचे कौतुक करण्याची गरज आहे. जगातील सर्वात जातीयवादी संघटन म्हणजे संघपरिवार आणि सर्वात दुष्ट व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी या लोकसत्तेच्या मोहिमेला लवकरच यश येवो. म्हणजे सच्चर, अरुंधती रॉय, तीस्ता सेटलवाड अश्या धर्मनिरपेक्ष लोकांचा विजय होईल. यातच भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे यश सामावलेले आहे.
संदर्भासाठी दोन्ही अग्रलेखांचे दुवे खाली देत आहे.
१) http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=110...७
२) http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=111...
प्रतिक्रिया
29 Oct 2010 - 9:18 am | स्वानन्द
अगदी... कालचं अग्रलेखाचं पान तर काँग्रेस्वाल्यांनी विकतच घेतलं असावं. एरव्ही ही मी लोकसत्ताचे अग्रलेख वाचतच नाही. एककल्ली आणि सोनिया धार्जिणे असतात. सुरुवातीला वाटायचं की हे प्रामाणिक मतं मांडताहेत. पण नंतर नंतर तर सोनिया गांधीचा आणि काँग्रेस चा जो उदो उदो चालवलेला दिसला ते पाहून म्हटलं हे न वाचलेलंच चांगलं.
29 Oct 2010 - 9:33 am | मृत्युन्जय
एरव्ही ही मी लोकसत्ताचे अग्रलेख वाचतच नाही
मी लोकसत्ताच वाचणे सोडुन दिले. सकाल सोडुन लोकसत्ता सुरु केला तेव्हा कळाले की लोकसत्तापेक्षा सकाळ १०० पटींनी चांगला. सध्या प्रभात वाचतो आहे. तो किमान निष्पक्ष तरी वाटतो.
29 Oct 2010 - 2:00 pm | विजुभाऊ
लोकसत्तापेक्षा सकाळ १०० पटींनी चांगला. तो किमान निष्पक्ष तरी वाटतो.
अरे बापरे... सकाळ इतके मिळमिळीत वर्तमानपत्र गेल्या १०००० वर्षात झालेले नाही होणार नाही.
पुण्यातले स्थानीक वर्तमान पत्र आहे. स्थानीक बातम्या त्याही केवळ फारसे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी करत छापलेल्या ( झैराती बुडतील म्हणून) सकाळने कधीच सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध फारशा बातम्या कधी छापलेल्या नाहीत. कोणत्याच बाबतीत सकाळने कधीच एक निश्चीत धोरण स्वीकारले नाही.
"सकाळ निष्पक्ष आहे " हा एक मोठा विनोद आहे. सकाळ निष्पक्ष असेल तर तो केवळ कोणतेच धोरण नसल्यामुळे. एक बीनबुडाचे ;ब्राम्हणी विचारांचे वर्तमानपत्र ही सकाळची खरी ओळख आहे. पुणेकराना तसे सोयीस्कर धोरण मंजूर आहे यामुळे सकाळचा पुण्यात फार्फार उदोउदो होतो.
29 Oct 2010 - 2:07 pm | स्वानन्द
>>ब्राम्हणी विचारांचे वर्तमानपत्र ही सकाळची खरी ओळख आहे.
म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे? नीट कळलं नाही.
29 Oct 2010 - 2:12 pm | परिकथेतील राजकुमार
कृपया ह्याचा अर्थ विजुभौ समजावतील का ?
आणि पवारांचे वर्तमानपत्र ब्राम्हणी विचारांचे आहे हि एक नविनच माहिती.
असो...
विजुभौंच्या उत्तराची वाट पाहात आहे. उगाच विशिष्ठ जातीवर टिकाटिपणी करुन सवंग प्रसिद्धी मिळवण्याच्या लाटेतला हा एक प्रयत्न नसावा अशी आशा.
29 Oct 2010 - 2:17 pm | छोटा डॉन
+२,
ब्राम्हणी विचारांचे म्हणजे नक्के कसे हा अर्थ जाणुन घेण्यास मी ही उत्सुक आहे. त्या हिशेबाने मग इतरही वृत्तपत्रांचे मुल्यमापन करता येऊ शकते अशी एक शक्यता निर्माण होते.
वाट बघत आहे विवेचनाची.
- छोटा डॉन
29 Oct 2010 - 2:19 pm | अवलिया
हेच म्हणतो. आणि मग असेच आयडींचे पण मुल्यमापन करता येईल असा विचार करतो.
29 Oct 2010 - 2:21 pm | llपुण्याचे पेशवेll
+२,
ब्राम्हणी विचारांचे म्हणजे नक्के कसे हा अर्थ जाणुन घेण्यास मी ही उत्सुक आहे. त्या हिशेबाने मग इतरही वृत्तपत्रांचे मुल्यमापन करता येऊ शकते अशी एक शक्यता निर्माण होते.
वाट बघत आहे विवेचनाची.
+४
मला पण तसे मूल्यमापन व्हावे असे मनापासून वाटत आहे पण,
पण असली विवेचने ते देत नाहीत हा इतिहास आहे.
29 Oct 2010 - 6:13 pm | मृत्युन्जय
उगाच विशिष्ठ जातीवर टिकाटिपणी करुन सवंग प्रसिद्धी मिळवण्याच्या लाटेतला हा एक प्रयत्न नसावा अशी आशा.
जरा जास्तच अपेक्षा तुमच्या विजुभौंकडुन.
29 Oct 2010 - 8:20 pm | विजुभाऊ
ब्राम्हणी विचारांचे वर्तमानपत्र ही सकाळची खरी ओळख आहे
आपण कशाला कोणत्या भानगडीत पडायचे . नस्ते बालंट यायचे आपल्यावर. आपण बरे आपले बरे ही ती वृत्ती.
( ब्राम्हणी हा शब्द जातीवाचक म्हणून लिहीलेला नाही. तो वृत्तीवाचक आहे. )
सकाळ ने आत्तापर्यन्त कधीच खळबळजनक बातम्यांचा पाठपुरावा केलेला नाहीय्ये. जो काही केला असेल तो हात राखूनच केलेला आहे.
ती बातमी कोनत्याही पक्षाची असूदे सकाळच्या बातम्यांत त्यांचा उल्लेखदेखील नसतो.
खैरनारांची वक्तव्ये सर्व वृत्तपत्रे डोक्यावर घेत होती. सकाळमध्ये साधी ओळही छापून येत नव्हती.
भुजबळ तेलगी वगैरेंच्या संदर्भात जे काही यायचे त्यावर सकाळची भुमिका काहीच नव्हती. बातम्या छापून येत नव्हत्या.
सकाळ एक स्थानीक वर्तमानपत्र म्हणूनच वावरत असतो. लोकसत्ता अथवा मटा हे राज्याचे प्रतिनिधीत्व करतात.
मी ब्राम्ह्नणी हा शब्द जातीवाचक म्हणून वापरलेला नाहिय्ये. सकाळ हे पवारांचे वर्तमानपत्र आहे हे नेहमीच जाणवते. पवाराष्ट्रवादी बद्दलच्या अनेक बातम्या सकाळमध्ये कधीच दिसत नाहीत.
सकाळ हे भांडवलदारांचे वृत्त्तपत्र नाहिय्ये पण ते नेहमीच भांडवलदारांची बाजू उचलून धरते.
उदा: टेल्को मधला संप चालू असताना खरे तर सकाळने फार मोठी भूमिका बजावू शकला असता.
लवासा प्रकरनाबद्दल सकाळ मध्ये छापून येणार्या बहुतेक बातम्या एकतर्फी असायच्या.
पुण्यातील टेकड्या/अनधीकृत बांधकामे याबद्दल सकाळ लढावू भुमिका घेवु शकते. पण ती त्यानी कधीच घतली नाही.
अर्थात सकालने कोणत्याच बाबतीत लढावू भूमिका कधीच घेतली नव्हती असो.
सकाळ बाबत मत व्यक्त केले म्हणून पुणेकरांच्या नाकाला मिरच्या झोंबलेल्या दिसतात.
29 Oct 2010 - 8:34 pm | स्वानन्द
>>आपण कशाला कोणत्या भानगडीत पडायचे . नस्ते बालंट यायचे आपल्यावर. आपण बरे आपले बरे ही ती वृत्ती.
याला बोटचेपेपणा, पुळचटपणा वगैरे म्हणू शकता. 'ब्राह्मणी' ही वृत्ती कशी होवू शकते? त्या न्यायाने 'क्षात्रियी' वृत्ती, मागासवर्गीय वृत्ती असे ही शब्द असतील, हो ना?
29 Oct 2010 - 9:40 pm | प्रशु
आलात का परत आमच्यावर.. अहो तुम्हाला कोणी अरे केले तर त्याला कारे करा ना पण उगाच दुसर्यांना का मध्ये खेचता...
30 Oct 2010 - 10:58 am | परिकथेतील राजकुमार
उत्तम माहिती. आज ज्ञानात खुपच भर पडली. धन्यवाद विजुभौ :)
आता विजुभौं सारख्या अभ्यासु सदस्याकडुन गुजराथी वृत्ती, जैन वृत्ती, नवबौद्ध वृत्ती, मराठा वृत्ती अशावर अभ्यासपुर्ण माहिती येण्याची अपेक्षा करतोय. विजुभौंनी इथेच किंवा सरळ एक नवा लेख लिहुन ह्या सर्व वृतींविषयी आपले अभ्यासु मत मांडुन थोडे ज्ञान तुषार आमच्यावार शिंपडावेत अशी प्रार्थना करतो.
31 Oct 2010 - 12:25 pm | मिहिर
मला तर कायम तो केवळ मुंबईचे प्रतिनिधित्व करत असल्याचे वाटतो.
29 Oct 2010 - 2:50 pm | नितिन थत्ते
सकाळ ब्राह्मणी विचारांचे आहे असे मला वाटत नाही. पवारांनी १९८५ च्या आसपास सकाळ परुळेकरांकडून ताब्यात घेतला. त्यापूर्वी ते हिंदुत्ववादी विचारांचे वर्तमानपत्र होते.
परंतु ते ब्राह्मणी विचारांचे आहे म्हणून पुणेकर ते वाचतात हे म्हणणे तद्दन चुकीचे आहे. ते "पुण्याचे" वर्तमानपत्र आहे म्हणून पुणेकर ते वाचतात. (जाज्ज्वल्य अभिमान, विजुभौ). :)
31 Oct 2010 - 12:18 am | चिंतामणी
त्यापूर्वी ते हिंदुत्ववादी विचारांचे वर्तमानपत्र होते. हे कोणी सांगितले थत्ते चाचा तुम्हाला?
मी गेली ४० वर्षापेक्शा जास्त काळ (पहीली काहे वर्षे सोडुन दिली आहेत. ) वाचत आहे. सकाळ कधीच हिंदुत्ववादी विचारसरणीचा नव्हता. असेलच प्रभाव तर समाजवादी विचारसरणीचा होता.
तुमच्या अभ्यासु नजरेला कुठे दिसला हिंदुत्ववाद हे जर माझ्यासारख्यांना सप्रमाण दाखवले तर आमच्या ज्ञानात भर पडेल.
29 Oct 2010 - 3:12 pm | मृत्युन्जय
"सकाळ निष्पक्ष आहे " हा एक मोठा विनोद आहे. सकाळ निष्पक्ष असेल तर तो केवळ कोणतेच धोरण नसल्यामुळे. एक बीनबुडाचे ;ब्राम्हणी विचारांचे वर्तमानपत्र ही सकाळची खरी ओळख आहे. पुणेकराना तसे सोयीस्कर धोरण मंजूर आहे यामुळे सकाळचा पुण्यात फार्फार उदोउदो होतो.
आपण प्रतिसाद वाचुन प्रतिसाद देता की असेच डोळे बंद करुन ठोकता? मी कुठे बरे असे म्हणले आहे की सकाळ निष्पक्ष आहे?
29 Oct 2010 - 8:26 pm | विजुभाऊ
मी कुठे बरे असे म्हणले आहे की सकाळ निष्पक्ष आहे?
ओ साहेब तुमच्या लिखाणातले हे एक वाक्य बघाना
लोकसत्तापेक्षा सकाळ १०० पटींनी चांगला. तो किमान निष्पक्ष तरी वाटतो.
याचा अर्थ म्या पामराना काय घ्यावा.
सकाळ निष्पक्ष असू शकेल कारण तो कुठलीच बाजू मांडत नाही.
29 Oct 2010 - 10:16 pm | मृत्युन्जय
दादा कमाल आहे. तुम्हाला दुसर्यांदा वाचल्यावर पण नसेल कळले तर कमाल आहे तुमच्या निरीक्षणशक्तीची आणि वाचनाची. मी निष्पक्ष वाटतो असे म्हणले आहे. निष्पक्ष आहे असे नाही. आणि ते सुद्धा प्रभात बद्द्ल. असले काहीतरी अर्धवट वाचता आणि मग पावशेर प्रतिक्रिया देता. लक्षात आणुन दिल्यावर तरी नीट वाचावे ना. तरी तुम्हाला अजुनही नीट सापडणार नसेल तर वाक्य जसेच्या तसे डकवतो:
मी लोकसत्ताच वाचणे सोडुन दिले. सकाल सोडुन लोकसत्ता सुरु केला तेव्हा कळाले की लोकसत्तापेक्षा सकाळ १०० पटींनी चांगला. सध्या प्रभात वाचतो आहे. तो किमान निष्पक्ष तरी वाटतो.
आता तुम्ही पामराने काय निष्कर्ष काढावा त्याबद्दल काय लिहिणार? मी फक्त एवढाच निष्कर्ष काढु शकतो की तुम्हाला जे वाचायचे असेल तेच दिसते. अर्धवट वाचता तुम्ही.
आणि वर दिशाभूल कशाला करता लोकांची? असा चोरटेपणा नाही ना करायचा मग. चुकीची वाक्ये खुशाल माझी म्हणुन नाही डकवायची ना.
29 Oct 2010 - 9:25 am | ढब्बू पैसा
लोकसत्तेचं "संघप्रेम" काही नवीन नाहीच्चे!
29 Oct 2010 - 9:53 am | प्रचेतस
लोकसत्तेच्या कांग्रेजी धार्जिण्या अग्रलेखांना सामन्याच्या अग्रलेखातून दिलेले प्रत्युत्तर येथे वाचा.
कुमार केतकरांची निस्पृह पत्रकारीता व निष्ठा गांधी कुटुंबियांवरील निष्ठा पाहून डोळे पाणावले :). त्यातच सामन्याच्या अग्रलेखामुळे खदखदून हसलो.
अवांतर: अग्रलेख पक्षपाती असले तरी लोकसत्तेच्या शनिवार, रविवारच्या पुरवण्या वाचनीयच असतात असे आमचे मत. त्यामुळे लोकसत्ता घ्यावा तो विकांतालाच.
29 Oct 2010 - 10:09 am | चिरोटा
ओबामा बेंगळूरला येणार नाहीत कारण इकडचा भ्रष्टाचार्?मग महाराष्टात(मुंबईत) ओबामा यायचे कारण राष्ट्रवादी/कॉंग्रेसचा "स्वच्छ" कारभार?
केतकरांना काय झालय तरी काय्?आणि मोदींना व्हिसा नाकारला म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटायचे कारण काय्?तो भारताचाच अप्रत्यक्ष अपमान नाही का?
29 Oct 2010 - 10:40 am | स्पा
माझ्यामते......
70% मराठी मुंबईकर....... "म टा " वाचतात........................
29 Oct 2010 - 10:42 am | चिरोटा
उरलेले ३०% वाचले.
29 Oct 2010 - 10:45 am | स्पा
पत्र नवे स्मार्ट मित्र............. ;)
29 Oct 2010 - 12:39 pm | भारी समर्थ
नवे नव्हे, तर नव्हे!!!!
बाकी या नव्हेचा उच्चार सगळेच 'न्हवे' असाच करतात, मग आपण नव्हे असे का लिहीतो? मंडळी, ही दुरूस्ती व्हाया हवी.
सुकोबा म्हणून गेलेच आहेत की,
'बोले तैसा टंके त्याची वंदावी पाऊले'
बोला, हरी विट्ठल!!!
भारी समर्थ
29 Oct 2010 - 10:53 am | स्वैर परी
लोकसत्ता -> काँग्रेस
सामना -> शिवसेना
प्रहार -> नारायण राणे
आणखी बरेच आहेत.. हे लोक नक्कि वर्तनान पत्र प्रकाशित करतात, कि पक्शाचा प्रचार करतात???
29 Oct 2010 - 10:56 am | नितिन थत्ते
पूर्वी वर्तमान पत्रे नेहमीच आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी असत. उदा. केसरी, मराठा, यंग इंडिया, सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ निबंधात उल्लेख येणारे गोरक्षण वगैरे.
29 Oct 2010 - 11:30 am | Dhananjay Borgaonkar
सकाळ -> काँग्रेस व राष्ट्रवादी.
29 Oct 2010 - 11:32 am | Dhananjay Borgaonkar
सध्या द हिंदु बरा वाटतो. बाकी सगळे पुचाट.
29 Oct 2010 - 11:32 am | चिंतातुर जंतू
आजच्या लोकसत्ताचं मुखपृष्ठ हे अशोक चव्हाणांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी आहे. छोट्या टायपात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू सुध्दा आहेत, पण भर काँग्रेसच्या अशोक चव्हाणांवर आहे. त्या तुलनेत सकाळची पहिली बातमी भेसळयुक्त खव्याची आहे आणि या प्रकरणासंबंधित बातमीत आव्हाडांचं नाव अर्थात नाही.
29 Oct 2010 - 11:57 am | प्रशु
ह्याच लोकसत्तेत सुनिल चावके नामक कोणी एक तथाकथित पत्रकार लेख लिहितो. त्याचे लेख म्हणजे (कु)सुमार केतकरांचे अग्रलेख परवडले म्हणायची वेळ आणतात.... गांधी घराण्याची हुजरेगिरीची परिसीमा असते त्यात......
29 Oct 2010 - 12:04 pm | विकाल
लोकल मध्ये वाचत असतानाच यावर काही लिहावे वाट्ले होते....! अगदी विनोदी आहे हा लेख... आवरा सदरात प्रकाशित व्हायला उत्तम!
काही नमुने....
१."...परंतु कर्नाटकमधील बेसुमार भ्रष्टाचार आणि भाजप सरकारची बेबंदशाही पाहून, ओबामांच्या सल्लागारांनी बंगळुरू भेट रद्द करण्याचा सल्ला त्यांना दिला असेल"
२."मोदींच्या अचाट कार्यक्षमतेचे कौतुक हा आता भारतीय मध्यमवर्गाचाही एक राजकीय छंद झाला आहे."
म्ह्ण्जे नक्की काय...?
३. "अशा मोदींच्या गुजरातला अमेरिकेच्या अध्यक्षांनी भेट दिली असती तर ती भेट ही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नेपथ्यरचना करण्यासाठी भाजपला उपयोगी ठरली असती आणि मोदींच्या पंतप्रधान होण्याला अमेरिकेचा आशीर्वाद आहे, असा आविर्भाव भाजपने व जागतिक गुजराती समाजाने आणला असता"
अतीच झाल ना जरा..
४.मोदींच्या ‘ग्रेट गुजरात’ला मुस्लिमांवरच्या संघटित व नियोजित हल्ल्याचा कॅनव्हास नसता तर ओबामा गुजरातला गेलेच असते;
५."म्हणजेच दोन वर्षांनी, नवीन अध्यक्षासाठी हे सर्व अनिवासी गुजराती, त्या वेळच्या उमेदवारांभोवती गरबा खेळू लागतील. कारण त्यांना भारत-अमेरिका संबंधांपेक्षा गुजरात-अमेरिका असे समांतर संबंध प्रस्थापित करायचे आहेत. भारताचे पंतप्रधानपद मिळविण्यासाठी मोदींचीही ती गरज आहे!'
हा कहर आहे...!
29 Oct 2010 - 12:41 pm | समंजस
काळात क्वचितच एखाद दोन वर्तमान पत्रे असतील की जी फक्त आणि फक्त बातम्या आहेत तशाच छापतात अन्यथा सर्वच वर्तमान पत्र, मासिके चालविण्या मागे राजकीय फायदा मिळवणे, आर्थिक फायदा मिळवणे हाच हेतु आहे आणि तो स्पष्ट आहे.
राहीला प्रश्न काँग्रेस ने भाजपाला किंवा इतर कोणत्याही पक्षाला जातियवादी म्हणण्याचा तर विकासाच्या मुद्दांवर बोलायला टाळणे हे काँग्रेस ला आवश्यक आहे कारण त्यांना माहित आहे की फक्त या मुद्यावर बोलल्यास बहूमत मिळवणं कठीण त्या करीता हुकमी एक्का म्हणजे जातियवाद या वर बोलणे. बहुजन समाज, मागासवर्गिय समाज, आदिवासी समाज यांना भिती घालणे की काँग्रेस ला मतं नाहि दिलीत तर उच्च वर्णियांचं राज्य परत येइल आणि उच्च वर्णियांचं राज्य परत आल्यास ५०-१०० वर्षांपुर्वी जी परिस्थीति होती ती परत निर्माण होईल आणि बहुजन समाज, मागासवर्गिय समाज, आदिवासी समाज यांना मागे ठेवल्या जाईल, त्यांना शिक्षणापासून वंचीत ठेवले जाईल, त्यांना समाजात सन्मानाने जगू दिले जाणार नाही, त्यांना परत जाती आधारीत कामे दिली जातील. अश्या प्रकारची भिती घालून मते मिळवीणे, पर्यायाने सत्ता मिळवणे आणि नंतर विकास कार्याकडे नेहमी प्रमाणे दुर्ल़क्ष करणे आणि स्वकीयांचे खिशे भरणे हे कार्य करत राहणे.
बहुजन समाज, मागासवर्गिय समाज, आदिवासी समाज यातच समाधानी की ५०-१०० वर्षांपुर्वी सारखी परिस्थीती नाहीय, त्यांना जाती आधारीत भेदभावाचं जिवन जगावं लागत नाहीय. राहीला प्रश्न आर्थिक विकासाचा तर तो सुद्धा हळू हळू होईलच?
29 Oct 2010 - 1:06 pm | नितिन थत्ते
>>त्यांना समाजात सन्मानाने जगू दिले जाणार नाही, त्यांना परत जाती आधारीत कामे दिली जातील. अश्या प्रकारची भिती घालून
भीती कशाला घालायला हवी? प्राचीन भारतीय संस्कृतीवर आधारलेल्या समाजाची उभारणी करण्याचे (हिंदू राष्ट्राचे) उद्दिष्ट असल्याचे हिंदुत्ववादी स्वतःच सांगत असतात. आता "प्राचीन भारतीय संस्कृतीवर आधारलेल्या" म्हणजे नक्की काय हे जरासे स्पष्ट करून सांगावे लागते इतकेच. ;)
आजतागायत जेथे हिंदुत्ववाद्यांनी राज्य मिळवले तेथे असे काही केले नाही ही गोष्ट खरी आहे. पण ती बहुतांश आघाडीची सरकारे होती (ही कारणमीमांसाही हेच लोक त्यांच्या व्होट बँकेला देतात). शत प्रतिशत राज्य मिळाल्यास काय करण्यात येईल हे ठाऊक नाही.
29 Oct 2010 - 1:45 pm | समंजस
<<< शत प्रतिशत राज्य मिळाल्यास काय करण्यात येईल हे ठाऊक नाही.
>>हिच ती भिती ज्यावर काँग्रेसला आतापर्यंत बहुमत मिळवता आलंय :)
परंतू यात परत नुकसान झालंय ते शेवटी बहुजन समाज, मागासवर्गिय समाज, आदिवासी समाज यातील आर्थिक दृष्टया मागे पडलेल्या लोकांचच. कारण ही भिती घालून सत्ता मिळवता येत असल्यामुळे काँग्रेस नेत्यांना जनतेचा विकास करणे आवश्यक वाटत नाही. ही जनता अजूनही दारिद्र्यातच आहे. पुर्वी आणि आता जास्त फरक नाही. जनता तेव्हाही दरिद्री होती आताही आहे. फरक तो एवढाच की सत्ता गाजवणारे बदललेत.
29 Oct 2010 - 4:41 pm | विकास
बाकी नितीनरावांच्या प्रतिसादात आणि कुमारसत्तेच्या अग्रलेखात एक साम्य आढळले: विषय काही चालला असुंदेत गाडी हिंदूत्व, हिंदू, संघावर येते... ;)
29 Oct 2010 - 11:11 pm | नितिन थत्ते
चालायचेच.
30 Oct 2010 - 3:50 pm | हंस
नाही हो थत्तेकाका.......घसरायचेच...(हे बरोबर वाटते)
30 Oct 2010 - 11:32 am | अवलिया
थत्ते "हिंदूद्वेष्टाप्रतिसादसम्राट" आहेत असे तुम्ही सुचवत आहात का? ;)
30 Oct 2010 - 2:55 pm | नितिन थत्ते
हॅ हॅ हॅ.
कसचं ! कसचं !!
30 Oct 2010 - 3:33 pm | विकास
थत्ते "हिंदूद्वेष्टाप्रतिसादसम्राट" आहेत असे तुम्ही सुचवत आहात का?
हिंदूद्वेष्ट्पणा ही कोणी एक व्यक्ती नसून वृत्ती आहे. ;)
31 Oct 2010 - 2:05 pm | अप्पा जोगळेकर
अगदी अगदी. सहमत आहे.
29 Oct 2010 - 7:32 pm | तर्री
भा. ज. प चे वहूतांश नेते हे ओ.बी.सी आहेत.
गेल्या ४ लोकसभांमध्ये काँग्रेस पेक्षा भा.ज.पा. चे अधिक मागास / इ.मगास / भटके खासदार आहेत.
भा.ज.प.च्या महिला पदाधिकारी व निर्वाचित अधिकारी काँग्रेस च्या २ पट आहेत.
विचार करण्यची बाब आहे .
"प्राचीन भारतीय संस्कृतीवर आधारलेल्या " म्हणजे मनु संस्कृती असेल तर आपल्या बाबासाहेबांची घटना त्या कोणा मनु ला पुरून ऊरणारी आहे हो.
29 Oct 2010 - 1:59 pm | झुणका भाकर
लोकसत्तेच्या शनिवार, रविवारच्या पुरवण्या वाचनीयच असतात....
पण त्याही आता पुर्वी सारख्या नसतात...
पुर्वी त्यात जयराज साळ्गावकर, प्रसाद कुलकर्णी लिहायचे.
अजुन कोणीतरी ईग्रजी चित्रपटाविषयी लिहायचे..
29 Oct 2010 - 2:02 pm | Parag Purandare
लोकसत्तेचे दिवस भरत आले आहेत. पुण्यात आता फक्त ५०००/६००० अन्क खपतात. मुम्बइ मधिल खप पण निम्मा झालाय.
केतकरान्नि लोकसत्ता बन्द करायचे फारच मनावर घेतलेले दिसतेय.
30 Oct 2010 - 5:05 pm | ओम८६
>> पुण्यात आता फक्त ५०००/६००० अन्क खपतात
वचून मजा वाटली ... :)
ही माहिती (?) कुठून मिळाली बरे ?
29 Oct 2010 - 2:29 pm | योगी९००
सुमार अग्रलेख.. अणि काय अपेक्षा ठेवणार..
त्या कॉग्रेसवाल्यांना कोणीतरी सांगारे ..की घेऊन टाका त्या सुमार केतकरांना एकदाचे राज्यसभेवर...सुमार साहेब किती म्हणजे किती चाटूगिरी करणार? जरा त्यांच्या चाटूगिरीची काहीतरी किंमत द्या रे त्यांना..
29 Oct 2010 - 9:25 pm | इंटरनेटस्नेही
इतका विचार करण्यापरीस काही 'रोचक' पुस्तके वाचलेली काय वाईट?
;)
29 Oct 2010 - 10:17 pm | हुप्प्या
मागे एकदा महासम्राज्ञी सोनिया देवींचे पोट कुण्यातरी पाप्याची नजर लागून खराब झाले तेव्हा सुमाररावांनी
सोनियांच्या जुलाबापुढे मोदींचा गुलाबही फिका अशा शीर्षकाचा अग्रलेख लिहिल्याचे अंधुकसे आठवते. त्या बीमार अग्रलेखात सुमारजींची प्रतिभा ढाळ लागल्यासारखी बेसुमार वाहत होती. धर्मांध हिंदुत्ववाद्यांना आपल्या कोत्या विचारांचा बद्धकोष्ट झाला आहे त्यांना ह्या अतिसाराची उत्कटता समजणारच नाही. सरतेशेवटी सगळी चूक भाजपा, रास्वसंघ आणि नथुराम गोडशांचीच कशी आहे असे लिहून आपल्या विचारांचे नि:स्सारण केले. देवींच्या आजाराचे निमित्त करुन धर्मांध लोकांना वैचारिक जमालगोटा देण्याची अदभूत प्रतिभा ह्या हकीमाला अवगत आहे ह्यात शंकाच नको.
आता अगदी महाराज्ञी झाली तरी त्यांच्या पोटाच्या विकाराचे इतके गोडवे गाणे जऽऽऽऽरा जास्तच होतय असे नाही वाटत?
असो. पराकोटीचा भक्तीभाव असला की देवाचे सगळे काही कौतुकास्पद वाटू लागते.
29 Oct 2010 - 11:06 pm | अडगळ
पण वाचताना किळस आली. नावडत्या व्यक्ती - विचाराला मलमूत्राच्या उपमा दिल्याने फार काही बोलण्याला धार येईल असे वाटत नाही.
केतकर पटतात / न पटतात हा भाग वेगळा पण ते चांगली मराठी तरी लिहतात.
बाकी चालू दे.
29 Oct 2010 - 11:42 pm | प्रिया देशपांडे
हेच म्हणते. टोकाला जायचे आणि स्वतःच्या पायावर दगड मारुन घ्यायचा ही हिंदुत्ववाद्यांची वृत्ती असते असे सर म्हणतात.
30 Oct 2010 - 10:37 am | पंख
कोणते सर ?
30 Oct 2010 - 11:31 am | इनोबा म्हणे
केतकरांच्या शिष्या असाव्यात बहूधा. ;)
30 Oct 2010 - 9:02 am | स्वानन्द
असहमत.
त्यांनी ती उत्प्रेक्षा वापरली कारण सुमारांनी त्याच विषयाच्या संदर्भात अग्रलेख लिहीला होता. असो.
30 Oct 2010 - 10:14 am | इनोबा म्हणे
चला, सुमारांचा टिआरपी थोडा तरी वाढला.
हिंदूत्ववाद्यांना शिव्या देण्यासाठी सुमारांना स्वतः इथे यावे लागत नाही हे बरे झाले. त्यांच्या सुदैवाने ते काम करायला इथे त्यांचे भरपूर अनूयायी आहेत.
30 Oct 2010 - 11:31 am | अवलिया
अगदी सहमत आहे.
30 Oct 2010 - 11:56 am | sagarparadkar
राज्यसभेच्या जागेसाठी एव्हढा लाळ्घोटेपणा कोणी केलेला पाहिला नव्हता ... मला तर एकदम 'HMV' चा लोगोच आठवतो ...:)
30 Oct 2010 - 5:26 pm | विकि
राज्यसभेच्या जागेसाठी एव्हढा लाळ्घोटेपणा कोणी केलेला पाहिला नव्हता ... मला तर एकदम 'HMV' चा लोगोच आठवतो ...
हे जे केतकरांबद्दल लिहीले आहे ते चुकीचं आहे. तुम्ही ठामपणे हे कसं सांगू शकता ? जर केतकरांना राज्यसभेचा खासदार व्हायचं असतं तर ते केव्हाचं होऊ शकले असते. इतकी वर्ष थांबले नसते. हे लक्षात असू द्या. आज मराठी वृत्तपत्रात केतकर या एकाच संपादकाचं नाव घेतलं जातं.
31 Oct 2010 - 4:51 am | विकास
नमस्कार कॉम्रेड साहेब, आज एकदम अलभ्य लाभ झाला!
जर केतकरांना राज्यसभेचा खासदार व्हायचं असतं तर ते केव्हाचं होऊ शकले असते. इतकी वर्ष थांबले नसते.
त्यांच्या मनात आले की तात्काळ ते राज्यसभेचे खासदारच काय सभापतीपण (aka राष्ट्रपती) होऊ शकतील याची खात्री आहे. :-) .
आज मराठी वृत्तपत्रात केतकर या एकाच संपादकाचं नाव घेतलं जातं.
सहमत. "एकाच संपादकाचे" नाव घेतले जात आहे. :-)
31 Oct 2010 - 8:12 am | चिंतामणी
त्यांच्या मनात आले की तात्काळ ते राज्यसभेचे खासदारच काय सभापतीपण (aka राष्ट्रपती) होऊ शकतील याची खात्री आहे.
राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती असतात. राष्ट्रपती नव्हे.
बाकी भा. पो. :)
31 Oct 2010 - 7:46 pm | विकास
राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती असतात. राष्ट्रपती नव्हे.
चूक झाली! तसेच म्हणायचे होते पण गोंधळ झाला. नजरेत आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :-)